गुरुजिंचे भावं विश्व! भाग- १९

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
13 Jan 2015 - 4:39 pm

(या मागिल भागापासून सांधा जरा बदलला गेला असल्यामुळेच ,नविन भाग लिहायला हा बराच वेळ-गेलेला आहे.त्याबद्दल प्रथमच क्षमा मागतो.. आणि पुढे वाचायची अगत्यपूर्वक विनंती करतो. :) )
मागिल भाग- १८

याला कारण असं की आमच्या काकाचा "माणूस चुकतो" ह्या घटनेवर जबरदस्त विश्वास होता. वास्तविक कोकणातल्या एका छोट्या खेड्यात कुठल्याच प्रकारचं फारसं शिक्षण न झालेला हा माणूस. पण त्याचा स्वतःचा एक असा काहि कार्यक्रम त्याच्या जीवनक्रमात लागलेला आणि बहरत गेलेला होता,की हल्लीच्या व्यक्तिमत्व विकास वाल्यांनी ह्या असल्याच लोकांच्या जिवनपटांवरून स्वतःचे कार्यक्रम बेतलेले आहेत की काय? अशी दाट शंका यावी!

पुढे चालू....
======================
वर्ष दोन वर्ष पुढे सरकली ,आणि मी माझ्या आवडिच्या विषयात म्हणजे दर इयत्तेत एकदा नापास होण्यात पास होऊ लागलो. प्रथम पाचविला दणका खाल्ला,तेंव्हा 'नसेल झेपलं या वर्षी' म्हणून जवळ जवळ सगळ्यांनीच दुर्लक्ष केलेलं होतं. पण सखाराम काका मात्र चिडला नाही तरी यावर लक्ष ठेऊन होता. मूळचा गुप्तहेरच तो! हतातल्या त्या ब्याट्रीनी तो अंधारातली जनावरं जशी एका फ्लॅश मधे कोण/कुठची? हे ओळखायचा.तशीच बारिक आणि शोधक नजर त्याला माणसांचे अंगिभूत गुण आणि सवई तपासण्यात सहज लाभलेली होती. त्यामुळे मी पाचवीला एकदा आणि सहावीतून सुटून..सातवीला सलग दुसर्‍यांदा हापटल्यावर माझ्या आयशी पासून ते मावशी पर्यंत आणि वडलांपासून ते (हा काका वगळता) सगळ्या काका आणि अत्यांपर्यंत आपल्या कुटुंबावर काहितरी सावट आलय. अशी भावना झालेली होती.

काकानी ,घरातल्या सगळ्यांना ''मला हात लावायचा नाही!'' ,अशी सख्त ताकिद दिलेली असल्यामुळे..मी तेंव्हा आईच्या रागानी पाठीत घातलेल्या कड्क चार धपाट्यां शिवाय कुणाचाही मार खाल्लेला नव्हता. रिझल्ट नंतरचे एक/दोन दिवस सुन्नावस्थेत गेले आणि मग काकानी काहि घडलेची नाही
या आविर्भावात मला बैलगाडीत बसवून धा कि.मि.वरच्या तालुक्याच्या गावी नेले. जाताना गप्प .. तिकडे गेल्यावर त्याची पोस्टातल्या कसल्याश्या कागदपत्रांची चौकशी वगैरे जुजबि काम झाल्यावर मला तो व्हिडिओ दाखवायला घेऊन गेला. मी ही खुश्श झालो..तो दिड रुपयातला अख्खा शिनेमा! नंतर बंदरावरचा..उलथन्यानी पाव कापून चटणी लावलेला वडापाव,मग पेप्शी..एव्हढं सगळ मिळाल्यावर माझी गाडी ट्रॅक्टरच्या वेगानी पळायला लागली. आणि याची चाहुल लागली ,तशी काकानी मला हळूच पहिली गुगली टाकली.. "आत्मू... तुला काय काय करायला आवडतं रे?"

मी:- नक्कल करायला आवडते..पण आई करु नाय देत..मारते सारखी सारखी! :(

काका:- तिला बघतो हां मी... पण तू गाणी म्हणतोस ना गाणी..? मग..मगाचच्या पिच्चरातलं म्हण ना एक! ..

मी:- (आनंदून) पर्बत के उस पार..पर्बत के इस पार.... ढुंढती छम छम छम .. मेरी पायल की झंकार ...आ...आ...आ..आ...आ... ,ओ..ओ..ओ..ओ... ढुंढती छम छम छम .. मेरी पायल की झंकार ...

काका:- (मनमुराद हसत..) छान हो.. आत्मू कि शोर कुमार। बायांची गाणी पण चांगली गातोस हां..फक्त ते ढुंढती... नैय्ये मेल्या.... गूँज उठी आहे... घरी जाईपर्यंत म्हण बोटे घालून

मी:- ह्हूं..!माझं कुठे चुकलं त्यात...? तसंच्च ऐकू आलेलं ना? :(

काका:- होय का ? मग आता जाता जाता गाण्यांची पुस्तक घेऊ हां आपण! बघू किती पाठ म्हणातायस ती? क्का..य?

मी:- चालेल..

मग त्या दिवशी मी घरी जाई पर्यंत त्या पर्बता पासून ते तोहफा...तोहफा...तोहफा...तोहफा...लाया...लाया...लाया...लाया... पर्यंत चांगली चार/पाच गाणी काकाला झोपाळ्यावर बसल्या बसल्या पाठ म्हणून दाखवली. आईला आणि घरातल्यांना हा नेमका काय प्रकार चाल्लाय यांची काहिच कल्पना येत नव्हती. आज्जी तर पडवीतनच काकावर ओरडली..."अरे सख्या ..तो आत्मू नापास झालाय आणि त्याला दहा वेळा रामरक्षा म्हणवायची सोडून ,ही शिनेमातली गाणी कशाला घोकून घेतोयस त्याच्या कडून्???,तुझंही डोकं फिरलं कि काsssय?

यावर काका मला 'तिथेच' बसायची ऑर्डर देऊन्,या सगळ्यांच्यात - आत गेला .आणि जाता जाता आईला "त्याच्या बापसाला काय समजवायचे ते मी समजावतो" असं काहिसं बोलत ,हतात दुध आणायची क्याटली घेऊन "जेवायला उशिरा येइन मी आज" असं म्हणत.. माझ्याकडे पहात ,गमतिनी डोळे मिचकवून चपला घालून आंगणयातून सायकलला टांग मारून अदृष्य झालाही!... मला मात्र त्या दिवशी रात्री झोपताना, आई मधुनच काहिसं रडत तर कधी आनंदुन जात, माझ्या डोक्यावरनं हात फिरवत झोपि का गेली?.. ते..., काहि कळलं नाही.

होता होता सुट्टिचा काळ संपला,आणि माझी शाळा सुरु व्हायच्या दोन दिवस आधी काकानी मला वाडित गाठलन.
"अरे आत्मूsss .. हिकडे ये आधी"
मी आपला नेहमी सारखा 'काकानी बोलावलय्,म्हणजे काहिच प्रॉब्लेम नसणार ' अश्या अंदाजानी गेलो.
तर काका मला म्हणाला " हे बघ आत्मू ..तुला ते शाळा वगैरे आवडत नाही की नाही?"
मी:- "हो..नाहिच्च आवडत."
काका:- "हम्म्म्म्म...म्हणूनच तुझ्यासाठी मी आपल्या साखरदांड्या'त दुसरी शाळा शोधलीये..उद्या आपण तिकडे जाऊ या ... येशील ना? "
मी काकानी शोधलीये, म्हणजे.. 'मला न आवडणारी नक्किच नसणार'.. इतकच मनात आल्यामुळे "हो!" म्हणालो.
आणि मग मला नंतर कळलं , की काकानी माझी बदली वेदपाठशाळा नावाच्या दुसर्‍या वेगळ्याच जगात केलीये. त्यावेळी त्यातलं बर वाइट काय? इत्यादी काहिही कळायचं वय आणि बुद्धी असण्याचा प्रश्नच नव्हता. पण ते माझ्या मनाविरुद्ध नव्हतं! आणि काकाच्या घरच्यांना पटवण्याच्या डायलॉग मधल्या महत्वाच्या वाक्या नुसार ते -मला जमणारं होतं.

आणि मग काय विचारता माझा तो घर-सोडण्याच्या दिवसाचा शीन!?
...अगदी आधुनिक टिव्हि मालिकेत शोभावा असाच एपिसोड तो!. मला एकिकडे लिहायच्या कट्कटीच्या अभ्यासातून सुटका झाल्याचा आनंद ,तर दुसरीकडे कायम पंचा नेसावा लागणार आणि शेंडी(टकला सह!) ठेवावी लागणार अश्या अनेक औत्सुक्यपूर्ण गोष्टींचं भययुक्त दु:ख्ख किंवा दुख्ख युक्त भय! मला दुपारी २ च्या गाडीनी काका तिकडे नेऊन सोडणार..म्हटल्यावर सकाळी ६ वाजता उठल्यापासून आईच्या डोळ्याला पाणी! सारखं मला जवळ घे..रड..असले प्रकार सुरु झाले.काका तर आईला बोलल्ला ही त्यावरन :- "अगो... तुझ्या कार्ट्याला वनं-वासात नैय्ये हो सोडत मी! कायतरी विश्वास धरत जा दुसर्‍या माणसाचा! हे एव्हढं वैट वाटणं बरं नाही!..मग तिकडे राहिल का तो..पहिला महिना तरी!!! शाळेतल्या सुट्टी सारखा दिवाळी/मे महिन्याला परतही येणारे तो. कायमचा नै चाल्ला काहि गुरु-गृही!"
या त्याच्या ओरड्याला आईनी सहन केलं. पण आज्जी आगदी पारंपारिक डायलॉगांचा भाता त्याच्यावर रिकामा करायला सरसावली
"हो.....तुला कशाला मेल्या कळतील बायकांची दुख्ख!?" "पोटचं पोर असं जंगलात गाय सुधा सोडत नाही!" "येणार असला सहा सहा महिन्याला घरी म्हणून काय कौतुकं सांगतोस?" "सहा महिने म्हणजे काय चेष्टा आहे का?" "शिवाय आपल्यापेक्षा खेडं-असलेलं गाव ते!" "तिथे काळजी कोण घेइल पोराची!???- असं वाट्णार नैss?" दगड्या काळजाचा मेला पुरुष तू,तुला काय समजायचं त्यातलं?"

यावर काकानी आज्जीसमोर (युद्धात पड खाल्लेल्या मुद्रेनी) एक साष्टांग लोटांगण घातलं... आणि आईपासून सगळी जणं तो प्रसंग पाहून,त्या तसल्या रडव्या चेहेर्‍यानीच खळ्ळकन हसली. दुपारची जेवणं झाली. मला जेवताना अगदी यथेच्छ.. उकडीचे मोदक आणि तिकडे गेल्यावर संध्याकाळला काही..म्हणून पार्सल, असे देत माझी बोळवणीची तयारी झाली. मी "देवांना आणि सग्ळ्या मोठ्यांना नमस्कार कर!" अश्या आईच्या हुंदकेयुक्त आज्ञेचं शिरसावंद्य पालन केलं आणि काकाबरोबर पाठिला ती प्ल्याश्टिकच्या कापडाची,कपड्यांची पिशवी घेऊन ..सायकलच्या मागे क्यारियरवर बसलो सुद्धा! काकानी घरासमोरच्या रस्त्यानी सायकल येश्टीश्टॉपच्या दिशेनी हाणायला घेतली..आणि आई अंगणातून बाहेर..झरझर चार पवलं आमच्या मागे येऊन.. तितक्याच वेगानी पदर डोळ्याला घेत पुन्हा घरात गेली!... मी मात्र..."चेहेर्‍यावर तिकडे जायचा आनंद, आणि मनात आईचा तो टाटा करायला आलेला चेहेरा".. घेऊन.... त्या मला आवड असलेल्या नव्या जगाच्या दिशेनी निघालो..ते पुन्हा सहा महिने परत न येण्यासाठीच!

काकानी मग मला , रितसर साखरदांड्याच्या वेदंपाठशाळेत नेलं. आणि पहिल्यांदा तिथे असलेल्या मुख्य गुरुजिंच्या पायावर घातलं. गेल्या गेल्या हा प्रसंग तिथे माझ्या आधी आलेल्या इतर विद्यार्थ्यांना नवा नव्हताच! पण ते मात्र माझ्याकडे.. "आला हा (आपल्यात!) अजुन एक.." अश्या नजरेनी पाहात होते. मग पहिला एक तास गेल्यावर मला काकानीच "आता हे नाही! ..-हे कपडे घालायचे!" म्हणून माझ्या भोवती पंचा गुंडाळून त्या शर्टंचड्डीतुन मला सोडवलं. करगोट्याला अगदी चारबोटं रुंद अशी लंगोटीही घातली. आणि आता पंचा गोल नेसवावा की काष्टी मारून? या विचारात तो असताना,तेथील एका शिनियर विद्यार्थ्यानी...हातातली छडी बाजुला ठेवत .. काकाला " बघतो मी ते,द्या इकडे त्याला" असा काकाला काहिसा जरबयुक्त आदेश दिला. एव्हढं सगळं होईपर्यंत मुख्य गुरुजी आले. आणि माझ्या एकंदर तिथल्या शिक्षणाच्या योग्यते बद्दल काकाशी बोलायला लागले. मग काकानीही त्यांना माझी पाठांतरातली प्रथमा - सांगितली. आणि त्यावर आमच्या गुरुजिंनी स्मितहास्य करीत, मी,काका आणि तेथिल बाकिच्या विद्यार्थ्यांना.. "जेवायला चला" असे खुणेनीच सांगितले. ती रात्र काका पाठशाळेतच थांबला. आणि दुसर्‍या दिवशी सकाळी..मला त्याच गावातील न्हाव्याकडे घेऊन 'नी...ट गुळगुळीत गोटा करवून' (शेंडी सह!) गुरुजिंच्या हवाली करता झाला. आणि त्यानंतर काहि वेळातच मला प्रेमानी जवळ घेऊन... "नीट रहां हं ..मी आता पुढच्या पौर्णिमेला येणारे..तेंव्हा येताना तुला ती मोठ्ठ्यातली-क्याडबरी आण्णारे!" असं म्हणून आमच्या पाठशाळेतून , जायला निघाला...मी मात्र आता अत्यंत दाटलेल्या गळ्यानी, "काका...येताना क्याटबरी नक्को..गाण्याची पुस्तकंsssss!!!!" असं उंबर्‍यातून ओरडलो, आणि टच्च भरलेल्या डोळ्यांनी ..काका दिसेनासा झाल्यावर गप्प चेहेरा करून ..गुरुजिं समोर त्या लालमातिच्या ग्गार भिंतीला पाठ टेकवून बसलो!
=======================
क्रमशः ....

संस्कृतीसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

13 Jan 2015 - 4:56 pm | प्रमोद देर्देकर

आवडलं. पण हळवं केलंत हो गुरुजी.

नाखु's picture

13 Jan 2015 - 5:07 pm | नाखु

उगं रडवायचं नाही.
आधिच खपल्या सुकल्यात, सातवीला गाव सोडून पुण्यात रहिल्यावर, आईने पाठवलेली पत्रांची पारायणे आसवांबरोबर ,अजून आत आहेत नका त्याला धक्का लावून बाहेर काढू !!

जेपी's picture

13 Jan 2015 - 5:13 pm | जेपी

गुरुजींच दुसर विश्व....

सूड's picture

13 Jan 2015 - 5:28 pm | सूड

वाचतोय!

श्यामची आई मधला श्याम आठवला.

रेवती's picture

13 Jan 2015 - 6:20 pm | रेवती

हम्म्म.......वाचतिये.

सतिश गावडे's picture

13 Jan 2015 - 6:29 pm | सतिश गावडे

आवडलं. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

मुक्त विहारि's picture

13 Jan 2015 - 6:32 pm | मुक्त विहारि

पुभाप्र...

काका मात्र भलताच ग्रेट आहे हो तुमचा!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2015 - 6:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ! और आवंदे !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jan 2015 - 7:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लेखाचं पानं झक्कास जमलयं :))

गुर्जी, तुम्ही जबरदस्त लिहिता हो. एकच नंबर. तुमचा काका आवडून गेला आहे.

वेदपाठशाळेच्या जगाबद्दल एक भीतियुक्त कुतुहल आहेच. त्यामुळे पुभाप्र.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jan 2015 - 7:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वेदपाठशाळेच्या जगाबद्दल एक भीतियुक्त कुतुहल आहेच.

होय मलाही. मला लहानपणी माझ्या मुंजीत भिती घातली होती बाबांनी आता अभ्यास केला नाहीस तर वेदशाळेत जायला लावीन पार्ट टाईम म्हणुन मग तिकडे शेंडीला दोरी बांधुन ती छताला अडकवतात. श्लोकम स्त्रोत्र वेळच्या वेळी पाठ झाली नाहीत तर धुरी देतात वगैरे वगैरे...!!!

आदूबाळ's picture

13 Jan 2015 - 7:40 pm | आदूबाळ

हा हा हा हा!

मला कुतुहल जरा वेगळ्या कारणामुळे आहे.

लहानपणी भावेस्कूलच्या मैदानावर क्रिकेटची "मॅच घ्यायला" वेदपाठशाळेची मुलं यायची. मलमलच्या बंड्या आणि धोतराचे काचे मारून झक्क खेळायची. एका "भव्य रबरी बॉल टूर्नामेंट" टाईप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आम्हाला बेकार कुबलला होता. आम्ही डिफेंडिंग चँपियन्स असूनही.

त्यांच्याकडे मंत्रशक्ती असल्यामुळे आपलं काही चाललं नाही, अशी पुडी आमच्या वाड्यातल्या पिटूने सोडली होती. त्याकाळी ते पटलंही होतं. तेव्हापासून वेदपाठशाळा म्हटलं की काहीतरी गूढरम्य वाटतं. हॅरी पॉटरमध्ये हॉगवार्ट्स वाचलं तेव्हा वेदपाठशाळेचीच आठवण झाली होती. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jan 2015 - 9:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

=))

टवाळ कार्टा's picture

13 Jan 2015 - 8:02 pm | टवाळ कार्टा

मस्त...बाकी मण्त्रसुध्धा पिच्चरच्या गाण्यांच्या चालीवर म्हटले होते का कधी ;)

निमिष ध.'s picture

13 Jan 2015 - 8:03 pm | निमिष ध.

गुरूजी हे अनोळखी विश्व असेच आम्हाला सांगत रहा. खुप सुंदर झाला आहे हा भाग.

सिरुसेरि's picture

13 Jan 2015 - 10:25 pm | सिरुसेरि

वेदपाठशाळेमधील जग ही एक मनाची कठोर परीक्षाच असते का असे कधी कधी वाटते . म्हणजे तोंडाने पुजेचे मंत्र म्हणायचे आणी मन मात्र वयानूसार करीना , कतरीना यांच्यात असते .

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jan 2015 - 10:42 pm | अत्रुप्त आत्मा

@वेदपाठशाळेमधील जग ही एक मनाची कठोर परीक्षाच असते का असे कधी कधी वाटते . म्हणजे तोंडाने पुजेचे मंत्र म्हणायचे आणी मन मात्र वयानूसार करीना , कतरीना यांच्यात असते.>> अत्तीशय खरे बोल्लात. :)

खटपट्या's picture

14 Jan 2015 - 1:08 am | खटपट्या

अप्रतीम !!
खरे तर या भागापासुन नवीन मालिका सुरू करायला हवी होती. कारण हे सगळं तुमच्याबद्दल आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jan 2015 - 5:34 am | अत्रुप्त आत्मा

@खरे तर या भागापासुन नवीन मालिका सुरू करायला हवी होती. कारण हे सगळं तुमच्याबद्दल आहे. >>> कृपया गैरसमज नको. :)
ह्यातले काहीही व्यक्तिश: माझे किंवा माझ्यावर बेतलेले नाही. हे आंम्हा भटजी लोकांचे प्रातिनिधिक आत्मकथन आहे. जे मी ललितलेखानाच्या आधारे मांडत आहे. :)

खटपट्या's picture

14 Jan 2015 - 6:46 am | खटपट्या

ओके :)

छान लिहीले आहे!

सुरेख लिहिताय गुरुजी!लवकर टाका पुढचा भाग.
इतर चालू भिक्षुकगिरी करणार्या गुरुजींपेक्षा वेदपाठशाळेतले गुरुजी जी पूजा करतात ती पाहाण्यासारखी आणि ऐकण्यासारखी असते हे अनुभवलं आहे.आमच्या जवळ गुळसुंद्याला तिथे शिकलेले काही गुरुजी आहेत.त्यांनी केलेली पूजा पाहिल्यापासून दुसर्या कुडमुड्या गुर्जींना बोलवायचे बंदच केले!अशाच एका पुस्तक वाचुन पूजा सांगणार्या गुर्जींना मीच पूजा कशी करायची सांगीतली होती!!त्यानंतर ह्या गुळसुंद्याच्या गुरुजीलोकांचा शोध लावला होता!

कंजूस's picture

14 Jan 2015 - 1:48 pm | कंजूस

दणक्यात लिहिताहात. मागे कालडीला गेलो होतो तेव्हा सकाळी पाठशाळेत मांडी घालून ओळीत बसून अंगाला झोके देत जोरजोरात मंत्रपठण करणारी मुले आठवली.

अशाच काही लिखाणामुळे मिपावर यावेसे , रहावेसे वाटते

__/\__

मधुरा देशपांडे's picture

14 Jan 2015 - 2:26 pm | मधुरा देशपांडे

आवडलं.

सौंदाळा's picture

14 Jan 2015 - 2:53 pm | सौंदाळा

जबरदस्त लिहिले आहे.
हासु + आसु दोन्ही एकदम.
वेदपाठशाळेची सफर डीट्टेलवारी वाचायची आहे.
चिंचवडगावात वाड्यातल्या गणपतीच्या देवळात स्मार्ट, निरागस बटुंना उच्चार चुकल्यावर छडीने रट्टे खाताना पाहिले आहे.
सावंतवाडी वेदपाठ्शाळा बाहेरुन पाहिली आहे, हरिश्चंद्रगडावर (तोलारखिंडी मार्गे) जाताना पण एक वेदपाठशाळा बाहेरुनच बघितल्याचे आठवत आहे. आत कसे शिकवत असतील, व्यवस्थापन, जेवणखाण, उपासतापास, चतुर्थीला चंद्रोदयानंतर उपास सोडणे वगैरे असते का तिकडे? नियम मोडले तर शिक्षा काय होतात? वेदपाठशाळेत पण रॅगिंग होते का? हे सर्व वाचण्यास उत्सुक आहे.

पैसा's picture

14 Jan 2015 - 11:02 pm | पैसा

खूपच छान आणि एका वेगळ्याच जगाची ओळख! कवळेमठाच्या वेदपाठशाळेतली अगदी ८/९ वर्षांची निरागस मुलं पंचे नेसलेली आणि शेंड्या ठेवलेली बँकेत २५ रुपये ठेवायला नाहीतर ५० रुपये काढायला यायची तेव्हा अगदी पोटात तुटायचं. यातली बरीचशी मुलं घरी अगदी खूप दारिद्र्य असल्याने पोटाची परस्पर सोय होते आणि शिकता शिकता थोडे पैसे मिळून जातात म्हणून बहुतांश कर्नाटकातून इकडे गोव्यात शिकायला आलेली असतात. ही लहानगी नुकती मुंज झालेली पोरं गावच्या अकांउंटला चिरीमिरी पैसे ट्रान्सफर करायची आणि वेळ मिळाला तर घरच्या गप्पा सांगायची ते सगळं आठवलं.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2015 - 12:37 am | अत्रुप्त आत्मा

आदूबाळ

@गुर्जी, तुम्ही जबरदस्त लिहिता हो. एकच नंबर. तुमचा काका आवडून गेला आहे.>> मनःपूर्वक धन्यवाद! @वेदपाठशाळेच्या जगाबद्दल एक भीतियुक्त कुतुहल आहेच. त्यामुळे पुभाप्र.>> प्रोत्साहनाबद्दल आभार. :)

@लहानपणी भावेस्कूलच्या मैदानावर क्रिकेटची "मॅच घ्यायला" वेदपाठशाळेची मुलं यायची. मलमलच्या बंड्या आणि धोतराचे काचे मारून झक्क खेळायची. एका "भव्य रबरी बॉल टूर्नामेंट" टाईप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आम्हाला बेकार कुबलला होता. आम्ही डिफेंडिंग चँपियन्स असूनही.>>> ह्हा ह्हा ह्हा...! नक्किच ती आमच्या पुणे वेदपाठशाळा आणि पटवर्धन पाठशाळेची मुलं होती. दोन्ही शाळांमधे संध्याकाळी पाठ संपल्यावर,शाळेच्या गच्चीत हा क्रीकेट खेळायचा परिपाठ कधिही चुकलेला नव्हता. आज ते सगळं आठवलं. :)

@त्यांच्याकडे मंत्रशक्ती असल्यामुळे आपलं काही चाललं नाही,
अशी पुडी आमच्या वाड्यातल्या पिटूने सोडली होती. >>> =))

@त्याकाळी ते पटलंही होतं. तेव्हापासून वेदपाठशाळा म्हटलं की काहीतरी गूढरम्य वाटतं. हॅरी पॉटरमध्ये हॉगवार्ट्स वाचलं तेव्हा वेदपाठशाळेचीच आठवण झाली होती. >>> ते माझ्या अहमदनगरच्या वेदपाठशाळे सारखं सगळ्या शाखा,त्यांचे विद्यार्थी ... ते शिक्षणातले वेगळेपण ..असं भरपूर साम्य आहेच. पण दोन्ही गोष्टी अगदी भिन्न पातळीवरच्या आहेत. :)
====================================
कॅप्टन जॅक स्पॅरो

@माझ्या मुंजीत भिती घातली होती बाबांनी आता अभ्यास केला नाहीस तर वेदशाळेत जायला लावीन पार्ट टाईम म्हणुन मग तिकडे शेंडीला दोरी बांधुन ती छताला अडकवतात. >>> =)) पांढर्‍या कांद्याची लगड टांगतात्,ते दिसलं हो एकदम! =)) ही शिक्षा असते.. पण ती अशी नाही.. ती बसल्या बसल्या डुलक्या काढणार्‍या झोपबहाद्दर मुलांना देतात,भिंती जवळ बसवून मागच्या खिळ्याला ताणून शेंडी बांधतात्,म्हणजे मग झोपेनी मान जरा जरी खाली गेली..कि गचकन झटका बसतो! ( =)) ) आणि मग त्या भितिनी झोपेची सवय नंतर मोडते!
@श्लोकम स्त्रोत्र वेळच्या वेळी पाठ झाली नाहीत तर धुरी देतात वगैरे वगैरे...!!! >> =)) बाप रे...बाप रे!! नै हो नै! =)) इतकं नस्तं काहि. पण बेताल आणि वांड मुलांना - उपाशी ठेवण्यापासून (शारीरिक इजा होणार नाही अश्या) इतर शिक्षा करतात. तरिही नाही ऐकले,तर घरी हाकलून देतात. :)
=====================================
टवाळ कार्टा

@बाकी मण्त्रसुध्धा पिच्चरच्या गाण्यांच्या चालीवर म्हटले होते का कधी>>> =)) कार्ट्या.., हे असलेच सुचायचे तुला कहितरी! ;) मंत्र गाण्यांच्या चालिवर म्हटले जात नाहित...मात्र गाणी मंत्रांच्या-चालिनी म्हटली तर अगदी मेंदू"पाठ होतात....... बरं का!!!! :p
========================================
निमिष ध

@गुरूजी हे अनोळखी विश्व असेच आम्हाला सांगत रहा. खुप सुंदर झाला आहे हा भाग. >> अत्यंत धन्यवाद! नक्कि सांगत रहाणार आहे. :)
=========================================
अजया

@इतर चालू भिक्षुकगिरी करणार्या गुरुजींपेक्षा वेदपाठशाळेतले गुरुजी जी पूजा करतात ती पाहाण्यासारखी आणि ऐकण्यासारखी असते हे अनुभवलं आहे.आमच्या जवळ गुळसुंद्याला तिथे शिकलेले काही गुरुजी आहेत.त्यांनी केलेली पूजा पाहिल्यापासून दुसर्या कुडमुड्या गुर्जींना बोलवायचे बंदच केले!अशाच एका पुस्तक वाचुन पूजा सांगणार्या गुर्जींना मीच पूजा कशी करायची सांगीतली होती!!त्यानंतर ह्या गुळसुंद्याच्या गुरुजीलोकांचा शोध लावला होता! >>> ह्हा...ह्हा..ह्हा...! भारी अनुभव!
====================================
कंजूस
@सकाळी पाठशाळेत मांडी घालून ओळीत बसून अंगाला झोके देत जोरजोरात मंत्रपठण करणारी मुले आठवली.>>> हम्म्म्म... ते (मंत्रांचे) स्वराघात म्हणताना होतं तसं..पण स्वर-बसे पर्यंतच! एकदा स्वर नीट बसले की अंगच काय? मान देखिल हलवायची गरज पडत नाही. तरिही पुढे इतरत्र मंत्र म्हणताना काहि कारणास्तव मुद्दाम ,हातानी स्वर-दाखवण्याची पद्धत आहे.
==========================================
स्पा

@अशाच काही लिखाणामुळे मिपावर यावेसे,रहावेसे वाटते. >> धन्यवाद रे पांडोबा. :)
===============================================
सौंदाळा
@चिंचवडगावात वाड्यातल्या गणपतीच्या देवळात स्मार्ट, निरागस बटुंना उच्चार चुकल्यावर छडीने रट्टे खाताना पाहिले आहे.>>> होय रे होय.. पहिले काहि महिने , प्रत्येकाच्या मातीला तो अपेक्षित मडक्याचा आकार येइपर्यंत या दिव्यातून जावेच लागते.(नगरची पाठशाळा,आणि त्यातले पहिले तीन/चार महिने-हात आणि पाठ लाल होइपर्यंत छड्या/रुळ खाल्लेले सगळे आठवले. :) )

@सावंतवाडी वेदपाठ्शाळा बाहेरुन पाहिली आहे,हरिश्चंद्रगडावर (तोलारखिंडी मार्गे) जाताना पण एक वेदपाठशाळा बाहेरुनच बघितल्याचे आठवत आहे. आत कसे शिकवत असतील, व्यवस्थापन, जेवणखाण, उपासतापास, चतुर्थीला चंद्रोदयानंतर उपास सोडणे वगैरे असते का तिकडे? नियम मोडले तर शिक्षा काय होतात? वेदपाठशाळेत पण रॅगिंग होते का? हे सर्व वाचण्यास उत्सुक आहे.>>> हम्म्म्म... येणार आहे हळूहळू. पण रॅगिंग नाहि होत ..याला कारण पाठशाळेची तंत्र आणि व्यवस्था! अर्थात ज्या सिनियर विद्यार्थ्याला नेमलेला असतो. त्या पात्रांकडून काहि कड्वट म्हणावे असे दादागिरीचे प्रसंग घडतात. पण यापेक्षा आधिक नाही. बाकि मुलांच्या आपापसातल्या मारामार्‍या,एकमेकाचे कपडे पळवणं..दुसर्‍याच्या कपडे भिजवलेल्या बादलीत ,धोतरांना घालायची नीळ गुपचूप टाकणं..असे होस्टेल लाइफ प्रमाणे अनेक गमतीचे प्रसंग होतात... पण यापेक्षा आधिक नाही. :)
==========================================
पैसा
@खूपच छान आणि एका वेगळ्याच जगाची ओळख!
कवळेमठाच्या वेदपाठशाळेतली अगदी ८/९ वर्षांची निरागस मुलं पंचे नेसलेली आणि शेंड्या ठेवलेली बँकेत २५ रुपये ठेवायला नाहीतर ५० रुपये काढायला यायची तेव्हा अगदी पोटात तुटायचं. >> :(
@यातली बरीचशी मुलं घरी अगदी खूप दारिद्र्य असल्याने पोटाची परस्पर सोय होते आणि शिकता शिकता थोडे पैसे मिळून जातात म्हणून बहुतांश कर्नाटकातून इकडे गोव्यात शिकायला आलेली असतात. >> अगदी अगदी बरोब्बर आहे हे! सगळ्या पाठशाळां मधे हे प्रमाण असेच आहे. माझ्या वेळी मी आणि आमचा सोलापूरचा पुष्कर व्यास असे दोघे वजा जाता..बाकिची मराठवाड्यातून आलेली ५ जण अश्याच हलाखिच्या परिस्थितीतली होती.

@ही लहानगी नुकती मुंज झालेली पोरं गावच्या अकांउंटला चिरीमिरी पैसे ट्रान्सफर करायची आणि वेळ मिळाला तर घरच्या गप्पा सांगायची ते सगळं आठवलं.>> (घरच्या कृपेनी) मला पैसे पाठविण्याइतकी वेळ नव्हती..पण माझ्या दोन्ही पाठशाळांमधल्या अनेकांच्या बाबतीत हे पाहिलं आहे.. आज त्या सगळ्यांची आठवण झाली. :(
=================================================

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2015 - 9:31 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

सुबोध खरे's picture

15 Jan 2015 - 9:57 am | सुबोध खरे

गुरुजी __/\__.
आम्ही पण अभ्यास केला पण इतके कष्ट फक्त एम बी बी एस ला काढल्याचे आठवते म्हणजे तेंव्हा वय १८ + असताना. इतक्या कोवळ्या वयात तर नाहीच नाही. एम बी बी एसच्या पहिल्या वर्षाला असताना शेवटच्या महिन्यात इतका अभ्यास बाकी होता कि शेवटच्या सहा ओव्हर्स मध्ये शंभर धावा काढण्यासारखे वाटले. मी दोन दोन तासाच्या हप्त्यात चार वेळेला मिळून आठ तास झोपत असे. म्हणजे रात्री १० ते १२ मग पाहते ४ ते ६ मग सकाळी १० ते १२ आणि परत दुपारी ४ ते ६. ज्यावेळेस होस्टेलमध्ये सर्वात जास्त गडबड असेल तेन्व्हा मी झोपून घेत असे म्हणजे वेळ फुकट जायला नको. मधल्या काळात इतर आन्हिके इ उरकून घेत असे.
आमचे वडीलही आम्हाला अभ्यास करताना वेद्पाठ्शाळेचे उदाहरण देत कि त्यांची शेंडी खुंटीला बांधून ठेवत म्हणजे जर डुलकी लागली कि शेंडीला झटका बसत असे. त्याची आठवण झाली.

दोस्त's picture

16 Jan 2015 - 10:22 pm | दोस्त

मस्त...