अश्शी सासू असती तर, आंम्ही असे झालो नसतो
भर तारुण्यात बायकोला,
असं उठसूट सासुरवाडीला घेऊन गेलो नसतो
तिची नसती आली कुणालाच सर
अश्शी सासू असती तर
आळी सगळी गाजवली असती,
मिजास मोठी केली असती,
राजा बनून हिंडलो असतो
मेव्हणीही म्हणली नसती मेल्या बाजु सर
अश्शी सासू असती तर
घरातल्या कार्ट्यांजवळ तिला सोडून गेलो असतो
आंम्हीसुद्धा नवरा-बायको मग सतत जवळ दिसलो असतो
मळ्यातल्या शिदुबाने दिले असते अनेक वर
अश्शी सासू असती तर
सासुरवाडीतल्या मेव्हण्यांनी ठोकला असता सलाम
दहा ते दहा रोज मस्त केला असता आराम
सासर्यांनी माझं ऐकून वेळेअगोदर
भरले असते लार्ज पेग
अश्शी सासू असती तर
मिपाबंधुंनी रम डिलेवरी केली असती
माझ्यासाठी पायघडीसुद्धा ठेवली असती
काही नसते बोलले घेतल्यावर
त्याचीच मिसळ,
अश्शी सासू असती तर
माडीवरती माझ्यासाठी खास ठेवली असती जागा
सर्वांना बोललो असतो ओ चखण्यातच र्हावा
माझी गाडी पळवली नसती अशी टकाने सिग्नलवर
अश्शी सासू असती तर
आता बायकोला दोष देऊन काय फायदा
केला असता तिने पहिला माझाच रांदा
झालो असतो मी या जन्मातच सातारकर
अश्शी सासू असती तर
प्रतिक्रिया
9 Mar 2016 - 3:42 pm | बोका-ए-आझम
शिवाय कोडाईकॅनाल आणि भूछत्री हे दोन मिपीय काव्यरस सोडल्याचा णिशेध!
9 Mar 2016 - 4:23 pm | चांदणे संदीप
शिवाय विडंबन पेरणेचा उल्लेख नाही....विडंबन कंसात टाकायचा संकेतही पाळला जात नाहीये आजकाल! :(
(यामुळे'च' अजूनतरी वाचले'च' नाही!)
Sandy
9 Mar 2016 - 4:31 pm | अन्नू
ओह! ते राहीलंच.. :/
9 Mar 2016 - 7:07 pm | अत्रुप्त आत्मा
हहीह्हीहही....
9 Mar 2016 - 7:18 pm | sagarpdy
"अश्शी मेव्हणी असती तर" च्या प्रतीक्षेत :)
9 Mar 2016 - 7:21 pm | सूड
"अस्सं परसदार असतं तर" च्या प्रतिक्षेत!! ;) =))
9 Mar 2016 - 8:13 pm | बाबा योगिराज
सूड भौ,
____/\____
9 Mar 2016 - 10:32 pm | अन्नू
@मिपा संम- दुरुस्ती अपडेटबद्दल थांकू :)
अस्सं परसदार असतं तर" च्या प्रतिक्षेत!!
खिक्क!! :))
9 Mar 2016 - 11:33 pm | पैसा
=))