करण आणि फ्रेण्ड्स ... भाग २१-२३

विनीत संखे's picture
विनीत संखे in जनातलं, मनातलं
19 Aug 2011 - 7:11 pm

मागेल भाग ..... http://www.misalpav.com/node/18887

भाग एकवीस

"नं. फिफ्टी सेवेन. करण रूपवते."

"प्रेझेण्ट मॅम!", करणने कसंतरी म्हटलं अन तो पुन्हा बेंचवर डोकं टाकून पडून राहिला. आज आपण शाळेत आल्याचे करणलाच खुद्द अप्रूप वाटत होते.

त्यादिवशी रात्रीच करणला शुद्ध आली. आई आणि समीर त्याला हवं नको ते बघत होते. दोन दिवस आई सुट़्टी घेऊन घरी राहली होती. पण कालचा पूर्ण दिवस विषादाच गेला. करणचं आई समीरशी घरी नीट बोलणं होत नव्हतं. मग आज त्यानेच शाळेत जायचं म्हटलं. घरी बसून त्या सुतकी वातावरणात करणचं मन गुदमरून जात होतं. आई अन समीरला फेस करावेसे त्याला वाटत नव्हते. त्यांच्या वरचा करणचा राग आता अविश्वासात बदललेला होता. समीरनं दिलेला ओरडा, आईला पाठवलेल्या एसेमेस चा गोंधळ, मेनकावरचा हल्ला हे सगळंच डिप्रेसिंग होतं. शेवटी आज सकाळी टिव्हीवर मेनकाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे अन तिचा ब्लडप्रेशर आणि हार्टबीट्सचा रीस्पॉन्स रेग्युलर झाल्याचे दाखवण्यात आले अन करणला त्यातल्या त्यात हायसे वाटले. मेनका अजून शुद्धीवर आली नव्हती. त्यामुळे घरी बसून अजून पाठपुरावा करण्यासारखं काहीच नव्हतं. थोडा विरंगुळा म्हणून शाळाच बरी वाटत होती.

"करण! अरे थकलेला दिसतोयस!", पूजाने करणला विचारलं. हा भट़्टाचार्य मिसचा क्लास म्हणून पाठी बसून नीट बोलता येत होतं.

"अं!", करण बावरला.

आपला ईमोशनल ब्रेकडाऊन होता होता राहिलाय हे करणलाच स्वतःलाच पचवण्यास जड जात होते. सॅवियोलाही करणचे दोन दिवस अनुपस्थितीत राहण्याचे कारण माहित नव्हते. करणने ह्याविषयी स्वतःहून कुणालाच काही सांगितले नव्हते. तसंही सांगून काहीच ऊपयोग नव्हता. हे सगळं लपवण्याशिवाय किंवा त्याबद्दल खोटं बोलण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
"मी ठिक आहे....", करणने डॊकं पुस्तकात घालत म्हटलं.

करण असा थोडा गोंधळलेला पाहून पूजाने सॅवियोकडे पाहिलं. सॅवियोने खांदे उडवले. मेनकावर होणाऱ्या खुनी हल्ल्याच्या धमकीचा पत्ताही पूजाला नव्हता. पुन्हा त्या दिवशी पोलिस स्टेशनातून घरी गेल्यावर दुसऱ्यांदा पडलेले धपाटे सॅवियो अजूनही विसरला नव्हता. करणलाही सॉलिड ओरडा पडला असेल हे सॅवियोने अंदाजात काढलं होतं. म्हणून मग तोही मूग गिळून राहिला होता.
"मला माहितीये मेनकावर हल्ला झालाय, म्हणून तू चिंतीत असशील", पूजाने म्हटले, "बट शी बी ऑलराइट! शी विल गेट वेल सून."
"या आय होप सो", करणने मोजकेच शब्द म्हटले.
"काल गौतम अंकलचा फोन आलेला.", पूजाने माहिती पुरवली तसं करण अन सॅवियो पूजाकडे पाहू लागले.
गौतम अंकलचा उल्लेख ऎकून करणला आठवली ती साधी भोळी कॉलेजगर्ल मेनका, गौतम अंकलना शोभून दिसणारी मेनका, फोटोंमध्ये निरागसतेचं मूर्तिमंत प्रतीक मेनका... करण पुन्हा गदगदीत झाला.
"काय म्हणाले", करणने पुढे विचारलं.
"त्यांचं टिक्कूजीशी फोनवर बोलणं झालं. तिच्यावर हल्ला कसा झाला ते कळलं..."
"काय?", करण चमकला.
"हो", पूजाने म्हटले, "टिक्कूजीही मेनकासोबत होते तेव्हा."
"त्यांनी पाहिलं मेनकाच्या हल्लेखोराला? कोण होता तो?", करणने पूजाला अधीरतेने विचारले.

"त्यांनी तसं काही जास्त पाहिलं नाही. एवढंच सांगितलं की सकाळच्या त्या एमटिव्हीच्या शूटींगवरून मेनका तिच्या पाली हिलच्या बंगल्यावर गेली. तिथे दुपारी विश्रांती घेतल्यावर संध्याकाळी ‘इधर उधर’ च्या म्युझिक रीलीजला पवईत रीनिसॉंमध्ये जायचं होतं. तेव्हा टिक्कूजी, मेनका आणि त्यांचा ड्रायव्हर तिच्या गाडीतून येत होते. मेनकाला स्वतः गाडी चालवायला आवडते म्हणून तीच गाडी चालवत होती. पवई लेककडे एका निर्जन रस्त्यावर गाडीत बिघाड झाला. म्हणून मग टिक्कूजीनी उतरून पाहिलं. गाडीचं इंजिन तपासताना कळलं की गाडीत पाणीच नाही. ड्रायव्हर पाणी आणायला गेला असता अचानक कुणीतरी पाठून आलं आणि त्यांनी बाहेर उतरलेल्या टिक्कूजींच्या डोक्यात काहीतरी हाणलं. टिक्कूजींना ग्लानी आली. थोडावेळ त्यांना मेनकाची किंकाळी अन एका पुरूषाचा आवाज ऎकू आला होता. तो पुरूष तिला शिव्या देत असावा. पण भोवळ आल्याने टिक्कूजी काहीच करू शकले नाहीत... मोमेण्टरीली कॉन्शस गेन केल्यावर जेव्हा टिक्कूजींनी मेनकाला पाहिलं तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसली… तिचा गळा चिरलेला होता...", पूजा हे सांगतानाच अस्वस्थ झाली, "... तोच हे सगळं घडत असताना पाणी आणणाऱ्या ड्रायव्हरने दुरूनच एका माणसाला गाडीपासून दूर पळताना पाहिले. तो इसम सहा फुटाचा असावा. अंगाने स्लीम होता. काळा क्र्यू नेक टीशर्ट आणि खाकी कार्गो पॅन्ट घातलेली होती. चेहेऱ्यावर मास्क होता."
हे ऎकून शेवटच्या बेंचर शुकशुकाट पसरला.

"आय थॉट तुला कळलेलं बरं.", पूजाने करणला म्हटले, "यू मस्ट बी स्सो वर्रीड अबाऊट हर."
"म्हणजे हेल्लेखोर एक सहा फुटाचा पुरूष होता?", करण विचारात पडला.
"हो असंच म्हणाले ते.", पूजा म्हणाली.
"पण ब्लॅकवल्चर तर माझ्या वयाचा असेल.", करणने ताडले.
"ब्लॅकवल्चर!", पूजा प्रश्नांकित झाली, "तुला म्हणायचंय की ब्लॅकवल्चरने हे केलेय?"
"हो... कारण धमकी त्यानेच दिलेली.", सॅवियो अनवधानाने बोलून गेला... करणचे वटारलेले डॊळे व्यर्थ गेले.
"धमकी कसली धमकी?", पूजा साशंकित झाली. करण आणि सॅवियो अपराधीपणे गप्प बसले.
"आर यू गाइज नॉट टेलिंग मी समथिंग?", पूजाने भुवया उंचावल्या.
आता जास्त लपवून उपयोग नव्हता. म्हणून करणने परवाची फुलांच्या बुके पासून पोलिसांपर्यंतची सगळी कथा तिला कथन केली. पण त्यानंतर त्याच्या घरी काय काय घडले आणि ‘बि’घडले ते सोडून.
"ओह माय गॉड म्हणजे त्यानेच मेनकावर हल्ला केला?", पूजाने स्वाभाविक शंका उपस्थित केली.
"असेलही. पण जर तो वयाने मोठा पुरूष होता तर मग तो ब्लॅकवल्चर असणं शक्यच नाही.", करणने पुढे आपले मत जोडले.
"बट ही कुड बी सम कॉन्ट्रॅक्टेड किलर. ब्लॅकवल्चरने दुसऱ्या कुणाला सुपारी दिली असेल तर?", सॅवियोने अंदाज बांधला.
"बट मेनका इज सच अ ह्युज स्टार! तिच्या खुनाची सुपारी देणारा तितकाच मालदार किंवा पॉवरफुल हवा.", पूजाने योग्य पॉइंट मांडला.
"मग तो कुणीतरी श्रीमंत घराण्यात दिला असेल किंवा त्याचे माफियाशी संबंध असतील...", सॅवियोने आत्तापर्यंत चाललेल्या मुद्देसूद संभाषणात स्वतःचे मत जाहीर केले, "पण हा ब्लॅक्वल्चर आता लपून बसलेला असणार... ही प्रॉबॅबली वोन्ट रीटॅलियेट अनटील मेनका गेट्स वेल!"
"ह्ंम्मं.. पण पुढे आणखी काही वाईट होणार त्याधीच आपण त्याला शोधायला हवं."
"कसं पण?"

थोडावेळ तिघे विचार करत बसले. शक्यता मनातल्या मनात मांडल्या, फेटाळल्या जात होत्या. त्यात ‘ब्लॅकवल्चर’ की ‘आणखीच कुणीतरी’ हा मूळ मुद्दा तसाच राहिला. शेवटी काही क्ल्यू लागेपर्यंत भट़्टाचार्य मिसचं लेक्चर संपलं अन मिश्रा सर आले.
मिश्रा सरांनी "सरला की कहानी" हा अध्याय सर्वांना वाचायला सांगितला. थोड्यावेळाने त्यांची प्रश्नोत्तरं सुरू झाली. पाठी बसून लुडबूड करणाऱ्या सॅवियोलाच मिश्रा सरांनी प्रथम उठवले.
"सॅवियोमहाशय क्रिपया आप बताएं की सरला किस तरहसे अपने सखी विमलाके साथ बातें करती थी?"
सॅवियो चुकचुकत उभा राहिला. कधीही प्रत्यक्षात न पाहिलेल्या ब्लॅकवल्चरचं एक भयानक विलेनस कार्टून काढण्यात तो गुंतलेला होता पण त्याने प्रसंगावधान राखून उत्तर दिले, "सर मेल से?"
"क्रिपया हिंदी शब्दप्रयोग किजीये...", मिश्रा सरांनी हलकाच दम दिला.
"लेटर भेजके.", सॅवियोने सोपं करून सांगितलं.
"लेटर या फिर मेल भेजने के तरीकेको हिंदी में क्या कहते है?"
"पोस्ट?", सॅवियोने नवा पर्याय मांडला तसे मिश्रा सर संतापले.
"ईमेल!", सॅवियोने ओरडून म्हटले तसे मिश्रा सराचं डोकंच सणकलं.

पण त्या उत्तराने करण चमकला कारण ब्लॅकवल्चरचा पाठपुरावा करायचा ईमेल हाच एक मार्ग दिसत होता. साऱ्या प्रसंगात तो कॉम्प्युटरवर सेव्ह करून ठेवलेल्या ब्लॅकवल्चरच्या ईमेल आणि आय.पी. विषयी विसरलाच होता.
इथे रागवलेले मिश्रा सर, "इतना सीधा उत्तर तुम्हे नहीं आता है अंग्रेज की औलाद!", असे सॅवियोला ओरडले. मिश्रा सरांनी दिलेली ही शिवी एवढी वाईट नव्हती म्हणून सॅवियोने माईण्ड केले नाही. रागात मग त्यांनी त्यांच्या हिंदीविशारद शिष्याला, कुणाल चॅटर्जीला उभे केले.

"कुणाल महोदय आप बताएं।"

"सर, सरला अपनी सखी विमला से पत्रव्यवहार द्वारा अपने क्षेमकुशलताकी बातें करती थी ।"
हे उत्तर दूरान्वयानेही सॅवियोला येणं शक्य नव्हतं. कारण मनातल्या मनात तो स्पीड पोस्ट, कुरीयर इतकंच काय एसेमेसचे ऑप्शन पण बोललेला होता पण ’पत्रव्यवहार’ हा एवढा कठीण शब्द सुचण्याचा चांसच नव्हता.
"सॅवियो महोदय आप इस उत्तर को अपने कापिमें पचास बार लिखें और ‘पत्रव्यवहार’ इस शब्दका बीस अलग अलग वाक्योंमें प्रयोग किजीये यही आपकी सजा है।".

आजचं होमवर्क पनिशमेन्ट दुसऱ्याच लेक्चरने सुरू झाल्याचं पाहून सॅवियो हिरमुसला आणि उरलेल्या वेळात त्याने ब्लॅकवल्चरच्या काढलेल्या कार्टूनमध्ये बदल करवून तिथे मिश्रा सरांचं नाव लिहिलं. मधल्या सुट़्टीत करणने पूजा अन सॅवियोला ईमेलविषयी सांगितलं.
पूजा एक्साईट झाली, "ओह! दॅट्स ग्रेट! माझा कजिन सिस्कोमध्ये नेटवर्कसिक्युरिटीमध्ये सिनियर टेक्निकल ऍनालिस्ट आहे. त्याला आय.पी. आणि ईमेल ट्रेसिंग विषयी काहीतरी माहित असेल. मी त्याच्याशी बोलून बघते. मला तो ईमेल ऍड्रेस्स आणि आय.पी. फॉर्वर्ड कर आज."
पूजाच्या ह्या युक्तीवर करणचा विश्वास बसत नव्हता. हे म्हणजे सुंठाविना खोकला गेलेला वाटत होता. ईमेल ट्रेसिंगचा हा नवा मार्ग करणला उत्साहित करून गेला. संध्याकाळी घरी परतताना सकाळपेक्षा थोडी जास्त उर्मी होती. करण घरी पोहोचला तसं दाराबाहेर कुणाचेतरी ब्राऊन लेदर शूज दिसत होते. कोण गेस्ट आलाय ह्या प्रश्नात करणने बेल वाजवली तसं समीरनं दार उघडलं. दिवाणखान्यात सोफ्यावर कुणीतरी पोलिसी वेशात बसलेलं होतं. करणने कोण ते ओळखलं नाही. करणला बघताच तो पोलिस इन्सपेक्टर ऊभा राहिला. त्याने कॅप काढली. करणने ओळखले.

"इन्स्प. विवेक काळे!"

आज त्यांच्या चेहेऱ्यावर त्याखेपेसारखा तुसडेपणा नव्हता. तो आज करणच्या चेहेऱ्यावर आलेला होता.
"इन्स्प. काळे मेनकावर झालेल्या हल्ल्याविषयी विचारायला आलेत.", समीरने करणला म्हटले, "आम्ही आधीच तो बुके आणि ते कार्ड इन्स्प.ना देऊन टाकलंय. त्यांना तुझ्याकडे आणखी काही माहिती आहे का ते विचारयाचंय."
"का?", करणने चिडून म्हटले, "मी तर फेम वल्चर आहे ना. फेक एक्स्टॉर्शन करणारा एक प्रॅन्कस्टर मोरॉन आहे. माझ्याकडची माहिती सगळी खोटीच असणार. ती कशाला हवी ह्यांना?"

करणने म्हटलेले शब्द उद्धटासारखे होते पण त्याचा राग स्वाभाविक होता.

"हे बघ करण ... ", समीर काही बोलणार तोच इन्स्प.नी त्याला थांबवलं.
"लूक करण", इन्स्प. म्हणाले, "मी तुझी अस्वस्थता जाणतो. माझ्याकडनं चूक झाली ते मी कबूल करतो ऍण्ड आय ऍम सॉरी." इन्स्प. काळे नम्र आवाजात म्हणाले, "पण खरंच मेनकावर हल्ला खरेच होणारेय ह्याचा जर परिस्थितीजन्य पुरावा तुझ्याकडे असता तर मी लगेच ऍक्शन घेतली असती. अनफॉर्च्युनेटली तुझ्याकडचे सगळे एविडन्सेस अपूर्ण होते. सरळ मेनकाशी जोडणारे नव्हते आणि जेव्हा मला कळलं की तू मेनकाचा एवढा डाय हार्ड फॅन आहेस तेव्हा मला वाटलं की तिच्याशी एकदा भेट झाल्यावर वाटणारं आपलेपण अजून वाढावं म्हणून तू ही प्रॅन्क खेळत असशील. शिवाय मेनकाकडून आम्हाला या आधी कधीच पुलिस प्रोटेक्शन साठी विचारणा झालेली नाहीय. म्हणून तुझ्यावर प्रॅन्क्स्टर होण्याचा माझा संशय आणखीनच बळावला. बट आय वॉज रॉन्ग! त्याचीच माफी मी मागतो आणि आता जेव्हा खरंच मेनकावर हल्ला झालाय तेव्हा त्याच्या तपासात तुझं सहकार्य मिळेल हे मी एक्स्पेक्ट करतो. शेवटी मेनकाच्या जीवाचा प्रश्न आहे हा. मी पोलिस म्हणून अन तू तिचा फॅन ... नो... जेन्युईन फॅन ... म्हणून एकमेकांना मदत करायला हवी. नाही का? "

एरव्ही करणचं उत्तर नकारार्थी असतं पण इथे त्याला जाणवलं की एमोशनल फूल होऊन काहीच साध्य होणार नव्हतं. पोलिसांना मदत करून ब्लॅकवल्चरला गाठणं सोपं होईल हे त्याने ताडलं आणि मुळूमुळू इन्स्प. काळेंना होकार दर्शवला. इथे आई आणि समीर, मेनकाहल्ल्याच्या ह्या पोलिसी इन्वेस्टिगेशनमध्ये करणच्या खास सहभागाने थोडे चिंतीत झालेच. पण इन्स्प. च्या समोर करणला थांबवणं पोलिसांना खटकलं असतं अन करणला तर आणखीच दुखावून गेलं असतं. म्हणून मग समीर आणि आई गप्प बसले. त्यांच्यासाठी तो दिवस कसासाच गेला.

********************

भाग बावीस

दुसऱ्या दिवशीही परिस्थितीत विशेष बदल नव्हता. मेनकावरचा हल्ला कुठल्यातरी वेड्याने केल्याच्या बातम्या टिव्हीवर आज प्रकाशित होत होत्या. कारण त्याच दिवशी पवईपासूनच जवळ हिरानंदानी आणि साकीनाका रोडवर एका अज्ञात गुंडाने दोन लोकांवर हल्ला केल्याची बातमी आली होती. फरक एवढाच की तो लुटण्याच्या इराद्याने होता. पण ह्या सर्वांवर कहर म्हणजे दुसरी एक अफवा न्यूज वर फिरत होती आणि ती म्हणजे मेनकाने स्वतः पब्लिसिटी मिळवण्यासाठी केलेला स्टण्ट. एवढा भीषण हल्ला भासवूनही मेनका त्यातून वाचली होती आणि अफवादारांच्या मते गळा कापणाऱ्याने अगदी प्रोफेशनल रीत्या तिचा गळा जरा जास्त नाही की कमी नाही असा कापला होता ...

… सिक्क!’

ह्या सगळ्या गडबडीने करण अस्वस्थ होता. वेड्याने केलेला हल्ला असो वा मेनकावर तिच्या स्वतःवरच्या हल्ल्याची योजना केल्याचे आरोप असोत हे सगळं बिनबुडाचं होतं कारण ब्लॅकवल्चरविषयी मिडीयाला काहीच ठाऊक नव्हतं. करणला मिडीयाला ब्लॅकवल्चरविषयी सांगावेसे वाटले होते पण आधीच इन्स्प. काळेंनी त्याला सर्व माहिती गुप्त ठेवायची ताकिद दिली होती. शिवाय मिडीयावर बातमी आल्यास ब्लॅकवल्चर आणखीनच सावध होईल हे करण जाणून होता. म्हणून तसं करणं शक्य नव्हतं.

आज जेवण एकत्र होतं. संध्याकाळच्या जेवणाचाही मूड नव्हता. करण त्याच्या रूममध्ये जाऊन जेवायचं म्हणत होता पण आईने रीक्वेस्ट केली म्हणून डायनिंग टेबलावर थांबला. आज करणची आवडती फिश करी होती. पण करण काही खास खात नव्हता.
"करण हे घे. आणखी हवीय आमटी?", आईने पृच्छा केली तसं करणने ताटातला घास इकडचा तिकडे करत ‘नाही’ म्हटलं.
"मग स्कूल काय म्हणतंय?", समीरने कोंडी फोडायचा प्रयास केला, “म्हणजे दोन तीन दिवस मिस्स झालं म्हणून विचारतोय."
"फाईन.", करणने भाताशी खेळत म्हटले, "आज गेल्या क्लास टेस्ट्चे मार्क्स मिळाले. मला १९ आहेत. आऊट ऑफ २५."
कुणी काहीच बोल्लं नाही. करणचा स्कोर एरवी २३ च्या खाली कधीच नव्हता. कुणी काही बोलत नाहीये हे पाहिल्यावर करणलाच कसेसे झाले.
"गुड!", आई म्हणाली. १९ मार्क्स ना गुड! हे करणच्या दृष्टीने थोडा चकितच करणारं होतं.
"हह्ह!", करणने उपरोध केला, "सोलंकी मॅमतर ओरडल्या. म्हणाल्या मी इररीस्पॉन्सिबल झालोय … आणि तुम्ही म्हणताय गुड!... तुम्हाला काय वाटतं की मला कळत नाही? एरवी ओरडालात असता तुम्ही. १९ आऊट २५. ‘दॅट्स रीडीक्युलस!’ म्हणाला असतात… यू गाईझ नो धिस इज माय लोएस्ट स्कोर… आय थॉट यू वुड थ्रॅश मी.", करणने असे म्हणताच समीरने आईकडे पाहिले. आईने आता मूकपणे खाली बघत घास घेतला.
"ज्या परिस्थितीत तुला एवढे मार्क्स मिळालेत त्या परिस्थितीत ते बरे आहेत.", समीरनेही थोडक्यात आईच्या बोलण्याला दुजोरा दिला. खरं तर खोटं बोलणं भाग होतं. निदान पुढच्या एका आठवड्य़ापर्यंत तरी करणशी कुठलंही नवं भांडण समीरला पकडायचं नव्हतं.
"यू आर लाइंग.", करणने दोघांना उद्देशून म्हटले, "जेव्हा खरं काय ते समोर आलं तेव्हा तुम्हाला वाटलं असेल तुम्ही माझ्याशी जास्त स्ट्रिक्ट वागलाय म्हणून .... माझा मूड ठिक व्हावा म्हणून १९ मार्क्स पण चांगले वाटतायत तुम्हाला आज ... म्हणूनच ही फिश करी आज केली असेल आईने... ऍज अ ब्राईब!", करणने असे म्हटले तसा समीर इरिटेट झाला. आईने मात्र शांतपणे जेवण संपवले अन भांडी उचलली. करणनेही मग ताट सोडलं आणि तो अर्ध्यावरच उठला.

"आम्ही आज मनोहर मामांशी बोल्लो ...", समीरने वेगळाच संवाद सुरू केला, "तुझ्याबद्दल विचारत होते."
करण गडबडला. समीरने करणचं ताट थोडं खुर्चीकडे सरकवलं. करणला मनातल्या मनात थोडं वाईट वाटलं. मनोहर मामांची तब्येत आपण एवढे दिवस विचारली नाही हे करणला बोचलं. तो वळला आणि पुन्हा जागेवर येऊन बसला.
"ह्या वीकएंडना यायचं सांगत होतो आम्ही पण कुसुममामी म्हणाली पुढच्या वेळी भेटलेलं बरं. कुसुममामीचा भाऊ भूपेश पण आलाय दिल्लीवरून तिथे. तो बघतोय सगळं. म्हणून मग पुढच्या शनिवारी जाऊ....", असं म्हणून समीरने ग्लासातलं ऊरलेलं पाणी संपवलं, "मी म्हटलं करणला विचारून बघतो.... इज इट ओके फॉर यू?"
करण होकारार्थी मान डॊलावली आणि आत्मलज्जेखातर ताटावरून उठण्याआधी त्यातले दोन घास संपवलेच. त्यातच दिवस संपला.

नवा दिवस उजाडला. मेनका अजूनही बेशुद्धच होती पण प्रोग्रेस चांगला होता. टिव्हीवरची न्य़ूज-लाईमलाईट "बूम" चॅनलच्या एका पार्टीत बराच लो नेक अन रीव्हिलिंग आऊटफीट घालून आलेल्या मालविकाने व्यापलेली होती. त्यामुळे तिथेही मेनकाच्या हल्ल्याविषयीच्या अफवांना चांगलीच विश्रांती मिळाली होती. करण आज चांगल्या मूडमध्ये होता.

"मी माझ्या कझिनला, जयराजदादाला तुझा ईमेल फॉर्वर्ड केला.", पूजा करण अन सॅवियोला सांगत होती. अर्थातच हा भट़्टाचार्य मिसचा क्लास होता.
"मग कधी मिळणार त्याच्या कडून रीपोर्ट?", करणने अधीरतेने म्हटले.
"तो म्हणाला की दोन तीन दिवस जातील. ह्या वीकेंडला कळेल.", पूजाने म्हटले.
"त्याला काही सांगितलं नाहीस ना? म्हणजे कुणाच ईमेल आहे वगैरे?"
"नाही.", पूजाने सांगितलं, "मी ‘मला फेसबुकवर सतावणारा मुलगा’ आहे एवढंच त्याला सांगितलं. जयराजदादा तर चिडलाच. म्हणाला ‘बघतोच त्याला!’”.
"स्निकी!", सॅवियोने कॉम्प्लिमेन्ट दिली तसं करणही हसला. पूजाच्या ह्या युक्तीने जयराजच्या हातून लवकर काम होईल असं दिसत होतं.
"तसं तो म्हणतो त्याच्या ट्रेसिबिलिटी सॉफ्टवेयने ईमेल्स, सर्व्हर चॅट, पीटूपी फाईल्स यांचा सोर्स कळू शकतो. म्हणजे ते कुठून येतात ते कळते. फक्त स्पूफ्ड असतील किंवा वायरसेस आय.पी.वरचे असतील तर कठीण आहे."
"स्पूफ्ड?", सॅवियोने विचारले
"हो. तो म्हणाला की आपल्याला जे जंक मेल्स येतात ना ते सगळे स्पूफ्ड असतात. त्यांचा सोर्स नीट ट्रेस होत नाही. तिथे दुसऱ्यांच्या मेल आय.डी.चा, आय.पी.चा किंवा फेक प्रोफाईलचा सर्रास वापर केला जातो. पण एक गोष्ट आहे की खऱ्या ईमेलची ऑथेंटीसिटी आणि स्पूफ्ड आय.पी. ची चालबाजी काही सॉफ्टवेयरना कळते जसंकी ‘ट्रेसिबिलीटी’ला. फक्त स्पूफ्ड असेल तर नक्की ईमेल कुठून आलाय तेवढं कळणं मात्र मुश्किल होत जातं."
ते ऎकताच करणचा थोडा मूडऑफ झालाच. ब्लॅकवल्चर आपल्या खऱ्या ईमेलचा वापर करण्याएवढा गाफिल असेल तरच मार्ग दिसत होता. त्यामुळे इथे प्रे करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
“आय होप स्पूफ्ड नसेल…”, करण प्रे करत म्हणाला.
"आता तो ईमेल कसा स्पूफ्ड निघेल. तो तू स्वतःच पाठवलाय ना पूजाला.", सॅवियोने त्रस्त चेहेऱ्याने म्हटले.
"मी ब्लॅकवल्चरच्या ईमेलविषयी म्हणतोय डम्बो ... माझ्या ईमेलविषयी नाही.", करणने डोळे फिरवत म्हटले.
"ओह! ... सॉरी", सॅवियो ओशाळला.
"स्पूफ्ड असेल तर बॅडलक!", पूजा म्हणाली.

शाळा संपली आणि करण घरी परतला. पण वाट बघत ते दोन दिवस त्याच्यासाठी मिनिटामिनिटाने मोजले गेले...

... आई समीरसाठी मात्र प्रत्येक क्षण जणू सारं आयुष्य व्यापत होता

…. कारण पुढचा शनिवार फक्त सात दिवसांवर आला होता.

********************

भाग तेवीस

दोन दिवस कसेबसे गेले. आज जयराजकडून रीपोर्ट यायचा होता. ब्लॅकवल्चरचा ईमेल स्पूफ्ड निघू नये म्हणून करणने मनातल्या मनात देवाकडे केवढ्या प्रार्थना केल्या असाव्यात. साहाजिकच रीपोर्ट प्रथम येणार होता पूजाच्या घरी. त्यामुळे तिथे जमायचं होतं. या आधी करण एकदाच पूजाच्या घरी गेला होता. तिच्या बर्थडे पार्टीच्या वेळी. पण तेव्हा शाळेतले इतर मित्र मैत्रिणही हजर होते. आजचा बेत मात्र फक्त त्याचा एकट्याचा होता. सॅवियोने ऎनवेळी टांग दिली. एकाच दिवशी झालेला नियर किलर एन्काऊण्टर आणि रॉबरी एक्स्पिरीयन्समुळे आजकल सॅवियो दर वीकेंड चर्चला जाऊ लागला होता. शनिवार रविवारचं टिव्हीवरचं इएसपिएन सोडून पुस्तकातलं बायबल वाचू लागला होता. अर्थातच ते करायला त्याला सारी दुपार लागायची. तसं बायबल वरवर फटाफट संपवून यायचा चांस होता. पण मम्मी डॅडीनी क्रिस्टललाच वॉचमनचं काम सोपवलं होतं. ह्या साऱ्या कारणांमुळे त्याची येण्याची शक्यता आज कमी होती. करण निघण्याच्या तयारीत होता तोच दारावर बेल वाजली. दिवाणखान्यात बसलेल्या समीरने दार उघडले. हे इन्स्प. काळे होते.

"हॅलो इन्स्प. आज इथे?", समीरने अगत्याने विचारले
"हो. नवी माहिती मिळालीय म्हणून म्हटलं तुमच्याशी शेयर करूयात."
"काय?" आईने किचनमधून बाहेर येत म्हटलं. करणही दिवाणखान्यातच होता.
"आम्ही त्या फ्लोरीस्ट शॉपचा पाठपुरावा केला. तिथून कळलं की कुणीतरी त्यांना फोन करून तो बुके ऑर्डर केला होता आणि क्रेडिट कार्डने पैसे भरले होते. आवाज कोणातरी बाईचा होता. फ्लोरीस्ट म्हणाली की तिने तुमचा ऍड्रेस दिला अन त्यावर ती फुलं पाठवायला सांगितली. दिलेला मेसेज थोडा सिरीयस असल्याने ती फ्लोरीस्ट तशी घाबरली होती. पण त्या स्त्रीने ‘ही एक प्रॅन्क आहे’ असं सांगत वेळ मारून नेली. आम्ही फोन नंबर चेक केला पण तो पब्लिक टेलिफोन निघाला. क्रेडिट कार्डही चेक केलं. पण त्यावरचे कॉन्टॅक्ट्स खोटे निघाले. क्रेडीट कार्ड कंपनीच्या विरूद्ध आम्ही तक्रार नोंदवली आहे. पुन्हा एक्सेंजमधून फोनवर झालेल्या संभाषणाची टेप मिळतेय का ते बघतोय आम्ही आता."

करण हिरमुसला. ह्यातून काहीच निष्पन्न होत नव्हतं. आता सारी जबाबदारी जयराजच्या रीपोर्टवर आलेली होती. इन्स्प. काळेंनी करणकडे बघून "आम्ही गुन्हेगाराला लवकरच पकडू ... डोण्ट वर्री!", असं टिपिकल पोलिसी आश्वासन दिलं अन ते कॅप चढवून निघून गेले. आई आणि समीर आपापल्या खोल्यांत पांगले.

तोच फोन वाजला. ही पूजा होती. रीपोर्ट पोस्टाने आलेला होता. करण आपल्या विचारांतच निघाला अन पूजाच्या घरच्या दाराशी येऊन थडकला. पूजाच्या वडिलांनी दार उघडले.

"हॅलो अंकल."
"हॅलो करण! कसा आहेस? खूप दिवसांनी भेटलास? हात कसाय तुझा?", पूजाच्या वडिलांनी ऎटीत विचारले.
"बराय. एका आठवड्यांपूर्वीच बरा झाला."
"गुड! गुड!", ते आपला चष्मा नाकावर रूळवत म्हणाले, "नेक्स्ट टाईम बी केयरफुल. डोण्ट ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह!!"
त्यांच्या ह्या उपदेशावर हसावे की रडावे हेच करणला कळले नाही. पूजाने आपल्या वडिलांना ऍक्सिडण्ट विषयी नक्की काय सांगितलंय ह्याचा करणला प्रश्न पडला. तोच मागून पूजाची आई आसावरी आण्टी आल्या.
"अहो तो करण नव्हता काही. शेजारचा उज्ज्वल. तो पियून बाईकवरून पडला."
"ओह! आय ऍम सॉरी.", पूजाच्या वडिलांनी थोडे शरमून म्हटले, "मला मुलांची नावंच लक्षात राहत नाहीत. यू नो... करण ऍण्ड उज्ज्वल इट्स सो सिमिलर..."
आता ह्या नावांच्या इंग्रजी स्पेलिंगात एका ‘ए’ शिवाय काय साधर्म्य पूजाच्या वडिलांना वाटलं देवजाणे. तोच पूजाने वरून हाक मारली, "करण वर ये. मी वरच्या लाऊंज मध्ये आहे.".
पूजाचा फ्लॅट ड्युप्लेक्स होता. करण पायऱ्या चढून वरच्या लाऊंज मध्ये गेला. पूजा सोफ्यावर बसली होती. आजूबाजूला वह्यांचा खप पडलेला होता. अन समोरच कॉफी टेबलावर एक खाकी एनव्हलप होता. तोच तो रीपोर्ट असावा. करण पूजाच्या बाजूच्याच कोचावर बसला.

"एवढा कसला होमवर्क आलाय तुला?", करणने आसपास पडलेल्या वह्या निरखत म्हटले.
"अरे नाही. सॅवियोचा होमवर्क आहे हा."
"व्हॉट़्ट!", करण बावरलाच, "त्याने तुला होमवर्क दिलाय करायला?"
"हो.", पूजाने करणकडे हनुवटी ताणत म्हटले, "त्याला सांगू नको मी तुला सांगितलंय ते. हे त्याचं आणि माझं सिक्रेट आहे."
"काय म्हणून?"
"मी सलोनीच्या पेपरातून कॉपी केलेली ... गेल्या सायन्सच्या क्लास टेस्ट मध्ये... तेव्हा सॅवियोने मला कॉपी करताना पाहिलं... त्याचंच ब्लॅकमेल."
"व्हॉट!!", करणसाठी ही न्यूज म्हणजे मालविकाने मनिष भट़्टच्या पिक्चरमध्ये पूर्ण वेळ साडी घालून फिरण्यासारखं होतं.
"आर यू सिरीयस?"
"हो ना!", पूजाने चेहेरा कडू केला, "मला लाईटचा स्पीड आठवला नाही. म्हणून मी सलोनीला विचारलेलं..."
"पण मग एवढ्या क्षुल्लक कारणासाठी एवढा होमवर्क."
"हो!", पूजा आणखीनच शरमली, "तिने सांगितलेली वॅल्यू मला पटली नाही म्हणून मी मग पुस्तकात पाहिलं ..."
मालविकाने साडीच नाही तर बुरखाही नेसल्याचे करणला भासू लागले.
"पूजा!! यू शॉक्ड मी!", करण अजून अविश्वासाने पूजाकडे बघत होता. पूजा शरमून आधीच अर्धी झाली होती.
"कुणाला सांगू नको हा प्लीज. ह्या रीपोर्टची तुला शपथ!", तिनं ते एनवलप हातात घेऊन सांगितलं.
"ओके नाही सांगणार.", करण पूजाला आश्वसत करत म्हणाला, "पण पूजा हे पोस्टाचं प्रयोजन काय? जयराजने ईमेलने किंवा फोन करूनही कळवलं असतं ना?"
"हो रे! पण त्याने ऑफिसचे रीसोर्स अनऑफिशयली वापरून काम करवून घेतलंय. ह्याची वाच्यता ऑफिसात होऊ नये म्हणून जयराजने रीपोर्टचे प्रिण्टआऊट वेगळ्या तेऱ्हेने काढून स्पीड पोस्ट केलेत. ईमेल सर्व्हरवर कॉपी राहते आणि फोन ट्रेस होतातना म्हणून ", पूजा म्हणाली.

आता एवढी रीस्क घेऊन काम केल्याचे जयराजचे आभार करणने मनातल्या मनात मानले नसते तर नवलच.
"उघड! मला उत्सुकता लागून राहिलीय ह्यात काय आहे ते.", पूजाने हातातला होमवर्क टाकून म्हटले.
करणने एनवलप उघडला. ब्लॅकवल्चरचा ईमेल हा ‘नॉट स्पूफ्ड’ लिहून आला होता. करण खूश झाला. त्याने रीपोर्ट वाचला.

ईमेल: ब्लॅकवल्चर@रिओरी.सिक्युर.नेट
लोकेटर: बॉलिवूडब्लॉग.कॉम वेब होस्ट
आय.पी. : प्रॉक्झीड (मल्टीराऊट्स इन कॅनडा ऍण्ड फिलीपिन्स)
पॉसिबल सोर्स होस्ट: अननोन.

शेवटची माहिती विसंगत दिसत होती. सोर्स होस्ट आणि आयपी अननोन नसायला हवे होते. करणने पाहिलं तर पुढे कारणं दिली होती. सिक्युर्ड असल्याने हा ईमेल नॉन स्पूफ्ड होता. म्हणजे मूळात कुठून हा ईमेल आलाय हे कळणे शक्य नव्हते पण तो कुणीतरी वॅलिड सोर्सने मुद्दाम पाठवलाय हे नक्की होतं. रीपोर्टनुसार हा ईमेल पाठवणारा एका अत्यंत सुरक्षित खाजगी नेटवर्कने ईमेल पाठवत होता. असा नेटवर्क जो लष्करी, अर्थसहाय्य करणाऱ्या मोठ्या कंपन्या किंवा टिव्ही-फिल्म-मिडिया मधली लोकं वापरतात.

… ब्लॅकवल्चर एक घर हुशार निघाला होता. दोन दिवसांची प्रार्थना धुळीस मिळालेली दिसत होती.
"छ्या सच बॅडलक!.", करणचा विश्वास बसत नव्हता. पण रीपोर्ट सूर्यप्रकाशाएवढा लख्ख होता.
"वियर्ड!", पूजा म्हणाली.
"एनिवेज", करण व्यथित होऊन उठला, "मला जायला हवं आता. जयराजला थॅन्स सांग. ही वॉज अ ग्रेट हेल्प!" करणने म्हटले अन पूजाने काही बोलण्याच्या आधीच तो इथून निघून गेला. सारी दुपार अन संध्याकाळ त्याचाच विचार करण्यात गेली. काही सुचतच नव्हतं. आता पोलिसांच्या इन्वेस्टिगेशनचाच आसरा होता.
तोच फोन वाजला. हा सॅवियो होता.

"हाय! कधी आलास?"
"दोन तासांपूर्वी!", करणने मुळूमुळू उत्तर दिलं.
"आणि काय झालं?"
"काही नाही. ब्लॅकवल्चरचा ईमेल भरपूर सिक्युर्ड आहे त्यामुळे त्याचा पत्ता लागणं शक्य नाही.", करणने रागात तो रीपोर्ट बिछान्यावर फेकत म्हटले.
"ओह! दॅट्स सॅड! इट्स युजलेस. इजस्न्ट इट!"
"या काईण्ड ऑफ!"
"बाय द वे!", सॅवियोने करणला खाजगी स्वरात म्हटले, "डीड यू सी टूडेज हिंदूस्तान टाईम्स?"
"नाही. का?", करणने साशंकित होऊन विचारले.
"इन्स्प. काळेंवर इल्लीगल मॉनेटरी ट्रांझाक्शन्स्चा आरोप लागलाय."
"काय?? कसा?"
"त्यांच्याकडे आठ लाख रूपये सापडले. कुणीतरी निनावी फोन करून हायर अथॉरीटींना कळवलं आणि इन्स्प. काळेंची झडती घेण्यात आली."
"ओह माय गॉड! मग?", करण जवळजवळ उडालाच.
"मग काय? इन्वेस्टीगेशन इस अंडर वे. इन्स्प. काळेंना सध्या सर्विसमधून सुट्टी देण्यात आलीय."
"ओह नो!", करण खूपच नर्व्हस झाला.
हे सगळं काय होत होतं? आता मेनकाची केस कोण सांभाळणार?. इन्स्प. काळे असं काही करू शकतील ह्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती...

... आजचा दिवस संपूर्ण भ्रमनिरासचा निघाला होता.

*****************

(पुढील भाग ... http://www.misalpav.com/node/18896)

कथाप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

19 Aug 2011 - 7:48 pm | प्रचेतस

कमाल आहे तुमची.
हल्ली टीव्ही लावला की जसे सगळीकडे अण्णा हजारेच दिसतात तसे मिपा उघडले की सगळीकडे तुमचे करण आणि फ्रेण्ड्सच दिसतात.

विनीत संखे's picture

19 Aug 2011 - 8:01 pm | विनीत संखे

अहो वल्ली साहेब,, लघु कादंबरी म्हटली की बरेच भाग होतात आणि जे काही उत्सुक वाचक आहेत ते व्यनी करून पुढचा भाग टाका असा तगादा लावतात.

आता तुम्हीच बोला आम्ही काय करावं? मिपावरचा एक धागा आम्हाला तीन भागांपेक्षा जास्त पोस्ट करू देतच नाही.

:(

प्रचेतस's picture

20 Aug 2011 - 8:47 am | प्रचेतस

काय बोलू आता आम्ही, निशःब्द झालोत पूर्णपणे.

प्रास's picture

19 Aug 2011 - 7:51 pm | प्रास

मस्त लिहिताय....

येऊ द्या पुढले भाग....

स्वगत - मला 'वार्‍या'ची दिशा कळू लागलीय बहुतेक..... ;-)

पुन्हा अप्रतिम भाग.

मस्त कादंबरी आहे ही.

करण आणि फ्रेंड्स असे नाव बदलुन एक मस्त नाव द्यायला हवे या कादंबरीस.

पिढील लिखानाच्या प्रतिक्षेत

कवितानागेश's picture

20 Aug 2011 - 12:06 am | कवितानागेश

वाचतेय.
नाव बदलायला हवे या मताशी सहमत.

निमिष ध.'s picture

19 Aug 2011 - 9:06 pm | निमिष ध.

एकदम झकास कादम्बरी आहे. वेगवान .. पण जरा अन्दाज येत आहेत. अजुन जास्ति रहस्य असायला पाहिजे होते.

पुढिल भाग लवकर येउ द्या..

विनीत संखे's picture

19 Aug 2011 - 9:44 pm | विनीत संखे

बर्‍याच वाचकांना वाटतंय की रहस्यं अजून असायला हवीत. पण तशी ही रह्स्यकथा नाहीय. रह्स्य फक्त वाचकाला गुंतवून ठेवण्यासाठीच. रह्स्याचे अंदाज यावेत अशी व्यवस्था मुद्दमून केलिय, कारण रहस्य महत्त्वाचं नाही. त्याचा भेद झाल्यावर करणने काय करावं हे जाणणं महत्त्वाचं आहे.

:-)

एकदम बरोबर विनित.
आणि एक .. मुळ विषय आणि काय लिहायचे आहे, हे तुम्हाला माहित असल्याने कादंबरी कुठेही हेलकावे खात नाहिच ..
अगदी पुजा-करण अशी मैत्री ही विनाकारण एक्ष्ट्रा लक्ष घेत नाहि..
आणि हे खुप छान आहे.
तरीही ब्लॅकवल्चर कोण आहे , हे मला कळले आहे, माझा अंदाज खरा ठरला तर छान वाटेलच,..
बघु