असेही एक पैलतीर

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
23 May 2008 - 8:46 am

असेही एक पैलतीर

काळसागर अथांग आहे. ह्या अथांग सागराच्या दूरच्या किनार्‍यावरील लोकांना एकदा इकडच्या पैलतीराचे दर्शन घडले ते असे.......

*********************************************
रियल होम ड्रामा ई एडीशन 12 फेबृवारी 2106
"थ्री डी ड्रामा"च्या फ्रेश ईन्टरनेट इशूत हंड्रेड इयर्‍स ऍगो टीव्ही वर प्रोग्राम कसे होते ह्याचा एक एन्टरटेनींग विडीयोग्राम आला होता. त्याची वीजूअल लीन्क इथे दिली आहे.---> :-C
*********************************************

दादर 3 जानेवारी 2106
दादर म्युनीसीकॉन्सीलच्या ट्वेन्टीफीफ्थ बर्थडेला दादरचे मेयर भिकाजी खताडे ह्यांनी ओपन केली हंड्रेड
इयर्‍स ऍगो बरी केलेली टाईम कॅपसुल. त्या टाईम कॅपसुल मधे आर्टीकल होता कॉन्टेम्पोरेरी ईन्डीयातल्या टीव्हीचा. "टीव्ही ऑल टाईम" या चॅनेलवर त्या इरात स्क्रीन करायचे सोशल सोप ऑपेरा. ऑब्वीयसली तेव्हा आजचा रिऍलिटी थ्री डी व्ही टीव्ही नव्ह्ता. पब्लीक पहायची सोशल ड्रामा तेव्हा टॉकीन्ग पिक्चर् मधे फ्लॅट स्क्रीनवर.

"टीव्ही ऑल टाईम" होती ही त्या टाईमची एक फेमस कंपनी. कंपनीच्या ऍन्युअल मॅगेझीनमधे एक आर्टीकल होता. कॉन्टेम्पोरेरी सोशल लाइफ पोर्ट्रे करणार्‍या सिरीयल विषयी. हा आर्टीकल मिळाला टाइम कॅपसुल मधे. ह्या आर्टीकल मधे फर्स्ट हॅन्ड अकौन्ट हिस्टौरिकल पिरीयड्च्या टीव्ही सोशल ड्रामाचा डिसकव्हर झाला. हे आहे मार्व्हलस रेफरन्स फाउन्ड ड्रामा हिस्टरीच्या स्टुडन्टसाठी.

ओरीजीनल आर्टीकल ओल्ड मराठीत होते. हिस्टरीचा परस्पेक्टीव्ह इन्टॅक्ट रहावा म्हणून ईन्गराठीत ट्रान्स्लेट नाही केले. काही पार्ट ओल्ड मराठी आर्टीकलचा दिला आहे पुढे. रीडरला फील येईल ओल्ड मराठीचा हे रीड केल्यावर. हार्ड असेल जर फॉलो करायला ओल्ड मराठीचे वर्डस तर ईन्गराठी ट्रान्स्लेशन एव्हेलेबल आहे. लीन्क ---> :-C वर क्लीका. जर हवा असेल फुल आर्टीकलचा ईन्गराठी डायरेक्ट ब्रेनकॉन, तर ब्रेन डाउनलोडची ऑर्डर द्या, डायल करून कन्ट्रोल नंबर 56230 तुमच्या पर्सनल ब्रेननॉन कन्सोलवर.

*************************************
क्रमशः

कथाविनोदजीवनमानविज्ञानज्योतिषप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छामाध्यमवेधसंदर्भ

प्रतिक्रिया

सुमीत's picture

23 May 2008 - 1:48 pm | सुमीत

तुम्ही खरोखर काळ प्रवास करून आलात का? असलात तर मराठीची फार दैनावस्था झालेली आहे.
बरे आमचे रायगड, राजगड, तोरणा तरी उभे आहेत काय की त्यांची होटेले झालेली आहेत?

दुर्गप्रेमी
सुमीत

ऋचा's picture

23 May 2008 - 1:56 pm | ऋचा

#:S

काय हे????

अरुण मनोहर's picture

23 May 2008 - 3:27 pm | अरुण मनोहर

पहा ना! काय हे? मराठीची दुर्दशा ही माझी करणी नव्हे हं! कृपया बातमीदाराला गोळी मारू नये. :H

आवडाबाई's picture

23 May 2008 - 2:46 pm | आवडाबाई

बरी केलेली टाईम कॅपसुल =))

आवडलं !!

बिपिन कार्यकर्ते's picture

23 May 2008 - 3:12 pm | बिपिन कार्यकर्ते

मॅन मी तर कन्फ्यूजच :/ झालो... बिगिनिन्गला काही अंडरस्टँडच झालं नाही तरी रीड करत राहिलो, मग फनी वाटलं... नेक्स्ट पार्ट कधी राईट करणार?

बाय द वे, तुमच्या लींकांवर क्लिकून क्लिकून बघितलं... काहीच नाही झालं... =)) :D

बिपिन.

अरुण मनोहर's picture

23 May 2008 - 3:31 pm | अरुण मनोहर

>>>बाय द वे, तुमच्या लींकांवर क्लिकून क्लिकून बघितलं... काहीच नाही झालं...

सरपंचांना विचारा. फ्युचर सिस्टीमच्या क्लीका त्यांच्या ओल्ड बाबा आदमच्या कंप्युटर वर काम करत नाही त्याला आम्ही काय करणार?
:)) :))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 May 2008 - 3:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरुणराव कशाबद्दल लिहिले आहे, काही समजेल असे सांगाल काय ?
बरं लिंकवर क्लिक केले तर काहीच हालचाल नाही !!! :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋचा's picture

23 May 2008 - 3:41 pm | ऋचा

आहो भाऊ हे वाचताना डोक्याची पार मंडई झाली.
तरीबी काय उमगना ~X(

अरुण मनोहर's picture

23 May 2008 - 3:49 pm | अरुण मनोहर

ऋचा आणि प्राध्यापक साहेब,

सबर का फल मिठा होता है. जरा थांबा दुसर्‍या एपिसोडसाठी.

मन's picture

23 May 2008 - 4:42 pm | मन

फ्रेश सब्जेक्ट आणि सिम्पल प्रेझेंटेशन बद्दल आणखी काय कमेंट देणार?
केवळ आयडियाशीर स्टाइलने केलेले रायटिंग फंटास्टिक म्याच झालय.
ही वरची दोन सेंटंन्स इंटरप्रीट करीत बसल्याने तुमच्या ब्रेनचे भुसभुशीत बर्गर बनल्यास प्रस्तुत रायटर (म्हंजे मी)
कलप्रिट नसुन वाचणारे रीडर्सच स्टुपिडिटी प्रदर्शन करताहेत असे प्रूव होते.

ह.घ्या् हे.वे.सां . न.ल.

युवर्सचाच,
माइंडोबा
(मनोबा)

चतुरंग's picture

23 May 2008 - 8:18 pm | चतुरंग

नेक्स्ट भागासाठी वेटून आहे! :W

चतुरंग

मन's picture

23 May 2008 - 8:42 pm | मन

रूटला हँड घालुन थिंक केलं तर माइंडमध्ये येइल की आपल्या लँग्वेजमधुन कम्युनिकेट करण्यासाठी एखाद्या अदर लँग्वेजचा
सपोर्ट घेणं किती शेमास्पद आहे ते.

अरे तुम्हाला काय आयडेंटिटी आहे का नाय?

तुम्हा ऑलचा थ्री वार
प्रोस्टेट
प्रोटेस्ट
प्रोटेस्ट

आपलाच,
माइंडोबा

अरुण मनोहर's picture

24 May 2008 - 2:20 am | अरुण मनोहर

खर तर हा लेख माझा पण एक "हटके" केलेला विरोध आहे. विरोध आहे सुधारणेच्या नावाखाली चाललेल्या मराठीच्या संवेदनाशून्य कत्तलीला. विरोध आहे मूर्ख पेटीने समाजावर लादलेल्या अपरिवर्तनीय आणि असंस्कृत विच्छेदनाचा.

झी टीव्ही वर कधी बातम्या ऐकल्यात? नसल्या तर फार छान केलेत. मुळीच ऐकू नका. "जज अपना वर्डीक्ट फोर डेजके बाद सुनाएंगे" अशी वाह्यात रचना असते. उगवती मराठी पिढीही ह्या अनुकरणापासून फार दूर नाही. शंभर वर्षांनी आणखी काय होणार आहे?

समाजाचे आणखी एक कतलेआम टीव्ही मालिकांमुळे आजच्या काळात घडत आहे. मात्र आजुबाजुला घडत असूनही ते आम्हाला दिसत नाही. (काळात) फार दूरवर जाऊन कदाचित ते नीट दिसू शकेल. ह्या आशेने "असेही एक पैलतीर" च्या पुढच्या भागात समाजाच्या पद्धतशीरपणे चाललेल्या कत्तलीचे दूरवरून घेतलेले चित्र आहे.

ककाराचा विकार जडलेल्या कुजकट मालिकांच्या विरोधात शहाणा समाज केव्हा उभा रहाणार आहे कोण जाणे!

-- विदीर्ण.

देवदत्त's picture

23 May 2008 - 8:43 pm | देवदत्त

अरे बापरे, एवढे पुढारलेले इंग्राठी?

पुलंच्या अघळपघळ मधील सोन्या बागलाणकरचे वाक्य आठवले.
मराठी लँग्वेजमधून आपले थॉट्स जेवढ्या क्लिअरली एक्स्प्रेस करता येता ते दुसर्‍या लँग्वेजमधून नाही.
त्या मानाने १५० वर्षांत जास्त बदल नाही झाला हो.

आणि विज्ञानाची प्रगती तर काय? ह्यातील सर्व काही होऊ शकते.
बघूया, 'लव स्टोरी २०५०' मध्येही असे काही दाखवतात का?

धनंजय's picture

24 May 2008 - 2:20 am | धनंजय

आजच्या व्याकरणाशी मिळतेजुळते मराठी व्याकरण आहे. हेही नसे थोडके.

> ह्या आर्टीकल मधे फर्स्ट हॅन्ड अकौन्ट हिस्टौरिकल पिरीयड्च्या टीव्ही सोशल ड्रामाचा डिसकव्हर झाला.
ऐवजी
ह्या आर्टीकल मधे फर्स्ट हॅन्ड अकौन्ट हिस्टौरिकल पिरीयड्च्या टीव्ही सोशल ड्रामाची डिसकव्हरी झाली.

> त्या टाईम कॅपसुल मधे आर्टीकल होता कॉन्टेम्पोरेरी ईन्डीयातल्या टीव्हीचा.
ऐवजी
त्या टाईम कॅपसुल मधे कॉन्टेम्पोरेरी ईन्डीयातल्या टीव्हीचा आर्टीकल होता.
असे लिहिले असते तर जरा बरे वाटले असते. अशी थोडीच काही वाक्ये बरी करावीत, म्हणजे त्या काळातल्या म्हतार्‍याकोतार्‍यांची सोय होईल.

त्याच काळात दुसर्‍या एका वर्तमानपत्रात हीच बातमी अशी काही आली :

Dadar, 3 janevari 2106
Bhikaji Khatade, Mahapaur of Dadar, has made ughad a kaalkupi that had been dafaned shambhar varshes ago. There was a lekh about taatkaalik bharatiya doordarshan in the kaalkupi...

राजे's picture

24 May 2008 - 5:05 pm | राजे (not verified)

बाय द वे.. ही आयडीया धासू आहे बर का !
पण मिस्टेकल्ली तुम्ही पॉईन्ट व्यवस्थीत पण प्रेझेंट केला नाही त्यामुळे मेंबरना फस्ट टाईम कळण्यासाठी प्राब्लम होत आहे...! नो मॉटर !

=)) :))

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

आज मराठी "दीन" आहे म्हणे. चिरा यू होणार म्हणे.