यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग एक
यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग दोन
यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग तीन
यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग चार
यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग पाच
यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग सहा
युजी कृष्णमूर्ती या व्यक्तीमत्वाबद्दल इथे लिहीत असताना आणि बाकीच्या दैनंदिन निरिक्षणातदेखील माझी मलाच एक गोष्ट सुस्पष्टपणे जाणवली. आपल्याला जे स्पर्शून जातं ते सगळ्यांना स्पर्शून जाईलच असा सरळसोट नियम असू शकत नाही, होऊ शकत नाही - कारण माणसं वेगवेगळी आहेत, प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगवेगळी असते आणि त्यातून प्रत्येकाचं "रिस्पॉन्स मॅकॅनिझम" वेगवेगळं झालेलं असतं; त्याबद्दलही ठाम आडाखे बांधता येत नाहीत. पण या लेखमालेत आलेल्या जवळपास सर्वच प्रतिक्रियांवरून (अगदी बोटावर मोजण्याइतक्या असल्या तरी) पुन्हा एकदा माझा यावर विश्वास बसला की लोक अजूनही वाचतात आणि काही नवं समजून घेण्याची आणि लिहीणार्याला प्रोत्साहन देण्याची त्यांची मानसिकता असते; ती लिहिणार्यांसाठी खरंच फारच महत्वाची आहे. त्यामुळे नाव न घेता, ज्ञात-अज्ञात प्रत्येक वाचकाचे व्यक्तीश: आभार मानतो आणि या लेखमालेच्या समारोपाकडे वळतो...
----
मागच्या सहा लेखांत युजी या व्यक्तिमत्वाचा (!) पुसटसा का होईना पण बराचसा भाग रेखाटून झाला आहे. वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी युजींना घडलेल्या कॅलॅमिटीचा नंतर ८९ व्या वर्षी त्यांचे प्राणोत्क्रमण होईपर्यंतच्या आयुष्यात त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये प्रभाव दिसत राहिला. पण दुर्दैवाने, युजींनी त्या घटनेभोवती किंचीतही वलय उमटू दिले नाही. आध्यात्मिक क्षेत्राचे अभ्यासक/ स्वत:चा अध्यात्मात तेवढा (म्हणजे केवढा हेही एक कोडेच आहे!) अभ्यास नाही असे मानणारे सर्वसामान्य वाचकही या घटनेला कितीही ओढून ताणून एन्लायटन्मेंट/मुक्ती/मोक्ष याच आपल्याला नुसते ऐकून ज्ञात असलेल्या स्टेशनांवर आणून पोचवत असले तरी युजींनी आयुष्यभर ते नाकारले. युजींचा मूळ स्वभाव निर्दयी, कठोर होताच; सदयता, मृदूता अंगी बाणवण्यासाठी, स्वत:चा शोध घेण्यासाठी युजींनी जीवतोडून केलेली साधना निष्फळ ठरली होती; शेवटी स्वत:मध्ये असलेल्या निर्दयता, मोह याच घटकांना (!) आधार मानून बाकी जे-जे काही शिकवले, सांगितले जाते ते सर्व युजींनी भिरकावून दिले होते (पण म्हणून ते लोकांचे खून करीत किंवा लूटमारही करत सुटले नव्हते). ते फक्त जे जसे आहे ते तसेच स्वीकारणे होते. सगळ्या साधना सोडून दिल्यानंतर, बैराग्यासारखे जगभरात विविध ठिकाणचा प्रवास करीत करीत ते लंडन आणि तिथून पॅरीसमध्ये आले असताना, जवळचे सगळे पैसे संपून गेल्याने तिथल्या दूतावासात जाऊन स्वत:ला भारतात परत पाठविण्याची विनंती करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच मार्ग उरला नसताना युजींच्या आयुष्यात पूर्वीची काहीही ओळखपाळख नसली तरीही व्हॅलेण्टाईन डी कार्व्हान या आश्रयदातीचा प्रवेश झाला. आणि त्या एकाच भेटीत युजी व्हॅलेण्टाईनसोबत स्वित्झरलॅण्डमधील सानेन येथे राहू लागले. दैनंदिन कामे, खाणे, पिणे, झोपणे, आणि टाईम मॅगझीन वाचणे याशिवाय युजी तिथे काहीच करीत नसत. नेमक्या याच कालखंडात जेकेंची व्याख्याने सानेनमध्येच व्हावीत आणि व्याख्याने, उपदेश, साधना या गोष्टींना रामराम ठोकलेल्या युजींना मित्रांनी त्या व्याख्यानात ओढून न्यावे हा विचित्र योगायोग आहे (भारताच्या एका कोपर्यातील शहरातून निघून अमेरिका, लंडनमध्ये जाणारे विवेकानंद आणि तिथे त्यांना भेटलेल्या सारा बुल, भगिनी निवेदिता आणि कसलीच अपेक्षा न ठेवता आधार देणारी माणसे हे एक दृश्य आणि जवळपास बैराग्याच्याच मनोवस्थेत जगप्रवास करीत असताना कोणतीच ओळख नसतानाही युजींना आश्रय देणार्या व्हॅलेण्टाईन हे एक दृश्य मनात एका वेळी चमकून जाते तेव्हा अफाट पसरलेले हे जग खरंच नुसत्या स्वार्थी माणसांचे वैराण वाळवंट नाही असं उगाच वाटून जाते).
साधना आणि मोक्षप्राप्तीचे विचार सोडून देऊन, विविध प्रकारचे अतिंद्रिय अनुभव घेऊनही कुठल्याच अंतिम निष्कर्षाप्रत न पोहोचलेल्या युजींना जे. कृष्णमूर्तींच्या व्याख्यानात जेकेंच्या तोंडून बाहेर पडलेल्या “...त्या शांततेत, तिथं मन नसतं; तिथे कृती असते...” या शब्दांतून, एकूणच त्यांच्या त्या पोपटपंचीबद्दल तिटकारा आला आणि युजी तिथून उठून व्याख्यानाच्या शामियान्याबाहेर पडले.
हा झालेलाच कथाभाग पुन्हा एकदा मांडावा लागत आहे कारण खरा टर्निंग पॉईंट इथेच आहे. कारण एका "पोहोचलेला" मानला जात असणार्या आणि एका "प्रवासातील" माणसांतील ती शीतयुध्दासारखी परिस्थिती आहे. जेकेंच्या बोलण्याचा तिटकारा येण्याचे कारण म्हणजे ज्या गोष्टी सांगितल्या जात होत्या त्या युजींच्या जीवनात "ऑपरेट" होत नव्हत्या; आणि पार भगवान बुध्दांपासून, उपनिषदे, वेद, रामकृष्ण परमहंस अगदी इथून तिथून सगळ्याच वर्ल्ड टीचर्सनी सर्वात आधी स्वत:ला मूर्ख बनवले आणि नंतर संपर्कात येणारे सर्वजणही त्या मूर्खपणावर विसंबून राहात आले हा त्यांचा विश्वास अगदी पक्का झालाच होता. तरीही ती मोक्षाची स्थिती नेमकी असते कशी? आणि मी त्या स्थितीत आहे हे मला कळणार कसे? हे प्रश्न शिल्लक होतेच. जे. कृष्णमूर्तींच्या व्याख्यानातून निघून आल्यानंतर दोन दिवस ते प्रश्न "युजी" ही जी कुणी व्यक्ती होती तिच्या अंगात भिनले, रोम-रोम त्या प्रश्नाने पेटून उठले. शेवटी त्यांची त्यांनाच समज आली की आतापर्यंत त्याच वर्ल्ड टीचर्सकडून पाझरत स्वत:मध्ये आलेले ज्ञानच ते प्रश्न विचारत आहे (कारण जी माहिती आत उपलब्ध असते तीच बाहेर येते, जे शिकवलेले नसते ते कळूच शकत नाही हे त्यांनी पुढे चालून केलेले विधान आहे). ही बाब सुस्पष्टपणे दिसल्यानंतर, काही क्षण सगळी शरीर-मनोयंत्रणा सुन्न झाली कारण ती समज उदयाला येताच विचार प्रक्रिया थांबली होती. समजून घेण्यासारखे काहीही नाही हे वास्तव वीजेसारखे युजींवर येऊन आदळले होते. त्यानंतर काय घडले हे खुद्द युजीही सांगू शकत नाहीत. कारण विचारसाखळी तुटली तेव्हा तिच्यातून प्रचंड ऊर्जा मुक्त झाली आणि त्या ऊर्जेचा शरीरात स्फोट होऊन युजी या व्यक्तीने ४९ मिनीटे मृत्यूच्या स्थितीत घालवली; आणि या प्रक्रियेदरम्याने शरीर धनुरासनच्या स्थितीत वाकले होते. ही त्या कॅलॅमिटीची सुरूवात. पुढच्या पाच दिवसात सर्व इंद्रियांचे रूपांतरण आणि पाचव्या दिवशी स्वत:चे शरीरही स्वत:साठी नाहीसे होणे वगैरे घडले.
त्या पाच दिवसांत या घटना घडत असताना आणि नंतर सहा महिन्यांपर्यंत सर्व यंत्रणा स्थिरस्थावर होईपर्यंत नेमके काय होत आहे, झाले आहे हे युजींनाही उमगत नव्हते. साहाजिकच, ते ज्या अद्भुत प्रक्रियेतून जात होते त्याबद्दल युजींच्या आसपासच्या लोकांनाही उत्सुकता दाटून आली होती आणि त्यांच्यावर जेकेंच्या व्याख्यानासाठी सानेनमध्ये येऊन युजींनाही भेटायला येत असलेल्या लोकांकडून प्रश्नांचा भडीमार केला जात होता. पण त्या कॅलॅमिटीचा परिपाक म्हणून युजींना सलगपणे बोलता येत नव्हते; कारण आत स्वयंभूपणे चालणारा विचार कायमचा थांबला होता; आणि विचारांत समन्वय साधणारा समन्वयकच गायब झाला होता. पाहणार्या लोकांसाठी युजी शिल्लक होते; युजींसाठी "युजी" नावाचे कुणीच शिल्लक राहिले नव्हते. कॅलॅमिटीनंतरच्या विविध घटना आणि युजींनी सांगितलेली त्यांच्या शिल्लक राहिलेल्या शरीराच्या चलनवलनात्मक कार्याची निरिक्षणे पुन्हा एकदा इथे लिहीत नाही; ती मागील भागात येऊन गेली आहेत.
ही घटना घडून गेल्यानंतर युजींसोबत लोकांच्या झालेल्या बोलण्यामध्ये युजींनी वेळोवेळी स्पष्ट केले आणि त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते स्पष्ट करीत राहिले की घडलेल्या घटनेत कसलाही आध्यात्मिक "कंटेट" नाही. त्या घटनेनंतर फक्त विचार नाहीसे होणे आणि शरीराचा प्रचंड इन्टेलिजन्स जागा होणे आणि त्याचे कार्य कसे चालते याबद्दल बाकीचे तपशील आहेत. पण इकडे युजींना घडलेल्या घटनेची खबर जेकेंच्या अनुयांयापर्यंत पोहोचली होती आणि जेकेंचे निकटवर्ती डेव्हीड बोह्म यांनीच युजींची सुमारे अडीच तास मुलाखत घेतल्याने युजींकडे लोकांच्या रांगा लागू लागल्या. आलेले लोक जेकेंच्या शिकवणुकीबद्दल बोलू लागले, युजी निर्दयपणे समोर मांडलेल्या मुद्याच्या चिंध्या करू लागले आणि त्यांना घडलेल्या घटनेला कोणताही आध्यात्मिक संदर्भ नसल्याचे पुन:पुन्हा सांगू लागले.
पुढे रजनीशांना सोडून आलेल्या दोन माजी संन्याशांनी संकलीत केलेले मिस्टीक ऑफ एन्लायटन्मेंट, माईंड इज ए मिथ, थॉट इज युअर एनेमी ही तीन पुस्तके सुरूवातीला प्रकाशीत झाली; नंतर युजींकडून विरोध होत असतानाही महेश भट यांनी युजींचे चरित्र लिहीले. युजींच्या कॅलॅमिटीबद्दल वैद्यकिय, वैज्ञानिक, मानसशास्त्रीय, आध्यात्मिक या आणि अशा कित्येक क्षेत्रातील ख्यातनाम नावांना उत्सुकता निर्माण झाली; वैज्ञानिक क्षेत्रातील मूर्खांचा (!) "गिनीपीग" व्हायला युजींनी नकार दिला, आध्यात्मिक क्षेत्रातील मूर्खांचा (!) "एन्लायटन्मेंटप्राप्त" गुरू व्हायला युजींनी नकार दिला. आणि त्यांच्यासमोर मांडल्या जात प्रत्येक गोष्टीला ते नकार देऊ लागले; मुळातच असलेला कठोर स्वभाव, कुठल्याही क्षेत्रातून आलेल्या कुठल्याच व्यक्तीच्या हुशारीची भीडभाड न ठेवता, इंग्रजी भाषेतील तिखटजाळ शीव्यांची वाक्या-वाक्यातून पखरण करीत युजी "उत्तरे" देऊ लागले नव्हे विचारलेल्या प्रश्नाची मोडतोड, चोळामोळा करून तो प्रश्नच प्रश्नकर्त्याच्या अंगावर भिरकाऊ लागले.
युजींनी केलेले बोलणे स्वत:च्या शब्दात रूपांतरीत करून वाचकांसमोर मांडणे म्हणजे जळत्या निखार्यावर पाणी ओतून शिल्लक राहिलेले कोळसे वाचकांसमोर ठेवण्यासारखे होईल. त्यामुळे युट्यूब, व्हिडीओसर्फ आणि इतर ठिकाणी अजूनही धगधगत असलेले हे निखारे जसेच्या तसे : -
स्वत:ची एन्लाटन्मेंट नाकारताना बॉम्बफेक -
व्हॉट नॉन्सेन्स इट इज?? आय अॅम नॉट अॅन एन्लायटन्ड मॅन... नॉट इन दी सेन्स यू यूज दॅट वर्ड...नॉट इन एनी सेन्स...देअर इज नो सच थींग अॅज एन्लायटन्मेंट... दे कॅनॉट टॉक ऑफ लव्ह, कम्पॅशन अॅट ऑल..यू कॅन फूल यूअरसेल्फ...आय अॅम नॉट इंट्रेस्टेड इन फ्रीईंग यू फ्रॉम यूवर फुलीशनेस...व्हाय शूड आय?..हू हॅज गिव्हन मी दी मॅण्डेट टू सेव्ह मॅनकाईंड? व्हाट इज रॉंग विथ मॅन काईंड..यू आर प्रॉडक्ट ऑफ दॅट..ऑल धीस सिली नॉन्सेस...
डॉक्टरांवरची बॉम्बफेक -
यु थिंक दॅट वी नीड ऑल दोज स्क्रौंड्रल्स? फोर्टी ऑफ देम डाऽऽईड दोज स्क्रौंड्रल्स...डॉक्टर्स.. दे वील नॉट हॅव चॅन्स वीथ मी...दे कॅन फूल व्होल ऑफ मॅनकाईंड...नॉट मी... सो माय कमांडमेंट - शूट ऑल डॉक्टर्स ऑन साईट अॅण्ड अॅट साईट..वी डोण्ट नीड दोज बास्टर्डस..
दलाई लामा आणि जे. कृष्णमूर्तींवरची बॉम्बफेक -
आर यू रेडी टू बिलीव्ह दॅट डलाई लामा इज ए सीआयए एजंट? यू गेव्ह हीम ए नोबल प्राईज.. ही बॉट एकर्स अॅण्ड एकर्स ऑफ व्हीनयार्डस... बीकॉज इट्स ए रिफ्लेक्शन ऑन युवर इण्टेलिजन्स... यु आर नॉट रेडी दॅट यू आर ए डॅम फूल टू बिलिव्ह ऑल दोज शीट...
इव्हन व्हेन कृष्णमूर्तीज स्टोरीज केम आऊट, दे डिडण्ट वॉण्ट टू बिलीव्ह...ऑल इज सेक्स-अ-पेट्स (अस्पष्ट शब्द)..आय अॅम नॉट अगेन्स्ट इट.. आय अॅडमायर हीम मोर फॉर दॅट...बिकॉज ही केप्ट इट अंडर दी कार्पेट... अॅण्ड देन इव्हन टू ऑर थ्री वीमेन वर इन्व्हॉल्व्हड.. दे वूड ब्रिंग इट इन्टू दी ओपन..इव्हन दे केप्ट इट अंडर दी कार्पेट... दे आर नाऊ सर्क्युलेटींग दॅट बुक सेईंग ऑल दॅट इज ट्रू...ऑल हिज लव्हलेटर्स आर देअर..इन दि हंटिंगटन लायब्रेरी पॅसिडीएना...यु कॅन रीड देम....यू कान्ट डीनाय दॅट... ही वॉज लाईक ए नेव्हीमॅन..अॅण्ड ही हॅड ए गर्ल अॅट एव्हरी पोर्ट..आय अॅम नॉट अगेन्स्ट इट..आय अॅडमायर दॅट....नॉट हिज टीचींग..फिल्दी टीचींग... सर, यू गो अवे अॅण्ड गो टू सम ऑफ दोज बास्टर्डस..अॅण्ड पिक अप मोर फ्रेजेस..एम्प्टी वर्ड्स.. अॅण्ड रीपिट देम अॅण्ड फिल गुड... आय हॅव नो इंट्रेस्ट इन फ्रीईंग यू फ्रॉम एनिथींग..ऑर एनिबडी इन धीस वर्ल्ड.. व्हेन आय वॉज यंग अॅण्ड स्टूपीड आय यूस्ड टू गिव्ह दी लेक्चर्स.. यूथ शॅल रिशेप दी वर्ल्ड..यू कॅन रीड ऑल दी शीट ऑन इंटरनेट..
मातृत्वावर बॉम्बफेक-
मदर्स आर मॉन्स्टर्स, किल देम ऑल. दॅटस माय कमांडमेंट.
रजनीश उर्फ ओशोंवर बॉम्बफेक -
रजनीश इज, वॉज अॅण्ड एव्हर वील बी ए पोर्नो अवतार... हि वॉज ए पिम्प..ही प्रोव्हायडेड बॉय्ज अॅण्ड गर्ल्स टेलींग देम यू फक अॅण्ड थ्रू फकींग, तान्त्रिक फकींग यू वील गेट एन्लायट्न्मेंट... हाऊ मेनी पीपल हॅव बीन एन्लायटण्ड??... यू ऑल फेल फॉर दॅट... पिम्पस यूज्वली शेअर मनी विथ दी बॉय्ज अॅण्ड गर्ल्स.. बट दॅट बास्टर्ड टूक मनी फ्रॉम बॉय्ज अॅण्ड गर्ल्स अॅण्ड केप्ट ऑऽऽऽल फॉर हिमसेल्फ..
स्वत:बद्दल:
दी बेस्ट थींग यू कॅन डू टू मी अॅण्ड टू मॅन काईण्ड, इज टू बर्न ऑल दी मेमरीज ऑफ मी, अबाऊट मी अॅलॉंग विथ धीस बॉडी, व्हेन आय अॅम डेड.
अवेअरनेस (जागरूकता) आणि त्यांच्या आत्मचरित्राबद्दल:
कॅन अवेअरनेस ब्रिंग अबाऊट ए चेंज ? (प्रश्न विचारणारा)
(वाक्य मध्येच तोडत) ...अवेअरनेस डझन्ट एक्झिस्ट्.. हू इज धीस दॅट ही सेज ही इज अवेअर?..
वॉचिंग वन्स ओन थॉट्स?? (प्रश्न विचारणारा)
(मध्येच तोडत) नेव्हर..थॉट्स डोन्ट एक्झिस्ट्.. यू डोन्ट हॅव टू टेक माय वर्ड..दोज बास्टर्डस कॅनॉट इन्फ्ल्य़ूएन्स मी..शो मी दी थॉट... इट इज अबाऊट थॉट बट नॉट थॉट...ऑल दॅट शीट दॅट दे पुट इन्टू शीटबॉक्स ऑफ युवर्स..व्हाटेव्हर कमिंग आऊट ऑफ यूवर माऊथ इज ओव्हरऑल शीट...आयडियाज दे हॅव पुट इन्टू युवर हेड...
व्हेन यू आर रिकॉलींग यूवर पास्ट, देअर इज नथिंग बट पास्ट..(प्रश्न विचारणारा)
देअर इज नो पास्ट..
दे हाऊ कूड (यू) रोट युवर बायॉग्राफी? (प्रश्न विचारणारा)
नॉट मी, सम बास्टर्ड रोट इट.. यू थिंग आय अॅम माय ओव्हर रायटर ऑफ माय बायॉग्राफी?
नो..नो..(प्रश्न विचारणारा)
बट व्हेन यू रोट, यू रिकलेक्टेड फ्रॉम युवर पास्ट..दॅट इज पास्ट.. (प्रश्न विचारणारा)
दॅट इज मेमरी.. टू रिकग्नाईज दॅट स्काय इज ब्ल्यू..आय कीक्ड माय ग्रॅण्डमदर.. व्हेन शी टोल्ड मी स्काय इज ब्ल्य़ू..यू आर टेलींग मी.. दि फिजीकल आय डज नॉट सी दॅट स्काय इज ब्ल्यू..शट अप आय सेड टू माय ग्रॅण्डमदर..शी वॉज शिव्हरींग...अॅण्ड फ्रॉम देन ऑन यू लूक अॅट दॅट यू से स्काय इज ब्ल्यू...अॅण्ड यू आर विअरींग ए ब्लॅक जॅकेट..फिजीकल आय डज नॉट सी इट इज ब्लॅक..दॅट बीच टोल्ड मी
युजींनी आयुष्यभरात कधीच कुठली औषधे घेतली नाहीत किंवा आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही. "हेल्थ फूड" वर त्यांचा विश्वास नव्हता आणि त्यांच्या आहारात फक्त चीज, क्रीम यासारख्याच गोष्टी असत. ते सलग झोप न घेता दिवसभरात आणि रात्रीतून अधेमध्ये तासा-तासाची डुलकी काढत. युजी जीवंत असेपर्यंत दर वर्षातील डिसेंबर महिन्याच्या ३१ तारखेला वर्षाच्या हिशेबातून त्यांच्याकडे शिल्लक राहीलेले पैसे वाटून टाकत. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी युजींच्या शरीरावर, सामान्यत: योगात सांगितलेली चक्रे असतात त्या जागांवर सूज येत असे. प्रश्न विचारला नसल्यास युजी कधीच कुणावर चिडत नसत आणि इतरवेळी त्यांच्या अवतीभवती वातावरण एवढे हलके आणि सहज असे की लोक हास्यविनोद करीत, युजींसोबत बसलेले असताना तंगड्याही टेबलावर ठेवत. युजी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ कुठेच राहात नसत. आफ्रिकेची जंगले आणि दोन ध्रुव वगळता युजींनी अक्षरश: प्रत्येक देशात पायपीट केली. जगभरातील टीव्ही वाहिन्या, रेडीओ स्टेशन्स, वृत्तपत्रे, नियतकालिकांना युजींनी मुलाखती दिल्या. व्हॅलेण्टाईन डी कार्व्हानने स्थापन केलेल्या फंडातून युजींचा प्रवासखर्च चालत असे.
फक्त "एन्टरटेन्मेंट" म्हणून युजी प्रसंग येईल तेव्हा सर्व पठडीतील ज्योतिषांकडून स्वत:चे भविष्य वदवून घेत. कौमारन पध्दतीतील युजींच्या "नाडी रीडींग" तसेच "आय-चींग" या चीनी होराशास्त्रासंदभातील किस्सा फार मनोरंजक आहे. हे नाडीवाचन १९८८ साली केलेले आहे. हे दोन्ही किस्से महेश भट यांनी लिहीलेल्या युजींच्या चरित्रातून-
नाडी वाचन करणार्या श्री. नागराज यांनी उदबत्ती पेटवली आणि अत्यंत भक्तीभावाने ती भविष्ये लिहीलेल्या बंडलाभोवती फिरवून त्यांचे काम सुरू केले. त्यांनी नंतर नाडीचे एक टोक बाहेर काढले आणि दुसरे टोक त्या बंडलाला जोडलेले होते. ते बंडल त्यांनी युजींच्या हातात दिले. त्या पानांच्या बाडातून नाडीचे एक टोक मागे पुढे करीत त्यांनी युजींना त्या बाडाचे दोन भाग करायला सांगितले. युजींनी ते बाड जिथे वेगळे केले होते ते पान घेऊन ज्योतिष्याने ते वाचायला सुरूवात केली: कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे अस्पर्शित राहाणार्या या अवलियाबद्दल काय सांगण्यासारखं आहे? राजासारखे सुखोपभोग आणि ऐश आराम यांच्यासोबत राहूनही हा रामायणातील भरताप्रमाणे विरक्त राहातो. बुध (??) आणि शनि या ग्रहांच्या संयोगामुळे याला जीवनाचे सार कळू शकले आहे. तो मोठा अभ्यासक आणि अनुभव संपन्न आहे.
चुकीचे पान निघाले की काय अशी शंका आल्याने नागराज यांनी वाचन थांबवत प्रश्नार्थक चेहेरा करून युजींकडे पाहिले. चाललेले वाचन बरोबर आहे असे युजींनी तात्काळ म्हटले, आणि वाचन पुन्हा एकदा सुरू झाले:
हा माणूस त्याच्या रविदशेत ख्यातनाम होईल. त्याच्या मूळ गावापासून स्थलांतरीत झाल्याने, तो कुठल्याच एका ठिकाणी मुक्काम ठोकुन राहाणार नाही. तो कसल्याच प्रकारची दीक्षा घेणार नाही, उपजतच त्याला ती मिळाली आहे. त्याची शिकवण साधुसंत आणि वनात राहाणार्या लोकांसारखी नसेल. त्याच्या शिकवणुकीचा प्रकाश प्रत्येक ठिकाणी पसरत राहिल. कुठेतरी पोहोचू , काहीतरी मिळवू या हेतूने त्याच्याकडे येणार्यांना तो पूर्णत: निराश करील. या व्यक्तीला "माणूस" असे संबोधन न वापरता "आत्मा" असे म्हटले जावे (कारण त्याच्याकडे व्यक्तीत्वच नाही).
यानंतर, प्राचीन ऋषिंना मध्येच विश्रांती घ्यावी वाटली की काय कोण जाणे, पण पुढे लिहीलेले होते: एक घटीका संपल्यानंतर आम्ही पुन्हा वाचन सुरू करू. नागराज यांनी बाड बंद केले. त्यांची आणि त्यांच्यासोबत आलेल्या साथीदारांची उत्सुकता फारच ताणली गेली होती. त्या पंधरा किंवा वीस मिनीटांत आत्ता सांगितलेल्या आणि इतर भविष्यकथनांत त्यांच्या जीवनांतील घटना कशा स्पष्टपणे प्रतिबिंबीत होतात ते समजावून सांगितले. ज्योतिषातील भाकीताच्या भागात सत्यता किती असू शकते याबद्दल मी बिनतोड विधान करू शकणार नाही, पण कुणाला त्यात सखोल अभ्यास करायचा असेल तर माझी कुंडली सर्वोत्तम उदाहरण ठरेल - युजी म्हणाले.
तिथे बसलेले सर्वजण युजींबद्दल नाडी पुढे काय म्हणणार ते ऐकण्यासाठी खूपच उताविळ झाले होते. आम्ही नागराज यांना वाचन पुन्हा एकदा सुरू करा म्हणालो. नागराज यांनी ते सुरू करण्यासाठी पुढचे पान उघडले आणि प्राचीन ऋषिंना आमचा उताविळपणा आधीच दिसला होता की काय माहीत नाही, कारण एका पूर्ण कोर्या पानाने नागराज यांचे स्वागत केले.
"कोरे पान म्हणजे माझे भविष्यही कोरेच आहे!" युजींनी हसतहसत शेरा मारला. पुन्हा अर्धा मिनीट थांबा घेऊन नाडीने पान काढण्यात आले. या पानावर लिखाण होते. ते असे:
मागच्या भविष्यात आपण घेतलेली एक घटीकेची विश्रांती पूर्ण होण्यासाठी अजूनही दीड मिनीट बाकी आहे. या भविष्याचा असल्या माणसाला काहीच उपयोग नाही. तरी पण, त्यातील मजेसाठी म्हणून आपण ते पुढे चालू ठेऊया. तुम्ही आम्हाला नमस्कार करण्याची गरज नाही पण तुमच्यासमोर जो बसला आहे त्याला नमस्कार घाला आणि पुढे वाचा. नाडीवाचन पुढे सुरू झाले: आजपासून अकरा वर्षांनंतर, हा जिथे जाईल तिथे-तिथे तो सदभाग्य त्याचा पाठलाग करीत राहिल. ते त्याला सोडून जाणार नाही...जेवत असो, पाणी पित असो, चालत असो, झोपलेला असो किंवा काहीही करीत असो, हा माणूस सहज समाधीत असेल. चंद्रदशेच्या अंतिम पर्वात त्याच्या फक्त दर्शनानेच पाहाणार्याला आध्यात्मिक दीक्षा मिळेल...अशा माणसाला या वाचनाचा काय उपयोग आहे? उत्तर अपेक्षित नसलेला प्रश्न विचारून नाडी वाचन समाप्त झाले.
आय-चींग प्रकारातील चिनी भविष्य -
हे भविष्य महेश भट यांची युजींची ओळख करून देण्याचे माध्यम ठरलेल्या व्यक्तीने त्याच्या मनात युजींबद्दल झालेला गोंधळ दूर करण्यासाठी करून घेतले आहे. युजींना भेटल्यावर प्रत्येकवेळी निराश झाल्याने त्याने आय-चिंग करून घेतले होते. त्याला हे उत्तर मिळाले:
"तो गुरू नाही, शिक्षक नाही, किंवा तारणहार नाही. तुम्हाला जागे करण्याशी त्याला काही देणेघेणे नाही आणि त्याला काहीही करायचे नाहीय. कोणताही हेतू न ठेवता तो मस्तीत धगधगत राहील. तो नसताना तुम्ही जेवढे हरवलेले आहात तेवढाच तुम्ही नसताना तो हरवलेला असेल. तुमच्यात प्रतिबिंबीत होत नसेल तर त्याचा प्रकाश विझेल. त्याच्या प्रकाशाशिवाय तुमचे जीवन अंध:कारमय आहे."
आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम येथे ९ जुलै १९१८ रोजी त्यांचा जन्म झाला. उप्पलुरी गोपाला कृष्णमूर्ती हे त्यांचे पूर्ण नाव. आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात युजींनी इटलीमधील व्हॅलेक्रोशिया येथे मित्राच्या घरी एके ठिकाणी राहायला सुरूवात केली. प्राणोत्क्रमण होताना त्यांच्या महेश भट या निष्टावान मित्रासह आणखी दोन व्यक्ती सोबत बसून होत्या; इतर सर्वांना बाहेर जायला सांगण्यात आले होते आणि त्यांच्या पार्थिवावर अंत्यक्रिया कशी करण्यात आली हे गुलदस्त्यात आहे. युजींनी त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तीन हजार डॉलर देण्याचा प्रस्ताव दिला होता. ते गेल्यानंतर त्यांची आठवण केली जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. मी गेल्यानंतर बागेतल्या कृमिसारखाच सडेल हा त्यांचा देह सोडतानाचा संदेश होता. २२ मार्च २००७ रोजी इटालीतील व्हॅलेक्रोशिया इथे युजींनी देह सोडला.
इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ!!!!
समाप्त
आभार:
१. श्री. महेश भट (ब्लॉगवरील फोटो, संदर्भ साहित्य वापरण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल)
२. के चंद्रशेखर राव (युजींच्या सुरूवातीपासूनच्या छायाचित्रांचे संकलक)
३. मुकूंद राव (लेखक, युजी रीडर)
४. ज्युली थायर ( आज आपल्याला उपलब्ध असणारी व्हिडीओग्राफी युजींसोबत सतत दहा ते बारा वर्षे राहून; ती विविध साईटस टाकणे)
५. इंग्लिश विकीपिडीया
६. मध्येच हे लेखन थांबविल्यानंतर प्रोत्साहन देणारे इथले अनेक वाचक
प्रतिक्रिया
20 Oct 2010 - 4:50 pm | मृत्युन्जय
मदर्स आर मॉन्स्टर्स, किल देम ऑल. दॅटस माय कमांडमेंट.
मला बेसिकली लेख माला नीट कळाली नाही. संपुर्ण वाचुनसुद्धा युजींना काय झाले होते ते झेपले नाही. पण हे वाक्य वाचुन तो माणूस ठार वेडा होता असेच वाटले.
20 Oct 2010 - 5:59 pm | विजुभाऊ
हे सगळे कसे कॉस्मॉस वाटते ना
इट्स यू इन द आय ऑफ यू इन द यू.
लेखमाला दळण संपवल्याबद्दल धन्यवाद.
20 Oct 2010 - 7:40 pm | sagarparadkar
सर्व लेखमाला वाचून एकच जाणीव झाली कि ही लेखमाला वाचण्यापूर्वीचा मी आणि ती वाचल्यानंतरचा मी हे १००००००००००००००००% सारखेच किंबहुना 'सेम्'च आहोत .... मला पामराला कसलाच बोध झालेला नाही ...
पु. लं. च्या 'असा मी असामी' मधील नेमके "इट्स यू इन द आय ऑफ यू इन द यू." हेच शब्द प्रथम डोक्यात आले.
नक्की कशासाठी असल्या स्वयंकेंद्रीत तत्ववेत्त्यांना इतका भाव द्यायचा?
त्यापेक्षा 'इतरां'ची सेवा करणारे डॉ. बाबा आमटे, प्रकाश आमटे आणि इतर अनेक लोक मला तरी शिरसावंद्य वाटतात. उलट हे असले भंपक तत्वज्ञ ऐकले की उपरोल्लेखित लोकांबद्दलचा आदर शतगुणित होतो.
विषयांतर वाटेल पण जर 'कोsहं कथमिदं जातं' वगैरे प्रयोजन शोधणे हेच जर तुमचे 'मिशन' असेल तर तुम्हाला जीवन कळलेच नाही असे वाटते. एकटेच कुठल्यातरी अगम्य, अमूर्त, अज्ञात विचारांच्या गर्तेत अक्षम्यपणे घुटमळत आहात. ना धड इहलोक ना धड परलोक ....
20 Oct 2010 - 7:50 pm | यशवंतकुलकर्णी
कुणालाच, कुठलेच प्रत्युत्तर द्यायचे नाही हे ठरवले होते. हे प्रत्युत्तर नाही. इतर दुसरा कुणीही माणूस मधे न आणता फक्त स्वत:शी खाली जे लिहीलंय त्याचा विचार करा (तेवढंच हातात आहे म्हणून) -
"तुम्ही" वगळता इतर कुठल्या मार्गानं तुम्हाला जग दिसतं?
20 Oct 2010 - 8:04 pm | sagarparadkar
हा किंवा आधीचा प्रतिस्सद हा व्यक्तिशः कोणाविरुध्द नाही.
मानवी देहाची आणि मेंदूची मर्यादा असल्याने तुमचा प्रश्न क्षणभर निरुत्तर करणारा वाटेल. पण त्याच मानवी मेंदुला हेदेखील समजते की आपल्याला जग 'ह्या' मार्गाने दिसतंय, पण इतरांना ते तसेच आणि त्याच मार्गाने दिसेल असे नाही. मग इतरांना ते कसे दिसतय हे पण शोधू या. शक्य झाल्यास 'त्यां'च्या मार्गाची अनुभूती घेवू या. अशाच विचारांमुळे मला त्या (पक्षी डॉ. बाबा आमटे आणि इतर लोकांचा) जगाकडे बघण्याचा मार्ग कळला, भावला.
किंबहुना शब्द्च्छल बराच करता येईल, पण सांगण्याचा मुद्दा हा की त्यांचे विचार मला बदलू शकतात, एक चांगली द्रुष्टी देवू शकतात, जे करण्यात असले एककल्ली तत्वज्ञ निदान माझ्या बाबतीत तरी सपशेल पराभूत झालेले दिसतात.
20 Oct 2010 - 8:11 pm | यशवंतकुलकर्णी
सागर पराडकर,
तुमच्या प्रतिसादातील शेवटच्या वाक्यापर्यंत वाचून, त्याचे उत्तर म्हणून माझा वरचाच प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा!
20 Oct 2010 - 9:05 pm | sagarparadkar
अहो पण मग दुसर्या कोणालाच मधे न आणता फक्त 'मी'च जग कसं दिसतं म्हणून पाहू लागलो तर मग माणूस म्हणून 'माझ्या' अस्तित्वाला काय अर्थ उरणार? मग मी युजींबद्दल काय वाचणार किंवा मत नोंदवणार ?
परत त्यांची एक एक विधानं जी आपण उद्ध्रुत केली आहेत ती केवळ 'त्यां'ची आहेत मग आपण कशाला ऊहापोह करायचा?
लहानपणापासून 'आपली' दृष्टी व विचार हे इतरांकडून संस्कारीत झाले नाहीत तर मग आपण माणूस म्हणून समाजात कसं वावरणार? जर त्या संस्कार कर्त्यांनाच आपण दोष देवू लागलो (e.g. Mothers are monsters ...) तर मग आपण आदीमानवाच्या दिशेने नाही का जाणार? माणूस म्हणून जगताना एव्हढं अलिप्त कसं राहता येईल?
20 Oct 2010 - 9:18 pm | यशवंतकुलकर्णी
कुणी सांगितलं तुम्हाला तुम्ही माणूस आहात म्हणून? सगळे म्हणतात आपण माणसं आहोत. त्याची काय गॅरण्टी पण??
आणि ही "अस्तित्वाचा अर्थ" ही काय भानगड असते ब्वॉ??
ते मदर्स मॉन्स्टर, किल देम वगैरे गांभिर्यानं घेऊ नका. युजींना ऐकून कुणीही स्वत:च्या आईचा खून केलेला नाही. करणार नाही. अशी गर्दी खेचणारी वाक्ये फेकत राहातात असले लोक.
मानव असण्याचाच पत्ता नाही, आणि आदीमानवाकडं मागे कुठं जाताय?
जान्दो यार! सो जाता मै अब.
20 Oct 2010 - 9:50 pm | sagarparadkar
आता मात्र मी पूर्ण नि:शब्द .... संपलो ....
20 Oct 2010 - 10:03 pm | यशवंतकुलकर्णी
एवढ्या लवकर कसचे नि:शब्द हो??
तिकडे कोलमडून पडून राहिला असतात तासभर म्हणजे इकडे आणि तिकडे नि:शब्दता पसरली असती.
चला. मी कोलमडतो आता. :)
21 Oct 2010 - 1:53 am | मृत्युन्जय
ते मदर्स मॉन्स्टर, किल देम वगैरे गांभिर्यानं घेऊ नका. युजींना ऐकून कुणीही स्वत:च्या आईचा खून केलेला नाही. करणार नाही. अशी गर्दी खेचणारी वाक्ये फेकत राहातात असले लोक.
गांभीर्याने घेउ नका म्हणजे? कोणीही माणूस माथेफिरु सारखा काहीतरी बरळतो आणि ते गांभीर्याने घेउ नये? तसे असेल तर तो संपुर्ण माणूसच गांभीर्याने घेण्याचा लायकीचा नाही असे नाही का वाटत तुम्हाला?
आणि गर्दी खेचणारी वाक्ये म्हणजे? या वाक्याने तर तुम्ही युजींना अगदी राखी सावंतच्या रांगेत बसवले. ती सुद्धा गर्दी खेचणारी वाक्ये फेकते? मग युजी नावाचा माणूस इतर कोणाही भंपक माणसापेक्षा वेगळा कसा? ते तर ऐहीक सुखाच्या पलीकडे गेले होते ना? मग त्यांना गर्दी खेचणारी वाक्ये कशाला फेकावीशी वाटली. शिवाय ते एकांतप्रिय होते, गर्दीला टाळायचे असे तुम्हीच कुठेतरी लिहिले आहे. मग गर्दी खेचणारी वाक्ये कशाला फेकायला लागतात? सगळे बाप *डवे असतात किंवा सगळ्या बहिणी ** असतात अश्या अर्थाची विधाने पण केली आहेत काय त्यांनी? नाही म्हणजे आइला जर राक्षस म्हणून सगळ्या आयांना मारण्याचा आदेश देउ शकतात तर असेही काही बोलले असतील कदाचित, गर्दी खेचण्यासाठी.
या वाक्याची पाठराखण करण्याचा तुमचा प्रयत्न अगदी च अंधानुकरणाच्या पातळीतला वाटतो. राग मानून घेउ नका पण या वाक्याने या माणसाची आख्ख्या आयुष्याची पुण्ण्याई (काही असेल तर) अगदी धुळीला मिळवली असे वाटते. असे काहीतरी होण्यापेक्षा आहे ते बरे आहे. नको ती कलॅमिटी आणि नको ती नसती एनलाइटमेंट.
21 Oct 2010 - 4:14 pm | यशवंतकुलकर्णी
युजींच्या पुण्याईच्या गोष्टी करताय म्हणजे वाचलेल्या लेखांतलं अक्षरसुध्दा कळलं नाही हे स्पष्टच आहे; पण तरीही फूट्भर लांब प्रतिसाद देताय. काहीही कळलेलं नसताना तुम्हाला गप्प बसवत नाही.
यु वील नेव्हर नो अन्टील एव्हरीथिंग इस इन्जेक्टेड, टॉट टू यू सर !
21 Oct 2010 - 5:10 pm | मृत्युन्जय
युजींच्या पुण्याईच्या गोष्टी करताय म्हणजे वाचलेल्या लेखांतलं अक्षरसुध्दा कळलं नाही हे स्पष्टच आहे;
पाप पुण्य युजी मानायचे नाहीत. माझे काही तसे विचार नाहीत. तुम्ही लिहिलेले निम्मे लेख डोक्यावरुन गेले हे तर मी आधीच सांगितले आहे. युजी या व्यक्तीने काही पुण्य कमावले असेल तर ते या वाक्याने धुळीला मिळाले असे मी म्हणालो. तसे युजींना वाटते की नाही किंवा वाटले असते की नाही हे माझ्मासाठी गौण आहे.
पण तरीही फूट्भर लांब प्रतिसाद देताय.
मी ४ फूट पण लिहु शकलो असतो. आईला (या नात्यला) राक्षस म्हणणार्या, सगळ्या आयांना मारण्याची भाषा करणार्या माणसाबद्दल किती लिहावे तेवढे कमीच आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्यांनी असे केले असावे असे माझे स्पष्ट मत आहे. गर्दी खेचण्यासाठी ते असे काहीबाही बोलायचे असे तुमचे मत आहे. पहिले मत खराब आहे, दुसरे तर फारच वाईट आहे. गर्दी खेचण्यासाठी अशी काहीतरी मुक्ताफळे उधळणार्या माणसाबद्दल फारसे चांगले मत बनवत नाही.
तुम्हालाही हे मत पसंत नसावे असे वाटते. तरी त्याचे समर्थन करता?
काहीही कळलेलं नसताना तुम्हाला गप्प बसवत नाही.
जे कळाले त्याच्यावरच मत प्रदर्शन करतो आहे. आईला राक्षसीणीची उपमा देण्यामागे आणि सगळ्या आयांचे शिरकाण करण्याचा आदेश देण्यामागे काही समर्थनीय कारण असेल तर आम्हा पामरांना सांगावे? नसेल तर तुम्हाला गप्प बसवत नाही?
21 Oct 2010 - 7:16 pm | मूकवाचक
यु. जी. त्यांच्या खास "शैलीदार" विंग्रजी मध्ये 'माई पेरेंट्स फकड यांड डम्पड मी ऑन द अर्थ" असे पण म्हणतात!
21 Oct 2010 - 7:31 pm | यशवंतकुलकर्णी
मग??
तुमच्या किंवा जगातल्या सगळ्यांच्याच पॅरेण्टसनी काय वेगळे केले आहे??
हां, टेस्ट ट्यूबमधुन एखाद्याचा जन्म झाला असेल तर ते वेगळे..
डू यू सिरीयसली नो एनिथिंग अबाऊट युवर बर्थ एक्सेप्ट ऑल दॅट रबिश वेदान्तीक स्टफ पूट बाय सम मॅडीज??
21 Oct 2010 - 8:04 pm | मूकवाचक
कुलकर्णी साहेब, ते 'जाउ द्या' तुमच्यासाठी नव्हते.
पालकत्व, मनुष्यजन्म याबद्दल 'भुन्कणारा कुत्रा' आणि ते ऐकून पिसाळलेला डुप्लिकेट कुत्रा या पेक्षा वेगळे काय बोलणार? (की भुन्कणार?)
सगळेच बार्किन्ग डॉग आहेत याची इतकी खात्री असेल तर इथे प्रतिक्रिया देणार्यान्चे भुन्कणे का उगाच इतके मनावर घेताय?
21 Oct 2010 - 8:15 pm | यशवंतकुलकर्णी
मूकवाचक,
तुम्हीसुध्दा अश्लाघ्य भाषा तोंडात आणलीत त्याबद्दल आभार.
यामुळं काय होतं माहीत आहे?? पुढेपुढे चांगली भाषा, वाइट भाषा असा भेदच उरत नाही.
संस्कृतीने मेंदूमध्ये तयार केलेली, आणि सतत टिकून राहाणारी चांगले आणि वाईट ही विभागणीच ढासळू लागते.
मला माहितीय, हे तुम्हाला मान्य होणार नाही.
कारण तुम्ही युजींचा पॅरेण्टस आणि डम्पिंगचा मुद्दा स्वत:होऊन इथं आणलात, मी तुमच्या आणि सगळ्यांच्याच पॅरेण्टशीपबद्दल बोललो - ते तुम्हाला झोंबलं. अक्षरश: इतकं, की तुमच्या, एका विवेकानंद प्रेमीच्या आणि "डु गुडर्स" जमातीतील एकाच्या तोंडातही शिव्या आल्या.
त्यामुळे तुमचा पिसाळलेला ड्यूप्लिकेट कुत्रा हा शब्द माझ्यावर काडीचाही परिणाम करू शकत नाहीय.
21 Oct 2010 - 8:56 pm | मूकवाचक
माझ्या 'जाउ द्या' प्रतिसादासकट पुढचा धागा उडवावा ही विनम्र विनन्ती ...
(कुलकर्णी साहेब, क्षमस्व)
21 Oct 2010 - 9:08 pm | यशवंतकुलकर्णी
एकतर मिसळपाव पेड साईट नाही.
मी मागे तसा कौल टाकला होता तो उडवण्यात आला.
आणि क्षुल्लक मुद्यांवरून प्रशासकांच्या दाराची घंटी वाजवणं आणि त्यांना सतत व्यत्यय आणणं गैर आहे.
धागा वाचनमात्र करून टाकल्यास उत्तम.
20 Oct 2010 - 8:04 pm | यशवंतकुलकर्णी
तुम्ही रजनीशांचे चेले आहात असं कळतं. तुम्हाला लेखमालेमुळे झालेला त्रास तर स्पष्टच दिसतोय. ध्यान वगैरे करत असाल, आणि लेखमालेमुळे शारीरिक त्रास होत असेल तर कळ काढा - त्याचा चांगला परिणाम होतो.
फक्त पिंक टाकायच्या खूमखुमीतून प्रतिसाद दिला असेल तर, मी पण तुमच्यासारखीच एक पिंक टाकलीय असं समजून गप्प बसा.
आय रिसाईन फ्रॉम धीस वन्स अॅण्ड फॉर ऑल !
20 Oct 2010 - 8:07 pm | sagarparadkar
नाही हो, खरं तर मी कोणाचाच चेला नाही, त्रास तर बिलकुल नाही. पिंक टाकायचा हेतू तर मुळीच नाही, असं का वाटलं आपल्याला?
20 Oct 2010 - 8:13 pm | यशवंतकुलकर्णी
सागर पराडकर,
ते विजूभाऊंसाठी हो! तुमी न्हवं ते!
ज्याचं त्याचं नाव लिहीतोय उत्तर देताना.
20 Oct 2010 - 8:54 pm | sagarparadkar
होय हो जरा घाईच झाली प्रतिसाद देताना ... पुनश्च क्षमस्व !
21 Oct 2010 - 7:08 am | विजुभाऊ
ते विजूभाऊंसाठी हो! तुमी न्हवं ते!
ज्याचं त्याचं नाव लिहीतोय उत्तर देताना.
व्यक्तीगत काही लिहायचे असल्यास व्यनी करावा /ख व मध्ये लिहावे . स्वागत आहे
असो.
कोणाचा चेला असणे यापेक्षाही स्वतःला का समजले ते महत्वाचे.
आणि जे समजले ते कितपत अमलात आले ते महत्वाचे.
अर्थात प्रत्येक समजलेले अमलात आणलेच पाहिजे असे नाही.
ज्यानी मानवी जीवन व्यर्थ आहे. जगाकडे एक त्रयस्थ म्हणून पहा कशातच गुंतू नका असे सांगितले
त्या स्थित्प्रज्ञाना पु लंनी त्यांच्या तुजे आहे तुजपाशी मध्ये एकदम झकास उपमा दिली आहे.
गवत कागद आणि मिठाई एकसमान मानायचे
कशाचा आनन्द घ्यायचा नाही , कशातच गुंतायचे नाही , अंगाला काही लागून द्यायचे नाही. कधीच न पाहिलेल्या तथाकथीत मुक्तीसाठी सध्या जगतोय ते नाकारायचे. या जगण्याचा तिरस्कार करायचा . अशाना कोणीतरी " ये चलते फिरते प्रेत" असे म्हम्टलय त्याची आठवण झाली.
रजनीशाना नावे ठेवली म्हणून काही वाटले नाही ती नावे ठेवताना तर्कदृष्ट्या नावे ठेवली असती तर बरे झाले असते.
उगाच आईनस्टाईनला त्याने कधीच वजन उचलण्याच्या स्पर्धेत भाग घेतला नाही म्हणून कमी लेखण्याचा प्रकार होतो.
अर्थात मुद्दे संपले की गुद्दे येतात.
असो.
बाकी स्वतःचा प्रतिसाद देवून धाग्याचा टी आर पी वाढवायची ही आयडीया मस्त
21 Oct 2010 - 4:46 pm | यशवंतकुलकर्णी
विजूभाऊ,
मी लिहीलेल्या लेखमालेवर मी बिलकुल प्रतिसाद देऊच नये अशी तुमची अपेक्षा असेल तर सॉरी !
मी प्रतिसाद देणार नाही तर कोण देणार???
तसे पाहाता तुमचेही तीन प्रतिसाद इथं आहेत; म्हणून मी काही तुम्हाला टीआरपी वाढवायची मस्त आयडीया आहे असे म्हणालो नाही.
असो.
कुणीही चालतं फिरतं प्रेत नाहीय. युजी नाही किंवा मीही नाही. तुमच्याकडं कसल्या आठवणी आहेत तो तुमचा प्रश्न!
कसले तर्क हो?? तर्क वापरून वापरूनच त्या मूर्खानं सगळ्या बट्ट्याबोळ केलाय; आजच्या आध्यात्मिक क्षेत्रात चाललेला बाजार सुरू होण्यासाठी, आध्यात्मिक गुरू हे रंडीबाज असतात हा वैश्विक समज निर्माण होण्यासाठी
रजनीश/ओशो या पक्का मारवाडी असलेल्या माणसानं "बुध्दत्वप्राप्त व्यक्ती" च्या लेबलाखाली केलेला धंदाच कारणीभूत आहे.
गुद्दे वगैरे काही येत नाहीत; तुम्ही तिकडं/आम्ही इकडं!
20 Oct 2010 - 5:11 pm | स्वानन्द
संपूर्ण लेखमालेसाठी मन:पूर्वक धन्यवाद. प्रत्येक लेख वचल्यावर बरेच प्रश्न मनात यायचे, काही वक्तव्य करावीशी वाटायची पण शेवटी म्हटलं की तो जास्तकरून एक स्वसंवादच असेल. त्यामुळे तिथेच थांबलो. असो. पण युजी या व्यक्तीची अओळख करून दिल्याबद्दल फार फार आभार.
20 Oct 2010 - 6:04 pm | भाऊ पाटील
लेखमालेसाठी मन:पूर्वक धन्यवाद!
लेख वाचल्यावर प्रश्न यायचे, पण ते तुम्हाला विचारुन काय फायदा, म्हणून सोडुन दिले.
अवांतरः ते नाडी वगैरे थोडे खटकले, पण चरित्रात लिहिले आहे म्हटल्यावर....
20 Oct 2010 - 7:42 pm | विलासराव
धन्यवाद.
खुप वेगवेगळ्या माध्यमातुन माहिती गोळा केलेली दिसते आहे.
एवढे कष्ट घेउन चिकाटीने लेखमाला पुर्ण केली त्याबद्दल आभार.
20 Oct 2010 - 7:44 pm | सहज
युजींबद्दल मराठीमधे अशी एकत्रीत माहीती असलेली छान मालीका योग्य वेगात लिहून पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.
20 Oct 2010 - 11:00 pm | प्राजु
अगदी हेच म्हणते..
लेख मालिका कितपत समजली.. हा भाग वेगळा. पण काहीतरी वेगळं वाचायला मिळालं हे नक्की.
21 Oct 2010 - 6:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>युजींबद्दल मराठीमधे अशी एकत्रीत माहीती असलेली छान मालीका योग्य वेगात लिहून पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
20 Oct 2010 - 8:09 pm | अडगळ
माहितीपूर्ण लेखमाला.
नेति नेति चा विचार एका लांब टोकापर्यंत नेलेला हा माणूस वाटला.इतका की पार कडेलोटच.
पण मग विचार नाकारणारा आयुष्यभर (भाषण , गप्पा , मुलाखती) विचार कसे मांडत राहीला ?
(बाकी चमत्कार वगैरे पटले नाही.जावू दे.)
पण तुमच्या लेखनाने विचार करायला लावला. लिहीत रहा. धन्यवाद.
20 Oct 2010 - 8:10 pm | कानडाऊ योगेशु
लेखमालेबद्दल आभार.माहीत नसलेल्या एका व्यक्तिमत्वाबद्दल कळले.
स्वतःच्याच धुंदीत जगणार्या आणि त्याबद्दल ठोस भूमिकाही असणार्या अश्या व्यक्तिमत्वांबद्दलचे लिखाण नेहेमीच वाचनीय होते.
20 Oct 2010 - 9:25 pm | मधुशाला
कुठल्याही बुवा/बापू/स्वामी वगैरे सारखाच एकदम भंपक आणि बोगस माणूस वाटला...
20 Oct 2010 - 9:31 pm | यशवंतकुलकर्णी
धन्यवाद! आपकी नजर और निरमा सुपर.. :)
20 Oct 2010 - 11:13 pm | Nile
अवांतरा बद्दल क्षमस्व!
पण ह्या धाग्यावर कोड गंडला आहे का? लेखकाने काही एच्टीएमल कोड टाकले आहेत का? आख्ख्या पानाचं स्ट्रक्टरच मोडलंय. इतर कुणाला प्रॉब्लेम आहे का?
20 Oct 2010 - 11:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
व्हय रे नायल्या! कित्ती रे हुश्शार तू!!
या प्रतिसादानंतर कोड गंडला आहे,
http://www.misalpav.com/node/15020#comment-251047
आणि आधी तो ठीक होता; याचा अर्थ सदर प्रतिसादकर्त्याच्या स्वाक्षरीतला कोड हुकलेला आहे.
<परा मोड सुरू>आपल्यालाही एच्टीमेल समजतं हे दाखवण्याच्या क्षीण प्रयत्न <परा मोड बंद>
20 Oct 2010 - 11:47 pm | Nile
रिपेर केलेलं आहे.
21 Oct 2010 - 5:58 pm | बिपिन कार्यकर्ते
मेहनत घेऊन लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. सगळे वाचले नाही. दुसर्या का तिसर्या भागात महेश भट वगैरे नावे बघितली आणि धागा बंद केला. पण नंतरचे काही वाचले. बरेच प्रश्न आहेत डोक्यात. सवडीने बोलू.
21 Oct 2010 - 6:28 pm | इन्द्र्राज पवार
"यु.जी." लेखमालेचा विषयच मुळात तुमच्या डोक्यात आला होता त्याचवेळी त्याचे स्वागत Pros & Cons रितीने होईल इतपत आराखडा तुम्ही मनी मांडला असणारच. शिवाय कितीही झाले तरी स्वामी, गुरू, बाबा, बुवा, आध्यात्म हे विषयच चर्चेच्या दृष्टीने अंगार असल्यासारखे आहेत. लेखकाला प्रतिसादांना उत्तर देताना आलेले नैराश्यही त्रयस्थाला जाणवण्याइतके स्पष्ट आहे, आणि ते तर अगदी पहिल्याच लेखापासून सुरू झाले होते. असे असले तरी श्री.यशवंतरावांनी मध्येच ही लेखमाला खंडित न करता, अगदी उपसंहारापर्यंतचा तिचा प्रवास, तितक्याच उत्साहाने आणि प्रभावी लेखनाने इथे पूर्ण केला आहे.; त्याबद्दले ते नि:संशय अभिनंदनास पात्र आहेत.
त्यांची त्यांच्या विषयावर एक नितांत श्रद्धा आहे, ते ज्ञानच असेल अशीही त्यांची भावना नाही वा आग्रह नाही. शेवटी भौतिक घटनेप्रमाणे श्रद्धेचे किंवा ज्ञानाचे अस्तित्व हे जगात घडत असलेल्या घटनांवर निर्भर असते. एखादा ओशो शिकवणीला/परंपरेला स्वतःच्या प्रांगणात जागा देत नाही, तर ओशो हे श्रद्धास्थान असणारा युजी किंवा जे यांच्या पंक्तीला जाणार नाही. दोघांच्या श्रद्धा तिसर्या कुणालातरी अमान्य. कारण त्याच्या ज्ञानाचे कंगोरे त्याला असल्या गोष्टीतील फोलपणा जाणवून देत असतील. ह्या मतभेदाच्या फळ्याच खरंतर ज्ञानप्राप्तीचे सोपान ठरू शकतात....जर तिघेही एकत्र आले तर !!! अन् नेमके हेच होत नसते.
इन्द्रा
21 Oct 2010 - 7:48 pm | अडगळ
>>ह्या मतभेदाच्या फळ्याच खरंतर ज्ञानप्राप्तीचे सोपान ठरू शकतात....जर तिघेही एकत्र आले तर !!! अन् नेमके हेच होत नसते>>>>
हे वाइच्च उमागलं न्हाई.
म्हणजे दरवेळी परस्परविरोधी तत्वांची मोळी बांधता येईल काय ? बांधावी का ?ही मतभेदाची फाळकुटं एकमेकाच्या डोकीत मारण्यापेक्षा , तसेच फळ्या जोडून समन्वयवादी कडबोळी शिल्पं बनविण्यापेक्षा , आपापली फाळकुटं घेऊन चालू पडणं शहाणपणाचं नाही काय ? ( नाहीतरी दोन ओंडक्यांची सागरात कुठं ना कुठं भेट होती म्हणतातंच की. तेव्हा जरा सांभाळून बाजूबाजूनं जावं की झालं)
21 Oct 2010 - 9:34 pm | इन्द्र्राज पवार
"....आपापली फाळकुटं घेऊन चालू पडणं शहाणपणाचं नाही काय ?..."
~ खरंय ! ज्यावेळी वादाचे मुद्दे संपतात आणि आपल्याला कुठेतरी अस्पष्टशी अशी का होईना जाणीव व्हायला लागते की वृथा भिंतीवर धडका मारून आपलाच कपाळमोक्ष होण्याची शक्यता आहे, त्यावेळी श्री.अडगळ म्हणतात तसे आपले फाळकूट घेऊन वादमंडपातून चालते व्हावे. कोणत्याही धर्माची वा श्रद्धेची शिकवण कशीही आकर्षक असो, मानवासाठी बुद्धिप्रामाण्य हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे असे मानणारे खूप आहेत. साधू, गुरु, बाबा आदी स्थळे ही केवळ आत्मिक समाधानासाठी असतात, जिची गरज ज्याला भासते तिला विरोध करण्यात काही हशील नसते. कारण त्याने तो झेंडा स्वत:च्या बुद्धीने दिलेल्या कौलावरच घेतलेला असतो. समाजजीवनाशी आपली नाळ अतूट असते, आपण तिच्याशी फटकून वागूच शकत नाही, हे मान्य व्हावे. पण काही परिस्थितीत, श्री.अडगळांचे तत्व "नाहीतरी दोन ओंडक्यांची सागरात कुठं ना कुठं भेट होतेच. तेव्हा जरा सांभाळून बाजूबाजूनं जावं की झालं"....हेच शहाणपणाच लक्षण ठरतं.
इन्द्रा
21 Oct 2010 - 8:42 pm | नगरीनिरंजन
धागा वाचनमात्र करावा ही विनंती.
21 Oct 2010 - 8:54 pm | अविनाशकुलकर्णी
यु.जी. कृष्णमूर्ती होमो सेक्सी होते असे रजनिशांचे जाहिर मत होते
21 Oct 2010 - 9:47 pm | यशवंतकुलकर्णी
अविनाशजी,
ते तर सर्वात जुनं हत्यार आहे..
मुलांना मुलं तर कुठंही मिळू शकतात हो, मुलांना मुली सहजी मिळत नाहीत
मुलांना मुली आणि मुलींना मुलं पुरवायचा आणि बुध्दत्वप्राप्त व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली चाललेले आध्यात्म, साधना या लेबलखाली धंदा करणारा रजनीश/ओशो हा जगातला सर्वात हुशार मारवाडी होता..
आणि तुम्ही शब्दतरी जरा नीट वापरत जा हो,
होमो सेक्सी?? ;-) काय आहे हे?
21 Oct 2010 - 10:08 pm | अविनाशकुलकर्णी
होमो सेक्सी??.ठिक आहे....होमोसेक्युअल....गे...खुष? ..रजनिश वर का चिडता?...
21 Oct 2010 - 10:18 pm | मिसळभोक्ता
मग महेश भटांना मुलगी कशी झाली ?
21 Oct 2010 - 10:38 pm | यशवंतकुलकर्णी
अविनाशराव,
रजनीश आध्यात्माच्या नावाखाली लोकांच्या आयाबहिणींना स्वत:च्या बेडरूममध्ये घेत असेल,
त्या "आध्यात्मिक" गोष्टीसाठी पैसे वसूल करत असेल
आणि त्यावर तुमची/जगाची काहीच हरकत नसेल तर यापुढे चिडणार नाही बुवा मी तरी
21 Oct 2010 - 11:55 pm | विजुभाऊ
अत्यन्त आदरणीय , विचारप्रवर्तक महाराष्ट्र विचारमन्थक. श्री श्री श्री श्री यशवंतकुलकर्णी साहेबाश्री साह सो.
आपणास नमस्कार. _/\० आपले विचार थोर आहेत. आम्ही पामर त्याच्या पासंगाला देखील पुरेसे ठरत नाहिय्ये.
या उप्पर आपण नेहमीच आम्हा पामराना तथाकथीत थोर विचारवन्तान्तांच्या विचारांचे मार्गदर्शन करावे.
बाकी कोन कोणाच्या कोणाला कुठे घेत असे यात ई आर पी वाढवून आम्हाला कसलेच समाधान लाभत नाहीय्ये. त्यामुळे तुमच्या धाग्याचा टी आर पी आम्ही कशाला वाढवू?
न्यटनचा गतीविषयक नियम समजून न घेता त्याने मांजरासाठी आनि पिल्ला साठी दोन वेगळे दरवाजे केले याची चर्चा करणे हे कशाचे लक्षण आहे हे अजून समजले नाहिय्ये.
असो.
गेट वेल सून.
अवांतर: अष्टावक्र गीता या वर रजनीशानी जे भाष्य केले आहे त्याबद्दल काही सांगाल का? फार बरे होईल. आपल्यासारख्या ज्ञानी बहूवाचक इसमाने काही मार्गदर्शन करावे ही विनन्ती
21 Oct 2010 - 11:59 pm | प्रियाली
महेश भट्टांचे नाव या मालिकेत आल्यावर इंटरेष्ट बराचसा निघून गेला. महेश भट्ट इम्रान हाश्मीवरही चरित्र लिहू शकतात.
आपल्या मुलाबाळांना सोडून, कामधंदा न करता आयतं खाणार्या माणसाबद्दल सहानुभूतीही वाटत नाही. आदर बाजूला राहीला. :(
असो. हे व्यक्तिगत मत झालं.
22 Oct 2010 - 11:39 am | llपुण्याचे पेशवेll
महेश भट्टांचे नाव या मालिकेत आल्यावर इंटरेष्ट बराचसा निघून गेला. महेश भट्ट इम्रान हाश्मीवरही चरित्र लिहू शकतात.
याच्याशी सहमत.
22 Oct 2010 - 12:43 am | संपादक मंडळ
सदर लेखाचे लेखक यशवंतकुलकर्णी यांचे खाते तात्पुरते गोठवलेले आहे. मिसळपावावर लेखन करणे, प्रतिसाद देणे, निरोप किंवा खरडी करण्याची सोय सदर सदस्यास नाही याची नोंद सर्व वाचकांनी आणि या लेखाच्या प्रतिसादकर्त्यांनी घ्यावी.
यशवंतकुलकर्णी हे संपादक मंडळाशी पंचायत या दुव्यामार्फत संपर्क साधू शकतील.
धन्यवाद,
संपादक मंडळ.
22 Oct 2010 - 11:26 am | मिसळभोक्ता
अरेरे, हे फार वाईट झाले.
लेखमाला खूप आवडली होती.
22 Oct 2010 - 2:26 am | चतुरंग
हे समर्थ रामदास सांगून गेलेत. असा संसार सुरु करुन त्यातली बायका पोरे उघड्यावर टाकून स्वतः परागंदा होत त्यांना पुन्हा तोंडही न दाखवणार्या इसमाबद्दल काडीचाही आदर नाही.
पुढे महेश भट्ट, परवीन बाबी, विनोद खन्ना वगैरे प्रकरणे वाचली आणि एकंदर मगदूर समजलाच. त्याहीपुढे नाडी भविष्य, चिनी चिंगमिंग भविष्य वगैरे बाता आल्यावर तर मी आशाच सोडली.
असो. अजून जास्त ओळी खर्ची घालाव्यात असे वाटत नाही.
परंतु विषय कसा का असेना तुम्ही चिकाटीने लेखमाला पूर्ण केलीत ह्याबद्दल तुमचे अभिनंदन!
-रंगा
28 Jul 2012 - 6:45 pm | मन१
तुझं मत अजूनही तेच आहे की आता बदललय?
28 Jul 2012 - 11:08 pm | बिपिन कार्यकर्ते
जाना दो ना भाय!
29 Jul 2012 - 10:57 am | मन१
क्यों जाने दो?