सरुटॉबाने कट्टा - एक सुरुवात

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
19 Apr 2011 - 12:13 am

१७ एप्रिल,रात्रीचे साडेसात वाजलेले, पुण्याच्या हद्दीबाहेर थोड्याश्या सुनसान रस्त्याच्या बाजुला एका मोठ्या इमारतीसमोर दोन धिप्पाड तरुण थोड्याश्या अंधारात उभे. समोरुन एक गाडी येते, कर्र्र्र्र्र ब्रेक दाबुन बंद पडते, एक दोन वेळा सुरु होते पुन्हा बंद पडते, त्या दोन्ही तरुणांच्या चेह-यावर हसु येतं, त्यांचे हात खिशात जातात, पुढ्च्याच क्षणी बाहेर येतात, तेवढ्यात गाडी पुढं जाते, त्या तरुणांचे हात पुन्हा खिशात. ते परत अंधारात सरकतात. गाडी थोडी पुढं जाउन पुन्हा त्या तरुणांच्या दिशेने येते, पुन्हा कर्र्र्र्र्र्र ब्रेकचा तोच आवाज पण यावेळी गाडितुन दोघं जण खाली उतरतात, त्या तरुणांच्या दिशेनं जायला लागतात. आता सगळेच जरा उजेडात आलेत, गाडी पुढं निघुन जाते आणि जोरात आवाज घुमतो,

’या प्यारे या, तुम्हाला भेटायला आम्ही खुप उतसुक आहोत’ अण तु काय गाडीची स्ट्रेस टेस्ट घेतो काय रे, उचलत णाय काय गाडी लगेच?’

एवढे दणदणीत ण्कराने 'सरुटॉबाने' कट्टा चालु झाला. पण कुणाला माहितच नव्हतं, म्रुत्युंजय आधीच सरुटॉला पोहोचले होते, त्यांचा फोन आला ’अरे येता का वर नाहीतर समोरच्या २ चेअर टेबलवर पोरगी एकटीच आहे, मी जातो तिथं बसायला. काय आहे अडचणीत सापडलेल्या मदत करावी’ ही सुचना वजा धमकी अधिक ऐकुन आम्ही खाली जमलेले सदस्य ती एकटी पोरगी कोण हे पाहायला पटकन वर गेलो, काय आहे म्रुत्युंजय या नामाशी संबंध असलेली माणसं मुळात असतातच रसिक,पुन्हा एकदम कट्ट्याचं केळवण नको व्हायला.

तिथल्या सरदारजींना नाव सांगुन आमचं टेबल हुडकायला जाम वेळ लागला, एक तर टेबल लांब आणि चौतरफा हुच्च्भ्रु लोकं बसलेली,त्या सरदारजी कडं कोण लक्ष देणार. पण शेवटी आलं आमचं टेबल, सगळ्यांनी बसुन घेतलं,९ जण हजर होते, टारझन,प्यारे१,वल्ली,आत्मशुन्य,मनराव,गणेशा,म्रुत्युंजय, साधासुधासौरभ आणि मी ५० फक्त. शुभशकुन झाला, ठाणे कट्टयाचे यशस्वी आयोजक श्री. स्पा(गमोगो) यांचा फोन आला, फोन टारझनकडे देउन मी खाली कॅमेरासाठी येताना उदवाहनातच पुणेरी पेशवे भेटले, पुन्हा वर येउन बसलो तो बानेच्या कॅप्टनने उपयुक्त माहिती देण्याचा उपक्रम सुरु केला होता, तो संपता संपता वपाडाव यांचे आगमन झाले. आजुबाजुच्या चमकधमकचा त्याच्यावर एवढा परिणाम झाला होता की आम्ही नाही म्हणलं असतं तर त्याला जाम बरं वाटलं असतं दुसरं एखादं टेबल पकडायला. तशी त्याला मिळालेली जागा छानच होती. छान गार वारं त्याबरोबर येणारा काय तो चार्ली का यार्डलीचा हुच्च्भ्रु सुगंध.

मनराव, गणेशा, साधासुधा सॉरभ आणि वपाडाव

टारझन आणि आत्मशुन्य


५० फक्त आणि प्यारे १

पुपे, वल्ली, म्रुत्यंजय आणि ५० फक्त

बरेच जण पहिल्यांदाच भेटत असल्याने ओळखी करुन दिल्या गेल्या आणि मग झेंडा व त्याच्या पोझिशन व त्याचे अर्थ यावर एक अम्बळ प्रेमळ चर्चा करण्यात आली. संदर्भ डॉ. दिवटेंचे लेख ते गुर्जीचे क्रिप्टिक लेखन, सगळॆ. एकुण काय झेंडा ताठ उभा ठेवलेला आहे तोपर्यंतच खायला मिळणार आहे हे वैश्विक सत्य सगळ्यांना पुन्हा एकदा समजलं. तोवर व्हेज आणि नॉनव्हेज याची मोजणी करुन वेटरचा गोंधळ वाढवण्यात आला होताच. आणि तेवढ्यात ज्यासाठी इथं कट्टा केला ती गोष्ट आली, गरम गरम लाल बुंद कोळसा घातलेल्या शेगड्या म्हणजे शुद्ध मराठीत ग्रिल किंवा बार्बेक्यु. हे ग्रिल / बार्बेक्यु प्रत्येक टेबलवर लावुन झाले, थोडा वेळ नुसतंच त्या पेटलेल्या कोळशाकडं पाहात, काही तेवढ्याच गरमागरम विषयांवर गरम चर्चा करण्यात आल्या.

या चर्चा पार या कट्ट्याच्या धाग्याचे ट्यार्पी कोण वाढवणार, बाजीराव पेशवे आणि पुपे यांच्यातील साम्य (भिकबाळी सोडुन), वपाडाव म्हणजे काय आणि एका कविशिवाय दुसरा कवि म्हणजे प्रकाशाशिवाय गणेशचंद्र इथंपर्यंत चर्चा झाल्या.

तोपर्यंत वेटरने केज्यु/कजुन स्पाईस क्रिस्पि पोटॅटो*, दोन प्रकारचे व्हेज कबाब तर नॉनव्हेज मध्ये तंदुरी चिकन अरे स्टार्टर सर्व्ह करायला सुरुवात केली. त्यानंतर एका एका ग्रिलवर विविध स्टार्टर आणुन ठेवायला लागला. व्हेज मध्ये पनीर मलई, पनीर कबाब, स्पाईस कॉर्न,बेबी मशरुम, पाईनापल वुईथ मॅंगो सॉस व इतर फिलर टाईपचे कबाब स्टिकवर आणुन ठेवायला सुरुवात केली.

मशरुम, पायनॅपल आणि शेवटी मासा.

पायनॅपल मॅरिनेटेड इन मँगो सॉस

तर नॉनव्हेज मध्ये चिकन,प्रॉन्स, दोन प्रकारचे मासे असे आयटम होते.

मासे, चिकन, स्पाईस कॉर्न

याच्या एक दोन राउंडनंतर गविंनी इशारा दिल्याप्रमाणे उगाचच भरताड न भरता सगळ्यांनीच आवडलेल्या आयटम वर लक्ष ठेवुन त्या त्या स्टिक उचलायची चपळाई दाखवायला सुरुवात केली. मग नंतर या सगळ्यांवर तिथं असलेली विविध बार्बेक्यु तेलं आणि चटण्यांचे प्रयोग सुरु केले गेले.

मस्टर्ड / लेमन / बहुधा ऑलिव्ह ऑइल

मँगो सॉस / तिखट चटणी / मायोनीज सॉस - टारझन फेव्हरिट

साधासुधा सॉरभला पडलेला साधासुधा प्रश्न काय घेउ आता व्हेज की नॉन व्हेज, हातानं की काट्यानं ?

झेंडे अजुन वरच आहेत, शो विल गो ऑन ,

रिकाम्या डिशा, भरलेली पोटं आणि समाधानी चेहरे - याच साठी केला होता अट्हास आणि कट्टा.

तिळवाला आत्मशुन्य आणि सदा हसतमुख मनराव.

अधुन मधुन वेटर केस्पाक्रिपो* घेउन येतच होता पण माझ्यापासुन सुरुवात करुन प्यारे, टारझन, आत्मशुन्य यांच्यानंतर ते पोहोचतच नाहित अशी परिस्थिती झाली. त्यात सॉरभ व गणेशा हे एका बाजुला नॉनव्हेजचा किल्ला टारझनच्या साथित लढवत होते. व्हेज मध्ये केस्पाक्रिपो*, पायनापल वुइथ मॅंगो सॉस, बेबी मशरुम व स्पाइस कॉर्न हे स्टार्टस मस्त होते, नॉन व्हेज बद्दल मंड्ळी खाली प्रतिसादात लिहितीलच. साधारण आठ ते साडेनवापर्यंत हा कार्यक्रम अखंड चालु होता, खाल्लेलं जिरवण्याकरता एक दोघांनी आजुबाजुला चकरा मारुन घेतल्या. जेंव्हा काही लोकं लवकर आलीच नाहीत तेंव्हा जाउन बघता लक्षात आलं की दोन इशान्यभारतीय कन्यका खांदेपट्टयाला अडकवलेले फ्रॉक घालुन गाणि म्हणत होत्या, या ठिकाणि त्यांच्या बहुतेक कुणालाच न कळेल अशा गाण्याचे कौतुक करण्याचे कारण गणेशा व मनराव यांना विचारले असता, पुर्वांचलातुन आपण इंचाइंचाने घेत असलेली माघार सुधारण्यासाठी अश्या प्रकारचे सांस्क्रुतिक बंध निर्माण केले गेले पाहिजेत असा समाजोपयोगी उद्देश सर्वांना समजाउन दिला. या तरुण पिढीचे हे आदर्श आचरण पाहुन डोळे पाणावले, (खरंतर ते शेगडीच्या धुरानं पाणावले होते). असो.

मागं लांबवर आहेत त्या चार्ली आणि यार्डलीच्या चालत्या बोलत्या खाणी, कळालं वपाडाव एवढ्या कोप-यात का बसला होता ते.

अशी तब्येतदार खाणारी माणसं हवीत इथं यायला.

तसेच मनराव यांच्या बाईकवर पुणे ते कन्याकुमारी ह्या प्रवासावर मुख्य चर्चेत मुंबई पुणे जुना हायवे बरा की नवा महाग अशी पण चर्चा करुन झाली. दोन आनंदाच्या घोषणा केल्या गेल्या, श्री. मनराव यांनी बुलेट क्लासिक ३५० ही गाडी बुक केली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तसेच श्री.प्यारे१ यांच्या मुलीच्या बारश्याचा कार्यक्रम येत्या रविवारी २४ तारखेला क्षेत्र वाई येथे होणार आहे, त्या कार्यक्रमाचे त्यांनी सर्वांना सस्नेह आमंत्रण दिले आहे. बाप झाल्याबद्दल प्यारे१ यांचे अभिनंदन.

पुपे व टारझन यांना लवकर निघायचे असल्याने त्यावेळी सर्वांनी केलेल्या आग्रहामुळे व इभाकन्यकांच्या गाण्याने प्रभावित झाल्याने स्थळाच्या जवळच असलेल्या डेझर्ट कडे सर्वांनी आपला मोर्चा वळविला. एक-दोन मिनिटातच आमंत्रणाच्या धाग्यावर अनुभवी लोकांनी दिलेला सल्ला, स्टार्टर व डेझर्ट बास. हा किती मोलाचा आहे हे लक्षात आले. मेन कोर्स फक्त प्यारे१, सॉरभ व वपाडाव यांनीच घेतला असावा. डेझर्ट मधील अंगुरी गुलाबजामुन, बटरस्कॉच पेस्ट्री, फिरनी , ऑरेंज मुस, मड केक, फ्रुट पुडिंग,विविध फ्रुट सॉसेजेस, यावरच सर्वजण तुटुन पडले. मी त्यातल्या त्यात अंगुरी गुलाबजामुन हा एकच आयटम डोळ्यासमोर आणि डिशमध्ये ठेवला होता. गरम गरम गुलाबजामुन व जोडीला फिरनी, फक्त तिथं १० मजल्यावर गार वा-यात झोपायची सोय व घरची परवानगी या दोनच गोष्टींची कमतरता होती. बाकी गोडाबद्दल पट्टीचे गोडखाउ सदस्य लिहितीलच.

आम्ही कट्टेकरी - साधासुधा सॉरभ, आत्मशुन्य, वल्ली, वपाडाव, गणेशा, ५० फक्त, प्यारे१, म्रुत्युंजय आणि मनराव.

साधारण सव्वा अकरा वाजता, सगळ्या चर्चा संपवुन आणि बिल भागवुन फोटो काढुन आम्ही खाली उतरलो. पुन्हा एकदा सयाजीच्या बाहेर येणा-या जाणा-या पोरी व महागामोलाच्या गाड्या पाहात पाहात चर्चा झाल्या आणि पुढच्या महिन्यात राजमाची किंवा एक दिवस मुळशी असा फिरायचा बेत ठरवुन आम्ही परत निघालो.

हा व्रुतांत टाकुन मी फक्त सुरुवात केली आहे, बाकी कट्ट्याला हजर सदस्यांनी यात भर घालावी तरच या कट्ट्याची साठा उत्तरी कहाणी सुफळ संपुर्ण होईल. माझ्यासाठी या वर्षातले आतापर्यंतच्या चारही महिन्यातला एक दिवस मिपाकरांच्या सोबतीत खुप खुप सुखाचा गेला आहे त्यामुळं माझ्यासाठी ही या वर्षीच्या १२ उत्तरांची कहाणी ४ उत्तरी सुफळ सुखद संपुर्ण आहे.

५० फक्त.

कलाकथाचारोळ्यापाकक्रियाविनोदराहती जागाशब्दक्रीडाजीवनमानराहणीमौजमजास्थिरचित्रशिफारसअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

बाबारे त्या फटुंखाली डावी कडुन उजवी कडे सगळ्यांची नावं देना.
म्हणजे कुणाला ओळख लपवायची असेल तर 'क्ष' टाक पण बाकिच्यांची ओळख तर पटु दे. :)

चिंतामणी's picture

19 Apr 2011 - 12:43 am | चिंतामणी

येका फटुखाली चूकून वपाडावचे नाव लिवलेस. (त्यातला दुसरा अन तु यवढेच म्हाइत हायत). तवा किरपा करा अन फटुखाली .................................................

( येक गोस्ट नाय लक्षात आली. १३ चे १३ नग हजर व्ह्ते????? धमु कुट व्हता??????)

रामदास's picture

19 Apr 2011 - 12:46 am | रामदास

बायकोच्या ताटाखालचं मांजर कसलं येतं आता कट्ट्याला.संध्याकाळी शुभं करोती आणि मग चिडीचूप.

चतुरंग's picture

19 Apr 2011 - 4:08 am | चतुरंग

ते आता किचन कट्ट्याखालचं मांजर झालंय! आम्हालाबी अशीच हूल दिली होती त्यांनी! ;)

-रंगा

चिंतामणी's picture

19 Apr 2011 - 12:51 am | चिंतामणी

बाकी मेजावर (म्हराटीत याला टेबल म्हनतात) पान्याचे ग्लास पाहुन ड्वाले पानावले. (तरी वपाडाववाल्या फटुत असलेल्यांचे ड्वाले "तसे" का दिसत हायेत????????)

प्रचेतस's picture

19 Apr 2011 - 8:22 am | प्रचेतस

मेजावर जरी मदिरेचे पेले नसले तरी आजूबाजूच्या बर्‍याच मेजांवर मदिराक्षी भरपूर संख्येने असल्यामुळे डोळे नशीले होउन गेले. :)

चिंतामणी's picture

19 Apr 2011 - 8:55 am | चिंतामणी

:D

किसन शिंदे's picture

19 Apr 2011 - 9:54 am | किसन शिंदे

गणपा यांच्याशी सहमत...... त्याशिवाय आमच्यासारख्या नवीन मिपाकराला जुन्या जाणत्या जाणकारांची ओळख कशी व्हायची.
एक टारझन राव सोडून बाकी कोणालाच वळाखल नाही.

सूर्य's picture

19 Apr 2011 - 12:35 pm | सूर्य

हेच म्हणतोय.

बाकी लै भारी झालेला दिसतोय रे भौ कट्टा.

- सूर्य.

इंटरनेटस्नेही's picture

19 Apr 2011 - 12:31 am | इंटरनेटस्नेही

अतिशय उत्तम!

निनाद's picture

20 Apr 2011 - 9:57 am | निनाद

किती जळवाल?

फोटोंच्या खाली कोण कोण आहेत फोटोत याचे कॅप्शन्स लिहा ना.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Apr 2011 - 12:36 am | निनाद मुक्काम प...

लय भारी
कट्टा वीरांचे स्वानुभव वाचण्यास उत्सुक

रामदास's picture

19 Apr 2011 - 12:40 am | रामदास

पिडांकाकांचे धाकटे बंधू बसले आहेत का ?
हनुवटीवर तीळ असलेला गोंडस मुलगा कोण आहे.?

स्पा's picture

19 Apr 2011 - 9:02 am | स्पा

हनुवटीवर तीळ असलेला गोंडस मुलगा कोण आहे.?

हॅ हॅ हॅ

प्रचेतस's picture

19 Apr 2011 - 9:05 am | प्रचेतस

तो गोंडस मुलगा म्हणजे साक्षात आत्मशून्य.

श्रावण मोडक's picture

19 Apr 2011 - 3:14 pm | श्रावण मोडक

काय नजर आहे! नेमका तीळ दिसला. ;)

एकंदरीत मजा केलेली दिसते आहे.
टारूच्या डाएटची ऐशीतैशी झाली का?;)

टारझन's picture

19 Apr 2011 - 10:50 am | टारझन

हो खुप मजा केली .
यशस्वी आयोजना बद्दल ५०सेंट यांचे आभार आणि अभिणंदण ...

आम्ही जेवण केलं नाही.. स्विट्स पण अतिआग्रहा खातर खाल्ले .. नाही तर आम्ही एकेका कोंबडीची नाडी पाहुन तिचा समाचार घेत होतो .. :) प्यारे १ ने काँपिटिशन दिल्यामुळे मजा आली :) पुप्या तर आपला जुणा माणुस पण .. सौरभ , आत्मशुन्य , वल्ली , मृत्युंजय, गणेशा , मनराव सगळेच नव्या पिढीतले मिपाकर असले तरी ते मिपाकर होते :) मागे म्हणजेच बॅकग्राऊंड मधे गाणार्‍या नेपाळ्या पोरी काय गात होत्या का काय करत होत्या कळलं नाही .. पण तोंड सोडलं तर बाकी सगळ्या छाण होत्या ;)

आणि "केजु पटॅटो " का काय ते .. तो एक लै भारी प्रकार होता :) आम्ही व्हेज आणि नॉन-व्हेज दोघांचा धुव्वा उडवला ..

डाएट ला एक दिवस सुट्टी दिली .. थोडक्यात जेवण वर्थ होते :) पैका वसुल :) अर्थात २ पिस मध्ये पोट भरणार्‍यांना मात्र ते परवडणार नाही .. दाबुन खावे .. चापुन खावे ;) खाण्यासाठीच जगावे ..

- (परत एकदा बार्बेक्यु णेशण ला जायच्या बेतात ) टारझन

आत्मशून्य's picture

19 Apr 2011 - 2:51 am | आत्मशून्य

सर्वप्रथम अचूक सल्ला दील्याबद्दल गवींचे मनःप्पोर्वक आभार. तूमच्यामूळेच आम्हाला सर्व महत्वाचे प्रकार काहीही हातचे राखून न ठेवता मनसोक्त खाता आले.

बानेच्या कॅप्टनने उपयुक्त माहिती देण्याचा उपक्रम सुरु केला होता

तसा तो उपक्रमच होता पण ते ऐकताना एम टीवी रौडी चा होस्ट जसे टास्कचे नीयम सामजावतो, तसे काहीतरी तो बरळत आहे असे वाटले. समजायची गोश्ट त्यात इतकीच होती पोट भरलं की (टेबलावरचा) झेंडा खाली करायचा. पण त्यातही गोंधळ ऊडाला असावा, कारण दोन पैकी एकच झेंडा खाली गेला होता तर दूसरा का गेला नाही याबाबत संशोधनाला बराच वाव होता, पण त्यामूळे तेथील स्टाफ थोडासा गोंधळून आम्हाला अजून सर्व्ह करायचे की नाही या बाबत संभ्रमीत होवून चक्क त्याबाबत वीचारणा करू लागला, जे त्यांनीच आम्हाला सामजावलेल्या नीयमांच्या अगदी वीरूध्द वर्तन होते.

एकूणच बार्बेक्यू म्हणजेच कोळशावर भाजलेल्या त्या वीवीध रूचकर व दर्जेदार पदार्थांना कोळशांची धग, धूर व कींचीतशी राख यामूळे आपण ट्रेकला (अथवा घरी) चूलीवर बनवलेल्या अन्नाला येणारा एक वीशीश्ट असा खमंग वास चीकटून राहीला होता, व त्या वर पून्हा आपल्या गरजे प्रमाणे वेगवेगळे तेल, सॉस, व आमरस याचा मनसोक्त वापर करून भाजून खाणे म्हणजे तर रूचकरपणाची पर्वणी होती.

स्टार्टर व डेझर्ट सोडून जेवणात बूफेसोबतच तीथे एक प्रकार ऑर्डरनूसार बनवून दीला जात होता, त्यातील कंटेंट पाहता तो इटालीयन पास्ता कीव्हां मॅक्सीकन एंन्शील्डा बनेल असे वाटून ओर्डर दीली, तयार होत असतानाच कूक ने सांगीतले त्याला काँन्टीनेंटल म्हणतात, व्हाइट सॉस चवदार असते म्हणून चीली ऐवजी त्यातूनच तो पदार्थ बनवून द्या असे सांगीतले. अत्यंत सपक बेचव व ऊलटी आणणारा तो पदार्थ मी कसाबसा २०%च संपवू शकलो. तर त्यातील ५% भाग गणेशा सूध्दा संपवू शकला नाही. अर्थातच तीथल्या सर्व गोश्टी अनलीमीटेड सदरात मोडत असल्याने, तो पदार्थ तसाच सोडून लगेच इतर पदार्थांकडे मोर्चा वळवला, सांगायचा मूद्दा हा की त्या डीश पासून सावध रहावे व हवेच असेल तर चीली ऑप्शन ट्राय करावा, कीमान चमचमीत तरी असेल व खायला मज्या पण येइल.

तसंच तीथे कसला तरी एक त्रीकोणी ब्रेड सूध्दा वाढत होते जो चवीला एकदम घरघूती द्श्म्यांप्रमाणे लागत होता(फक्त वरून तूपाचीच कमतरता होती, जी वीवीध सॉस वापरून भरून काढता आली नाही), अर्थातच म्हणून मग त्याचा फक्त एकच तूकडा ट्राय केला गेला.

एकूणच इव्हेंटच्या यशस्वी आयोजना बद्दल ५०फक्त चे अत्यंत आभार. त्यामूळेच इतर मीपाकरांशी अशी साक्शात भेट होऊन त्यामूळे नीर्माण झालेला आनंद यापूढे त्यांच्या लेख व प्रतीक्रीयांचे वाचन जास्त जीवंत व आनंददायी बनवत राहील ही खात्री मनामधे नीर्माण झाली व मी धन्य झालो ;)

अवांतर :- लेखाची सूरूवात वाचून "गॉडफादर" मधील प्रसंगाचे मराठी भाषांतर/रसग्रहण वगैरे वाचत नाहीना अशी भावना नीर्माण झाली.

नगरीनिरंजन's picture

19 Apr 2011 - 8:35 am | नगरीनिरंजन

>>तसंच तीथे कसला तरी एक त्रीकोणी ब्रेड सूध्दा वाढत होते
तो पीटा ब्रेड असावा.

बाकी फोटू मस्तच. कट्टा जोरात झालेला दिसतोय. इनो घेतले आहे.
फोटूतले चेहरे आणि नावं यांचा ताळमेळ बसलेला नाहीय त्यामुळे कॅप्शन मस्टच.

मृत्युन्जय's picture

19 Apr 2011 - 10:06 am | मृत्युन्जय

नव्हे नव्हे तो पीटा ब्रेड नव्हता. ताश्तानच्या जवळपास पोचणारा होता. बरा होता. हा आत्मशून्य म्हणतो तितका काही वाईट नव्हता. लोणकढी तूप असले असते तर छान लागला असता.

राजेश घासकडवी's picture

19 Apr 2011 - 2:24 am | राजेश घासकडवी

आयला, भुकेल्यापोटी हे फोटो बघितले आणि कोकलून दमलेले पोटातले कावळे पुन्हा जोरात केकाटायला लागले. (फोटोतली काही मंडळी फारच स्वादिष्ट दिसत होती :) )

एकंदरीत कट्ट्याला धमाल केलेली दिसते आहे. वर्णन सुद्धा मस्तच.

प्यारे१'s picture

19 Apr 2011 - 10:13 am | प्यारे१

>>>>>(फोटोतली काही मंडळी फारच स्वादिष्ट दिसत होती )

हे काय हो मास्तर (वि अ चे) ? डोके खाता हे माहिती आहे आता सगळा माणूसच? ;)

५० फक्त, मी थोडा दाल चावल घेतले बाकी तुमच्यासारखेच डेस्सर्ट आणि आईसक्रिम.

चतुरंग's picture

19 Apr 2011 - 4:11 am | चतुरंग

एकदमच दणदणीत झालेला दिसतोय!
सगळीच मंडळी 'अंमळ तब्बेतीत' आहेत असं दिसतंय! (फोटूखाली नावं टाका रे - लेखाच्या संपादनाची सोय दिली आहे ना आता? ;))

-रंगा

प्रचेतस's picture

19 Apr 2011 - 9:10 am | प्रचेतस

हर्षद, मस्त वृत्तांत रे.
ठाणे आणि पुणे या दोन्ही खादाडी कट्ट्यांना उपस्थित राहून दोन शहरांमध्ये पुन्हा एकदा सांस्कृतिक बंध निर्माण करणेत आल्यामुळे वपाडावचे विशेष कौतुक करणेत आले. :)
मृत्युंजयच्या क्रिकेट विषयक लेखांबद्दल चर्चा व कौतुक करणेत आले.
खादाडी कट्ट्यावर एक कविता करण्याचा गणेशाला प्रेमळ आग्रह करण्यात आला. तो आता हे कधी मनावर घेतोय कुणास ठाउक.

गणेशा's picture

19 Apr 2011 - 3:00 pm | गणेशा

असेच म्हणतो ... ५० फक्त यांच्या बरोबरच्या मला वाटते ४ पैकी तिसर्‍या कार्यक्रमात हजर होतो मी..
त्यांच्या उत्कृष्ठ आयोजन आणि व्रुत्तांत बद्दल विशेष आभार ,...

खाण्याचे म्हणाल तर मी स्टार्टर नॉनव्हेज .. आणि मेन कोर्स व्हेज खाल्ला असेच म्हणले तरी चालेल ...

बाकी खादाडी वर कविता लिहु पण त्या आधी जेंव्हा आता चांदण्या वेचत राजमाची ला जावु तेंव्हाच कविता लिहिण्याची आशा आहे ...

नरेशकुमार's picture

19 Apr 2011 - 8:34 am | नरेशकुमार

जब्री रे गड्यांन्नो. अशीच मौजमज्जा करा.
जरा फटूत कोन कोन आहे ते पन कळुद्या की ! मंजे नावबीव टाका.

खतरनाक वृतांत, आणि जबराट खादाडी

हे "बा ने" प्रकरण लय झ्याक दिसतंय :)

सर्वांची नावं तर कळलीच पाहिजेत :) , अर्थात त्यांची इच्छा असल्यास
बाकी कट्ट्याचे आयोजक, हर्षद चे अभिनंदन ,
असा मिपा मेळावा वरचेवर भरत राहो

दोन पेग इनो घेतल्या गेल्या आहे

अन्या दातार's picture

19 Apr 2011 - 1:24 pm | अन्या दातार

>>दोन पेग इनो घेतल्या गेल्या आहे

कसलं रे मर्दा, दोन पेगात चिप बसलायंस, इथं २-२ बाटल्या रिचवल्या गेल्या आहेत.... :(

प्रचेतस's picture

19 Apr 2011 - 9:09 am | प्रचेतस

शेवटच्या फोटूतील व्यक्ती डावीकडून.
साधासुधा सौरभ, आत्मशून्य, वल्ली, वपाडाव, गणेशा, ५० फक्त, प्यारे१, मृत्युंजय आणि मनराव.

सुहास..'s picture

19 Apr 2011 - 9:11 am | सुहास..

चांगलच एन्जॉय केलेले दिसते आहे ..टार्‍या तर काय कट्ट्याला नेहमीच महफिल-ए-जान असतो ..पण हर्षद तु अंमळ वाळला आहेस राव मागील वेळेपेक्षा ;) की ती फोटोशॉप ची कमाल आहे ;) ...असो...दोन जण या कट्ट्याला(येतो-येतो म्हणुन) येणार नाहीत हे माहीत च होतो ..

एकाचे कारण वर रामदास काकांनी सांगीतलेच आहे, दुसर्‍याचे तर विचारुच नको...त्या बेण्याला त्याच्या लग्नात , सासुरवाडीच्या लोकांना, त्याला उचलुन आणायची सुपारी द्यावी लागणार आहे ;) ..

आणि पुप्या(गरिंबाचे स्वप्निल जोशी ;) ) ची भिकबाळी हा सध्या राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला आहे ....

छोटा डॉन's picture

19 Apr 2011 - 11:32 am | छोटा डॉन

सहमत आहे.
सध्या हेच्च म्हणतो.

कट्टा छानच झाला असे फोटोवरुन दिसत आहे, सर्व कट्टेकर्‍यांचे अभिनंदन :)
बाकी ही केवळ पोच आहे, बाकी सविस्तर नंतर खरडेनच :)

- छोटा डॉन

मृत्युन्जय's picture

19 Apr 2011 - 11:39 am | मृत्युन्जय

घ्या वायदे आझमांचा अजुन एक वायदा आला.

मराठमोळा's picture

19 Apr 2011 - 11:47 am | मराठमोळा

>>घ्या वायदे आझमांचा अजुन एक वायदा आला.

+१.

या वायद्यांचे आम्ही पण एकदा विक्टीम झालो आहोत. :)
त्यामुळे क्रमवारीत बदल केल्या गेल्या आहे.
आमचे टांग मारु मित्र उतरत्या क्रमानुसार..
१. चोता दोन
२. टिंगी
३. सुहास..
४. धम्या
५. पुपे
६. नि.दे.

:)

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Apr 2011 - 4:11 pm | ब्रिटिश टिंग्या

भांबा! आम्ही कधी टांग दिली बॉ?

स्वसंपादन करता येत नसल्याने फोटोंना कॅप्शन व नावे टाकता येत नाहियेत, मा. संपादक मंडळाला विनंती की त्यांनी ही सोय उपलब्ध करुन द्यावी, सदर चुका लगेच दुरुस्त केल्या जातील.

कट्टा छान, वृत्तांत सुरेख !!!

अवांतरः कट्टा शन्वारी असता तर आलोही असतो कदाचित...(पळा..... त्ये वपाडाव मारतंय आता !!) :D

ज्या दिवशी फ्रिजमधल्या सगळ्या भाज्या संपलेल्या असतात, अडीनडीला लागणारे फोझन पदार्थही संपलेले असतात, कडधान्य भिजवलेली नसतात तेंव्हा खरे पाककौशल्य दिसून येते.

त्यातुनच मग बॅचलर वडे अन भेळी जन्माला येतायेत वाट्टे....

सूड's picture

19 Apr 2011 - 7:55 pm | सूड

भेळेचं माहित नाही, भाजणीच्या वड्यांची कथा आय मीन पाकृ सर्वज्ञ आहे. :D

स्पा's picture

19 Apr 2011 - 9:53 am | स्पा

भीकबाळी???????

हे काय लिहीलंयस रे स्पावडू ??

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Apr 2011 - 6:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मग ? काय लिहायला हवे होते ??

sneharani's picture

19 Apr 2011 - 9:57 am | sneharani

झकास कट्ट्याचा झकास वॄतांत!!
:)

गवि's picture

19 Apr 2011 - 10:06 am | गवि

क्या बात...क्या बात...क्या बात...!!!

काही बारबेक्यूज तर एकदम खल्लास चटकदार वाटताहेत.

मस्त मजा केलीत सगळ्यांनी हे दिसतंय.

५० फक्त यांनी ठिकाणच मस्त निवडलं होतं..

आता प्रतीक्षा मिसळ कट्ट्याची.. :)

मृत्युन्जय's picture

19 Apr 2011 - 10:12 am | मृत्युन्जय

नदीचे मूळ, ऋषीचे कूळ आणि मिपासदस्यांचे आयडी शोधण्याच्या भानगडीत पडु नये असे म्हणतात. तरीही काही उत्सुक सदस्यांनी टार्‍याला "टार्‍या हा **** आयडी कोणाचा रे" असले खोचक प्रश्न विचारले. त्यावर पु लंच्या लेखातल्या काकाकुवाच्या स्थितप्रज्ञतेने टार्‍याने "हॅ हॅ हॅ, मला कसे माहिती असणार त्या **** लाच विचार ना" असे गोलमाल उत्तर दिले. असे २-३ वेळा झाल्यावर बहुधा टार्‍याची एक्सेलशीट हरवली असावी असा संशय काही मिपासदस्यांनी खाजगीत व्यक्त केला. अर्थात याची जाहीरपणे वाच्यता कोणीच केली नाही कारण तसे केल्यास आपल्या सदस्यनामांची विडंबने असणारे आयडी तयार होउन त्यातुन आपल्याच धाग्यांचे आणि प्रतिसादांचे विडंबन करुन आपला बाजार उठवला जाइल अशी भिती होती असे म्हणतात. खरे खोटे देव जाणे (प्रमोद देव नव्हे. तो वरचा देव)

नानाने आंतरजालीय आत्महत्या केल्यामुळे, पराने कट्ट्याकडे पाठ फिरवल्यामुळे, वायदे आझमांनी अपेक्षेप्रमाणे आणि धम्याने अनपेक्षितपणे ऐनवेळेस डिच दिल्यामुळे कट्ट्याच्या वृत्तांताच्या धाग्याचा ट्यार्पी वाढवण्यासाठी सर्वांचे डोळे पुप्यांच्या आगमनाकडे लागुन राहिले होते. शब्दाला जागुन ते आलेदेखील. मात्र प्रतिसादांची संख्या वाढवण्यासाठी त्यांना गळ कोणी घालावी याबद्दल एकमत न झाल्यामुळे तो विषय तसाच राहिला. शिवाय पुप्यांचे प्याकेज आपल्याला परवडेल की नाही अशी रास्त शंकाही बर्‍याच सदस्यांनी खाजगीत बोलुन दाखवली. अखेर घरचे कार्य समजुन पुपे योग्य ती मदत करतीलच असा सुज्ञ विचार करुन सर्वजण गप्प बसले.

बाकी पुपे भिकबाळी वगैरे घालुन आले होते त्यामुळे ते आपली पेशवे ही प्रतिमा सांभाळण्याचा कसोशीने प्रयत्न करतात ही बाब चाणाक्ष मिपाकरांच्या नजरेतुन सुटली नाही. पुपे अगदी बाजीराव सारखे दिसतात असे मतही काही जणांनी प्रदर्शित केले. अर्थात असे मत प्रदर्शन करणार्‍यांनी बाजीरावाला कुठे बघितले हे मात्र कळु शकले नाही. शिवाय बाजीराव पहिला की दुसरा याबद्दलही काही वाच्यता झाली नाही. पुपेच योग्य वेळी खुलासा करतील म्हणा.

वपाडाव या आयडी बद्दल बर्‍याच जणांना उत्सुकता होती. अखेर श्री काळे (काळे म्हणजे वपाडाव. श्री सुधीर काळे नव्हेत. वपाडाव यांचा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा दुरान्वयानेही म्हणजे मल्लिकाचा कपड्यांशी आणि राखी सावंतचा लाजललज्जेशी जेवढा संबंध नाही तेवढाही संबंध नाही याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी) यांनीच आपल्याला वडापाव हाच आयडी हवा होता मात्र मिपावर या सदस्यनामाच्या कॉम्बिनेशनचे ६ आयडी असल्यामुळे आपल्याला हा आयडी मिळाला नाही अशी तक्रार केली. थोड्या संशोधनाअंती हे बर्‍याच प्रमाणात सत्य असल्याचे मिपाकरांच्या लक्षात येइलच. मात्र वपा'डाव' हा आयडी घेण्यामागे काळ्यांचा काहीतरी डाव असल्याचा संशय काही जणांनी व्यक्त केला. शिवाय त्यांना वडापाव हा आयडी तरी का हवा होता यामागचे गूढ्देखील कायम राहिले.

बाकी प्यारेने गोड बातमी दिली आहे आणि बारश्याचे आमंत्रण देउन पुढच्या कट्ट्याची सोय केली आहे. कट्ट्यातर्फे प्यारेला हार्दिक शुभ्च्छा आणि मेनी मेनी हॅप्पी रेटर्न्स ऑफ द डे ;)

प्यारे१'s picture

19 Apr 2011 - 12:03 pm | प्यारे१

वपाडाव ने दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये त्याला हा आय्डी का हवा होता हे त्याने सांगितले होते. तेव्हा मृत्यूंजय 'इतर' कामात मग्न असावेत. असो.

वपा मेकॅ. इंजिनिअरींग करत असताना ( होतकरु, देखणा आणि सुशिक्षित त्याबरोबरच वाटत नसला तरी नोकरी करणारा असा हा सुयोग्य तरुण लग्नेच्छु आहे हे सूज्ञांनी लक्षात घेतले आहेच) ;) जर का एखादा पास झाला तर गोड आणि बुडाला तर वडापाव असे त्यांच्या ग्रुपचे समीकरण होते. कोण कुणाला किती वडापाव देणार यामध्ये ते चुरस करीत असत.

या रम्य आठवणी जागृत रहाव्यात हा एकमेव हेतू.

>>>>>बाकी प्यारेने गोड बातमी दिली आहे आणि बारश्याचे आमंत्रण देउन पुढच्या कट्ट्याची सोय केली आहे. कट्ट्यातर्फे प्यारेला हार्दिक शुभ्च्छा आणि मेनी मेनी हॅप्पी रेटर्न्स ऑफ द डे

सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. मिपाकरांसारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांकडून कन्येस आशिर्वाद मिळावेत हीच मनिषा. धन्यवाद.

मृत्युन्जय's picture

19 Apr 2011 - 12:07 pm | मृत्युन्जय

वपाडाव ने दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये त्याला हा आय्डी का हवा होता हे त्याने सांगितले होते. तेव्हा मृत्यूंजय 'इतर' कामात मग्न असावेत

हॅ हॅ हॅ. शक्यता नाकारता येत नाही. 'इतर' महत्वाची बरीच कामे होती. म्हणजे स्टार्टर्स वगैरे ;)

होतकरु, देखणा आणि सुशिक्षित त्याबरोबरच वाटत नसला तरी नोकरी करणारा असा हा सुयोग्य तरुण लग्नेच्छु आहे हे सूज्ञांनी लक्षात घेतले आहेच.....

५० फक्त यांजकडुन बाजार उठवण्याची सख्त तालीम घेण्यात येते आहे की काय? असे वाटुन-चाटुन गेल्या गेलेले आहे...
-प्यारेभौ, शप्पथ बार्श्याला येणार हो... पण बाजार नका ऊठवु असा....

प्रीत-मोहर's picture

19 Apr 2011 - 10:18 am | प्रीत-मोहर

मस्त कट्टा रंगला म्हणाय्चा तर

वा.. जोरदार कट्टा! फोटो विशेष आवडले. (का ते खाली येईलच.)

टार्‍याला वेटर आग्रह करतोय अन टार्‍या लाजतोय हा फोटो अंमळ भारीच आलाय. द्वाले पानावले.
पहिल्या फोटूत गणेशा कुठल्यातरी खाद्यपदर्थाकडे पाहुन कविता करण्यात गुंग दिसताहेत. साधेसुधे सौरभ यांना कवितेची (अन फोटूचीही) काहीही पडलेली दिसत नाही, ते आपले साधेपणाने पदार्थ संपवताहेत.
आत्मशून्य बहुतेक फोटोत शुन्यात हरवलेत. हर्षदराव बोटं चाटत खुन्नस देताहेत (की उद्या कट्ट्यांचा वृत्तांत लिहायचा म्हणून 'बारीक' नजरेनं निरीक्षण करताहेत)?
पेशवे अजून पेशवाईतच रमलेले दिस्ताहेत. मनरावांनी दरवेळेला फोटूग्राफरच्या मनातलं ओळखून 'चीझ' न म्हणताच फोटूंच चीज केलेलं आहे. सरुटॉबाने मध्ये 'वडापाव'(!) चे ची बंडखोरी( बाकी मुंबईचे पुण्याला आले म्हणजे काय कमी बंडखोरी की काय!) अधोरेखीत करत आहेत. भारतीय संस्कृतीप्रेमी प्यारे फ्रेंच दाढीत आलेले आहेत आणि मृत्युवर विजय मिळवताना केस गमावून बसल्यानंतरही चेहर्‍यावर विजय कोणाच्या आहे हे दिसतेच आहे. सगळ्या फोटोत प्रेक्षणीय दिसणार्‍या वल्लींचा कुणा चावटाने मुद्दाम टम्म भरलेल्या पोटाच्याबाजूने फोटो काढुन कट्ट्याला न आलेल्या आमच्या सारख्यांना जळवण्याचा प्रयत्न केला आहे.

बाकी, एकूणात (टार्‍या अन पेशवे सोडून) सर्वांनी त्यांच्या आयडीमूळे निर्माण झालेल्या प्रतिमेशी प्रतारणा केलेली दिसते.असो.

(सर्वांनी हलके घेणे.) :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Apr 2011 - 10:42 am | बिपिन कार्यकर्ते

मस्त लेको!

स्पंदना's picture

19 Apr 2011 - 10:42 am | स्पंदना

फार छान !!

सार्‍यांच्या चेहर्‍यावरच हास्यच सांगतय, कट्टा यशस्वी झाल्याच.

मराठमोळा's picture

19 Apr 2011 - 11:39 am | मराठमोळा

जोरदार.. दणदणीत, तरुण आणि चविष्ट-गप्पिष्ट कट्टा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. :)
बाकी फोटु आणि वृत्तांताबद्दल काय लिहिंणार? एकदम झकास..

पुढील कट्टे आणखी जोरदार आणि मोठे होतील यात तीळमात्रही शंका नाही. :)

यशोधरा's picture

19 Apr 2011 - 11:46 am | यशोधरा

मस्त वृत्तांत आणि फोटो.

प्रास's picture

19 Apr 2011 - 11:49 am | प्रास

हेच म्हणतो मी.....

मृत्युन्जय's picture

19 Apr 2011 - 11:53 am | मृत्युन्जय

डेझर्ट मधील अंगुरी गुलाबजामुन, बटरस्कॉच पेस्ट्री, फिरनी , ऑरेंज मुस, मड केक, फ्रुट पुडिंग,विविध फ्रुट सॉसेजेस, यावरच सर्वजण तुटुन पडले.

व्हॅनिला स्वादाचा दुग्धशर्करामिश्रीतघनगोलगट्टु देखील होता की रे.

किसन शिंदे's picture

19 Apr 2011 - 12:06 pm | किसन शिंदे

दुग्धशर्करामिश्रीतघनगोलगट्टु

हा... हा..हा :)

सहज's picture

19 Apr 2011 - 12:33 pm | सहज

मस्त!!!

:-)

---------------------------------------------
पण शिक्रण व मटर उसळ नसल्याने .. हॅ हॅ हॅ!!

नि३सोलपुरकर's picture

19 Apr 2011 - 1:22 pm | नि३सोलपुरकर

मस्त वृत्तांत आणि फोटो.
लय भारी
पश्चाताप ...(जळजळ) कट्टा आणि कट्टा वीरांची भेट मिस झाल्याबद्दल.

यशस्वी आयोजना बद्दल ५० फक्त यांचे अभिनदन .

लवकरच ते पुढील कट्ट्याचे आयोजन करतील अशी आशा

सर्व कट्टेकर्‍यांचे अभिनंदन

(कट्टा आणि कट्टा वीरांचा दर्शन अभिलाशी)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Apr 2011 - 1:29 pm | परिकथेतील राजकुमार

उत्तमच !

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Apr 2011 - 10:56 am | llपुण्याचे पेशवेll

पर्‍या न आल्यामुळे "आम्ही २ पेग मारून वर पोळीभाजी खाऊन झोपणारी सामान्य माणसं तुमच्यासारख्या मोठ्या माणसांच्यात येऊन काय करू" असा त्याचाच डायलॉग आठवला. :)

स्मिता.'s picture

19 Apr 2011 - 1:53 pm | स्मिता.

पहिले इनो घेऊनच धागा उघडला आणि इनो घेतल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.
'बाने'मध्ये खादाडी जोरदार झालेली दिसतेय. सगळे फोटो सहीच.
आता ते संपादनाचं जमतं का बघा आणि फोटुखाली नावं द्या.

स्वाती दिनेश's picture

19 Apr 2011 - 5:54 pm | स्वाती दिनेश

एकंदरीत मस्त कट्टा झालेला दिसतो आहे,
(स्वगत-जर्मन कट्ट्याची तयारी करावीच लागणार आता..)
स्वाती

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Apr 2011 - 9:35 pm | निनाद मुक्काम प...

ताई
तू फक्त कधी कुठे केव्हा ते सांग

प्रभो's picture

19 Apr 2011 - 6:22 pm | प्रभो

मस्त रे....

विनायक बेलापुरे's picture

20 Apr 2011 - 10:57 am | विनायक बेलापुरे

वा वा वा वा वा !!!!
जोरदार झाला म्हणायचा कट्टा.
आमच्या सारख्या नव्यांना अनेकांचे दिव्य दर्शन लाभ झाला. प्रतेक्ष नसला तरी फटू मधून.

नाव देवून सुद्धा कल्टी मारणार्याना पेनल्टी ठेवा नेक्स्ट टाइम.