गँग्ज ऑफ वासेपुर

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
4 Jul 2012 - 6:40 pm

'अनुराग कश्यप डोक्यावर पडला आहे' इथपासून ते 'येवढा चित्रपट लोकांनी का नाकारला?' अशा दुसर्‍या टोकाच्या प्रतिक्रियेपर्यंतच्या गप्पा 'गँग्ज ऑफ वासेपुर' ह्या चित्रपटाबद्दल ऐकत होतो. स्वतः अनुराग कश्यप आणि ज्यांना चित्रपटातले नक्की कळते (आसे आम्हाला वाटते) अशा दोन चार समीक्षकांनी देखील वासेपुरचे कौतुक केल्याने, आता नक्की भानगड आहे तरी काय हे बघणे आलेच होते. काल मग एकदाचा हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची कथा म्हणाल तर एका वाक्यात संपणारी आहे. 'वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यास मुलगा उत्सुक'. झाली संपली कथा. खरे तर संपली नाही, अजून एक भाग यायचा आहे. ह्या चित्रपटाचे समीक्षण लिहिताना, समीक्षण म्हणण्यापेक्षा ह्या चित्रपटाविषयी तुम्हाला माहिती देताना आधी चित्रपटाबद्दल घेतले गेलेले आक्षेप आणि चित्रपटाच्या चांगल्या वाईट गोष्टींची दखल घेऊ.

सगळ्यात मोठा आक्षेप होता तो म्हणजे 'हा चित्रपट दोन भागात काढायचे कारणच काय ?'
हा आक्षेप घेणार्‍यांवरती खदखदून हसावे, का त्यांची कीव करावी हेच मला नक्की कळत नाहीये. मुळात हा चित्रपटच पाच तासाचा आहे , हे किती आक्षेप घेणार्‍यांना माहिती आहे ? ह्या चित्रपटाचे पहिले दर्शन 'Cannes Directors' Fortnight' ला करण्यात आले होते, त्यावेळी संपूर्ण लांबीचा चित्रपट दाखवण्यात आला. बॉलीवूड आणि हिंदी दर्शक ह्यांची मानसिकता लक्षात घेऊन मग तो दोन भागात प्रदर्शित करण्याचे ठरवण्यात आले.

आक्षेप २ :- चित्रपटातील किळसवाणे, अश्लीलतेकडे झुकणारे संवाद आणि हिंसा.

इथे मात्र अनुराग कश्यपला विचार करण्यास नक्की संधी आहे. सरदार खान (मनोज वाजपेयी, रामाधीर सिंह (तिग्मांशु धुलिया) किंवा अगदी एहसान कुरेशी (विपिन शर्मा) हे अडाणी, असंस्कारीत असले तरी ते ज्या प्रकारे टोळ्या सांभाळत असतात ते बघता त्यांची भाषा अक्षरशः एखाद्या देशी दारूच्या गुत्तेवाल्याच्या तोंडी शोभावी अशी देण्यात आली आहे. ते रांगड्या भाषेत जे शब्द बोलतात, तेच शब्द अगदी वेगळ्या प्रकारे ह्या आधी आपल्या कानावरती गेले आहेत, पण ते सुसह्य होते. कारण 'सूंघ के देख आज मंत्रीजी ने क्या खाया है' किंवा 'तेरी कह के लूंगा' सारखी वाक्ये आपण 'खाया पिया सबको पता चल जायेगा' , 'तुम दोनोने एक ही आयटम बजाया था' अशा बंबय्या गॅंग्जच्या भाषेत ऐकली होती. जी कधी ना कधी कानावरून गेली होती, किंवा नसली तरी असह्य वाटली नव्हती. इथे मात्र अनुरागचे गुण नक्की कमी होणार. राहिला मुद्दा हिंसेचा, तर हात मुख्य संघर्ष दाखवला आहे तो कुरेशी आणि खान ह्या दोन स्थानिकांमधला. कुरेशी जमात ही खाटीक, त्यामुळे त्यांच्याकडून दाखवलेला हिंसाचार हा अक्षरशः कसाई बकर्‍या कापतो तसाच अंगावर येणार दाखवणे गरजेचे. कुठेतरी प्राणी आणि माणसे ह्यात हे कुरेशी काहीच फरक जाणत नाहीत असे काहीसे दाखवण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल. दुसर्‍या बाजूला वर्षानुवर्षे कुरेंशीच्या आधिपत्याखाली पिचणारे खान जेव्हा स्वतःच्या ताकदीवरती विश्वास ठेवायला लागतात, तेव्हा त्याच्याकडून आलेले प्रत्युत्तर देखील त्याच ताकदीचे दाखवणे गरजेचे होते. वर्षानुवर्षाचा राग, संताप, द्वेष, अन्यायाची चीड ही त्या हल्ल्यांमधून बाहेर पडत असताना दिसायला हवीच होती.

1

हा हिंसाचार अंगावरती काटा आणतो हे नक्की, पण ह्याहून अधिक भयावह हिंसाचार आपण पाहिलेला आहे. अर्थात तो अ‍ॅटोमॅटिक रायफल्स, मशीनगन्स इत्यादींनी केलेला असल्याने आपल्या सरावाचा आहे. पण हा चित्रपट ज्या कालखंडात घडतो तो कालखंड पाहता त्या काळातल्या हत्यारांनीच हा हिंसाचार लडबडलेला असणे योग्यच नाही का ? खाटीक त्याच्या हातातल्या सुर्‍याने एखाद्याला मारेल, तेव्हा तो काय अगदी व्यवस्थित पोटात सुरा खुपसणे ह्या सारखे प्रकार करणार नाही. तो सरळ बकरा कापतो तसे खपाखप वार करणार आणि मोकळा होणार.

आक्षेप ३ :- अनुराग कश्यप डायरेक्टर म्हणून कुठेच जाणवत नाही. बिहार देखील मनात ठसत नाही.
हा आक्षेप घेणारी बहुतांश मंडळी ही 'प्रकाश झा, रामगोपाल वर्मा ' ने झपाटलेली असावीत असा मला संशय आहे. झा साहेबांनी आपल्या अनेक चित्रपटांमधून जो बिहार उभा केला, तो बिहारच आता दर्शकांची ओळख बनला आहे. बिहारचे राजकारणी, बाहुबली, तिथली घरे, पोलीस, तिथली भाषा ह्या सगळ्यांचा एक वेगळाच ठसा काही लोकांनी स्वतःवरती उमटवून घेतला आहे. मराठी माणूस म्हणजे हवालदार किंवा हीरोचा मूर्ख मित्र, किंवा गेला बाजार जोकर वाटावा असा राजकारणी अशी जी एक प्रतिमा काही काळापूर्वी बॉलीवूड मध्ये होती, तसेच काहीसे बिहारचे होत आहे. मुळात हा चित्रपट बिहारचा उत्कर्ष / अधःपतन / तिथल्या राजकारणाच्या खेळ्या, बाहुबलींचे राज्य, स्वातंत्र्याचे फायदे -तोटे हे ज्या काळात सुरू झाले, तो काळ दाखवतो हे आधी लक्षात घ्यायला हवे. ह्या चित्रपटाकडून तुम्ही एकदम मुरलेले राजकारणी, सहजपणे गळा चिरणारे आणि नामानिराळे राहणारे बाहुबली, कर्तव्यदक्ष / लाचखोर पोलीस बघण्याची अपेक्षाच करू शकत नाही. तसेच रामगोपाल वर्मा दाखवतात त्या काळातल्या गँगवॉरची आणि बिहारमधल्या चित्रपटात दाखवलेल्या काळाची तुलना देखील अशक्यच.

2

आक्षेप ४ :- मनोज वाजयेपी एकटा चित्रपटा तारून नेऊ शकत नाही. तो वगळता इतर कोणी ओळखीचे पण नाही.

ह्या आक्षेपावरती तर काय बोलावे तेच कळत नाही. अहो, हा चित्रपट आहे, प्राणिसंगहालय नाही. एका तिकिटात जंगलातले सगळे प्राणी बघता येतात, तसे तुम्हाला सगळे हीरो आणि हिरवण्या बघायच्या असतात का ? बरं ह्या चित्रपटात मोठी स्टारकास्ट घेतली असती, तर हेच लोक 'कथेत दम नाही म्हणून कलाकारांची फौज गोळा केली आहे' असे गळे काढत बसले असते. काही चित्रपट हे कथांसाठी नाही, तर सादरीकरणासाठी बघायचे असतात हे लक्षात कधी घेणार? ह्या चित्रपटात नीट लक्ष दिले तर मोठे मोठे सीन्स तुम्हाला कुठेच दिसणार नाहीत. लांब, पल्लेदार संवाद किंवा अभिनयाची जुगलबंदी इथे आणलेली देखील नाही. प्रत्येक भूमिकेला न्याय मात्र नक्की मिळालेला आहे. खरेतर ह्या चित्रपटातील सर्वच पात्रे ही एकमेकांना पूरक आहेत, आणि ह्या आधी कुठल्याही भूमिकेचा शिक्का बसलेला नसणे हीच ह्या पात्रांची खरी गरज होती. अनुरागने अतिशय चाणाक्षपणे हे हेरून नवोदितांना मोठ्या अपेक्षेने इथे संधी दिली आहे, आणि त्यांनी देखील त्याचे सोने केले आहे.

आता चित्रपटाची कथा थोडी समजावून घेऊ. ब्रिटिश अमदानीत कुख्यात डाकू सुलतान ह्याची चांगलीच दहशत असते. ह्या सुलतान डाकूचे खोटे नाव घेत त्याच्या नावाने शाहीद खान हा ब्रिटिशांच्या ट्रेन्स लुटायला लागतो आणि चित्रपटाच्या मूळ कथानकाला सुरुवात होते. ही गोष्ट कळल्यावरती पिसाळलेला सुलतान डाकू खरेतर शाहीदच्या जीवावरच उठतो पण शेवटी सामंजस्य होऊन शाहीदला गावाबाहेर हाकलले जाते. गावाबाहेर पडलेला शाहीद आता थोड्या फार संघर्षानंतर रामाधीर सिंग ह्या कोळसा खाणीतील ठेकेदाराकडे 'पैलवान' अर्थात पाळलेला गुंड म्हणून काम करायला लागतो. शाहीदचा वाढता दबदबा बघून वेळीच पुढचा धोका ओळखून रामाधीर सिंह त्याला संपवतो. इकडे शाहीदचा मुलगा सरदार खान मात्र आपल्या काका बरोबर पळून जाण्यात यशस्वी होतो आणि त्याचा जीव वाचतो. आता सूडाने पेटून उठलेला सरदार खान रामाधीरचा बदला घ्यायला निश्चय करतो. ह्या बदल्याच्या ठिणगीचे आगीत होत जाणारे रूपांतर आणि ह्या आगीत जळणारी ओली सुकी लाकडे म्हणजे 'गँग्ज ऑफ वासेपुर' हा चित्रपट.

काही चित्रपट हे कथांसाठी नाही, तर सादरीकरणासाठी बघायचे असतात असे मी वर म्हणलेच आहे. ह्या अपेक्षेत अनुराग उतरला आहे का ? म्हणले तर हो, म्हणले तर नाही. चित्रपटातला संघर्ष हा हळूहळू अनुरागने उत्तमपणे वाढवत नेलेला आहे. पण कोळशाच्या खाणींचे राजकारण, स्वातंत्र्यानंतर त्यांची बदललेली मालकी आणि ह्या पैसेवाल्या पण कोळसा खाणींचे ज्ञान नसलेल्या मालकांची धडपड, बाहुबलींचा उदय, कोळसा खाणींचा अस्त आणि त्यामुळे बदलत जाणारे समाजकारण ह्या गोष्टी आपल्यापर्यंत फक्त संवादा द्वारे पोचतात, त्यामुळे त्या म्हणाव्या तशा ठसत नाही. ह्या गोष्टी अधिक सुसंगत आणि नेमकेपणाने दाखवल्या असत्या तर चित्रपटाची रंगत अजून वाढली असती. सरदार खानच्या डोक्यातील बदल्याची आग दाखवतानाच, हा सरदार खान कसा स्त्री लंपट आहे, वेळेला मुलांवरती जीव टाकणारा आहे, वेळेला जमातीतील लोकांच्या अडचणीला उभा राहणारा आहे, हे कंगोरे दाखवत अनुराग त्याला सर्वसामान्य पातळीच्या वरती जाऊ न देण्याची जी दक्षता घेतो ती खरंच सुंदर आहे. ह्यामुळे हा संघर्ष फक्त एकट्या सरदार खानचा न उरता, एका समुदायाचा बनत जाण्यास मदत होते.

चित्रपटाचे संगीत उत्तम आहे. 'इक बगल मे चांद होगा' आणि 'वुमनीया' ही गाणी तर अप्रतिमच. वेगवेगळ्या प्रसंगांना धार आणण्यासाठी पार्श्वसंगीत आणि गाणी ह्यांचा केलेला वापर वाखाणण्याजोगा. अभिनयाच्या बाबत म्हणाल तर मनोज वाजपेयी सोडता बरेचशे चेहरे हे नवोदित आहेत. मात्र आपल्या अभिनयात ते कुठेही नवखेपणा जाणवून देत नाहीत. उत्तम प्रकारे समजून उमजून अभिनय त्यांनी केलेला आहे. सरदार खान आता बाहुबली म्हणून प्रस्थापित झालेला आहे आणि त्याच्या हाताखाली त्याची दोन तरूण मुले देखील आली आहेत. अशातच सरदार खानवरती जीवघेणा हला होतो, आणि ह्या टप्प्यावरती चित्रपट संपतो. चित्रपट एकदा तरी पाहाच असा आग्रह करणार नाही, पण 'काहीसे वेगळे' चित्रपट बघण्याची आवड असल्यास हा चित्रपट बघायला नक्की हरकत नाही.

कलासमाजजीवनमानतंत्रमौजमजाचित्रपटआस्वादसमीक्षामाध्यमवेधअनुभवमाहितीप्रश्नोत्तरेप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

नाना चेंगट's picture

4 Jul 2012 - 6:42 pm | नाना चेंगट

वाचनमात्रता सोडून लिहिता झाल्याबद्दल धन्यवाद.

बाकी प्रतिक्रिया शांतपणे धागा वाचून.... :)

मुक्त विहारि's picture

4 Jul 2012 - 7:03 pm | मुक्त विहारि

देखील उभे राहणार नाही..

गॉड-फादरचे सगळे पार्ट बघून झाले आहेत.. ("धर्मात्मा" आणि "विधाता" ही त्याची हिंदी विडंबने पण बघून झाली आहेत.)

आता परत "मार्लन ब्रँडो आणि अल पचिनो" बघावासा वाटत आहे.

कपिलमुनी's picture

4 Jul 2012 - 7:14 pm | कपिलमुनी

हे सुद्धा गॉडफादर चा अतिभ्रष्ट विडंबन आहे

मुक्त विहारि's picture

5 Jul 2012 - 4:00 am | मुक्त विहारि

मी नाही बघितला..

कदाचित , हे नांव वाचूनच गेलो नसेल..

मी हिंदी सिनेमाच्या वार्‍याला देखील उभे राहणार नाही..

बरं ठीक, मग?

मान्य आहे की बरेचसे इंग्रजी सिमेने चांगले, दर्जेदार असतात. पण त्याचा अर्थ असा नाही की बॉलीवूडचे सगळेच सिनेमे 'वार्‍यलाही उभे न रहाण्या'इतके तद्दन फालतू असतात. 'जे विकते ते पिकते' साधारण नियम आहे त्यानुसारचं बॉलीवूडचे सिनेमे बनतात.

आता बरेच ताज्या दमाचे प्रयोगशील सिनेमाकर ह्या पिढीत आहेत त्यांनी जरा काही प्रयोगात्मक केले की लगेच 'गेट वेल सून' असा छिद्रान्वेषीपणा करणार्‍यांमुळेच मग 'जे विकते ते पिकते' ह्या उक्तीप्रमाणे सिनेमे बनवले जातात आणि हिटही होतात.

असो!

- (हिन्दी चित्रपटांचा वारा प्यायलेला ) सोकाजी

सागर's picture

4 Jul 2012 - 7:05 pm | सागर

परा,

परिक्षण जाम आवडले.

सुदैवाने माझ्याकडे हा चित्रपट आहे. आज रात्रीच बघतो.

मी पण चित्रपटाबद्दल दोन्ही बाजूंनी मते ऐकली होती. पण चित्रपट बघायचाच होता.
तुझ्या सर्वंकष वेध घेणार्‍या या परिक्षणामुळे वासेपुराच्या गँगमधे रमायची इच्छा तीव्र झालेली आहे.
तवा आता हापिसातून घरला पळतो आणि चित्रपट बघतो ;)
चित्रपट पाहिल्यावर नक्की सांगेन कसा वाटला ते... अनुराग कश्यपचे चित्रपट वास्तववादी असतात असे ऐकले होते.
तसेच शूल या चित्रपटाची पटकथा त्याचीच होती व तो पाहिला असल्यामुळे गँग्स ऑफ वासेपूर कसा असेल त्याची थोडीफार कल्पना करता येते.

सखोल परिक्षणाबद्दल धन्यवाद परा

बेस्ट परीक्षण हो पराशेठ. अगदी मनातले बोललात.

आंबोळी's picture

4 Jul 2012 - 9:04 pm | आंबोळी

हा पर्‍या डोक्यावर पडलाय!
सागरराव,
पिच्चर बघुन झाला की कळवा हो कसा वाटला ते.

सोत्रि's picture

4 Jul 2012 - 9:07 pm | सोत्रि

तरी म्हटलं 'गेट वेल सून' म्हणण्याइतका अनुराग कश्यप आजारी कसा काय पडला.
पर्‍या, फोकलीच्या, जरा लवकर टाकले असतेस हे परिक्षण तर काय बिघडले असते? उगा अनुराग बद्दल नाही नाही ते विचार आले होते ना मनात.

असो, आता पुण्यात आलो की माझी HD घेउन येतो तुझ्याकडे मला खुप सिनेमे हवे आहेत.

- (अनुरागच्या 'कश्य(च्छ)पी' लागलेला) सोकाजी

बँक इन अँक्शन
हे परीक्षण आवडलं तुझ
बाकीच्यांचे रिव्ह्यूज चांगले आले होते
तुझ्या या परीक्षणामुळे नक्कीच बघेन

jaypal's picture

4 Jul 2012 - 9:15 pm | jaypal

आपुन भी ऐसाईच बोलता है क्या?
जाई मेडम को फुल टु सपोर्ट

पैसा's picture

4 Jul 2012 - 10:40 pm | पैसा

सिनेम्याची फक्त ओळखच नव्हे, तर त्यात काय चांगलं आणि काय खराब वाटू शकेल याबद्दल समतोल लिहिल्याबद्दल अभिनंदन! दोन्ही भाग एकाच वेळी मात्र पाहू शकणार नाही.

शाहिद आपल्याला भारी ठरू शकेल, या अंदाजापोटी त्याला संपवणारा रामाधीर, किरकोळ ड्रायव्हर असलेल्या सरदारला पकडून ही संपवू शकत नाही, हे काही पटत नाही. सरदारची टोळी तर कधीही फारशी खतरनाकपण वाटत नाही. ना यांच्याकडे शस्त्रं आहेत, ना खूप लोकं, ना ते कोणता मोठा जिगरबाज हल्ला करतात.अगदीच भुरटे चोर वाटावे असे दाखवले आहेत.
हाच सरदार, रामाधीरच्या, जो आता एक बलवान राजकीय पुढारी आहे, घरासमोर एकटा जाऊन त्याला हीन भाषेत धमक्या देतो (तद्दन फिल्मी प्रसंग हे चित्रपट म्हटल्यावर असायचेच, पण 'रियालिस्टिक' वगैरे चित्रपट बनवणार्या अनुरागकडून बरी अपेक्षा होती), तेव्हाही रामाधीर ढिम्म हलत नाहे, हे अनाकलनीय आहे.
सरदारचा 'ठरकीपणा' दाखवण्यात अती अती वेळ घालवला आहे.
त्याच्या धाकट्या सुपुत्राचे "स्पूफ" छाप उपकथानक अगदीच अप्रस्तुत वाटते. (यात परत आजोबांच्या खुन्याला याच्याच हातून मृत्यू, इत्यादि मनमोहन देसाई छाप योगायोग उगाच घुसवला आहे.)

सुहास झेले's picture

5 Jul 2012 - 1:11 am | सुहास झेले

ब्येस रे... अगदी अप्रतिम लिवलं आहेस. ह्या चित्रपटाचे परीक्षण लिहून, एकदम ब्येस काम केलंस बघ :) :)

एका हिंदी ब्लॉगवर याबद्दलचे एक अल्टिमेट परीक्षण वाचले होते, त्यातला थोडा भाग इथे द्तो.

ब्लॉगची लिंक - http://wp.me/pv36D-2nk

जनाब, ये एक सच्ची कहानी पर आधारित है. फिल्म में कोई हीरो नहीं है. मतलब, conventional defintion वाला तो कतई नहीं. सरदार खान निहायती कमीना, शातिर, ठरकी और एक हत्यारा है. राह-चलते आदमी को जो चाक़ू गोद-गोद के मारने में हिचकी नहीं लेता उससे आपको बहुत sympathy तो नहीं होनी चाहिए.

अगर आप ऐसे इंसान को ढूंढ रहे हैं जो किसी महिला की इज्ज़त लुटने से बचाता है, या किसी गाँव को डाकुओं के आतंक से या फिर जिसकी बहन की हत्या हो गयी है और ऐसी ज़बरदस्ती थोपी हुई sympathy आपको चाहिए तो साहब ये गलत फिल्म है आपके लिए. यहाँ कहानीकार आपको ज़बरदस्ती कुछ “feel” करवाने की कोशिश नहीं कर रहा है. ये वो manipulative सिनेमा नहीं है जहाँ हीरो के आंसू निकलते ही पीछे से १०० violin मेघ-मल्हार बजाने लगते हैं और आपकी रुलाई फूट पड़ती है. वो काम आजकल के prime-time TV shows बेहतर कर लेते हैं.

इसे एक new-wave कह लीजिये या फिर सालों से चली आ रही इस तरह की फिल्मों का mainstream हो जाना कह लीजिये कि आज की हर फिल्म आपको manipulate नहीं करती बल्कि काफी कुछ आपकी judgment पर छोडती हैं और वासेपुर इस मामले में मील का पत्थर साबित होगी. आज से कई साल बाद तक इसका नाम याद रखा जायेगा जिसने सही मायने में unconventional और conventional के बीच की रेखा को पूरी तरह मिटा दिया.

वासेपुर भारत की underbelly को दर्शाता एक दर्पण है जिसमें हम झांकते हैं और हमें गंदगी दिखाई देती है. हमें दिखाई देते हैं रेलगाड़ियों का पाखाना साफ़ करते हुए छोटे बच्चे और एक ऐसा नर्क जहाँ इंसान की जान की कीमत कोयले से कम और कौड़ियों के भाव है. शायद इसलिए हम इसे देखकर या तो हँसते हैं या घिनौना समझ कर नज़रंदाज़ करने की कोशिश करते हैं.

ये कहानी बड़े शहरों को जोड़ते हुए किसी चौड़े highway की नहीं है, बल्कि उस highway से उतर के पांच मील अन्दर, इधर-धर दौड़ती हुई पगडंडियों और टूटी सड़कों की कहानी है. Problem आपको तब होगी जब आप highway पर अपनी air-conditioned कार में बैठे हुए ही अन्दर की तरफ देखेंगे.

थोडा सा धूप में बाहर निकलिए और अन्दर जाकर देखिये..

क्योंकि ये भी ज़रूरी है.

:) :) :) :)

एकंदरीतच गोग्गोड प्रकारचा शिनेमा नसल्याने पहायचा नव्हताच पण भावाने त्याच्या घरी लावला असताना गेले आणि अंधारात मारामारी किंवा कोळशाने माखलेले चेहरे असं पाहिल्यावर पाच मिनिटात उत्साह संपला.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Jul 2012 - 11:36 am | मिसळलेला काव्यप्रेमी

आधी गवि अन आता पराण्णा... चंगळ आहे राव आज आमची.. :)
मस्त परिक्षण, आता पहायलाच हवा..

चित्रगुप्त's picture

5 Jul 2012 - 11:50 am | चित्रगुप्त

या सिनेमाचे 'गॅग्स ऑफ न्यूयॉर्क' शी साम्य आहे का काही? असल्यास काय?

मृत्युन्जय's picture

5 Jul 2012 - 11:54 am | मृत्युन्जय

कालच तुझ्या ब्लॉगवर वाचले होते परीक्षण. छानच लिहिले आहेस. तरीही मी हा चित्रपट बघणार नाही.

माझीही शॅम्पेन's picture

5 Jul 2012 - 1:07 pm | माझीही शॅम्पेन

पुन्हा तेच सान्गतो !

झक मारली आणि हा चित्रपट पाहिला

चित्रपटात खूप काही चांगल्या गोष्टी असून अतिशय दर्जा-हीन चित्रपट पाहिल्या सारख वाटल

त्या अनुराग ला धरून एकदा तुडवावा हि मनोकामना आहे :(

शिल्पा ब's picture

5 Jul 2012 - 1:39 pm | शिल्पा ब

हं..
ते कापाकापी वगैरे वाचुन त्या रात्री पाउस होता ची आठवण आली. यात फक्त रुपक वगैरे दाखवुन काम केलंय..पण परीणाम तोच. अर्थात या दोन सिनेमात प्रचंड अंतर आहे ही गोष्ट वेगळी.

स्वाती दिनेश's picture

5 Jul 2012 - 2:04 pm | स्वाती दिनेश

परीक्षण संतुलित!
चित्रपट पाहिन म्हणते..(मोकळा वेळ भरपूर असेल तेव्हा)
स्वाती

कालच हा चित्रपट पाहीला. अतिशय आवडला. चित्रपट पहात नाही पण असे (भरभक्कम व्यक्तीचित्रण व सुरेख अभिनय) असणारे चित्रपट जरुर पहाते. मनोज बाजपेयीच्या पहील्या बायकोचे पात्र लक्षणीय उतरले आहे. फार आवडला सिनेमा.

दोन्ही गँग्ज ऑफ वासेपुर आवडले.