(डिसक्लेमर: सदर कथा ही संपुर्णतः काल्पनिक कथा आहे. कथेतील कोणत्याही घटनेचा, ठिकाणचा, संस्थेचा, जिवंत अथवा मृत पात्राचा, वास्तवाशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
मुंबईतलं एक अग्रगण्य महाविद्यालय.. डी. जी. रुपारेल कॉलेज. दिवस १० ऑगस्ट २००७ वेळ दुपारची.. पाउस रिमझिमत होता आणि वातावरणाला एक प्रकारचा 'रोमांचित साज' चढला होता.. आणि कॉलेजचे कॅम्पस विविधरंगी 'फुलांच्या' ताटव्यांनी बहरून गेले होते.. इकडे आत 'मेन बिल्डींग' मध्ये धावपळ सुरु होती.. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याची गडबड घाई .. १२ वी पर्यंत कॉलेजचा अनुभव घेतला असला तरी ११ वी १२ वी म्हणजे एकप्रकारे शाळाच.. या काळात कुठेही फिरण्याचे, नाईट आऊट पार्टीजला जाण्याचे स्वातंत्र्य मुलांना मिळत नसते.. साधारण १२ वी पास होईपर्यंत मात्र पालकांना आपल्या -कार्टींचा एकंदरीत अंदाज आलेला असतो.. आणि मुले देखील कागदोपत्री का होईना 'मोठी' झालेली असतात.. सो आजपर्यंत जे अनुभव घेता आले नाहीत ते आता एफ वाय (वरिष्ठ महाविद्यालयाचे पहिला वर्ष) मध्ये आल्यावर घेऊया, या औत्सुक्याने मुलं 'सीनीयर कॉलेज' करता तयार झालेली आहेत .. त्यामुळे त्यांची देखील आपापला वर्ग शोधण्यासाठी धावपळ सुरु असते . अशातच पहिली बेल होते.. विद्यार्थी विद्यार्थीनी आपापल्या वर्गात शिरतात.. आणि यातच असतो आपला नायक.. स्वताची ओळख शोधणारा, आयुष्यात काहीतरी करून धावण्याची इच्छा असणारा.. टिपीकल स्टोरीज प्रमाणे आपला नायक अति स्मार्ट, पहाताक्षणी नजरेत भरावा असा नाहिये उलट थोडासा भिडस्तच आहे.. नायकाचे वर्णन एका शब्दात करायचे झाले तर 'फॉर्मल' हा शब्दच योग्य ठरेल.. मात्र एकदा मैत्री झाली जीवाला जीव देखील देण्याची तयारी असणारा.. हा आपला नायक आपल्यासाठी एक ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.. शाळेपर्यंत अभ्यासात तथाकथित लो-प्रोफाईल असलेला हा विद्यार्थी.. एचएससी मध्ये चांगले गुण मिळवून मुंबईतीलं असं एक महाविद्यालय जिथे प्रवेश मिळणे म्हणजे आपला जन्म भरून पावला, असं बहुतांश विद्यार्थी आणि पालकांना वाटतं, त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने आपल्या नायकाचा आत्मविश्वास दुणावलेला असतो. आणि आता बाय हूक ऑर क्रूक, अभ्यासात जास्तीत जास्त मेहनत करुन येणाऱ्या भविष्यात आपण आपल्या पालकांचं आणि कुटुंबाचं नाव मोठं करायचं अशी पक्की खुणगाठ त्याने मनाशी बांधलेली असते.
***
साधारण विशीतल्या आणि भविष्याची स्वपने रंगवणारा विद्यार्थी विद्यार्थींनींचा ग्रुप थट्टा मस्करी करत आपल्या नेमून दिलेल्या वर्गात प्रवेशता होतो.. हा असतो बीएमएस चा वर्ग.. यांच्या मध्ये असतो आपला नायक.. आज एफवाय-बीएमएसला प्रवेश करताना त्यांचे कोर्स कोऑर्डीनेटर वेलकम स्पीच देत असतात.. अभ्यास सिरीयसली करा.. तुमाच्यातुनच उद्याचे व्यवस्थापक, अर्थतज्ज्ञ, बिझीनेस लीडर्स घडणार आहेत.. मुलं-मुली मात्र भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे पाहत असतात.. नायक देखील आपला ग्रुप तयार करण्यासाठी आतुर असतो.. मात्र मुळच्याच भीडस्त स्वभावामुळे त्याची स्वत:हुन कोणाशी ओळख करण्याची तयारी नसते. मात्र तरीदेखील तो एका चेहर्यावरुन तरी सुसंस्कृत वाटण्यार्या मुलाशी ओळख करुन घेतो.. याचं नाव आहे अविनाश सेन.. प. बंगाल मधुन मुंबईला खास मॅनेंजमेंट्ची डिग्री मिळवण्याकरता आलेला तरुण.. मुंबईत वन बीएचके फ्लॅट रेन्ट्वरुन घेऊन एकटाच राहणारा..
इतक्यातच, नायकच्या मागच्या बाकावर बसलेली एक नवतरुणी नायकाला 'हॅलो' म्हणते.. नायक देखील हसुन प्रतिसाद देतो.. हीच आपल्या कथेची नायिका... शर्वरी सुब्रमण्यम.. चेहरा टिपीकल दक्षिण भारतीय.. सावळा वर्ण.. मध्यम चणीची उंची आणि चेहर्यावर मात्र दिलखुलास आणि अफाट मनमोहक हास्य.. नायक मनातुन इम्प्रेस होतो, त्याला हवीहवीशी वाटणारी नायिका त्याला शर्वरीत दिसते.. पण सध्या तरी तो चेहर्यावर काहिच न दाखवता, प्राथमिक ओळखी वर समाधान मानतो.. आणि त्याच्या मित्रा सोबत चहाच्या टपरीवर रवाना होतो.. तिला देखील नायकाशी खरंतर पुढे बोलायचे असते, पण तास संपल्याने ती देखील तिच्या नवीनच झालेल्या मैत्रीणी सोबत कॅंटीनकडे जाते.. कॉलेजचा पहिला दिवस मावळतो.. आता पुढे काय होणार याची हळवी उत्सुकता दोघांच्याही मनाला लागलेली असते...
(क्रमश:)
प्रतिक्रिया
18 Aug 2011 - 5:23 pm | गणपा
नावावरुन ही गुडी गुडी कथा असावी असा समज होतोय.
ते ढिश्क्लेमर का टाकलस उगा, खर सांग हे तुझं तुझ्या कालिजातल प्रकरण आहे का नाही? ;)
किती भागांची मालीका आहे तेही आताच सांगुन टाक...इतरांसारख उगाच टांगुन ठेवलस तर याद राख.
18 Aug 2011 - 5:34 pm | धन्या
गणपाभौशी आपण सहमत आहोत... वर जरी ढिश्क्लेमर टाकलं असलं तरी हे लेखकाच्या कॉलेजमधलंच (लेखकाचं ?) एक प्रकरण आहे हे लगेच कळतं. अनुभवाचे बोल ;)
असो. छान लिहिलं आहे. (फुलपाखरी दिवसांवर काही लिहिलेलं छानच असणार राव ;) )
पुढचा भाग येऊदया लवकर... तुमच्या स्वारी, तुमच्या नायकाच्या प्रकरणात काय झालं ते भराभर सांगून टाका :)
18 Aug 2011 - 5:31 pm | प्रचेतस
इंट्या, चांगले लिहित आहेस. फक्त कथा लिहिण्याच्या शैलीमध्ये थोडासा बदल कर. उदा. आपला नायक असे लिहिण्याऐवजी त्याच्या नावाने कथा सुरु कर. कदाचित पहिला भाग पात्रांची ओळख असल्यानेही या शैलीत लिहिले असशील.
18 Aug 2011 - 8:36 pm | पप्पु अंकल
आगदी सहमत
बाकी वाट पहातोय...
18 Aug 2011 - 6:41 pm | शुचि
दाक्षीणात्य का रे? महाराष्ट्रीअन गोड मुली मेल्या होत्या का इंट्या? ;)
18 Aug 2011 - 7:00 pm | गणपा
त्याला वाटल असेल की कॅरेक्टर्स थोडीशी बदलली तर लोकं डौट खाणार नाय. ;)
18 Aug 2011 - 7:08 pm | इंटरनेटस्नेही
'ती' दाक्षिणात्यच आहे! कॅरेक्टर बदलंल असलं तरी, वय,जात, सोशल स्टेटस, फॅमिली बॅकग्राऊंड जो आहे/होता तोच लिहिणार आहे मी. :)
18 Aug 2011 - 7:08 pm | शुचि
हाहाहा .... मग कितव्या भागात नायक विपश्यनेला जातोय रे ईंट्या ;) .... नाही आपली उगाच चौकशी :प
18 Aug 2011 - 7:13 pm | सूड
>>हाहाहा .... मग कितव्या भागात नायक विपश्यनेला जातोय रे ईंट्या
शुचिकाकूंनी पार सिक्सरच मारलाय राव. बा द वे कथा वाचतोय, पुभाप्र.
22 Aug 2011 - 2:17 pm | नावातकायआहे
>>शुचिकाकूंनी पार सिक्सरच मारलाय राव
सिक्सर नाही. होम रन.. ;-)
18 Aug 2011 - 7:13 pm | धन्या
गणपाभौ... तुम्ही तर इंटयाचा बाजारच उठवलात :)
18 Aug 2011 - 7:16 pm | शुचि
बाजार नाही हो. तो इतका मनमिळाऊ आहे की त्याचे पाय ओढायला (पुलींगलेग्स) काही वाटत नाही. हक्काने त्याची खेचता येते. :)
18 Aug 2011 - 7:22 pm | इंटरनेटस्नेही
हेच म्हणतो.. सर्व प्रतिसादकांना विनंती करतो की त्यांनी कसलीही भीड भाड न बाळगता, जो मनात येईल तो प्रतिसाद इथे द्यावा!
18 Aug 2011 - 7:25 pm | धन्या
रे झिलां... तां आमकां ठाव आसा..
18 Aug 2011 - 7:42 pm | गणपा
म्हणजे आता १०० नक्की ;)
18 Aug 2011 - 7:32 pm | प्रीत-मोहर
वाचतेय ...
18 Aug 2011 - 8:22 pm | जाई.
चांगल लिहीलेस. वर्णन छान केलेस.
रुपारेलबद्दल योग्य लिहीलेय. खरतर मला दहावीत मिळालेल्या मार्कापेक्षा रुपारेल काँलेजच अप्रूप जास्त होत आणि आहे.
अवांतर= तुमच्या बीएमएस बँचमुळे आम्हा बीकाँमवाल्याची फार पंचाईत झालेली होती.
तुमच्यामुळे वर्ग बदलले गेले आणि सायन्स बिल्डीगमध्ये आमची बँच शिफ्ट झाली ती नेमकी लँबसमोर .
ती रसायने रोज डोक उठवायची.
त्यामुळे रोज त्या लँबसमोरुन जाताना तुमच्या बँचला शिव्याशाप देणे हा आम्हा काँमर्सवाल्याचा एककलमी अजेंडा होता.
नशिब शेवटच वर्ष होत आमच्या बँचच. लवकरच सुटलो.
18 Aug 2011 - 10:24 pm | इंटरनेटस्नेही
धन्यवाद. :)
ओके.
तुम्हा बी कॉमच्या विद्यार्थ्यांच्या शिव्याशापांमुळेच बहुदा आमच्या ७५ जणांच्या बॅच पैकी ३३ जणांना पहिल्याच सेमिस्टरला एटीकेटी लागली! :( पण बरं झालं तुम्ही आमच्या पेक्षा दोन वर्ष सीनीअर होतात ते.. नाहितर आणखीन जास्त शिव्याशाप खायला लागले असते. पण तरीदेखील तुम्हा बीकॉम स्टुडंट्सचे शाप इतके प्रभावी होते की तुम्ही पास आऊट होऊन दोन वर्ष होऊन सुद्धा, टीवायला.. म्हणजे महत्त्वाच्या वर्षाला देखील अर्ध्या बॅचची एटीकेटी शिवाय सुटका झाली नाही. :(
-
(बीएमएस रुपारेल), इंट्या.
18 Aug 2011 - 10:37 pm | जाई.
वेळेवर अभ्यास करावा म्हणजे अशी वेळ येणार नाही.
18 Aug 2011 - 8:47 pm | पप्पु अंकल
गणपा ओप्निंग ला व शुचि यांची बहारदार फटके बाजी........४ . ...६.....४......६......६.....
१०० नक्की
कथे सारख्याच प्रतिक्रिया पण शो...लेट
18 Aug 2011 - 10:11 pm | कवितानागेश
रुपारेलला बीएमएस आहे ही नवीन माहिती कळली.
शिवाय जवळपास चहाची टपरी आलीये हेदेखिल कळले.
बाकी काही नाही कळले.
18 Aug 2011 - 10:30 pm | इंटरनेटस्नेही
आमची पहिली बॅच... रुपारेल बीएमएसची. मुंबई विद्यापीठा कडुन उशीरा परवानगी मिळाली म्हणुन ऑगस्ट मध्ये सुरु झाली.
18 Aug 2011 - 10:23 pm | रेवती
काय कळं ना झालय राव!
पुढे काय ल्हितोस हे वाचून ठर्वेन.
18 Aug 2011 - 10:27 pm | धनंजय
नायकनायिकेस शुभेच्छा.
18 Aug 2011 - 10:37 pm | धन्या
अॅनिव्हर्सरीच्या का?
लेखक मराठी नायकाचे सौथ ईंडीयन पोरीशी लग्न लावेल, आणि मग ती दोघं सुखाने नांदू लागतील हा अंदाज तुम्ही कसा काय बांधलात ब्वा? :)
18 Aug 2011 - 10:36 pm | पैसा
आत्मचरित्र लिहायला अजून खूप खूप वेळ आहे रे! ईस्टायल मात्र इतर कथांपेक्षा वेगळी वाटली, म्हणजे कॉलेजातली मुलं पिच्चरची ष्टोरी सांगतात तशी!
अभ्यास चालू ठेवून पुढचे भाग लिही. कथेचा नायक व्हाया दारू विपश्यनेपर्यंत कसा पोचला हे वाचायची उत्सुकत आहेच!
18 Aug 2011 - 10:41 pm | धन्या
इंटयाभौ, तुमचं आयुष्य ओपन बुक दिसतंय. सगळ्यांना सगळं माहितीय... ज्यांना माहिती नाही त्यांना या (सत्य) कथेतून माहिती होईल. :)
18 Aug 2011 - 11:05 pm | बिपिन कार्यकर्ते
परासरांचं क्यारेक्टर कसं रंगवलंय हे बघायची उत्सुकता आहे! ;)
19 Aug 2011 - 12:13 pm | स्पा
परासरांचं क्यारेक्टर कसं रंगवलंय हे बघायची उत्सुकता आहे
__/\__
बिका धन्य आहात :D
नायकाचा पुणे भेटीचा प्रसंग वाचायला आवडेल
इणत्या लिही रे बिनधास्त
वाचतोय
18 Aug 2011 - 11:08 pm | ५० फक्त
आणि इंट्या लिहिता झाला,
चला आजची तरुण पिढी फक्त बाबा, बुवा, बाई आणि अण्णाच्या मागे न लागता काहितरी त्या त्या वयात करण्यासारखं करतेय हे केवढं छान झालं.
बादवे, इंट्या कोरीगडावर पोरगी बंगाली आहे असं बोलला होतास की रे, का तो भाग नंतर येईल , म्हणजे मी असं गॉप्यस्फोट नको होता करायला पण राहवलं नाही लं, असो पैसातै म्हणाल्या तसं अभ्यास सांभाळुन लिहि बरं उगा अडचण नको व्हायला अभ्यासात
वपाडाव, अजुन एक पत्रिका घ्या छापायला.
19 Aug 2011 - 12:06 am | माझीही शॅम्पेन
अहो इंट्यास्वामी काही प्रश्नांची उत्तरे त्वरित देण्याचा प्रयत्न करावा अशी समस्त मिपाकरांकडून आपणास नम्र विनंती
१. नायाकाने रेनकोट सोडून छत्री वापरण्यास सुरूवात केली हे कुठल्या भागात येईल
२. नायक साधारण पणे किती तिखट खाऊ शकतो
३. नायकॅचा बॉडी मास इंडेक्स किती आहे म्हाजे चालताना दम वैइगरे लागतो का
४. नायक एस.टि बसला बी-ई-एस-टी म्हणतो का ?
५ नायकला नाइकेला अनरिटा पाहिल कॉकटेल पाजायची मनीषा आहे का ?
(समस्त प्रतिक्रिया हलकीच घ्यावी )
माझीही छत्री :)
19 Aug 2011 - 12:34 am | इंटरनेटस्नेही
नायकाने ट्रेककरता म्हणुन रेनकोट वापरला होता. अदरवाईज मुंबई मध्ये अंब्रेलाच वापरणे सोयिस्कर आहे.
डिपेंड्स.. आजकाल नायकाला तिखट खायचा कंटाळा आला आहे.. म्हणुन.. नाहितर एकेकाळी आम्ही तिखट जेवणावर तुटुनच पडायचो.
बीएमआय २५.१०. चालताना दम 'वैइगरे' लागत नाही.
अजिबात नाही. नायकाला या दोन्ही वेगवेगळ्या परिवहन संस्थांबद्दल पुर्ण माहिती अजुन तो योग्य त्या नावानेच त्यांच्या सेवांचा निर्देश करतो.
=)) प्रस्तुत 'नाइका' शर्वरी यांना नायकाने सीसीडी व्यतिरिक्त अन्य कुठेही नेले नाही आणि अनरिटा कॉकटेलची पातळी आम्हाला कधीच गाठता आली नाही! :(
-
माझीही गावठी. ;)
19 Aug 2011 - 12:44 pm | माझीही शॅम्पेन
.
.
__/|\__
अरे मिपा स्टाईल उत्तरे त्वरित दिल्या बद्दल आतिजलद धन्यवाद
अरे लबाडा आतच सांगून टाकतोस की तूच नायक आहेस म्हणून
बर पुढचे भाग लवकर यउद्या :)
19 Aug 2011 - 12:53 pm | किसन शिंदे
ओ शॅम्पेनराव वर गणपाशेठचा प्रतिसाद बघा कि त्यांच्या अंतर्यामी दॄष्टीने त्यांनी आधीच जाणलंय हि लेखकाचीच कहानी आहे. ;)
19 Aug 2011 - 11:48 pm | माझीही शॅम्पेन
अरे किस्ना , गणपा ने केल ते प्रेडिक्षण आणि इंटेश ने केल ते कँफेक्शण :)
माझीही वाइन आणि कँफेक्शरीज
20 Aug 2011 - 5:07 pm | सूड
सौदिंडीयन नायकिणीचं आपलं ते हे.... नायिकेचं नाव शर्वरी वैगरे शोभत नाही. हरिप्रिया, दुर्गाभवानी, कनककिशोरी असं काहीतरी शोभलं असतं. नायिकेचं आजोळ मर्हाटी असल्यागत वाटतंय !! खरं का ??
19 Aug 2011 - 12:22 pm | पियुशा
छान इन्टया
येउ देत अजुन :)
19 Aug 2011 - 12:28 pm | स्पा
छान इन्टया
इंट्या छान कि लेख ;)
--इंटुशा
20 Aug 2011 - 7:24 am | ५० फक्त
''छान इन्टया
येउ देत अजुन ''
छान इन्ट्या यायला बराच वे़ळ लागेल हो अजुन, काही पुर्वतयारी केली असेल तर तसं काही बोलला नाही, का रे इंट्या ?
20 Aug 2011 - 8:39 pm | गणेशा
असेच म्हणतो इंट्या ...
अआणि छान लिहित आहे येवुदे अजुन लिखान .. एकदम जोरदार
21 Aug 2011 - 12:55 am | आत्मशून्य
वाचतो आहेच सविस्तर प्रतीसाद लवकरच दिल्या जाइल.
23 Aug 2011 - 6:46 pm | स्पंदना
आहा !
लव श्टोरी ! लव श्टोरी!