ह्या ठिकाणी टारझनने एका प्रतिसादाचे रसग्रहण करण्याचे आव्हान केल्याने मी माझा कधी नव्हे ते मिळालेला रिकामा वेळ सत्कारणी लावण्याचे ठरवले.
सर्वप्रथम अन्वर चित्रपटावरून लेखकाला लंडनची आठवण येते म्हणून त्या चित्रपटाच्या निर्मात्याला धन्यवाद. केवळ त्यामुळेच निनाद यांचा सुंदर प्रतिसाद आपणास वाचायला मिळाला.
लंडनला आमच्या बरोबर बरेच मित्र सवंगडी हे केवळ आर आर ह्यांच्या निर्णयामुळे नाईलाजाने दोन वेळचे कोक /बर्गर / पिझ्झा खायला परदेशात शिक्षणासाठी आले होते
अहाहा.. पहिल्याच वाक्यातून लेखकाने किती विविध गहन विषयांना स्पर्श केला आहे पहा.
पहिल्याच ३ शब्दात लेखक आपण लंडनला असतो हे वाचकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतो. आर आर हे लेखकाचे कोणी मित्र आहेत कि नातलग हा suspense ह्याच वाक्यात लेखक निर्माण करतो. बाकी आर आर यांचा निर्णय वगैरे समजण्यास तुमचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाढा अभ्यास पाहिजे. परंतु एकदा का तुम्हास हे रहस्य उलगडले की मग तुम्हाला करून चुकते की एका व्यक्तीच्या निर्णयामुळे किती लोकांची आयुष्ये बदलून जाऊ शकतात. लेखकाचे मित्र सवंगडी नक्की शिक्षणासाठी परदेशात गेले होते की दोन वेळचे कोक /बर्गर / पिझ्झा खायला हा अजून एक suspense लेखक निर्माण करतो आणि तो शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात यशस्वी होतो. किंबहुना लेखकाने मराठी भाषेला एक नवीन परदेशात हा एक context sensitive जोडशब्द बहाल केला आहे असे म्हणावेसे वाटते. (उदा. कोक /बर्गर / पिझ्झा खायला आणि/ अथवा/ व शिक्षणासाठी ह्या ऐवजी कोक /बर्गर / पिझ्झा खायला परदेशात शिक्षणासाठी).
.(त्यांच्या नर्तन मधुशाला थंड पडल्या होत्या .)
पुढील वाक्यात ह्या लेखकाच्या प्रयोगशीलतेचा अजून एक नाविन्यपूर्ण आविष्कार दिसून येतो. पूर्णविराम वाक्याच्या शेवटी देण्याच्या आपल्या इतके वर्षांच्या खुळचट प्रथेला छेद देऊन लेखक एक नवीन पायंडा पडण्याचा प्रयत्न करतो. पूर्णविराम वाक्याच्या पहिले देण्यामुळे वाचण्यास कुठून सुरुवात करायची हे कळते. तसेच त्या . चा bullets ऐवजी वापर करून लेखक आपले लेखन मुद्देसूद बनवण्यचे दुहेरी उद्दिष्ट सध्या करतो. आपण इतके दिवस कसे काय इतके कठीण प्रकारे लिहिलेले वाचत होतो हा विचार करून मलाच स्वत:ची शरम वाटली.
भारतात आल्यावर आता तेथे फक्त संगीताचे कार्यक्रम होतात .पण गाणाऱ्यांना नोटांची माळ व , इतर प्रकार सर्रास व्हायचे .
आता लेखक भारतात आल्यावर तो कार्यक्रम करतो की तो भारतात आला म्हणून इंग्लंडात कार्यक्रम होतात ह्याचा शोध घेण्याचे काम लेखक वाचकांवर सोपवतो. लेखकाने नवीन जोडशब्द शोधल्याने की काय पण लेखक एक स्वल्पविराम व ह्या शब्दानंतर टाकून देतो.
माझ्या मित्रांच्या मालकीच्या अश्याच एका मधु शाळेत जाणे झाले .( येथे कॉफी ही बियर पेक्षा महाग असते म्हणून ती मागवली )
अजून एक बहारदार वाक्य जे भरपूर गोष्टी सांगून जाते. लेखकाचा मित्र मधुशाला चालवतो. तिथे बियर बरोबर कॉफी सुद्धा विकतो. तीसुद्धा बियर पेक्षा महाग. लेखकाची ती खरेदी करण्याची ऐपत आहे.
काही नवजात गायिका भसाड्या आवाजात गाणी गायल्यावर लगेच फुले उधळण्यात आली.
लेखकाबद्दल अजून माहिती देणारे आणि वाचकाला विचार करण्यास भाग पाडणारे वाक्य. लेखकाला गायिका नवजात आहेत हे बघताच कळले. वाक्यातून त्या गायिकांनी गाणी गायली की त्या नवजात आहेत म्हणून लेखकानेच गायली हे कळण्यास मार्ग नाही. परंतु भसाड्या आवाजात गाणे म्हटल्यास लगेच फुले उधळण्यात येतात हे महत्वाचे.
मग तो आला .
हिरोसारखा दिसणारा एक तरुण
तो आल्यावर एकदम सन्नाटा ( तो मैफिलीची सुरवात ह्या गाण्याने करतो हे सर्वाना ठाऊक )
आहाहाहा .. काय वातावरण निर्मिती केली आहे पहा. ३-४ शब्दांची छोटी छोटी वाक्ये.
आणी त्याने'' मौला मेरे मौला ....
तेरी''................. .
त्यांचे गाणे ,ती सादर करण्याची पद्धत व त्याचा जीव ओतून गाणे सादर करणे ..
( ह्या गाण्याला २० हजार तरी सहज .....) आमच्या मित्राने धंद्यांचे गणित सांगितले .
अजून एक नवीन पायंडा. " " च्या ऐवजी ( ) वापरणे.
दिवसा हा इसम अनेक ठिकाणी बॉलीवूड मध्ये वर्णी लागावी म्हणून पायपीट करतो
.
व रात्री येथे पहाटे पर्यत गातो .( आणी हा नियमित रियाझ सुद्धा करतो असे कळले )
येथे लेखकाने . चा वापर separator सारखा केला आहे. पुर्णविरामाचे इतके विविध उपयोग आजपर्यंत उमगले नव्हते.
मी त्याची स्वाक्षरी घेतली .
'' एक दिन तुम जरूर बडे स्टार बनोगे ,फिर तुम्हे फुरसत कहा होगी ''
माझ्याकडे पाहून तो हसला .
अजूनही त्यांचे स्वर कानात गुंजतात .
लेखकाच्या दूरदृष्टीला आणि गुणग्राहक्तेला सलाम.
मेंढ्राला मांस असतं की मेंढरु म्हंणजेच मांस ? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण जेवढे बकरे खाल तेवढे अधिकंच आपण मांसाहारी होत जातो . ( ह्याचा अर्थ सांगणार्यास मला मिळालेलं बक्षिस फॉरवर्ड ).
(स्वाक्षरी सौजन्य टारझन)
प्रतिक्रिया
23 Mar 2011 - 12:03 am | टारझन
लंबुटांग ,
आपले आभार कसे माणु ते कळत नाही. आजवर आम्ही श्री.निनाद मुक्काम जर्मणी ह्यांचे प्रतिसाद डिकोड करण्यात कित्येक वेळ वाया घालवला. पण हाती लागला तो "डॉट" :)
आपल्या रसग्रहणाने आज मला निनाद समजाला , उमगला , असेच म्हणावे लागेल .
रसग्रहणानिमित्त माझ्या वजनाची पाच , दहा आणि विस पैषांच्या नान्यांची तुळा करुन त्याचे अॅल्युमिनीयम भंगारात विकुन जेवढे पैसे येतील त्याची वह्या पुस्तके आपण एखाद्या अनाथाश्रमाच्या मुलांना दान करावीत असे सुचवतो.
-(मिरचीसकट) लिंबुटांग
23 Mar 2011 - 12:04 am | रेवती
प्रतिसादाच फारसा कळला नव्हता (सॉरी निनाद मु. पो. ज.) तर रसग्रहण कुठलं रे कळायला?
मिपावरचं तुझं दुसरं कि तिसरं लिखाण रे लंबूटांग?
बाकी सध्या वेळ दिसतोय्......हे असं लिहायला!
बक्षिस काय आहे हे माहीत नसताना कशाला फॉरवर्ड करतोस?
23 Mar 2011 - 1:18 am | लंबूटांग
किती ते कमी लेखायचे दुसर्याला !(पुण्याच्या का हो तुम्ही?).
तब्बल ५ लेख लिहीलेत मी ! (त्यातील ३ दुसर्यांच्या लेखाची विडंबने असली म्हणून काय झाले) ;)
आज lunch meeting पर्यंत वेळ होता थोडा. वेळ मिळाला की मी लग्गेच सदुपयोग करून टाकतो.
बाकी, अशा प्रतिसादाच्या अशा रसग्रहणाला मिळून मिळून काय बक्षिस मिळणार.. लोकांच्या असतात काही बाही अपेक्षा म्हणा.
23 Mar 2011 - 6:32 pm | रेवती
अस्सं काय!
मी पुण्याची म्हणूनच असे लिहिले तर ती प्राजु कोल्हापुरकरीणही तसंच म्हणतीये.
कधीकधी लॉटरी लागते म्हटलं.........मिळाली बाईक तर का सोडतोस?
चांगली हर्ले डेव्हिडसन घे. ती मिळाल्यानंतरच गोंदवलेकर महाराज व्हायचं.;)
पेश्शल कपडे वगैरे त्यानंतर्......काळी जॅकेट्स् , काळ्या रंगाची पालथे कलिंगड ठेवल्यासारखी हेल्मेटं, अजून काय काय असतं कि!
23 Mar 2011 - 12:21 am | इंटरनेटस्नेही
मस्त! मस्त! ए मच अवेटेड लेखन एवढंच म्हणेन. प्रत्येक वाक्याला हसुन हसुन पुरेवाट झाली.
-
(प्रस्तुत लेखन ज्यांच्या लेखनशैली बेतले आहे त्यांचा फॅन) इंट्या!
23 Mar 2011 - 12:35 am | प्राजु
वेळ गावला वाट्टं!! :D
23 Mar 2011 - 12:52 am | ५० फक्त
च्यायला : शिमग्याचं! कवित्व "ऐकलं " (होतं) आणि शिमग्याचआव्हनात्मकरसग्रहण हा एक नवा जोड्संधीसमासशब्द मराठीजालसाहित्यासंस्क्रुतीला बहाल केल्याबद्दल खालील क्रमाने सगळ्यांचे अभिनंदन.
१. निनाद
२. टारझन
३. लंबुटांग
म्रठीजाल्साहित्यसंस्क्रुती आंतर्जाल बंड पडेपर्य्णंत आपली आभारी राहील.
23 Mar 2011 - 1:30 am | धनंजय
कठिण आहे!
23 Mar 2011 - 1:35 am | पुष्करिणी
. हसून हसून मेले
23 Mar 2011 - 9:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
लंबूटांग, तुझे पाय कुठे आहेत रे ?मेले हसून हसून
.
अदितीताई अवखळकर पाटील
मुक्काम बेरकेवाडी, पोस्ट अवखळवाडी.
23 Mar 2011 - 7:30 pm | निनाद मुक्काम प...
इंटर नेट स्नेही
मला एक प्रश्न पडला होता त्याचे उत्तर .तुम्हाला काही माहित आहे का ?
रमजा हे मिपावरील एक आदरणीय व्यक्तिमत्व
त्यांच्या खव मध्ये डोकावले तर अनेक मान्यवरांनी विविध विषयावर त्यांच्याशी चर्चा केली आहे .
त्याला उत्तर देतांना त्यांनी नेहमीच मृदू भाषेत उत्तर दिले आहे .
मग अचानक विक्षिप्त राडिया बाईंना त्यांचा त्रास का व्हावा .?( जशी दृष्टी तशी सृष्टी )
तुम्ही त्यांचे जुने मित्र असे कुठेतरी वाचले म्हणून तुम्हाला विचारात आहे
23 Mar 2011 - 1:38 am | मेघवेडा
उच्च!
23 Mar 2011 - 1:43 am | निनाद मुक्काम प...
लंबू टांग
सर्व प्रथम जाहीर आभार ( ह्या आधी मिपावर अनेक मान्यवरांच्या लेखाचे रसग्रहण झाले आहे .त्या पंक्तीत तुम्ही आम्हाला बसवले .)
आमच्या जुन्या सहकाऱ्याने परत जुने माकड चाळे सुरु केले आहेत .
त्यांच्या विनोद बुद्धीने त्यांनी मन ह्यांच्या लेखावर अनावश्यक विडंबन केले .
ते प्रतिसाद उडवले गेले .
उगाच ज्येष्ठ मिपाकरांना टपल्या मारून झाल्यात .(नंतर लेख व्यक्तीशः आवडला अशी सारवासारव एकेठिकाणी केली)
आता लंबू .तुम्ही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिलात .
एक दिवस तुम्ही टारझन ह्यांना खरड करायला जाल. तर त्यांची खरड वही बंद दिसेन .
मग ती का बंद झाली ह्यावर कविता लिहायला ही कुणी नसेन
असो ..
.
बाकी आम्ही आमच्या मित्राच्या मधुशालेत त्यांच्या बरोबर गेलो होतो .म्हणून बिल आले नाही .व ते भरण्याचा प्रश्न आला नाही .
आपले मित्र आपल्याला त्यांच्या घरी बोलवून चहा पाजला तरी कटिंग चे अडीच रुपये आपल्या कडून घेत असतील .असे मला वाटते
.
आणी नर्तन कलेवर बंदी आली म्हणून गायन कलेकडे वळलेल्या गायिका ह्या नवजात होत्या. हे त्यांच्या गाण्यावरून कळून चुकले .
आणी हो
मधुशालेचा दरबान एक लंबू टांग व्यक्ती होता .त्याने मी परदेशातून म्हणजे आफ्रिकेतून आलो हे कळल्यावर मला पाठमोरा सलाम केला .
मी त्याला आपला दोस्ताना होणे शक्य नाही असे सांगितले. त्यावर तो थोडा हिरमुसला . .
तुम्हाला गिफ्ट म्हणून महिलांना जाहीर रीत्या अडचणीचे प्रश्न कसे विचारायचे ? ह्याचे मार्गदर्शन स्वतः टारझन करणार आहेत असे कळले .
त्याच ललित लेखनाचा प्रसार आपण फोरवर्ड करणार आहात मिपावर असे दिसून येत आहे .
अवांतर ह्यापुढे आपल्या प्रत्येक साहित्यकृतीचे रसग्रहण आपला रसभंग न करता आम्ही आवर्जून करू ह्याची खात्री बाळगावी .
ह्यातील बऱ्याच गोष्टी लंबू ह्यांना समजल्या नाही तर त्यानी मिपाचा पूर्व इतिहास पाहावा
किंवा .हा प्रतिसाद कळला नाही म्हणून कुणाला त्याचे रसग्रहण करायला लावण्यापेक्षा
माझ्या एका अप्रकाशित लेखाची प्रत त्यात योग्य ते बदल करून पुन्हा प्रकाशित करण्यासाठी मला परत मिळाली होती .
ती पुन्हा प्रकाशित न करता लंबू ह्यांना व्यनी करेन .
23 Mar 2011 - 2:17 am | लंबूटांग
प्रतिसाद देणार नव्हतो, पण इतके वाचल्यावर राहवले नाही म्हणून पहिला आणि शेवटचा प्रतिसाद.
मला कोणाचीही खरडवही चालू आहे किंवा बंद ह्याने काही फरक पडत नाही आणि त्यावर कविता आणि लेख लिहावेत असेही वाटत नाही. दुसर्यांनी लिहावेत अशी अपेक्षाही मी करत नाही.
वैयक्तिक होते आहे थोडे आणि उगाचच मित्रांना मधे कशाला? कसे आहे ना, मला उगाचच आपण बाहेर गेलो की कसे महागात महाग drink पितो ह्याची जाहिरात करायची सवय नाही. आणि मित्राच्या जिवावर तर नक्कीच नाही. बाकी माझे मित्र काय करत असतील ह्याची चिंता आपण करू नये ही नम्र विनंती. आपणास तशी पण जर्मनीचे पारंपारिक अन अपारंपारिक उर्जास्रोताचे व इतरही बर्याच चिंता आहेतच. असो.
माहिती स्रोत तपासा.
बर्र.
बाकी 3 वर्षे 4 आठवडे कालावधीत मी तब्बल ५ लेखांचा (त्यातील ३ विडंबने अथवा तत्सम काहीतरी) प्रसार केला हे आपणास वरील प्रतिसादांतून कळले असेलच. त्यामुळे रसग्रहण करायला माझ्या साहित्यकृती मिळणे थोडे कठीण आहे. पण करायचे असेल तर जरूर करा. मी कोण थांबवणारा.
हॅ हॅ हॅ
काळजी नसावी.
लंबूटांग: सभासद कालावधी 3 वर्षे 4 आठवडे आणि आपला सभासद कालावधी 15 आठवडे 6 दिवस.
त्यामुळे आपल्यापेक्षा थोडा अधिक इतिहास माहित आहे.
Thanks but no thanks :)
23 Mar 2011 - 2:39 am | गणपा
:)
अरे निनाद, कुणी चुका दाखवल्या की तो आपला शत्रुच आहे वा शत्रुच्या कंपुतलाच आहे हा गैरसमज का करुन घेतोस?
23 Mar 2011 - 10:16 am | शिल्पा ब
कारण सग्गळ्ळे मेले त्यांच्याविरुद्ध कट करताहेत म्हणुनच.
24 Mar 2011 - 1:48 am | निनाद मुक्काम प...
गणपा तुझा व्यनी मिळाला
त्याला सवडीने व्यनिने उत्तर देईन
मला एक सांग '' असा जाहीर सल्ला तू टारझन ह्यांच्या चुकांबद्दल त्याला देतोस का ?
24 Mar 2011 - 2:47 am | गणपा
तो माझ्या गबोल्यावर आहे. तिथे त्यला अधुन मधुन डोस देतच असतो. आता ते क्षेत्र मिपाबाहेरच असल्याने त्या व्यनी मनीच्या गोष्टी इथे सांगता येणार नाहीत.
24 Mar 2011 - 2:50 am | Nile
ओ गनपासेट, आमालाबी देत जा की राव सल्ले अधुन मधुन.. एखांदा व्यनी तरी पाठवत जा.. आम्ही काय घोडं मारलंय तुमचं?? आं??? :-)
24 Mar 2011 - 2:51 am | शिल्पा ब
तुम्ही जर्मनीवाल्या धाग्यांवर प्रतिसाद दिला तरच गणपाशेट सल्ले देतात असा अंदाज आहे.
24 Mar 2011 - 2:54 am | गणपा
माताय माझ्या व्यनीला इतकी डिमांड आहे माहीत नव्हत. =))
23 Mar 2011 - 10:40 am | नगरीनिरंजन
लेख आणि प्रतिसाद दोन्ही जबरा! जुगलबंदी आवडली. फक्त मस्करीत हे सगळं चालावं अशी इच्छा व्यक्त करून माझे हे दोन शब्द संपवतो.
23 Mar 2011 - 1:51 am | Nile
=)) =))
=)) =))
जबरा!
23 Mar 2011 - 2:39 am | गणपा
:)
23 Mar 2011 - 2:40 am | राजेश घासकडवी
:)
23 Mar 2011 - 4:29 am | अनामिक
.तिन वर्ष व, चार आठवड्यात आलेले तुझे ५ लेख (
की विडंबणं?)
.
जबरदस्तं आहेत रे लंबूटांग
ह ह पु वा
23 Mar 2011 - 7:35 pm | निनाद मुक्काम प...
अहो त्यांना सुपारी मिळाली कि ते लेखन ( विडंबन करतात ) उगाच आपले अमूल्य शब्द वाया घालवत नाहीत .
राडिया बाई येथे स्वतः जातीने हजर तेही आपल्या फौजफाट्यासह
अजून काय पुरावा पाहिजे
23 Mar 2011 - 10:40 pm | अनामिक
तू इथे उपप्रतिसाद दिला आहेस म्हणून...
मी इथे बहुतेक करुन वाचनमात्रच असतो. आणि माझ्या जवळ जवळ ३ वर्षाच्या वास्तव्यात लंबूटांगने कोणत्याही कंपूबाजीत येऊन उगाच कुणाला टारगेट केलेलं बघीतलं नाही. आता त्याला वेळ होता म्हणून आणि अनायसे तुमचा प्रतिसाद मिळाला म्हणून त्याने इथे हे रसग्रहण केलं असावं हे माझं भाबडं मत. तू जर हे रसग्रहण सिरियली न घेता अगदी मजेत घेतलं असतंस तर चांगलं वाटलं असतं.
24 Mar 2011 - 12:22 am | रेवती
अनामिकशी सहमत.
लंबूटांग हा निरुपद्रवी सदस्य आहे.
मिपाकट्टा, हरित देश येथे तो विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही मोजक्या शब्दात देतो.
त्याला मी भरपूर चिडवत असते पण बिचारा उलट उत्तर कधीही देत नाही.
अवांतर: ए, तुला चांगलं म्हटलय रे लंबू......आता माझ्या धाग्याला प्रतिसाद दे!;)
24 Mar 2011 - 2:26 am | निनाद मुक्काम प...
माझी खात्री पटली
पण त्यांच्या निम्मिताने कंपू बाजाची टोळ झाड आली ..
लांबू टांग
चूक भूल द्यावी ध्यावी
23 Mar 2011 - 7:40 am | सहज
मास्तर आजकाल काही लिहीत नाहीत पण नवीन क्रिप्टीक किंग मिपावर दाखल झाले आहेत.
निनाद मु. पो. ज. हे मात्र खरे आहे की तुमचे साधे प्रतिसाद / लेखन नीट समजुन घ्यायला विनाकारण मेहनत करावी लागते. तुमच्या मुळ प्रतिसादात किस्सा मुंबईत घडला का लंडनमधे घडला यावर अजुन संभ्रम आहे. कॉफी मागवायचा व बियरपेक्षा महाग असा संदर्भ का आला? महागड्या बार मधे गेला होता इतके पुरेसे होते. आणि अपेयपान केल्याचा लोकांचा समज जरी झाला तरी आपण 'गर्व से कहो हम पेताड है' च्या जमान्यात आहोत हे कसे विसरलात?
बर इथेच वर लिहले आहे
मधुशालेचा दरबान एक लंबू टांग व्यक्ती होता .त्याने मी परदेशातून म्हणजे आफ्रिकेतून आलो हे कळल्यावर मला पाठमोरा सलाम केला .
मी त्याला आपला दोस्ताना होणे शक्य नाही असे सांगितले. त्यावर तो थोडा हिरमुसला . .
तुम्ही अफ्रिकेतुन कधी आलात? म्हणजे मानवजात अफ्रिकेतुन आली आहे हा संदर्भ असेल तर हम सब अफ्रिकन पण इतकेही जुने संदर्भ शोधायला लावू नका राव. आणी पुढचा अर्थ, हिरमुसणे इ इ नाही झेपले. असेही म्हणा तुम्ही मित्राला भेटायला गेला होतात, दरबानशी दोस्ती करायला नसावात. त्यामुळे अवांतर पण तेही क्रिप्टीक म्हणजे जरा अतीच होते असे नाही वाटत?
तुम्हाला अभिव्यक्त व्ह्यायचे आहे पण नेमके कसे व काय व्यक्त करायचे आहे ह्याची गोची होती आहे का? असो ह्या धाग्यानंतर आपल्या लेखनात सकारात्मक फरक पडेल अशी आशा व्यक्त करुन थांबतो.
जय मिपा, जय मआंजा.
23 Mar 2011 - 9:34 am | मनीषा
मला कवितांचे, गाण्याचे रसग्रहण माहिती होते....
. पण मिपा वर प्रतिसादाचेही रसग्रहण वाचले .
. धन्य !!! . (मिपा, तुम्ही आणि वाचणारे आम्ही सुद्धा ) . :)
23 Mar 2011 - 8:13 am | प्रीत-मोहर
=))
=))
=))
हसुन हसुन.
मेले.
23 Mar 2011 - 9:29 am | सूड
असे रसग्रहण दुर्मिळच !!
23 Mar 2011 - 9:34 am | पैसा
प्रतिसादाच्या विडंबनात्मक रसग्रहणाची नवीन पद्धत आवडली. लंबूटांग यानी जरा जास्त प्रमाणात लिहावे अशी विनंती!
23 Mar 2011 - 10:26 am | प.पु.
ह्या रसग्रहणाला २५ हजार तरी सहजच..........
23 Mar 2011 - 10:20 am | शिल्पा ब
भन्नाट...
बाकी लंबूटांग कधीपासून कंपूबाज आणि निनाद मुक्काम पोष्ट जर्मनी यांच्याविरुद्ध कट करणारे झाले? तो तर टारझन , मी , आदिती, बिका वगैरे लोकांचा प्रांत ना? हॅ हॅ हॅ हॅ
23 Mar 2011 - 10:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ए, तू कशाला गं आमच्या राखीव क्षेत्रात घुसखोरी करते आहेस. ;-)
23 Mar 2011 - 10:26 am | शिल्पा ब
मी स्वतः घुसले नाही जर्मन निनाद यांनी खास माझ्यासाठी लेख अन प्रतिसाद लिहू लिहू बळंच ढकललंय नाहीतर उगाच तुझ्याशी पंगा कोण घेणार? ;)
23 Mar 2011 - 10:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अच्छा, जर्मनीमुळे आपण दोस्त झालो आहोत काय? हरकत नाही. पण पंगाशेट कुठून आले इथे?
23 Mar 2011 - 10:40 am | शिल्पा ब
पंगाशेठचा काय संबंध? उगाच भांडणं लाउन गंमत बघायची सवय कधी जाणार?
23 Mar 2011 - 10:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
'संशयरत्नमाला' आठवली. प्रश्न विचारायचा आणि आपण त्याचं उत्तरही द्यायचं.
(पळते आता, नाहीतर शिल्पा आणि पंगाशेट, दोघंही सोडणार नाहीत मला!)
23 Mar 2011 - 7:39 pm | निनाद मुक्काम प...
@उगाच भांडणं लाउन गंमत बघायची सवय कधी जाणार?
अहो शिल्पा ब
तुम्ही येथे प्रतिसादात बिका ह्यांचा अकारण उल्लेख कोणत्या निर्मळ हेतूने केला आहे .?
सासू सासऱ्यांची निरपेक्ष वृत्तीने सेवा करणारा मुक्काम पोस्ट....
23 Mar 2011 - 10:51 am | निनाद मुक्काम प...
@वैयक्तिक होते आहे थोडे आणि उगाचच मित्रांना मधे कशाला? कसे आहे ना, मला उगाचच आपण बाहेर गेलो की कसे महागात महाग drink पितो ह्याची जाहिरात करायची सवय नाही. आणि मित्राच्या जिवावर तर नक्कीच नाही. बाकी माझे मित्र काय करत असतील ह्याची चिंता आपण करू नये ही नम्र विनंती. आपणास तशी पण जर्मनीचे पारंपारिक अन अपारंपारिक उर्जास्रोताचे व इतरही बर्याच चिंता आहेतच. असो.
लंबू महाशय उगाच मित्राला कशाला म्हणजे मूळ प्रतिसादात मी मित्राच्या बरोबर त्याच्या मधु शाळेत गेलो होतो .हे लिहिले होते .
तरीही तुम्ही जर (लेखकाची ती खरेदी करण्याची ऐपत आहे.) काढत असाल तर मी अजून काय अर्थ काढावा .( हे वैयक्तिक होत नाही का ?)
बाकी डान्स बार मध्ये बियर इतर बार पेक्षा जास्त भावाने विकतात हे माहीत होते .पण काही शौकीन जे दारू सुद्धा पीत नाहीत ते सुद्धा येथे हजेरी लावतात व चहा किंवा कॉफी पितात .व त्यांचे दर पंचतारांकीत हॉटेलपेक्षा जास्त असतात .ही नवी माहिती मिळाली .म्हणून मी लिहिले .
गणपा
अरे ह्या निमित्ताने आलेल्या काही निवडक प्रतिसाद पहा तुझे तुलाच समजून येईन .
एक साधे उदाहरण देतो .मागच्या वेळी माझ्या आख्यानात माझ्या टंक लेखनाच्या निमित्ताने ज्यांनी शिमगा घातला त्यात तू हजेरी लावलीस (आवर्जून )
इतर अनेक ठिकाणी बरेच जण टंक लेखन अशुद्ध लिहितात तेथे तुझी अनुपस्थिती एक गोष्ट स्पष्ट करते '' तुझा विरोध हा अशुध्द टंक लेखनास नसून विक्षिप्त राडिया बाईंच्या फुटकळ प्रतिसादात आपली एक भर
म्हणून असायचा
.आज त्यांनी व आम्हाला शब्दांनी ठोकणाऱ्या लोकांनी येथे हजेरी लावून हे सिद्ध केले आहे .( मुळात उगाच आपण द्वेष्टे आहोत .व जेथे वाद तेथे पहिले आम्ही .हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे .)
बाकी लंबू तुमचे पाय पण लंबू आहेत का ?
तुम्ही ठाण्यात आणी पुण्यात राहणारे असला तर काही द्वेष्टे तुमचे पाय खेचून तुमचा कपाळमोक्ष करतील .
सहज
@मुळ प्रतिसादात किस्सा मुंबईत घडला का लंडनमधे घडला यावर अजुन संभ्रम आहे
.(त्यांच्या नर्तन मधुशाला थंड पडल्या होत्या .)
भारतात आल्यावर आता तेथे फक्त संगीताचे कार्यक्रम होतात .पण गाणाऱ्यांना नोटांची माळ व , इतर प्रकार सर्रास व्हायचे .
माझ्या मित्रांच्या मालकीच्या अश्याच एका मधु शाळेत जाणे झाले .माझ्या ह्या वाक्यातून सदर घटना ही भारतात घडली हे सहज कळून येईन .
मुळात तो गायक दिवसा बॉलीवूड मध्ये वर्णी लागावी म्हणून दीवसा पायपीट करायचा असा उल्लेख आहे .
अहो रोज लंडन वरून अप डाऊन करायला लंडन हे डोंबिवलीच्या पलीकडे आहे का ?
माझ्या प्रतिसादाचे मुख्य हेतू म्हणजे माझा अनुभव शेअर करणे .
डान्स बार मध्ये कोणती गाणी लोकप्रिय असतात हे तेथे न जाणारे सुद्धा चांदणी बार हा सिनेमा पहिला तर कळून येईन .
पण सुफी पद्धतीचे हे गाणे येथेच नाही अनेक डान्स बार मध्ये आजकाल संगीताचे कार्यक्रम होतात तेथे लोकप्रिय आहे .
मुळात ते गाणे ऐकतांना तेथे आलेली लोक ते गाणे अत्यंत तन्मयतेने ऐकतात . त्यावेळी तेथे आढळणारी शांतता त्या वास्तूस पूर्ण पणे नवखी होती .
भांगेमध्ये तुळस असा वाक्यप्रचार भाई ह्यांनी मराठी साहित्याला दिला त्याची . प्रचीती आली म्हणून प्रतिसाद टंकला .
तरीही सहज
ह्यापुढे प्रतिसाद अजून स्पष्ट करून सांगेन ( भले ते अजून दीर्ध झाले तरी चालतील )
आतापर्यतच्या सर्व प्रतिसादात तुमचा प्रतिसाद निखळ वाटला .हे आवर्जून नमूद करतो .
23 Mar 2011 - 10:57 am | इंटरनेटस्नेही
आवरा!
23 Mar 2011 - 11:19 am | सहज
लंडनला आमच्या बरोबर बरेच मित्र सवंगडी हे केवळ आर आर ह्यांच्या निर्णयामुळे नाईलाजाने दोन वेळचे कोक /बर्गर / पिझ्झा खायला परदेशात शिक्षणासाठी आले होते
.(त्यांच्या नर्तन मधुशाला थंड पडल्या होत्या .)
आता हे वाचून मला तरी वाटले की महाराष्ट्रात डान्सबार बंद झाले व तुमचे जे मित्र सवंगडी होते ज्यांना त्याशिवाय करमायचे नाही ते शिक्षणाच्या नावाखाली मौजमजा करायला पक्षी लंडनच्या डान्सबार मधे जिज्ञासा , तृष्णा पूरी करायला आले.
सध्या मी, (वाचक) तुमच्या वरील वाक्यांमुळे 'लंडन' मधे आहे. पक्षी: तुम्ही हे लंडन मधील अनुभवाबद्दल लिहीत आहात असे समजलो आहे.
भारतात आल्यावर आता तेथे फक्त संगीताचे कार्यक्रम होतात .पण गाणाऱ्यांना नोटांची माळ व , इतर प्रकार सर्रास व्हायचे .
माझ्या मित्रांच्या मालकीच्या अश्याच एका मधु शाळेत जाणे झाले .( येथे कॉफी ही बियर पेक्षा महाग असते म्हणून ती मागवली )
ही वाक्ये उगाच अवांतर माहीती वाटली. लंडनला असताना तिथले काही सांगत आहात असे वाटताना भारतात आल्यावर काय कसे कुठे कधी होते हे अवांतर व अति अवांतर वाटले, तितके ठळक संदर्भ डोक्यात घेतले गेले नाही. पक्षी : प्रसंग अजुन लंडन मधे घडत आहे असेच वाटले.
काही नवजात गायिका भसाड्या आवाजात गाणी गायल्यावर लगेच फुले उधळण्यात आली .
मग तो आला .
हिरोसारखा दिसणारा एक तरुण
तो आल्यावर एकदम सन्नाटा ( तो मैफिलीची सुरवात ह्या गाण्याने करतो हे सर्वाना ठाऊक )
आणी त्याने'' मौला मेरे मौला ....
तेरी''................. .
त्यांचे गाणे ,ती सादर करण्याची पद्धत व त्याचा जीव ओतून गाणे सादर करणे ..
माझ्या डोक्यात अजुनही हा कार्यक्रम लंडन मधे सुरु आहे.
( ह्या गाण्याला २० हजार तरी सहज .....) आमच्या मित्राने धंद्यांचे गणित सांगितले .
दिवसा हा इसम अनेक ठिकाणी बॉलीवूड मध्ये वर्णी लागावी म्हणून पायपीट करतो
२० हजार पौंड ? असतील ही बॉ! महागाई वाढली आहे. परवा लाख डॉलर नाही का कोणाच्या बॅग मधे सापडले! आणी बॉलीवूड मधे संधी लागावी म्हणून पायपीट फक्त मुंबईतच केली पाहीजे कशावरुन? (आता बॉलीवूड सिनेमात पाहीले आहे की मुंबईत जावे, सिनेमात जावे या करता देशभर आता तर जगभर लोक मेहनत करुन सध्या जिथे आहेत तिथेच आपले फोटोसेशन करणे, फिल्म /सीडी बनवणे, गावातल्या चार माहीतगारांना भेटणे व उरलेल्या वेळात पैसे कमवणे जे मुंबईत गेल्यावर 'गुजारा' करायला उपयोगी होतील म्हणून साठवणे. हा सगळ्याला देखील - 'हा इसम अनेक ठिकाणी बॉलीवूड मध्ये वर्णी लागावी म्हणून पायपीट करतो' असे म्हणता येईलच की) आजकल तर कित्येक सिनेमे लंडन / युके मधे होतात. बरेच निर्माते व सिनेमाक्षेत्राशी संबधीत लोक लंडनला असतात. आमची जुनी माहीती तर नदीम्-श्रवण मधला नदीम तिथे राहून संगीत देत होता व दिवसा कोर्टकेस लढत होता. (अवांतर माहीती द्यायचा मोह आवरत नाही आहे, पाकीस्तान/ कराचीशी लागेबांधे असलेले अनेक लंडन/युके स्थित आहेत असेही आमचीही सुत्रे सांगतात. बॉलीवुड मधे पैसा तर कराचीहून येतो असे कित्येक दशकांपासुन ऐकीवात आहे.)
त्यातुन तुम्ही सध्या मुक्काम पोस्ट जर्मनी असल्याने लंडनला काय पुणे- डोंबीवली सारखे ये जा करु शकता असे वाटले. तुम्ही तेथुन मुंबईत याल हे जरा अवघड वाटले. जर्मनी-लंडन व लंडन-बॉलीवूड हे मी अंतर मोजले हो. :-)
असो. म्हणून जास्त फाटे न फोडता, अचूक माहीती देत गेले की माझ्यासारखे ए.डी.डी. वाचक नीट अर्थ लावू शकतील.
-----------------------------------------------------------------------------------
मराठी आंतरजालावर भाईकाका यांच्या वैचारिक लेखातील संदर्भ सोडून अन्य संदर्भ द्यायला बंदी केली पाहीजे
23 Mar 2011 - 1:53 pm | पुष्करिणी
क्ड्क्ड्क्ड्क्ड्क्ड्क्ड्क्डकड्कड्कड्कड्कड....
* हा टाळ्यांचा कडकडाट आहे
23 Mar 2011 - 7:50 pm | निनाद मुक्काम प...
@अचूक माहीती देत गेले की माझ्यासारखे ए.डी.डी. वाचक नीट अर्थ लावू शकतील.
+ १
ह्यापुढे तसा प्रयत्न राहीन
तुम्ही मोठ्या मनाने निखळ भावनेने सल्ला दिला ह्याबाबत आभारी आहे .
23 Mar 2011 - 10:44 am | निनाद मुक्काम प...
शिल्पा ब
तुम्ही अगदी उद्वेगाने मागे माझ्या खव मध्ये लिहिले होते की माझे लेखन व प्रतिसाद वाचणे तुम्ही कधीच सोडले आहे .
मग आता अचानक २ ते ३ प्रतिसाद .......
आता ध्यानात आले .
तुमच्या जिवलग .प्राणप्रिय मित्राचा येथे जाहीर उल्लेख झाला म्हणून तुम्हाला राहवले नाही .
अवांतर - '' मला कश्याला हवे सासू ,सासरे माझ्या घरी परदेशात . आमचा आभसी जगतातील दोस्ताना पुरे आहे .माझ्यासाठी .
23 Mar 2011 - 10:52 am | शिल्पा ब
<<माझे लेखन व प्रतिसाद वाचणे तुम्ही कधीच सोडले आहे .
मला वाटलं कि हा लेख लंबूटांग यांनी लिहिला आहे...आणि या प्रतिसादाआधी कोणताही प्रतिसाद तुम्हाला दिलेला नव्हता....
हो आणि माझे जे मित्र आहेत ते सगळे प्राणप्रियच आहेत...उगाच तोंडदेखली फुकट खाण्यापिण्यासाठी मैत्री आम्ही करतच नाही.
23 Mar 2011 - 11:00 am | निनाद मुक्काम प...
@आणि या प्रतिसादाआधी कोणताही प्रतिसाद तुम्हाला दिलेला नव्हता....
अगदी १००% सहमत
तुम्ही दिलाच नव्हता .
पण आज राहवले नाही .
असो ह्यापुढे दिला नाही तर आजन्म उपकृत होईन .
तुमचे खव मध्ये चालू द्या
.( .............. गप्पा ,टप्पा )
23 Mar 2011 - 11:06 am | शिल्पा ब
मी काय करायचं आणि काय नाही ते माझं मी ठरवायला समर्थ आहे आणि वेळ आलीच तर माझं मित्रमंडळ जिवंत आहे काळजी नसावी. हे वाचायला अवधड जात असेल तर ...
मी काय करायचं आ.
णि काय नाही ते माझं मी ठरवायला समर्थ आहे
आणि वेळ आलीच तर माझं मि"
.त्रमंडळ जिवंत आहे काळजी न
सावी.
23 Mar 2011 - 11:07 pm | सविता
"(" आणि ")"राहिला की हो शिल्पा ताई!
23 Mar 2011 - 7:53 pm | निनाद मुक्काम प...
@उगाच तोंडदेखली फुकट खाण्यापिण्यासाठी मैत्री आम्ही करतच नाही.
हा टोमणा मला की इतर मिपाकरांना आहे .?
बॉलीवूड मधील दोस्ती ह्या विषयाला वाहिलेली अनेक गाणी आठवली
मला मात्र माझ्या सासू सासऱ्यांची सेवा करण्यापासून फुरसतच मिळत नाही .
23 Mar 2011 - 8:24 pm | सूड
>>मला मात्र माझ्या सासू सासऱ्यांची सेवा करण्यापासून फुरसतच मिळत नाही .
तेच तर, आमच्या समोरच्या कुलकर्ण्यांच्या सूनेने लग्न झाल्यानंतर सहा महिन्यात एका घरात वेगळी चूल मांडली.
23 Mar 2011 - 8:52 pm | निनाद मुक्काम प...
तिची सासू येऊन तुम्हाला तिच्या चुगल्या सांगते .की तुम्ही त्यांच्या घरात नाक खुपसतात .
24 Mar 2011 - 7:05 am | सूड
छे छे आम्ही आमचं नाक व्यवस्थित सांभाळून असतो. आम्ही ते कुठे खुपसत वैगरे नाही, फक्त निरीक्षणं करतो. काही लोकांना मात्र नाकाने कांदे सोलण्याची फार सवय असते, जमलंच तर त्यांची नाकं मुठीत घ्यायला लावतो त्यांना !! बा द वे असा सासु-सासरेप्रेमी जावई मिळणं हल्लीच्या काळात दुर्मिळच म्हणून हे लिहीलं होतं. असो.
23 Mar 2011 - 10:48 am | योगी९००
प्रतिसादाचे रसग्रहण आवडले...
निनाद : हलकेच घ्यावे ही विनंती.
23 Mar 2011 - 10:54 am | स्पा
मिपावर नवीन लोकांचे ऱ्यागिंग होतेच होते, मी, इणत्या, शुची तै,गवि इवन पियुषा सुद्धा, कोणीच सुटलं नाही :D
थोडी खेचा खेची होणारच. पण आपण मजेत घेतले कि हे सर्वच स्वभावाने किती चांगले आहेत हे सुद्धा कळते
तुझ्या बाबतीत प्रत्येक प्रतिसाद बघितल्यावर नेहमी तू स्वतःचेच अनुभव सांगत सुटतोस, लेख कुठलाही असो
तू तुझी जर्मनी मध्ये आणतोसच आणतो , कधी कधी ठीक आहे रे.. पण सतत हे व्हायला लागलं तर लोक कंटाळतात
टंकायच्या बाबतीत , मनातल्या भावना जश्या विस्कळीत असतात, तश्याच्या तश्या तू उतरव्तोस , अरे पण वाचणार्यांचा पण विचार कर न..
वाचायला सोप्पं करून लिही, म्हणजे तुझे दोन्ही उद्देश सध्या होतील, तू काय बोलतोस ते लोकांना कळेल, आणि अशी सतत मस्करी होणार नाही
असो, मला जे काही जाणवलं ते मी लिहिलं, बाकी तू जाणकार आहेसच
23 Mar 2011 - 10:55 am | निनाद मुक्काम प...
स्पा येथे जर्मनी नव्हते
भारतात आलेला एक अनुभव होता .
पण धन्यवाद
मी ह्यावर विचार करेन
अवांतर -- बदलापूर ची ट्रीप कशी झाली ?
अनुभव वाचण्यास उत्सुक .
23 Mar 2011 - 11:21 am | इंटरनेटस्नेही
कोणत्याही नवीन ठिकाणी गेल्यावर आपले रँगिग होणारच. किंबहुन मानसशास्त्रीदृष्ट्या आपल्यालाच अशी काही काळानंतर सवय लागते की कोणी थोडं जरी काही बोलंल तर ते मनाला लावुन घ्यायची, आणि मग आपण फुकटचा त्रागा करुन स्वताला रँगिग्चे व्हिक्टीम समजायला लागतो. इतकं सिरीयस होण्याची काही गरज नाही. असो.
तुम्हाला स्पष्ट शब्दांत सांगायचं तर, तुमचे लेख आणि प्रतिसाद त्यांच्यातील पराकोटीच्या जाहिरातबाजीमुळे आणि त्याहुनही जास्त अशुद्धलेखनामुळे डोळ्यांना त्रास देतात, आणि या अर्थाने आम्ही सर्व मिपाकर तुमचे लेखन वाचत नसुन सहन करतो असं म्हणायला पुरेसा वाव आहे. पण, आमच्याही सहनशक्तीला मर्यादा आहेत हे कृपा करुन लक्षात घ्यावे.
त्याचप्रमाणे, वेळोवेळी तुमच्या निदर्शनास येथील सभासदांनी आणुन दिले आहे की वारंवार तुम्ही 'जर्मनी, जर्मनी' करु नका म्हणुन, माझे मत आहे की, जर तुम्ही जर्मनी सारख्या अत्यंत प्रगत देशात वास्तव्याला असाल तर ती खरंच अभिमानाची बाब आहे. मात्र वारंवार तुम्ही जर्मनीला होतो/आहे म्हणजे जणु काही चंद्रावर/मंगळावर/अन्य कुठल्या ग्रहावर वास्तव्यास होतो/ आहे, इतक्या महत्त्वाची बाब असल्यासारखा त्याचा उल्लेख अतिशय वारंवार करत आहात. परदेशागमन ही खरंच इतकी काही अप्रुपाची बाब आता राहीली नाही. म्हणुन कुठली गोष्ट कुठपर्यंत ताणायची याचा विवेक बाळगलात तर तुम्ही एक उत्तम लेखक होऊ शकाल.
याउप्पर, मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्यांचा तुम्ही सातत्याने अपमानास्पद उल्लेख आपल्या प्रतिसादांत करत आहात ते सर्व मिपाचे जुणे जाणते सदस्य आहेत आणि आजही त्यांचे लेखन आवडीने वाचले जाते. तेव्हा हे भान आपण बाळगले तर उत्तमच होईल.
23 Mar 2011 - 7:04 pm | निनाद मुक्काम प...
इंटर नेट स्नेही
@ या अर्थाने आम्ही सर्व मिपाकर तुमचे लेखन वाचत नसुन सहन करतो
तुम्हाला समस्त मिपाकरांनी त्यांचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून नेमले आहे का ?
स्वतः पुरते बोला
@त्याचप्रमाणे, वेळोवेळी तुमच्या निदर्शनास येथील सभासदांनी आणुन दिले आहे
( हो अर्थात त्यांची नेमणूक ह्यासाठी झाली आहे व त्यांना मी युरोमध्ये पगार देतो .त्यांची योग्यता एवढी आहे की ते मलाच काय समाजातील मान्यवर लेखक मंडळींना सुद्धा कसे लिहावे ,काय लिहू नये .बुकर पारितोषिक मिळवण्यासाठी कोणत्या विषयावर लिहिले पाहिजे असे अनेक सल्ले ते देऊ शकतात ह्याच कारणास्तव फक्त विक्षिप्त बाईंना स्वताचे अर्धवट राहिलेले लेख पूर्ण करता येत नाही म्हणून वाईट वाटते )
काही निवडक कंपूबाज सभासद .. ,त्यांच्या आदेशावर मी चालावे अशी तुमची इच्छा
@ज्यांचा तुम्ही सातत्याने अपमानास्पद उल्लेख आपल्या प्रतिसादांत करत आहात ते सर्व मिपाचे जुने जाणते सदस्य आहेत आणि आजही त्यांचे लेखन आवडीने वाचले जाते.
मस्तानीचा प्याला कधी प्यायला? .
बाकी शतकी प्रतिक्रिया मिळवण्यासाठी कधी पुणे ,कधी ठाणे ह्या विषयावर विपुल लेखन तर कधी हिरवा माज अश्या कोलांट्या उड्या मारणारे विक्षिप्त सभासद नक्कीच आहेत .त्यांचे लेखन व त्यांच्या प्रतिसादाच्या संख्या पहिली असता तुमचे म्हणणे
पटले.
23 Mar 2011 - 11:45 pm | इंटरनेटस्नेही
तुम्हाला समस्त मिपाकरांनी त्यांचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून नेमले आहे का ?
नाही.
स्वतः पुरते बोला
हो. मी स्वत:ही तुमचे इमोशनल अत्याच्यार करनारे लेखन सहन करतो.
@त्याचप्रमाणे, वेळोवेळी तुमच्या निदर्शनास येथील सभासदांनी आणुन दिले आहे
( हो अर्थात त्यांची नेमणूक ह्यासाठी झाली आहे व त्यांना मी युरोमध्ये पगार देतो .त्यांची योग्यता एवढी आहे की ते मलाच काय समाजातील मान्यवर लेखक मंडळींना सुद्धा कसे लिहावे ,काय लिहू नये .बुकर पारितोषिक मिळवण्यासाठी कोणत्या विषयावर लिहिले पाहिजे असे अनेक सल्ले ते देऊ शकतात ह्याच कारणास्तव फक्त विक्षिप्त बाईंना स्वताचे अर्धवट राहिलेले लेख पूर्ण करता येत नाही म्हणून वाईट वाटते )
काही निवडक कंपूबाज सभासद .. ,त्यांच्या आदेशावर मी चालावे अशी तुमची इच्छा
या सर्व बालिश अर्ग्युमेंट्स तुम्ही करत आहात. मला वाटतं तुम्ही भावुक होऊन दणादण की बोर्ड चालवाताय. ..
@ज्यांचा तुम्ही सातत्याने अपमानास्पद उल्लेख आपल्या प्रतिसादांत करत आहात ते सर्व मिपाचे जुने जाणते सदस्य आहेत आणि आजही त्यांचे लेखन आवडीने वाचले जाते.
यात अजिबात असत्यता नाही.
मस्तानीचा प्याला कधी प्यायला? .
=)) हसुन हसुन पुरेवाट झाली. आणि बाय द वे मी मस्तानीचा नाही 'वेगळाच' प्याला प्रीफर करतो!
बाकी शतकी प्रतिक्रिया मिळवण्यासाठी कधी पुणे ,कधी ठाणे ह्या विषयावर विपुल लेखन तर कधी हिरवा माज अश्या कोलांट्या उड्या मारणारे विक्षिप्त सभासद नक्कीच आहेत .त्यांचे लेखन व त्यांच्या प्रतिसादाच्या संख्या पहिली असता तुमचे म्हणणे
पटले.
असं का? वा वा!
साहेब, मला काय सांगायचे ते तुम्हांला नक्कीच समजले आहे, ते पुरेश्या स्पष्ट आणि सुलभ मराठी भाषेत आहे. जरा शांत डोक्याने घ्या व साकल्याने विचार करुन आपली वर्तणुक सुधरा. अर्थात हे सांगण्याचा मला कायदेशीर अधिकार नसावा, मात्र मॉरल अधिकार नक्कीच आहे. असो. बाकी तुम्ही जाणकार आहातच!
24 Mar 2011 - 12:04 am | निनाद मुक्काम प...
तुम्हाला मेहेंदळे ह्यांनी लिहिलेला सोप्या मराठीत प्रतिसाद समजला नाही का ?
( माझे लिखाण उमजत नाही म्हणून म्हटले )
माझे इमोशनल अत्याचार वाचायला आमंत्रण दिले नाही
माझे लेख न टाळता येण्या एवढे नाही आहेत का ?( अगदी सहन करता वैगैरे अश्या गोष्टी लिहितात .)
तुमचे दुर्बिणीचे प्रगल्भ प्रतिसाद तुमच्या कंपूबाज रादिया बाईंच्या लेखात तुम्ही लिहितात
मी घेतला का त्यावर आक्षेप ?
दिला का तुम्हाला सल्ला ?
जगा आणी जगू द्या
24 Mar 2011 - 1:14 am | इंटरनेटस्नेही
साहेब, मला काय सांगायचे ते तुम्हांला नक्कीच समजले आहे, ते पुरेश्या स्पष्ट आणि सुलभ मराठी भाषेत आहे. जरा शांत डोक्याने घ्या व साकल्याने विचार करुन आपली वर्तणुक सुधरा. अर्थात हे सांगण्याचा मला कायदेशीर अधिकार नसावा, मात्र मॉरल अधिकार नक्कीच आहे. असो. बाकी तुम्ही जाणकार आहातच!
24 Mar 2011 - 1:43 am | निनाद मुक्काम प...
तुम्ही येथे लिहित आहात
तेथे टारझन तुम्हाला खव मध्ये शाबासकी देत आहे .
शिल्पा ब सुद्धा शाबासकी देत आहेत .( म्हणे आता तुम्ही मोठे झालात )
तेव्हा आपले मोठेपण आपल्या कंपूत मिरवा ,
24 Mar 2011 - 2:08 am | इंटरनेटस्नेही
=)) =)) =)) =))
चिल ड्युड, चिल!
=)) =)) =)) =))
23 Mar 2011 - 8:57 pm | निनाद मुक्काम प...
@मिपावर नवीन लोकांचे ऱ्यागिंग होतेच होते, मी, इणत्या, शुची तै,गवि इवन पियुषा सुद्धा, कोणीच सुटलं नाही
अरे मी एकाचे ठरवून पारध केले जाते त्याच्या विरुद्ध आहे .
ह्या प्रकाराने दोन गोष्टी होतात .
१) जे मिपाचे वाचक आहेत त्यांना सदस्य बनण्याची इच्छा असून ते बनत नाहीत .
व झालेत तर नवीन स्वताचे काही लिहित नाहीत .
ह्यांच्या ह्या प्रकारामुळे अनेक मान्यवर लिहायचे टाळतात .
त्या अवलीयांचे काम वाढवतात .( आता ते कोण करणार ?) शाली व नारळ
जगा आणी जगू द्या .
जर माझ्या काही गोष्टी खटकत असतील आणी त्या ह्यांना सुधाराव्या वाटत असतील तर ह्यांनी पहिले स्वतःला सुधारावे .
23 Mar 2011 - 10:57 am | कच्ची कैरी
बाप रे !!!! काय च्या काय वाचायला मिळते आहे ,असो लेख आणि प्रतिसाद दोन्ही वाचुन खूप मजा आली :)
23 Mar 2011 - 11:17 am | मृत्युन्जय
काय लहान मुलांसारखे भांडता आहात? मला तर लेख आणि प्रतिसाद दोन्ही अनुचित वाटले.
लेख वाचुन करमणुक झाली खरी. रसग्रहण एक नंबर आहे हे पण मान्य. पण हे जरा अतिच वैयक्तिक होते आहे. धाग्याची गरज होती असे वाटत नाही. सगळ्यांनी मिळुन एकाला मारायला सुरुवात केली की त्याच्याकडुनही वैयक्तिक चिखलफेक करणारे प्रतिसाद येतीलच. निनादचे बरोबर आहे असे मी म्हणत नाही. पण म्हणुन हे असे धागे काढुन त्याची अजुन हुर्यो उडवावी हे पण मला पटत नाही. त्याने मध्यंतरी एक अतिशय विनोदी आणि अनाकलनीय धागा काढला होता आणि तो निश्चित चुकीचा होता. त्याने केलेल्या चुका आपण सगळेजण परत करतो आहोत असे मला तरी वाटते.
बाकी चालु द्यात.
23 Mar 2011 - 12:09 pm | छोटा डॉन
+१,
ह्यापेक्षा अजुन काही लिहण्यासारखे नाही.
- छोटा डॉन
23 Mar 2011 - 12:26 pm | टारझन
जिकडे रसग्रहणाचे आवाहन केले होते तिकडे प्रतिसाद टाकल्या गेला असता तर तो धागा हायजॅक झाल्या गेला असता. तो विसोबा खेचर यांचा धागा असल्याने तसे होऊ नये असे वाटल्याने लंबुटांग यांना नविन धागा काढण्याचे सुचवल्या गेले होते .
धाग्याचे कारण पुन्हा पुन्हा स्पष्ट करण्याची गरज वाटत नाही. ज्येष्ठ संपादक कार्यकर्ते , ज्येष्ठ सदस्या मस्त कलंदर , वयोवृद्ध सदस्य परिकथेतील राजकुमार , ज्येष्ठ महिला शिल्पा ब आणि मी स्वतः श्री निनाद ह्यांच्या लेखनशैली मधल्या त्रुटी त्यांना वेळोवेळी दाखवुन दिल्या होत्या . अगदीच ताजं ताजं उदाहरण द्यायचं झालं तर वर मिपा चे ज्येष्ठ संता-बंता म्हणजेच इंट्या-स्प्या ह्यांनी देखील त्यांना तेच दाखवल्यावर उपप्रतिसादात पुन्हा तीच शैली दिसते. श्री निनाद ह्यांच्याशी कोणतेही वैरभाव नाही . तसेच कुठे मस्करीची कुस्करी ही झाल्याचे वाटत नाही. श्री निनाद हे मिपा परिवारातले असल्याने त्यांना एवढे महत्व दिल्या गेले आहे.
कोणे एके काळी वातुळ निबंध , अतीजड शब्द आणि इन्नोव्हेटिव्ह जोडशब्द यांनी युक्त लेख ( ते ही दिवसाला ४ च्या सरासरीने ) पाडुन श्रीमान कोदा ह्यांनी खरडवहीत येऊन "लेख वाचा आणि प्रतिक्रीया द्या " ह्याचा जाप सुरु केला होता तेंव्हा देखील असाच शॉट लागला होता. मग पु.ल. म्हणतात त्यानुसार जर एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत असेल तर ती गोष्ट आपल्याच साठी आहे असे समजुन आनंद घ्यावा म्हणजे त्रास होत नाही. त्याच हेतु ने प्रेरित होऊन लेख टाकल्या गेला आहे .
वैयक्तिक असे काय वाटले ते कृपया स्पष्ट करावे . जे लिहीलंय ते संपुर्ण पणे निनाद यांच्या लेखणशैली शी मॅच करते . निनाद चा रंग , जात , वैयक्तिक आयुष्य किंवा लोक किंवा अजुन कोणत्या कॅरॅक्टरिस्टिक्स् चा लेखात उल्लेख केल्या असल्यास त्याला वैयक्तिक म्हणावे .
उगाच सनसनिखेज प्रतिक्रीया देऊन टिआरपी वाढवु नये . ज्येष्ठ नागरिक आणि बुजुर्ग संपादक श्री छोटा डॉण ह्यांचा +१ देखील आश्चर्यकारक वाटला नाही. हल्ली त्यांना कशातंच मुड नसल्याने ते दुसर्यांचाही मुड घालवण्यासाठी असे "+१" लावत असावेत असं प्रथमदर्शनी दिसतं .
असो . धाग्याचे प्रयोजन माझ्या डोक्यातुन आले होते म्हणुन सविस्तर खुलासा केल्या गेला आहे आणि त्यामुळे त्याची जबाबदारी मी उचलतो.
कळावे.
- निवृत्ती
23 Mar 2011 - 12:15 pm | अभिज्ञ
सहजरावांच्या पहिल्या प्रतिसादाशी व मृत्युंजय ह्यांच्या ह्या प्रतिसादाशि पुर्णपणे सहमत.
अभिज्ञ.
23 Mar 2011 - 9:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मृत्युंजय यांच्याशी बहुतांश मुद्द्यांवर सहमत. मस्करी एका मर्यादेपर्यंत असावी. खरे तर ज्याला मस्करी सहन होते त्याचीच मस्करी करावी. अन्यथा मस्करीची कुस्करी होण्यासाठी वेळ लागत नाही. जे या क्षणी इथे होते आहे. (त्यात चूक कुणाची हे सोडून द्या)
मला या निमित्ताने इथे एक गोष्ट मांडावीशी वाटते, ती म्हणजे, एखाद्याची लेखन शैली आवडली नाही, तर आपण वाचू नये. मुद्दे आवडले / पटले नाहीत तर गोष्ट वेगळी. निनाद याने लिहिण्यास सुरुवात केल्यापासून त्याला अनेक लोकांनी त्याच्या शैलीतील उणीवा, त्रुटी सांगितल्या आहेत. एकदा तर अख्खा लेखही पुर्नलेखीत करून दिला असे वाचले होते. तरीही त्याने शैलीत काही बदल केले नाही. मग त्याची खिल्ली उडवली गेली. तरीही त्याने काही बदल केले नाही. याचा अर्थ एक तर त्याला त्या उणीवा आहेत हे मान्य नाही किंवा मान्य आहे पण बदलायची इच्छा नाही. अशा परिस्थितीत आता परत १०० वेळा तेच मुद्दे सांगून काही फरक पडेल असे वाटत नाही.
निनादने मागे तो धागा काढला तेव्हा अनेक लोकांनी त्याला लिहीत राहण्यास सांगितले होते. याचा अर्थ काही लोकांना तरी त्याचे लेखन वाचायला आवडते. (शैली सुधारली तर कदाचित जास्त आवडेल.) ज्यांना आवडत नाही त्यांनी तिथे पूर्ण दुर्लक्ष करावे. कुणी अक्षता घेऊन आमंत्रण देते का लेखन वाचण्यासाठी. आणि दिले आमंत्रण तरी नाकारू शकता तुम्ही. त्याचे प्रतिसाद अवांतर वाटत असतील तर धागाकर्ता संपादक मंडळाकडे तक्रार करू शकतो. मला व्यक्तिश: मिसळपाव वरचे कित्येक प्रतिसाद नाही आवडत, इतरांचेही असेच होत असणार. पण मग वाचू नये.
या प्रकरणावर लवकरच पडदा पडला तर आवडेल. निनाद यांनीही थोडे हलके घ्यावे आणि या धाग्यावर आवरतेही घ्यावे, असा एक फुकटचा सल्ला. :-)
वि. मे.
23 Mar 2011 - 11:19 am | स्पा
+१
23 Mar 2011 - 12:34 pm | वपाडाव
रणांगण...
चालु द्या... आम्हाला एव्हाना रक्तपाताची सवय झाली आहे....
-(शस्त्रसामग्रीचे दुकान पानिपतात लावणारा)
अवांतर : माझ्या हाताच्या बोटांवर दाताचे ठसे उमटले आहेत.
(माझा म्यानेजर माझ्या म्होरं बस्तो, हस्ता येत न्हाय, ते दाबाय लाग्तं.)
इथं अशीच येक स्मायली इमॅजिन करा....
23 Mar 2011 - 1:08 pm | पप्पुपेजर
प्रतिसाद वाचनिय आहेत.
23 Mar 2011 - 1:21 pm | कवितानागेश
.अरे द्येवा........
-- लोळतेय.....
23 Mar 2011 - 4:35 pm | नि३सोलपुरकर
आमच्याकडून वाईड बॉल चा इशारा....
23 Mar 2011 - 7:02 pm | लंबूटांग
सर्वप्रथम एका चुकीबद्दल जाहीर माफी. धाग्यात लेखकाची ती खरेदी करण्याची ऐपत आहे. असे टंकले आहे. ते थोडे वैयक्तिक वाटते खरे. तसा हेतू मुळीच नव्हता त्यामुळे निनाद यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व.
परंतु याउपर मला तरी काही वैयक्तिक वाटत नाही आहे. केवळ त्यांच्या विशिष्ट लेखनशैलीवरच संपूर्ण लेख आधारीत आहे. किंबहुना निनाद यांच्या प्रतिसादातच कित्येक ठिकाणी वैयक्तिक उल्लेख झाले आहेत. बाकी छोटा डॉन यांच्या +१ चे आश्चर्य वाटले नाही. किंबहुना असे काहीतरी येणार याची खात्रीच होती.
@मृत्युन्जय मी इथे कोणाशीच भांडायला येत नाही. माझी वाटचाल पाहिलीत तर मी बहुतांश वेळा वाचनमात्रच असतो. भांडण तर दूरचीच गोष्ट मराठी आंतरजालावर मी फार कुणाला वैयक्तिकरित्या अथवा खरडीमधूनही ओळखत नाही. येथे येतो ते मराठीतले काही वाचायला मिळावे म्हणून. जे काही लिहिले आहे ते केवळ लेखकाची जी लिहिण्याची शैली आहे त्याला वरूनच काहीतरी. मी बहुधा निनाद यांना मागे खरड सुद्धा केली होती की त्यांची जर्मनी ची लेखमाला छान आहे. असो.
वर सहज यांनी लिहिल्याप्रमाणेच मला देखील हे लंडन मध्ये घडत आहे असेच वाटले.
@टारझन सविस्तर खुलाश्याबद्दल आभार.
बाकी @निनाद
वैयक्तिक. परंतु उत्तर आहे होय म्हणूनच हा आय डी घेतला आहे. अजून कसल्या लांबी रुंदी उंची बद्दल प्रश्न असतील तर ख व आहेच.
मी ह्या दोन्ही ठिकाणी राहत नाही. मी कुठे राहतो हे माझ्या profile मध्ये सापडेल. जाहिरात करायला आवडत नाही. बाकी पाय खेचून कपाळमोक्ष होण्याची काळजी नसावी. माझे पाय जमिनीवरच आहेत. आणि मी काही इतका मोठा नाही की कोणाला माझे पाय खेचायची इच्छा व्हावी. बाकी एकंदरीतच तुमचा रोख असा दिसतो की प्रतिसाद द्यायचे तर माझ्या सर्व लेखांवर द्या मधेच कोणी प्रतिसाद द्यायला आले तर तुम्हाला तो कंपूबाज वाटतो. एक निरीक्षण नोंदवले. मोठे व्हा इतकेच म्हणेन.
@पैसा: लेखन हा काही आपला प्रांत नाही ब्वॉ. आपली मजल विडंबनापर्यंतच. आणि मुलखाचा आळस त्यामुळे तेही लिहावेसे वाटले तरी टंकायचा कंटाळा. आता तर निनाद यांनी वर माझ्या प्रत्येक साहित्यकृतीचे रसग्रहण करायची खात्री दिली आहे त्यामुळे जरा जास्तीच भीती वाटतेय काही लिहायची ;).
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार.
23 Mar 2011 - 11:53 pm | निनाद मुक्काम प...
तुमचा खुलासा पटला.
एक सल्ला
उस्फुर्त पणे विडंबन केले तर मलादेखील आवडेल .( गवी यांच्या धाग्यावर ब ने माझे विडंबन केले .त्यावर माझा काहीच आक्षेप नव्हता .खुद टारझन ह्यांनी त्या धाग्यावर जेव्हा रसग्रहण वैगैरे लिहिले तेव्हा सुध्धा
मी हलकेच घेतले होते
पण कंपूबाज व नियमबाह्य खेळ केल्याने संघाबाहेर राहिलेल्या लोकांच्या आव्हानाला बळी पडून लिहित जाऊ नका .
तुमच्या लेखाचे निम्मित करून अनेक कंपूबाज आपली पोळी पिकवून घेतली .
तुम्ही मिपावर जुने आहात .पण नुकत्याच विशिप्त रादिया ह्यांचे प्रतिसाद पहिले तर तुम्हाला कळून आले असते .
मी
तुम्ही ठाण्यात आणी पुण्यात राहणारे असला तर काही द्वेष्टे तुमचे पाय खेचून तुमचा कपाळमोक्ष करतील .हे वाक्य तुम्हाला उद्देशून नाही म्हटले .
23 Mar 2011 - 11:42 pm | पक्या
नावडतीचे मीठ अळणी अशातला हा प्रकार आहे.
मिपावर अशुध्द आणि वाचताना त्रास होईल असे लिहीणारे पुष्कळ आहेत उदा. गणेशा , टारझन
बाकी निनादच्या प्रतिसादातील अनुभव मुंबईत घडत आहे हे समजण्यास मला तरी फार काही अवघड वाटले नाही.
जाता जाता अवांतर : खूप त्रासलेला माणूस साध्या साध्या गोष्टींवर ही कसा त्रासून बोलतो तसा शिल्पा ब ह्यांचा प्रतिसाद बहुतेक ठिकाणी असतो. आता तर ते नाव वाचले की पुढील प्रतिसाद कसा असेल हे ही डोळे झाकून सांगता येते.
23 Mar 2011 - 11:54 pm | शिल्पा ब
<<<खूप त्रासलेला माणूस साध्या साध्या गोष्टींवर ही कसा त्रासून बोलतो तसा शिल्पा ब ह्यांचा प्रतिसाद बहुतेक ठिकाणी असतो. आता तर ते नाव वाचले की पुढील प्रतिसाद कसा असेल हे ही डोळे झाकून सांगता येते.
मी त्रासलेली आहे हे ध्यानात आणुन दिल्याने आभारी आहे आणि नुसते माझे नाव वाचले की प्रतिसाद कसा आहे ते सांगता येत असल्याने तुमचाच पुर्ण प्रतिसाद वाचायचे कष्ट वाचवते हेसुद्धा काही कमी नाही.
बाकी आपण कोण? याआधी कधी नाव पाहीले नाही म्हणुन विचारतेय.
24 Mar 2011 - 12:03 am | टारझन
=)) =)) =)) काय बोलतेस ? माहिती नाही पक्या कोण ? =)) =)) अगं रामदास आणि पिवळा डांबिस नंतर पक्याच आहे :) माहिती नाही का ? मराठीला नविन परिमीती बहाल केलीये त्यांनी :)
आज मिपाचं नाव घेतलं तर तात्या किंवा निलकांत किंवा रामदास किंवा मुसु वगैरे नाही .. तर फक्त पक्याचंच नाव घेतलं जातं .. :)
होक्कीनै रे पकु ?
पण हल्ली फक्त मुळव्याधी उमळल्यावर आमच्या नावे दोन शब्द लिहीतात ते :)
पकलो च्यायला ;)
- सक्या
24 Mar 2011 - 2:52 am | निनाद मुक्काम प...
तुम्ही फक्त कंपूबाज लोकांना व ते ज्यांना टार्गेट करतात अश्या लोकंना ओळखतात .
सगळीकडे उरफाटे प्रतिसाद देण्यापलीकडे तुम्ही दुसरे केले काय ?
24 Mar 2011 - 2:55 am | शिल्पा ब
काय म्हणता!!
मी फक्त कंपुबाज लोकांना ओळखते? मला वाटलं की मीच कंपुबाज आहे म्हणुन!! तुम्हीच नाही का प्रत्येक प्रतिसादात म्हणत तसं?
24 Mar 2011 - 12:25 am | रेवती
यापुढे फालतू प्रतिसाद, भांडणे बंद झाली नाहीत तर धागा वाचनमात्र करावा लागेल याची सदस्यांनी नोंद घ्यावी.
24 Mar 2011 - 1:49 am | रेवती
मी वेगळी प्रतिक्रिया देतिये. बूच मारण्याचा अचरटपणा करत नाहिये.
धागा वाचनमात्र करण्याची कारणे संमं ला कशाला हवीत? जे चाल्लय ते दिसतच आहे.
सगळ्या संपादकांनी ठरवलं कि वाचनमात्र होणारच. तो काही दरवेळी माझ्या एकटीचा निर्णय नसतो.
24 Mar 2011 - 2:46 am | निनाद मुक्काम प...
टारझन ह्यांनी खुलासा दिला मी पण माझ्या बाबतीत खुलासा देऊन ह्या लेखातून निवृत्ती घेतो
त्यांचे म्हणणे होते की विसोबा ह्यांचा धागा हाय जेक होऊ नये म्हणून त्यानी विनंती केली
हा विनोद झाला
'शुचिताइ ह्यांच्या पोट तिडकीने लिहिलेल्या लेखावर ह्याने काय केले ?
मन ह्याच्या सुंदर धाग्यावर ह्याने काय केले ?
मागे तुमच्या आदरणीय महिला कोण ? ह्या लेखावर मीतान ह्यांच्या प्रतिसादावर ह्यांनी कितीतरी उरफाटे प्रतिसाद दिले .
@स्वतः श्री निनाद ह्यांच्या लेखनशैली मधल्या त्रुटी त्यांना वेळोवेळी दाखवुन दिल्या होत्या .
प्राध्यापक बिरुटे ह्यांनी टारझन ह्यांना त्यांच्या लेखनातील त्रूटी दाखवल्या
त्यावर ह्यांनी त्यांच्या खव मध्ये काय उरफाटा प्रतिसाद दिला हे मी जाणून आहे .
त्यांना स्वतः समज मिळाली आहे त्यावर गंभीरपणे विचार करावा .
मला सल्ला देण्यापेक्षा ते अधिक महत्वाचे आहे ..
परीकथेतील राजकुमार ह्यांचे ह्या लेखात टारझन ह्यांनी उगाच नाव घेतले .
त्यांचा येथे काहीही संबंध नाही आहे .
थोडक्यात जे ह्यांच्या खव मध्ये हजेरी लावत नाही अश्या सगळ्या महिला सदस्यांच्या लेखात हे माकड चाळे करत असतात .त्यांचे फोटो ह्यांना आवडत नाहीत ,( उगाच चांगल्या पाककृतीत उरफाटा अनावश्यक प्रतिसाद )
.तेव्हा ह्यांचे हितचिंतक ह्यांना समजावत नाहीत व सल्ला देत नाही .
ह्यांनी वाटेल ते प्रतिसाद द्यावे कुणी ह्यांना बोलणारे नाही .
निलीकांत ह्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ह्या लेखात १०० मिपाकरांनी शुभेच्छा दिल्या फक्त ह्यांनी उरफाटा विनोदी प्रतिसाद दिला .
प्रत्येक वेळी ह्यांचे उरफाटे प्रतिसाद असतात .त्यांना सल्ला कोणीच देत नाही .
स्पा तुला माझ्या एका मिपाकर मित्राने जाहीर रीत्या विनंती केली होती .त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून
तू शिल्पा ब ह्यांना खव मध्ये हरभराच्या झाडावर चढवत आहेस .तुला अजून काय म्हणू .
हा माझा येथील शेवटचा प्रतिसाद
24 Mar 2011 - 7:10 am | रेवती
हा धागा वाचनमात्र केला जात आहे.
नाईल,
तो काही दरवेळी माझ्या एकटीचा निर्णय नसतो.
हे माझ्या आधीच्या प्रतिसादातील वाक्य येथे पुन्हा देत आहे.
यापुढे जास्तीचे स्पष्टीकरण देणार नाही.
जास्त माहितीसाठी मिसळपावची धोरणे वाचणे जरूरीचे आहे.
याही उपर तक्रार असल्यास, आपण नीलकांतशी संपर्क साधावा.