मागील भाग .... http://www.misalpav.com/node/18907
भाग पस्तिस
"साट! सटाक!"
आईने मुस्काटात मारली तसं समीर भानावर आला...
वाऱ्यांनी असंबंध दिशा पकडलेली... पावसाने चहूबाजूनी मारा सुरू केला... अंधाराने व्यापलेलं जंगल पाचोळ्याने बरबटलं होतं... ‘सावली’ची खिडक्या दारे एकमेकांत आपटत होती... तिथे हजर प्रत्येकाच्या मनातला काहूर जणू मांडवून दाखवत होती... आईचा क्रोधाग्नी समीरला पुन्हा पुन्हा जाळत होता... भूपेश आणि कुसुममामींनी नजर फिरवून शरमेने आपल्या पायात डोकं घातलेलं... सॅवियो आणि पूजानेही समीरकडेच अविश्वासाने नजर रोखलेली...
आणि समीर! तो तर तीळतीळ तुटत होता ... त्याला धरणीने अजून पोटात कसं घेतलं नव्हतं? ... आपल्या जगण्यावर क्षणागणिक पश्चाताप करत... "हे एखादं वाईट स्वप्न आहे... कदाचित... ?", असं सारखा स्वतःला विचारत होता ... पण याचं उत्तर तर नकारार्थी मिळत होतं ... हतबल झाला होता तो ... एकदम लुळा ... हे खरंच घडत असताना पाहून ... प्रत्यक्षात... सगळ्यांसमोर... ती गौतमच्या नजरेतली आग, शून्यात गेलेल्या मेनकाची आपल्या बाळासाठीची करूण साद, गीताबाईंच्या डॊळ्यातले सवाल जणू त्याला लाथा झाडून जात होते. त्याचा स्वाभिमान चक्काचूर झाला होता. नशिबाने अशी सणसणीत चपराक लावून दिली होती की सत्य तीव्र सूर्यप्रकाशासारखं डोळ्यांत खूपत होतं, काट्यांसारखं पायात रूतत होतं
... करण! ... आणि माझा मुलगा!!!
... पण तो ... तो तर माझा भाऊ आहे ... भाऊ ...
... आणि आता मुलगा ...
ही कल्पनाच अंगावर शिसारी आणत होती… पोट मळमळवत होती. समीरला स्वतःचीच घृणा वाटू लागली होती. त्याच्या स्वत्वाचा असा नामशेष झाला असताना तो इतरांना कसं समजवणार... इतरांचं सोडा पण आईला काय सामोर जाणार... करणला कसं सामोर जाणार...
... स्वतःला कसं सामोरं जाणार?
समोर उभ्या आईकडे बघत समीर आईच्या पायांशी कोसळला.
"आई... आय ऍम सॉरी ... मी... मी काय सांगू ... मला काहीच कळत नाहीये ... आई!"
पण आईच्या नजरेत केवळ घृणा भरून राहिलेली ... तिनं पाय चोरले ...
"मी मूर्ख होतो ... स्वार्थी होतो ... आपल्यातच गुंग होतो ... आय वॉज सो सेन्सलेस ...", समीरच्या डोळ्यांत आसवांची धार लागली, "आई मला माफ कर. मला मुळीच हे सगळं ठाऊक नव्हतं... जर मला कुठूनही कल्पना आली असती की करणच माझा... माझाच मुलगा आहे तर मी एवढं सगळं होऊ दिलंच नसतं गं! मी बाबांना समजावलं असतं ... बाबांना वाचवलं असतं... आई ... आई माझ्यावर विश्वास ठेव... मला ह्याविषयी काही म्हणजे काहीच माहित नव्हतं...", समीर कळवळला.
आईनं काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. समीर आणखीनच खचला, "आई आई अगं काही बोल... मला शिव्या दे... दोष दे... पण काहीतरी बोल गं... तुझी ही नजर मला खायला उठलीय... मला असं गप्पपणे नको मारूस... आई प्लीज...", समीर किंचाळत होता....
"मेनका.... ", समीरला अचानक काहीतरी उमगलं.... तो बाजूलाच सोफ्यावर बसलेल्या मेनकाकडे वळला, "मेनका... मेनका बघ बघ मी सॅम... तुझा सॅम. मी परत आलोय... तुझ्याकडे... मला माझीच लज वाटतेय आज … एका स्त्रीसाठी अशी रात्र किती खास असते ह्याचं मला अजिबात भान नव्हतं ... सेक्सला फक्त लेज्यर मानून राहिलो होतो मी... आय वॉज अ जर्क! ... पण हे सगळं जर तू मला तेव्हा सांगितलं असतंस तर मी कधीच तुला सोडून गेलो नसतो ... आणि मी हे सगळं मान्य करायला तयार आहे... हे बघ, माझ्याकडे बघ, मी तुला माफ करायला तयार आहे.. पण तूही मला माफ कर... तू माफ करशील तरच माझी आई मला माफ करेल... मी माझ्या आईच्या दृष्टीत असा वाईट होऊन राहू शकत नाही ... प्लीज मेनका आय बेग यू ..."
"मि. रूपवते", गौतम अंकल गंभीरतेने म्हणाले, "हे सगळं तुम्ही कुणाला सांगताय … ह्या मेनकाला बोलून काहीएक साध्य होणार नाही... ती तुम्हाला ऎकू शकत नाही... ", समीरने वेडावलेल्या नजरेनं गौतम अंकल कडे पाहिलं... "... कारण तिच्यात कुठेच मेनका उरली नाहीय... शी इज नॉट मेनका... शी इज ब्लॅकवल्चर!"
गौतम अंकलनी खुलासा केला ...
समीर हतबलतेने तिच्याकडे पाहू लागला... काय बोलावे कळत नव्हते... तिच्या चेहेऱ्यात त्याला ब्लॅकवल्चर दिसत होता अन त्याच्यातच दिसत होता करण! ... उफाळलेला, रागावलेला, चवताळलेला... त्याचे डोळे समीरला जर्जर मारत होते जणू...
समीरला असह्य झाले.. त्याने मेनकाचा हात पकडला... समीर सरभरीत झाला होता …
"येस! येस… सी सन ... आय ऍम युअर डॅडी!"
मेनका समीरकडे बघू लागली. तिचा शून्यात गेलेला जीव थोडा चाळवला गेला ...
"मी तुला सोडून गेलो नं... एकटं वाऱ्यावर टाकून?", समीरच्या ह्या प्रश्नावर मेनकाने पुन्हा डॊळे वेगळीकडे वळवले... तिचा चेहेरा ब्लॅकवल्चरचे भाव दाखवू लागला. राग, चीड, उपहास ...
... अन कुठेतरी बाळबोध रूसवा....
"मी खूप वाईट आहे नं?", समीरने रडवेल्या स्वरात प्रश्न केला, "मला माहितच नव्हतं रे की मी तुझा डॅडी आहे ते. आय वॉज सो क्लूलेस्स ... आणि ... आणि मी तुझ्यावर रागावलेलो नाही... तुझ्या आईवरही नाही... तिचीतर काही चूकच नव्हती."
समीरने असे म्हटले तसे मेनका समीरच्या डोळ्यात चिकित्सक नजरेनं पाहू लागली.
"हो! तिची तर काहीच चूक नव्हती. चूक माझी होती. मीच तिला आणि तुला समजलो नाही रे ... म्हणूनच तर मी आलोय ... आज तुझी माफी मागायला ... तुझ्या आईची माफी मागायला ... मला माफ कर ... जसं … जसं तू माझ्यवर रूसलायस तशी माझी आईही माझ्यावर रूसलीय ...", समीरनं विवशतेत आईकडे वळून पाहिलं. तिनं मान फिरवली होती ... करणने बंद केलेल्या त्या दाराकडे ... समीरच्या आवाजात अगदीच थरथर आली... "तिचे ... तिचे डॊळे मला खायला उठलेत ... जोवर तू मला माफ करत नाहीस, तोवर माझी आईही मला माफ करणार नाही... तेव्हा मला माफ कर... प्लीज ... आय बेग यू!", पण मेनका शांत होती... एकाकी समीरकडे बघत... तिनं समीरच्या ओठांवरून बोटं फिरवली ... समीरला काय करावे कळत नव्हते... तो सरभरीत अवस्थेत तसाच उठला आणि त्याला दिसलं ते बंद दार ... बाबांच्या खोलीचं ... करण आतच होता... समीरला चटकन कुठेतरी वाटलं …
... करण सगळं ऎकत होता !
समीर दाराकडे गेला... त्याने दारावर डोकं टेकवलं ...
"सॉरी ब्रो! आय ऍम सॉरी... ", तो पुटपुटला ... ओक्साबोक्शी रडत.
समीरच्या डोळ्यातले अश्रू त्या दाराच्या पायरीवर टपटप ओथंबले... "मला ठाऊक आहे मी तुझा गुन्हेगार आहे... पण हा गुन्हा मी मुद्दामून नाहीरे केला... माझ्या मूर्खपणाची एवढी मोठी किंमत सर्वांना भोगायला लागतेय हे पाहून मला माझी किती लाज वाटतेय हे कुणालाच नाही कळणार... मी ... मी ... ना चांगला मुलगा बनू शकलो, ना चांगला भाऊ बनू शकलो का ना चांगला पिता बनू शकलो... आय एम अ लूजर... सच अ जर्क! ... अ हिप्पोक्रिट...
...
... मी सर्वांच्याच भावनांशी खेळलो... मी खूप वाईट आहे ... खूप... खूप स्वार्थी आहे ... ऍण्ड आय ऍम सॉरी फॉर ऑल धिस ... "
...
आत शुकशुकाटच होता... समीरचे अश्रू वायफळ जात होते... हळूहळू समीरला आपल्या भोवती जग फिरतेय असं वाटू लागलं... सगळ्यांच्या भेदक नजरा त्याचे सद्वत्तेचे कपडे ओरबाडत होत्या... त्याच्या लज्जेच्या ठिकऱ्या पाडत होत्या... बाबा, करण, आई, मामा, मामी ही आपलीच लोकं नव्हे तर गौतम, गीताबाई, सॅवियो, पूजा ह्या आपल्याशी नातं नसलेल्या लोकांनाही त्याने नकळत धोका दिला होता... त्यांच्या भावनांशी खेळ केला होता... आणि मेनका? तिला तर एखाद्या कामांध पुरूषासारखं मोहात अडकवून काम झाल्यावर कपड्यांवरून धूळ झटकावी तसं त्याने झटकून टाकलं होतं... ह्या आपल्या कृत्यांचा आघात जो तिने सहन केला, त्याचं पाप तर तो सात जन्मातही फेडू शकणार नव्हता... समीरने स्वतःची कृत्य मोजली तसं एकच उपाय त्याला दिसू लागला
... अंतीम उपाय ...
... स्वतःच्या नजरेत एवढं पडलेल्या त्याच्या स्वत्त्वाचा कायमचा निकाल ...
... त्याच विवशतेत त्याने आईचे पाय धरले आणि तो उठून बाहेर पडला ...
... कधीच परत न येण्यासाठी …
... कुणाच्या ध्यानात येण्याच्या आधीच त्याने आपली गाडी शंभरच्या वेगात हाकली होती ...
"... मी ह्या कुटुंबाच्या लायकीचा नाही... बाबांच्या मृत्यूचे कारण होतो मी, आईच्या दुःखांचं कारण ठरलो मी, मेनकाचं आयुष्य बरबाद केलं मी, करणचा गुन्हेगार मी ... सर्वांच्या यातनांचं कारण आहे मी ... फक्त मीच ...
... हे कारणच मिटायला हवं ... "
समीरने मनोमन ताडलं आणि तो डिवचलेल्या नागिणीसारख्या तीव्र वळणाऱ्या वाटेवर दुःखोन्मादात गाडी चढवू लागला... नागफणीचा घाटातली ही वाट एका मैलावर उंच जाऊन आनन्फानन बंद होत होती. एका मामुली लोखंडी दांड्याने रोखलेल्या त्या रस्त्यापुढे होती, खोल निबीड काळोखाने व्यापलेली दरी. ... ती दरी समीरला बोलावत होती.... आपल्यात सामावून घ्यायला ...
... समीरनं आपली ऑक्टाविया "स्टॉप" साईनची पर्वा न करता तोडून त्या काळोखात स्वैर घातली ... अंधातरी खोल गर्तेत जाताना त्याच्या अश्रूंना पावसाच्या गार थेंबाचीच साथ लाभत होती... अन तोच एक जोरदार हिसका बसला ...
... आणि त्यानंतरचा पसरलेला तो अंधार …
... जो स्वीकारून त्याच्या मनातल्या क्लेशांना मुक्ती मिळणार होती ...
कायमचीच?
****************
भाग छत्तीस
दूर कुठेतरी अचानक वीज चमकली अन आगीचा लोळ उठलेला ...
भूपेश भानावर आला...
"ताई अगं समीरचं काय? रागात घर सोडून गेलाय तो, त्याने काही बरं वाईट करून घेतलं स्वतःला तर?", भूपेश चिंतेत कुसुममामीला पुटपुटला.
"काय करावं हेच कळत नाही रे. एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी अवस्था झालीय... डोकं चॊंदलय नुसतं.", कुसुममामी पुरती हतबल झाली होती, "समीर ... आणि करणचा जन्मदाता पिता... ", कुसुममामीने हे शब्द कसेबसे म्हटले अन तिलाही गरगरलं, "भावजींना हे कळलं तर ते काय रिऍक्ट करतील... त्यांना पुन्हा टेन्शन ने बीपीचा अटॅक आला तर..."
तोच मुख्य दारावर टकटक झाली... आणि सर्वांनी व्हरांड्यात पाहिलं... हे मनोहर मामाच होते... बरेचसे सावरलेले...
"तुम्ही! अहो कशाला इथे आलात. तुम्हाला बरं वाटत नाहीये तर तुम्ही ...", कुसुममामी त्याना आधार देत म्हणाल्या. श्रिया सोबतच होती.
"मी ठिक आहे.", मामा कुसुममामीचा आधार बाजूला सारत म्हणाले, "ती कुणाची गाडी आलीय बाहेर ..."
मनोहर मामांना बघताच गौतम अंकल उठून उभे राहिले. मामा गोंधळून गौतम, गीताबाई आणि मेनकाला बघू लागले. एक नजर पूजा आणि सॅवियोकडे गेली.
"व्हॉट्स द मिनींग ऑफ ऑल धिस?", मामांच्या कपाळावर आठ्या पडल्या, "गौतम तू इथे? आणि मेनकाला घेऊन..." त्यांची नजर मेनकाच्या विस्कटलेल्या रूपावर थोडा काळ रेंगाळली.
"हो मनोहर", गौतम अंकलनी खंबीरपणे म्हटले, "खऱ्या खोट्याचा सोक्षमोक्ष लावायला आलोय. मेनकाला न्याय द्यायला आलोय. तुझ्या अनुपस्थितीत मला हे करावंच लागलं ..."
"कसला सोक्ष मोक्ष? कसला न्याय?", मामांनी सावलीतलं वातावरण ओळखलं, "मला थॊडं अनकंफर्टेबल वाटू लागलेलं म्हणून इथून निघून गेलो मी ... पण आय ऍम ओके ... हे बघ मी सांगितलेलं तुला की मी सगळं हॅन्डल करीन म्हणून... "
"बट यू कुडन्ट!", अंकल म्हणाले, "म्हणून मला रिस्क घ्यावी लागली मनोहर. म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं..."
"कसलं पाऊल म्हणतोयस तू... काय झालंय तरी काय? काय सांगितलंस तू सगळ्यांना?" मामांनी भोवताली बघितलं. ते साशंकित होऊन म्हणाले, "काय सांगितलंस तू इथे सर्वांना? करण? करणचं काय झालं? समीर कुठाय?"
समीरचं नाव काढताच कुसुममामी आणि भूपेश विचलीत झाले झाले. त्यानी मामांना कोपऱ्यात खेचलं अन सगळं थोडक्यात सांगितलं...
मामांच्या बावरलेच ... सभोवारी बघत एकदमच सुन्न झाले. तिथल्या वातावरणात अजून वेगळं होणार तरी काय होतं? करणने स्वतःला आत डांबून घेतले होते, मेनका वेडीपिशी समोर बसली होती, तिला सांभाळणारे गौतम आणि गीताबाई, दाराशी निपचित पडलेली सुलभाताई तर आततायीपणे निघून गेलेला समीर आणि कावरे बावरे झालेले करणचे मित्र. निदान समीर गेल्यानंतर तरी करणने बाहेर यायला हवं होतं... पण तेही झालं नव्हतं... सगळे करणला बोलावून बोलावून थकले होते... दार अजूनही बंदच होतं...
मामानी सुलभाताईंकडे पाहिलं... तिच्यावर आभाळ कोसळलेलं साफ दिसत होतं... आज पंधरा वर्षांनी पुन्हा तसंच झालं होतं... भावजी गेल्यापासून खंबीर असलेली आपली सुलभाताई आज पुन्हा पार खचलेली मामाना दिसत होती... मामानी सुलभाताईंसमोर येऊन खांदे टाकले आणि ते तिचे पाय धरून ओक्साबोक्शी रडू लागले.
"ताई मला माफ कर."
सुलभाताई मलूल डॊळ्यांनी मनोहर कडे बघू लागल्या... अगदी भावशून्य नजरेनं...
"चूक माझीच होती... मी तुला आधीच हे सर्वं सांगायला हवं होतं...", त्यांनी रडवेल्या स्वरात ताईकडे पाहिलं.... "समीर करणचा खरा जन्मदाता पिता आहे हे मला सुधाकर भावजींनी त्यांच्या मृत्यूच्या आधी हॉस्पिटलात असताना सांगितलेलं..."
आज नियतीने रूपवते खानदानाशी जणू थट़्टेची स्पर्धाच सुरू केलेली. मनोहर मामांचं हे वाक्य सुलभाताईंवर एकदम आघात करून गेलं...
"काय!!!", आई पुन्हा रडवेली झाली, "का रे? का तुम्ही सगळे असं करताय. का माझं पोटची पोरं माझ्याकडून दुरावताय... मी म्हटलेलं समीरला आपण खूप घाईत करतोय म्हणून... पण त्याने सांगितलं म्हणून केवळ हिच्या भितीपोटी आम्ही हे केलं...", आईने मेनकाकडे तुच्छतेने पाहिलं, "आणि त्याचं काय फळं मिळालं मला... आज करण मला त्याची आई मानत नाही... समीर मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेला ... आणि आता तू सांगतोयस की तुला सगळं आधीच माहित होतं... मग तू इतकी वर्षं आमची परीक्षा का घेतलीस मनोहर? मी काय बिघडवलं होतं तुझं..."
"ताई प्लीज असं नको म्हणूस...", मामांच्या आवाजात थरथर आली, "मी वचनानी बांधलेलो होतो गं. भावजींची इच्छा होती की मी वेळ येईपर्यंत हे कुणालाही सांगू नये आणि म्हणूनच मी हे गुपित इतकी वर्षं माझ्या मनात लपवलेलं... ताई खरं सांगतो जेव्हा जेव्हा मी तुला, समीरला आणि करणला एकत्र पाहायचो तेव्हा तेव्हा माझ्या काळजावर सुऱ्या चालायच्या... मला प्रश्न पडायचा हे कटू सत्य सांगू तरी कसं ... ही वेळ येऊ द्यायचीच नाही असं मी ठरवलेलं... पण ...", मामांनी उसासा टाकला आणि उदास चेहेऱ्याने गौतमकडे पाहिलं, "पण नियतीनं पुन्हा मला निर्बल करवलं... आज... इथे..."
आई अजूनही हुंदके देत होती.
"ताई तू धीर धर... हे बघ अजूनही वेळ गेलेली नाही... समीर गेला पण त्याला आम्ही शोधून आणू...", मामांनी आईचा हात हातात घेऊन म्हटलं, "भूपेश जाईल त्याला शोधायला...", असं म्हणून मामांनी भूपेशला खूण केली. भूपेश तसाच बाहेर पडला आणि बाईक घेऊन निघालाही.
"पण करण.... माझा करण!", आईने पुन्हा समीरच्या बाबांच्या बंद खोलीकडे बघत आक्रोश केला...
मामा गांगरले. सुलभाताईचं अवसान परत आणायचा तोच मार्ग जोता... करणने बाहेर येणं अत्यावश्यक होतं ... पण त्या खोलीत जायचा दुसरा कुठला रस्ता नव्हताच... त्या सागवानी दाराशिवाय आणि एका लोखंडी बंद खिडकीव्यतिरिक्त आत जायचा काहीच मार्गच नव्हता... बाकी सगळे मार्ग बंद झालेले वाटत होते... करण आतच होता ... कदाचित सुरक्षित असावा ....
... पण नसेल तर ??
.. ‘वेट!’ मामांची स्मृती एकदम चाळवली गेली. त्यांना विजेच्या गतीनं आठवलं ... ‘त्या खोलीचं छप्पर तर माळ्यावर उघडतं’... मामांनी विचार केला , ‘आणि घराची छपरं ... ती तर कौलारू आहेत’...
... डॅम्न इट! हे आपल्याला आधी का नाही आठवलं... मामानी आपल्या विस्मृतीवर वैतागून कपाळावर हात मारला ...
"सॅवियो" मामानी हाक मारली तसं सॅवियो पुढे आला.
"करणच्या रूममध्ये जायचा एक वाकडा रस्ता आहे... तू ट्राय करशील?"
मामानी असं म्हणतच सगळे सतर्क झाले. आईही चमकली
"हो!" सॅवियोही उत्साहात म्हणाला.
"गुड! कम विथ मी", मामा सॅवियोला बाहेर घेऊन गेले...
"तुम्ही इथेच थांबा", मामानी गौतम अंकलना आणि सुलभाताईंना विनंती केली. मामा, सॅवियो, कुसुममामी आणि पूजा व्हरांड्यात पोहोचले. पावसाचं पाणी नुसतं गारेगार चटके देत होतं. त्याचा जोरही तसाच होता. मामा सॅवियोला एका ड्रेनेज पाईपकडे घेऊन आले...
"हा पाईप चढू शकशील?"
"हो", सॅवियो कुडकुडत पाईपाची ऊंची आणि त्याचे हूक्स बघत म्हणाला.
"ग्रेट! इथून चढल्यावर सरळ वरच्या टोकाच्या कौलांपर्यंत जा. दोन्ही स्लोपवर मांडलेली कौलं खेचून काढ. तुला शिरण्याएवढी जागा मोकळी झाली की आत उडी मार. डोण्ट वर्री. खूप खोल नाही. जमिन खाली फक्त चार पाच फूट खाली असेल."
"ओके.", सॅवियो म्हणाला.
"आत शिरल्यावर माळ्याच्या जमिनीत एक दार दिसेल. तो ऍटीक डॊअर आहे. तो उचलून उघडायचाय. उघडलास की खाली करणची रूम दिसेल. तिथे शिरल्या शिरल्या आधी त्याचं ते बंद दार उघड. गॉट इट!"
"राईट!", मामानी सॅवियोला इंस्ट्रक्शन्स दिले तसं सॅवियो चढायला तयार झाला. इशारा करताच भरभर चढून सॅवियोने छपरांचं टोक गाठलं आणि एका मागे एक कौलं आपली पूर्ण ताकद लावून खेचून काढायला सुरूवात केली. थोड्याच वेळात सॅवियो कौलांच्या आत दिसेनासा झाला. मामा, मामी आणि पूजा परत घरात शिरले आणि त्या बंद दारासमोर जाऊन दाराला कान लावून आतली चाहूल घेऊ लागले... दार उघडेस्तोवर "करणचं काय झालंय", ह्याच विचारांत सगळ्यांचे प्राण कंठाशी आले होते....
चार पाच मिनिटांनी दाराच्या बिजागऱ्यांची किरकिर झाली आणि दार उघडलं गेलं...
हा सॅवियो होता... धापा टाकत. त्याच्या ओल्या केसांतून अजूनही पाणी निथळत होतं. पण त्याने आपलं काम चोख बजावलं होतं.
"सॅवियो! ..... करण कुठाय?"... असं विचारत सगळे एकादमात आत घुसले आणि सॅवियोचे डॊळे हताशपणे बघत एका कोपऱ्याकडे वळले.
"करण!", आईने टाहो फोडला आणि ती अंधाऱ्या कोपऱ्यात मुटकुळं करून बसलेल्या आकृतीला बघून त्याच्याकडे धावली. तिनं त्या निस्तेज शरीराला एकदम कवेत घेतलं. सगळेच करणला पाहून आनंदित झाले. करणच्या भोवती कोंडाळं जमलं...
"करण बाळ! अरे काय करत होतास तू हे"... "करण आम्ही घाबरलेलो रे"... "करण यू स्केयर्ड द हेल आऊट ऑफ अस"... "करण आय ऍम सॉरी की मला मेनकाला इथे असं आणावं लागलं" ... "करण आर यू ओके?" ... "टेल मी करण..."
काळजीच्या शब्दांचा भडिमार चहुबाजूने होत होता... पण करणवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता... तो जणू गारठलेला गोठला होता.... डाव्या हाताचं मनगट समोर मांडलेलं आणि त्यावर उजव्या हाताची मूठ पडलेली... मामा करणला निरखून बघत होते... करणाचे डॊळे भावहीन होते... अश्रू केव्हाच गोठलेले असावेत... मामानी करणला हलवलं अन त्याची मूठ सैलावली गेली...
त्यानंतरची पूजाची किंकाळी सगळ्यांचं हृदय थरकावून गेली... करणच्या मूठीतून ब्लेडचा तुकडा खाली पडला होता...
"करण!", आईही किंचाळली. ती करणच्या अंगावर, हातावर, पायांवर जखमा शोधू लागली... पण कुठेच जखम दिसत नव्हती... आसपास रक्तही कुठेच नव्हतं... सगळे भांबावले... काही सेकंदानी त्याना सत्य परिस्थितीची जाण आली... करण सुखरूप होता... एक मोठं संकट टळलेलं होतं...
… करणने आत्महत्या करायचा विचार बदलला होता ...
"अरे वेड्या हे तू काय करायला जात होतास?", आईने हंबरडा फोडला आणि करणला पुन्हा आपल्या कवेत घेतलं... "एवढ्या क्षुल्लक कारणावरून कुणी जीव देतं का रे?"
"करण अरे वेडा झालायस का तू? केवळ तुझ्या जन्माचं रहस्य कळलं म्हणून?"
"... कोण म्हणतंय तू माझा मुलगा नाहीस ते?", आई खेचकली, "हं? बाजूला व्हा... तुम्ही सगळे निघून जा इथून... करणला कुणीही माझ्याकडून दुरावू शकणार नाही... कुणी प्रयत्न केलात तर बघा... माझ्याशी गाठ आहे तुमची...", आईची जणू चंडिका झालेली, "माझं बाळ आहे ते... कुण्या फुक्या नटीचं नाही... मी सांभाळलंय करणला... निघून जा ... जा म्हणतेय ना मी..."
आई बेंबीच्या देढापासून ओरडत होती ... तिला अन करणला वेगळं करू पाहणारा प्रत्येक चेहेरा तिला जणू खायला उठला होता... त्यावेळी फक्त करणच तिला हवा होता... तिच्या जवळ, तिच्या कुशीत... तिनं त्याला घट़्ट पकडलेलं... तिला पुन्हा करणला गमवायचं नव्हतं...
आईच्या अगतिकतेमुळे बाकी सर्वांनी तिला अन करणला एकटं सोडलं आणि ते दिवाणखान्यात येऊन बसले. आतून आईचे "माझ्या बाळा... माझा करण" असे हुंदके येत होते... ती करणवर उरली सुरली सगळी माया टाकत होती... करणने स्वतःला इजा पोहोचवली नव्हती हेच मोठं नशीब होतं... तसं झालं असतं तर आईची काय हालत झाली असती ह्याचा कुणाला विचारच करवत नव्हता...
गौतम अंकलही करणच्या सुखरूप असल्याने निवळले होते. ही त्यांच्यासाठी ... किंबहुना मेनकासाठी चांगली बातमी होती. त्यांनी बाजूला बसलेल्या मेनकाकडे बघितलं अन तिला ते हळूच तिच्या कानांत पुटपुटले ...
"आईचं बाळ सुखरूप आहे!"
मेनकाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ती शून्यात गेलेल्या डॊळ्यांनी सुधाकररावांच्या बेडरूमकडे एकटक बघत होती... भकास ... तिथेच जिथून आणखीन दुसऱ्या आईचे मायेचे, करूणेचे स्वर तिला ऎकू येत होते...
"गौतम!", काही मिनिट सगळं स्थिरस्थावर झालं अन मामा म्हणाले, "आय थिंक नाऊ यू शूड लीव्ह!"
"व्हॉट?", गौतम अंकल एकदम चमकले, "व्हाय? हे बघ माझं काम अजून पूर्ण झालेलं नाहीय..."
"हे बघ गौतम, ईनफ इज ईनफ!", आता मामांनी आवाजात जरब आणली, "मेनकाचा आणि तुझा भाग इथे संपला... करणला सगळं खरं कळलंय. आम्हा सगळ्यांनाही कळलंय. आता इथे थांबून तुला काहीही साद्ध्य होणार नाही."
"बट मनोहर व्हाय डोन्ट यू..."
"...साहेब!", गीताबाईंनी मध्येच म्हटलं, "... मनोहरराव सही बोलत्यात... आपन गेलेलं बरं... हितं थांबून काय होनार नाही... समद्यांना कळायचं ते कळलं... आता जे ह्वईल ते खंडोबाच्या हाती..."
"गीताबाई पण मेनका..."
"...मेनकाचंच म्हनतेय म्या... जरा तिचाकडं बगा... तिला ह्या अवस्तेत एवडा येळ ठेवनं पन बरं नाय... तिला हास्पिटल मंदी नेलेलं चांगलं... माजं म्हातारीचं ऎका... आपल्या मनू साटी येवडं करा..."
गौतम अंकल हतबल झाले. गीताबाईंच्या बोलण्यातही तथ्य होतं. मेनकाला अशा अवस्थेत जास्त वेळ ठेवणं बरं नव्हतं. ते उठले.
"ठिकाय, गीताबाई तुम्ही मेनकाला गाडीत नेऊन बसवा... मी आलोच... सॅवियो, पूजा तुम्ही पण पुढे व्हा..."
गौतम अंकलनी सांगितल्याप्रमाणे सॅवियो, पूजा आणि गीताबाई मेनकाला मूकपणे बाहेर गाडीत घेऊन गेले.
"मनोहर!", गौतम अंकलनी मनोहरला म्हटले, "करण सुखरूप आहे हे बरं झालं. मला तेच हवं होतं. पण त्याने मेनकाला येऊन भेटणं गरजेचं आहे. तिला माफ करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्लीज त्याबद्दल काही होत असेल तर ट्राय कर..."
मनोहर मामानी गौतमच्या ह्या रिक्वेस्टवर हल्केच हुंकार दिला आणि गौतम अंकल त्याना ‘गुड बाय’ बोलून निघून गेले...
... गौतम अंकल गेले तसं वादळ थोडं शमल्याचं जाणवू लागलं ...
****************
भाग सदतीस
अंधारात फाकलेला प्रकाशचा झोत फक्त पाण्याच्या तिरप्या रेषाच दाखवत होता. वायपर ने पुन्हा पुन्हा पुसूनही समोर दिसायचं असं नीट स्पष्ट होत नव्हतं. अशा अवस्थेत घाटातला प्रवास जिकरीचा होता. पण मुंबईला परत जाणेही तितकेच आवश्यक होते. मागे राहिलेली वाट पुन्हा जोखायचा हुरूप कुणातही नव्हता. गाडीतला प्रत्येक जण मानसिक दृष्ट्या शिणलेला होता. भावनांच्या अजस्त्र वावटळीतून पार झाला होता. बोलायची ना हिम्मत होती कुणात ना त्राण. पावसाच्या धांदलीत केवळ गाडीच्या हेडलाईट्स मधून प्रकाशित झालेल्या अंधारमय रस्त्याचा अंदाज लावत गौतम गाडी चालवत होते
.
समोरच्या सीटवर सॅवियो होता अन मागे पूजा अन गीताबाई त्याच्यांमध्ये बसलेल्या मेनकाला सांभाळत होत्या. मेनका गीताबाईंच्या दंडावर डोकं टाकून बाहेरचा काळॊख एकटक न्याहाळत होती.
"आपण चार तासात पोहोचू. फक्त ही नागफणीची दरी पार झाली की बस.", अंकल रस्त्याचा अजमास लावत म्हणाले.
"हं!", पूजा आणि सॅवियो एवढंच म्हणाले अन निरूत्तर झाले. यापुढे बोलण्यासारखं उरलं होतं तरी काय? मेनकाची दुरावस्था, समीरचा ऱ्हास आणि करणच्या मनातली घालमेल आज सर्वांनाच चक्रावून गेली होती. एकापेक्षा एक गुपितं फुटली होती... करण मेनकाचा मुलगा! मेनका हीच ब्लॅक्वल्चर! समीर करणचा जन्मदाता पिता! .... टृथ इस वियर्ड दॅन फिक्शन हे पुरेपूर पटत होतं... ही सत्यं सॅवियो आणि पूजालाही मानसिक दृष्ट्या शिणवून गेली होती... आपण उगीचच इथं यायचा हट़्ट धरला असं त्यांना वाटू लागलेलं.
"अंकल!", पूजाने धीर एकवटून गौतम अंकलना विचारले, "मेनका.... तिचं काय होणार आता? ... जर करण मानला नाही तर..."
अंकल काही म्हणाले नाहीत. दोन मिनिटं मुक्याने गाडीच चालवत राहिले, "काय करणार...", अंकलनी एका वळणाशी म्हटले, "हॉस्पिटलात अंडर ऑब्सर्वेशन ठेवावं लागेल. ब्लॅकवल्चरचा हिस्टेरीया पुन्हा आढळला तर मात्र ईसीटी द्यावं लागेल.", अंकलनी स्वरात म्हटले तसं गीताबाईंनी डॊळ्य़ांना पदर लावला. ईसीटीबद्दल गीताबाईंनी हॉस्पिटलात डॉ. सहानींकडून आधी ऎकलं होतं. त्यामुळे गंभीरता पूजा अन सॅवियोला लक्षात यायला थोड वेळ गेला.
"ओह गॉड ईसीटी?", पूजा बावरलीच. "यू मिन ईलेक्ट्रोकन्वल्सिव थेरेपी? शॉक थेरेपी?"
अंकल गप्पच होते.
"पण मला वाटलं की शॉक थेरेपी वॉज आऊट डेटेड. विजेचे शॉक देणं जुनी पद्धत आहे. शिवाय अमानुषही आहे...", पूजा कन्विन्स्ड नव्हती.
"नाही. आपल्या केस मध्ये नाही.", गौतम अंकल नैराश्याने म्हणाले, "हायली सायकॉटीक स्किझोफ्रेनियाला नाही. ईसीटी इस द लास्ट थेरेपी फॉर सच टाईप."
आता शॉकही देणार हा विचार पूजा अन सॅवियोला पुन्हा अस्वस्थ करवून गेला. आयुष्यात एक मोहाचा क्षण, एक बालिश चुक आपल्या पासून आपलं आयुष्य एवढं हिरावून घेऊ शकते ह्याचा कुणी अंदाजही केला नव्हता. पण मेनका, समीरच्या किश्श्यातून नियतीचा हा अघोर खेळ स्पष्ट दिसत होता. बाहुलीसारखी गोड मेनका आता विजेचे शॉक खाणार हा विचारच मनाला कुठूनही शिवत नव्हता. पुन्हा सगळे गप्प झाले अन बाहेर गरजणारा पाऊस फक्त वाचू लागले.
इतका वेळ आपलं मन खंबीत करत मेनकासाठी इथवर पाऊल उचलेले गौतम अंकल मात्र आता नियतीच्या पायी माथा टेकलेले होते... आपलं प्रेम असं कोमेजताना पाहून त्यांना कसंसंच होत होतं... राग येत होता... नैराश्य दाटत होतं... पण ते हतबल होते... नशीबाने त्यांचे हात बांधून ठेवले होते... आता फक्त मेनकाला जमेल तितका आधार द्यायचा त्यांच्या हाती होता....
... अंकलनी त्याच विवश नेजरेनं समोरच्या आरश्यातून मागे बसलेल्या मेनकाकडे एक कटाक्ष टाकला.... आपल्यावर आलेल्या ह्या परिस्थितीपासून तिच्यातली मेनका पूर्णपणे अनभिज्ञ होती... तिचं पाऊस वाचत... अंधार न्याहाळत... तिचा आवडता अंधार... अंकलनी त्याच आरश्यावर आपलं बोट फिरवलं आणि आपल्या बोटांनी तिच्या चेहेऱ्यात हरवलेलं ते निरागस हास्य पकडायचा व्यर्थ प्रयत्न केला...
"स्टॉप!", अचानक सॅवियो किंचाळला.... अंकल भानावर आले ... गाडीसमोर कुणीतरी दिसलं ... त्यानी दृतगतीत आपलं स्टेयरींग वळवून ब्रेक दाबले... गाडी रस्त्याच्या कडेला काही फूट सरपटत थांबली होती.... मागे सर्वाना करकचून धक्का बसला होता... अंकलनी कसंबसं स्वतःला सांभाळत मागे वळून विचारलं, "आर यू ऑल ओके?"
सगळे ठिक होते... थोडे घाबरेलेले पण सुखरूप... गाडीच्या पुढ्यात अचानक आलेली व्यक्तीही अगदी थोडक्यात बचावली होती...
"हा कोण माझ्या गाडीखाली मरायला आलाय..", अंकलच्या चेहेऱ्यावरचे भाव आंबले. त्यांनी गाडीचं दार उघडलं अन गार पाण्याची एक धार त्याना थरारून गेली. त्यांनी आपला कोट पावसाच्या आड केला अन त्यात ते त्या व्यक्तीकडे धावले... जवळ येता येता ती व्यक्ती स्पष्ट होऊ लागली.
"भूपेश?"… गौतम अंकल त्याला बघून चमकले, "तू इथे? पावसात एकटा..."
"गौतम हेल्प!", भूपेश घाबरलेल्या चेहेऱ्याने अंकलना म्हणाला, "प्लीज हेल्प... गौतम ... घाटात समीर..."
गौतम अंकल गांगरले. "घाटात समीर काय?"
"त्याची गाडी घाटात पडलीय. इट्स ऑल ब्रोक... समीर इस मिसिंग!"
"व्हॉट़्ट!", गौतम अंकल किंचाळले. हे तर अनपेक्षित होतं.
"कुठे आहे समीर ... त्याची गाडी ... टेल मी...", भूपेश अजूनही ताळ्यावर नव्हता... भितीने त्याची बोलतीच बंद झालेली... "टेल मी... भूपेश लिसन टू मी... कुठे आहे समीर? .... त्याची कार कुठे आहे? ..."
"तिथे खाली... घाटात!"
"दाखव मला...", अंकलनी भूपेशला सांगितलं तसं भूपेश पुढचं मागचं काहीही न ऎकता मागच्या निसरड्या वाटेवर धावला... अंकल लगबगीत गाडीकडे परत आले आणि, "मी येतोय. तुम्ही कुठेच जाऊ नका" असं म्हणून भूपेशने पकडलेल्या वाटेने निघून गेले.
"पण...", पूजा, सॅवियो अन गीताबाई काही विचारणार तोवर अंकल दृष्टिक्षेपातून पार गेलेही होते....
...
...
"अर्धा तास झाला. कुठे असतील अंकल?", पूजाने गीताबाईंना बघत प्रश्न केला. गीताबाईही धास्तावल्या होत्या. त्यानी मेनकाचा हात घट़्ट पकडला होता. एवढ्या पावसात अन कभिन्न काळोखात घाटातल्या निर्जन रस्त्यावर एकटं राहणं खचितच धोकादायक होतं.
"मी जाऊ का बघायला?", सॅवियोने प्रश्न केला तसं "नको नको! प्लीज तू कुठे जाऊ नकोस.", अशी दोघींनी त्याला विनंती केली. सगळे अंकलनी सांगितल्याप्रमाणे गाडीतच थांबले. बाजूला बसलेली मेनका थोडी अस्वस्थ होऊ लागली. तिच्या हृदयाची धडधड वाढत असलेली गीताबाईंना जाणवू लागली. कॅटामाईन अन राईजोस्परच्या गोळ्यांचा नवा डोस द्यायची वेळ अवघ्या एका तासावर आली होती. तोवर हॉस्पिटलात नेलं नाही अन त्याच्या अभावी मेनकाला पुन्हा एम्पीडीचा अटॅक येण्याची शक्यता होती. तो आला तर कदाचित ती हिंस्त्र होऊ शकेल आणि स्वतःस किंवा इतरांना इजा पोचवू शकेल हे डॉ. नी तिला हॉस्पिटलातून नेताना गौतम अंकलना सांगितलेलं. गीताबाईंनी ते ऎकलेलं. त्यामुळे ते आठवून त्या आणखीच चिंतीत झाल्या. त्यानी पुन्हा त्या दूर वाटेकडे डोळे वळवले जिथून गौतम अंकल अंधारात गायब झाले होते. त्यानी लवकरात लवकर येणं गरजेचं होतं.
काही सेकंदाचा अवकाश अन त्या वाटेवरून पावसाच्या तुषारधुक्यात दोन माणसाकृती दृष्य होऊ लागल्या... दोघे पुरूष होते... आणि त्यांच्या हातात काहीतरी होतं... अवजड ... अचानक काहीतरी जाणवून सगळे थरारलेच ... ते काहीतरी नव्हतं... कुणीतरी होतं...
गाडीच्या पाशी पोहोचताच ती आकृती दिसलीच ...
... "अगं बाई!"... गीताबाई मनातल्या मनातच किंचाळल्या... हा तर समीर होता ... निपचित, रक्तबंबाळलेला, निर्जीव... गीताबाई त्याच्याकडे डॊळे विस्फारून बघत होत्या ... पूजा सॅवियोलाही सद्य परिस्थितीची जाणीव व्हायला फार वेळ लागला नाही. ते सगळे मेनकाला सोडून गाडीबाहेर उतरले. सॅवियो आणि पूजा गौतम अंकलकडे धावले होते.
"ओह माय गॉड! अंकल इज धिस समीर? ... व्हॉट हॅप...", अंकलनी पूजाच्या प्रश्नांची पर्वा न करता सगळ्यांच्या मदतीनं समीरचा तो अचल देह गाडीच्या मागच्या सीटवर पाडला.
"ही इज बॅडली हर्ट. घाटातल्या खारकीच्या झूडुपात पडलेला मिळाला आम्हाला. श्वास चालू आहे का नाही हे कळत नव्हतं पण नस कशीबशी सापडली मला. बट इट इज वेरी इर्रेग्युलर. लूक्स लाईक ही हॅज लॉस्ट लॉट ऑफ ब्लड... ", अंकल पूर्णपणे थरथरत म्हणत होते, "... आय एम सप्राईज्ड दॅट ही इज इवन अलाईव्ह... ". त्यांनी पूजा आणि सॅवियोकडे एक आश्चर्याचा कटाक्ष टाकला.
"क्विक! आपण त्याला हॉस्पिटलात न्यायला हवं.", भूपेश कळवळून म्हणाला.
"पण मल इथे हॉस्पिटल्स... भूपेश तुला जवळचं हॉस्पिटल कुठलंय माहितिये?"
"कैवल्यधाम नावाचं आहे... स्टेशनापासून २ किमी... इथून सात किमी असेल."
"म्हणजे अर्धा तासात पोहोचू आपण... चल माझ्याबरोबर... दाखव मला."
"पण माझी बाईक पलिकडच्या रस्त्यावर आहे.... शिवाय कारमधल्या बाकीच्यांचं काय?"
"डॅम्न ईट!!!", अंकलना भूपेशची त्रासदी जाणवली. "मी मनोहर भावजींना फोन करतो....", भूपेशने म्हटले... त्याने मोबाईल ट्राय केला पण नेहेमीप्रमाणे रेंज येत नव्हती...
"जाऊदे ते.", अंकल म्हणाले, "फोन लावत बसण्याएवढा एवढा वेळ नाहीये... हे बघ ... ", त्यांनी दोन सेकंद घेतली, "... तू आणि सॅवियो बाईकने स्टेशनापर्यंत या. मी, गीताबाई आणि पूजा समीरला घेऊन मागाहून येतो आणि एकदा स्टेशनला पोहोचलो की तिथून फोन करून मामांना थेट हॉस्पिटलात बोलाव. मग तिथून पुढचा रस्ता तू मला दाखव."
भूपेश तयार झाला. सॅवियो उतरला अन भूपेशसोबत निघून गेला. पूजा मागची पुढे येऊन बसली. भेदरलेल्या गीताबाईंनी समीरच्या देहाचं कलेवर हातांनी सांभाळलं अन त्यांना उबाळीच आली. आधी पावसाने बरंच वाहून गेलेलं रक्त आता बाहेर येताना कमी वाटत असंलं तरी अंगावरच्या इंचाइंचावर झालेल्या जखमा ऍक्सिडन्डच्या भीषणतेची ग्वाही देत होत्या. गीताबाईंना मेनका अन समीरला दोघांना सांभाळायचं होतं... दोघे येनकेन कारणाने अनिष्टाच्या समीप होते...
मिनिटागणिक मेनका अस्वस्थ होत होती. ब्लॅकवल्चर पुन्हा उफाळून यायचा प्रयत्न करत होता... पण गीताबाईंचा पकडलेला हात तिला आपलंपण जाणवू देत होता... त्यांचा मधमधला आवाज तिला त्या सोबत असल्याचं पटवून देत होता... गौतम अंकल जमेल तितक्या वेगात गाडी पळवत होते... पण घाटाची निसरडी वळणं अजून न गेल्याने हाय स्पीडची रिस्कही घेता येत नव्हती ... अशाच एका तीक्ष्ण वळणाशी तोल जाऊन मृतप्राय समीर गीताबाईंच्या मांडीत कोलमडला अन गीताबाईंच्या खांद्यावर डोकं टाकून पडलेल्या मेनकाच्या नजरेत त्याच्या रक्ताने बरबटलेल्या जखमा भरल्या.. ती दोन मिनिटं त्याच्याकडे एकटक पाहतच राहिली... मनात कुणीतरी "सॅम!" किंचाळल्याचं तिला जाणवू लागलं... तिच्यातला ब्लॅकवल्चरही चरफडू लागला ... ती थरथरू लागली होती... तिनं घाबरून गीताबाईंचा हात जिवानिशी गच्च आवळला... गीताबाईंची मनातली घालमेल वाढली ... कुठल्याही हॉस्पिटलला का होईना पण लवकरात लवकर एखाद्या डॉ.च्या निगराणीत पोहोचणे दोघांसाठी अत्यावश्यक होतं.
गाडीचा वेग शेवटी कामाला आलाच. लोणावळा स्टेशन दृष्टीपथात येऊ लागलं. मुख्य-प्रवेशाशीच भूपेश अन सॅवियो दिसले. त्यांच्या पुढ्यात गाडी आणून अंकलनी काच खाली केली.
"मी फोन करायचा प्रयत्न करतोय पण काहीच रेंज येत नाहीय. वाटतं मला ‘सावली’त स्वतः जायला लागणार...", भूपेशने अंकल ना म्हटले.
"ठिक आहे. एकदा हॉस्पिटलात घेऊन चल. तिथून मग घरी जा.", अंकल भूपेशला म्हणाले. भूपॆशने हेल्मेट चढवलं आणि सॅवियोसोबत गौतम अंकलच्या गाडीपुढे बाईक घातली. अन तो पुढे निघाला. मागहून अंकल येऊ लागले.
पाच सात मिनिटांनी कैवल्यधाम आलं. भूपेशने आधीच बाहेरचं इमर्जन्सी सायरन ऍक्टिवेट केलं होतं. डॉ. आणि नर्सबॉयज स्ट्रेचरसहीत बाहेर येऊन त्यावर समीरला उचलून लगबगीत आत निघून गेले. त्यानी सरळ इ.आर. चा रस्ता पकडला. भूपेशने "मी बातमी देऊन येतो" असं म्हटलं अन बाईकवर किक मारली.
हॉस्पिटलच्या दाराशी आता फक्त गौतम अंकल, सॅवियो आणि पूजा उभे होते... अतीव विवंचनेत ... भिजत बोचऱ्या पावसात ... तिथे भिजण्यापेक्षा किंवा दाटीवाटीने गाडीत बसण्याऎवजी त्यानी आत हॉस्पिटलात जाणं पसंत केलं.
पेपरवर्क करून गौतम अंकल सगळ्यांसह वेटींग रूमच्या बाकड्यावर बसले. भोवताली विशेष कुणी नव्हतं ... नाहितरी एरवी फिल्म ऍक्ट्रेस्स मेनकाला पाहण्यासाठी तोबा गर्दी करणारे लोक आज ब्लॅकवल्चर ने केलेला मेनकाचा हा जिवंत अस्थीपिंजर ओळखत सुद्धा नव्हते...
कुणीच काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. गीताबाईंना गौतम अंकलना मेनकाविषयी आठवण करून देणं गरजेचं वाटत होतं. मात्र गौतम अंकलचा काळजीने व्यापलेला चेहेरा पाहून त्याना धीर होत नव्हता. म्हणून त्याही गप्प बसल्या. फक्त मनोहर ची वाट गौतम अंकलना बघायची होती. एकदा तो आला की ते मुंबईसाठी निघायला मोकळे होते. त्याच विचारांत गौतम अंकल गुंतलेले होते.
थोडावेळ शांत राहलेलं वातावरण अचानक एका आवाजाने चाळवलं गेलं.
"मारून टाकेन!", कुणीतरी चिरक्या आवाजात पुटपुटलं, "वांध्येला मारून टाकेन!".
गीताबाईंच्या काळजात धस्स झालं. ही मेनका होती. गीताबाईंचा हात गच्च पकडून ठेवलेली. थरथरत ती स्वतःशीच बडबडत होती... "डॅडींच्या मृत्यूचं कारण पण हिच माझी वांझ ठरली ना... डॅडींनी स्वतःला मारलं ते तिच्यामुळेच... आता मी तिला मारून टाकेन... तिने माझे डॅडी मारून टाकले...", अचानक तिने मानेला हिसडा दिला अन ती इतरत्र बघू लागली.
"मी नाही सोडणार तुला चांडाळे... अजून मेली कशी नाहीस तू... हं! मला वाऱ्यावर टाकून गेली अन आता डॅडींनाही मरायला लावलंस... मला पूर्ण अनाथ करायचा विचार आहे हैवानीचा... हे मी नाही होऊ देणार... त्याना मारण्याच्या आधीच मी मारून टाकेन तिला... जीव घेईन तुझा.", तो आवाज बोलू लागला.... ब्लॅकवल्चरचा सूड बोलू लागला. गौतम अंकल घाबरले. त्यानी पूजा अन सॅवियोला मागे जायला सांगितलं. गीताबाईंना दूर सारलं. मेनका वेगळी पडली.
"बघताय काय मला भूत पाहिल्यासारखे...", मेनकाने त्यांच्याकडे पिसाळलेल्या नजरेने बघत म्हटले, "... मी आलोय परत ... ब्लॅकवल्चर... तिच्या नरडीचा घॊट घ्यायला... बघा तुम्ही सगळे... तिच्या मृत्यूचा तमाशा...", आणि असं म्हणून ब्लॅकवल्चरने मेनकाचं डोकं भिंतीवर आपटलं... भिंतीवर रक्ताची पिचकारी उडाली...
मेनका "आह!" म्हणून किंचाळली.... "बघा बघा मला सोडून गेलेली ही स्वार्थी भांड आज स्वतःच्या जगण्याला पारखी होणारेय...", असं म्हणून ब्लॅकवल्चरने तिचं डोकं पुन्हा टेबलाच्या कोपऱ्याशी फिरवलं... पण ब्लॅकवल्चरचा हा घाव व्यर्थ गेला ... अंकलनी पुढे होऊन मेनकाला मागून पकडलं होतं ...
... "सोड मला सोड", ब्लॅकवल्चर ओरडत होता... अंगाला हिसडे देत होता... मेनकाच्या पोटाशी घट़्ट पकडलेल्या गौतम अंकलच्या हातांवर तिच्या नखांनी ओरबाडत होता... किंचाळत होता ... शिव्या देत होता…
..."मनू माझी ऎक माजं.. मी तुजी गीताबाई हाय...", गीताबाई व्यर्थपणे ब्लॅकवल्चरला आपली ओळख पटवून देत होत्या... पण मेनका ब्लॅक्वल्चरच्या हल्ल्याने गलितगात्र झालेली होती... त कुणालाही ओळखत नव्हती… गौतम अंकलही गांगरून गेले होते.... ह्याखेपेस ब्लॅकवल्चर जो मेनकावर हल्ला चढवला होता तो आधी कधीच कुणी पाहिला नव्हता... डॉ. सहानींनी उघड केलेली भिती खरी झाली होती.... हा पोस्ट ट्रॉमटिक हिस्टेरीया नव्हता ... ह्याखेपेस ब्लॅकवल्चर प्रसूतिच्या कळा न देताच बाहेर आला होता... म्हणजे ब्लॅकवल्चर आता खऱ्या मेनकावर वरचढ ठरला होता... त्याचा जन्म व्हायला आता प्रसूतिच्या वेदनांसारख्या फॉल्स सिम्प्टम्सची गरज नव्हती...
"डॉ.! डॉ.!!! नर्स... सिक्युरीटी...", भेदरलेले पूजा अन सॅवियो किंचाळू लागले. एक डॉ. आणि वॉर्डबॉय धावत आले. त्यानी गौतम अंकलना सोडवलं आणि ब्लॅकवल्चरला जेरबंद केलं. काय करावे कळत नव्हते. तोच डॉ. नी सेफटी रूमविषयी सुचवलं. प्रत्येक हॉस्पिटलात हिंस्त्र पेशन्ट्सना सांभाळण्यासाठी असणारी सेफटी रूम सुदैवाने इथेही होती. मेनकाला आत नेऊन एका खुर्चीशी पट्यांनी बांधण्यात आलं. ती आता ब्लॅकवल्चर मध्ये पूर्णपणे बदलली होती. शिव्या देणारी, स्वतःवरच दातओठ खाणारी मेनका... तिला स्वत्त्वाचं भानही राहिलं नव्हतं...
साहाजिकच गोंधळलेल्या डॉक्टरानी "हे काय?" असं विचारलं असता गौतम अंकलनी थोडक्यात तिची सद्य परिस्थिती त्यांना सांगितली. हॉस्पिटलात कॅटामाईन होतं पण तरी राईजोस्परच्या गोळ्या नव्हत्या. कॅटामाईन काही तासच तिच्यावर कंट्रोल ठेवू शकत होती. राईजोस्पर नसल्याने पुन्हा अटॅक येणे जवळजवळ निश्चित होते. त्यामुळे त्या आपत्तीचं चिंतन करत गौतम अंकल उभे होते. कॅटमाईनचं इंजेक्श्न जसं तिच्या शरीरात भिनलं तसं ब्लॅकवल्चर दुर्बल झाला ... गळू लागला ... पण ग्लानी येता येता "मी मारणार तिला ... हैवानेचा खून करणारच!" अशा शक्तिहीन धमक्या देतच त्याने त्राण सोडले.
गौतम अंकलसहित बाकी सारे स्तब्ध झाले होते. मेनकाचं हे अमानवी रूप त्यांना तिच्या आत्मपरिक्षणाची खरी कसोटी दाखवून गेलं. पडद्यावर सशक्त अभिनय करणारी मेनका आतून किती हतबल झालेली होती इतकी वर्षं ह्याचं प्रत्यंतर त्या खुर्चीशी बांधलेल्या तिच्या शरीराच्या बुजगावण्याला बघून येत होतं...
****************
मिपावर ह्या कथेचे बरेच भाग पोस्ट होत असल्याने काही सदस्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आलीय. म्हणूनच पुढील भाग मिपावर टाकत नाहीये. त्यासाठी संपूर्ण कथा इथे टाकलीय ...
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B-UuD...
इथे "फाईल -> डाऊनलोड ओरिजिनल अटॅचमेंट" करा.
प्रतिक्रिया
21 Aug 2011 - 10:29 am | आदिजोशी
आता जरा थांब. पुढचे भाग दमाने टाक. पहिल्या पानावर सद्ध्या तुझेच लेख दिसतायत. अनेक लेख लोकांनी वाचल्या शिवाय मागच्या पानावर गेले आहेत. त्यामुळे पुढचा भाग आता लगेच टाकू नकोस. इतरांचे लेखही पहिल्या पानावर काही काळ असू दे.
21 Aug 2011 - 11:43 am | विनीत संखे
संपूर्ण कथा इथे....
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B-UuD...
21 Aug 2011 - 1:39 pm | गणेशा
पुन्हा अप्रतिम पुढच्या लिखानाच्या प्रतिक्षेत आहे. ...
आणि एक प्लीज इमेल करा पुढचे भाग, येथुन ओपन होत नाहियेत.
मला तर क्रमशः चे कीतीही भाग येथे चालले असते.. पण इतर म्हणत आहेत तर तुम्ही नंतर टाका येथे काही हरकत नाही..
21 Aug 2011 - 2:14 pm | किसन शिंदे
धन्यवाद विनित, संपुर्ण कथेची लिंक इथे टाकल्याबद्दल... :)
21 Aug 2011 - 7:51 pm | विनीत संखे
ही कथा गुगल डॉक्स पब्लिकली शेयर्ड आहे. लॉगीनची गरज लागणार नाही.
22 Aug 2011 - 1:39 am | निमिष ध.
मस्त कथा होती एकदम. झकास !
22 Aug 2011 - 7:25 am | ५० फक्त
मस्त कथा, सर्वात महत्वाचे ह्याचे कापिराइट कुठे क्लेम केलेले आहेत का ? आधी ते करा अत्यंत गरजेचे. तुमच्या लेकराला तुमचं नाव लागणं फार महत्वाचे
22 Aug 2011 - 12:32 pm | विनीत संखे
"५० फक्त", नक्की कॉपीराईट करेन. फक्त कसं करायचं ते बघायला लागेल.
22 Aug 2011 - 10:46 am | शाहिर
अरे विनित ने कथा लिहिलि ..लोक वाच्तात ,, आव्डते म्हनुन प्रतिक्रिय देतात ..
कम्पू च्या टुकार लेखांना पहिला पान मिळत नसेल म्ह्णून गळे काढत असतिल .
अवांतर : एका सदस्याने ठराविक कालावधी मेधे किति लेख प्रकाशित करावे या संबधी काही नियम आहे का ??
संपादकांनी प्रकाश टाकावा
22 Aug 2011 - 11:41 am | मृत्युन्जय
अर्रे बापरे. ही तर एक पुर्ण कादंबरीच होती. एवढी मोठी सलग कादंबरी लिहु शकल्याबद्दल अभिनंदन. थोडी फिल्मी स्टाइलची आहे. पण तरीही तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
22 Aug 2011 - 11:52 am | इरसाल
विनीत सर्वप्रथम तुझे खूप खूप आभार.
बर्याच दिवसांनी एक छान, उत्कंठावर्धक आणि गुंतवून ठेवणारी कथा वाचायला मिळाली.
एक भाग वाचताना पुढचा कधी पुढचा कधी असं होत राहायचं आणि तू ते पूर्ण केलंस.
धन्यवाद.
तुझ्या पुढच्या लेखांची आतुरतेने वाट पाहणार/बघतोय.
(तुझ्या ज्या मित्राने तुला कल्पना देवून मदत केली त्याचेही आभार.)
23 Aug 2011 - 11:20 am | विनीत संखे
थांकु. :-)
22 Aug 2011 - 12:29 pm | विनीत संखे
धन्यवाद मित्रांनो.
:-)
22 Aug 2011 - 2:11 pm | पिंगू
डालो करतोय. पुर्ण वाचून व्यनीतून कळवेन. आतापर्यंतचे सर्वच भाग उत्कंठावर्धक होते आणि पुढील कांदबरीपण तशीच असेल अशी अपेक्षा बाळगून आहे.
- पिंगू
22 Aug 2011 - 9:12 pm | विनीत संखे
धन्यवाद.
:-)
22 Aug 2011 - 4:44 pm | प्रचेतस
धन्यवाद विनीत,
कथा संगणकावर उतरवल्या गेली आहे. सविस्तर वाचून काढण्यात येईल.
23 Aug 2011 - 12:12 pm | सामान्य वाचक
३ दिवस झाले या भागाला.
23 Aug 2011 - 12:43 pm | किसन शिंदे
पुर्ण कथेची लिंकच विनितने इथे टाकलीय, अन तुम्ही म्हणता पुढचा भाग टाका.
23 Aug 2011 - 12:46 pm | सामान्य वाचक
इथेच पुढचा भाग टाका, असे म्हणून राहीलो !
23 Aug 2011 - 12:53 pm | विनीत संखे
काय एरर येतोय
23 Aug 2011 - 1:10 pm | सामान्य वाचक
access denied!!!!!
23 Aug 2011 - 2:14 pm | विनीत संखे
https://doc-0c-ao-docsviewer.googleusercontent.com/viewer/securedownload...
23 Aug 2011 - 2:37 pm | सामान्य वाचक
आहे हो !
23 Aug 2011 - 3:03 pm | विनीत संखे
Email pathva msg karun. Mi Katha attach karun pathvato.
31 Aug 2011 - 11:59 pm | विनीत संखे
अहो सामान्य वाचक, मिळाली का लिंक?
23 Aug 2011 - 2:22 pm | साबु
मस्त झालिये कथा...
सगळी वाचुन काढली...
पु.ले.शु.
30 May 2015 - 2:27 pm | अविनाश पांढरकर
सगळी वाचुन काढली.
31 May 2015 - 11:35 pm | विनीत संखे
धन्यवाद अविनाशजी
31 May 2015 - 11:35 pm | विनीत संखे
धन्यवाद अविनाशजी
3 Jun 2015 - 12:03 pm | पेरु
ते डॉक्युमेंट माझ्याकडे ओपन होत नाहीये. शेवटचा भाग कसा वाचता येईल?
3 Jun 2015 - 1:01 pm | विनीत संखे
घरून करताय कि ऑफिस मधून? ऑफिसमध्ये ब्लॉक केलं असेल. मी कालच लिन्क पाहिली होती. चालत होती. मोबाईलवर ट्राय करा.
4 Jun 2015 - 1:56 pm | पेरु
ठिक आहे बघते करुन आज.
18 Jun 2015 - 8:46 pm | विनीत संखे
पेरू तुम्हाला डाऊनलोड करता आलं का?