पोपट....

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
3 May 2015 - 12:59 pm

माझ्यासाठी ठेवलेल्या पिंडाकडे पहात, मी हटवाद्या सारखा बसलो होतो,
जाताजाता तिला अडकवल्या शिवाय, मी पिंडाला मुळी शिवणारच नव्हतो,

तिच्या एका निर्दय नकारा मूळे, मी हे जग सोडले, हे सर्वांना ठाउक होते,
तेव्हा मी अगतिक होतो, आता तिलाही तसेच झालेले मला पहायचे होते,

बर्‍याच शपथा घेतल्या आणि घालल्या गेल्या, मी कशालाही बधलो नाही,
आजूबाजूचे कावळेही प्रचंड दबाव टाकत होते, पण मी जागचा हललो नाही,

मला खात्री वाटत होती, अजुन थोडेसे ताणले, की ती नक्की येईल,
या जन्मी जरी नाही जमले, तरी पुढच्या जन्मीचे वचन नक्की देईल,

मग दिमाखात पिंडाला चोच मारुन, तिच्या समोरुन मला उडून जायचे होते
त्या आधि, एकदातरी माझ्यासाठी ओले झालेले, तिचे डोळे मला पहायचे होते,

उन्हात उभे राहून वैतागलेले आप्त, नाईलाजाने, माझ्यासाठी प्रार्थना करत होते,
माझ्या मृत आत्म्याला चिरशांती लाभावी, म्हणून देवाला साकडे घालत होते,

शेवटी कंटाळून, एका अनुभवी भटजींनी, एक जालीम उपाय काढला,
मी दाद देत नाही हे पाहिल्यावर, त्यांनी एक दर्भाचा कावळा आणला,

दर्भाच्या कावळ्याला नमस्कार करुन, सगळे नातलग जेवायला बसले,
इकडे मात्र माझ्या पोटात, मात्र हजारो कावळे कोकलू लागले,

नाईलाजाने मी त्या मोडक्या पिंडातला भात नरड्या खाली ढकलला
आणि मागे न बघता, निमुट पंख ओढत, यमलोकाचा रस्ता पकडला

काहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागद्वारभूछत्रीवाङ्मयशेतीशृंगारसांत्वनाभयानकहास्यअद्भुतरसपाकक्रियाप्रेमकाव्यवाक्प्रचारशब्दक्रीडाविनोदऔषधोपचारप्रवासविज्ञानकृष्णमुर्तीशिक्षणछायाचित्रण

प्रतिक्रिया

तिमा's picture

3 May 2015 - 1:11 pm | तिमा

हे म्हणजे, अनुप खलबत्ता यांच्या एका भेसूर गजलेची आठवण करुन देणारं आहे.
मरनेके बादभी मेरी आँखे खुली रही थी
क्यों कि, इंतजार करनेकी इन्हे आदतही हो गयी थी|

जडभरत's picture

30 Jun 2015 - 10:21 am | जडभरत

अनुप खलबत्ता म्हणाजे काय? मी मिपावर नविनच आहे, अजून इतकीशी माहिती नाही.

एक एकटा एकटाच's picture

3 May 2015 - 2:18 pm | एक एकटा एकटाच

आवडली.

आतिवास's picture

3 May 2015 - 2:32 pm | आतिवास

आवडली.

पैसा's picture

3 May 2015 - 3:57 pm | पैसा

आवडली तरी कसं म्हणू? वाईट वाटलं

दिल दिया, ऐतबार की हद थी
जान दी, तेरे प्यार की हद थी
मर गए हम, खुली रहीं आँखें
ये तेरे इंतज़ार की हद थी,

हे आठवलं.

नगरीनिरंजन's picture

3 May 2015 - 4:04 pm | नगरीनिरंजन

लैच जबर्‍या करुण विनोद आहे! आवडली!

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2015 - 9:02 pm | अत्रुप्त आत्मा

+१

प्राची अश्विनी's picture

3 May 2015 - 4:18 pm | प्राची अश्विनी

आवडली!
वाचून वाइट वाटले .

विवेकपटाईत's picture

3 May 2015 - 6:21 pm | विवेकपटाईत

असे कित्येक कावळे मी पाव वर असतील, ज्यांचे हृदय कोणी न कोणी तोडले असतील. शेवटी
काफिर के वादे पर एतबार कर रहा है कोई
बीते हैं दिन चार, जनाजा उठ रहा है कोई.

जडभरत's picture

11 Jul 2015 - 9:16 pm | जडभरत

व्वा भौ व्वा!!!

स्पंदना's picture

3 May 2015 - 6:59 pm | स्पंदना

__/\__!!

श्रीरंग_जोशी's picture

4 May 2015 - 12:45 am | श्रीरंग_जोशी

दर्द भरी रचना भावली.

शीर्षक मात्र रुचले नाही.

सर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे मनःपूर्वक आभार,

जोशी सर,

या कविते मधे ज्या घटनेचे / मानसीकतेचे वर्णन करायचा मी प्रयत्न केला आहे त्या साठी या पेक्षा दुसरे योग्य शीर्षक मला सुचले नाही. मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही.

जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर तुम्ही कोणते शीर्षक दिले असते?

पैजारबुवा,

श्रीरंग_जोशी's picture

4 May 2015 - 9:32 am | श्रीरंग_जोशी

पैजारबुवा, त्याचे असे झाले की इतकी दर्दभरी कविता वाचून माझे डोळे पाणावले, इतके पाणावले की शेवटचे कडवेच वाचू शकलो नाही. म्हणून शीर्षक रुचले नाही.

जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर

देवाने मला कविहॄदय दिलेले नसल्याने ती वेळच येत नाही हो :-( .

प्रचेतस's picture

4 May 2015 - 10:26 am | प्रचेतस

कविता आवडली पैजारबुवा.
बर्‍याच काळानंतर वेगळ्या धर्तीची कविता वाचायला मिळाली.

कविता वेगळी वाटली आणि आवडली.
त्यातही कवितेतील भावना आणि कवितेचे शिर्षक विरुद्ध भासी असल्याने, खुद्द कवीने ही जी भावना कवितेत लिहिलेली आहे त्या भावनेस तो अलिप्त राहुन पाहताना विषाद न वाटता एक त्रयस्त काय म्हणत असेल हे मांडलेले आहे. आणि असा पोपट होउ नये म्हणुन या जगात असताना कुठल्याही नकाराने हे जग सोडुन न जाणे यातच शहानपणा आहे हे मान्य करुन जगत रहावे हे कवीच्या अलिप्त भावनेला तर वाटत नसेल ?

आवडली! कावळ्याची दया आली. पण दर्भाचा कावळा शिवायला लावून जेवायला बसणारे नातलग वाचून फार काही वेगळं वाटलं नाही. एकदा मातीआड गेलं की गेलं कावळा बिचारा फारच अपेक्षा ठेवून बसला होता.

पगला गजोधर's picture

5 May 2015 - 7:06 pm | पगला गजोधर

कावळा बिचारा फारच अपेक्षा ठेवून बसला होता

कावळा नव्हे पोपट !

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 May 2015 - 6:41 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

__/\__!

मोहनराव's picture

5 May 2015 - 7:02 pm | मोहनराव

छान कविता!

एकाच वेळी विनोदी एकाच वेळी करूण!

dadadarekar's picture

29 Jun 2015 - 8:43 pm | dadadarekar

उम्र-ए-दराज़ माँगके लाए थे चार दिन
दो आरज़ू में कट गए, दो इन्तज़ार में

काळा पहाड's picture

29 Jun 2015 - 11:46 pm | काळा पहाड

सेक्युलर-ए-शबाब बनाके आये थे चार आयडी
दो गाली देनेमें 'उड' गए, दो बहस में

dadadarekar's picture

30 Jun 2015 - 6:33 am | dadadarekar

मुहोम्मद को मिलनेके लिये आखिर पहाड आही गया !

( ईफ माउंटन कान्ट गो टु मोहम्मद , मोहम्मद शुड गो टू माउंटन .. अशी म्हण आहे ना ? )

मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही.>>>+11111
मला तरी कवितेचं शीर्षक योग्य वाटतंय . आई वडिलांचा विचार न करता क्षुल्लक कारणासाठी प्राण देवूनही त्याचा पोपट झाला . :-)
पण तोच कसा काय त्याच्या पिंडाला शिवणार ?

साधी गोष्ट! तो कावळ्याच्या रूपात तिथे आलाय पिंडाला शिवायला!

माझ्या माहिती प्रमाणे कावळे पिंड खायला येतात पण मेलेल्याचा आत्मा पिंडाला लपेटून बसल्यामुळे ते पिंडाजवळ जावू शकत नाहीत .
मेलेला माणूस कावळा होवून पिंड शिवायला येत नाही :-)

जडभरत's picture

11 Jul 2015 - 9:18 pm | जडभरत

हं गहन प्रश्न आहे!!!