करण आणि फ्रेण्ड्स ... भाग ३-५

विनीत संखे's picture
विनीत संखे in जनातलं, मनातलं
18 Aug 2011 - 12:01 am

आधीचे भाग ... http://www.misalpav.com/node/18850

भाग तीन

"आई गं!", सॅवियो तळहात चोळत म्हणाला. होमवर्क न केल्याने सोलंकी मिसच्या पट्ट्या खाऊन तो करणच्या बाजूस बसला होता.

"तरी मी तुला होमवर्क कर म्हणून बोल्लो होतो!", करणने कालची संध्याकाळ त्याला आठवून दिली, "उगीच पट्टी खायची हौस तुला!"
"हौस कसली?", सॅवियो कपाळावर आठ्या आणून म्हणाला, "आय स्वेअर. घरी गेलो आणि मॅथ्स होमवर्क सुरू केला मी. पण तोच टि.व्ही.वर विम्बल्डन फायनल सुरू. अरे फेडरर आणि नदाल कोण सोडणार यार?"
"अरे पण होमवर्क इम्पॉर्टण्ट की टेनिस?", करणने फळ्यावरचं लक्ष न ढळू देता सॅवियोला हळूच विचारलं.
"ऑफकोर्स टेनिस!" सॅवियोने स्वाभविक उत्तर दिले, "फेडरर आणि नदालनं कधी मॅथ्स होमवर्क केला होता?"
"पण त्यांच्या शाळेत सोलंकी मिस नव्हती!...", करण त्रासला.

"...मि. रूपवते स्टॅण्ड अप!", सोलंकी मिसने चश्मा रागात डोळ्यांवरून काढला. वर्गात भीतीचे हुंकार फुटले. सगळे वळून करणच्या बाकाकडे "आता ह्यांची लागली!" असे डोळे विस्फारून पाहू लागले. सोलंकी मिसने डोळ्यावरचा चश्मा काढणे ही वर्गातल्या मुलांसाठी वाईट बातमी असायची.
"इज युवर डिस्कशन विथ मि. रूडॉल्फ मोअर इम्पॉर्टण्ट दॅन माय लेक्चर? ईफ सो? देन प्लीज शेयर इट विथ द क्लास!"
"सॉरी मिस!", करण अडखळत उभा राहिला.
"व्हॉट सॉरी? मि. सॅवियो हॅस ऑलरेडी हॅड हीज पनीशमेण्ट! नाऊ डू यू वॉण्ट टू फॉल फोर इट?"
"नो मॅम! सॉरी मॅम!", करणने मान खाली घातली.
"लूक करण! यू आर अ व्हेरी गुड स्टुडण्ट. डोण्ट वेस्ट युअर टाईम विथ दॅट स्कॉउण्ड्रल! लूक ऍट अदर स्टुडण्ट्स! लूक ऍट मिस. प्रधान. बी सिंसीयर लाईक हर."

सोलंकी मिसच्या ह्या टिप्पणीवर पूजा अन सॅवियोचे चेहेरे विरूद्ध भाव दर्शवू लागले. पुढच्या बाकावर बसलेल्या पूजाने मिश्किलीत करणकडे वळून पाहिलं. करण थोडा ओशाळला.

"धिस इज अ लास्ट वॉर्निंग! यू मे सिट डाऊन." सोलंकी मिसने चश्मा डोळ्यावर पुन्हा चढवला. सगळ्यांना हायसं वाटलं. तसा करण सोलंकी मिसचा आवडता स्टुडण्ट होता त्यामुळे भिती नव्हती.

"डीड यू हियर दॅट?", सॅवियो अस्पषट्सा कुजबूजला...."ती मला स्कॉउण्ड्रल म्हणाली!!!"...

अर्थातच होपलेस आणि यूजलेस ह्या सॅवियोच्या नेहेमीच्या विशेषणांत आज एक नवी भर पडली होती.
करणने गणिताच्या पुस्तकात डोकं घातलं. सॅवियोच्या ऍन्टि सोलंकी कमेण्ट्सकडे पूर्ण दुर्लक्ष करत तो अभ्यासात गुंतला. त्याला पुन्हा ओरडा खायचा नव्हता. करण आपल्याला प्रतिसाद देत नाहीये म्हणून इथे सॅवियो रागात सोलंकी मिसचं कार्टून त्याच्या वहीच्या मागल्या पानावर काढू लागला.

तास संपता संपता सॅवियोचं ते व्यंगचित्रही संपलं. मधली सुट्टी झाली अन सगळे वर्गाबाहेर पडले. आजूबाजूच्या काही मंडळींना ते कार्टून दाखवून सॅवियोने करमणूक करून घेतली अन स्वतःचा राग शमवला.

"करण.... सॅवियो! सॅवियोऒ!!!" दानिश शाह मागून दोघांना हाक मारत होता.
"च्यायला!", सॅवियोने तोंड लपवलं, "सावकार आला वाटते!.. यार करण! ५० रूपये आहेत काय?"
"कशाला", करणने विचारलं.
"अरे गेल्या वीकमध्ये मी हॉकी प्रॅक्टीसच्या वेळी नी-बॅंण्ड आणायला विसरलो. तेव्हा पीटीच्या सरांनी सगळा सेट आणल्याशिवाय आत येऊ दिलं नाही. मग दानिशकडून पन्नास रूपये उसने घेऊन मी ते नी-बॅण्ड्स बाजूच्या स्टेशनरी दुकानातून विकत घेतले. त्याला मी आज परत देतो सांगितलेलं! पण ..."
"..विम्बल्डनच्या जोशात विसरलास!"
"होय! आणि मग आता नाहीयेत म्हटल्यावर तो रडायला लागेल आणि तुला माहितिये ना! दानिश इज सच अ क्राय बेबी!", सॅवियो मुळूमुळू उत्तरला.
"म्हणजे?"
"अरे! गेल्या खेपेस हेतनला त्याने त्याचं स्वीस घड्याळ दिलं. ते बॅटरी संपून बंद पडलं. तरी सिच्युएशन न समजता हा हेतनच्या नावाने रडू लागला. शेवटी हेतनकडूनच घड्याळजीकडे नवी बॅटरी टाकून घेतली त्यानं!"
"आणि एवढं असूनही तुला आयत्या वेळेला पैसे उसने घ्यायला हाच मिळाला?", करणने विचारले.
"काय करणार? माझं तुला ठाऊकच आहे. माझ्या डिक्श्नरीत लक हा शब्द बॅडच्या मागोमाग येतो!"
करण उपहासाने हसला आणि त्याने पन्नास रूपये काढून दिले,"हे घे! माझे लॅब कोटचे आहेत. माझा जुना फाटलाय म्हणून नवा घ्यायला मी आईकडून घेतलेले. आज सायन्स प्रॅक्टीकल नाहिये तेव्हा तुला उपयोगी पडतील."
पन्नास रूपये सॅवियोने घेतले नसतील तोवर दानिश शाहाने सॅवियोला गाठलेच.
"माझे पैसे?"
"हे घे."
"नोट जुनी दिसतेय!"
"मग नवीन नोटेसाठी उद्या ये."
"नको असूदे. ही चालवीन."
नोट मिळाल्यावरही दानिश शाह दोन सेकंद काहीतरी ऎकण्याच्या अपेक्षेने त्यांच्या समोर उभा राहिला होता.
"थॅंक यू दानिश. खूप दानशूर आहेस.", सॅवियो खोटी कॄतार्थता चेहेऱ्यावर आणत म्हणाला.
दानिश खूष झाला अन नोटेतून सूर्याकडे बघत, नोट तपासत निघून गेला.
"पाहिलंस? एकदम सावकार!"
"जाऊ दे रे."
"जाऊ दे काय? एवढा श्रीमंत असूनही एवढा कद्रु? अरे त्याच्या वडीलांचा इस्तांबूलला मसाल्याचा मोठा बिझिनेस आहे आणि त्याची आई फिल्मफेयर मॅगझिनची असिस्टण्ट एडिटर आहे. एवढं असूनही..."
"काय???", करण एकदम चमकला.
"मग काय ही इज सो ब्लडी रीच्च!"
"...अरे ते नाही. त्याची आई फिल्मफेयरची एडिटर आहे?"
"नाही असिस्टण्ट एडिटर!"
"तेच ते!..." करण पुढचं काहीही न बोलता दानिशकडे पळाला.
सॅवियो काहीच न कळल्याच्या आवेशात तिथेच उभा होता. दोन मिनिटात करण परतला... खूश होऊन!
"कुठे गेला होतास?", सॅवियोने आठ्या पाडल्या.
"दानिश शाह रॉक्स!"
"व्हॉट्ट! आर यू ओके?"
"यप्प!"
"काय झालं सांगशील का?
"दानिश शहाला नव्या फिल्मफेयरची कॉपी आणायला सांगितलीय."
"पण अजून नवा महिना यायचाय."
"त्याधीच आणायचीय."
"का?"
"अरे दोन आठवड्यांनी मेनकाचा बर्थडे! नव्या फिलफेयरमध्ये कव्हर आणि फ्रण्ट पेज तिचंच असणार आहे ह्या वेळी."
"त्यात काय एवढं? पुढच्या महिन्यापर्यंत थांबला असतास ना."
"अंहं! अजिबात नाही. अरे मेनकफॅन्सच्यांत चुरस असते. मेनकाचे फिल्मी मॅगझिनवरचे कव्हर पेजेस मिळवण्याची. मला जर तिच्या बर्थडेच्या वेळी मेनकाचं पुढल्या महिन्यात छापून येणारं कव्हर पेज स्कॅन करून माझ्या साईटवर टाकता आलं तर किती भाव मिळेल मला मेनका फॅनग्रुपमध्ये!"
" माय गॉड एवढं प्रिपरेशन! माझं तर ऍन्युअल एक्झामचं पण नसतं. यू नो यू आर क्रेझी... क्रेजीकरन!", सॅवियोने डोळे मिचकावले.

करण हसला पण तोच ‘क्रेझीकरन’ वरून त्याला आठवली कालची रात्र. कुण्या एका माथेफिरूने मेनकाच्या चारित्र्यावर विनाकारण उडवलेले शिंतोडे! करण पुन्हा अस्वस्थ झाला.

"हे करण! काय विचार करतोयस?", सॅवियो करणच्या चेहेऱ्यासमोर हात हलवित म्हणाला.
"काही नाही! जस्ट एक्सायटेड!", करण चेहेऱ्यावरचे भाव लपवत म्हणाला.
"अरे पण दानिश शाह मानला कसा? पक्का सावकार तो. काय गहाण ठेवलंस त्याच्याकडे? अं?", सॅवियोने भुवया उंचावल्या.
"मॅगझीन आणल्यावर मॅथ्सचा फ्री होमवर्क...", करण बोलता बोलता अडखळला, "पुढच्या तीन दिवसांचा!"
... सॅवियोच्या भुवयांची स्थिती बदलणार होती.
"व्हॉट्ट! दॅट्स सो अनफेअर!!", सॅवियो चिडला, "मी तुझा मित्र असून तू माझा कधी होमवर्क केला नाहीस!", सॅवियोने रागात भुवया आकुंचल्या.

"तुझी आई फिल्मफेयरची एडिटर आहे का?"
"असिस्टण्ट एडिटर!"
"हो तेच ते! नाहिये ना. मग मी का तुझा होमवर्क करू?"
"करण दॅट इज रियली मीन!", सॅवियो ओरडला.
"व्हॉट मीन? आणि पेपरात मागे वळून वळून माझ्या सम्सची कॉपी करतोस त्याचं काय?", करणनेही मग आवाज चढवला.

भांडण चव्हाट्यावर येणार तोच मागून सिस्टर प्रिन्सिपल निलिमा गेल्या. ते दोघे एकदम गप्प बसले. प्रिन्सिपलच्या ऑफिससमोरचचा बाक हा ‘प्रॉक्सी होमवर्क’ आणि ‘एक्झाम कॉपी’ विषयी बोलायचा कट्टा कदापी नव्हता. हे त्या चाणाक्षांनी जाणलं अन ते साळसूदपणे पुढच्या लेक्चरला चालते बनले.

*******************

भाग चार

"काय चाल्लेय तुझं मघापासून? किती ते चॅनल बदलणार? एक धड तरी ठेव किंवा तो टि.व्ही. बंद तरी कर." आई थोडी चिडून म्हणाली. करण आणि त्याची आई बाजूलाच बसलेले टि.व्ही. पाहत होते. करणने रिमोटची सगळे नंबर तीनदा दाबून पाहिले होते. टि.व्ही.वर काहीच मनोरंजन चालू नव्हतं.
"हो गं! ठेवतो ना.", करणनेही मग आठ्या पाड्लया अन एक फिल्मी चॅनल ठेवला.
"वेल्कम टू बॉलिवूड न्यूज!", टिव्हीवरील वी.जे. सांगत होती, "सुमीत सिन्हा और गौरी माथुर की नयी ‘सात सपने’ बॉक्स ऑफिसपर पीट गयी। ये उन दोनोकी साथ साथ दूसरी फिल्म है। ..."
खरं तर सॅवियोची वाट पाहत करण वेळ मारत होता. बॉलिवूड न्यूज वर मेनका शिवाय आणखी कोणीही करणला उल्साहित करत नसे. आईही पेपर वाचत होती. त्यामुळे टि.व्ही. खरं कोण पाहत होतं हे सांगणं कठीणच होतं.
"कधी येणार सॅवियो? ५ चे साडेपाच झालेत." करणने घड्याळाकडे पाहिलं. आई पेपरात. तिथे टि.व्ही.वर त्या वी.जे.ची बडबड चालू .

"और अब एक खास खबर! हजारों दिलों की धडकन मेनका के बारेमें नयी कॉण्ट्रोवर्सी आजकल सुनाई दे रही है।"
करणने टि.व्ही.कडे कान टवकारले.

"सुना है की मेनकाके दोस्त है जिनके साथ मेनकाजी काफी करीब थीं.. शायद कुछ ज़्यादाही करीब... । बॉलीवूड न्यूजके एक गुप्त गॉसिपपाल ने बताया की हालहीमें येह एन.आर.आय दोस्त अमरीकासे मुंबई आये और मेनकाजीसे मिलें। लेकीन यह मिटींग कुछ वजहसे नाकामयाब रहीं । मिटींगके बादसेही मेनकाजी काफी दु:खी दिखायीं दे रहीं है और फोन कॉल्सभी अटॆंड नहीं कर रहीं । कुछ लोगोका शक है की शायद मेनकाजी के जिंदगींमे कोई और भी आया था जिसकी वजह से वोह अपने इस पुराने दोस्तसे नाता तोड चुकीं हैं । और तो और ये भी सुनाई दिया है की मनिष भट़्ट मेनकाजीकी जिंदगीपर नयी फिल्म बना रहें है। तो आखिर इस फिल्म में हिरोईन मेनका की रायवल मालविका साईन होही जायेगी। आखिर मनिष भट़्ट सेक्स और मालविका के बगैर कैसे रहेंगे? देखतें है की मेनका के सेक्रेटरी टिक्कू की इसपे क्या राय है? ... "

"एन.आर.आय.? अफेयर? लव्ह ट्रायंगल?", करण ताडकन उठला.

समोर टि.व्ही.वर थुलथुलीत टिक्कू अवतीर्ण झाला. करणचं लक्ष पुढच्या मुलाखतीत लागलं होतं.

"टिक्कूजी क्या ये सच है की मेनकाजीके कोई अमरिकी दोस्त आजकल मुंबईमें आये हुऎ हैं?"
"जी”, टिक्कूने आपल्या बारीक आवाजात म्हटलं.
"क्या ये भी सच है की मेनकाजी और उनके बीच काई करीबी रिश्ता था?"
"नही। बिलकूल नहीं।"

करणने भुयव्या उंचावल्या.

"आप तो मुकर रहें है पर हमने ये सुना है की ये रिश्ता इसिलिये टूट गया था की कोई और मेनकाजीके जिंदगी में आ गया था?"
"देखिये ये मुझे मालूम नही। लेकीन मुझे येह मालूम है की मेनकाजी और उनके दोस्त के बीच सिर्फ अच्छी दोस्ती है; और कुछ नही। जो हुआ वो क्या और क्यूं हुआ ये मुझे पता नही। लेकीन जो अभी है वो सिर्फ गहरी दोस्ती है बस्स।"
"लेकीन फिर भी आपको कुछ तो पता होगा ही?"
"देखिये मैं दस साल पहले मेनकाजीका सेक्रेटरी बना हूं। ये बात उस्से भी पुरानी है। मुझे इसके बारे में कुछ भी नही पता। लेकीन इतना पता है की मेनकजी इस अफवा की वजह से काफी व्यथित हैं और टेलिफोन कॉल्स नहीं ले रहीं। इसिलिये मेरी आप सब लोगोंसे गुजारिश है की प्लीज आप इस बात को इतना महत्त्व देना बंद किजीये।"
"लेकीन ये एन.आर.आय दोस्त हैं कौन? क्यूं उन्हे इतना गुप्त रखा गया है?"
"देखिये वो खुद अपनी शख्सियत गुप्त रखना चाहते हैं। ये उनकी मर्जी है।"
"लेकीन फिर मनिष भट़्ट की फिल्म के बारेमें आपका क्या खयाल है?"

यावर टिक्कू थोडा भडकला, "मनिष भट़्ट उन्हे चाहें उस विषय पर फिल्म बना सकतें है। वैसेभी कॉट्रोवर्सी उनसे दूर कहा रहती है। ये शायद उनका और एक गिमिक होगा!"
"क्या येह सच है की इन उनका नाम गौतम है?.... "
"ओह माय गॉड!", करणने आ वासला होता. तिकडे टिक्कूचं "नो कमेण्ट्स प्लीज!" ची टेप सुरू झाली. आईने थोडक्यात करणकडे बघितलं अन पुन्हा पेपरात मान घातली.
"आई! माहितीये?", करणने गोंधळलेल्या स्वरात आईला म्हटलं.
"काय?"
"परवा काय झालं?"
"काय?", आईने पेपरातच डोकं घातलं होतं.
" एका ऑनलाईन चॅट मध्ये मला कुणीतरी माथेफिरू भेटला होता. म्हणाला की तो मेनकाचा मुलगा आहे!"
"काय?"… आईने झटकन पेपर दूर सारला… हा ‘काय’ मघासच्यापेक्षा नक्कीच मोठा होता.
"हो! आणि म्हणाला की मेनकाचं गौतम दोशी नावाच्या माणसाशी अफेयर होतं आणि ती एका तिसऱ्या माणसाकडून प्रेगेनण्ट राहिली होती. तिने ते मूल जन्माला घातलं अन सोडून दिलं. तोच तो तिचा मुलगा!"
"कोण होता तो?", आईने गोंधळून विचारलं.
"माहित नाही पण हे सगळं तिची फिल्म लाईन जॉईन होण्याधीचं लफडं होतं."

आई दोन मिनिटं थोडी चकितच होती मग तिच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलत गेले.

"फिल्मी आयुष्याधीचं नं मग ते खोटच असणार? पेपराझींचा फक्त सेलिब्रिटीच्या फिल्मी आयुष्यावर कण्ट्रोल असतो. त्याधी काय झालं ह्यावर त्यांचा फक्त कयास असू शकतो. मला तर बाई ही त्या मेनकाला फसवायची कुणाचीतरी चाल वाटते. बऱ्याच दिवसात तिच्याकडून कुठलं गॉसिप आलं नव्ह्तं. तोच तिचा एन.आर.आय मित्र कुठूनतरी आला, तिला भेटला अन ह्या अफवा सुरू. तो जो कुणी तुला ऑनलाईन भेटला ना तोही ह्या लोकांमधला असेल... कुणीतरी ‘गॉसिपपाल’", आई शांतपणे पुन्हा पेपरात डोकं घालून म्हणाली.

करणही आईच्या ह्या विचारावर सहमत झालेला वाटत होता. पण त्याच्या मनात कुठेतरी एक हुरहुर लागली होतीच. तेवढ्यात सॅवियो आला.

"उशीर झालाय", करण थोडा इरीटेट होऊन म्हणाला.
"सॉरी रे! लेट्स गो! घरी मम्मी लेट आली. मग मोठा भाऊ म्हणून क्रिस्टल ला सांभाळत थांबावं लागलं... ओह बाय द वे... हॅलो आण्टी!"
"हॅलो", आईने हसत विचारलं, "कशी आहे क्रिस्टल? गेल्या आठवड्यापासून के.जी.त जायला लागली ऎकलं मी?"
"हो! के.जी. एकदम फर्स्टक्लास चाल्लंय.", सॅवियो डोळे मिचकावले, "आत्ता मलाच ए, बी, सी शिकवते!"
मिश्किलीत आई उठली अन करणला, "लवकर ये. जेवायच्या आधी." असं बोलून किचनमध्ये निघून गेली.
करण डेनिम जॅकेट चढवून सॅवियो सोबत बाहेर पडला.
"सॅवियो अरे मी ते तुला सांगितलेलं बघ, ब्लॅकवलचर बद्दल! आठवतंय?"
"कोण तो मेनका हेटर ना? हो. त्याचं काय?"
"आज टिव्हीवर त्याने सांगितलेल्यासारखीच एक न्यूज ऎकली मी. मेनकाचा आधीचा बॉयफ्रेण्ड इंडियात आलाय अन इथे येऊन तिला भेटला. त्यानंतर त्यांच्या अफेयर विषयीच्या गुप्त गोष्टी कुठल्यातरी न्यूजचॅनलना कळल्या. यावर सगळा वादंग उठलाय!"
"वादंग?!", सॅवियो गोंधळला
"अरे कॉण्ट्रोवर्सी रे!", सॅवियो कॉन्व्हेण्ट शाळेत शिकणारा एक अमराठी मुलगा आहे हे करणच्या मग ध्यानात आलं.
"ओके. मग?"
"त्यात त्या मनिष भट़्टने ह्या गॉसिपवर नवा पिक्चर काढायला लावलाय. त्यात तो मालविकाला घेणारेय..."
"काय? मालविका इन मनिष भट़्ट फिल्म?" छोट्या कपड्यातली उत्तान मालविका त्याच्या डोळ्यांसमोर तरळली. पण मग ध्यानावर येऊन करणचा सिरियस मूड बघून "ओह्ह बिच्चारी मेनका!" असं म्हणत त्याने आपला आनंदी चेहेरा झटक्यात पालटला.

"इट्स ओके, यू कॅन चियर. उगीच खोटा ड्रामा नको.", करणने थोड्या रागातच म्हटलं.
"फरगेट ईट यार", सॅवियोने आपले नेहेमीचे शब्द म्हटले, "कशाला ही संध्याकाळ ह्या माहित असल्या नसल्या फिल्मी बातम्यांवर घालवायची? छान पैकी बोलिंग करायाला जाऊ चल."

आणि असं म्हणून त्यांनी आपल्या सायकल्स वर टांग मारली अन ते लिंक रोडला निघाले. संपूर्ण रस्ता सायकल चालवित करण मनात फक्त गौतम दोशीचाच विचार करत होता.....

२०० पॉईण्ट्स! करणचा नवा रेकॉर्ड! सॅवियो अजून ८० वर. ही अंधेरीचा बोलिंग ऍली करण अन सॅवियोची अत्यंत आवडती जागा.

"मला आज एकही फुल्ल स्ट्राईक मिळाला नाहिये आणि तुला सात मिळले." सॅवियोने गाल फुगवले आणि करणने ऎटीत कॉलर ताठ केली.

"जाऊ दे रे. एव्हरी डॉग हॅज हीज डे!" करणने विनोद केला तसा सॅवियो अजून रागावून त्याच्याकडे पाहू लागला.
आता दिलेलं १०० रूपयांचं क्रेडीट संपत आलं होतं. फक्त एक सेट उरलेला. त्या एका सेटच्या जोरावर सॅवियोने करणला हरवणे शक्य नव्हते. पण तरीही सॅवियोने करणला बोट उंचावून म्हटलं, "क्रॉस दॅट २१० मार्क आणि मी तुला ५० रूपये देईन!"

करणने स्कोअर बोर्डकडे पाहिले. त्याच ऍलीत दुसऱ्या कुणीतरी युनिकॉर्न नावाच्या प्लेयरचा २१० चा स्कोर दिसत होता. आता रेप्युटेशन म्हणून हे चॅलेंज स्वीकार करणं भाग होतं... सॅवियोसमोर करण काही फट़्टू नव्हता... करणने दीर्घ श्वास घेतला अन आपल्या आवडीचा ओशन-ब्लू बॉल व्यवस्थित समोरच्या पिन्सच्या सेटकडे फेकला. बॉलने सरळ दिशा पकडली खरी पण हाय! मध्येच दिशा बदलून एकाही पीनला न शिवता बॉल गटर मध्ये घुसला.
एक चान्स वेस्ट!

"बूऊऊऊऊ!" सॅवियोने ‘कशी जिरली!" म्हणून करणचा आत्मविश्वास खच्ची करायचे निष्फळ प्रयत्न केले, पण करण खरंच ईरेला पेटला होता. अजून एक चान्स बाकी होता. तो २१० चा स्कोर त्याच्या जणू जीवनमरणाचा प्रश्न झाला असावा!

करणने पुन्हा त्याचा ओशन-ब्लू बॉल व्यवस्थित बोटांत अडकवला अन त्याच्या लेनच्या बरोबर मध्यभागी उभा राहून बोलिंगची त्याची एक्स्पर्ट पोझ घेतली अन बॉल सरपटत फेकला. तीन सेकंद त्याचा श्वास आतच अडकला ...
... आणि बॉल ने स्ट्राईक केलं. आजची ही आठवी स्ट्राईक! करणचा पर्सनल बेस्ट स्कोर!
"जिंकलो!" म्हणत करण सॅवियोला चिडवत ब्रेक डांस करून दाखवू लागला. सॅवियो ओशाळला.
आता स्कोर बोर्ड वर फक्त करण आणि यूनिकॉर्नच २१० दाखवत होते.
"हाय करन!", पाठून एक मधाळ आवाज आला. ब्रेक डांस करत करणने मागे वळून पाहिलं तसं समोर पूजा प्रधान! त्याचा ब्रेक डांस पाहून ती थोडी गोंधळलेलीच दिसत होती.
करणने झटक्यात डांस बंद केला.
"हाय पूजा!", करण थोडक्यात.
"इथे कुठे?", पूजा.
"असंच!", करणचं एका शब्दात उत्तर.
"मी तुझं नाव पाहिलं स्कोरबोर्डवर. माझ्याएवढा स्कोर पाहिल्यावर मी म्हटलं बघूया कोण आहे ते. तर तू दिसलास!"
"ओह! म्हणजे यूनिकॉर्न..."
"हो मीच यूनिकॉर्न!"

एका मुलीच्या स्कोरला टफफाईट दिलेली बघून करणचा बेस्ट स्कोरचा आनंद क्षणात मावळला.

"ओके", असं बोलून करण पुन्हा मुका झाला, पूजा कडे बघत.
"आख्ह:अंख्ह!", पाठून कुणीतरी घसा साफ करीत होतं.
"सॉरी!", करणने त्रागा करीत म्हटलं, "सॅवियोही आहे माझ्यासोबत."
"हाय पूजा!", सॅवियो सोज्वळपणे पुढे येऊन म्हणाला.
"हॅलो सॅवियो!", पूजानेही मग दोनच शब्द म्हटले.

पुढची दोन मिनिटं एकमेकांची तोंड बघण्यातच गेली.

"कोल्ड कॉफी?", सॅवियोने एकांत फोडला.
"व्हाय नॉट!", पूजानेही पटकन होकार दिला.
अन तिघे ‘कॉफी डे’ च्या काउन्टर कडे निघाले. पुढे दोघे लव्हबर्ड्स. मागे विसरला गेलेला सॅवियो!

"तर मग आज सॅटरडॆ! काय केलंस?", पूजानं चॉकोलेटमोकाची सिप घेत विचारलं.
"काही नाही. आता काही वेळ सॅवियोबरोबर आहे, नंतर संध्याकाळी समीरदादा बरोबर जीम.", करणने कॉफीतच लक्ष घालून म्हटलं. पूजाकडे पाहत एक पूर्ण वाक्य म्हणायला अजून त्याच्यात अवसान आलं नव्हतं. सॅवियो करणची मजा बघत त्याची आईस्क्रीम कॉफी मिटक्या मारत चाखत होता.
"तू काय केलंस पूजा आज?", सॅवियोने मध्येच चोमडेपणा केला तसे करणने डोळे वटारले.
"काही नाही. मीही संध्याकाळी माझ्या वडिलांच्या मित्रांना भेटायला जाणार आहे, जे डब्ल्यू मॅरियट मध्ये"
"कूल. म्हणजे कोणी स्पेशल आहे का?", करणला बोलण्याचा काहीही चान्स न देत सॅवियोने थेट पुढचा प्रश्न केला.
"हो माझे पप्पांचे खास दोस्त आहेत. त्यांच्या सोबत फॅमिली डिनर आहे.", पूजा म्हणाली.
"म्हणजे तुझी संध्याकाळ फिक्स आहे....", सॅवियोचा चोमडेपणा काही थांबत नसल्याचे पाहून करणने एक पाय टेबलाखालून झाडलाच, "आऊच्च्च!", खालून करणने सॅवियोला एक कीक मारली तसा सॅवियो कळवळला. पूजा गोंधळून सॅवियोकडे पाहू लागली. एक नजर करणकडेही गेली. करणने आपल्याला काहीही माहित नसल्याचे दाखवत त्याच्या रिकाम्या कॉफी ग्लासमध्ये डोकं घातलं.
"म्हणजे छान!", सॅवियो उसनं हसू आणत पाय लटपटत म्हणाला.

तेवढ्यातच पूजाचा मोबाईल वाजला.

"हॅलो? हा आई बोल... हो माहितीये. हो ग. मी येईन. तुम्ही जा पुढे. कूलकॅबने येईन. अगं होना मला माहित आहे... जुहूच्या जवळ... मी गेलेय तिथे आधी... आता नाव का विचारतेस? येस मला ठाऊक आहे सरनेम पण. हो रूम नं ३०२, गौतम दोशी. हॅप्पी? आता बोअर नको करूस... चल बाय."
"फुर्र्र्र्र!", ‘गौतम दोशी’ नाव ऎकताच सॅवियोने कॉफी फुंकली अन करण ताडकन खुर्चीवरून उडाला.

पूजा दोन मिनिटं घाबरलीच.

"काय झालं. एनी प्रॉब्लेम?", पूजा ने विचारलं.
"तू गौतम दोशी म्हणालीस?", करणने प्रश्न केला. कधी नव्हे ते पूजाच्या डोळ्यात पाहत.
"हो. मी सांगितलं ना ते पप्पांचे फ्रेण्ड. तेच ते. यूएस वरून आलेत. "
"आय नो! द फार्मा विझार्ड!", करण म्हणाला.
"व्हॉट?", पूजा गोंधळली, "तुला कसं..."
"मला माहित आहे... इजन्ट ही द सेम गाय हू इज लिंक्ड विथ मेनका? ... यू नो द बॉलीवूड स्टार?" करणने थोडा आवंढा गिळला आणि विचारले

पूजा संशयित नजरेन दोघांकडे पाहू लागली. आता सॅवियोने कॉफीत तोंड घातलं होतं. तसं तिला करण मेनकाचा फॅन आहे हे माहित होतं पण हा प्रश्न थोडा पर्सनल वाटत होता.

"तू कशा बद्दल म्हणतोयस?"
"टिव्हीवर..."
"हो ते?...", पूजाने करणला तोडलं, तिच्या चेहेऱ्यावरचे संशयित भाव नाहीसे झाले होते, "..आय थिंक इट्स जस्ट अ गॉसिप!"
"आर यू श्युर?"
"हो. पण असं का विचारतोयस?"

करणने ब्लॅकवल्चरची स्टोरी पूजाला सांगू की नको ह्या विचारात काही सेकंद घालवले. मग सॅवियोनेच पुढाकार घेतला...

"काही नाही गं. यू नो करण इज कन्सर्न्ड अबाऊट मेनका. ही इज हर फॅन ना..."
पूजा हसली आणि म्हणाली, "तुला हवं तर मी त्यांच्या कडून काही खबरबात काढते ह्याविषयी. आय कॅन बी अ गॉसिप गल टूडे!", पूजाने डोळे मिचकावले.
करण हसला, "नको इट्स ओके. इट्स कूल."
"...याह फरगेट अबाऊट ईट!", सॅवियो.
"चल मी निघते. बाय! थॅन्क्स फॉर द कॉफी!"
"नो प्रोब्लेम!", करण पुन्हा त्याच्या द्विशब्द संभाषणावर आला.
"बाय सॅवियो!", असं म्हणून पूजा निघून गेली.
"क्या ड्युड! इव्हनिंग स्पेशल झाली म्हणायची!", सॅवियोने करणचा पाय खेचला.

करण थोडा लाजला अन दोघे बील फेडून घरी निघाले. पण येतानाही करणचा फक्त गौतम दोशीविषयीच विचार चालू होता.

*******************

भाग पाच

करणने बेल वाजवली तसा आईने दरवाजा उघडला.

"अरे किती वेळ लावलास? सातला यायचं होतंस. आता साडेसात वाजलेत. तिथे समीर जीममध्ये तुझी वाट पाहतोय. दोनदा फोनही केला त्यानं. आताही त्याच्याशीच बोलत होते.", आईने त्रस्त चेहेऱ्याने म्हटलं.
"हो गं! तिथे बोलिंग ऍलीत ऊशीर झाला. जातोय ना मी आत्ताच निघतोय."

"तुझ्या मित्राचा दानिशचा फोन आलेला. कुठलतरी मॅगझीन आणलंय त्यानं. ते त्याला तुला द्यायचंय. आज साडेसात पर्यंत घरी आहे तो असं म्हणाला."

"काय दानिश ने मॅगझीन आणलं? ग्रेट!!!", करणच्या चेहेऱ्यावर आनंदा ओसंडू लागला, "मी दोन मिनिटांत निघतोच."
असं म्हणून कपडे बदलून जिमची ट्रॅक सूट अन पॅण्ट घालून करण कधी निघाला ते आईला कळलेच नाही. करणने उत्साहाच्या भरात सायकल दानिशच्या घराकडे हाकली.

"हाय दानिश!", दानिशने दार उघडलं तसा करण स्मित आणून म्हणाला.

दानिशने नवं मॅगझिन करणला दिलं अन म्हणाला, "ड्राफ्ट प्रिंट आहे ही ... मम्मीच्या पर्समधून ढापलिय मी…. उद्या शाळेत परत दे … आणि होमवर्कचं लक्षात आहे ना?"

मॅगझीन अधाशीपणे हाती घेऊन त्याच्या कव्हरवर छापलेलं मेनकाचं पोर्ट्रेट बघून करण एक्साईट झाला होता. दानिशच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत तो परत फिरला.

मोठे काळेभोर डोळे, डार्क तांबट कलर चे सिल्की केस, चेहेऱ्यावर नेहेमीची मादकता. महोगनी शॉर्ट ब्लाऊज अन खाकी थ्री फोर्थ जिन्समधून साकार केलेल्या कॉलेज तरूणीच्या आभासाने फोटोग्राफरने मेनकाच्या टाईमलेस ब्युटीचा नेमका सूर पकडला होता. करणला फ्रन्ट बघत पेज बघत हरखून गेला. त्याच धुंदीत त्याने पान सत्तावन्न उघडले अन तो आठ पानी इण्टरव्हू तिथच बसून वाचून काढला.

इण्टरव्ह्यूत बराचश्या गोष्टी नेहेमीच्या होत्या. तिचं लहानपण, कॉलेज, फिल्मी आयुष्यातले उतार चढाव, अवॉर्ड्स, मालविकाशी असलेला बेबनाव. तेच ते. पण सातवं पान स्पेशल निघालं. मेनकाची अतिखाजगी मुलाखत...

(इन्टरव्ह्यू)....

मग आता एवढा सक्सेस मिळाल्यावर पुढे काय?

पुढे? अरे पुढे जाण्याच्या हट़्टपायी मागे बऱ्याच गोष्टी गमावून बसलेय. त्यांचा अजून हिशेब मांडायचाय. कधी कधी असं वाटतं कित्येक लोकांच्या मनाशी खेळून, त्यांना दुखवून खोट्या स्वार्थापायी मी स्वतःसारखी राहिलेच नाही.

म्हणजे कुणा स्पेशल माणसाविषयी बोलतेस का?

कुणा स्पेशल? ह्ह! (हताशपणे हसून) कित्येक स्पेशल माणसांविषयी बोलतेय मी. सगळेच जे आता पारखे झालेत.

ते स्पेशल कोण होते?

ते होते माझे सगे सोयरे. मेनकाची मित्र मंडळी, प्राणापलिकडची काही सख्खी लोकं.

मग त्यांना शोधलं का?

नाही रे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. स्वतःच दुःख पचवते. उगीच जुनी प्रेतं कां उकरायची? आता फॅन्स साठी जगतेय…. कधीकधी वाटतं हे स्टार व्हायचं ओझं फेकून द्यावं. सगळा मेक-अप पुसून टाकावा. अंगावरचे फॅन्सी कपडे ओरबाडून आरशासमोर उभं रहावं. स्वतःवर हसावं. मला माहितीये ‘ते सगळे’ माझ्यावर मनातल्या मनात असेच हसत असतील.

म्हणजे मेनकाचं आयुष्य फक्त फॅन्ससाठी… इतकं एक्स्लुजिव ?

ऑफ कोर्स! फॅन्सचं ओझं बरंच जड आहे रे. टाकता येत नाही. मेक-अप चेहेऱ्यावरून निघत नाही. हे कपडेच आता मेनकची कातडी झालेत. हे सगळं झुगारता येणंच शक्य नाही.

एवढे फॅन्स असताना मग मेनका दुःखी का व्हावी?

खरं तर ह्वायला नको… पण शेवटी मीही माणूसच आहे ना… चुका करून प्रायश्चित्त घ्यावं, चारचौघांसारखं सॉरी बोलून मन हलकं करावं असं आता होत नाही. आकाशात स्टार झालेय तर जमिनीशी कशी रुळणार?

एवढे रीग्रेट्स?

हो. (इथे डोळे ओलावले) खरं सांगू… सारखं वाटतं त्या जुन्या सगळ्यांना सॉरी म्हाणावं. त्यांच्या गळ्य़ात गळे टाकून रडावं.

म्हणजे सॅल्वेशन?

आत्ता मिळणं शक्य नाही… एकच गोष्ट होऊ शकते… रीग्रेटफूलनेस…
आयुष्यभराचा...

(इथे मेनकाने काही मिनिटं मागून घेतली)

करणच्या डोळ्यात पाणी तराळलं. मेनकाची एवढी हळवी मुलाखत या आधी कधीही त्याने वाचली नव्हती. तिचं एवढं मानवी रूप ह्याधी कधीही दाखवलं गेलं नव्हतं. पण असं काय झालं असावं?
ह्या विचारात मग करणला गेल्या काही दिवसांपासून चाल्लेला मामला आठवला अन त्याचं मन पुन्हा विचलित झालं. गौतम दोशी, ब्लॅकवल्चर, टिक्कू सगळे त्याला आठवले. आज अचानक ब्लॅकवल्चर साठी त्याला क्षणिक वाईटही वाटून गेलं. पण मेनकाचं अफेयर आणि प्रेगेनन्सीची स्टोरी अजिबात मानवत नव्हती. ब्लॅक्वल्चर पुन्हा घृणास्पद झाला.

त्या विमनस्क स्थितीत करण दीड तास ऊशीरा जीममध्ये पोहोचला तेव्हा हातातलं मेनकाचं पोस्टर असलेलं फिल्मफेयर मॅगझीन पाहून समीरने सुरूवातीस त्याला थोडं धारेवर धरलं. पण करण गुपचूप पणे त्याची जीम प्रॅक्टीस करू लागला. समीरची भांडणाची टाळी एका हाताने जास्त वेळ वाजू शकली नाही.
थोड्या वेळाने करणला गप बसलेला पाहून समीरला कण्ठ फुटला.
"करण, मला तुला काहीतरी विचारायचं होतं...", समीर स्ट्रेच करीत म्हणाला.
"काय?", करणचे ट्रेडमील वर चार कि.मी. एव्हाना झाले होते, त्यामुळे त्याने धापा टाकतच विचारलं.
"धिस इज अ बिट सिरीयस, रागावणार नाहीस ना?", समीरने करणकडे न पाहत विचारलं.
करण संशयित झाला, "इट डीपेण्ड्स. पण तरी काय विचारायचंय?"
"सी.", समीरने स्ट्रेचिंग थांबवलं, "तू आता नववीत आहेस. पुढे दहावी. त्यानंतर कॉलेज. त्यात तुला आय.आय.टीत जायचंय. तुझ्यावर आत्ताच अभ्यासाचा एवढा बोजा आहे, मग ह्या एक्स्ट्रा करीक्युलर ऍक्टिविटीज आणखी किती दिवस चालणार?"
"म्हणजे?", करणला नीट उमगलं नाही.
"ओ.के.", समीरने शेवटी स्ट्रेचिंग थांबवलं अन करणकडे पाहत तो म्हणाला, "म्हणजे मला ह्या मेनकाफॅड विषयी बोलायचंय."

करण दोन मिनिटं ट्रेंडमिलवर गडबडला. थांबून त्याने प्रश्नार्थक चेहेऱ्याने समीरकडे पाहिलं. समीरचा चेहेरा बराच सिरियस होता.

"पण तू हे का विचारतोयस?", करणने उतरत प्रश्न केला.
"आजकल तू बराच मेनका प्रकरणात गुंतलायस. अभ्यासात तुझं लक्ष नाही. काल पप्पांचा वाढदिवस होता तेही तुला ठाऊक नव्हतं. आईला वाटलं तू अभ्यासात बिझी असशील. पण इकडे तू काल पूर्ण संध्याकाळ तिच्या वेबसाईट वर काहीतरी करत होतास. मी पाहत होतो. आजही हे मॅगझिन आणल्याच्या नादात तू मला इथे दीड तास लटकवलंस. आय मिन कमॉन! शी इज जस्ट ऍन ऍक्ट्रेस्स. तिच्यात एवढं मन का गुंतवायचं...."
"वेट अ मिनिट!", करणने समीरला मध्येच तोडलं, "मला लास्ट सेमिस्टर मध्ये चांगले पर्सेण्ट मिळाले. होना?"
"हो..."
"स्कूलमधूनही माझ्या प्रोग्रेसविषयी तुम्हाला चांगला रिपोर्ट मिळालाय. राईट?"
"येस", समीरला करणचा रोख कुठे जातोय तो कळला, "मला माहितीये पण.."
"मग माझ्या ह्या हॉबिचा तुला आता का त्रास होऊ लागला?", करणने आठ्या पाडल्या.
"तसं नाहीये रे. पण हॉबीचं ऑब्सेशन ह्वायला नको आणि पुन्हा तुझं वय कंसिडर करून..."
"माझं वय कधीपासून प्रॉब्लेम देऊ लागलं? लूक! नो नीड फॉर युअर कन्सर्न्स. आय कॅन टेक केयर ऑफ मायसेल्फ!", करणने थोड्या गुश्श्यातच म्हटलं.
"कन्सर्न! आय बेट यू नो एनिथिंग अबाऊट अवर कन्सर्न! गेल्याच वर्षी, त्या क्षुल्लक नटीचा पिक्चर बघायला तू तुझं रक्त सांडलंस आणि त्यावर बोलतोस नो नीड फॉर कन्सर्न्स?"
"ती क्षुल्लक नाहीये. शी इज माय आयडॉल!"
"ती फडतूस ऍक्ट्रेस्स तुझी आयडॉल? तुझ्या आई वडिलांना सोडून, शिक्षकांना सोडून ती तुला वंदनिय झालीय?"
"समीर दादा मेनका फडतूस नाहिये. आपलं ह्यावर आधीच भांडण झालय.", करणने आवाज चढवला.
"हो माझ्याशी, तुझ्या आईशी, मित्रांशी आणि इण्टरनेट वर वाया गेलेल्या पोरांशी! सगळ्यांशी तुझं भांडण झालयं. सगळे मेनकाच्या जीवावरच जसे उठलेत! आणि तुलाच तिची फिकर जास्त. नाही का?" समीरने मग रागात उपहासाचा सूर पकडला.
"हो तुम्ही सगळेच तिच्या विरूद्ध आहात! मला तर त्या ब्लॅकवल्चर पेक्षा आज तुझाच राग जास्त आलाय. मला वाटलेलं तू तरी मला समजत असशील. बट आय वॉज सो रॉन्ग! तुलाही तिचाच प्रॉब्लेम.", करण दातओठ खात म्हणाला, "आय हेट यू!"
"काय? दॅट्स रिडिक्युलस! मी तुझा भाऊ असून यू हेट मी फॉर दॅट होर्र?", समीरने मेनकाला शिवी दिली तसंच करणचे डोळे रागाने लाल झाले. तो जळजळीत नजरेनं समीरकडे पाहू लागला...
"नजर खाली कर ती. डॊण्ड लूक ऍट मी लाईक दॅट! मी आजही तुझा मोठा भाऊ आहे हे विसरू नकोस.", समीरने करणला दम दिला.
"येस. मला ठाऊक आहे तू माझा भाऊ आहेस ते. भाऊ! नॉट फादर!! सो यू स्टॉप बिईंग वन!", करणने आपला रीस्टबॅण्ड काढून समीरकडे रागात फेकला, "आय रीयली हेट यू!", असं म्हणून करण रागात बाजूच्या बॉक्सिंग बॅगला एक पंच मारून निघून गेला.

समीरने रागातच करणच्या निघून गेलेलेया पाठमोऱ्या आकृतीकडे हताशपणे पाहत तो मागल्या फ्रेण्ड्शीप डेला दिलेला नायकीचा रीस्टबॅण्ड उचलला... करणने रागात फेकलेल्या त्यावरचा लोगो समीरला उसवलेला दिसत होता...

जीममधून तणतणत निघालेल्या करणने सायकल भरदाव पळवली होती. समीरशी फारकत घेऊन करण निघाला होता खरा पण कुठे आपण जातोय ह्याचे त्याला भानच राहिले नव्हते. आज समीरदादाने मेनकाला दिलेल्या शिव्या त्याच्या जिव्हारी लागल्या होत्या. मनात तापाचा, रागाचा अन कुठेतरी दुःखाचा कल्लोळ माजला होता...
"आय हेट हिम!" हेच शब्द मनात बराळत करणने सायकल तीव्रगतीत वळवली… त्या विचारांत त्याला उजवीकडच्या वळणावर येणारी गाडीही दिसली नाही…. जोरात ब्रेक लागले, पण जरा ऊशीराच… करणची सायकल गाडीच्या बोनेटशी आदळली अन तो जोरात खाली पडला...

"ओह माय गॉड!", कुणीतरी किंचाळलं, अन गाडी मधून बाहेर येऊन खाली पडलेल्या करणच्या चेहेऱ्यासमोर येऊन बघू लागलं. करणचा चश्मा चेहेऱ्यावरून निखळला होता. पण त्यापेक्षाही त्याच्या उजव्या बाहीत असह्य कळ उठली होती, त्यामुळे त्याच्या डॊळ्यासमोर अंधारी आली असावी. त्याही गोंधळात कुणीतरी "करण करण!" अशी हाक मारत असल्याचं करणला जाणवलं अन तो डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न करू लागला. पण अर्ध्या अंधारात अन त्यातून फाकलेल्या गाडीच्या तीव्र प्रकाशाच्या आडून येणारी ती आकृती कोण हे करणला समजले नाही.

नाहीतरी एव्हाना त्या भयंकर वेदनेमुळे करणची शुद्ध जवळजवळ हरपलीच होती....

*******************

(पुढचा भाग ... http://www.misalpav.com/node/18862)

कथालेख

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

18 Aug 2011 - 2:48 am | अर्धवटराव

येउ देत पुढील भाग लवकर ...

(कित्येक नटींचा फॅन) अर्धवटराव

प्रास's picture

18 Aug 2011 - 11:43 am | प्रास

+१

:-)

विनीत संखे's picture

18 Aug 2011 - 12:20 pm | विनीत संखे

धन्यवाद.