काही कारणान रजा टाकून दोन दिवस घरी जावं लागला होत. परत आल्यावर मेल बॉक्स उघडून बघितल तर अभिनंदनाच्या मेल्सचा पावूस पड्ला होता! कारण code complete was announced! मी- "बनिया मैने जो बग फाईल किया तो वोह किसने फिक्स किया?" बनिया -" किसीने भी नहि." मी - "तो फिर code complete announce कैसे हुआ?" बनिया- "मॅनेजर ने कहा है- coding and testing will go ahead simultaneously!" मला आता राग आला होता! "What nonsense?" तेवढ्यात गीता मध्ये कड्मडली- " अरे इतका चिडायला काय झालाय? त्याचा काय आहे- हा प्रोजेक्ट जर लवकर संपवला तर पुढे मोठा प्रोजे़क्ट आपल्या टीमला मिळणार आहे. त्याने आपल्या सगळ्यांचाच फायदा होइल. असा मॅनेजर न सांगितला आहे. आणि आपण टेस्टींग आणि डेव्हलप्मेंट पूर्ण करनारच आहोत." बनिया -" सही तो बोल रही है वोह. finally it helps to pay our bills!" ते ऐकून काय करायचा ते सुधरल नाही. सरांना भेटायला गेलो.
सर " Rangraao, good that you are back. I need to tell you something. I have resigned yesterday! " अजून एक धक्का! त्यानी राजीनामा का दिला हे विचारायची गरज नव्हती. आज दिवस इतका वाईट का चालला होता माहित नव्हत! मी -"thats very unfortunate.!" सर- " But you dont need to worry. You can still try to change things around you. wish you all the best." तिथून निघून आलो.
त्यानंतर एक महिना होत आला होता. त्यात performance rating झाला. आणि appraisal ही झाला. मला मॅनेजर म्हणाला " You have got very strong rating from the architect. Hence we give you five percent hike! Company has great expectations from you. If you change your attitude, you can go places. " मी-"Thats fine." सगळ्यात जास्त हाईक बनियाला मिळाली होती- ८%. बनिया म्हणाला " यार मुझे बहोत कम मिला है तुम्हे तो औरभी कम बुरा नहि लग रहा है तुम्हे". माझा उत्तर गितान देवून टाकल-" इतना सब होने के बाद भी उसको हाईक मिली यही बहोत है!" त्यानंतर गिताचा नंबर आला. गीताला फक्त ३% दिली होती. ती बरच उशिरा जॉईन झाली होति. आणि थोड्या कमी पगारातपण. तिला जॉईन होताना सांगितला होता लवकरच तुझ अप्रे़जल होइल तेंव्हा सॅलरी अॅडजस्ट होईल. आणि आता तिला सांगितला गेल होत- " चार महिन्यात तुमचा performance judge करन शक्य नव्हता तरीही तुम्हाला proportionate hike दिली आहे". ती बरीच नाराज होती.
दुसर्या दिवशी सरांचा शेवट्चा दिवस होता. त्यांचा फेअरवेल झाला. आणि आमचा अमेरिकन बॉस ही आला होता. सगळयाना मीटींगमध्ये बोलवलो होत. मी ती मिटींग सोडून सरांबरोबर कॉफी प्यायला खाली गेलो. थोडा वेळ बोलण झाल. आणि सर निघून गेले! त्याना गेट पर्यंत सोडून परत आलो.
पून्हा जावून कॅफेमध्ये बसलो. आणि गेल्या एक महिन्यात काय काय झाला ह्याचा विचार करू लागलो. राग वाढत चालला होता. हातान कप टेबलावर गोलगोल फिरवत बसलो होतो. तो पर्यंत आमची पूर्ण टीम खाली आली होती. बनिया म्हणाला "तुझे एक अहम खबर सुनानी है! " सगळे लोक त्या टेबलावर बसले. " आज क्या हुआ पता है. उस अमरिकनने बता दिया -" I'm very happy that this product is getting completed three months ahead of schedule, And we are going to save 200 thousand dollars of the allocated money. This all is possible because of your hardwork and efficient management .. और इसलिये उसे सिनियर मॅनेजर बनाया जा रहा है." आज जिग्सॉ पझल सुटावा तसा सगळ चित्र पूर्ण झाला होत. मॅनेजर्ची सहा महिन्यात प्रोजेक्ट संपवायची धडपड. बाहेर बूम असतानाही सगळ्यांनाच कमी मिळालेली हाईक. तेवढ्यात गीता म्हणाली -" लोक इतके अप्रमाणिक कसे असू शकतात?" मी कप तसाच फिरवत बोलून गेलो- "आज आठवला का प्रामाणिकपणा. दोन महिन्याभरापूर्वी मोठा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी खोटा code complete announce झाला होता तेंव्हा कुठ गहान ठेवला होतात तुमचा ईमान-धर्म?" एक क्षणभर शांतता पसरली. त्या खर्खर करत फिरनार्या कपच्या आवाजामध्ये कसला तरी वेगळा आवाज मिक्स झाला होता. कप थांबवला. हूंदक्याचा अवाज येत होता. वर पाहिल. गिताच्या डोळ्यातून गंगा जमूना वाहू लागल्या होत्या. तोंडावर रूमाल ठेवून ती पळत निघून गेली.
प्रतिक्रिया
12 Oct 2010 - 10:55 pm | रन्गराव
वर नीट लिंक टाकने जमला नाही म्हणून इथ लिहित आहे.
http://www.misalpav.com/node/14540
http://www.misalpav.com/node/14560
http://www.misalpav.com/node/14575
http://www.misalpav.com/node/14584
http://www.misalpav.com/node/14592
http://www.misalpav.com/node/14623
http://www.misalpav.com/node/14625
http://www.misalpav.com/node/14706
http://misalpav.com/node/14839
http://misalpav.com/node/14852
http://misalpav.com/node/14873
12 Oct 2010 - 11:01 pm | शुचि
मी तरी वेळेआधी पूर्ण झालेला प्रकल्प अजून तरी पाहीलेला नाही आहे.
वेळेआधी काम पूर्ण करायचा अजून एक तोटा हा असतो की नंतर बगस हे येतातच आणि तेव्हा कोणीही हा ठपका ठेऊ शकतं की तुम्ही घिसाडघाई केलीत, कशाला वेळेआधी पूर्ण करायचा शहाणपणा केलात? Why were you not thorough?
___
असो, तुमचा अनुभव वेगळा दिसतो आहे.
12 Oct 2010 - 11:11 pm | रन्गराव
काम तर व्यवस्थित पूर्ण झालच नव्हता. शॉर्ट्कट मारले गेले होते. फक्त दिखावा असा करायचा होता की ते पूर्ण झाला आहे. मग टेस्टींग मधला टाईम आणि बिटा मधला वेळ वापरून कसा तरी करून गुंडाळायच होत. त्यातून ही नाहि झाल तर पॅच पाठवायची सोय असतेच!
ह्यात अमेरिकनही गप्प बसनार होते कारण भारतात काम पाठवल तर ते लवकर आणि स्वस्तात होत हे सिद्धा होणार होत. काही चूकिच्या निर्णायामुळ कंपनीची अर्थिक नुक्सान झाला होत. कमी वेळात फायदा दाखवन्यचा एक उपाय म्हनून वर झालेला रामायण घडल. त्यात आमच्या मॅनेजर ने चांगलाच हात मारला. हे सगळे लोक सामील असल्यांमुळे सर काही करू शकले नाहित.
13 Oct 2010 - 10:15 am | सविता
कहानी पुरी फिल्मी है...
पण प्रत्यक्षात घडणे अगदीच अशक्य नाहीये......
13 Oct 2010 - 11:28 am | अनिल २७
रन्गरावांच्या लेखमालेचे पहिले ३-४ भाग वाचले, पण नंतर नंतर वाचायचं सोडून दिले..
सगळ्या लेखांचे सार एकच.. रन्गरावाने कशी जिरवली !!
पार फिल्मी आहे बुवा.. चालू द्या...
13 Oct 2010 - 11:37 am | रन्गराव
अनिल राव मग तर हा भाग नीट वाचाच तुम्ही. ह्यात नेहमी वेडा दिसणार्या मॅनेजरन सगळ्यांना वेडा बनवला आहे!
13 Oct 2010 - 10:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आयटीतल्या लोकांनी आयटीतल्या लोकांसाठी लिहीलेली तद्दन फिल्मी कहाणी! तरीही वाचायचा प्रयत्न केला पण (अ)शुद्धलेखन आणि हजारभर भाषांच्या मिश्रणामुळे दोन-चार ओळींतच धागा सोडून दिला आणि प्रतिसाद वाचले. तिथेही हीच ऐटीतली कंपूबाजी दिसली.
सर्व प्रतिसादकांनी ह. घेणे
(क्रमशः)
13 Oct 2010 - 11:06 am | रन्गराव
>>आयटीतल्या लोकांनी आयटीतल्या लोकांसाठी लिहीलेली तद्दन फिल्मी कहाणी! तरीही वाचायचा प्रयत्न केला
फार उपकार झाले आपले!
>>पण (अ)शुद्धलेखन आणि हजारभर भाषांच्या मिश्रणामुळे दोन-चार ओळींतच धागा सोडून दिला
पहिल आणि तिसर वाक्य जरी अति शुद्ध भाषेत लिहिल असला तरी विसंगत आहे ह्याचा भान राहिलेल नाहि आपल्याला. दोन चार वाक्यात निष्कर्श काढून आपण आपला नाव सार्थकी लावला आहे. अपसंती किंवा अमान्यता ह्याआधी बर्याच जणानी दर्शवला. पण त्याला विचार, अनुभव अशी कारण दिली होते. ही आपली म. न.से. गिरी मिपावर नवीनच दिसली!
आपण हे हळू घ्या किंवा ज्याच्या पाहीजे त्याच्या नावाने शिमगा करा. ;)
13 Oct 2010 - 11:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपण हे आधी पाहिलं नव्हतंत याचा अर्थ एवढाच की आपला अभ्यास कमी पडतो आहे, बाकी काही नाही.
अवांतरः
अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.
13 Oct 2010 - 11:41 am | llपुण्याचे पेशवेll
अदितीशी सहमत आहे.
13 Oct 2010 - 1:44 pm | परिकथेतील राजकुमार
काय ग अदिती, एक तर लोकांच्या 'प्रायव्हेट चाट विंडो' मध्ये घुसतेस आणि वर त्यांच्याच चुका काढतेस होय ?
अतिशय सुंदर वाक्य. पण ह्या वाक्यात थोडासा शुद्ध अथवा कोमल गंधार लावुन वाक्याचा शेवट जर शार्दुलविक्रिडितने केला असता तर जे आयटी मध्ये नाहीत त्यांना देखील वरिल वाक्यांचा अर्थ पटकन लक्षात आला असता.
13 Oct 2010 - 1:54 pm | रन्गराव
आयटी वाल्यांचा वाङमय थोडा कच्च असल्यामुळे वरील शब्दाचा अर्थ समजला नाही. तरी स्पष्टीकरण द्यावे ही नम्र विनंती!
13 Oct 2010 - 10:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे
रन्गराव घाबरू नका, परासाहेब तुम्हाला शार्दुलविक्रीडीत चा अर्थ तर सांगतीलच पण मराठी संकेतस्थळांवर कसे लिहावे याचा परिपाठ घालून देताना वरील वाक्याचे (काम तर व्यवस्थित.... पाठवायची सोय असतेच) शुद्ध आणि सहजसोप्या मराठीत भाषांतर पण सांगतील.
(वाक्याचा शेवट शार्दुलविक्रीडीत ने कसा करायचा हे जाणण्यास उत्सुक असलेला) वि. मे.
13 Oct 2010 - 10:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> (वाक्याचा शेवट शार्दुलविक्रीडीत ने कसा करायचा हे जाणण्यास उत्सुक असलेला) वि. मे. <<
जसं काही वाक्यात शुद्ध किंवा कोमल गंधार कसा लावायचा हे समजलंच आहे! ;-)
13 Oct 2010 - 11:53 pm | अनामिक
जसं काही वाक्यात शुद्ध किंवा कोमल गंधार कसा लावायचा हे समजलंच आहे!
हे लै म्हणजे लै भारी.... :)
14 Oct 2010 - 12:25 am | विश्वनाथ मेहेंदळे
खरे तर तेही नाही कळले, पण मुद्दलातले शुद्ध किंवा कोमल गंधार म्हणजे काय हेच माहित नसल्याने तो वाक्यात कसा लावायचा हे कळण्याची शक्यता शून्य. संगीतातले काहीही कळत नाही हो. मी तर बरेच दिवस यमन हा यमक चा भाऊ आहे असे समजत होतो. शार्दुलविक्रीडीत वगैरे भानगडी म्हणजे काय हे माहित असल्याने निदान तेवढे कळू शकते.
(परीकथेतील राज्यात सूर्योदय होण्याच्या प्रतीक्षेत) वि. मे.
14 Oct 2010 - 5:21 pm | परिकथेतील राजकुमार
आमच्या राज्यात सूर्य कधीच मावळत नाही हो वि. मे. :)
बाकी राहिला प्रश्न तुमच्या शंकांचा तर आता त्या तुम्हाला सूर्योदय दिसला की मग सोडवु ;)
14 Oct 2010 - 5:32 pm | रन्गराव
परा भाऊ आपण संयम दाखवताय आणि कुणीतरी उगाच आपल्यावर पाळत ठेवून आहे. "किसीकी दुखती रग का सवाल है" अशी शंका यायला लागली आहे आता ;)
14 Oct 2010 - 5:33 pm | रन्गराव
परा भाऊ आपण संयम दाखवताय आणि कुणीतरी उगाच आपल्यावर पाळत ठेवून आहे. "किसीकी दुखती रग का सवाल है" अशी शंका यायला लागली आहे आता ;)
14 Oct 2010 - 5:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =))
आवरा आता!
14 Oct 2010 - 5:26 pm | परिकथेतील राजकुमार
एक बार जो मुझे 'पेमेंट' मिल जाता है तो फिर मै अपने आपको भी नही आवरता.
14 Oct 2010 - 5:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी तुझ्याशी नव्हते बोलत, मी विमेंशी बोलत होते. का त्यांनाही दिलंय पेमेंट?
14 Oct 2010 - 5:40 pm | परिकथेतील राजकुमार
अयोग्य ठिकाणी विचारला गेलेला अयोग्य प्रश्न !
14 Oct 2010 - 10:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे
उगाच विषय भरकटतो आहे. ते शार्दुलविक्रीडीत वगैरे सगळे सोडा हो भाऊ. त्या वाक्याच्या मराठी भाषांतराचे तेवढे सांगा. मला खरच उत्सुकता आहे. कसे आहे की, अशुद्ध लिहिले अशी टीका करणे सोपे असते पर्यायी शुद्ध वाक्य सांगा. विशेषत: टेस्टींग, बिटा, पॅच इत्यादी शब्द सामान्यांना कळतील अशा मराठी भाषेत कसे लिहायचे ते कळले तर बरे होईल.
आधीच खूप अवांतर झाले असल्यामुळे या मुद्द्यावर हा शेवटचा प्रतिसाद :-)
14 Oct 2010 - 10:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बिटामधला वेळ कसा काय असतो? मला बिटातली जीवनसत्त्व माहित होती. ;-)
काम पूर्ण झालं नव्हतं.
दिखावा करायचा -> देखावा निर्माण करायचा नव्हता.
टाईम -> वेळ
त्यातून अनेक ठिकाणी, विशेषतः क्रियापदांंच्या रूपात मात्रा वगळली आहे आणि त्याजागी अनुस्वारही नाहीयेत. एकदा-दोनदा झालं ठीक आहे, पण किती वेळा हे खडे येणार?
>> टेस्टींग, बिटा, पॅच इत्यादी शब्द सामान्यांना कळतील अशा मराठी भाषेत कसे लिहायचे ते कळले तर बरे होईल. <<
टेस्टींग मधला टाईम -> चाचणी काळ
पॅच -> सुधारणा
हे शब्द सहज सुचले आहेत आणि सुधरण्यासारखेही वाटतात. बीटाला मराठीत बीट म्हणतात; पण बीटा (व्हर्जन)ला तात्पुरतं असा शब्द वापरता येईल.
13 Oct 2010 - 2:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पराला हलकटशिरोमणी या किताबाने मी आज सन्मानित करत आहे.
13 Oct 2010 - 11:02 am | समंजस
छान रंगराव, मस्त कथा!!
खरी असल्यास आश्चर्य नाही. असं होताना बघितलंय मी, एखाद वेळेस भागीदार सुद्धा व्हावं लागलंय :( ज्यांनी नाही बघितलंय त्यांना अविश्वसनीय वाटणे साहजीकच आहे :) परंतू या पेक्षाही बरंच जास्त राजकारण(अर्थकारण) चालतं वरच्या पातळीवर ज्यात दोन्ही बाजूंचे अधिकारी/प्रबंधक (ग्राहक आणि सेवादाता) सामील असतात.
येउद्यात आणखीही असेच कॉर्पोरेट अनुभव. बाकी तुम्ही नशिबवान पहिल्याच नोकरीत अतिशय महत्त्वाचा आणि पुढे उपयोग होईल असा अनुभव मिळाला :)
[अवांतरः शेवटी ग्राहक काय आणि सेवादाता काय दोन्ही बाजूला माणसेच असतात आणि प्रत्येकाच्या काही गरजा, काही मर्यादा असतात. काहींना नोकरी वाचवायची असते तर काहींना बढती मिळवायची असते तर काहींना स्वतःचा निर्णय योग्य होता हे सिद्ध करणे आवश्यक असते. ]
13 Oct 2010 - 11:10 am | रन्गराव
>>[अवांतरः शेवटी ग्राहक काय आणि सेवादाता काय दोन्ही बाजूला माणसेच असतात आणि प्रत्येकाच्या काही गरजा, काही मर्यादा असतात. काहींना नोकरी वाचवायची असते तर काहींना बढती मिळवायची असते तर काहींना स्वतःचा निर्णय योग्य होता हे सिद्ध करणे आवश्यक असते. ]
हे खूप छान लिहलत आपण! जीवनाच सार दोन वाक्यात! मानल तुम्हाला! :)
13 Oct 2010 - 11:35 am | अनिल २७
या वाक्यांत जीवनाचे सार आहे ? कुठेय ?
13 Oct 2010 - 11:25 am | अनिल २७
परत एकदा ..
रन्गराव - दी सुपरहीरो..!
आवाज नाय पाहिजे.. नारायणमूर्तींनंतर आम्हीच !
13 Oct 2010 - 11:46 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत. आमच्या कुंपणीत आयटीवाले अॅप्रेझल न झाल्यामुळे पेटलेले पाहीले आहेत. पेटण्याची परिसीमा म्हणजे रेटिंग येताच रिझाईन करणे. :) रडणारे आयटीवाले मी कधीच पाहीलेले नाहीत. असो.
आमच्या एका मित्राने टपरीवर सिगारेट ओढताना तिथे सिगारेट ओढायला आलेल्या आमच्या मॅनेजरला त्याने (मॅनेजरने) भाषण द्यायला सुरुवात केल्यावर "तू मॅनेजर आहेस म्हणून मी तुला कधीच तू माद**द आहेस असे म्हणणार नाही पण म्हणून तू नसशील ही शक्यताही नाकारता येत नाही" असे बोलता बोलता कसलेतरी उदाहरण म्हणून सजमावले होते. ;)
13 Oct 2010 - 12:38 pm | रन्गराव
पेशवे लई भारी लिवताय तुमी. पण एक बोंब हाय! नाव पुण्याचे पेशवे पण लिवलय कोल्हपूरच्या छत्रपतिंसारख. काय भानगड्स!? ;)
13 Oct 2010 - 2:13 pm | परिकथेतील राजकुमार
ऑ ? पुप्या घसरगुंडीवर बसुन प्रतिसाद टंकलास का काय ?
13 Oct 2010 - 7:04 pm | नगरीनिरंजन
तपशीलात थोडी चूक होतेय परा. पायथ्याशी म्हणायचंय का तुम्हाला?
13 Oct 2010 - 7:06 pm | परिकथेतील राजकुमार
बहुदा चूक असु शकते. कारण मी दोन्ही पोझिशन्सबद्दल ऐकले होते. जास्ती लोकांनी वरची पोझिशन सांगितली होती म्हणुन मी तीच ग्राह्य धरली येवढेच ;)
13 Oct 2010 - 8:43 pm | अडगळ
जेम्स लेन आठवला.
त्यानं म्हणे काही ऐकिव गप्पा , अफवा लिहील्या आहेत त्याच्या पुस्तकात.
13 Oct 2010 - 9:05 pm | रन्गराव
परा आणि नगरी निरंजन इथ ह्याविषयी लेख लिहिण्यास आपल्या इतक समर्थ कोणी नाही. होऊन जावू द्या एक एक ;)