मी काय करू??..........
तो रिटायरमेंट घेणार आहे म्हणे..
मग मी काय करू??
त्यांचं स्मारक इथं नाही तिथं बांधणार म्हणे
मग मी काय करू??
त्याच्या त्या मुव्ही मध्ये ती मर्डरर नाहीये म्हणे
मग मी काय करू??
म्हणे तो तर डेंग्यू ने मेलाय
मग मी काय करू??
तो म्हणे भारताचा नेक्स्ट पंतप्रधान
मग मी काय करू??
आणि तो म्हणे भारताची नवीन WALL
मग मी काय करू??
फेसबुक BAN होणार आहे म्हणे
मग मी काय करू??
अरे पेट्रोल महाग ..Gas महाग
महागाईची भडकलीये आग
तसं म्हंटलं तर मी काहीच करू शकत नाही..
कारण ना मी "हृदयसम्राट", ना मी कोणाचा "माही"
तुटपुंज्या कमाईत जगतोस रे कसा तू..
अशी कोणीच विचारपूस करत नाही
कारण, आहे मी एक सामान्य माणूस
जस्ट " A Stupid Common Man" !!
ज्याला महागाईचा भस्मासुर फाडून खाई...
पण, मी काय फक्त जन्मभर मरायचंच का?
ह्या कणखर जीवनात फक्त हरायचंच का??
सांगा ना काय करू मी???
मग मी काय करू??
कुणी ऐकतंय का माझं...
मीsss ...कायsssss ...करूssssssssssssss !!!!!!!!
-बटाटा चिवडा (A Stupid Common Man!!)
प्रतिक्रिया
2 Dec 2012 - 1:13 pm | अविनाशकुलकर्णी
लाज वाटते राजे, या जगात जगाव लागतं
समाजाच अध:पतन, उघड्या डोळ्यांनी बघाव लागतं
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत.....
कायदा सुव्यवस्थेला कुणी भीत नाही राजे,
सुभेदाराची सूनही इथे सुरक्षित नाही राजे,
आया,बहिणी,लेकी,सुना पवित्रा राहिली नाहीत नाती,
शासन करणार्या तलवारींची गंजून गेलीत पाती,
आपल्या अब्रुच लक्तर,अब्रू झाकण्यासाठीच मागाव लागत
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत
2 Dec 2012 - 1:34 pm | श्री गावसेना प्रमुख
सुभान अल्ला कुलकर्णी साहेब
2 Dec 2012 - 3:46 pm | संजय क्षीरसागर
आपण इंटरनेटवर येतो याचा अर्थच सगळं व्यवस्थित चाललय आणि फावला वेळ आहे असा होतो.
हे म्हणजे लिव्ह- इन मधे राहणार्यांनी आय्-पिल्सचा खर्च परवडत नाही असा त्रागा करणं झालं.
14 Dec 2012 - 10:29 pm | इष्टुर फाकडा
हहपुवा !! काय रूपक आहे ! वा वा
2 Dec 2012 - 1:47 pm | पैसा
उद्वेग चांगला व्यक्त झालाय. आमचं आपलं एकच धोरण
तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे.
2 Dec 2012 - 2:57 pm | परिकथेतील राजकुमार
तुका म्हणे उगी रहावे, मिपावर जे जे होईल ते ते पहावे
प्रसंगे अखंडीत मारीत जावे पाचर...
3 Dec 2012 - 6:17 pm | बॅटमॅन
पैसातैंशी बाडिस. उगी पाचर मारली तरी उगी रहावे.
2 Dec 2012 - 2:37 pm | भिकापाटील
पै तैशी सहमत
2 Dec 2012 - 5:08 pm | अभ्या..
आलिया भोगासी असावे सादर
निवांत झोपावे पांघरुनी चादर (सोलापुरी)
2 Dec 2012 - 5:44 pm | किसन शिंदे
सोलापुरी चादरी वापरणे आमच्यासाठी चंगळवाद आहे बाबा. आम्ही आपले आजीने शिवलेल्या गोधड्या वापरतो.
2 Dec 2012 - 6:18 pm | लीलाधर
अजूनही चादरीतच आहेस ;) :-P
2 Dec 2012 - 7:57 pm | मनीषा
सिकंदर ने पोरस से की थी लडाई ... तो मै क्या करु ?
हे गाणे आठवलं
http://youtu.be/b0xBa8kr7TI
3 Dec 2012 - 8:45 pm | जेनी...
मला त बै " तुझे मिरची लगी त्तो ........ मै क्या करु?? " आठवलं .
14 Dec 2012 - 10:15 pm | अनिल तापकीर
त्या अभंगाची आठवण झाली 'सांगा मी काय करू'
15 Dec 2012 - 12:22 am | अभ्या..
ते "आई तुझं लेकरु वेडं गं कोकरु, रस्ता चुकलय. सांग मी काय करु" अभंग आहे?
का तुम्ही म्हणता तो अभंग अजून वेगळा आहे?
14 Dec 2012 - 10:36 pm | हारुन शेख
कुणाला शाळेतलं गाणं, कुणाला गोविंदाचं टपोरी गाणं, कुणाला अभंग कायकाय आठवतंय. हा धागा काढणाऱयाची प्रतिभा सूत्रे रचणाऱ्या शास्त्रकारांच्या तोडीची आहे असे म्हणावे काय ?
14 Dec 2012 - 10:38 pm | जेनी...
अगदि सहमत .
3 Feb 2017 - 8:27 am | बटाटा चिवडा
तोडीची आहे यास सहमत? :-O
10 Mar 2015 - 8:58 am | बटाटा चिवडा
तुमचे प्रतिसाद पाहुन गहिवरून आलयं.. परंतु, मी काय करू अजूनही उमगत नाहिये की मी काय करू??
10 Mar 2015 - 2:25 pm | कंजूस
10 Mar 2015 - 2:37 pm | वेल्लाभट
नीली नीली आखें मेरी 'मैं क्या करू?'
गोरे गोरे गाल मेरे 'मैं क्या करू?'
आणि आत्ताचं
इस दिल का क्या करूं मैं क्या करूं (लूप टिल इन्फिनिटी)
16 Aug 2016 - 8:18 pm | बटाटा चिवडा
बॉलिवूड बेसिस प्रतिसाद बरेच आठवले की
10 Mar 2015 - 2:38 pm | वेल्लाभट
उद्वेग पोचला. गुड !
10 Mar 2015 - 7:45 pm | चाणक्य
हे वाचायचं राहिलंच होतं. भारीये.
17 Aug 2016 - 11:33 am | डॉ सुहास म्हात्रे
स्वगृहावरच्या लेखांच्या यादीत असे वाचले...
"मी काय करू??.......... बटाटा चिवडा"
:) (हघ्या)
स्वगत आवडले.
हातावर हात ठेऊन न बसता प्रत्येकाने आपापल्या मगदुराप्रमाणे शक्य तेवढे केले तरी पुरे होईल असे वाटते.