रस्त्याच्या कडेला एक जुनाट हॉटेल होती.बघणारा तिथे कधी गेलाच नसता.
एक माणूस शांतपणे सिगार पीत होता!
बाहेर कार येऊन थांबली.
कारमधून उतरणारा सरळ हॉटेल मध्ये आला!
"मनिष तुला हजारदा सांगितलंय की इथे येण्यासाठी कार वापरायची नाही!"
"सॉरी ग्रेग."
"तू मी दिलेले कागद वाचलेस?"
"हो आणि ग्रेग ही खूपच विचित्र केस आहे."
"म्हणून मी तुला इथे यायला लावलं."
मनिषने कॉफीची ऑर्डर दिली आणि तो शांतपणे बोलू लागला.
"पण मला याचा मार्ग सापडला आहे!"
ग्रेग उडालाच!
"मी जोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीये मनिष!"
"मी जोक करत नाहीये.तुला ती अन्ड्रिआ कुठे भेटेल हे बघायच होतं ना!"
"हो आणि?"
"ती तुला भेटेल, मात्र एकच ठिकाणी!"
कुठे?
"स्वप्नांच्या जगात!!!!!"
ग्रेग कितीतरी वेळ सुन्न बसून राहिला.भानावर आल्यावर तो म्हणाला.
"ओके,पण स्वप्नांच्या जगात अँद्रिआ मला भेटेल हे कशावरून?"
मनिष हसला आणि म्हणाला,
"जशी ती तेरा हजार सैनिकांना भेटली होती!"
आणि पुढच्याच क्षणी त्याने एक चित्र ग्रेगपुढे धरले!
"कंग्रेजुलेशन्स ग्रेग तू आताच अँद्रिआला बघितलेस!"
"मनिष आणि तू?"
"नाही ग्रेग मी अजून ते चित्र बघितलं नाही."
"म्हणजे ती आता माझ्या स्वप्नात येईल?"
"हो आणि तिला मारण्याचा एकच उपाय आहे."
"काय?"
"तुला तिच्या मायाजालातून बाहेर पडावं लागेल!"
एवढे बोलून मनिष तडक बाहेर गेला!
-------------
ग्रेग आपल्या घरी गेला!
त्याने कपाटातून काहीतरी वस्तू काढली.ती एक अत्यंत जुनाट कुपि होती.
"चल ग्रेग तीन दिवस तरी तुला जाग येणार नाही."ग्रेग स्वतःशीच म्हणाला.
आणि त्याने कुपि तोंडाला लावली!
क्षणार्धात ग्रेग अंथरुणावर आडवा झाला!
--------------
'मी पोहोचलो?'
'कसं शक्य आहे?'
'इतक्या लवकर?'
ग्रेग विचारात गढला होता.
बाजूलाच जाणाऱ्या एका व्यक्तीला त्याने विचारले,
"हे कोणतं ठिकाण आहे?"
तय व्यक्तीने त्याला न्याहाळले.
'नवीन दिसतय!'
"क्वीन अँद्रिआचे राजधानी,अँद्रेला!"ती व्यक्ती म्हणाली.
"वेलकम ग्रेग," ग्रेग स्वतःस म्हणाला.
तेवढ्यात घंटेचा आवाज झाला,आणि त्याबरोबर धीरगंभीर आवाज घुमला,
'ग्रेग मॉरिसन, महालात या!'
ग्रेग महालाकडे चालू लागला.
अँद्रिआचा महाल!
स्वप्नांचा महाल!
ग्रेगने आपली हत्यारे चाचपून पाहिली.
एकही हत्यारे ग्रेगकडे नव्हते!
'तिला मारण्याचा एकच उपाय आहे.तुला तिच्या मायाजालातून बाहेर पडावं लागेल!'
ग्रेगला मनिषचे शब्द आठवले!
ग्रेगने महालात प्रवेश केला. हा फक्त महाल नसून एक स्वप्नमहालच होता.जगातील सर्व सूखे तेथे अस्तित्वात होती.
आणि सुंदर स्त्रियादेखील!
"यावे ग्रेग, मी आपलीच वाट बघत होते.एक स्त्री पुढे होत म्हणाली."
तिच्यामागोमाग अनेक स्त्रिया पुढे आल्या!
"तुमच्यापैकी एकही स्त्री मला काहीच करु शकत नाही," ग्रेग ओरडला!
क्षणार्धात त्या स्त्रिया गायब झाल्या!
"पर्फेक्ट!" महालात आवाज घुमला!
म्हणजे तुला महालाची माहिती आहे तर!"
"कोण आहे तिकडे," ग्रेग ओरडला.
"मला माझ्या महालासाठी असाच एक राजा हवा होता!"
"समोर ये!" ग्रेग ओरडला.
आणि त्याच्या समोर ती उभी होती.
अँद्रिआ!!!!!!!!!!!!
--------------
ग्रेग हरखून गेला होता!
असं सौंदर्य?
जगात असू शकतं?
काय आहे हे?
अप्सरा की स्त्री?
देवता की स्त्री?
"ग्रेग शांत हो!" ती प्रेमाने म्हणाली.
"मी तुला........."ग्रेग कसाबसा म्हणाला.
"मार ना मग. बघ मी कशी तुझ्यावर मरतेय!"
"एक तर मला मारून टाक नाहीतर या राज्याचा राजा हो!"
'तिला मारण्याचा एकच उपाय आहे.तुला तिच्या मायाजालातून बाहेर पडावं लागेल!'
ग्रेगला मनिषचे शब्द पुन्हा आठवले!
पण अँद्रिआला विसरण अशक्य होतं!
कसा हिला विसरू मी?
कसा हिच्या मोहपाशातून बाहेर पडू?
हिच्यापुढे जगात कुठलीही स्त्री सुंदर नाही?
होती एक स्त्री!
माझी क्लेआ!
जगातील सर्वात सुंदर स्त्री!
कारण मी तिला जगातील सर्वात सुंदर वस्तू दिली!
प्रेम!!!!!!!!!!!!
"नाही!!!!!" अँद्रिआ ओरडली!
क्षणार्धात सर्व संपले.
--------------
ग्रेग तीन दिवसांपासून पडून होता!
डॉक्टरांनी त्याला म्रुत घोषित केले.
आज त्याचा अंत्यविधि होता!
त्याला पुरणार तेवढ्यात एक कार तिथे आली!
.......आणि कारमधून मनिष बाहेर पडला!
-----------------
"मी अँद्रिआला मारलं नाही!" ग्रेग म्हणाला .
"मला माहिती आहे."मनिष म्हणाला.
"मग कोणी मारलं तिला?"
"मी! मनिष शांतपणे उद्गारला."
"तू?"
"हो!"
"कसं? तू तर माझ्या स्वप्नात नव्हतास."
"पण मला माझी स्वप्नं पडू शकतात,ग्रेग," मनिष हसत म्हणाला!
"मला अँद्रिआने मारलं क्लेआच्या रूपात, मग कसं झालं हे?" ग्रेगने विचारले
"सांगतो!"
मनिषने सांगण्यास सुरुवात केली........
प्रतिक्रिया
19 Dec 2015 - 11:59 am | DEADPOOL
क्रमशः
19 Dec 2015 - 12:00 pm | DEADPOOL
www.misalpav.com/node/34145
19 Dec 2015 - 12:02 pm | मयुरMK
झकासस्स्स्स .
19 Dec 2015 - 12:17 pm | DEADPOOL
मयूरराव एखादी कविता येऊ द्या की!!
19 Dec 2015 - 12:03 pm | मयुरMK
पुढचा लेख केव्हा ?
19 Dec 2015 - 12:05 pm | DEADPOOL
येईल उद्यापर्यँत!
19 Dec 2015 - 12:13 pm | एस
अरे वा! मोठे भाग टाकत जा.
19 Dec 2015 - 12:16 pm | DEADPOOL
धँस एस!!!!!
19 Dec 2015 - 12:50 pm | मयुरMK
गावी गेलो होतो आलो आहे काल .आज टाकेन कविता :)
19 Dec 2015 - 1:00 pm | DEADPOOL
I'll Wait
19 Dec 2015 - 1:06 pm | मयुरMK
प्रतीक्षा संपली :)
19 Dec 2015 - 4:14 pm | पद्मावति
कथा खूपच मस्तं रंगत चालली आहे. नेहमीप्रमाणेच पु.भा.प्र.
19 Dec 2015 - 4:35 pm | DEADPOOL
धँस!
19 Dec 2015 - 5:18 pm | अनिरुद्ध.वैद्य
छान! उत्सुकता वाढत चाललीय!
19 Dec 2015 - 5:23 pm | जव्हेरगंज
19 Dec 2015 - 5:56 pm | DEADPOOL
धँस अनि आणि आमचे फेवरेट जवेरगंज साहेब!!!!
19 Dec 2015 - 6:01 pm | विशाल कुलकर्णी
आवडला हा भाग !
19 Dec 2015 - 6:21 pm | DEADPOOL
भाग मोठा टाकलाय !!!!;)
21 Dec 2015 - 11:15 am | DEADPOOL
www.misalpav.com/node/34185