आज काल भाषाशुद्धी-शुद्धलेखन या आणि अशा बर्याच विषयांवर बराच काथ्याकुट करुन झाला आहे.
शब्दकोश हा धनकोशापेक्षा वेगळाच आहे! तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्ह्सा होतो, हाच धागा पकडून ऐक नविन चर्चा पुढे चालू करु.
मिपावर फक्त पश्चिम महाराष्ट्रातले नसून जगातल्या विविध भागातले सदस्य आहेत / गेलेत. चला तर मग आपला शब्द संग्रह वाढवूया. पण अट ऐकच वाद नघालता नव नविन आणि गंमतशीर शब्द सांगायचे आपल्या प्रांतातले
( तात्या अशी चर्च्या यापुर्वी झाली असल्यास लीखकाच्या संमती शिवाय विषय काढुन टाका)
सुरवात मी करतो
शासकीय कामानिमीत्य काही महिन्यांपुर्वी विधान-सौधा (बेंगळूरु) येथे जाण्याचा (जेवण्याचाच म्हणाना) योग आला. बरीच वेळ चर्चा झाल्या नंतर तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी महोदय आले, तिथेच आमच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आणि त्यांच्या कन्नड भाषणाला सुरवात झाली (त्यांना ईंग्रजी येत नसावे बहुतेक)
काय बोलले राव ! अधी आदर आणि मग हसु यायला लागलं मला. शब्दच कळेनात मला आणि मी ते मराठी शब्दांना जुळवले. अगदी शाळेत करतो ना तसचं जोड्या जुळवा / गाळलेल्या जागा भरा ईत्यादी.
पण आता अर्थ लागलेत त्यांचे ते असे-
गळू - लोकहो / जनहो (आदरार्थी बहूवचनी संबोधन) ऊदा : यलार सल्लागार गळू - सर्व सल्लागार लोक
हागु - आणि / तसेच (ऊभयान्वयी शब्द)
भंगार - सोने
कुंडी - ढुंगण
सोप्पु - पालेभाजी
मेले / मेलगडे - वर , केळे / केळगडे - खाली
केळी - विचारा
हेळी - सांगा
हळ्ळी - गाव, पाळ्या - भाग (देवन हळ्ळी, कद्रेनहळ्ळी, मरीयप्पन पाळ्या, कळासी पाळ्या)
प्रतिक्रिया
30 May 2008 - 10:18 pm | ईश्वरी
अमेरिकेत बर्याचदा कानावर पडलेले स्पॅनिश शब्द
स्पॅनिश शब्द: अर्थ
Hola : (उच्चार) ओला - हॅलो , Gracias - धन्यवाद
Amigo: अमिगो - मित्र
Cero सिरो - शून्य
Uno, dos, tres, cuatro(क्वात्रो), cinco (सिंको) : एक दोन तीन चार पाच
Negro - काळा (रंग) , blanco (ब्लांको)- पांढरा
Esposo , Esposa - (एस्पोसो - एस्पोसा) नवरा बायको
Hijo - इहो - मुलगा (son) (स्पनिश मधे j चा उचार ह करतात )
Hija- इहा - मुलगी (daughter)
Nino - Nina : छोटा मुलगा - छोटी मुलगी
Padre / Papa / Papi : वडील
Madre/ mama/ mami : आई
Luna: चंद्र
Perfecto: perfect तसेच Fantastico
ईश्वरी
30 May 2008 - 10:12 pm | आजानुकर्ण
कुमारस्वामी यांनी कुंडी हा शब्द भाषणात वापरला? कुमारस्वामींचे आडनाव ठाकरे तर नाही ना?
आपला,
(नवनिर्माणसैनिक) आजानुकर्ण ठोकरे
31 May 2008 - 3:38 pm | बिपिन कार्यकर्ते
अश्या औपचारिक गप्पांत त्यांनी 'कुंडी' असा शब्द वापरला? बहुतेक नसावा...
बिपिन.
30 May 2008 - 11:51 pm | पक्या
'कुंडी ' हा शब्द लिस्ट मधे नसता दिला तर चालले नसते काय?
31 May 2008 - 12:10 am | विसोबा खेचर
तसे अनेक शब्द आहेत, परंतु आमच्या देवगडी बोलीभाषेतले दोन खास शब्द!
१) आंडिलपाड्या - जेव्हा एखादी बाई एखाद्या पुरुषाला 'ठेवते' तेव्हा त्या पुरुषाला आमच्याकडे 'आंडिलपाड्या' असं म्हणतात!
२) अक्करमाश्या - अनौरस अपत्याला अक्करमाश्या असे संबोधतात!
तूर्तास इतकेच. बाकी अनेक शब्द आहेत. सांगेन सवडीने!
आपला,
(सध्या कुणाचाही 'आंडिलपाड्या' नसलेला!) तात्या देवगडकर.
31 May 2008 - 12:20 am | पक्या
यूएस मधे असताना एका चायनिज कलीग कडून शिकलेले शब्द
Ni Hao - हॅलो
Shi shi - धन्यवाद
Shing - हो (येस)
Dong budong - do you understand?
Zou ba - Let's go
Sheshiao - शाळा
ba ba : बाबा (सबोंधन , वडील नव्हे)
ma ma: आई
ye ye : ये ऽऽऽ ये - आजोबा (वडीलांचे वडील)
Nei nei - नेय ऽ ने - आजी (वडीलांची आई)
ga ga - ग ग - मोठा भाऊ
di di- दी दी - लहान भाऊ
gu gu - आत्या
Ji Ji - मोठी बहीण
mei mei - लहान बहीण
Jiu Jiu - मामा
shooooshu - काका
Tai tai - बायको (साधीसुधी नव्हे बरं का- गर्भ श्रीमंताची)
बाकी चायनीज उच्चार ऐकताना मजा वाटते. दोन चायनीज बोलत असतील तर भांडतात की काय असे वाटते.
चायनीज ग्रेट वॉल ला 'चांग चंग ' म्हणतात.
-- आपलाच पक्या त्सेंग
31 May 2008 - 1:59 am | धनंजय
जनेलाकडे कदेल वर : खिडकीपाही खुर्ची ने
बांगड्यां रेशियाद : भरलेले बांगडे
हे झाले केवळ अनोळखी शब्द.
पण पुढचे जरा अभावित विनोद करून जातात.
कुलेर-लात दी : चमचा-डबा दे.
शी खाता : थंडी वाजते
31 May 2008 - 2:06 am | कोलबेर
बाली बाली काप्शीदा - कोरियन - लेट्स गो - चला!
31 May 2008 - 11:16 am | राजे (not verified)
"कुंडी" - हा शब्द तुमची चुकीचा लिहला आहे.. तो " खुंडी " - बसा !!!
"कुंडी"- अर्थ जरा वेगळा आहे (जो भाग बसण्यासाठी वापरतात तो ;) )
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
31 May 2008 - 11:36 am | विजुभाऊ
" खुंडी " - बसा !!!
मग राखुंडी म्हणजे काय? पूर्वी लोक राखुंडीने दात घासायचे भांडी घासायचे.
आणखी मजेदार गुजराती शब्द.
नवरा = रिकामटेकडा
खाकरा = कडक भाजलेली पोळी
पादर = भाग /गल्ली
पोळ = बोळ / विभाग
अघोरी = झोपल्यावर घोरणारे.
चिबुक = हनुवटी
घुटण = गुढगा
चकली = चिमणी (पक्षी)
31 May 2008 - 12:09 pm | अभिज्ञ
अघोरी = झोपल्यावर घोरणारे.
मग जागे पणि घोरण्या-यांना काय म्हणावे?
ह.घ्या.
(अनभिज्ञ) अभिज्ञ.
31 May 2008 - 12:05 pm | आनंद घारे
सध्या मी मैसूरला आल्यावर माझ्या कानडीच्या (अ)ज्ञानाची उजळणी करतो आहे आणि घरातील इतर लोकांना ती भाषा शिकवण्याचा प्रयत्न. कानाला एकासारखे वाटणारे पण वेगळ्या अर्थांचे काही शब्दः
एले (यले)= पान ---- कानडीत र्हस्व व दीर्घ असे दोन ए आणि ओ स्वर आहेत. र्ह्स्व ए चा उच्चार ऐकतांना थोडा य सारखा वाटतो. र्हस्व ओ चा उच्चार व सारखा.
एल्ले (यल्ले)= कोठे
इल्ले = इथे
इल्ला = नाही
एल्ला(यल्ला) = सर्व
एळ= ऊठ
एळु = सात
गोंधळ उडवणारे कांही शब्द :
मरा = सूप
हाल = दूध
कसा = केरकचरा
माडी = करा
अंगडी = दुकान
मने = घर
बेक री = पाहिजे हो
31 May 2008 - 4:00 pm | बिपिन कार्यकर्ते
सीधा = सरळ
रो / रा = जा
मरातब = गादी (मान मरातब?)
हिंद = हिंदुस्तान
हिंदसा = इंजिनीरिंग किंवा गणित या संबंधीचे ज्ञान
-- ज्याला पाश्चात्य 'अरेबिक न्यूमरल' म्हणतात त्याला अरब 'हिंदसा' म्हणतात. कारण त्यांनी ते आकडे हिंदुस्तानातून शिकले.
मुहंदेस = इंजिनीयर
तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता...
शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ)
कम = किती?
नुस = अर्धा
अख्खु = भाऊ
उख्ति = बहिण
वालिद / वालिदा = वडिल / आई
मोया = पाणी
बहर = समुद्र
साबुन = साबण
वाहेद, इथनेन, तलाता, अरबा, खमसा, सित्ता, सबाह, तमानिया, तिस्सा, आशरा... = १,२,३,४,५,६,७,८,९,१०
31 May 2008 - 10:48 pm | प्रभाकर पेठकर
अरबस्थानातही देशा-देशांमध्ये शब्दांचे उच्चार बदलतात. निळ्या अक्षरातील उच्चार मस्कतमध्ये प्रचलीत आहेत.
मुहंदेस = इंजिनीयर = मुहांदिस
तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता... तबीब (पुरूष डॉक्टर); तबीबा (स्त्री डॉक्टर)
शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ)= मु = काय? व्हॉट?
अख्खु = भाऊ = अखोई
मोया = पाणी= माई
बहर = समुद्र = बहार (बहारेन = दोन समुद्रांनी वेढलेला प्रदेश)
मैदान = मैदान
सेम सेम = तसेच (इंग्रजी सेम ह्या अर्थी)
गोल =गोल (गोलाकार)
कमर = दिवा, चंद्र
खमर = दारू (व्हिस्की)
1 Jun 2008 - 9:55 am | अरुण मनोहर
सिंगापूर इथे मलय, तामीळ, मॅन्डेरिन आणि इंग्लीश च्या मिश्रणातून तयार झालेली सिंग्लीश बोली भाषा कधी कधी इनफॉरमली वापरल्या जाते. ह्या बोली भाषेत इंग्लीशच्या व्याकरणाची वाट लावली जाते, म्हणून क्वीन्स इंग्लीश वापरणारे दु:खी होतात.
Kiasu (adj)
Pronounced 'kee-a-soo'.
Derived from the Hokkien dialect meaning afraid to lose out to others or not to lose face.
Example: He sent his family to line up in different queues for the same item, so kiasu.
Arrow (verb)
Derived from the English language meaning to be given a task that you don't want to do.
Example: I was arrowed to paint this wall.
Lah
The most famous of Singaporean expressions used at the end of sentences for emphasis.
Example: Very funny, lah!
Langgar (verb)
Derived from the Malay language meaning to collide.
Example: This van suddenly pulled out and langgar my car.
Sotong (adj)
Derived from the Malay language meaning does not know what is going on. Similar meaning to 'blur'. (Sotong is the Malay word for octopus which squirts ink and clouds everything.)
Example: This has been going on for months, didn't you know? Sotong!
Goondu: stupid or acting stupid
Can meh: are you certain?
2 Jun 2008 - 11:06 am | आर्य
मित्रांनो ! काय कुंडी घेऊन बसलाय यालाच अंडू पण म्हणतात.
याप्रांतात आल्यावर हे शब्द जरा जपून ऊच्चारा ऐवढेच, बेळगांवकरच यावर जास्त प्रकाष टाकू शकतील !
बाकी आणखी काही कन्नड शब्द
अळु - रडणे
कुत कोळी / कुळी तिको - बसा
सुमने कुतको - गप्प बस
बीडी - सोड (माड बीडी / होग बिडी - करुन सोड / जाऊदे सोड)
ताई - आई
बायको - बाई / स्त्री
सर्वात गंमतीची बाब म्हणजे - गणेशोत्सव -कधीही साजरा करतात गणेश चतुर्थी पासुन अगदी नोव्हेंबर पर्यंत
गणपती बसवायला आणि विर्सजनाला काही ताळ-मेळच नाही राव ! अगदी पक्ष पंधरड्यात सुध्दा बसवता.
आणि विधी-निषेध तर सोडाच ! बाजारात जाऊन पिशवीत घालून ऐका काकूंनी गणपती घरी नेला. काय बोंबलायच यावर ?
2 Jun 2008 - 5:27 pm | स्वाती दिनेश
मजेशीर धागा!
माझी काही भर-
ग्रीक मध्ये..
एला- ये
याया - आजी
2 Jun 2008 - 5:48 pm | मन
मी काल "हलवा:-ओरिजनल ग्रीक स्वीट"-मेड इन मॅसिडोनिया असा लिहिलेला बॉक्स आणला.
खाउन पाह्यला तर राव चव अगदि थेट आपल्या गज्जग सारखेच की राव.
काय म्हंजी काय बी फरक नाय. फक्त नाव "हलवा" दिलय त्ये लोकांनी त्येला.
(ज्यांना गज्जग माहित नाही त्यांच्यासाठी:-
ही मिठाई महाराश्ट्रात तितकीशी लोकप्रिय नाही दिसत््इचं खर ं प्रस्थ कळत मध्य प्रदेशात, आणी
त्यातही इंदुरमध्ये.)
आपलाच,
मनोबा