मागिल भाग..
गुरुजिंच्या या वागण्याचा पाठशाळेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांवर असा काहि जबरदस्त परिणाम घडलेला असायचा. कि तो विद्यार्थी कित्त्तीहि स्वच्छंदि वगैरे असला,तरीही...जर पड्लच काहि चुकिचं पाऊल,तर ते पडण्याआधी गुरुजिंचा चेहेरा त्याच्या डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहात नसे!
पुढे चालू...
==============================
दिवसामागुनी दिवस चालले... ह्या गाण्यातील ओळींप्रमाणे त्यातला पुढचा जो भाग , तो जीवलगा..कधी रे येशील तू??? हा ही वेदपाठशाळेच्या-हरएक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आयुष्यातला समान धागा.. क्षणभर थबकलात ना तूलनेमुळे..? सहाजिकच आहे. पण पुढे आमच्या त्या जीव-लगा'ची जी ओळख होइल्,त्यावरून तुंम्हालाही अगदी सहज पटेल ही तूलना!
त्याच काय आहे,की परिक्षा हा अगदी प्राचीन मनुष्यजीवना पासून ते आजपर्यंतच्या आधुनिक साधनयुक्त जगण्यापर्यंत.. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवरचा, म्हटला तर महत्वाचा ट्प्पा...अणि गृहीत धरला, तर-सहप्रवासी! हा जणू जीवन जगण्याचा एक नियम आहे,असं आपण मानतो.पण...,या नियमाची पुरेपुर जाणिव होते,ती आमच्या वेदपाठशाळेत होणार्या प्रतिवर्षिक परिक्षांनी. तुंम्ही म्हणाल त्याचा आणि 'जीवन एक परिक्षा!' असल्या निबंध वजा गोष्टीचा काय नेमका परस्पर अनुबंध? तर यातलं पहिलं,आणि ठळक साम्य, म्हणजे ही परिक्षा पहिल्यावहिल्या वर्षापासून जी सुरु होते,ती शेवटाच्या वर्षापर्यंत चालते. हीला कोणतीही सेमीस्टर सारखी पद्धती लागू पडत नाही. आणि पाडण्याचा प्रयत्न केला ,तर ती संपूर्ण..म्हणजे टोटल-फेल जाते..किंवा जाइल. आणि कॉपी तर यात-करताच येत नाही!
पहिल्या दिवशी जी संध्येतली चोविस नावं संथेमधे घोकली..आणि आपला या शिक्षणात जन्म-झाला...त्यापासून ते वेदातल्या शेवटच्या ग्रंथातल्या शेवटच्या अध्यायातल्या शेवटच्या मंत्र अगर श्लोकापर्यंत ..सगळ्याची प्रतिवार्षिक परिक्षाच परिक्षा.. आपल्या लौकिक शाळेच्या भाषेत समजायचं तर पहिलीला दिलेली परिक्षा आणि अभ्यासविषय..टेक्सबुक म्हणून दुसरीला नसतो. इतकच काय तिमाही आणि सहामाही असे छोटे छोटे ट्प्पेही असतात. पण आमच्याकडे मामलाच वेगळा .परिक्षा एकदाच दर वर्षाचे-शेवटी! आणि परिक्षेला गृहीत अभ्यासक्रम ,हा संपूर्ण वर्षाचा! हे पहिल्यावर्षी..पुढे दुसर्या वर्षी, परिक्षेला प्रथम आणि द्वितीय अश्या दोन्ही अभ्यासक्रमांची परत संपूर्ण परिक्षा... हाच क्रम पुढे चालू राहून माणूस जेंव्हा वेदातला शेवटाचा ग्रंथ पाठ करून पूर्ण करतो..तेंव्हा दशग्रंथाची-परिक्षा म्हणजे अख्या दहा वर्षाच्या पाठांतरीय (संपूर्ण) अभ्यासा'चीच परिक्षा.. म्हणजे दहावीला परिक्षा पहिली..ते..दहावी..या संपूर्ण अभ्यासक्रमाची. बरं लौकिक शाळांमधे कित्तीही विवाद्य वाटलं,तरी पुढची इयत्ता हा अधिच्या इयत्तेचा अपडेटच असतो. पण इकडे अपडेट वगैरे भानगडच नाही.. सारे काहि जन्म दिनापासून ते शेवटापर्यंत जीवन पूर्ण व्हावे,आणि अखेरीस त्या भगवंता-समोर पापपुण्याच्या हिशेबाला उभे रहावे तसे!!!. तेच नशिबी यायचे! काहिच,कुठेच न सोडणारे! आणि हो..,यात लेखी-असे काहिही नाही,सारेच्या सारे तोंडी'च-द्यायचे.
मंडळी... त्याच त्याच व्याख्या आणि संदर्भ वारंवार फेकून मारल्यासारखं वाटलं ना? त्याबद्दल क्षमस्व! पण आमची ही प्रतिवार्षिक-गतवार्षिक अभ्यासाची भर पडत वज्रासमान-कठिण होत चाललेली ही परिक्षा..ही जेव्हढी जीवघेणी आहे,तेव्हढीच जीवं-लंगं ही आहे बरं!!! अहो.., 'ही परिक्षा ज्यानी-दिली,त्यानी आयुष्यातली कुठलिही परिक्षा (बिनधोक)द्यावी...'(हे - पुण्यात ज्यानी टूव्हिलर चालवली,त्यानी कुठेही बिनधोक चालवावी...! या चालीवर वाचावे..! ;) ) आहाहाहा...!!!!!! परिक्षेचा आदला महिना जवळ येत चालला,की काय ती तयारी-सुरु होते..एकेका वेदपाठशाळांमधून! एक तर आपल्याच गोटात प्रचंड चढाओढ(पहिलं येण्यासाठी!) आणि बाहेरून इतर पाठशाळांचे विद्यार्थीही येणार असतील,तर ती गोटाबाहेरचीही लढाई... म्हणजे, रणांगण एक आणि शत्रू दोन...अशी अवस्था! मग काय???? मनातून एकच गर्जना बाहेर पडते.... हरं हरं महादेव............................!!! रणेभेरी वाजू लागतात..मेंदूमधे अनंत विषयांचा कल्लोळ उठतो.. अवघड विषयांचे बुरुज रातोरात पाठांतरांच्या महातोफांनी धडाधड फोडले जातात.संचार-जाणारे जड अध्यायरुपि शत्रू तर हेरून हेरून आणि पिंजून पिंजून ठ्ठार मारले-जातात. सामान्य विषयांची तर फावल्यावेळातंही पाठांतरांचे अश्व चौखूर उधळंवून गाळण-उडवली जाते. अध्यापक-गुरुजि, हे सेनापतिचं रूप धारण करून हल्ल्याची स्थिती आणि गती निश्चित करतात.. कुणी कुठल्या विषयांची आणि कशी मोर्चेबांधणी करावी याचं मार्गदर्शन सुरु होतं. याचं रणंगीतातच वर्णन करायचं झलं...तर..
या बाजूनी तो ही आला,सगळे मिळूनि-तिकडे चाला
हत्तीदळांसह मारायाला ,अचानक त्यावर टाकू घाला
संचारांचे बुरुज बुलंदी,लावू त्याला भल्या-तोफा
मोक्याच्या त्या खुणांमधुनी,सहजी त्यावर आगंचि-ओका
नका चुकू रे देऊ जागा,मारुनी टाकू मैदाना
ब्रम्ह'ही येता शत्रू म्हणूनी,उडवू त्याची-ही दैना
आता मागे फिरायचे ना,शेंडी तुटो वा पारंबी
बुद्धीवेदिवर बलिदाना या ,रक्त पडू दे तिजं कुंभी
परिक्षेस या जिंकायाचे, हरणे जरीही आले हो
मोक्याच्या या-वळणावरती,पुढे पुढे तुज जाणे हो
अश्या अवस्थेत सारी पाठशाळा असते,आणि एकंदर महिनाभर कुणाला श्वास घेण्यालाही वेळ नसतो. आहो..घाईघाईत त्याचं धोतर..हा धुतो,आणि ह्याचं तो नेसतो सुद्धा! ( =)) )
आणि मग उगवतो युद्धाचा निर्णायक दिवस...परिक्षेचा...! त्या दिवशी वातावरण असं- सगळी पाठशाळा,ही ढगातून तरंगणार्या कोण्या महालासारखी टेंन्शन्नी हलकी झालेली आहे. गुरुजि..'परिक्षक नावाचा छुपा शत्रू,कधी रणांगणात उतरू पहातोय?', या चिंतेत येरझार्या घालत आहेत. आणि.. विद्यार्थ्यांच्या डोक्यात, 'परिक्षक..आज पहिलं-काय विचारतील?' हा प्रश्न, विवाहोत्सुक तरुणाला वधुवर मेळाव्यात, 'आज नेमकी पहिली(च) समोर येणार-कोण???' ह्या प्रामाणिक-प्रश्नाप्रमाणे,त्याचा अत्यंतिक छळ करत आहे. विद्यार्थीमित्र एकमेकाला 'माझी तेव्हढी तयारी झालेली नाही,पण अमके-तमके अध्याय-दणकून कसे तयार आहेत? याची खरी आणि खोटी,अशी दोन्हीही प्रकारची खात्री देत आहेत. एखाद्या जोरदार परिक्षा देणार्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याला त्याचे गुरुजि , " दाम्या...गेल्यावेळी सापडला सूर्,आणि अचानक निघाला धूर...असे केलेवतेस...आठवतय ना!?' म्हणून-जागं करत आहेत. तर प्रथमवर्षातली किंवा फक्त नित्यविधी आणि काहि सूक्त तयार झालेली,वय वर्ष ७ ते १० या वयोगटातील बालके, स्विमिंगपूलवर स्पर्धेसाठी-उभं केलेल्या लहान मुलांप्रमाणे हुडहुडी भरलेल्या अवस्थेत परिक्षा-हॉल अगर खोली बाहेर ताटकळत उभी आहेत. अशी ही सगळी अवस्था! मग या युद्धजन्य वातावरणाच्या पार्श्वभूमीवर परिक्षकांचा प्रवेश होतो..आणि,प्रत्यक्ष युद्धभूमीवर (वेगवेगळ्या पाठशाळांमधल्या),सात विद्यार्थ्यांच्या टोळीचा पहिला प्रवेश होतो.. यांची वेद-संहितेची परिक्षा आहे.
परिक्षकः- "हं...पाठांतरं केलीयेत ना रे जोरदार?"
मुलं:- "होsssssss!"
परिक्षकः- "हां...,तसा सोडणार नैय्ये मी कुणाला! ( हॅ..हॅ..हॅ..हॅ..हॅ..!) हम्म्म्म..,म्हणा..उमेश शास्त्री.. म्हणा... तिसर्या अष्टकातल्या साहाव्या अध्यायातील-चवथा अनुवाक.. म्हणा..!!!"
उमेशः- "हरि: ओम... " (अशी सुरवात करून, तो उमेश (सोप्पा) बुरुज फोडायला मिळाल्याच्या आनंदात 'चवथा अनुवाक' दणकवतो!)
परिक्षकः- ह्म्म..आता सगळ्या संहितेत वायूसूक्त कुठेकुठे आलेलं आहे? ते सांगा..आणि अध्याय व अनुवाकाच्या क्रमांक सांगून म्हणूनंही दाखवा बरं.. (उमेश १/२ उत्तरे बरोबर देतो..आणि मग पुढे तोच प्रश्न पुट-अप झाल्यावर...सुरेश सगळच्या सगळ बरोब्बर सांगतो,आणि म्हणूनंही दाखवतो!) व्वा... सुरेश.., पाठशाळा कोणती हो आपली? (सुरेश नाव सांगतो,एव्हढ्यावरून परिक्षकांना शिकवणारेही कळतात.आणि मग ते..) "हम्म्म...गुर्जि खमके आहेत तुमचे.म्हणून निभावतय.असो! आता...नितिन शास्त्री जरा अस्यवामस्य...या सूक्तातली शेवटून तिसर्या अनुवाकातली खालून पाचवी ओळ म्हणा बरं!
नितीनः- (या अचानक झालेल्या हल्ल्यानी बावरून...) अं.............
परिक्षकः- काय??? धूसर झालय की काय सगळं? की अचानक-गायब झालय?
नितीनः- नाही गुरुजी... (असं म्हणून..योग्य ओळीची सुरवात करत..अख्खा अनुवाक ठणकावतो)
परिक्षकः- हम्म्म...उत्तम हो उत्तम.. आता म्हणा.. मधोर्धारामनुक्षर तीव्रः सधस्थमासदः...
नितिनः- मधोर्धारामनुक्षर तीव्रः सधस्थमासदः। चारूर्रृताय पीतये॥
परि सुवानो गिरिष्ठा: पवित्रे सोमो अक्षा:। मदेषु सर्वधा असि॥
त्वं विप्रस्त्वं कविर्मधुप्रजात मन्धसः। मदेषु सर्वधा असि॥
परिक्षकः- थांबा थांबा... आता हे मदेषु सर्वधा असि॥ ह्या सूक्तात कितीवेळा आलय? ते सांगा बरं...!
नितिनः- ..................... (बाकिचे विद्यार्थी,नित्याची दांडी-गुल झाल्यामुळे माना खाली घालून हसतात..)
परिक्षकः- (सगळ्यांना..) हसू नका. हम्म्म, सुनील..आपण सांगा ..
सुनीलः- सात! (असा खणखणीत षटकार ठोकून..त्याच आनंदात आणखिही अशीच स्थळं सांगायला जातो..पण परिक्षक त्याला 'ते विचारलं.....की सांगा हं महर्षी!'.. असा खौट्पणे दगड मारतात.. सुनील वरमतो..)
इकडे ही रणधुमाळी चालू असतानाच शेजारच्या खोलीत, त्या बालकांची प्रवेश-परिक्षा सुरु होते.
परिक्षकः- "हं म्हणा रे आधी सगळ्यांनी चोविस नावे म्हणा.."
सगळी बालकं: -"ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः ................."
परिक्षकः- "सौर सूक्त कुणाकुणाला येतं???"
सगळे:- "मला...मला,..मला!!!"
परिक्षकः- "असं का! बरं बरं.. म्हणा मग इथून... उदुत्यं जातवेदसं..."
सगळे:- "देवं वहंती केशवः। दृशे विश्वाय सूर्यम्।।" ..( या पुढे म्हणताना,त्यातली काहि मुलं आंग चोरल्यासारखं 'म्हणत' असतात. आणि हे परिक्षकांच्या लक्षात येतं..किंबहुना 'असे कोण आहेत?' हे हेरण्यासाठीच त्यांनी असा सोप्पा-वाटणारा 'गुगली' टाकलेला असतो..)
परिक्षकः- "हम्म्म....थांबा थांबा , नामू..तू पुरुषसूक्तातली शेवटून चवथी ऋचा म्हण.."
नामू:- "चंद्रमा मनसो जातः चक्षो:सूर्यो अजायता। मुखादिंद्रः श्चाग्निश्च प्राणाद्वायुर जायता॥"
परिक्षकः- "आता ही ऋचा,तुझ्या पोथिच्या वरच्या पानावर येते ,की खालच्या ? ते सांग"
नामू:- "वरच्या पानावर..खालून आठवी ओळ"
परिक्षकः- " हम्म्म...निर्णयसागर'ची प्रत वाट्टं...? असू दे असू दे. हम्म..आता यशवंता.. प्रातःसंध्येचे उपस्थान म्हण..बरं!"
यशवंता:- (कावरा बावरा..) ...........................
परिक्षकः- "बरं..मग पहिलं मार्जन म्हण."
यशवंता:- "ओम..आपोहिष्ठा मयोभुवः । तानऊर्जे दधातना॥
महेरणाय चक्षसे। योवः शिवत मोरसः। तस्यभाजयते हनः॥
उशती रीव मातरः। तस्मा अरंग मामवो । यस्यक्षयाय जिन्वथा॥ अपो जनयथा चनः॥"
परिक्षक : -"मग द्वितीय मार्जनात यातलं बदलतं काय..?कसं वेगळं म्हणता तुम्ही? सांगा.." (हा प्रश्न संजू आणि विजय ह्या ८ वर्षीय मुलांना डोक्यावरून जातो. पण नामू परत इथेही षटकार ठोकतो..)
नामू:- "ऋचा जोडून येतात.. ओम..आपोहिष्ठा मयोभुवःतानऊर्जे दधातना॥
महेरणाय चक्षसे। योवः शिवत मोरसःतस्यभाजयते हनः॥
उशती रीव मातरः। तस्मा अरंग मामवो यस्यक्षयाय जिन्वथा॥ अपो जनयथा चनः॥"
परिक्षकः- "हम्म्म..छान! शाळा कोणति रे तुझी? "
नामू:- "परसगाव...जिल्ला-आट्वानी"
परिक्षकः- "अस्सं!!! देवसगावकरांच्या शाळेतला काय??? तरीच इतका तयारीचा! आता सगळ्यांनी विष्णू सूक्तातला शेवटचा अनुवाक म्हणा..की..मग झाली तुमची परिक्षा."
तर असा हा परिक्षारूपी जिव-लंगं ..तो प्रथम वर्षी माझ्याही आयुष्यात आला... आणि मग मी,गुरुजी आणि बाकिचे सर्व विद्यार्थी, तो परिक्षे आधीचा महिना-फुल्ल तयारी करून..परिक्षा द्यायला निघालो- ते महाराष्ट्राच्या एका महान शहरात...
म्हणजे कुठे???? तर
................."
==========================
क्रमशः....
मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल) भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१ भाग- २२ भाग- २३ भाग- २४
प्रतिक्रिया
27 Jan 2015 - 4:59 pm | अत्रुप्त आत्मा
हे काय रे पांडू? :-/ लेख कसा हाय सांग की! दुष्ष्षष्ट! :-/
27 Jan 2015 - 4:45 pm | मृत्युन्जय
म्हणजे कुठे???? तर
हॅ हॅ हॅ. त्रिखंडात महान शहरे आहेत ती कितीशी म्हणतो मी.
27 Jan 2015 - 4:47 pm | बॅटमॅन
व्हायव्हाचे किस्से आठवले.
एकच नंबर!!!!!!!!!!!!!!
27 Jan 2015 - 5:03 pm | प्रचेतस
जबरी लिहिताय बुवा.
संवाद भयानक अवडले.
27 Jan 2015 - 5:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
मला पण अवडले.
27 Jan 2015 - 7:31 pm | प्रसाद गोडबोले
+७८६
अगदी डोळ्यासमोर घडत आहेत घटना असे वाटले !
सुरेख लेखन बुवा :)
27 Jan 2015 - 5:59 pm | आदूबाळ
एक नंबर लिहिलंय.
आमच्या जीवघेण्या परीक्षांच्या आठवणींनी डोले पानाव्ले. फायनल परीक्षेतल्या सर्वात अवघड विषयाचा सिलॅबस दोन ओळींचा होता. आमचे मास्तर म्हणत, "दे कॅन आस्क यू एनीथिंग अंडर द सन!". नशीब व्हायवा नसायच्या...
27 Jan 2015 - 7:44 pm | अजया
बाबौ,तुमच्या व्हायव्हा पेक्षा आमच्या बर्या होत्या हो.अवघड काम,एवढं पाठांतर!तुम्ही इतकं मस्त लिहिलंय की अगदी डोळ्यासमोर उभं राहातंय सगळं.
27 Jan 2015 - 9:01 pm | स्वच्छंदी_मनोज
जबरी अनुभव लिहीताय..
रत्नांगिरीला आठल्ये गुरुजींची पाठशाळा होती, आहे.. आठल्ये गुरुजी नाही आहेत आता पण नातेवाईक त्यांच्या पाठशाळेत त्यांच्याचकडे शिकलेले असल्याने त्यांचे अनुभव असेच आहेत.. लेखातल्या पाठशाळेच्या गुरुजींचा स्वभाव, शिकवण्याची पद्धत आणी विद्यार्थ्यावर माया लावून प्रवेश घेण्यार्या बटुला खणखणीत बंदा रुपया करून बाहेर पाठवण्याची हातोटी आठल्ये गुरुजींसारखीच..
पुढच्या अनुभव लेखाच्या प्रतीक्षेत...
27 Jan 2015 - 9:56 pm | रेवती
बापरे! अवघड आहे हो!
28 Jan 2015 - 12:09 am | मुक्त विहारि
लेखी परीक्षेपेक्षा तोंडी परीक्षा उत्तम, असेच वाटायला लागले.
कारण, कॉपी करता येत नाही.
28 Jan 2015 - 12:47 am | डॉ सुहास म्हात्रे
लेखी म्हणा की तोंडी; जेथे केवळ "घोका आणि ओका" ही पद्धत आहे त्या सर्वच परिक्षा नीच दर्जाच्या आहेत.
"शाळा-कॉलेजतून डिग्री/सर्टीफिकेट आणि नोकरीतून टक्केटोणपे खात व्यावहारीक ज्ञान" अशी सद्याची शिक्षणव्यवस्था आहे. हल्लीच्या आंतरजालयुगात कॉपी-पेस्ट प्रकारचे पुस्तकी ज्ञान (?!) तर अल्पबुद्धी मानव केवळ मिळवू शकतो असे नाही तर त्याचा उपयोग ढकलपत्रांव्दारे इतरांना दिवसांतून (किमान) दहादा छळण्यास करू शकतो ! ;)
"वाचा/ऐका/पहा --> स्वतंत्र विचार करा आणि प्रश्न विचारा --> विषय समजून-उमजून घ्या --> ज्ञान व्यवहारात वापरात आणा" या सर्व पायर्या ज्ञानार्जनात असल्या तरच ते खरे ज्ञानार्जन होईल.
28 Jan 2015 - 1:15 am | प्रसाद गोडबोले
(मी दिल्लीला होतो तेव्हा )आमच्या इन्स्टित्युट मध्ये ओपन बुक एक्जॅम्स असायच्या , पुस्तके , नोट्स, चिठ्ठ्या चपाट्या घेवुन परीचपाट्यायेण्याची पुर्ण परवानगी असायची ! पण एकही प्रश्न सिलॅबस मधला पडेल तर शप्पथ ! प्रत्येक प्रश्नावर डोकं आपटायला लागायचं ... तेव्हा कसे बसे पास व्हायचो ! ( ब्यॅट्या सेम कॉलेजातील असल्याने त्याला माझ्या भावना कळतील कदाचित )
असो. नको त्या आठवणी !
28 Jan 2015 - 6:14 am | खटपट्या
आमच्या शाळेत गाईड(मार्गदर्शक) वापरायला बंदी होती कारण त्यात तयार उत्तरे असत. कसंही वेडेवाकडे लीहा पण तुमच्या मनाने लीहा असे शिक्षकांचे म्हणणे असायचे. जर उत्तर तंतोतंत गाईड्मधल्यासारखे असेल तर शून्य मार्क मिळत असत. :)
28 Jan 2015 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
आमच्या एका कॉलेजची मला सर्वात जास्त आवडलेली पद्धत म्हणजे "हारवर्ड केस स्टडिज'.
यात एखाद्या मोठ्या कंपनीच्या मोठ्या प्रकल्पातील यशाचे/अपयशाचे वर्णन आकडेमोडीसकट दिलेले असते आणि त्याचे त्रयस्थ बुद्धीने विष्लेशण करायचे असते. कोणी कॉपी-पेस्ट केले की प्रोफेसर लगेच "पुस्तकातून / आंतरजालातून कॉपी-पेस्ट आजकाल ५ वर्षांचे मुल करू शकते. त्यामुळे त्याला झीरो क्रेडिट्स आहेत. मला या केसचे तुमचे स्वतःचे विश्लेशण हवे आहे, आणि घडले ते बरोबर की चूक हे तुमच्या कारणासह हवे आहे. शिवाय तुम्ही तेथे असता तर कंपनीपेक्षा जास्त/वेगळे काय आणि का केले असते ते सांगा." असे फटकावयाचे. इतकेच नाही तर पाठ्यपुस्तकातील एखादा मुद्दा पटला नाही तर त्याला लॉजिकली खोडून टाकाण्यास मनाई नव्हती.
29 Jan 2015 - 2:57 am | खटपट्या
थोडक्यात काय घोकंमपट्टीचा जमाना आहे. विषय कीती समजलाय याची कोणाला पडली नाहीये. मार्क कीती आहेत हे महत्वाचे. मुले विद्यार्थी कमी, परीक्षार्थी जास्त होतायत.
29 Jan 2015 - 4:06 pm | बॅटमॅन
रोचक!
एमस्टॅटला ओपन बुक एक्झाम्स कधी ऐकल्याचे आठवत नाही. बाकी आम्हांला त्या नव्हत्या कधी.
29 Jan 2015 - 4:47 pm | प्रसाद गोडबोले
काय सांगतोस काय ? तुम्हाला नव्हत्या ओपन बुक ? नशीबवान लेको तुम्ही !
मला लिनियर आणि जनरलाइझ्ड लिनियर मॉडेल्स ची ओपन बुक परीक्षा आठवुन आजही डोळ्यासमोर तारे चमकतात ...
श्या: नक्कोच त्या आठवणी ! :(
1 Feb 2015 - 7:10 pm | बॅटमॅन
क्यूआरओआरला तरी नव्हत्या. बाकी एमस्टॅट वगैरेलाही कधी ऐकल्याचे आठवत नै पण त्या लोकांशी संपर्क कमी असे.
28 Jan 2015 - 4:08 am | मुक्त विहारि
-----> स्वतंत्र विचार करा आणि प्रश्न विचारा --> विषय समजून-उमजून घ्या --> ज्ञान व्यवहारात वापरात आणा" या सर्व पायर्या ज्ञानार्जनात असल्या तरच ते खरे ज्ञानार्जन होईल.
सहमत..
28 Jan 2015 - 7:38 am | अत्रुप्त आत्मा
28 Jan 2015 - 4:52 pm | नाखु
पदवीधर असूनही बँक स्लिप न भरता येणार्या टग्यांना काय म्हणावे या विवंचनेतला.
खुली शाळा अनुभव ह्यासारखा परखड शिक्षकाचे हातचे कवतिक्/मार दोन्ही खाल्लेला..
नाखु
28 Jan 2015 - 4:59 pm | एस
छान लेख!
28 Jan 2015 - 9:42 pm | पैसा
झक्कास!