गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २८

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
3 Feb 2015 - 1:23 am

मागिल भाग..
सगळे आनंदानी ओरडायचे:- "अग्नि नारायण भगवान की...........................जय!"
पुढे चालू...
============================

आणि मग ते घमेलं यजमान पत्नी कडून पूजन करून घेऊन, अग्निमुख नावाचा यज्ञपूर्व होमंसंस्कार सुरु झाल्यावर कुंडात मध्यभागी ओतल जायचं. बास्स! आणि एकदा का हा मेनपॉइंट ऑफ दि गेम नीट झाला,की मग..माझी आणि सुर्‍याची चक्र फिरायला सुरवात व्हायची. मग होमकुंडाभोवती सर्वत्र आसने लावणे. त्यां'समोर यज्ञाची हविर्द्रव्य (आहुतींचे पदार्थ) नीट लाऊन ठेवणे. मुख्य देवतांना आवाहन पूजन करणार्‍या पूजकांना आणि कडेनी मंत्र म्हणणार्‍या वाचकांना काय हवं/नको ते पहाणे. हवन सुरु झालं की कमीच्या सीट्स-हलत्या.. आणि खेळत्या सीट्स-बद्ध.. ठेवणे. इत्यादी बाकि गोष्टींमधे आंम्ही-हलायला लागायचो. मग प्रथम दिवशीचा थोडासा लांबट झालेला कार्यक्रम नवग्रहांचं आणि इतर पुढलं..थोडंफार होमहवन होऊन,दुपारि १ ला संपायचा. मग सगळेजण भराभर सोवळी बदलून भोजना'कडे प्रस्थान करायचे. हो....! प्रस्थानच म्हणायला हवं. कारण कोकणासारख्या प्रांतात आजंही अश्या कार्यक्रमांचा-भोजन.., हा एक उप-कार्य-क्रमच असतो. अगदी आमच्या धार्मिक क्षेत्रातल्या मंडळींकडे पंगतीवर श्लोक म्हणण्यात जेव्हढी चाढाओढ असते. तेव्हढीच समोर येणार्‍या अन्नब्रम्हाच्या यथेच्छ उपासनेतंही चाढा-ओढच! त्यात मग..एकमेकाला (अती ;) )आग्रह करणे,त्याचा आगे/मागे अश्या कुठल्याही दिवशी, स्वतः खाऊन किंवा दुसर्‍याला खायला लावून सूड उगविणे..ज्यानी कुणी अति खाल्लेलं असेल..त्याला इकडे पैज जिंकू देणे..पण तिकडे त्याच्या बाबतीत काकूचे कान फुंकून ( =)))))) ) त्याला..विहिरिवरून पाण्याचे मोठ्ठाल्ले १२ हांडे आणायला भाग-पाडणे.. अश्या जब्बरदस्त शह/काट्शहाच्या लढाया पण चालायच्या.

मग पहिली पंगत बसवली..कि, मी आणि सुर्‍या..वाढंपाच्या-मनसोक्त आनंद लुटू देणार्‍या कामावर रुजू व्हायचो. काकूचंहि कडेनी हळ्ळूच सुरू व्हायचं.. "आत्मू..........ते पहिल्या रांगेतले शेवटून दोघे आहेत ना.., त्यांच्यावर लक्ष ठेव हो! नायतर पटकन जेऊन जातिल उठून!" .. आणि तिथे असायचं कोण??? तर मुख्य-यजमान आणि त्याची बायको. मग सगळे मिळून त्यांना पंगत उठेपर्यंत छळायचे. इतर बायका यजमान-पतिपत्नीला ..म्हणजे त्या नव्यानवरिला.. चांगले ,फक्कड आणि रग्गड उखाणे घेण्यास भाग पाडायच्या ... " अहो आता निम्मी होत आली पंगत..जेऊन! होऊ दे होऊ दे.. अता एकतरी..चांगला उखाणा ज्जोर्रात..." अशी बतावणी व्हायची.( आणि यानीच आधी पंगतीत सर्वत्र खसखस पिकायची!) त्यात ती नवरी बुजरी वगैरे असेल..तर पहिली काहि मिनिटं तिची हसण्यातच जायची..आणि मग कडेनी कुणीतरी वैतागून.."अरें मेल्यांनो हसवता किती तिला,मग उखाणे कधी घेणार?--- संध्याकाळी????" असा दगड हाणायच. आणि मग कसंबसं सावरत , " काळेश्वरी देवी आहे आमुची कुलस्वामिनी... काळेश्वरी देवी आहे आमुची कुलस्वामिनी... " यात परत कुणितरी तिला छळायला मागून... हूऊऊऊऊऊऊउ...आसा आवाज द्यायचं.. की मग परत हशा..आणि मागून सदाशिवदादाची चिडून "ए........गपा...रे!!! &^%$#साले!" अशी धमकियुक्त दरडावणी.. मग मात्र फायनल टेक"ला , "काळेश्वरी देवी आहे आमुची कुलस्वामिनी... काळेश्वरी देवी आहे आमुची कुलस्वामिनी...कुणी काहि म्हणा..पण मीच यांची भामिनी!" असा तो उखाणा पूर्ण व्हायचा.. आणि अख्खा भोजनमंडप हश्या आणि टाळ्यांनी दणाणायचा...फुल्ल एंटरटेनमेंट! मग नंतर यजमानाची राऊंड.. आणि त्याला उखाणा सुचला नाही..की सुर्‍याचं अचानक जाऊन केलेलं (कोकणातल्या नाटकांसारखंच! ;) ) प्रोम्टिंग :- मग कधी तो-"देवगडचा आंबा गोव्याचा काजू...आणि हिचं नाव घ्यायला..मी कशाला लाजू???" असा आयत्यावेळी हमखास हशा उडवणारा उखाणा-द्यायचा. मग बाकिच्यांकडून "परत..परत..! ऐकू आला नाय हो..परत..!!!" असा वन्समोअर-आला..की सुर्‍या मेला हरामखोर..- "देवगडचा आंबा गोव्याचा काजू...आणि हिचं नाव घेताना..सुर्‍यानी घेतली बाजू???" असा वन्स-मोअर(च) बदल करायचा.. मग पुन्हा एकदा हश्या आणि टाळ्या यायच्या. पण काकूला हा चावट्पणा अजिब्बात आवडायचा नाही..आणि मग भर मांडवात , एका हातानी पंचा सावरत पळणारा सुर्‍या आणि त्याच्या मागे हतात उलथन घेतलेली काकू असा "शीन" व्हायचा! मग गुरुजि यात मध्यस्थीला येत काकूला - " अगं..असल्या प्रसंगी पोरं जरा सैलपणा करतातच चिडवाचिडवीत.. तू कशाला त्यात एव्हढी चिडत्येस??? ..आपण आग्रहाला-जाऊ..चल!" असं म्हणून मग गुरुजि स्वतःच लाडूची परात घेऊन पंगतीवर आक्रमण करायचे...

आणि मग. मी..मी..म्हणणारे खाद्यवीरं विद्यार्थी.. गुरुजिंच्या हातानी पानात येणारे (प्रत्यही कमितकमी ५)लाडू आणि मागून काकूनी त्यावर तूप वाढत... "खा खा...दुपारी भांडी घासायला जोर नको का?" अश्या खात्या लाडूंच्या जागेवर केलेल्या पंच-नाम्यासह ! ..पचवत अक्षरशः जमिनिला हात देत उठायचे. मग मागून जेवलेले--वाढपावर आणि वाढंपी--पानांवर .,असा अपेक्षित बदल होऊन एकदाची जेवणं पार पडली..की मग मात्र पानसुपार्‍या होता होता ..आमच्यापैकि-कुणि वाडीत..कुणि विहिरि बाजुच्या गार हवेत चटया घेऊन चांगले ठ्ठार निद्राधीन व्हायचो. पण हा ही वेळ-फार मिळायचा नाही.. कारण जेवणानंतरच्या बाकि कामातंही आख्खि पाठशाळाच राबत असायची. मग काकूच जरा वेळानी अक्षरशः छडी हतात घेऊनच आंम्हा मुलांमागे वाडित यायची..."चला रे...बास झाल्या त्या झोपा! आता..कामास चला सगळी!" असा आदेश करायची. मग, सगळी काम अवरत अवरत दुपारी ५ वाजता एकेक पेश्शल "च्या" झाला..कि काहि काळ निवांत होऊन..पुन्हा डोक्यात वारं घुमायला लागायचं ते संध्याकाळी ७ वाजता,यज्ञमंडपात होणार्‍या वेदपुरुषादी देवतांप्रीत्यर्थ केल्या जाणार्‍या नित्यमंत्रसेवेचं..अर्थात.मंत्रजागराचं!

मग एका बाजुला पाठशाळेतली वैदिक विद्यार्थ्यांची टीम , आणि त्यांच्या समोर आसपासच्या इतर गावातून आलेले आणखि काहि इतर जुने जाणते नामवंत वैदिक लोक..असा बहुरंगी सामना रंगायचा. आता.. ज्या देवतांसाठी मंत्रजागर आहे,त्यांचे मंत्र/सूक्त म्हणणे प्राधान्याचे! हा परंपरेचा कित्तीही संकेत जरी असला, तरिही या खेळात एकमेकाला -पळविणे/पाडणे/धूळ चारणे/खड्ड्यात घालणे याची(ही) स्पर्धा असतेच! .. मग प्रथम पहिला काहि वेळ सगळं शिस्तित चालतं..पण नंतर कुठल्याही टीममधल्या कुणि एकानी खोडी-केली की मग मात्र त्या मंत्रांच्या खर्‍या जागराला सुरवात होते. आणि हे वर सांगितलेले तिन/चार प्रकार चिकार प्रमाणात सुरु होतात..त्यात- समशब्द मंत्रांचे संचार-जाणारी सूक्त म्हणायला काढण्यापासून..ते अज्जिबात न वापरली जाणारी सूक्त्/मंत्र समुह समोरच्या टीमला अपटवायला काढली जातात. मग ही रस्सीखेच सुरु झाली की आवाजंही शेवट शेवट टिपेला जायला लागतो.. मग त्यातच कुणितरी अवघड मंत्रांच्या पद/क्रमाला/घनाला हात घालतो.. म्हणजे..,गणानांत्वा गणपतिं हवामहे ..या मंत्राचा,साधारण :- "ओम..गणानांत्वा..त्वा..गणानां..गणानां त्वा..गणपतिं त्वा त्वा गणपतिं हवामहे हवामहे गणपतिं हवामहे..." असा पद क्रम किंवा घन--धाकिट तिरधा ताकिट धिरता--अश्या सारखा सुरु होतो. मग यात चुकाचुकि झाली की भेंडी-चढवल्या सारखे किंवा समोरच्याला खो-दिल्यासारखे संबंधितांचे चेहेरे व्हायला लागतात.. आणि शेवट शेवट सारा आसमंत सहैव मंत्रांनी भारला जाऊन,मग शेवटी काहि क्षणांची शांतता पसरली जाते.

आंम्ही मुलं पहिली दोन वर्ष ,या अनुष्ठानाचे सहाही दिवस.. हा मंत्र जागर अगदी मनापासून अनुभवत होतो. आणि मानवी स्मरण शक्तिचे विलक्षण प्रकार मनात साठवत होतो.पुढच्या वर्षापासून आंम्ही यात सहभागीहि व्हायला लागलो..पण अर्थातच ते बर्‍याच(शैक्षणिक..) मर्यादांनी. प्रथम तो वैदिकांचा स्पेशल मंत्र जागर झाला,की मग आंम्ही मुलं, काहि ठराविक सूक्त आणि सगळेच्या सगळे देवे त्याच उंच स्वरात तिथेच यज्ञमंडपात ठणकवायचो..आणि शेवटी सगळ्याच्या सगळ्या गायत्रीहि म्हणायचो. त्यातली शेवटाची गायत्री, - "ओम वेदात्मनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि। तन्नो ब्रम्ह प्रचोदयात्॥" ही .. अजून उंच स्वरात जायची तेंव्हा तर..खरच ते ब्रम्ह-दिसायच! मग काकू देखिल कडेनी स्वतःच्या घश्यावर सुरी फिरवल्यासारखी अ‍ॅक्शन करून.."अरे मेल्यांनो बा..स..!.घसे चिरतील नै तर ..बोंबलून..बोंबलून..त्या आवाजानी!" असं दर्शवायची ..मग आंम्हाला अज्जून चेव येऊन आंम्ही खरोखर बोगद्यामधे गोळी झाडल्यावर येइल..तश्या बुलं...........द छप्परभेदी स्वरात शेवटी "योवैतां ब्रम्हणो वेदा..अमृतेना प्लुतां पुरिम्। तस्मै ब्रम्ह च ब्रम्हा चा..आयुं कीर्तिं प्रजांददु:॥" या मंत्रानी त्या जागराची सांगता करायचो. मग बाकि मुलं हळूहळू भोजन कक्षाकडे सरकू लागायची ..पण मी आणि सुर्‍या मात्र..त्या आंगणातल्या यज्ञकुंडाभोवती समयांच्या मंद प्रकाशामधे त्या शांतपणे लाली सोडत तेवत असलेल्या कुंडातल्या अग्निच्या निखार्‍यांकडे एकटक पहात बसलेलो असायचो! मनाला एकप्रकारची अद्भूत आणि शां....त समाधि अवस्था त्यामुळे प्राप्त व्हायची! "ओम...शांति:शांति:शांति:" हा सांगतेचा शब्द समुह याच अवस्थेचा द्योतक आहे..असे आंम्हाला त्यावेळी वाटायचं.

आता इतक्या वर्षांनंतर.."श्रद्धा म्हणजे काय?"- या हज्जारो उत्तरं असलेल्या प्रश्नाचं मूळ.., मला माझ्या त्या अवेस्थेकडे लक्ष गेल्यावर दिसायला लागलेलं आहे. नाहि म्हणायला गुरुजिंनी आंम्हाला तेंव्हाच एकदा इकडे-पहायला लावलेलं होतं.. एकदा मंत्रजागरानंतर सगळी मुलं माणसं जेवली,आणि आंम्ही दोघे मात्र अजुनही नाही.. हे का? असं गुरुजिंनी काकूला विचारताच ..काकू तिच्या थट्टेखोर स्वभाव नुसार गुरुजिंना म्हणाली.." आज भुका नै हो लागायच्या त्यांना ..हाका सुद्धा ऐकू जात नाहियेत..एव्हढे त्या ब्रम्हा"त विलिन झालेत...तिकडे यज्ञमंडपात..बघा तिकडे जाऊन.." मग गुरुजिही काकूला "अगो विलिन काय म्हणत्येस???-एकरूप म्हण!...वेडी ती कुणिकडची!" असा प्रतिटोला देऊन आमच्याकडे आले.. आंम्ही अजुनंही ध्यानस्थच होतो.. मागून गुरुजिंनी आंम्हाला अगदी खांद्याला हात लाऊन उठवलं आणि आंगणातून.. बाहेर गावातल्या रस्त्यानी लांब वडाच्या झाडापर्यंत घेऊन गेले..जाताना आंम्हा दोघांच्या खांद्यावर अगदी समवयस्काप्रमाणे हात ठेवलेले होते. जसे आंम्ही त्या वडाच्या झाडाजवळ आलो..तसे गुरुजिंनी आंम्हाला.. "अरे मुलांनो.. तो अग्निरूपी देव असो..अथवा, हा चांदण्यामधे काहिसा भयप्रद दिसणारा वटवृक्ष! शेवटी हे निसर्गाचे चमत्कार आहेत. त्यामधे इंद्रिंयांपेक्षा ज्ञानानी आपण अडकण.. अधिक अपेक्षित आहे..कारण ज्ञानानी अडकलो,तर त्याची कोडी उलगडत जातात..आणि पंचेंद्रीयांनी अडकत गेलो,तर आणखि कोड्यात पडत जातो. ध्यान धारणा... ही माणूस भानावर रहाण्यासाठी हवी,भान-उडण्यासाठी नको..क्का....य??? तुंम्ही दोघेही ज्या अवस्थेमधे रमत आहात..ती भान उडविण्याकडे नेणारी प्रथमावस्था आहे. आज मी तुम्हाला जागं केलंय,आता उद्यापासून तुमचं तुम्हाला जागं-व्हायचं आहे..हे मंत्रजागरानंतर ध्यानात-जाण्यापूर्विच ध्यानात-घ्या...!!! , क्का....य???" असा आंम्हाला कडक्क-डोस देऊन..बोलता बोलता परत आंगणाकडे घेऊन आलेही..! काकू हे सर्व लांबुनच पहात होती. आणि जसे आंम्ही तिला दिसलो..तशी ती आंम्हाला..."चाला रे पोरांनो...जेवताय ना.??? कि आज मलाहि उपाशीच ठेवणार आहात?" असं म्हणाली. आणि रात्रीच्या त्या अंधारात आंम्हाला आमच्या खर्‍या-मायेचं पुन्हा एकदा दर्शन झालं..!
=======================
क्रमशः....
मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल) भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१ भाग- २२ भाग- २३ भाग- २४ भाग- २५ भाग- २६ भाग- २७ (यज्ञयाग विशेष!)

संस्कृतीसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

3 Feb 2015 - 2:11 am | आदूबाळ

काय छान लिहिलंय! एकाच गोष्टीचं पुनःपुन्हा आवर्तन करुन येणाऱ्या sensory deprivation च्या अवस्थेचा त्रास पुरोहितांना कसा होत नाही, या प्रश्नाचं उत्तर आज मिळालं!

शेवटचा परिच्छेद विशेष भावला.
बुवाची मालिका सुरेख सुरु आहे.

रेवती's picture

3 Feb 2015 - 2:20 am | रेवती

:)

मुक्त विहारि's picture

3 Feb 2015 - 4:02 am | मुक्त विहारि

झक्कास...

प्रचेतस's picture

3 Feb 2015 - 7:11 am | प्रचेतस

व्वा......!!!!!!!!
हा भाग पण एकदम सहीच झालाय.
भावविश्वाच्या प्रत्येक भागाची आम्ही अगदी चातकाप्रमाणे वाट बघत असतो.
पुस्तक प्रकाशित करण्याचे अवश्य मनावर घ्याच.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Feb 2015 - 7:17 am | अत्रुप्त आत्मा

@भावविश्वाच्या प्रत्येक भागाची आम्ही अगदी चातकाप्रमाणे वाट बघत असतो.>> काय सांगता काय!!!? व्वाह्व्वा! व्वाह्व्वा! व्वाह्व्वा! धन्य तो चातक ! __/\__

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Feb 2015 - 9:41 am | ज्ञानोबाचे पैजार

हा मंत्रजागर म्हणजे खरोखर एक आनंद सोहळाच असतो.

आमचे जठार गुरुजी दर वर्षी नवे नवे काहीतरी शोधुन काढत असतात या कार्यक्रमा साठी.

शेवटचा परिच्छेद विषेश आवडला.

पैजारबुवा,

प्रमोद देर्देकर's picture

3 Feb 2015 - 10:02 am | प्रमोद देर्देकर

+२२२२
हेच म्हणतो की शेवटचा परिच्छेद विषेश आवडला. आणि वाचताना अंगावर काटा आला जणु काही आपण स्वत: अनुभवतोय..

पण मी आणि सुर्‍या मात्र..त्या आंगणातल्या यज्ञकुंडाभोवती समयांच्या मंद प्रकाशामधे त्या शांतपणे लाली सोडत तेवत असलेल्या कुंडातल्या अग्निच्या निखार्‍यांकडे एकटक पहात बसलेलो असायचो! मनाला एकप्रकारची अद्भूत आणि शां....त समाधि अवस्था त्यामुळे प्राप्त व्हायची! "ओम...शांति:शांति:शांति:" हा सांगतेचा शब्द समुह याच अवस्थेचा द्योतक आहे..असे आंम्हाला त्यावेळी वाटायचं.

आता इतक्या वर्षांनंतर.."श्रद्धा म्हणजे काय?"- या हज्जारो उत्तरं असलेल्या प्रश्नाचं मूळ.., मला माझ्या त्या अवेस्थेकडे लक्ष गेल्यावर दिसायला लागलेलं आहे. नाहि म्हणायला गुरुजिंनी आंम्हाला तेंव्हाच एकदा इकडे-पहायला लावलेलं होतं.. एकदा मंत्रजागरानंतर सगळी मुलं माणसं जेवली,आणि आंम्ही दोघे मात्र अजुनही नाही.. हे का? असं गुरुजिंनी काकूला विचारताच ..काकू तिच्या थट्टेखोर स्वभाव नुसार गुरुजिंना म्हणाली.." आज भुका नै हो लागायच्या त्यांना ..हाका सुद्धा ऐकू जात नाहियेत..एव्हढे त्या ब्रम्हा"त विलिन झालेत...तिकडे यज्ञमंडपात..बघा तिकडे जाऊन.." मग गुरुजिही काकूला "अगो विलिन काय म्हणत्येस???-एकरूप म्हण!...वेडी ती कुणिकडची!" असा प्रतिटोला देऊन आमच्याकडे आले.. आंम्ही अजुनंही ध्यानस्थच होतो.. मागून गुरुजिंनी आंम्हाला अगदी खांद्याला हात लाऊन उठवलं आणि आंगणातून.. बाहेर गावातल्या रस्त्यानी लांब वडाच्या झाडापर्यंत घेऊन गेले..जाताना आंम्हा दोघांच्या खांद्यावर अगदी समवयस्काप्रमाणे हात ठेवलेले होते. जसे आंम्ही त्या वडाच्या झाडाजवळ आलो..तसे गुरुजिंनी आंम्हाला.. "अरे मुलांनो.. तो अग्निरूपी देव असो..अथवा, हा चांदण्यामधे काहिसा भयप्रद दिसणारा वटवृक्ष! शेवटी हे निसर्गाचे चमत्कार आहेत. त्यामधे इंद्रिंयांपेक्षा ज्ञानानी आपण अडकण.. अधिक अपेक्षित आहे..कारण ज्ञानानी अडकलो,तर त्याची कोडी उलगडत जातात..आणि पंचेंद्रीयांनी अडकत गेलो,तर आणखि कोड्यात पडत जातो. ध्यान धारणा... ही माणूस भानावर रहाण्यासाठी हवी,भान-उडण्यासाठी नको..क्का....य??? तुंम्ही दोघेही ज्या अवस्थेमधे रमत आहात..ती भान उडविण्याकडे नेणारी प्रथमावस्था आहे. आज मी तुम्हाला जागं केलंय,आता उद्यापासून तुमचं तुम्हाला जागं-व्हायचं आहे..हे मंत्रजागरानंतर ध्यानात-जाण्यापूर्विच ध्यानात-घ्या...!!! , क्का....य???" असा आंम्हाला कडक्क-डोस देऊन..बोलता बोलता परत आंगणाकडे घेऊन आलेही..! काकू हे सर्व लांबुनच पहात होती. आणि जसे आंम्ही तिला दिसलो..तशी ती आंम्हाला..."चाला रे पोरांनो...जेवताय ना.??? कि आज मलाहि उपाशीच ठेवणार आहात?" असं म्हणाली. आणि रात्रीच्या त्या अंधारात आंम्हाला आमच्या खर्‍या-मायेचं पुन्हा एकदा दर्शन झालं..!

एकदम खल्लास .... णो वर्डस __/\__

सूड's picture

3 Feb 2015 - 3:26 pm | सूड

+१

हाडक्या's picture

3 Feb 2015 - 11:57 pm | हाडक्या

+१ हो..
पण बुवा, खरं सांगु का ? का कोण जाणे, यकुची आठवण आली.. :(

(आमी तेव्हा वाचनमात्र होतो पण तरीही बसलेला धक्का जबरदस्त होता)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Feb 2015 - 12:28 am | अत्रुप्त आत्मा

@का कोण जाणे, यकुची आठवण आली.. Sad>>> आहो.. स्वाभाविक आहे.. मी हि त्याच्यासारखाच मनस्वि..पण त्याच्या इतका सर्वस्वि नव्हे..! हाच काय तो मह्त्वाचा फरक. तन्मयतेच्या बाबतीत तर, यक्कू कितितरी पट पुढे हो आमच्या...! आंम्ही त्याला कुठले शिवायला जाऊ शकणार...?
आणि नाहिच जाऊ शकलो शेवटी! :(

बॅटमॅन's picture

3 Feb 2015 - 12:34 pm | बॅटमॅन

शेवटचा परिच्छेद एकदम कळसाध्याय. पुस्तक ल्याहाच. _/\_

नाखु's picture

5 Feb 2015 - 2:27 pm | नाखु

पुस्तकलिहा- *ok* पुस्तकलिहा- *ok* पुस्तकलिहा- *ok* पुस्तकलिहा- *ok* पुस्तकलिहा- *ok* पुस्तकलिहा- *ok*

कंजूस's picture

3 Feb 2015 - 12:51 pm | कंजूस

तीनदा वाचूनही शेवटचं डोक्यावरून गेलं हो बुवा. आम्ही नर्मदेतला गोटा.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Feb 2015 - 2:18 pm | अत्रुप्त आत्मा

@तीनदा वाचूनही शेवटचं डोक्यावरून गेलं हो बुवा.>>> अरे बाप रे!!! :( तरी मी जमेल तितका हात हलका ठेवतो..असो..१५ ला संमेलनाला रंगवू चर्चासत्र..हा.का.ना.का. ?

दिपक.कुवेत's picture

3 Feb 2015 - 3:00 pm | दिपक.कुवेत

सगळे भाग दखल मधे आले कि मग सावकाश वाचतो.....अगदि पहिल्यापासूनचे.

नेहेमीप्रमाणेच वाचनीय.अप्रतिम शेवट.तुमच्या गुरुजींना _/\_

उगा काहितरीच's picture

3 Feb 2015 - 5:58 pm | उगा काहितरीच

गुरूजी __/\__

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Feb 2015 - 10:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गुरुजी :) झक्कास. डोळ्यासमोर आख्खं दृश्य उभं राहिलं :)

खटपट्या's picture

5 Feb 2015 - 10:42 am | खटपट्या

काय लीहीताहो तुम्ही !!!

पैसा's picture

5 Feb 2015 - 1:15 pm | पैसा

खूप छान लिहिताय!