We Rbots.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
28 Feb 2025 - 10:59 am

जडव्यागळ
असा असा कोणताही शब्द कोशात नाहीये, सर. तुम्हाला जगड्‌व्याळ असे म्हणायचे आहे का?
नाही. पण असाच एक शब्द आहे. त्याचा अर्थ काहीसा असा आहे म्हणजे किचकट, गुंतागुंतीचे, समजण्यास अवघड.
तुम्हाला जडजंबाळ असे म्हणायचे आहे का?
थँक्यू. आवडली का?
काय आवडली का, सर?
कविता रे.
सिंटक्स तपासला सर,बरोबर आहे. मला शब्दांच्या पलीकडले काही समजत नाही.
असे म्हणजे मनात काही हलल्यासारखे वाटत नाही? गलबलल्यासारखे वाटत नाही? अंग मोहरून येत नाही? अंगावरून पीस फिरवल्यासारखे...
कुठलीही गोष्ट हलण्यासाठी फोर्सची गरज लागते असे न्यूटनचे नियम सांगतात. तसा काही फोर्स इथे दिसत नाहीये. वस्तूच्या जडत्वावर मात...
स्टॉप इट.
येस सर.
आजची बातमी वाचलीस? मला रडू आले.
शक्य आहे.काही लोक वाजविपेक्षा जरा जास्त संवेदनाशील असतात.
एका नवजात सोनूलीचा मृत देह कचराकुंडीत... तुला काही वाटत नाही?
कचऱ्या पासून वीजनिर्मितीची प्रक्रिया अशी आहे की प्रथम ...
तुला काहीच कसे वाटत नाही?
We Robots don't feel anything.
Robots don't Cry.

भाषा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

10 Mar 2025 - 12:38 pm | कंजूस

बरोबर.

काही वर्षांत हे असे रोबोट डोकेदुखी ठरणार आहेत. ही सुरुवात आहे.