गेल्या महिन्यात एक छान जाहिरात बघण्यात आली.बघताच त्याच क्षणी आपल्या सन्माननीय तात्यारावांची (स्वातंत्र्यवीर सावरकरांची) प्रकर्षाने आठवण झाली.
जाहिरात परत परत बघाविसी वाटली. व्वा! काय उत्तम संदर्भ, हृदयस्पर्शी कथा, संगीत, संकलन व सादरीकरण!!!
"एक दौर था ,मन मन मोर था" वरून ही मराठीमाणसाने(संदर्भ: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला) बनवलेली आहे ह्या विचारावर ठाम झालो. आता लवकरच "अटकेपार" च्या ऐवजी "गुगलवर" हा शब्द प्रयोग येईल असे वाटते.
कृपया लक्षात घ्या: जरी दोन देशाच्या सीमा जरी पुसल्या जाणार नसल्या तरी मनामनातल्या सीमा तर पुसता येतीलच कि! आणि पाकिस्थानी लोक जर भारतहिताचा विचार करू लागले(कधी होणार ते माहिती नाही!), तर तेथील राज्यकर्त्यांनाही हा विचार मान्य करावाच लागेल. तात्यारावांची या बाबतची दूरदृष्टी आपल्यापेक्षा व आजच्या राज्यकर्त्यांपेक्षा नक्कीच मोठी होती हे सिद्ध होईल.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचावे, यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीने निरनिराळे मार्ग अवलंबिले जातात. याच धर्तीवर आता सावरकरांच्या कविता आणि गझल यांना बॉलीवूडचा शहेनशहा ‘बिग बी’ यांचा आवाज लाभला आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी अंदमान तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगताना उर्दू भाषा शिकली. त्यानंतर त्यांनी उर्दूत काव्यरचनाही केली. दोन गझल आणि एक कविता असलेली वही स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांना मिळाली. या रचना मराठीतून हिंदीत भाषांतर करून नामवंत गायकांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आल्या. यापुढचे पाऊल म्हणून, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या ज्वलंत राष्ट्रभक्तीपर कवितांचे निवेदन अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. या ध्वनिमुद्रिकेसाठी प्रसिद्ध लेखक-निर्देशक वेद राही
यांनी ही संहिता लिहिली आहे.
कळावे, लोभ असावा.
आपला लाडका : आयुर्हीत
प्रतिक्रिया
10 Jan 2014 - 11:46 am | आयुर्हित
माफ करा, चुकून लिंक्स गाळल्या गेल्यात.
गुगल Reunion Ad
बाई बाई मनमोराचा....
क्षमस्व!
आपला लाडका: आयुर्हीत
10 Jan 2014 - 7:46 pm | अनिरुद्ध प
साठी धन्यवाद,पु ले शु
10 Jan 2014 - 11:22 pm | संचित
सावरकरांच्या गझल बद्दल अधिक माहिति देउ शकाल?
11 Jan 2014 - 12:08 am | आयुर्हित
नक्क्किच, मटावरची ही बातमी
आपला लाडका, आयुर्हीत
11 Jan 2014 - 1:25 am | अर्धवटराव
आधि बच्चन साहेबांना गुजरात पर्यटनाचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर केलं... आणि आता सावरकरी कविता वाचन. मोदी पब्लीसीटी स्टंट करायल काय काय मार्ग अवलंबतोय.
13 Jan 2014 - 5:45 pm | मंदार दिलीप जोशी
ज्यात त्यात मोदी आणून आपली कावीळ जगजाहीर आणि आपला आयडी सार्थ करु नका. या बातमीचा आणि मोदींचा काय संबंध?
13 Jan 2014 - 9:11 pm | अर्धवटराव
जरा सत्य उघड केलं तर कसे कावतात मोदी समर्थक. मिपावर बरेच मोदीस्पॉन्सर्ड सदस्य असल्याचा हा पुरावा आहे.
13 Jan 2014 - 9:52 pm | विकास
मिपावर बरेच मोदीस्पॉन्सर्ड सदस्य असल्याचा हा पुरावा आहे.
अजून मला चेक आला नाही! प्रित भराराला सांगावे लागणार तर! ;)
13 Jan 2014 - 10:19 pm | अर्धवटराव
नुसतं टिस्टा मॅडमचं नाव काढलं तर कसं आपसूक सत्य बाहेर येतय.
13 Jan 2014 - 5:49 pm | कवितानागेश
मी आधीच सांगितलं होतं, लोक तुम्हाला सिरियसली घेतायत अर्धवटराव.
वेळीच सांभाळा स्वतःला!
=))
13 Jan 2014 - 6:10 pm | विकास
मला तर वाटते आहे त्यांचा (म्हणजे अर्धवटरावांचा) अर्धा कल केजरीवाल यांच्याकडे असल्याने असा पब्लिसिटी स्टंट करत असावेत. ;)
13 Jan 2014 - 9:09 pm | अर्धवटराव
टिस्टा मॅड्मला केजरीवाल आणि मोदि या दोघांत साटेलोटे असल्याचे नवीन पुरावे सापडले आहेत...आता या दोघांची खैर नाहि.
13 Jan 2014 - 9:04 pm | अर्धवटराव
नववर्षात आम्हि सत्याची कास धरुन मिपावतचं सर्वात वादग्रस्त आयडी व्हायचं ठरवलं आहे :)
13 Jan 2014 - 9:22 pm | प्यारे१
जमायला हरकत नाही.
हार्ड वर्क, टेम्परामेण्ट, परसिस्टन्स वगैरे शब्द घोटून घ्या!
क्लास और फॉर्म में फरक होता हय गुरु!
इमिटेशन टाळा.
-प्यारेविहारी
तोंड बघा. आम्हीही आहोत नी ते ही आहेत.
- प्यारे ब
ब्बरं तेही असो. फ्रस्ट्रेशन आलं की लोक असं करतात.
- प्यारेमॅन
पण मी काय म्हणतो म्हणजे असं आवश्यक असेल तरच असं करावं.
- प्यारेकर पेठकर
मी सैन्यात असताना काहीही न करता वादग्रस्त ठरलो ते साल होतं....
- प्यारेश खरे
मी तर चार लेख आधीच्च सांगितलेलं!
- .....
बाकी नंतर! थोडा बिझी आहे. ;)
14 Jan 2014 - 12:46 am | धन्या
आम्ही तुमच्या "च्च"चे फ्यान आहोत.
13 Jan 2014 - 9:56 pm | विकास
लिहायचे आहे पण अभ्यास करायला वेळ नाही म्हणून!
13 Jan 2014 - 10:21 pm | अर्धवटराव
म्हणजे मिपश्री व्हायला अभ्यासाची गरज नाहि असच म्हणताय ना?... मग आमचे प्रयत्न योग्य दिशेने सुरु आहेत.
14 Jan 2014 - 12:24 am | विनोद१८
बाबारे म्हणुन खाजवुन खरुज काढलीच पाहीजे का नेहमी ??? का आणि कशासाठी एव्ह्डा आटापिटा करताय जिवाचा ???
त्या मोदीच्या तुम्ही गावीसुद्धा नसाल ??? ज्याना घ्यायची ते त्याची दखल नक्कीच घेतील आणि घेत आहेत.
आज इतर जगाच्या तुलनेत आपल्या देशाची आजची राजकिय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती अभिमानास्पद व भूषणास्पद आहे असे वाटते का ?? कुठे चाललो आहोत याचे जरा भान असू नये हे अति झाले. हिच तुमच्या सत्याची कास काय ??
जरा तुमचे सत्य म्हणजे काय व कोणते हे विस्ताराने लिहीलेत तर बरे होइल. सर्वात वादग्रस्त आयडी व्हायला तुम्हाला मोदीची मदत / गरज घ्यावी लागते यातच सर्व आले.
विनोद१८
14 Jan 2014 - 12:48 am | प्यारे१
पण मी काय म्हणतो विनोदराव, जाऊ द्या ना? कशाला उगाच अर्धवटरावांच्या नादी लागायचं?
त्यांना जे वाटतं तेच सत्य आहे असं वाटत असलं तरी सत्य वेगळं असणार असेल तर सत्य सत्यच राहील ना? सत्य अर्धवटरावांनी म्हटलं म्हणून बदलणार थोडीच्च आहे?
बाकी हा माणूस नेहमीच काहीतरी खाजवून खरुज काढण्यासारखं करत असतो ह्या आपल्या निरीक्षणाशी आम्ही सहमत आहोत. चला जरा विदा द्या बघू पटकन! थेट सांगूनच टाकू त्यांना.
14 Jan 2014 - 2:12 am | अर्धवटराव
आणिबाणीची शिस्त आणि दूरसंचार, संगणकाचा पाया रोवला गेला म्हणुन आज मिपा उभं झालं. आणि इथे कौतुक कोणाचं, तर मोदीचं. वा रे न्याय.
14 Jan 2014 - 2:25 am | प्यारे१
तुम्ही तर बोलूच नका.
मोदी परवडतात. पण तुम्ही काय ती आणीबाणीची शिस्त घेऊन बसलाय? संजय गांधी तुमचेच ना? करायची का कापाकापी विशिष्ट जागी? संगणक आणला म्हणून कौतुक नि त्याबरोबर भ्रष्टाचाराचा आलेला व्हायरस (बघा बघा काय यमक जुळलंय. संगणक- विषाणू वा !) त्याचं काय? केजरीवाल सचिवालयावर चढले की तुमचे राहुल जी (पारले जी सारखं वाचू नका. ज्युपिटरची कसली व्हेलॉसिटी ती? तसे जाल उडत) गाडीवर चढून बसले माहित्ये??? एकतर गाडीचं भाडं थकलेलं. त्यात हे पोचे काढायचा खर्च वाढला.
कॅय्य चॅललंय कॅय्य?
14 Jan 2014 - 2:50 am | अर्धवटराव
जरा कुठे चार पैसे विडी-काडीला वापरले तर लागले चावायला. काय तर म्हणे भ्रष्टाचाराचा व्हायरस. खरं म्हणजे उच्चवर्णीयांनी मुद्दाम असे नियम बनवले कि कुठलिही प्रगती भ्रष्टाचारच वाटावी. मोदी ओबीसी आहेत हाच काय तर एक प्लस पॉईण्ट त्यांच्याकडे. त्यांनी आमच्या थोरल्या साहेबांना प्रधानमंत्री बनवण्याकरता प्रयत्न करायला हवे होते. राहुलजींसमोर संजयगांधींच्या महान त्यागाचा आदर्श आहे. म्हणुनच त्यांनी केजरीवालला एक चान्स द्यायची चतुर आणि पुरोगामी खेळी खेळली. उच्चवर्णाचा दंभ असल्यामुळे त्यात थोडी कमतरता राहिली हे मान्य... पण आता भगिनी प्रियंका आलि आहे सोबतीला. पण हे सगळं राजकारण समजणं आंधळ्या मोदीभक्तांना शक्य नाहि.
14 Jan 2014 - 3:05 am | प्यारे१
उच्च्वर्णीय? काय संबंध? काँग्रेसी कधी पासून असं बोलू लागले? ज्याच्याकडे जसे गुण असतील तसं होतात ना? तुमचे एन डी तिवारी गुणांवर च झाले ना मोठे?
मोदी ओबीसी आहेत? आम्हास त्याच्याशी घेणं नाही. पहा जातीचं राजकारण खरं कोण करतंय ते! बाकी तुमचा अंतरात्म्याचा आवाज खालच्या गांधींपर्यंत पोचला का? तो ऐकूनच संधी दिली ना केजरीवाल ना? नाव काय म्हणे चतुर नि पुरोगामी. अहो खरे पुरोगामी मोदी आहेत मोदी. अहमदाबादपासून बेंगलोर ला पोटेक्शन दिलं पोटेक्शन. अमित शहांना ठाऊक आहे. आहात कुठं? व्हेअर आर यु? एका स्त्रीसाठी कोण करतं एवढं? तुमच्या राजधानी दिल्लीत काय काय होतं नि मोदींचं वागणं. इकडे बघा जरा. सुशासन सुशासन म्हणतात ते अजून काय?
प्रियांका आली ती सोबतीला नाही काही, भावाला फीट आली की सावरायला आलीये ती. दिसला कागद की फाड, ह्याला मूर्ख म्हण, त्याला पुनर्विचार करायला सांग. चोच्याला आज आठवण आली लोकपाल ची. अक्षर बघितलं का अक्षर? २री क च्या मुलाचा पण अपमान होईल.
१७६००० करोड म्हणजे चार पैसे वाटतात काय तुम्हाला? एस्टिमेटेड असू नाही तर काहीही, १७६ म्हणजे १७६. घो टाळा आहे म्हणजे आहे.
जय भारत, जय भाई, जय बहन, जय मोदी!
(उद्या ह्याच वेळी... तयारी करुन या!) =))
14 Jan 2014 - 3:36 am | अर्धवटराव
माझ्या एकाहि मुद्याला तुमच्याकडे उत्तर नाहि. म्हणुन तुम्ही असं चिडीवर उतरला आहात. अंतरात्म्याच्या आवाजाला खाली-वर असं दिशानिर्देशक परिमाण लावुन तुम्ही तुमचा भोंगळपणा सिद्ध केला आहे. सबब, तुमचे प्रतिसाद ग्राह्य धरता येणार नाहित.
शेवटी मी जे म्हणातोय तेच सिद्ध झालं ना. मोदींच्या प्रचारकांनी कितीही आदळआपट केली तरी निकाल लागयचा तोच लागणार आहे.
20 Jan 2014 - 12:31 pm | प्यारे१
जमतंय जमतंय. =))
11 Jan 2014 - 8:19 am | श्रीनिवास टिळक
सावरकरांची उर्दू गझल सापडली या संदर्भाची बातमी तशी जुनी आहे. गुगलवर सावरकरांची उर्दू गझल (urdu gazal by savarkar)हा विषय टाकला तर २८ जुलै २०१३ चे सहा संदर्भ मिळतात. एकाने तर हे वृत्त youtube वर दिले आहे.
15 Jan 2014 - 10:32 am | उद्दाम
आसिंधुसिंधुच्या भोकातून विश्वबंधुत्वाच्या सागरात उडी टाकल्याबद्दल सर्वांचे आभार
17 Jan 2014 - 2:29 pm | अनिरुद्ध प
????????????????????????
17 Jan 2014 - 3:46 pm | उद्दाम
अरेरे तुम्ही अजून आतच बसलाय तर!
17 Jan 2014 - 4:39 pm | अनिरुद्ध प
करणार तुम्ही बाहेरुन टाळे लावल्यावर दुसरे काय करु शकतो? ईतका दुस्वास बरा नव्हे हो वाट बघतोय कोणी वाचवायला येतो का ते.
17 Jan 2014 - 4:42 pm | मंदार दिलीप जोशी
अनिरुद्ध, लीव्ह हिम अलोन. त्यांना मदतीची गरज आहे ;)
17 Jan 2014 - 10:50 pm | विनोद१८
मला सान्गा सन्दर्भासहीत स्पष्टीकरण देउन हे ' आसिंधुसिंधुच्या भोकातून ' म्हणजे नेमके काय ??? नवीन शोध म्हणायचा का हा ?? आमच्या अल्पमतीला समजेल असे लिहीलेत तर बरे होइल.
खुदा हाफीझ..
विनोद१८
17 Jan 2014 - 10:58 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
सावरकरंनी जहाजाच्या भोकातून सागरात उडी घेतली त्याचा संदर्भ आहे .आसिंधुसिंधु म्हणजे, सिंधुबंदी' याचा अर्थ सिंधु नदी ओलांडायला धर्मात बंदी आहे त्याअर्थी.
17 Jan 2014 - 11:16 pm | विद्युत् बालक
तुमच्या कडे एकूण किती मोबाईल व कॉम्पुटर आहेत ?
20 Jan 2014 - 3:23 pm | प्रसाद गोडबोले
किती थापा माराल राव ... काहीतरी चाड बाळगा
17 Jan 2014 - 11:24 pm | विनोद१८
काय म्हणता जहाजाला भोक असते ?? त्यालाच 'आसिंधुसिंधुचे भोक' म्हणतात काय ?? असे असेल तर मग ते जहाज तरगते कसे, बुडत कसे नाही ?? कसे ते सान्गा ?? *unknw*
आता काय म्हणावे या कर्माला, मिपाकरहो ?? *dash1* *dash1*
20 Jan 2014 - 12:17 pm | मंदार दिलीप जोशी
म हा न
20 Jan 2014 - 2:01 pm | नेहा_ग
अरे वा
20 Jan 2014 - 3:39 pm | राजेंद्र मेहेंदळे
लेखाचा विषय काय? प्रतिक्रिया काय ?
आपली तर एक्झिट..*bye* *BYE*
बाकी चालुद्या
24 Jan 2014 - 8:50 pm | आयुर्हित
हम हि हमारे वाली है!
अमिताभ प्रस्तावना
आजच्या काळात सावरकरवाद हाच देशाला वाचवू शकतो ः डॉ. शरद ठाकर
सीडी प्रकाशन
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व हेते, त्यांनी केलेली क्रांती आणि कविता या दोन्ही जुळ्या बहिणी आहेत,त्यांनीच सावरकरांना अंदमानच्या काळकोठडीत जिवंत ठेवले, तिथूनच देशभर क्रांतीचा वणवा पेटवायला भाग पाडले, त्यांचे विचार आणि सावरकरवाद हाच लांडगे आणि बकऱयांप्रमाणे जीवन जगणाऱया देशातील नागरिकांना वाचवू शकतो, असे परखड विचार ज्येष्ठ गुजराती साहित्यिक डॉ. शरद ठाकर यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उर्दू गझला आणि हिंदी गीतांवर आधारित हम ही हमारे वाली हैं, सीडीचे अनावरण स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर व कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्या संकल्पनेतून तसेच स्वरबद्ध झालेल्या या गीतांना प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचे निवेदन लाभले आहे. त्याचे संगीत दिग्दर्शन स्वराधीश भरत बलवल्ली यांनी केले असून समायोजन सुप्रसिद्ध संगीतकार कै. अनिल मोहिले यांचे आहे. नामवंत गायक सुरेश वाडकर, शंकर महादेवन, डॉ. जसपिंदर नेरूला, शान, जावेद अली, साधना सरगम, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आदींनी ही गाणी गायली आहेत.
अंदमानच्या जेलमध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा आणि कविता हेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कवच होते. त्यांना कविता सुचणे हे,त्यांच्यातील कणखर स्वभावाचे प्रतीक आहे. त्यांच्याजागी दुसरा कुणी असता तर खचून गेला असता आणि आत्महत्या देखील केली असती. सावरकर अदंमानातून बाहेर आलेले दिसले ते कवितांमुळे. त्यांच्या प्रत्येक कवितेत स्वातंत्र्याची उर्मी आणि बाहेर येऊन हिंदुस्थानासाठी काम करण्याची इच्छा दिसून येते, सायंघंटा या कवितेत त्यांनी घंटा वाजल्यानंतर कैदेतील एक दिवस संपला तसा माझ्या मातृभूमीचा पारतंत्र्यातला देखील एक दिवस संपला, अशी कल्पना त्यांना सुचली आणि एकेका दिवसाची फौज साचून ती भारतभूमीला स्वतंत्र करेल, असे त्यांना वाटत होते आणि ते प्रत्यक्षातदेखील आले, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अरुण साधू यांनी दिली.
मराठी विश्वात विदेशात लिहलेली पहिली कविता, पहिली कादंबरी, पहिला पत्रकारिता ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली. वयाच्या 9 व्या वर्षी पहिली कविता त्यांनी राष्ट्रभक्तीवर केली. अंदमानाच्या प्रतिकूल परिस्थितीतदेखील त्यांनी कविता केल्या त्या नव्या समाजाच्या निर्मितीसाठी. यांच्या कवितांमध्ये समाजनिर्माणाचा स्वर होता. त्यांनी अशा कवितांच्या 10 हजार ओळी भिंतींवर लिहल्या. सोबतच्या सुटका होणा-या कैद्याकडून पाठांतर करून त्या भारतीयांपर्यंत पोहचवल्या. स्वातंत्र्याच्या काळात त्यांनी लिहलेल्या कविता हा नंतरचा भारत कसा असावा, याबाबतचे त्यांचे विवेचन होते. राजकारणात भाग न घेण्याची अट असतानाही त्यांनी रत्नागिरीच्या नजरकैदेत कविता केल्या आणि देशभक्त निर्माण केले. त्यामुळेच त्यांना एक वेगळे महत्त्व आहे, पतितपावन मंदिराच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा अस्पृश्यनिवारणाचे कार्य केले. असे विचार ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ सचदेव यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा शस्त्रसज्जता, आधुनिकतावाद आणि विज्ञानवाद नव्या पिढीला कळू लागला आहे. त्यामुळेच त्यांना त्यांचे विचार समर्पक वाटावेत तसेच त्यांच्या आवडीच्या माध्यमातून ते त्यांच्यात रुजावेत, त्यांनी ते गुणगुणावे आणि स्वातंत्र्यवीरांच्या विचारांना अधिक बळकटी मिळावी,यासाठी संगीताचेदेखील माध्यम उपयोगात आणण्याच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार झाल्याचे स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी सांगितले.
स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी पास्ताविक केले. त्यावेळी त्यांनी स्मारकाचे कार्य केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे उद्दिष्ट असून आजच्या या सीडीचे प्रकाशन ही त्यातील एक महत्वाची पायरी असल्याचे सांगितले.
सावरकरांची गीते ही क्रांतीचा मंत्र देण्यासाठी तसेच देशभक्तीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी चिरंतर आहेत, त्यामुळे त्यांना स्वरबद्ध करण्याचा विचार मनात आला. क्रांतीची ज्योत सळसळत्या रक्तात पेटवायची असेल तर संगीत हेच प्रभावी माध्यम आहे आणि सावरकरांच्या शब्दांत ती प्रचंड ताकद आहे, त्यामुळेच या कविता चिरंतर राहतील, यादृष्टीने करण्यात आलेला हा एक प्रयत्न असल्याचे् स्वराधीश भरत बलवल्ली यांनी सांगितले. सावरकांचे गीत गाण्याची संधी आपल्याला मिळाली, हे आपले भाग्य असल्याचे विनम्र प्रतिपादन प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी केले.
या कार्यक्रमास प्रसिद्ध दिग्दर्शक वेद राही, इतिहासकार निनाद बेडेकर, खासदार भारतकुमार राऊत, कार्याध्यक्ष रणजित सावरकर,स्मारकाचे पदाधिकारी तसेच सावरकरभक्त व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश वाडकर, जसपिंदर नेरूला, वैशाली सामंत, भरत बलवल्ली, साधना सरगम यांनी या सीडीतील गायलेली गीते सादर केली. पूर्वी भावे व गुरूराज कोरगांवकर यांनी बहारदार नृत्यं सादर केली.
धन्यवाद सावरकर स्मारक
कळावे, लोभ असावा.
आपला लाडका : आयुर्हीत