महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=473...
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=473...
(या असल्या धोरणाबाबतच्या बातम्या आम्हाला वर्तनामपत्रातूनच का वाचायला भेटतात? शासनाला सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याची गरज वाटत नाही काय? असो.)
प्रा. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी एक समिती विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यावेळचे सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली होती.
समितीच्या शिफारशींची सविस्तर माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मिळू शकेल. प्रस्तुतचे लेख व प्रत्यक्ष शिफारशी वाचून वाचकांनी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत प्रतिक्रिया नोंदवणे अपेक्षित आहे. त्यानंतरच या समितीच्या शिफारशींवर साधकबाधक चर्चा होऊन त्याचे प्रत्यक्ष धोरणात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू होईल. महाराष्ट्र शासनाचा या प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असून तज्ज्ञांची मते आणि लोकांच्या सूचना यांतून समितीच्या शिफारशींची योग्यायोग्यता, आवश्यकता, उपयुक्तता पडताळून पाहिली जाणे गरजेचे आहे!
www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर माहिती जरी उपलब्ध असली तरी त्यावरील प्रतिक्रिया कोठे द्याव्यात यात कोठेही उल्लेख नाही. 'संपर्क करा' हा इमेल आयडी पण सापडत नाही. अशा वेळी कोणी या धोरणावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी कोठे संपर्क कराव? नाही म्हणायला एक अर्ज आहे. पण तेथे कशा प्रकारे प्रतिक्रिया चढवावी अन त्याची पोचपावती मिळेल याची खात्री काय?
थोडक्यात शासकिय संकेतस्थळाने आपली दिवाळखोरी परत एकदा जाहिर केलेली आहे.
असो. तत्राप आपल्यामध्ये कोणास या प्रतिक्रिया देण्याच्या (पक्षी लश्कराच्या भाकर्या भाजणे हा शब्दप्रयोग योग्य होईल काय?) मोह झाल्यास आपण जरूर करावा अन राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी सहभागी व्हावे.
प्रतिक्रिया
15 Feb 2010 - 9:36 am | विसोबा खेचर
नक्की! :)
तात्या.
15 Feb 2010 - 12:32 pm | युयुत्सु
जशी प्रजा तसा राजा...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
15 Feb 2010 - 3:36 pm | सुहास
काय सांगता? पन्नाशीतल्या महाराष्ट्राला स्वतःचे सांस्कृतिक धोरण नाही? :O
17 Feb 2010 - 8:35 am | II विकास II
मला आलेले इ-पत्र
---------------------------------
महाराष्ट्र शासनाने डॉ० आ०ह० साळुंखे ह्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा सादर केला आहे आणि त्या समितीने – म्हणजेच पर्यायाने शासनाने – जनतेला दि० २८ फेब्रुवारी २०१०पर्यंत सदर मसुद्यावरील सूचना पाठविण्यास सांगितले आहे. आपण ह्या मसुद्याच्या अनुषंगाने, त्यात आपण सुचवू इच्छित असलेल्या सर्व सूचना आमच्याकडे विरोपाने (ई-मेलने) पाठवून द्याव्यात अशी ’मराठी+एकजूट’ द्वारा आम्ही विनंती करतो. ’मराठी+एकजूट’कडे आलेल्या सूचनांचे मान्यवरांच्या सहाय्याने एकत्रित संकलन करून, त्यात आवश्यक तिथे मान्यवरांचे स्पष्टीकरण/भाष्य जोडून, ते ’मराठी+एकजूट’च्या सूचना करणार्या सहकार्यांच्या नामनिर्देशासह शासनाच्या सांस्कृतिक धोरणासाठी नेमलेल्या समितीला सादर केले जाईल.
संपूर्ण लेख आपण खालील दुव्यावर वाचू शकता.
http://amrutmanthan.wordpress.com/2010/02/16/महाराष्ट्र-राज्याच्या-सा/
---------------------
वरील मसुद्याबद्दलच्या आपल्या सूचनांबद्दल खालील रकान्यांमध्ये चर्चा करू शकता. परंतु आपल्या अंतिम स्वरूपातील सूचना मात्र थेट ’मराठी+एकजूट’ उपक्रमालाच ई-मेलद्वारे (marathi.ekajoot@gmail.com) अवश्य पाठवा.