मिसळपाव मान्सून सम्मेलन - २०१२

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
15 Jul 2012 - 10:42 pm

॥ जालिंदरबाबा की जय ॥

जुन्या-जाणत्या, वृद्धानुभवी मिपाकरांच्या आशीर्वादाने आणि नव्या-जाणत्या, होतकरू-तरुण मिपाकरांच्या पुढाकाराने

मिसळपाव धर्म वाढवावा। अवघा हलकल्लोळ करावा॥

या इराद्याने यंदाचे 'मिसळपाव मान्सून संम्मेलन - २०१२' मुंबईच्या पश्चिम दृतगती मार्गावर आयोजित केलेले आहे. सदर सम्मेलनासाठी

दाराज् धाबा,
पश्चिम दृतगती मार्ग, घोडबंदर रोड,
मिरा रोड (पूर्व)

हे स्थान निश्चित करण्यात आलेले असून दिनांक २२ जुलै २०१२ रोजी सांध्याकाळी ५:३० वाजण्याच्या सुमुहूर्तावर इथे येण्याचे आमंत्रण या अनुषंगाने सर्व मिसळपाव सदस्यांना देत आहोत. या मिषाने जुन्या-नव्या मिपाकरांमध्ये मैत्रीचे नवे धागे गुंफणे शक्य होईल आणि त्याचप्रमाणे आंतरजालिय व्यक्तिमत्त्वांच्या भेटीद्वारे आपला अभ्यास वाढवणेही शक्य होईल अशी आशा आहे.

कार्य सिद्धीस नेण्यास सर्व मिसळप्रेमी समर्थ आहेतच तरी उपरोल्लेखित कार्यक्रमामध्ये अधिकाधिक मिपाकरांनी हजेरी लावावी अशी विनंती आहे.

दाराज् धाबा मध्ये मिळणार्‍या पदार्थांचा मेन्यू आंतरजालावर उपलब्ध आहे आणि भोजनाचा दरडोई खर्च (सुमारे) रु. ५००/- (रुपये पाचशे फक्त) अपेक्षित आहे.

मिपाकर आगत्ये येऊन 'मिसळपाव मान्सून सम्मेलन - २०१२' यशस्वी करतील अशी खात्री व्यक्त करतो. प्रतिसादांच्या माध्यमातून मिपाकरांनी आपली उपस्थिती कळवल्यास मंडळ आभारी राहील.

तेव्हा आता २२ तारखेला भेटूच!

जय हिन्द । जय महाराष्ट्र । जय मिसळपाव ।

धोरणसंस्कृतीजीवनमानराजकारणशिक्षणविचारबातमीशिफारसमाहितीवादआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

15 Jul 2012 - 10:52 pm | मुक्त विहारि

जमल्यास नक्की येणार..

मराठमोळा's picture

16 Jul 2012 - 7:52 am | मराठमोळा

>>दाराज् धाबा मध्ये मिळणार्‍या पदार्थांचा मेन्यू आंतरजालावर उपलब्ध आहे आणि भोजनाचा दरडोई खर्च (सुमारे) रु. ५००/- (रुपये पाचशे फक्त) अपेक्षित आहे.

(परा मोड) गरीबांसाठी काही सवलत आहे का? असल्यास विचार केला जाईल. आधीच मंदी आलीये आणि त्यात हुच्चभ्रु लोकं संम्मेलनं करताहेत. देशाची वाट लागलेली असताना लोकं अशा पार्ट्या करताना पहुन एक मिपाकर म्हणून शरम वाटली. (/परा मोड)

अवांतरः मजा करा लेको.. शुभेच्छा आणि फोटू टाकायला विसरु नका. एक दोघांना बुकलुन काढायचे आहे, ते येणारेत असे दिसले की व्यनीतून मिपा पैलवानांना सुपारी दिली जाईल. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jul 2012 - 11:06 am | परिकथेतील राजकुमार

कष्ट वाचवलेस बरेच माझे.

आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. (लेखकाशी आदर राखून)

दाराज् धाबा मध्ये मिळणार्‍या पदार्थांचा मेन्यू आंतरजालावर उपलब्ध आहे आणि भोजनाचा दरडोई खर्च (सुमारे) रु. ५००/- (रुपये पाचशे फक्त) अपेक्षित आहे.

अशा ओळी आल्या की आम्हाला 'सार्वजनिक हळदी कुंकू , भोंडला, मंगळागौरी किंवा गेला बाजार बायकांच्या भिशीची' आठवण येते.

'मला न्यायला आणि सोडायला कोणी आहे का ?' अशा प्रश्नाने सुरुवात करायची. टेबलला बसल्या बसल्या दिसतील त्यांना चार चार शिव्या घालायच्या, जे आले नसतील त्यांच्या गैरहजेरीवरुन अफवा पसरवायच्या.. हे सगळे झाले की पुढचे तास दोन तास मनसोक्त खान पानाचा आनंद लुटायचा. जमेल तेवढे 'मनाचे श्लोक' सांगायचे, दुसर्‍याची खेच खेच खेचायची.. आणि बिल आले की किरंगळी वर करून तोंड काळे करायचे ही आहे आमची कट्ट्याची व्याख्या. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे ज्या माणसासाठी कट्टा भरवला आहे, त्यालाच घरुन निघेपर्यंत कुठे जायचे आहे हे माहिती नसणे आणि कट्टेकरी घरून निघाले की प्रवासात शेवटी एकदाची कट्याची जागा ठरणे ह्या सारखी मजा नाही. ;)

आणि शेठ तुम्ही मान्सून वैग्रेची काळजी करू नका हो. सच्चे मिपाकर जमले की तिथे आपोआप सगळे ऋतु फुलतात.

गवि's picture

16 Jul 2012 - 11:13 am | गवि

घरुन निघेपर्यंत कुठे जायचे आहे हे माहिती नसणे ..

हॅ हॅ हॅ.. आणि कट्टेकरी कट्ट्यावरुन परत निघाले की घर कुठे आहे हे माहीत नसणे .. ते विसरलेत का हो? ;)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jul 2012 - 11:24 am | परिकथेतील राजकुमार

हॅ हॅ हॅ.. आणि कट्टेकरी कट्ट्यावरुन परत निघाले की घर कुठे आहे हे माहीत नसणे .. ते विसरलेत का हो?

ते कसे विसरीन गवि ? म्हणून 'न्यायला आणि सोडायला कोण येणार ?' हा प्रश्न मी आधी सोडवून घेतो. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jul 2012 - 11:24 am | बिपिन कार्यकर्ते

अगदी अगदी!... काही हडळी आणि मुज्यांना घरी (त्यांच्या त्यांच्या) सोडायला आम्हालाच जावे लागते! ;)

मिसळपाव आणि संमेलन याबद्दल खात्री आहे, मान्सुन बद्दल काय ?

अर्थात येत आहोच..

नंदन's picture

16 Jul 2012 - 8:08 am | नंदन

संमेलनाला शुभेच्छा! कट्टा दणक्यात होणार यात काही शंका नाही. वृत्तांत (जमल्यास लाईव्ह) आणि फोटू नक्की टाका.

किसन शिंदे's picture

16 Jul 2012 - 8:14 am | किसन शिंदे

पावसाळी सम्मेलनाच ठिकाण बदललं कि काय.? :O

असो. हजेरी लावल्या जाईलच. :)

गणपा's picture

16 Jul 2012 - 8:17 am | गणपा

वोक्के. :)

किसन शिंदे's picture

16 Jul 2012 - 8:22 am | किसन शिंदे

वोक्के.

या शब्दाचा अर्थ कळाला नाही.

वोक्के नेमकं कशासाठी..?? :)

पावसाळी सम्मेलनालासाठी वोक्के कि जे ठिकाण ठरवलंय त्या ठिकाणासाठी वोक्के.;)

पावसाळी सम्मेलनालासाठी वोक्के कि जे ठिकाण ठरवलंय त्या ठिकाणासाठी

दोन्हींसाठी.
हजेरी लावल्या जाईल. ठिकाणही माहितीचे असल्याने फार शोधाशोध करावी लागणार नाही. :)

मराठमोळा's picture

16 Jul 2012 - 12:48 pm | मराठमोळा

समस्त कट्ट्याला जाणार्‍या मिपाकरांनो,
गणपा तिथे येणार आहे त्यामुळे ५०० रुपये वगैरे खर्च करायची गरज पडणार नाही. या व्यक्तीला किडनॅप करुन हवे ते पदर्थ करुन घेणे, इकडे थोडेसे जेवण पार्सल करुन देणे. सुपारी व्यनीतून न देता हे जाहीर टेंडर काढण्यात आले आहे याची नोंद घ्यावी. इकडे जेवण पोहोचताच किडनॅपर ला योग्य बक्षीस देण्यात येईल.

लावा बोली. :)

सूड's picture

16 Jul 2012 - 2:34 pm | सूड

प्रकाटाआ

प्रचेतस's picture

16 Jul 2012 - 9:06 am | प्रचेतस

शुभेच्छा.

सुहास झेले's picture

16 Jul 2012 - 11:09 am | सुहास झेले

व्वा व्वा... हजेरी लावण्याचा नक्की प्रयत्न केल्या जाईल :) :)

सूड's picture

16 Jul 2012 - 11:37 am | सूड

शुभेच्छा !!

सस्नेह's picture

16 Jul 2012 - 12:00 pm | सस्नेह

१. हे आमंत्रण स्त्री सदस्यांना ही आहे काय ?
असल्यास,
२. वेळापत्रक ?
३. वाहनव्यवस्था ?

प्रास's picture

16 Jul 2012 - 1:48 pm | प्रास

१. हे आमंत्रण स्त्री सदस्यांना ही आहे काय ?

निदान आमच्यापुरते आम्ही 'जेन्डर बायस्ड' नसल्याने स्त्री सदस्यांचा वेगळा उल्लेख टाळतो हे सूज्ञांच्या लक्षात आलेलं असेलंच तरी वैयक्तिक निमंत्रणा ऐवजी धागा हेच निमंत्रण मानून स्त्री सदस्यांनीही आगत्ये येणं करावं ही पुन्हा एकदा विनंती.

असल्यास,

आता नक्कीच स्पष्ट झालं असावं....

२. वेळापत्रक ?

सम्मेलनस्थानी पोहोचण्याची वेळ संध्याकाळी ५:३० अशी ठरवलेली आहे. आपापल्या गन्तव्य स्थानानुसार सम्मेलनस्थानावरून परतण्याची वेळ प्रत्येकाने स्वतः ठरवावी ही अपेक्षा आहे.

३. वाहनव्यवस्था ?

अशा सम्मेलनांसाठी कोणत्याही ठीकाणावरून वाहन व्यवस्था करणं कठीण होतं परंतु सम्मेलनस्थान हे पश्चिम दृतगती मार्गावरील प्रसिद्ध ठीकाण असल्याने मिरा रोड अथवा भाईन्दर रेल्वे स्थानकापासून रीक्षाने गाठणे सोपे आहे. या व्यतिरिक्त ठाण्याहून बोरीवलीला येणार्‍या आणि बोरीवलीतून ठाण्याला जाणार्‍या बससेवेचा 'दाराज् धाबा' हा थांबा आहे. या दोन्ही ठीकाणांवरून येणार्‍यांना हे सोयीचे होईल असं वाटतं.

धन्यवाद!

सस्नेह's picture

16 Jul 2012 - 5:06 pm | सस्नेह

सर्व उत्तरांबद्दल आणि आमंत्रणाबद्दल धन्यवाद.
येण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाईल.

मन१'s picture

16 Jul 2012 - 12:05 pm | मन१

जोरदार(की मान्सून असल्यानं "धुवांधार" ? ) होउ द्यात.

सर्वसाक्षी's picture

16 Jul 2012 - 12:17 pm | सर्वसाक्षी

संमेलनास शुभेच्छा!

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jul 2012 - 12:41 pm | अत्रुप्त आत्मा

बिझ्झी...सिझन...! त्यामुळे...पास...आणी शुभेच्छा :-)

स्मिता.'s picture

16 Jul 2012 - 2:13 pm | स्मिता.

मान्सून संमेलनास आमच्या शुभेच्छा!
नंतर डिट्टेलवार वृत्तांत आणि फोटो टाकायला विसरू नका.

sneharani's picture

16 Jul 2012 - 2:15 pm | sneharani

शुभेच्छा!! गणपाभाऊ येताहेत म्हणल्यावर कट्टा जोरदार...!!
:)

जाई.'s picture

16 Jul 2012 - 2:35 pm | जाई.

शुभेच्छा

विनायक प्रभू's picture

16 Jul 2012 - 3:23 pm | विनायक प्रभू

दारा(वा)ज धाबा का?
चान चान.

आत्मशून्य's picture

16 Jul 2012 - 5:05 pm | आत्मशून्य

मस्त वृत्तांताच्या प्रतिक्षेत.

शित्रेउमेश's picture

16 Jul 2012 - 8:46 pm | शित्रेउमेश

मान्सून सम्मेलन मुद्दाम मुंबई मध्ये ठेवले आहे.
१. पुण्यातल्या मिपा करांना जळवायला. आणि,
२. पुण्यात अजुन मान्सून अवतरला नाहिये. ;)

- १ मिपा प्रेमी, पुणेकर (नविन सभासद)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Jul 2012 - 8:51 pm | विश्वनाथ मेहेंदळे

नावावरून हे ठिकाण शहराबाहेरील एखादा धाबा वाटत असेल तर तसे काही नाही. हे family restaurant आहे, ते ही शहराच्या मधोमध, भर वस्तीत. त्यामुळे कुणीही (विशेषत: महिला वर्गाने) त्या कारणाने न येण्याचे ठरवू नये.

मागील वेळेप्रमाणे यंदाही कट्टा कोरडा असेल. मान्सून आणि धाबा अशामुळे उगाच गैरसमज नको. कट्टेकरी सहकार्य करतीलच.

एक अति महत्त्वाची सूचना :- जे या कट्ट्याला येण्याची शक्यता आहे त्यांनीच या धाग्यावर वरील पैकी कुठल्याही बाबतीत मत/सूचना व्यक्त करावी ही नम्र विनंती. तात्विक चर्चेसाठी सरळ दुसरा धागा काढावा.

(सरळसोट) विमे लाडू :-)

अर्थातच विमेकाकांना अनुमोदन आहे. :-)

माझंही विमेला अनुमोदन. सर्वांना विशेषतः ओळखीच्या / अनोळखी अशा सर्व स्त्री सदस्यांना कट्ट्यावर कंफर्टेबल वाटणं या गोष्टीला सर्वोच्च प्राधान्य आहे.

शिवाय अत्यंत इनोसंट निष्पाप सदस्यांकरिता "कोरडा कट्टा" म्हणजे "मद्यपान नसलेला कट्टा" असं सोपं शब्दरुपांतर करतो. कोणाला असं वाटायला नको की मागच्या वेळी फार पाऊस पडल्याने ओल्यात अथवा गळक्या जागी बसावं लागलं, आणि यंदा मात्र कोरड्या जागेची सोय केली आहे.. :)

>>एक अति महत्त्वाची सूचना :- जे या कट्ट्याला येण्याची शक्यता आहे त्यांनीच या धाग्यावर वरील पैकी कुठल्याही बाबतीत मत/सूचना व्यक्त करावी ही नम्र विनंती. तात्विक चर्चेसाठी सरळ दुसरा धागा काढावा.
हे काय विमेकाका, हा प्रतिसाद टाकलात ? आता चाळीतल्या नळांवरती वडाची साल पिंपळाक लावणार्‍या बायकांसारखे जे प्रतिसाद आले असते ते वाचण्याची मजा हिरावून घेतलीत.

स्पा's picture

17 Jul 2012 - 11:29 am | स्पा

हे काय विमेकाका, हा प्रतिसाद टाकलात ? आता चाळीतल्या नळांवरती वडाची साल पिंपळाक लावणार्‍या बायकांसारखे जे प्रतिसाद आले असते ते वाचण्याची मजा हिरावून घेतलीत.

अरेरे काय दिवस आलेत.. सूड काकांशी सहमत व्हाव लागतंय
असो..

कट्ट्याला शुभेच्छा :)

..........................................................
सध्या आमचे येथे दुसर्याच्या खवट (खवत) जाऊन तीसर्याबद्दल गॉसिप करण्याचे संवत्सर सुरु असलेने कोणाचाही उघड अपमान करणे टाळत आहोत(मागून मारणे सोप्पे असते ), त्यामुळे आमच्यात सात्विक बदल वैगरे झाल्याचा गैरसमज करुन घेऊ नये. धन्यवाद.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Jul 2012 - 11:56 am | विश्वनाथ मेहेंदळे

काल तुम्हा दोघांची प्रकर्षाने आठवण आली होती रे. यायचे जमवा ना राव :-)

मेल्या स्पावड्या, तू रे कशाला शुभेच्छा देतोयस? न येण्याचा विचार आहे की काय? हे पहा, स्पष्टच सांगतो, प्रासादि बलदंड व्यक्ती येऊन तुला उचलून नेण्यापेक्षा स्वतःच्या पायांनी ये हे उत्तम..

न येण्याची शक्यता ९०% आहे, त्यातही येनकेनप्रकारेण जमलं तर नक्की कळवतो.

बा द वे स्पावड्याची नवी स्वाक्षरी माझ्या स्वाक्षरीच्या चालीवर रचली असली तरी छान आहे. :)
@मकमावशी, गप्प बसायचे ठरविले आहे ;)

मस्त कलंदर's picture

17 Jul 2012 - 11:50 am | मस्त कलंदर

ता चाळीतल्या नळांवरती वडाची साल पिंपळाक लावणार्‍या बायकांसारखे जे प्रतिसाद

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Jul 2012 - 7:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे

सूड ने ते अत्यंत नाईलाजाने लिहिले असणार. मनात आले ते सभ्यतेच्या चौकटीत बसणारे नसेल म्हणून ;-)

मराठमोळा's picture

17 Jul 2012 - 7:49 pm | मराठमोळा

होय तर..
भरपुर रिकाम्या वेळात सगळे लेख वाचून फक्त ठराविक ठिकाणी शब्दांचे खेळ करणे सगळ्यांनाच थोडीच जमते.. ;)

डावखुरा's picture

16 Jul 2012 - 10:08 pm | डावखुरा

पुण्यात कधी ?

आम्ही दर वीकांताला भेटत असतो...

मुंबईकरांसारखे चेंगटपणे ३ / ४ महिन्यातून एकदा भेटत नाही.

काडी लावण्यात आली आहे. :-D

मुंबईकर होण्यासाठी मुंबईचा जाज्वल्य अभिमान असलाच पाहिजे अशी अट मुळीच नाही. ती अट पुण्याला.

-श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे..

मोदक's picture

17 Jul 2012 - 12:37 pm | मोदक

विमेंच्या सुचनेला लावलेली काडी गविंनी का विझवावी???

:-D

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Jul 2012 - 1:03 pm | विश्वनाथ मेहेंदळे

फरक आहे ना राव. आम्ही राजरोस धागे काढून कट्टे करतो. छुप्या (invitation only) भेटी नाही करत.

काडी लावून घेण्यात आली आहे. ;-)

सुनील's picture

16 Jul 2012 - 11:42 pm | सुनील

शुभेच्छा!!

मनोज श्रीनिवास जोशी's picture

17 Jul 2012 - 1:16 am | मनोज श्रीनिवास जोशी

हजेरी लावण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न आहे.

कापूसकोन्ड्या's picture

17 Jul 2012 - 11:23 pm | कापूसकोन्ड्या

तिथे मटार उसळ आणि शिक्रण पोळी मिळेल का?

प्रत्यक्ष येऊन स्वदृष्टीने पाहून शंका-समाधान करून घेणं चांगलच, नै का?

आता त्यासाठी का होईना, कट्ट्याला या, राव! :-)

दाराज ढाब्यात शिक्रण ?
म्हणजे मालवण किनारा मधे पास्ता?
हायवे गोमांतकमधे साबुदाणा खिचडी ?
तांबे आरोग्यभुवनात मटणपॅटिस?
पिझ्झा हट मधे मिसळ?
के एफ सी मधे थालीपीठ?
स्वाद थाळी मधे सुक्की वजडी?

हां... मटार उसळी ऐवजी आलू मटर मिळेल हो..

किसन शिंदे's picture

18 Jul 2012 - 12:34 pm | किसन शिंदे

दाराज ढाब्यात शिक्रण ?
म्हणजे मालवण किनारा मधे पास्ता?
हायवे गोमांतकमधे साबुदाणा खिचडी ?
तांबे आरोग्यभुवनात मटणपॅटिस?
पिझ्झा हट मधे मिसळ?
के एफ सी मधे थालीपीठ?
स्वाद थाळी मधे सुक्की वजडी?

=)) =)) =))

हाहाहा..

गविपण आजकाल जाम टांग खेचतात. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Jul 2012 - 12:40 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हां... मटार उसळी ऐवजी आलू मटर मिळेल हो..

आणि शिक्रणी ऐवजी फ्रुट सॅलड

किंवा शिक्रणीलाच "मिल्क बनाना सॅलड" म्हटलं तर ;)

कापूसकोन्ड्या's picture

19 Jul 2012 - 9:59 am | कापूसकोन्ड्या

मालवण किनारा
हायवे गोमांतक
आरोग्यभुवन
पिझ्झा हट
के एफ सी
स्वाद थाळी

वा वा

कापूसकोन्ड्या's picture

19 Jul 2012 - 9:54 am | कापूसकोन्ड्या

आग्रहाचे निमंत्रण वाचून डो.क.ओ.
प्रत्येकाची इनो घ्यायची पध्दत वेगळी असते. आम्हाला येता येत नाही ना मग म्हणता येते "छ्या! तिथे साधी ---- नाही?
कट्ट्याला शुभेच्छा. करा लेको मजा करा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Jul 2012 - 12:05 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तो अंदाज आला होता. पण कट्टा मुंबईत आहे. शिकरण आणि मटार उसळीवर दुसऱ्या शहराचा प्रताधिकार आहे ना ? आता दुसरा पदार्थ शोधा पाहू !!!

येण्याचा प्रयत्न केला जाईल :)

राजघराणं's picture

18 Jul 2012 - 6:01 pm | राजघराणं

बायका पोराना घेउन आल तर चालत का ?
मंजी सुट्टीच्या दिवशी घरातून कलटी मारलेली खपवून घेतळा जात नाही आमच्याकडे.

आनंदच आहे सहकुटुंब आलात तर.. मिसळपाव मेंबर्स म्हणजे एक्स्टेंडेड कुटुंबच आहे..

गवि तुम्ही कसं येणार आहात ते बोला,म्हणजे मी पण ठरवेन.

राजघराणं's picture

18 Jul 2012 - 7:16 pm | राजघराणं

नोंद केल्यास बरे होइल

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Jul 2012 - 8:01 pm | निनाद मुक्काम प...

मज्जा करा
आमच्या कडून संमेलनाला शुभेच्छा ,

गवि's picture

20 Jul 2012 - 9:23 am | गवि

जनहितार्थ धागा वर आणत आहे. श्री. रा. रा. पै. डॉ. प्रास यांनी आजपर्यंतची (प्रवर्तक वगळता) अपेक्षित यादी प्रकाशित करावी अशी विनंती करतो.

गविंनी केलेल्या विनंतीचा अव्हेर न करता आणि त्यांनी अस्मादिकांच्या नावाआधी लावलेल्या सर्व पदव्यांकडे दुर्लक्ष करून सम्मेलनासाठी उपस्थिती कळवलेल्या (आणि अपेक्षित अशा) सदस्यांची यादी, प्रवर्तक वगळता, खालील प्रमाणे -

१. रामदास काका
२. सर्वसाक्षी
३. किसन शिंदे
४. गणपा
५. देविदस्खोत
६. प्रभो
७. मुवि
८. ५० फक्त
९. गणामास्तर
१०. मोदक
११. राजघराणं
१२. मी कस्तुरी
१३. पंकज
१४. अमोल खरे
१५. पुश्कर
१६, सुहास झेले
१७. विजुभाऊ
१८. जयपाल

इच्छुकांनी आपापली नावं या यादीत जोडावी ही नम्र विनंती.

किसन शिंदे's picture

20 Jul 2012 - 10:10 am | किसन शिंदे

१९.अमोघ शिंगोर्णीकर
२०.टवाळ कार्टा
२१. गुळाचा गणपती

९. गणामास्तर येवू शकणार नाही....

आणि बॅटमॅन भाव खात आहे.

ब्याम्या...

नीलकांत's picture

20 Jul 2012 - 10:40 am | नीलकांत

नमस्कार,

या विकांताला मुंबईत आहे. त्यामुळे येण्याचा नक्की प्रयत्न करतो.

- नीलकांत

सुहास झेले's picture

20 Jul 2012 - 10:49 am | सुहास झेले

अरे व्वा सही... भेटूयात मग :) :)

नुसता जाऊ नकोस नीलकांत, एक छडी घेऊन जा.
धपाटे घालून तुझे हात दुखू नयेत म्हणून.
नावे व्य. नीतून कळवीन.
;)

मितभाषी's picture

20 Jul 2012 - 10:57 am | मितभाषी

एक अति महत्त्वाची सूचना :- जे या कट्ट्याला येण्याची शक्यता आहे त्यांनीच या धाग्यावर वरील पैकी कुठल्याही बाबतीत मत/सूचना व्यक्त करावी ही नम्र विनंती. तात्विक चर्चेसाठी सरळ दुसरा धागा काढावा.

आम्हाला यायला जमणार नाही. शुभेच्छा देवू शकतो का?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Jul 2012 - 11:58 am | विश्वनाथ मेहेंदळे

जरूर देऊ शकता की. कुठलीही चांगली गोष्ट करायला अजिबात आडकाठी नाही. त्याचे काय आहे ना, कधी कधी काही समाजकंटक सदृश घटक अनावश्यक वाद निर्माण करू शकतात, मग उगाच कटकट होते. ते टाळावे म्हणून अत्यंत नाईलाजाने हे उद्धट वाक्य लिहावे लागले. कुणाचे मन दुखावले असल्यास दिलगीर आहे.

स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद काका

स्पाकाकांनी केवळ आंतरजालिय धन्यवादावर बोळवण करू नये. विमेकाकांची बोळवण प्रत्यक्ष धन्यवाद देऊन करावी ही विनंती.

__________________________
कोण म्हणतो टॅब्ब दिला.......

मोदक's picture

20 Jul 2012 - 2:15 pm | मोदक

प्रकाटाआ

प्यारे१'s picture

20 Jul 2012 - 12:47 pm | प्यारे१

>>>समाजकंटक सदृश घटक
शब्द प्रयोग आवडण्यात आला आहे. ;)

विजुभाऊ's picture

21 Jul 2012 - 9:34 am | विजुभाऊ

अरे कुणीतरी त्या प्रभुमास्तराना किडनॅप ( मास्तर आणि किड कसे ते विचारू नये) करून आणा रे.
कुठं भटकत असतात कोण जाणे

पुन्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देण्यासाठी धागा वर आणत आहे.

ज्यांना शक्य होईल त्यांनी जरूर सम्मेलनास भेट देऊन आपली घोषणा सार्थक करावी -

मिसळपाव धर्म वाढवावा । अवघा हलकल्लोळ करावा ॥

अरेरे, मुंबईत असून सुद्धा मला कट्टयाला येणे जमणार नाही आहे... :(

बाकी कट्ट्याला शुभेच्छा..

सोत्रि's picture

21 Jul 2012 - 11:11 pm | सोत्रि

कट्ट्याला शुभेच्छा!

गवि, लाइव्ह अपडेट्ससाठी ऑनलाईन असणार आहे. नक्की अपडेट्स टाका!

- (चेन्नैस्थित असल्याने हे सम्मेलन मिस करणारा) सोकाजी :(