शिवजयंती विशेष - केंजळगड, रायरेश्वर आणि कारी-आंबवडे परीसर
केंजळगड.....पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला एक डोंगरी किल्ला. केळंजा या नावानेही ओळखला जाणारा हा किल्ला, वाई तालुक्यात, वाई शहरापासून वायव्येस साधारणपणे ३० किलोमीटर अंतरावर, तर पुण्याहून भोरमार्गे अंदाजे ९० किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. यादवकाळात वाईभोवती बांधण्यात आलेल्या, पांडवगड, वैराटगड, कमळगड यांच्याच मांदियाळीतील एक गड अशी याची ओळख. समुद्रसपाटीपासूनची उंची अदमासे ४२७५ फुट भरावी. गडाच्या पश्चिम बाजूला रायरेश्वराचे प्रचंड पठार गडापेक्षाही जास्त उंचीवर म्हणजे साधारणपणे ४५०० फुट उंचीवर पसरलेलं आहे.