"चेलुवी"[भारतीय लोककथेच्या सुगन्धाची कहाणी]

डावखुरा's picture
डावखुरा in जनातलं, मनातलं
29 Mar 2010 - 10:18 pm

"चेलुवी"म्हणजे लावण्यवती तरुणी.
'कथासरित्सागर' या कर्नाटकच्या लोककथासंग्रहातील कथेवर आधारित एक अप्रतिम ह्रदयस्पर्शी हिंदी चित्रपट.(भावलेला)

चेलुवी ही एक गरीब कुटुंबात आपली म्हातारी आई आणि बहिणीसह राहत असते. चेलुवीच्या हाती एक विलक्षण रहस्य येते.......ते म्हणजे 'सुंदर,दिव्य गंधाच्या फुलांचे झाड होण्याचे,अन् पुन्हा मानवी रुप धारण करण्याचं.' थोडं मोठं झाल्यावर चेलुवी हे रहस्य आपल्या बहिणीस सांगते, फक्त फांद्या तोडु नकोस असे बजावते. त्या दोन्ही बहिणी घनदाट जंगलात जातात.चेलुवी बहिणीच्या हातातील त्या दोन पाण्याने भरलेल्या कलशांवर विलक्षण मंत्राद्वारे एकाग्र होते. त्यातील एक कलश स्वतःवर ओतुन घेतल्याक्षणी चेलुवी चमत्कारिकपणे एका बहरदार फुलझाडात परावर्तित होते.स्वर्गीय सुंदर अशी दिव्य सुगंधाची फुले.फांद्याना काहीही ईजा न होउ देत दुसरी त्यावरील काही फुले तोडुन घेउन नंतर दुसर्‍या भांड्यातील मंतरलेले पाणी त्या तरुवर शिंपडते आणि काय आश्चर्य चेलुवी पुन्हा मानव रुप धारण करते. मग दोन्ही बहिणी घराकडे परततात.

त्यानंतर दोन्ही बहिणी अनेक वेळा जंगलात जाउन तो प्रयोग करतात. त्या दिव्य सुगंधाला भुलून कुमार नावाचा एक युवक चेलुवी च्या प्रेमात पडतो. अशाच एका दिवशी कुमार त्या युवतींच्या मागे मागे पाठलाग करत जंगलात गेला. तो आधीच त्या दैवी आणि विलक्षण सुगंधाने भारावलेला असतो आणि त्याला त्या सुगंधामागील रहस्य ही जाणुन घ्यायचे असते. त्या सुगंधाने मुग्ध झालेला कुमार तिच्याशी लग्न करतो. चेलुवी आणि कुमार एकांतात बर्‍याच वेळेला त्या सुंदर फुलांचा आणि दैवी सुगंधाचा आस्वाद घेतात. कुमार तिला एका निर्जन तलावावर घेउन जाउन तो त्या झाडाच्या रुपातील लावण्यवतीशी समरस होण्याचा प्रयत्न करत असतो पण काही लहान मुले आणि कुमारची लहान बहीण श्यामा हे रहस्य एका झोपडीत लपुन पाहतात.

एके दिवशी कुमार घरी नसताना श्यामा चेलुवीला तिचे रह्स्य सांगण्याबद्दल खुप आग्रह करते आणि जंगलात येउन तरु बनुन दा़खवण्यास भाग पाडते. चेलुवी तरु झाल्यावर श्यामा व ईतर मुलांनी भावनाशुन्यपणे ती दिव्य सुगंधाची फुले तोडत असताना अवखळ क्रुरतेने फांद्यानाही ईजा पोहोचवली त्याचे परिणाम स्वरुप त्या तरुस, चेलुवीस कायम स्वरुपाचे नुकसान सोसावे लागले.

एका लाकुडतोड्यास त्या "तरुतरुणीवर" दया येते आणि तो तिला घरी घेउन येतो. कुमार जेव्हा घरी येतो तेव्हा त्यास चेलुवीची अनुपस्थितता अस्वस्थ करायला लागते. दुसरीकडे तरुरुपी चेलुवी त्या लाकुडतोड्यास विनंती करते की माझे रोपण कुमारच्या, माझ्या पतीच्या घरासमोर कर.... पण लाकुडतोड्या तरुरुपी तरुणीची विनंती समजण्यास असमर्थ ठरुन तो तिचे पुनर्रोपण जंगलातच करतो. अंतिम चरणात चेलुवीच्या शोधार्थ तिच्या विरहात जंगलात भटकणार्‍या कुमारला चेलुवी सांगते की "जर तो त्या दिव्य तरुच्या तुट्लेल्या शलाका परत शोधुन आणु शकला तरच ती परत मनुष्ययोनीत पुन्हा एकदा परतु शकेल!" शेवटी दोन अस्वस्थ,अत्रुप्त जीव दाखवण्यात आले आहेत जे जंगलाच्या विनाशाचे,मोठ्मोठाली झाडे उन्मळुन पडण्याच्या घट्नेचे साक्षीदार असतात की ज्यानंतर तरुतरुणी चेलुवीच्या शलाका सापडणे केवळ अशक्य. हे जेव्हा निश्चित होते तेव्हा प्रेक्षकांचे ह्रुदय हेलावुन जाते. चेलुवी त्याच क्षणी या स्वार्थी मानवी जगातुन विरुन जाते. त्या तरुतरुणीचा चेलुवी अवतार तिथेच संपतो.
cheluvina
:चेलुवी चित्रपटातील एक क्षण(गुगल इमेजवरुन साभार):

या कलाक्रुतीतुन दिग्दर्शक गिरिश कर्नाडजी जिवनविषयक द्रुष्टिकोनाकडे लक्ष्य वेधु इच्छितात. "झाडांनाही भावना असतात आणि माणसांनाही फुलझाडांसारखं बहरता येतं,आनंद देता येतो."
हे कर्नाटकी लोककथेच्या सुत्रास गिरिशजींनी फार चपखलतेने गोवले आहे. यात जंगल वाचवण्याचा संदेश व मानवी [शोषणशील] प्रव्रुत्तीचा आलेखही स्पष्ट आढळतो. चेलुवीच्या संवेदनशील भुमिकेस न्याय दिला आहे आपल्या मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने. मानव आणि निसर्गातील द्वंद्वाचा प्रत्यय येतो.

मराठी अभिनेत्री,सिनेमा हिंदी आणि मुळ कथा कर्नाटकी लोककथा यांचा सुरेख संगम आणि तरल,सुगम दिग्दर्शन....

मांडणीसंस्कृतीकलानाट्यजीवनमानचित्रपटप्रकटनविचारप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखअनुभव

प्रतिक्रिया

डावखुरा's picture

29 Mar 2010 - 10:24 pm | डावखुरा

broken image?????????????
:''( :''( :''( :''( :''( :''(
~X( ~X( ~X(
:( :(

"राजे!"

राघव's picture

30 Mar 2010 - 12:07 am | राघव

मी पण बघीतलेला हा सिनेमा.
सोनाली कुळकर्णींचा पहिला सिनेमा बहुदा..
अतिशय तरल कथानक पण तेवढेच हृदयद्रावक.
गिरीशजींनी अप्रतीमपणे फुलवला आहे. पण, पुन्हा बघवला नाही.

राघव

शुचि's picture

30 Mar 2010 - 1:36 am | शुचि

छान ओळख. धन्यवाद.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

विशाल कुलकर्णी's picture

30 Mar 2010 - 10:11 am | विशाल कुलकर्णी

खुप वर्षापुर्वी पाहिला होता हा सिनेमा. खुप सुंदर आणि तरल चित्रपट होता. पुनःप्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

अरुंधती's picture

30 Mar 2010 - 7:18 pm | अरुंधती

वेगळा विषय व वेगळा चित्रपट. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! नक्की बघेन :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/