साधो यह तन ठाठ तँबूरे का
काल एका सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. तिथे कबीरांची एक अप्रतिम रचना सादर केली गेली - "साधो यह तन ठाठ तँबूरे का" .
ऐकता क्षणी मनाला भावली ही रचना ! ते कोणत्या रागातील सादरीकरण होते मला कळले नाही पण युट्युबवर शोधल्यावर हे एक सादरीकरण निदर्शनास आले जे की अगदी तत्सम आहे -
Sant Kabir Bhajan - Sadho yaha tan thaat tambure ka
https://www.youtube.com/watch?v=PH1ouOWuyT0
साधो यह तन ठाठ तँबूरे का
ऐंचत तार मरोरते खूँटी
निकासत राग हजूरे काटूटे तार बिखर गई खूँटी
हो गया धूरम-धूरे काकहै 'कबीर' सुनो भाई साधो
अगम पंथ कोई सूरे का
फक्त तीन कडव्यात कबीराने आकाशाला गवसणी घातली आहे !
साधो, हे साधो बाहेरच्या लोकांना, साधु जनांना उद्देशुन असेलही कदाचित, पण मला तरी ते स्वतःला उद्देशुन असलेले असावे असे वाटले ! अर्थात अरे मना सज्जना , हा देह हा जणु तंबोर्याचा थाठ आहे . ह्या तंबोर्याला द्वैताची, देहात्मभावाची खुटी मारुन ठेवली आहे अन त्याला ह्या वाणीची तार बांधलेली आहे , अन त्यातुन हा जो राग निघतोय तो सारं काही त्या हुजुराची अर्थात परमेश्वराची इच्छा आहे . आणि फक्त वाणीच का ? सर्वच कर्मेंद्रिरियांच्या कडुन होणारी सर्वच कर्मे हा त्या हुजुराने , भगवंताने कल्पिलेला , आळवलेला राग आहे !
एकदा ह्या कर्मांची तार तुटली, अन द्वैताची खुंटी तुटुन बिखरुन गेली की हा जो अधुरा होता, त्याचा अधुरेपणा लयास जाणार आहे अन तो पुर्णत्वास प्राप्त झालेला असणार आहे
किंव्वा ह्या देहाचा देहापणा धूर होऊन जाणार आहे , देहपण जळुन जाणार आहे .
आणि त्यानंतर सर्व कोलाहल शांत होऊन जाणार आहे, सर्व राग शांत होणार आहेत अन केवल एक शांततेचा राग शिल्लक राहणार आहे.
म्हणुन कबीर म्हणतो - हे मना सज्जना , त्या एकांताच्या शांततेच्या सुराचा जो काही अगम्य पंथ आहे , जो की सहजा सहजी न दिसणारा रस्ता आहे , उपाय आहे , पथ आहे अन पंथही आहे ,
असा काहीसा पंथ साधुन घे, प्राप्त करुन घे !
जियो कबीर जियो !!
दास कबीर ने ऐसी ओढ़ी, ज्यों की त्यों धरि दीनी ....चदरिया झीनी रे झीनी, राम नाम रस भीनी.... पटलं बाबा पटलं !!
___________/\____________