दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच इतर भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय!
उदा. कन्नड भाषेतील खालील लोकप्रिय गाणे पहा. (बहुतेकांना नुसतेच पहावे लागेल, वाचता येणार नाही. पुन्हा एकदा हाय!)
आम्हाला संपूर्ण कल्पना आहे की कन्नड भाषेतील उच्चारांचा गोडवा देवनागरीमध्ये उतरणे शक्य नाही. उदा पत्नी आपल्या पतिला "री" अशी जी गोड लाडिक हाक मारते त्याची री मराठीत ओढता किंवा लिहिता येणे सर्वस्वी कठीण.
पण व्याभिचारी आस्वादाला आमचा पाठिंबा आहे. या गाण्याचे देवनागरीतील भ्रष्ट उच्चार व मराठीतील अर्थ प्रत्येक कडव्याखाली देत आहोत. बघा आवडतो का ते.
ಅನಿಸುತಿದೆ ಯಾಕೊ ಇಂದು..ನೀನೇನೆ ನನ್ನವಳಿದ್ದು
ಮಾಯದ ಲೋಕದಿಂದ..ನನಗಾಗೆ ಬಂದವಳಿದ್ದು
ಆಹಾ ಎಂಥ ಮಧುರ ಯಾತನೆ
ಕೊಲ್ಲು ಹುಡುಗಿ ಒಮ್ಮೆ ನನ್ನ..ಹಾಗೆ ಸುಮ್ಮನೆ
ಅನಿಸುತಿದೆ ಯಾಕೊ ಇಂದು..
अनिसुतिदे याको इंदु.. नीनेने नन्नबळिंदु
मायदा लोकदिंदा...ननगागे बंदबळिंदु
आहा एंथा मधुरा यातने
कोल्लु हुडुगि ओम्मे नन्ना... हागे सुम्मने
अनिसुतिदे याको इंदु
मला हे असे आज का वाटत आहे कोण जाणे
की केवळ तूच एक माझ्यासाठी आहेस
मायावी दुनियेतून खास माझ्यासाठीच तू आज आली आहेस
हाय! काय गोड यातना आहे ही
हे मुली मला मारून टाक बरे,
उगीचच.
---------------------೧-------------------------
ಸುರಿಯುವ ಸೋನೆಯು ಸೂಸಿದೆ..ನಿನ್ನದೆ ಪರಿಮಳ
ಇನ್ನು ಯಾರ ಕನಸಲೂ..ನೀನು ಹೋದರೆ ತಳಮಳ
ಪೂರ್ಣ ಚಂದಿರ ರಜ ಹಾಕಿದೆ..ನಿನ್ನಯ ಮೊಗವನು ಕಂಡ ಕ್ಷಣ
ನಾ ಖೈದಿ ನೀನೆ ಸೆರೆಮನೆ
ತಪ್ಪಿ ನನ್ನ ಅಪ್ಪಿಕೊ ಒಮ್ಮೆ..ಹಾಗೆ ಸುಮ್ಮನೆ
ಅನಿಸುತಿದೆ ಯಾಕೊ ಇಂದು..
सुरियवा सोनेया सोसिदे... निन्नदे परिमळा
इन्नु यार कनसलू... नीनु होदरे तळमळा
पूर्ण चंदिरा रजा हाकिदे... निन्नय मोगवनु कंड क्षणा
ना खैदि नीने सेरेमने
तप्पि नन्ना अप्पिको ओम्मे... हागे सुम्मने
पावसाने तुझा नशीला गंध सोबत आणला आहे.
तुझा चेहरा क्षणभर पाहिल्यावर पौर्णिमेचा चंद्रही आकाशातून लाजून पळून गेला आहे
तू एक तुरुंग आहेस आणि मी एक कैदी.
असेच मला मिठीमध्ये घट्ट धरून ठेव.
उगीचच
---------------------೨------------------------
ತುಟಿಗಳ ಹೂವಲಿ..ಆಡದ ಮಾತಿನ ಸಿಹಿಯಿದೆ
ಮನಸಿನ ಪುಟದಲಿ..ಕೇವಲ ನಿನ್ನದೆ ಸಹಿಯಿದೆ
ಹಣೆಯಲಿ ಬರೆಯದ ನಿನ್ನ ಹೆಸರ..ಹೃದಯದಿ ನಾನೆ ಕೊರೆದಿರುವೆ
ನಿನಗುಂಟೆ ಇದರ ಕಲ್ಪನೆ
ನನ್ನ ಹೆಸರ ಕೂಗೆ ಒಮ್ಮೆ..ಹಾಗೆ ಸುಮ್ಮನೆ
तुटिगळा हुवलि... आडद मातिना सिहियिदे
मनसिना पुटदलि..केवला निन्नदे सहियिदे
हण्णेयलि बरेयदा निन्ना हेसरा... हृदयदि नाने कोरेदिरुवे
निननुंटे इदरा कल्पने
नन्न हेसरा कोगे ओम्मे... हागे सुम्मने
तुझ्या ओठांवरील रंगांना तू न बोललेल्या शब्दांचा गोडवा आहे
माझ्या हृदयातील पानांवर केवळ तुझ्याच स्वाक्षर्या आहेत
तुझे नाव दैवाने माझ्या नशिबी लिहिलेले नसून
मीच ते माझ्या हृदयात कोरले आहे
तुला ह्याची कल्पना आहे का वेडे.
माझे नाव एकदा तुझ्या मुखातून मला ऐकूदे
उगीचच
प्रतिक्रिया
28 Nov 2007 - 9:56 am | विसोबा खेचर
तू मारलेला प्रतिटोलाही आवडला! आम्हाला अशीच हेल्दी बॅटिंग पाहायला आवडते!
एखाद्या वादाला नुसती शाब्दिक चर्चा करून उत्तर न देता कलेच्या माध्यमातूनच उत्तर देण्याची तुझी पद्धत मला अतिशय आवडली! अहो भाषा काय उर्दू असो, कन्नड असो, किंवा आणखी कुठली असो, आम्हा वाचकांना चांगलंचुंगलं वाचायला मिळाल्याशी कारण! :)
बाय द वे, कन्नड भाषेबद्दलही आम्हाला प्रेम आहे. आमच्या गुरुजींची मातृभाषा आहे ती! :)
असो, आत्ता गडबडीत आहे, गाण्याबद्दलचा प्रतिसाद सवडीने...
आपला,
(कर्णाचा फ्यॅन आणि अण्णांचा मानसशिष्य) तात्या.
28 Nov 2007 - 10:19 am | धनंजय
ಸುತರಾಂ ಉತ್ತಮ ಪ್ರಕಲ್ಪ, ಆಜಾನುಕರ್ಣವರು. कन्नडातले साहित्य मराठीत जरूर यावे. कन्नड भाषा गोव्याची आणि महाराष्ट्राची दुहेरी शेजारीण असून मला मुळीच कळत नाही, हे माझे दुर्भाग्य! "कानडा तो विठ्ठलू" म्हणून सोडून न देता त्याच्या भाषेत त्याच्याशी गप्पा मरता आल्या पाहिजेत नाही का? पण कन्नड शिकेस्तोवर तो तिकडे आपल्याला न सांगता काय काय खलबते करतो आहे, ते कोणीतरी अनुवाद करून बित्तंबातमी येथे पोचवावी. (आजानुकर्ण यांनी ही हेरगिरी पोचवल्यास हरकत नाही. नाहीतरी ते सुळके वगैरे चढतात, हा जनूबांडेपणा त्यांना सहज जमावा.)
तमिळमध्ये भांडण करावे, कन्नडात भजन, मलयाळममध्ये कथन, आणि तेलुगुमध्ये प्रेम. चला, इथे कर्णांनी पत्ते पिसून कन्नडात प्रेम सुरू केले आहे (, आणि उर्दूत भांडण).
:-)
28 Nov 2007 - 10:22 am | सर्किट (not verified)
उर्दुत इश्क आणि शराब विषयीच सगळे असते, हे वाटणार्याने कन्नडातले इश्कविषयक साहित्यच मांडले आहे इथे !
काही अध्यात्म, देशप्रेम वगैरे इक्बाल सारखे ?
येऊ द्यात !
- सर्किट
28 Nov 2007 - 10:29 am | आजानुकर्ण
हे गीत अध्यात्मिकच आहे. वरवर दिसणारा अर्थ व छुपा अर्थ वेगळा आहे हे आपल्यासारख्या जाणकारांस म्या पामराने स्पष्ट करावे काय?
अगदीच उदा. द्यायचे म्हटले तरी मराठी वाचक आपल्या आवडत्या किंवा नावडत्या संकेतस्थळाविषयी हे गीत म्हणताहेत ही कल्पना केली तरी ओळ न ओळ लागू पडेल.
पहा बरे अगदी चपखल बसणार्या ओळी:-
तुझ्या ओठांवरील रंगांना तू न बोललेल्या शब्दांचा गोडवा आहे
माझ्या हृदयातील पानांवर केवळ तुझ्याच स्वाक्षर्या आहेत
तुझे नाव दैवाने माझ्या नशिबी लिहिलेले नसून
मीच ते माझ्या हृदयात कोरले आहे
तुला ह्याची कल्पना आहे का वेडे.
माझे नाव एकदा तुझ्या मुखातून मला ऐकूदे
- आजानुकर्ण
28 Nov 2007 - 10:37 am | सर्किट (not verified)
उदा. द्यायचे म्हटले तरी मराठी वाचक आपल्या आवडत्या किंवा नावडत्या संकेतस्थळाविषयी हे गीत म्हणताहेत ही कल्पना केली तरी ओळ न ओळ लागू पडेल.
आता समजा "सर्किट" हा "एखाद्या" संकेतस्थळावर "खार खाऊन" आहे. तर मग..
तुला ह्याची कल्पना आहे का वेडे.
माझे नाव एकदा तुझ्या मुखातून मला ऐकूदे
असे त्याला अजीबात वाटत नाही !
कैच्या कै सांगताय राव तुम्ही !
हे कन्नड इश्काचेच गाणे आहे, हे कबूल करा की. असे लाजू नका !
- सर्किट
28 Nov 2007 - 10:48 am | आजानुकर्ण
सर्किट खार खाऊन असतील तर त्यांना पहिले कडवे लागू पडेल
मला हे असे आज का वाटत आहे कोण जाणे
की केवळ तूच एक माझ्यासाठी आहेस
मायावी दुनियेतून खास माझ्यासाठीच तू आज आली आहेस
हाय! काय गोड यातना आहे ही
हे मुली मला मारून टाक बरे,
उगीचच.
थोडक्यात "जिंकू किंवा मरू" या देशप्रेमी भावनेचा पुरस्कार या पंक्तींमध्ये आहे. संपूर्ण गीत पहावे, केवळ एक कडवे घेतले तर अर्थ लावणे अवघड जाईल. सत्य हे नेहमी अंशाअंशाने प्रकट होत असते हे लक्षात ठेवावे. वन प्लस वन इज इक्वल टू मोअर दॅन टू हे तर माहितीच असेल. मटाच्या मराठीत यालाच "एक और एक ग्यारह" असे म्हणतात.
- आजानुकर्ण
28 Nov 2007 - 10:48 am | मनिष
दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय!
"सर्वोत्कृष्ट" नाही पण उत्कृष्ट साहित्य आहे (सर्वोत्कृष्ट चा दावा कुठे केला?). कुठल्याही एका भाषेने सर्वोत्कृष्ट साहित्याचा दावा करू नये अशा मताचा मी आहे. शिवाय उर्दू ही एक अस्सल भारतीय भाषा आहे - तिला एका देशाशी बांधून घेणे हे उर्दूचे दुर्भाग्य आणि आपलेही.
28 Nov 2007 - 10:53 am | आजानुकर्ण
उर्दू अस्सल भारतीय भाषा असावी. लेखामध्ये "इतर भारतीय भाषाभगिनींमधील" अशी दुरुस्ती करतो. :)
कोणत्याही भाषेला एका देशाशी किंवा राज्याशी बांधून घेणे हे त्या भाषेचे व भाषकांचे दुर्भाग्यच असते.
- आजानुकर्ण
28 Nov 2007 - 10:59 am | आजानुकर्ण
http://www.youtube.com/?v=gDTQJs6LbHM
http://www.youtube.com/watch?v=vLd4ChiNpYE&mode=related&search=
दोन्हीपैकी एका ठिकाणी हे सुंदर गाणे ऐकता (व पाहता) येईल. कार्यालयात यूट्यूब प्रतिबंधित असल्याने खात्री करता आली नाही. :((
- आजानुकर्ण
28 Nov 2007 - 7:48 pm | सागर
कर्णराव (कन्नड राव लावलेला छान वाटतंया...),
तुम्ही दिलेली लिंक काम करत आहे. आणि हे गाणे चक्क सोनू निगम याने गायलेले आहे...
सर्वोत्कृष्ट कन्नड गाणे नॉन-कन्नड गायकाने गायिले आहे हे विशेष...
गाणे पाहताना आणि ऐकतानाही भाषा कळत नसली तरी प्रणयाची नशा चढते यात काही संशय नाही...
लय भारी गाणं हाय ...
(हे गाणे ऐकून प्रितीमय झालेला ) सागर
28 Nov 2007 - 10:59 am | धनंजय
चित्रपट "मुंगारु मळे" मधील गाणे. कवी कोण? (जयन्त कायकिणी, कविराज, योगराज भट, शिव, पैकी एक)
चित्रपटातला प्रसंग कर्ण सुचवतात तितका आध्यात्मिक रंगवला नाही, असे वाटते. पण आध्यात्मिक रंगवला असता तरी काही हरकत नाही.
28 Nov 2007 - 11:00 am | मनिष
तेच सांगत होतो मी! :)
"हागे सुम्मने" म्हणजे "उगीचच" का?
अवांतर : आमच्या शेजारचा लहान कन्नड मुलगा "मामा, तू 'कुंडी' म्हणू नकोस, मला सारखे हसायला येते" असे सांगायचा! :)
28 Nov 2007 - 11:04 am | आजानुकर्ण
हागे म्हणजे असे (की तसे?)
सुम्मने म्हणजे गप्प
पण दोहोंचा एकत्रित अर्थ गाण्यामध्ये उगीच काहीतरी अशा अर्थाचा आहे.
- आजानुकर्ण
28 Nov 2007 - 11:41 am | आनंदयात्री
हागे सुम्मने म्हणजे समजले पण "कंड क्षणा" म्हणजे काय हो ?
28 Nov 2007 - 11:49 am | आजानुकर्ण
कंड म्हणजे भाग किंवा तुकडा. (खंड?)
क्षण म्हणजे क्षण (म्हराटीत हाये तोच)
कंड क्षणा म्हणजे क्षणाचा एक तुकडा.
- आजानुकर्ण
28 Nov 2007 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कर्णा,
कन्नड भाषेतील गाण्याचा अनुवाद आवडला. मराठी साहित्यात तौलनिक साहित्याचा अभ्यास हा एक भाग आहे,
आपण जर कन्नडी भाषा जाणता, तेव्हा त्या भाषेचा साहित्याचा इतर भाषेशी तौलनिक अभ्यास इथे अन्य लेखात दिला तर आजच्या अनुवादाइतकाच आनंद होईल.
तुटिगळा हुवलि... आडद मातिना सिहियिदे
मनसिना पुटदलि..केवला निन्नदे सहियिदे
हण्णेयलि बरेयदा निन्ना हेसरा... हृदयदि नाने कोरेदिरुवे
निननुंटे इदरा कल्पने
नन्न हेसरा कोगे ओम्मे... हागे सुम्मने
याचा अनुवाद आवडला ! :)
अवांतर :- माझ्या संगणकावर कन्नडी भाषेऐवजी चौकोने डबे दिस्ताहेत. दिसले असते तरी वाचता येत नाही तो भाग वेगळा.पण दिसावे यासाठी काय करावे लागेल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
11 Apr 2013 - 11:52 pm | आशु जोग
वा छान
पूर्वी 'आप्तमित्र' पाहिला होता थिएटरला जाऊन
पण
नंतर त्यावर आलेला हिंदी भूलभूलैय्या त्यापुढे अगदीच हे वाटला.
25 Apr 2017 - 11:54 am | अभ्या..
वाचनखुणा आल्या अन माझ्या पहिल्यापहिल्या वाचनखुणेची आठवण झाली.
मस्तच एकदम कर्णराव.
पिक्चर, गाणे अन लेखन प्रतिसाद सगळेच भारी.
बादवे सिक्वल आलाय्/येतोय मंगारु मळे चा. गणेशच आहे हिरो. पूजा गांधी मात्र नाहीये.
25 Apr 2017 - 8:33 pm | सिरुसेरि
सोनु निगमने गायलेले "निन्दिन दले " हे गाणे छान आहे . ----- https://www.youtube.com/watch?v=-xmRjO2G05c
--"तमिळमध्ये भांडण करावे, कन्नडात भजन, मलयाळममध्ये कथन, आणि तेलुगुमध्ये प्रेम. "---- काहि जणांना या चारही भाषा येत असतात . उदा. - https://www.youtube.com/watch?v=gLSVzz6piJU
25 Apr 2017 - 9:00 pm | यशोधरा
मिंचागी नीनू बरलू हे पण सोनूचे एक सुरेख गाणे आहे. गणेशबाप्पा बघवत नाही, पण ऐकायला छान वाटते.