करण आणि फ्रेण्ड्स .... भाग ६-८

विनीत संखे's picture
विनीत संखे in जनातलं, मनातलं
18 Aug 2011 - 11:43 am

आधीचा भाग ... http://www.misalpav.com/node/18855

भाग सहा

"आय थिंक ही इज गेनिंग कॉन्शसनेस! … करण कॅन यू सी मी?"
करणने डॊळे किलकिले केले. समोर करणचे फॅमिली डॉक्टर डॉ. श्रीनिवास करणकडे वाकून पाहत विचारत होते. करणने सभोवार नजर फिरवली. डॉक्टरांच्या सोबत आई होती, सॅवियो होता. उजवीकडे पूजा अन तिच्यासोबत कुणीतरी एक अनोळखी मनुष्य होता. आईचे डोळे रडल्यासारखे होते.
"करण बाळा कसा आहेस?", आईने करणला कवेत घेतलं. करणला थोडं कुठेतरी दुखलं.
"आह!", करण कळवळला तसं डॉक्टरांनी आईला बाजूला केलं.
"काय झालं? आई मी इथे...", करण विचारत होता
"यू आर ओके!", डॉक्टर म्हणाले, "छोटा ऍक्सिडण्ड झालाय. बस्स! उजवा हात फ्रॅक्चर आहे. आता महिनाभर विश्रांती!"
करणने उजव्या हाताकडे बघितलं. पांढरशुभ्र प्लास्टर बांधल्याने तो जड हात अगदी निपचित पडून होता.

"आता विश्रांती घे! उद्या क्लिनिकमधून डिस्जार्ज मिळेल... आता मी डॉक्टरांशी इतर फॉर्मालिटीज करून घेते.", आईनं उसनं हसून आणत म्हटलं, "आणि थॅन्क्स टू पूजा. तिच्याच गाडीशी तू आदळलास. तिनं आम्हाला फोन केला अन तुला इथे आणलं.", असं म्हणून आईने पूजाकडे कृतज्ञतेचा एक कटाक्ष टाकला अन ती निघून गेली.

करण दोन मिनिटं स्तब्ध होऊन पूजाकडे पाहू लागला. अधूनमधून त्याची नजर तिच्या मागे उभ्या असलेल्या माणसाकडे जात होती.

"थॅन्क्स!", करणने पूजाला म्हटलं.
"यू आर वेलकम. अरे डिनर वरून मी गौतम अंकलच्या गाडीतून घरी येत होते आणि एका वळणावर तू गाडीशी आदळलास. कित्ती घाबरलेच मी आणि पाहिलं तर तू आदळून बेशुद्ध झालेलास! मग मी आणि गौतम अंकलनी तुझ्या घरी फोन केला अन त्यांच्या सांगण्यावरून तुला इथे आणलं. ओह ऍण्ड बाय द वे, धिस इज गौतम अंकल... आय मिन मि. गौतम दोशी! अंकल धिस इज करण, मी तुम्हाला सांगितलेलं दॅट मेनका फॅन!", पूजाने दोघांची ओळख करून दिली. गौतम दोशीने करणच्या डाव्या हाताशी हॅण्डशेक केला.

"गौतम दोशी!!" करण हडबडला. चाळीशीतला, मध्यम बांधा असलेला, गहूवर्णीय, उंच अन फ्रेन्च दाढी असं मोजकंच रूप असलेला तो इसम म्हणजे खुद्द मेनकाच्या जीवनातला एक महत्त्वाचा माणूस! करणचा विश्वासच बसत नव्हता.

"हाऊ यू फिलिन?", अगदी अमेरिकन ऍक्सेण्ट मध्ये गौतम अंकल म्हणाले.
"फाईन!"
"वेल गुड! मला वाटलं तुला भरपूर लागलं की काय. तशी कार ३० च्या स्पिडनेच येत होती.", त्यांचं मराठी ऎकून करणला थोडा धक्कच बसला असावा. कारण त्यावर करणने तोंड उघडं राहिलं होतं. त्याचं ते ध्यान बघून पूजाच हसून म्हणाली, "हो गौतम अंकल इकडचेच आहेत मुळात. त्यांन मराठी छान येतं."

करणने थोडक्यात पूजाकडे स्तिमित नजरेनं पाहिलं अन तो पुन्हा गौतम अंकलकडे पाहू लागला.

"हो तुमची गाडी ३० ने येत असावी. माझी सायकलच त्यापेक्षा फास्ट होती.", करणने ओशाळत म्हटले, "...शिवाय मीच नो एण्ट्रीत घुसलो. आय ऍम सो सॉरी!"
"नो प्रोब्लेम सन.", गौतम अंकल समजवणुकीच्या स्वरात म्हणाले, "इट हॅपन्स समटाईम्स. वेल यू टेक केयर नाऊ, आय शुड ड्रॉप पूजा होम. इट्स लेट ऑलरेडी.", अंकलनी पूजाला इशारा केला तशी पूजाने पर्स उचलली.
"ओके करण बाय! टेक केयर. मी उद्या येईन.", असं म्हणून पूजाने गौतम अंकलकडे पाहिलं. गौतम अंकलनी मंद स्मित केलं अन करणला बाय करून ते निघून गेले. पूजाही त्यांच्या मागोमाग निघून गेली.

"काय ड्यूड! मेनकाच्या नादात हात पण मोडलास? मारामारी, ब्लडी वुण्ड्स, ब्रोकन बोन्स.... लगे रहो!", सॅवियोने बाजूची खुर्ची सरकावली अन त्यावर बसत त्याने नेहेमीची लुख्खागिरी सुरू केली.
करण फक्त हसला पण काहीतरी समजल्यागत म्हणाला, "पण तुला कसं कळलं की हे सगळं मेनकामुळे...", अन मग एक दीर्घ उसासा घेतला... रागातच.

"समीरने सांगितलं? हो ना? म्हणजे त्याने आईलाही चोमडेपणा केला असेल."
सॅवियो काहीही बोलला नाही पण थोडावेळात न रहावून म्हणालाच, "अरे पण समीरदादाची काय चूक?"
"काय चूक? हे बघ तो माझा भाऊ नाहिये. त्याने भावाभावांतली हद्द ओलांडली आहे, मेनकाला फडतूस आणि होर्र बोलून."
"कमॉन करण! आपणही स्कूलमध्ये कित्येक मॅडम्सना अन वाया गेलेल्या मुलींच्या नावाने स्वेअर करतोसच ना?"
"पण त्यांना आपण ओळखतो. त्यांच्याशी आपली खुन्नस असते. समीर मेनकाला ओळखत नाही, तरीही इतकं पर्सनल होऊन त्याने शिव्या द्याव्यात. मी कधी त्याच्या नेव्ही कलिग्स्ना किंवा त्याच्या देशपाण्डेसरांना पर्सनल शिव्या दिल्यात?"
करणच्या ह्या प्रश्नावर सॅवियो निरुत्तर झाला.
"पण शेवटी चुका होतातच ना रे! भाऊच आहे ना तो!"
"हो भाऊ आहे म्हणून मी काही जास्त बोल्लो नाही आणि तू म्हणतोयस तसा मोठाच भाऊ आहे तो, ही इज नॉट माय फादर. लहान भाऊ म्हणून मी त्याचा दम का ऎकून घेऊ?"
"मग भाऊ म्हणून माफ तरी कर ना..."
करणने सॅवियोकडे थोड्या गुश्यात संशयाने बघितलं, "पण तू का समीरची इतकी तरफदारी करतोयस?"
सॅवियो थोडा सावध झाला, "तसं नाही रे. मी म्हणजे तुमच्यात जमावं म्हणून. अजून काही नाही", असं म्हणून त्याने संवाद गुंडाळला.
पुढचे काही क्षण ‘काय बोलू?’ हे शोधण्यातच गेले. शेवटी सॅवियोने निळं मार्कर काढलं.
"जाण्याआधी गेट वेल प्लास्टर विशेस!", असं म्हणून त्याने मिस सोलंकीचं नेहेमीचं कार्टून करणच्या उजव्या हाताच्या प्लास्टर वर काढलं. त्याला जोडून तिच्या हाती पट्टी खाणारं स्वतःचंही एक कॅरीकेचर कोरलं आणि कमेण्ट लिहिली.... "सोलंकी मॅम, अहो करणचा ऍक्सिडेण्ट झाला म्हणून विशेस लिहित होतो... त्यातच ऊशीर झाला मग होमवर्क राहिला..."

कार्टूनमधल्या सोलंकी मिसचा चश्मा डोळ्यांवरून काढलेला होता अन कपाळावरच्या आठ्या कपाळात मावत नव्हत्या.

"गेस्स व्हॉट्ट? तू इथे असेपर्यंत मला अभ्यास न करण्याचा बहाणा मिळालाच.", सॅवियो हसला. करणनेही मग हसून दाखवलं अन त्या हलक्या फुलक्या मस्तीने दोघे सुखावले. सॅवियोने बाय केलं अन तो निघून गेला. सॅवियो सारखा मित्र असणे कदाचित त्यावेळी करणसाठी सर्वात मोठी दिलासादायक गोष्ट होती.
सॅवियो हॉस्पिटल वॉर्ड मधून बाहेर पडताच समोर समीर दिसला. सॅवियोने हताशपणे समीरच्या समोर जाऊन खांदे पाडले.
"मी त्याला सांगायचा बराच प्रयत्न केला. पण तो भरपूर भडकलाय. काहीच एकून घेत नाही."
"नो प्रॉब्लेम सॅवियो. तू तुला जमेल तवढं ट्राय केलंस ना. तेवढच पुष्कळ आहे. थॅन्क्स एनिवेज़.", समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं. सॅवियोने डोळ्यांतल्या डोळ्यांत सॉरी म्हणून समीरचा निरोप घेतला.

समीर हळूच करणच्या रूमच्या दाराकडे जाऊन पडद्याड करणकडे पाहू लागला. करणने बिछान्यावर डावी बाजू घेतली होती. त्यामुळे त्याचा चेहेरा दिसत नव्हता. पण तो जागाच असावा. त्याचे तळपाय हलत होते. करण नर्व्हस किंवा रागात असे तेव्हाच त्याचे पाय असे हलत असत. समीरने तिथूनच माघार घेतली. समोरून आई येत होती.

"भेटलास?"
"नाही."
"का?"
"पुन्हा रागावून काहीतरी बोलायचा."
"पण ही वेळ येऊ द्यायचीच का? मी तुला त्याच्याशी बोल असं सांगितलं ते काय ह्याच्यासाठी?"
"अगं सगळं नीट जमेल असं मला वाटलं होतं."
"समीर विचार कर जर तो आत्ताच असा वागू लागला तर त्याला खरं काय ते सांगायची वेळ येईल तेव्हा तो कसा रिऍक्ट करेल? मी त्याची आई नाहीये असं जर त्याला..."

समीरने चिंतीत डोळ्यांनी आईकडे पाहिलं. आज तेरा चौदा वर्षांनी हे गुपित प्रत्यक्षात बोललं गेलं होतं. त्याच्या विचारानेच समीरचं हृदय धडधडू लागलं. आईनेही तिचं वाक्य मध्येच गिळलं.

"आता काय करायचा विचार आहे?", आईने पृच्छा केली.
"तू काहीतरी करू शकशील का?"
"बघेन. त्याचा मोडलेला हात पाहूनच मला कसंसंच होतं. नाही बघू शकत रे मी त्याला अशी. नाही झाला तरी माझाच वंश आहे ना तो."

समीरलाही मग कसेसेच झाले. त्याचाही डॊळ्यांत ओलावा दाटला. मग आजचा दिवस असाच जाऊ द्यावा हे दोघांमते ठरलं.

*******************

भाग सात

आजची करणची सकाळ उल्हासित होती. कारण पूजा त्याला भेटायला आली होती.

"कसं सगळं अचानक घडलं ना?", पूजाने भुवया उडवत म्हटलं, "म्हणजे सकाळीच मी तुला बॉलिंग ऍलीत भेटले अन संध्याकाळी तू हॉस्पिटलात. माझ्याच गाडीपुढे येऊन. इट्स वियर्ड!"
करणही हसला, "हो वियर्ड! दॅट वॉज सम सन्डे!"
पूजा हसली अन दोघे गप्प झाले. अजूनही त्या दोघांना बोलायला काहीतरी शोधणं मुश्किल जात होतं. प्रत्येक दोन तीन डायलॉग्स नंतर चांगला दोन तीन मिनिटांचा पॉज असे.
"मॅगझिनमध्ये मेनकाचा इण्टरव्हू छापून आलाय." त्याने संभाषणाचा बाज बदलला.
"खरंच?", पूजाने विचारले, "काय गॉसिप छापलंय यावेळेस?"
"काही नाही नेहेमीचच. पण थोडं सेन्टीमेण्टल कव्हरेज आहे यंदा."
"म्हणजे?", पूजाने विचारलं तसं करणने तिला पान सात दाखवलं.
पूजा काही वेळ तो इण्टरह्यू वाचत होती. तिलाही तो थोडा इमोशनल वाटलाच. तिच्या चेहेऱ्यावरचे भाव सांगत होते.
"हम्म्म!", पूजा आर्टीकल संपवत म्हणाली, "आय ऍम नॉट सप्राईझ्ड!"
"का? यू थिंक इट्स फेक?", करणने गोंधळून विचारले.
"नाही रे असं नाही... पण", पूजा थांबली. सांगू की नको असं तिला झालं असावं. त्यात करणचा गोंधळलेला चेहेरा पाहून तिला कसंनुसंच झालं.
"ओके... हियर इट गोज...", पूजाने म्हटले, "काल बॉलिंग ऍलीत ठरल्याप्रमाणे मी गौतम अंकलना मेनकाविषयी विचारलं ..."
करणने कान टवकारले. तो उत्साहित झाला, "... आणि?"
"आणि मला त्यांनी सांगितलं की ते आणि मेनका चांगले फ्रेण्ड्स आहेत. मेनका स्ट्रगलिंग ऍक्ट्रेस्स होती तेव्हा तिला पहिला पिक्चर मिळाला अन त्यासोबत तिने आणखी तीन चित्रपट साईन केले. पहिल्या चित्रपटात ती एवढी बिझी झाली की मग दोघे कामानिमित्त खूप क्वचित एकमेकांना भेटू लागले. मग अंकलनी पुढाकार घेऊन मेनकाला लग्नाची मागणी होती."
"मग?", करण एक्साईट झाला होता... "काय केलं तिनं?"
पूजाने पॉज घेतला, "साहाजिकच नाही म्हटलं."
"का?"
"कारण सांगितलं नाही. पण एवढं मात्र म्हणाली की तिच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडल्यात ज्याने तिचा लग्न किंवा कंपॅनियशिपवरून विश्वास उडालाय... हेही म्हणाली की गौतम अंकल डिजर्व्स समवन बेटर दॅन हर."
"?", करणच्या चेहेऱ्यावर मोठा ‘का?’ उमटला होता.
"बेटर दॅन हर? इज शी किडींग??"
"नोप. असंच म्हणाली ती."
करण गप्प झाला. जिच्यावर सारा भारत आणि बॉलिवूड फिदा आहे तिला स्वतःविषयी एवढा न्यूनगंड?
"अंकलनी तिला विचारायचे प्रयत्न केले पण ती काहीच म्हणाली नाही. फक्त रडत होती."
"ओह!", करण भावनाविवश झाला, "मग पुढे?"
"पुढे काय मग. तिला लग्नात इन्टरेस्ट नाहीये म्हटल्यावर पुढची मैत्रीही एकत्र राहून सांभाळणे अवघड ठरणार होतं. गौतम अंकलना यूएसला जायचं होतं. म्हणून मग ते वेगळे झाले. टेलिफोनी व्हायची अधून मधून. बहुदा अंकलच करायचे. पण मागल्या महिन्यात तिनंच अंकलना फोन केला अन काहीतरी सांगायचंय म्हणून म्हणाली. अंकल इंडियाला येणार होते ह्या आठवड्यात. येऊन तिला भेटले. ह्यावेळॆसही मिटींग मध्ये पुन्हा रडत होती. तशीच..."

करणला अजून वाईट वाटू लागलं होतं

"ह्याखेपेस कारण सांगितलं", पूजाने करणकडे दुःखी डॊळ्यांनी पाहत म्हटले...
... करण उत्तराच्या अपेक्षेत होताच...

"गर्भाशयाचा कॅन्सर आहे तिला. म्हणून तिचं यूटेरस काढून टाकलंय!"

"व्हॉट़्ट??", करणला मोठ्ठा धक्का लागला. जणू तो क्षणही त्या दुःखाच्या वेदनेने कण्हला असावा. करणचा हात त्याच्या ओठांवर गेला.
"आर यू श्युर?"
"हो.", पूजाही अस्वस्थ झाली, "अंकलना खूप वाईट वाटलं. सारखी बोलत होती, मी कधी आई होऊ शकणार नाही म्हणून. सारखी रडत होती."
"ओह माय गॉड!", करण अगदी निरूत्तर झाला होता. ही हॅड नो आयडीय़ा दॅट हिज एंजल हॅज सफर्ड सो मच!

"कुणाला सांगू नकोस हे.", पूजाने करणच्या हातावर हात ठेवला, "प्रॉमिस? स्वतः अंकल मला सांगत नव्हते. पण मी स्वतःची शपथ देऊन त्यांना बोलतं केलं."
करणने दीर्घ उसासा घेतला. ही अशी बातमी होती जिची वाच्यता करून मेनकाला, करणला आणि तिच्या फॅन्सना अजून त्रासच झाला असता. त्याने पूजाच्या प्रश्नावर होकारार्थी मान डोलावली. पूजाने आऊट ऑफ नॉर्म जाऊन त्याच्या साठी ही बातमी आणली होती. म्हणून ह्या गोष्टीची गुप्तता राखणं त्याचंही तेवढंच कर्तव्य होतं.

"शी इज ओके नाऊ. तिच्या जीवाला तसा काही धोका नाहीय. बट नन्दलेस...", पूजाने म्हटलं अन ती गप्प बसली. अजूनही तिचा हात करणच्या हातावरच होता.
दोन मिनिटं दोघे हातात हात घालूनच बसले होते. त्यांच्या ऊशीरा लक्षात आलं अन पूजाने ओशाळून हात दूर सारला.
"माहितीये?", काहीतरी ऑफटॉपिक व्हावं म्हणून मग पूजाच म्हणाली, "कालपासून पासून शाळेत तुझ्याच बाता चाल्ल्यात. नव्या नव्या रूमर्स उठल्यात तुझ्या ऍक्सिडण्ट बद्दल."
करणनं त्यावर चमकून पाहिलं, "म्हणजे?"
"म्हणजे कुणीतरी म्हणत होतं की तुला अचानक मेनका दिसली गाडीतून जाताना म्हणून तू तिचा पाठलाग करत होतास. दानिश शाह म्हणत होता की तिच्या नव्या मॅगझिनमधला फोटो तुला आवडला नाही म्हणून तू रागावून सायकल चालवत होतास. सोलंकी मिसनं मलाच गाठलं अन विचारलं की करण तुझ्या गाडीच्या मागे लागला होता का? पुढे हेही म्हणाल्या की ही इज सच ग गुड बॉय. व्हाय वुड ही डू सच थिंग?"

करण थोडा घाबरलाच, "काय म्हणालीस? खरं?"

"हो रे! पण जस्ट रूमर्स...", पूजाने हसत मान थोडक्यात झटकली.
"मलाही तसं नक्की काय झालं ते माहित नव्हतं. म्हणून मीही सगळ्यांना खरं काय ते सांगू शकले नाही... पण ... करण ... ", पूजाने खाली मोबाईलशी चाळे करत धीर एकवटून विचारलंच, "नक्की ... काय झालेलं रे?"

करण गप्प झाला, "तुझं समीरशी बोलणं झालयं वाटतं ... का खरंच तुला माहिती नाहिये?"

"नाही रे काहीच माहित नाहिये. खरंच. फक्त तुझं अन समीरदादाचं भांडण झालेलं एवढंच...", पूजाने करणकडे पाहिलं, करण थोडा रागवलेला दिसत होता. त्यावर पूजा डिफेन्सिव झाली, "म्हणजे मला सॅवियोने सांगितलं."
करण गप्पच होता. आता त्याने मान खाली घातली, "मग कारणही सांगितलं असेलच."
पूजाने फक्त होकारार्थी मान डोलावली, "बट करण..."
"हे बघ", करण तिची बाजू सुरू न करू देतच म्हणाला, "जे काही आहे ते माझ्यात अन समीरदादात आहे. ते आम्ही बघू. तुला अन सॅवियोला त्रास करून घ्यायची गरज नाहीये."
पूजा हिरमुसली. करणला आपण तिच्याशी जास्त अगतिक झाल्याचं उमगलं.
"सिरियसली इट इजण्ट अ बिग डील. आय मीन तुम्ही उगाच त्रास का करून घेताय?"
"बिग डील नाही मग समीरदादाशी दोन दिवसांपासून बोलला का नाहीस?", पूजाने लगेच प्रतिप्रश्न केला.
यावर करण पुन्हा गप्प झाला, "चूक त्याची आहे."
"पण सॉरी म्हणतोय ना तो."
"कधी म्हणाला? माझ्या रूममध्येही आला नाहीय तो अजून. तेवढीही त्याच्यात सेंसिबिलिटी नाहीय.", करण रागात बोलला.
"असं? मग हे प्लास्टर वर काय आहे तुझ्या?", पूजाने दर्शवलं तसं करण उजव्या हाताच्या प्लास्टर वर बघू लागला.

सारं प्लास्टर लाल स्केचपेनने लिहिलेल्या "सॉरी! प्लीज फर्गिव मी!" च्या विनंतीनं भरलं होतं!

करण दोन मिनिटं गहिवरलाच. सकाळी उठल्यापासून त्यानं प्लास्टर पाहिलंच नव्हतं.
"सी! ही इज जेन्युईनली कन्सर्न्ड.", पूजा म्हणाली, "त्याने आपली चूक मान्य केलीय."
पण करण विरघळला नव्हता, "जोपर्यंत तो पर्सनली सॉरी बोलत नाही तोपर्यंत मी त्याला माफ करणार नाही..."

तेवढ्यातच "आय ऍम सॉरी!" असं कुणीतरी म्हणालं. पूजा अन करण दाराकडे पाहू लागले.

हा समीर होता.

"करण आय ऍम रीयली सॉरी.", समीरने पुन्हा म्हटले. करणच्या डॊळ्यांत बघायची समीरला हिम्मत होत नव्हती. पूर्ण रूम गप्प झाली. करण काय बोलतोय हे पाहण्यासाठी पूजाने त्याच्याकडे पाहिलं. करण त्याचं प्लास्टर डाव्या बोटांनी कोरत होता. त्याचे पाय अंथरूणातच हलू लागले होते. मनात भावनांचा कल्लोळ पुन्हा माजला असावा. समीरने पूजाकडे पाहिलं. पूजा समजली.
"लूक! तो आला अन त्याने सॉरीही म्हटलं आता. आता तरी भांडण संपवना."
"नाही", करण समीरकडे न बघता म्हणाला, "मी बरंच काही ऎकून घेतलंय. मला वेळ लागेल."
"अरे भावाला माफ करायला कसला वेळ? थोडा विचार कर.", पूजाने प्रश्न केला.
"भांडण त्याने वेळ पाहून किंवा विचार करून केलं नाही. मग मी का विचार करू?", करणने हट़्ट सोडला नाही, "आय जस्ट डोण्ट वॉण्ट टू लिसन टू एनिवन ऍट धिस मोमेण्ट!"
रागाच्या भरात आपण पूजा प्रधानलाही गप्प रहायला बोलून गेलो हे करणला ऊशीराच ध्यानात आले. खोलीत बराच अवघडलेला पणा जाणवायला लागला होता. समीरनं तिथून जाणं अत्यावश्यक होतं. तो चुकल्यासारखा चेहेरा करून तिथून निघून गेला. इकडच्यापेक्षा इतर कुठतरी आज दिवस घालवावा असं वाटून त्याने आईला सांगून ऑफिसची वाट धरली. इकडे पूजानेही तिची स्कूलबॅग उचलली.

"बाय देन!"

करण गप्पच होता. पूजा दारापर्यंत गेली. करणला राहवले गेले नाही.

"पूजा!", करण ओरडला, "सॉरी. मला तुला जायला सांगायचा माझा अजिबात मानस नव्हता."
पूजा वळली, "इट्स ओके. नाहीतरी ऊशीर झाला आहे. मी निघायला हवं, स्कूलला जायंचय."
"मग पुन्हा कधी येशील?", करणने अजीजीनं विचारलं, "आज जरा ऑकवर्डच सिच्युएशन झाली इथे."
"येईन ना ऊद्या. ओह बाय द वे!", असं म्हणून ती बॅगेत काहीतरी शोधू लागली, "हे गौतम अंकलनी मला त्यांचे जुने फोटोग्राफ्स दिलेत. त्याबद्दल नंतर शेयर करीन. आता निघायला हवं." असं म्हणून तिनं बॅगेतून एक फोटो आल्बम काढून तो करणच्या हवाली केला अन ती निघून गेली.

पूजाने सोबत आणलेला सकाळचा आनंद ती जणू परत स्वतःबरोबर घेऊन गेली असावी कारण ती गेल्यावर रूम पुन्हा भकास वाटू लागली होती.

*******************

भाग आठ

आज हॉस्पिटलातून डिस्चार्ज व्हायची वेळ आली. आईने सगळी आवरावर केलेली. करण प्लास्टर केलेला उजवा हात गळ्यात अडकवून जायला तयार झाला होता. सॅवियोने खास करणसाठी आज शाळेतून अर्धा दिवस सुट़्टी घेतली होती. समीरसुद्धा आज ऑफिसात जाणार नव्हता.

"घेतलंस ना सगळं?", आईने समीरला शेवटचा प्रश्न केला. सामान उचलण्यात गुंतलेला समीर "हो" एवढच मोजकं बोलून बाहेर निघून गेला. करणच्या खोलीत त्यापेक्षा जास्त बोलायची समीरला जणू मनाईच होती. तिथे बाहेर सॅवियो समीरनं आणून दिलेलं सामान गाडीत हलवित होता. अन इथे डॉ. श्रिनिवास करणचं शेवटचं इन्स्पेक्शन करत होते.
"ओके आता पुढे तीन आठवडे ऑर्थोपेडिक मेडिसिन्स आणि व्यायाम करायला लागेल. दुखेलही अधून मधून. पण इलाज नाही. म्हणजे ऍक्सिडण्डमध्ये दुखलं तेवढं दुखणार नाही.", डॉक्टर करणला आश्वस्त करत म्हणाले, "डॊण्ड वर्री!".
"श्युर!", असं हळूच म्हणून करणने डोळे फिरवले, "दॅट हेल्प्स!!!".
करणने उपहास केला तसे आईने डोळे वटारून त्याला तंबी दिली.
"लूक करण! व्यायामाशिवाय पर्याय नाही. अजून एक आठवडा तरी व्यायाम करायचा नाहीये. फक्त मेडिसिन्स घ्यायचीत. त्यानंतर तू शाळेत जाऊ शकतोस. बस्स आणखी तीन आठवडे आणि तसं पुढच्या आठवड्यात प्लास्टर तर निघेलच. ", डॉक्टर म्हणाले.
तेवढ्यावर सुटकेचा निश्वास टाकून करणने मान डोलावली. डॉक्टर निघाले तसं करणही जॅकेट घालून जायला तयार झाला. ह्या डिप्रेसिंग हॉस्पिटलमधून मधून कधी घरी जातोय असं त्याला झालं होतं.
"ओके. लेट्स गो!", समीरने रूमच्या बाहेरूनच हाक दिली. सगळे हॉस्पिटलच्या बाहेर आले अन गाडीपाशी थांबले. सॅवियो अजूनही ट्रंकमध्ये सामानची मांडणी करत होता. करण आला तसं समीरने कारचं पुढचं दार त्याच्यासाठी उघडलं. करणने समीरकडे न बघताच मागचं दार स्वतःच डाव्या हाताने उघडलं अन तो मागच्या सीटवर जाऊन बसला.

समीर हिरमुसला अन त्याने आईला पुढे बसायला सांगितलं. सॅवियोने स्वाभाविकपणे करणच्या सोबत मागे बसणे पसंत केले. १० मिनिटं कार मध्ये शांतताच होती.
"दानिश शाह तुझी आठवण काढतोय", सॅवियोने कोंडी फोडली.
"का?", करणने विचारलं.
"फ्री होमवर्क...", असं म्हणणार तोच आपण करणच्या फॅमिलीसोबत बसलोय हे सॅवियोच्या ध्यानात आलं. त्याने शब्द गिळले.
"आय मीन त्याचं मॅगझिन तुझ्याकडे आहे म्हणून … शिवाय तू लॅबमध्ये हेल्प करणार होतास ना त्याबद्दल..."

करणने उसासा टाकला, "अरे आता माझीच वाट लागलीय. होमवर्क, प्रॅक्टीकल्स, जर्नल्स. नेमका उजवा हात मोडलाय. लिहिणार कसं? तू त्याचं मॅगझिन देऊन टाक उद्या शाळेत."
"ते मी करीन", सॅवियोने लगेच म्हटले, "तुला होमवर्कमधे हेल्प पण करीन. त्यात माझाच फायदा आहे. मलाही तुझा होमवर्क कॉपी करायला मिळेलच ना...", सॅवियोच्या चेहेऱ्यावर मिश्किलीची नांदी होती.
"सॅवियो!", करण चकित झाला, "तू प्रत्येक दिवशी माझा अन तुझा असा दोनदा होमवर्क लिहिणार? बरायस ना? तुझे एकदाच होमवर्कचे वांधे होतात...", करणने भुवया उंचावल्या.
"हाहा", सॅवियोने खॊटं हसून दाखवलं, "डोण्ट गेट विकेड ओके! एरवी होमवर्क सोबत सोलंकी मिसचे पनिशमेण्ट सम्स करतोच ना मी. तोही डबल होमवर्कच असतो एका प्रकारे!", सॅवियोने म्हटलं तसं गाडीत थोडं हास्य पसरलं. कार चालवत समीरही गालातल्या गालात हसला.
"ओह! बाय द वे सोलंकी मिस काल तुझ्याविषयी मला विचारत होत्या", सॅवियोने आणखी एक अजब गोष्ट सांगितली, "कधी नव्हे ते माझ्याशी नॉर्मल टोनमध्ये बोलल्या."
"काय म्हणतोस?"
"मग काय! आणि आजकल आणखी एक गोष्ट ऑब्झर्व केलीय मी... त्यांच्या कपाळावर तेवढ्या आठ्या नाहीयेत जेवढ्या मी कार्टून मध्ये काढतो..."
सोलंकी मिस अन सॅवियो ह्या टॉम ऍण्ड जेरी जोडीचं अचानक कसं काय जमलं हेच कितीतरी वेळ करण स्वतःला पुसत होता. त्याचं उत्तर शोधेपर्यंत घर आलंही.
"आई तू जाऊन दार उघड मी सामान आणतो", समीरने आईला सांगितलं अन उतरून करणच्या बाजूचं कारचं मागचं दार उघडलं. पण करण सॅवियोसोबत दुसऱ्या दाराने उतरला. समीरला इरीटेट झालं. त्याने रागातच स्वतः उघडलेलं दार आपटलं अन ट्रंक उघडून दोन बॅगा खांद्यावर घातल्या. करणसाठी न थांबता तो घरात गेला अन करणच्या खोलीत जाऊन त्याचं सामन ठेवून स्वतःच्या रूममध्ये जाऊन दार बंद करून बसला.
आई आल्या-आल्या किचनमध्ये घुसली. सॅवियो अन करण त्याच्या खोलीकडे आले अन सॅवियोने करणसाठी दार उघडले. करण थोडा गुश्श्यातच त्याच्या अंधाऱ्या खोलीत शिरला. मागे उभ्या सॅवियोने दिवे लावले अन तो ओरडला.

"सप्राईज!"

भोवताली बघत दोन मिनिटं करण स्तब्ध उभा राहिला होता. त्याच्या खोलीला नवा रंग दिला होता. अन साऱ्या भिंतींवर मेनकाचे नवे पोस्टर्स अन कोलाज कोरलेले होते. एवढच नाही तर खिडकींवरचे पडदेही मेनकाच्या फोटोंनी एम्बॉस केलेले होते...
"काय मग! आहे ना नाईस सप्राईज?"
"हे थॅक्स!", करणचा चेहेरा उजळला होता.
"मला कशाला थॅन्क करतोयस? समीरला कर. त्याचीच आयडिया होती ही."
ते एकल्यावर करणचा आनंद झटकन मावळला. पुन्हा रागीट आवेशात तो म्हणाला, "म्हणजे त्याला माफ कारण्यासाठी तो मला ब्राईब देतोय असं म्हण ना?"

सॅवियोने ‘च्च’ केलं.

"काय रे करण! तुझा प्लास्टर सांगतंय की त्याने तुला आधीच सॉरी म्हटलंय. पूजाही सांगत होती की परवा त्याने तुझ्या समोर तुझी माफी मागितली. अन इकडे रूमचं डिकॉर तीन दिवसात करवून घेतलं. मला सांग कुठला भाऊ एवढं सगळं करेल?"
"हे बघ सॅवियो! तू समीरची बाजू घेणं बंद कर. मला जेव्हा वाटेल दॅट ही इज ट्रूली सॉरी तेव्हाच मी त्याला माफ करीन."
"ट्रूली सॉरी? ह्ह!", सॅवियो म्हणाला, "लूक अराऊण्ड यू! एवढं तर पॅरेण्ट्सही आपल्या मुलांसाठी करत नाहीत. स्टॉप बिईंग सो स्टबर्न करण. एनीवेज टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. तूही त्याला रागात काय काय बोल्लास ना? मग त्याने मोठा भाऊ म्हणून तुझं का ऎकून घ्यायचं? मीही क्रिस्टलचा मोठा भाऊ आहे. ती कधी माझ्याशी अशी वागली तर मी तिला समोर उभं करणार नाही. इन फॅक्ट समीर हॅज अ बिग हार्ट टू डू ऑल धिस फॉर अ स्टुपिड फाईट!", सॅवियोला करणचा राग पटत नव्हता.
"स्टुपिड फाईट!", करणने आवाज चढवला, "आय नो व्हॉट्स हॅपनिंग हियर. हे सगळं सांगायला त्याने तुलाही ब्राईब दिलीय."
"ब्राईब! सो यू थिन्क आय टूक अ ब्राईब?", सॅवियो चिडला, "यू नो व्हॉट! आय ऍम राईट. यू आर स्टबर्न. नो स्टबर्न ऍण्ड रुड ऍण्ड सेल्फिश! येस दॅट्स व्हॉट यू आर... अ पिग. यू डॊण्ट केयर फॉर युअर फॅमिली. युअर फ्रेण्ड्स... आम्ही सगळे मूर्ख आहोत तुला एवढा भाव द्यायला. यू जस्ट केयर अबाऊट युअरसेल्फ. अदर पीपल्स इमोशन्स आर लाईक अ टॉय फॉर यू!"
"ओ याह? देन डोण्ट बी फ्रेण्ड्स विथ मी. गेट लॉस्ट फ्रॉम हियर! आय डॊण्ट वॉण्ट टू सी यू!!!", करणने रागात दार उघडले अन सॅवियोला जायला सांगितलं

सॅवियो दोन मिनिटं जळजळीत नजरेने करणकडे बघत होता.

"फाईन! गो टू हेल्ल!", असं म्हणून सॅवियो तणतणत घरातून निघून गेला. करणने रागात दार आपटले. दार आपटल्याचा प्रतिध्वनी कितीतरी वेळ त्यानंतर घरात घुमत होता. किचनमध्ये काही सेकंद शांतता पसरली होती. आईने सगळं ऎकलं होतं.

समीरच्या रूमच्या दारावर टकटक झाली. ही आई होती.

"मला तर कळतच नाहीये ह्याचं काय करावं?"
"म्हणजे?", समीर डॅन ब्राऊनच्या डिजीटल फोर्ट्रेसच्या पानांत घुसला होता.
"करण अन सॅवियो. भांडले."
समीरनं पुस्तकाचं पान शांतपणे उलटलं.
"मी काय बोल्ले ऎकलंस ना?", आईने थोडा आवाज चढवला.
"मग मी काय करू असं तुझं म्हणणं आहे?", समीरनं त्रासिक स्वरात विचारलं.
"हॉलिडे मूडमध्ये वागून काही साध्य काही होणार नाही. जरा मोठ्यांच्या जबाबदारीने वाग."

समीरनं पुस्तक दूर सारलं. तो ऊशीला टेकून नीट बसला.

"अग पण मी आणखी काय करू?", समीर थोडा रागात दिसत होता, "मला काहीच कळत नाहीये. एकतर तूही मला मदत करत नाहीस."
"हा प्रोब्लेम तुझा अन त्याचा आहे. मी मध्ये पडणार नाही.", आईने स्पष्ट केलं, "तू माझा सख्खा मुलगा आहेस. मी तुला काय ते नीट सांगू शकते. त्याला समजावणं तुलाच करायचंय."

"पण...", समीरचा प्रश्न संपण्याधीच आई तिथून निघून गेली.

समीर हताशपणे उठला.

दारापाशी कुणीतरी आल्याचं करणला कळलं. त्याने दार उघडलं. समीरला समोर बघून करण मागे फिरला अन आत जाऊन कॉम्युटरसमोर बसून उगीच इथे तिथे माऊस क्लिक करू लागला. मेनकाची वेबसाईट कॉम्प्युटरवर दिसत होती. समीर आत शिरला अन त्यानं सभोवताली बघितलं. करणची ही खॊली मागले दोन दिवस सजवताना बरीच उल्हासित वाटत होती. पण आज तिचा मूड काळवंडलेला होता. दोन दिवस केलेली सारी मेहेनत फुकट गेलेली वाटत होती.

"मला तुझ्याशी बोलायचंय.", समीरने आज चार दिवसांनी पहिल्यांदाच पूर्ण वाक्य करणला उद्देशून म्हटलं होतं.
"मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही.", करणने सरळ आवाजात म्हटलं.
"मला तुझी माफी मागायचीय."
"मी विचार करून सांगेन!"
"करण! प्लीज", समीर करणच्या बाजूच्याच खुर्चीत बसला, "लूक! मला माफ कर. आय नो आय ऍक्टेड लाईक अ जर्क! पण मी काहीतरी करू शकतो ज्याने तुला विश्वास होईल की आय ऍम सॉरी. लूक! मी खरोखरच ऍमबॅरेस्ड आहे. मी काय करू? तूच सांग!"
"मी काय सांगणार? मेनकाला शिव्या देताना तुला काही सुचलं नाही. आता मलाच विचारतोयस?"
"आय सेड आय ऍम सॉरी फॉर दॅट. ओके फाईन... मग मी असं काही करू शकतो ज्याने तुझा मूड बरा होईल? हे बघ मी ही रूमही त्यासाठीच सजवलीय. जस्ट टू चियर यू अप!"

"इट्स नॉट अबाऊट धिस रूम. इट्स नॉट अबाऊट मी ऑर मेनका. इट्स अबाऊट यू ऍण्ड युअर फिलींग्स टू हर. तू तिला काय काय बोल्लास. त्या फाईटचे कॉसिक्वेन्सेस...", असं म्हणून करणच्या डोळ्यांत पाणी तराळलं, " माझा उजवा हात तुटला. त्याने आता मी डाव्या हाताने होमवर्क करू शकणार नाही. वेबसाईट चेंज करू शकणार नाही. नेक्स्ट वीक मेनकाचा बर्थडे आहे. तिचा नवा प्रोफाईल अन इण्टर्व्ह्यू मला वेबसाईटवर टाकायचा होता. मी फॅनक्लब्सच्या वेबसाईट कॉम्पिटीशन मध्ये भाग घेणार होतो. आय वॉज सो एक्साइटेड अबाऊट ऑल धिस... अनटील वी हॅड दॅट फाईट .... इट्स ऑल ऋईन्ड!"
समीर गप्पच होता. करणचे डॊळे पाणावले होते.

"मी मेनकाला एक प्लेजण्ट सर्प्राईझ देणार होतो. तिची ही वेबसाईट बनवून. मला वाटलेलं मी ती कॉम्पिटीशन जिंकेन..." अन एवढं बोलून तो गप्प झाला. त्या शांततेत करणची हलकी स्फुंदकेच फक्त ऎकू येत होती.
"पण असं धीर सोडून कसं चालेल करण.", समीरनं खाली बघतच म्हटलं, "मला वाटतं यू कॅन स्टील विन इट!"
"ह्ह! हाऊ? ह्या तुटलेल्या हाताने?"
"मी मदत करीन.", समीरने आशेने करणकडे बघितलं, "आय मीन तू मला सांगशील तसं मी करेन."
करण नकारार्थी मान हलवत होता.
"प्लीज. एक चान्स दे फक्त! बघ मी तुझी वेबसाईट तयार होईपर्यंत ऑफिसला जाणार नाही. तुला हवं तेवढा वेळ मी कॉंप्युटर वर बसेन. तुला हवी तशी वेबसाईट बनवेन. फक्त एक चांस दे. भाऊ म्हणून. प्लीज! आय बेग यू."

करणने पाणावलेल्या डोळ्यांनी समीरकडे पाहिलं. समीरची विनंती धुडकावून लावावी असा विचार करणला क्षणभर चाटूनही गेला पण समीरच्या डोळ्यांत पश्चातापाची छटा दिसत होती. समीरचे डॊळेही पाणावलेले होते. करण काहीही बोलत नाही हे बघून समीरने करणच्या डाव्या खांद्यावर हात ठेवला अन तो आपुलकीने दाबला.

"सॉरी ब्रो!".

करण अजूनही अस्फुटसा स्फुंदत होता.

"चकण्या ल्युटिनण्ट कमांडर देशपाण्डे!", समीरने म्हटले.
करण गप्प झाला. चार पाच सेकंदानी मग करणचा हलका आवाज आलाच
"चकण्या ... सडू ... ल्युटिनण्ट कमांडर देशपाण्डे."

समीरच्या चेहेऱ्यावर हास्य फुललं. त्याने "येस्स सर!", असं म्हणून करणला नेव्ही स्टाईल सल्यूट मारला अन एकदम दोघे हसायला लागले....

.... अचानक त्यादोघांत साचलेलं ते मळभ दूर झालं होतं अन करणची खोली हास्यानं उजळली होती.

**************************

(पुढचा भाग ... http://www.misalpav.com/node/18868)

कथालेखप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रास's picture

18 Aug 2011 - 12:12 pm | प्रास

नि छान लिहिताय संखे!

पुलेप्र आणि पुलेशु

:-)

विनीत संखे's picture

18 Aug 2011 - 12:18 pm | विनीत संखे

आधीच सगळं लिहिलंय... आता फक्त पोस्ट करतोय.

कथानकाच्या वेगाबद्दल बोलत होतो मी....

:-)

अप्रतिम लिहिले आहे.
कथानक माझ्या इम्याजिनेशनच्या पलिकडचे आहे तरी समरसुन ठेवणारे शब्द.. वातावारणनिर्मिती आवडली.

असेच लिहित रहा... वाचत आहे...

धनुअमिता's picture

18 Aug 2011 - 3:50 pm | धनुअमिता

अप्रतिम लिहिले आहे.

असेच लिहित रहा..

पुढिल भाग लवकर येउ द्या.

orkut var kuthe vachayala milel. pls sanga

किसन शिंदे's picture

18 Aug 2011 - 4:06 pm | किसन शिंदे

पुढचा भागही पटकन पोस्ट करून टाका....करण समीरचा सख्खा भाऊ नाहीये हे वाचून शॉक झालोय...पुढे काय होतेय याची उत्सूकता आहे.