पहिला भाग येथे मिळेल.----> http://www.misalpav.com/node/1865
दुसरा भाग येथे मिळेल.----> http://www.misalpav.com/node/1868
सामाजिक मालिका --- काही आराखडे
टी व्ही ऑल टाईम
सिरीयल्स प्रोड्युसिंग कोर्सवेअर डिसेंबर २००८
वाढता वाढता वाढे
सामाजिक सिरीयल्स म्हणजे टी व्ही ऒलटाइमची ब्रेड बटर उत्पादने आहेत. त्यामुळे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त एपिसोड्स करुन सिरीयलवर जाहिरातीचे उत्पन्न वाढवता येते.
ह्याचे उत्तम तंत्र टी व्ही ऒलटाइमने साधले आहे. ह्यालाच काही टवाळ लोक पाणी घालून वाढवण्याचे तंत्र असेही म्हणतात. टवाळकीचा भाग सोडला तर हे तंत्र प्रोड्युसरसाठी जीवन (पाणी) आहे ह्यात शंका नाही. ह्या तंत्राचे काही दाखले पुढे दिले आहेत.
- पुर्वी झालेलेच प्रसंग आठवणीच्या नावाखाली पुन्हा पुन्हा दाखवणे. ह्यासाठी सेपिया फ़टॊग्राफ़ी वापरून तपकिरी रंगात तीच ती द्रष्ये रिपीट करावीत.
- काहीही कारण न देता पुर्वीचे प्रसंग दाखवणे. ज्या प्रेक्षकंचे पुर्वीचे एपिसोड्स मिस झाले असतात, त्य़ांना मिस झालेले भाग पुन्हा पहायला मिळतात.
- गाणी टाकून गाण्यांमधे पुर्वीचे प्रसंग दाखवणे. गाणी चित्रीकरणाचा खर्चही वाचतो. सिरीयलचे फ़ुटेज वाढतेच.
- एकदा मारलेली झापड एकामागून एक तीनदा दाखवावी. त्यावेळी पात्राच्या चेहरा फ़ेड इन फ़ेड आउट करावा. किंवा भसाभसा लाइटची उघडझाप किंवा ढणाढण म्युझीक वगैरे तंत्रे वापरली म्हणजे सिरीयल लांबते. शिवाय पात्राला कुशल अभिनय करायची गरज रहात नाही.
- एकच प्रसंग तीनदा दाखवणे. हा तीन पात्रांच्या द्रष्टीतून दाखवला जातो. फ़ुटेज वाढतेच आणखी दिग्दर्शक कसा विविध ऎन्गल्सने सिचुएशन कवर करतोय म्हणून प्रेक्षक खुष होतात.
- तुकड्या तुकड्याने गाणी पेरावीत. वेगळ्या गाण्यांवर खर्च न करता, तेच गाणे पुन्हा पुन्हा वाजवावे. पात्र गात असतांना जुने प्रसंग रिपीट दाखवायला विसरू नये. पहा- "आप कहना क्य़ा चाहते है" मधले तुम्हारी अदा.... हे गाणे. तीनशे एपिसोडम्धे हे गाणे नउशे साठ वेळा वाजवले. म्हणजे गाण्याचा वेळ एकत्रीत केला तर ३०० पैकी ९६ एपिसोड ह्या गाण्यावर धकले. "वाढता वाढता वाढे" तंत्र वापरून केलेला हा एक जागतीक विक्रम आहे.
- दुसरा एपिसोड सुरू होतांना आधीच्या एपिसोड्च्या शेवटाचे तीन मिनीट पुन्हा दाखवायचे. वीस मिनटाच्या एपिसोड मधे १५% फ़ुटेज फ़ुकटात वाढते.
- पात्र विचार करते आहे, आठवण काढते आहे, रागावले आहे, झोपाळले आहे अशा विविध माइलस्टोनच्या बॆकग्राउंडवर काहीही विषेश न होउ देता केवळ म्युझीक व पात्राचे चार पाच क्लोज अप ह्यावर चार पाच मिनटे (२०%) फ़ुटेज वाढवायचे.
- मेलेल्या पात्राचा पुनर्जन्म दाखवला की जुने फ़ुटेज रीपीट करण्याचे खुल्ले लायसंन्स मिळते. नो क्वेश्चन्स आस्कड!
"वाढता वाढता वाढे" तंत्राचा योग्य वापर करून वीस मिनीटे एपिसोडमधे केवळ चार मिनटांचा सॊलीड कोअर भरावा लागतो. निदान येवढीतरी किफ़ायतशीर वाढ अपेक्षीत असते.
उत्कंठा ताणणे.
सिरीयल्स उत्कंठेवर चालत असतात कथेवर नव्हे. पाणीदार एपिसोड पाहून देखील प्रेक्षक कंटाळायला नको. त्यात दर दोन मिनीटांनी येणार्.या कमर्शीयल ब्रेक मधून सिरीयल जगवायचे असेल, तर प्रत्येक एपिसॊडच्या प्रत्येक लेगमधे उत्कंठा घालायलाच हवी. जाहिरातीचा मुख्य कार्यक्रम पाहिल्यावर त्यांच्यापुढे फ़ेकलेला पाणीदार तुकडा उत्कंठा नसेल तर ते कशाला पहातील? आजचा एपिसोड संपल्यावर उद्याचा एपिसोड कोव्हा एकदा पाहू अशी ओढ सर्वांना लागायला हवी. ही ओढ साधली नाही तर प्रेक्षक लगेच दुसरी चॆनेल पकडतात. उत्कंठा तंत्राचे काही यशस्वी नमुने---
- ब्रेकच्या आधी नायीका नायकाला थप्पड मारते. ढणाढण बॆकग्राउंड म्युझीक सोबत ही थप्पड तीनदा दाखवल्यानंतर... ब्रेक.
- धावत्या कारसमोर लहान मूल येते.... ब्रेक.
- बेचैन नायक एकटाच घरात येरझार्या घालत आहे. पाणी घालून येरझार्या वाढवाव्या. दारावरची बेल वाजते. दारापुढून घेतलेला नायकाच्या आश्चर्यचकीत चेहेरा. नायक म्हणतो... "तूम!!..." एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर दार उघडल्यावर समोर दिसतो पोस्टमन. तो पत्र देउन निघून जातो.)
- रात्रीची वेळ. नायीका घरात एकटी. भीतीदायक म्युझीक मधे वेळ काढावा. खिडक्यांचे पद्डदे उडत आहेत. नायीका बेडरूमच्या कपाटाचे दार उघडते. एक किंचाळी फ़ोडते. ... ब्रेक. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर कपाट उघडल्यावर समोर दिसते एक झुरळ.)
- खलनायकाने नायकाचा खून केलेला दाखवायचे. .... एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरू होताच नायक झोपेतून उठतो. "कैसा ये भयानक सपना....")
समारोप
अशी विविध तंत्रे वापरून सामाजिक सिरीयल्स एफ़िशियन्ट व एफ़ेक्टीव्ह करता येतात. रेफ़रन्स मधे दिलेली सिरीयल्स विद्यार्थ्यांनी जरूर बघावीत.
संदर्भ
ह्या आर्टीकल मधे लक्षात घेतलेल्या काही सिरीयल्स-
प्रेमकहानी एक चक्र, पिया जा मर, दुलहन के मांगमे सिंदूर, कम है पांच, घर घरमे लफ़डा, अब्बा इश्क ना खोजे, सरसर कार, तुम्हारी नशा, घर आना देख लुंगा, तू उसका मै सबकी.
*********************************************************
संपले (एकदाचे)
प्रतिक्रिया
27 May 2008 - 10:40 am | फटू
तुमच्या या लेखन मालिकेतील पहीला भाग अगदी आम्ही संगणक अभियंता असूनही भूसापेक्ष स्थीर उपग्रहाप्रमाणे डोक्यावरून छत्तीस हजार किलोमीटर उंचावरून गेला....
पण दुसरा आणि तिसरा भाग खूप छान लिहिले आहेत तुम्ही...
खूप वाईट वाटतं अशा भूक्कड दूरदर्शन मालिका जेव्हा आमची लोकं डोळे फाडफाडून पाहतात... का त्याना कळत नाही की समोरं त्या टी व्ही नावाच्या खोक्यात जे काही चालू आहे ते सगळं आभासी आणि फसवं आहे.... अशा मालिका बनवणं हा काही लोकांचा धंदा आहे हे आपण समजू शकतो... पण पाहणा~यांचं काय... का ते आपली डोकी गहाण ठेवतात....
मला एक प्रसंग मागे घडलेला प्रसंग आठवतो.... मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो... मी आतल्या खोलीत आराम करत होतो... बाहेरच्या खोलीमध्ये वहीनी कुठली तरी मालिका पाहत होत्या. अचानक वहीनी 'अरेरे' म्हणत विव्हळू लागल्या. मी धास्तावून काय झालं हे पाहण्यासाठी बाहेरच्या खोलीत आलो तर कळलं की वहीनी जी मालिका पाहत होत्या त्या मालिकेची नायिका रीक्षाची ठोकर लागून पडली होती...
मी मित्राच्या घरी असल्यामुळे मला डोक्यावर हात मारुन नाही घेता आला पण मनातल्या मनात त्या वहीनीना नमस्कार मात्र जरूर घातला...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
27 May 2008 - 4:12 pm | गिरिजा
या मध्ये एक गोष्ट अजुन..
प्रत्येक वाक्याला (खरतर शब्दा-शब्दाला) त्या scene मधल्या सगळयान्ची तोण्ड दाखवणे. (|:
27 May 2008 - 4:28 pm | विसोबा खेचर
अरूणशेठ,
झकास निरिक्षण, मस्तच लिहिलं आहे.
पाणी वाढवण्याचे आणि उत्कंठा ताणण्याचे सगळे प्वाईंट्स अगदी बरोब्बर आहेत, तंतोतंत पटले! :)
तात्या.
27 May 2008 - 5:37 pm | निरंजन मालशे
"बेचैन नायक एकटाच घरात येरझार्या घालत आहे. पाणी घालून येरझार्या वाढवाव्या. दारावरची बेल वाजते. दारापुढून घेतलेला नायकाच्या आश्चर्यचकीत चेहेरा. नायक म्हणतो... "तूम!!..." एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर दार उघडल्यावर समोर दिसतो पोस्टमन. तो पत्र देउन निघून जातो.)
रात्रीची वेळ. नायीका घरात एकटी. भीतीदायक म्युझीक मधे वेळ काढावा. खिडक्यांचे पद्डदे उडत आहेत. नायीका बेडरूमच्या कपाटाचे दार उघडते. एक किंचाळी फ़ोडते. ... ब्रेक. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर कपाट उघडल्यावर समोर दिसते एक झुरळ.)
खलनायकाने नायकाचा खून केलेला दाखवायचे. .... एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरू होताच नायक झोपेतून उठतो. "कैसा ये भयानक सपना...."
पुर्वी झी टि.व्ही. नविन असताना एक 'तारा' नावाची सिरीयल लागायची त्यात अक्षरश: हेच व्हायच. ती कधी संपली ते त्या ताराला नवनीत निशानलाही माहीत नसेल.
सोप ची कथा साबणावर घरसत नेण्याचा मान 'जुनून' नावाच्या भयाकारी सिरीयला जातो.
त्याच्याच पुढे पाउल टाकून तेरा पती सिर्फ मेरा है करण्याचा मान 'स्वाभिमान'ला द्यावा लागेल . या सिरीयलचा शेवट पाहील्याच सांगणारे काही खोटारडे या जगात आहेत.
यात अजुन एका सिरीयलचा उल्लेख करावा लागेल 'चन्द्रकांता' एक राजकुमारी आणि एक राजकुमार यांची परीकथा पण किती खेचावी. त्या दोघांशी काहीही संबध नसलेली क्रुत्तिका देसाई तिन रोल करून पैसा कमवून गेली.
27 May 2008 - 7:12 pm | विजुभाऊ
यक्कू.
मेरे यक्क पिताजी.............य.........क्कू
28 May 2008 - 6:36 am | अरुण मनोहर
कळले नाही बुवा! आप कहना क्या चाहते है?
31 May 2008 - 12:29 pm | झकासराव
हे त्या चन्द्रकांता सिरियलीत असलेल एक कृरसिंग नावाच पात्र म्हणत असे. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao