कॉर्पोरेट तमाशा ११- शिक्का मोर्तब.

रन्गराव's picture
रन्गराव in जनातलं, मनातलं
11 Oct 2010 - 11:21 pm

सोमवारी सकाळी ओफस मध्ये पोहचतो तोच मॅनजरने बोलावून घेतल. मॅनेजरच्या कपाळावर चांगल्याच आट्या पडल्या होत्या. मला म्हणाला- " तुला काही महत्वाचा सांगायचा आहे. US team wants to add a new module to our software, that will enable the product to communicate over the network in a better way. This needs to be done within next 5 to 6 weeks. And you need to drive this!" मला जे ऐकले ते अनपेक्षित होत. काहीही विचार न करता मी बोलून गेलो -" But i dont know anything about networking and since this design is not ready I doubt this can be done in month and a half." माझ्या चेहर्यावरचा प्रश्न्चिन्ह पाहून तो म्हणाला " You have a point there, but the module is already written and is being used in some other parts of the product. There is a guy called Friedman who has built this. He will explain the design and code structure to you and then you need to study it and explain that to team-mates over here, they will take care of integration! You will have to attend a late night call twice a week but you will enjoy this stuff"
मॅनेजरला ह्याचा जाम वैताग आला होता! त्याला काही तरी करून एका महिन्यात रिलीज संपवायच होत. मी बग टाकून किडा केला होता आणि अमेरिकन लोकांनी नवीन काम दिला होत. असो दुसर्यादिवशी रात्री माझी फ्रेडी बरोबर मिटींग झाली. अमेरिकन म्हणजे ऊर्मट आणि वर्ण्द्वेषी अस बरच काही ऐकून होत. पण प्रत्यक्ष अनूभव मात्र वेगळा होत. फ्रेडी तसा चार वर्षाचा अनूभव असलेला माणूस. पण एकदम कूल! पहिल्याच मीटींग मध्ये त्याने ढोबळ आर्किटे़चर समजावून सांगितला. त्याची सांगण्याची पद्धत इतकी मस्त होती कि सगळ्च सोपा वाटायचा. पूढ्च्या मिटींग्च्या आधी मी ठरवला थोडा वाचून जाव. वाचताना डोक्यात शिट्ट्या वाजत होत्या नुसत्या. वरून साध्या वाटणर्या त्या मोड्युल्मध्ये प्रचंड complex logic होत. त्याने कुठले जगावेगळे API वापरले होते देव जाणे. मिटींगमध्ये जाताक्षणी मी त्याला सांगून टाकले " Friedy, that module seems to be very complex, I would have loved to learn it. But I dont think I'm good enough to do this in such a short period of time." फ्रेडी " Dude just chill. You are trying to be modest!" हा आरोप आयुष्यात पहिल्यांदाच झाला होता. खरच हसू आल. तो पुढे " Things might seem to little complex because you are doing it for the first time. I will explain it to you. Its damn simple....." तो सांगायला लागला की सगळच सिंपल व्हायचा. मिटींग संपायच्या आधी मी त्याला विचारला. " One question. Where can I find the documentation of some of the API's that are used in code!" तो हसून " Nowhere! b'coz they are undocumented so far. I got them directly from the belly of the beast. Thanks for reminding me that. i'll cover them in the next meeting first. " ह्या माणसाचा ज्ञान अफलातून होता. network stack चे जितके details तो सांगायचा ते कूठल्या पूस्तकातही दिले नव्हते! आमचा काम छान चालल होता. मी फ्रेडीबरोबर जे काय शिकलो होतो ते सरांशी डिस्कस करायचचो आणि मग बाकिच्या टिमला समजावून द्यायचो.
आज सकाळी सकाळी "All hands meeting" झाली. कंपनीचे ह्या क्वॉर्टरचे रिझल्ट्स काही खास लागले नवते. मिटींग्मध्ये डारेक्टरने आश्वासन दिला- "No need to panic. This is not going to affect anyone. The results look bad just because we have no major releases in this quarter and we are following new accounting method. With couple of release planned for next quarter we are going to bounce back! "
त्याच दिवशी दुपारी मॅनेजर न मला विचारला तुझा फ्रेड्मन बरोबरचा डिस्कशन कसा चालू आहे! मी-" बहुदा संपत आल आहे." तो- " Good. Now you are ready to take control of that module." मी त्याच्याकडे दुर्लक्ष केला आणि संध्याकाळ्च्या मिटींगच्या तयारीला लागलो! रात्री फ्रेडी ने डिस्कशन संपवला. तसा आता नावाला एक भाग राहिला होता. मी त्याला म्हणालो "Looks like we can wrap it up by next week."
दुसर्यादिवशी ऑफिस मध्ये गेलो. फ्रेडीची मेल आली होती- " Dude, it was great discussing the design with you. This is my last day at the office. I wish you all the best for your career" मला काहीही समजला नाही. तोवर बनिया तिथ आला! " एक बूरी खबर है यार. अमरिका मे अपने कंपनीमै लोगो को दो-तिन महिने की सॅलरी देके निकाल दिया है! " तेव्ढ्यात मॅनेजरन मला ताबोड्तोब बोलावला -" Friedman will not be available anymore. As you know most of the dev team will be busy troubleshooting. You are going to do that role now! " जड झालेल डोक घेवून डेस्क्जवळ आलो! खूर्चित बसून मॉनिटरकड पहात बसलो. मनात विचार आला" चार वर्ष त्या डोमेन मध्ये डोक खपलेल्या त्या हुशार मानसाचा रोल आपण कसा करनार, तेवढी लायकी आहे का आपली?" त्या बंद पड्लेल्या मॉनिटर मध्ये माझा चेहरा प्रतिबिंबित झाला होता. अंगावर शहारा आला. प्रतिबिंबात कपाळावर बट्बटीत शिक्कामोर्तब झाल होत " Cheap labor!". गेल्या सहा महिन्यात कंपनीन दिलेल्या भरगच्च पगारानही कलंक धुवून निघाला नव्हता!

नोकरीअनुभव

प्रतिक्रिया

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Oct 2010 - 11:30 pm | विश्वनाथ मेहेंदळे

लेखन चांगले आहे. पण स्वत:ला चीप लेबर म्हणून हिणवून घेणे नाही आवडले. (आणि तसेच काम करणाऱ्या इतरांनाही). त्याची कारणे अनेक आहेत. काहींबद्दल चर्चा झाली होती थोड्या दिवसांपूर्वी इथेच मिपावर.

(स्वत: चीप लेबर असलेला) वि. मे.

रन्गराव's picture

11 Oct 2010 - 11:36 pm | रन्गराव

असो. जे मला वाटल ते लिहिल. सर्वांना ते मान्य असन्याचा अट्टाहास नाही. मतं ही मानसा मानसानुसार आणि वेळेनुसारही बदलतात! काय बरोबर आणि काय चूक ह्याची व्याखा वैयक्तीक होवून जाते! आपण लेख वाचत राहिलात त्याबद्दल धन्यवाद!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 Oct 2010 - 3:00 am | विश्वनाथ मेहेंदळे

मान्य, माझेही म्हणणे तुम्हाला पटले पाहिजे असा अट्टाहास नाही.

असे बघा, स्वस्त म्हणजे वाईट आणि महाग म्हणजे चांगले ही धारणा योग्य आहे का हे बाजूला राहू दे, पण एकदा असा विचार करून बघा की आपण स्वस्त लेबर नसून अमेरिकन हे गरजेपेक्षा जास्त महाग आहेत. मग चित्र वेगळे दिसेल.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Oct 2010 - 1:48 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे रंगा. आता आपण चीप लेबर म्हणून काम करतो आहोत पण पुढे जाऊन आपण आपला देश चांगला केला तर आपण चीप लेबर नक्कीच नसू. कितीही पगार मिळाला तरी स्वतःला चीप लेबर म्हणवून घेणे हे स्वतःतली चांगले काहीतरी करायची आग धगधगती ठेवण्यास मदत करते.

-(आयटीवाला (चीप लेबर)) पेशवे :)

रन्गराव's picture

12 Oct 2010 - 3:25 pm | रन्गराव

इथ चिप पैसा किंवा काम ह्या द्रुष्टीन नाही म्हंट्लेलं. काम ज्या पद्धतीन आणि ज्या परिस्थितीमध्ये करवला आणि केला जाता त्याला म्हंट्ल आहे

उपास's picture

12 Oct 2010 - 6:44 am | उपास

रंगराव साहेब, वरती बर्‍याच जणांनी समजावयचा प्रयत्न केला आहेच (रीक्षाचे उदा. वगैरे) माझेही दोन पैसे ;)
लेबर हा लेबर असतो.. तो चिप म्हणजे नेमका किती हे स्थल, काल आणि व्यक्ति सापेक्ष आहे.. आमच्या इथले रंगारी अमुक एवढं काम देत असाल आणि मोबदला देत असाल तर काम करू नाहीतर नुसते पान्-तंबाखू खात पिंका टाकत बसू.. (थोडक्यात आम्ही चिप नाही) असे म्हणतात आणि तसं करतात देखील. गंमत म्हणजे त्यांच्या अशा वागण्यालाच मी 'चिप' म्हणतो, मग तेच काम मला हवं तसं आणि हवं तितकं मी बाहेरुन आलेल्या एखाद्या बिहारी, उत्तरप्रदेशातील माणसाकडून करुन घेतो.. तो मिळेल तेवढ आणि मिळेल तितकं काम माझ्यापसंती प्रमाणे आणि माझ्या खिशाला परवडेल असं करतो.. त्याला नुसतं बसून राहाण्यापेक्षा चार पैसे मिळतात ह्यात तो खूष आणि माझं काम झालं ह्यात मी. शिवाय माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम त्याला मिळत असेल तर तो माझ काम (अर्धवट न सोडता) केव्हाही नाकारु शकतोच की.
थोडक्यात, चिप लेबर म्हणजे वाईट हे डोक्यातून काढायला हवं.. हे म्हणजे अमेरिकेत आणि जर्मनीत बनलेली प्रत्येक गोष्ट चांगलीच असं जे आपल्या डोक्यात आहे ना त्याच्यासारखंच पण विरोधी.. तितकाच न्यूनगंड दर्शवणारं!

उलट चिप असणं आणि तितक्याच ताकदीच उत्तम काम देण हे स्पर्धात्मकतेचं लक्षण आहे. .आज भारतियांना काम मिळतायत ऑफशिअरींगची ती नुसती चिप म्हणून नाही तर चिप तसेच क्वालिटी कंडीशन्स ना पुरी पडतील अशी आहेत म्हणूनच मिळताहेत. नुसतं स्वस्त मिळतय म्हणून कोंडा घेण्याइतपत अमेरिकन आणि युरोपियन यडे नक्कीच नाहीत..

सगळे लेख वाचले.. कॉर्पोरेट तमाशा सगळीकडेच असतो. .. थोडा अतिरंजित वाटला तरी चांगला मांडलाय.. शिवाय प्रोजेक्ट मॅनेजर आणि आर्कीटेक्ट ह्या दोन्हीं जागांवर काम केले असल्याने तुमचे मुद्दे मस्तच वाटले वाचायला..
लिखाण आवडलंच..

माझं एक अतिशय आवडतं पुस्तक ह्या विषयातलं.. Neal Whitten's No-Nonsense Advice For Successful Projects - प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये रस असलेल्या (आणि नसलेल्यानेही) प्रत्येक आयटीवाल्याने वाचण्यासारखं पुस्तक..

- उपास (पीएमपी आणि सी.एस्.क्यू.ए. असलेला, जावा आर्किटेक्ट/ डेव्हलपर )

योगी९००'s picture

12 Oct 2010 - 2:01 am | योगी९००

हा भाग आवडला..

थोडेफार माझ्याही बाबतीत असेच झाले..मी ज्या माणसाकडून knowledge घेतले, त्यालाच तो चिप नसल्याने जावे लागले..पण तो जाणार हे त्याला आधीच माहित होते तरी त्याने मला देण्यात येणार्‍या knowledge मध्ये कमीजास्तपणा केला नाही...किंवा एकही loophole सोडले नाही..

हा भाग मला (का कोणास ठावूक) अतिरंजित वाटला नाही..तुमच्या बाकीच्या भागांसारखा...

अजून अनुभव येऊ द्दात..

रन्गराव's picture

12 Oct 2010 - 8:20 am | रन्गराव

>>हा भाग मला (का कोणास ठावूक) अतिरंजित वाटला नाही..तुमच्या बाकीच्या भागांसारखा...

त्याचा कारण लिहिलेली घटना तुमच्या अनुभवाशी मिळ्तीजुळती होती. आता बाकिच्या कुणाला तस वाट्ल नाही म्हणून तुमची प्रतिक्रिया अतिरंजित ठरत नाही. या आधीचा प्रत्येक भागाखालील प्रतिक्रिया आपण वाचल्या तर आपल्या अस लक्षात येइल की कुणी ना कुणाच्या बाबतीत अस घडलेला आहे. इथ गंमत अशी आहे की सगळ्या गोष्टी एकाच जागी होतात आणि त्याला विरोधही. हे दुर्मिळ असल तरी अशक्य नाही. आणि म्हणून ते लिहिन्याजोगा आहे. आता राहिला मुद्दा मॅनेजरच्या मूर्खपणाचा आणि रंगरावाच्या अतिशहानपणाचा . मॅनेजर मूर्ख होता असा दावा कुठही ठोकला नाही. तो किती चालू होता कळेल लवकरच. आणि रंगरावाची अरेरावी म्हणायाची असेल तर त्याची ही सुट्का नाही. न्यायनिवाडा त्याचाही होइल.
पण तुम्ही वाचत राहिलात आणि परखड प्रतिक्रिया प्रामाणिकपणे दिलीत ह्याच कौतूक केल्याशिवाय रहावत नाही!

हे नॉलेज ट्रान्स्फर म्हणजे एकंदरीत आयत्या बिळावर नागोबा प्रकरण दिसतय. आपण मारे मधमाशीसारखं कणाकणानी कौशल्य गोळा करायचं , आपली निश कार्व्ह करायची आणि हा हा म्हणता आपल्या प्रतिस्पर्ध्याला ते कौशल्य दान करून टाकायच? :( टू बॅड!!!!
त्या फ्रेडीला पूर्वकल्पना दिली असेल तर ठीक आहे नाहीतर वाईट वाटलं.

उपास's picture

12 Oct 2010 - 5:10 am | उपास

जर तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंट करत असाल तुमचं नॉलेज तर Knowledge transfer is Not that bad & difficult.. knowledge घेणार्‍याचे आणि (सोडून जात असाल तर) त्या प्रॉजेक्ट स्टाफचे/ कंपनीचे तुम्ही दुवेच घेता.. जे ह्या सोशल आणि प्रोफेशनल नेटवर्कींगच्या जगात तुम्हाला उपयोगीच पडतील.. ज्ञान दिल्याने वाढते एवढी परिपक्वता मात्र यायलाच हवी मग समोरची व्यक्ती कशीही असली तरी तुमचा चांगुलपणा उपयोगी पडतोच पडतो, तुमचे नुकसान तरी नक्किच करत नाही (हा स्वानुभव...)

सोडून जातेवेळीची के टी इज पार्ट अँड पार्सल ऑफ अ गुड एक्स्पीरीअन्स पण इथे फ्रेडी ला न सांगता त्याचं ज्ञान काढून घेतलं आहे की काय अस वाटतं. आणि अचानक त्याला डच्चू दिला आहे असं वाटतं. थोडं पाठीत सुरा भोसकल्यासारखं.

उपास's picture

12 Oct 2010 - 6:41 am | उपास

पण जेव्हा असं मायग्रेशन आणि त्यातल्या त्यात ऑफशोरींग असतं (विशेषतः मोठ्या प्रमाणावर आउटसॉर्स करायचा कंपनी निर्णय घेते/ किंवा शेअर होल्डर्ससाठी तसा निर्णय घ्यावा लागतो) तेव्हा जाणार्‍या लोकांपुढे ऑनसाईट लिएझॉन किंवा एस.एम.ई (सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट) होण्याशिवाय पर्याय नसतो.. शिवाय ऑफशोअरींग असेल तर दिवस रात्रीचं गणित आलचं.. आणि नॉलेज घेणारी लोक 'दिलस तर चांगलंच नाहीतर आम्हि कोड रिव्हर्स इंजिनिअर करुच' अशा तयारीत असतातच (म्हणजे ज्या कंपनीला नवीन काम दिलेय उदा. टीसीएस, इन्फोसिस त्यांना त्यांच्या रीसोर्सेना असे तयार करावेच लागते).
फ्रेडीच्या दृष्टीने विचार करता जर त्याला पुढे अशा कंपनीत आणि वातावरणात जुळवून घेता येणार नाही हे चित्र स्पष्ट असेल तर लवकरात लवकर बाहेरचा मार्ग पत्करणे श्रेयस्कर.. आणि पाठीत सुरा म्हणाल तर बरेचदा तो त्याच्याच मॅनेजमेंटने (खूपदा अपरिहार्यपणे ) शेअर होल्डर्सना वाचवण्यासाठी/ कंपनी तारण्यासाठी/ नफ्यासाठी घेतलेला निर्णय असतो.. ह्यासाठीच फ्रेडीला 'हू मुव्ड माय चीज' हे हुंगत राहाणे महत्त्वाचे ;) असो!
अवांतराबद्दल क्षमस्व!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 Oct 2010 - 7:39 am | विश्वनाथ मेहेंदळे

काम फ्रेडीने केले असले तरीही ती (code/document/other artifacts) बौद्धिक संपदा (Intellectual property) कंपनीची असते. अनेकदा तर कंपनीची साधनसामग्री वापरून हे काम केलेले असते. त्यामुळे ते काम नवीन माणसाला नीट समजावून सांगणे ही फ्रेडीची नैतिक जबाबदारी असते. त्यातून जाताना KT देणे हे फ्रेडीच्या लीगल contract चा भाग असणार. (इथे फ्रेडी म्हणजे सोडून जाणारा कुणीही माणूस)

कानडाऊ योगेशु's picture

12 Oct 2010 - 12:19 pm | कानडाऊ योगेशु

KT देणे म्हणजे स्किल्स ट्रान्स्फर करणे नव्हे.
फ्रेडी फक्त त्याने केलेल्या कामाबद्द्ल समजावुन सांगु शकतो. त्याचा वैयक्तिक अनुभव ,त्याकरता त्याने वापरलेले स्किल्स,त्याचे इतर विकसित झालेले स्क्लिल्स ह्याबद्दलही त्याने सांगणे वा न सांगणे हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे.
उदा. मार्केटींग क्षेत्रात काम करणारा एखादा कंपनीतुन निघुन जाताना त्याच्या कालावधीत त्याने जमवलेली क्लायंट लिस्ट कंपनीला देवु शकतो पण त्याने ते क्लायंट कसे मिळविले (आणि ते कसे टिकवले!) ह्याबद्द्लची माहीती तो कदाचित देणार नाही.

रन्गराव's picture

12 Oct 2010 - 1:26 pm | रन्गराव

हा चांगला मुद्दा मांड्लात योगेश!

उपास's picture

12 Oct 2010 - 8:29 pm | उपास

सहमत..

रन्गराव's picture

12 Oct 2010 - 1:25 pm | रन्गराव

त्याला पूर्व कल्पना दिली नव्हती. Thats why those guys got २-3 months salary as golden handshake.

कानडाऊ योगेशु's picture

12 Oct 2010 - 12:09 pm | कानडाऊ योगेशु

रंगराव तुमचे चीप लेबरचे त्रांगडे काही सुटणार नाहीय असे दिसतेय.
समजा फ्रेडीबरोबरच तुम्हालाही कंपनीने "रंगराव तुम्हालाही पगार देणे कंपनीला परवडत नाही आहे हो?" म्हणुन पिंक स्लिप दिली असती तर तुमची प्रतिक्रिय नक्की काय झाली असती?
स्वतः ही चीप नसल्याचा अभिमान वाटला असता का नोकरी गेल्याचे दु:ख?

रन्गराव's picture

12 Oct 2010 - 1:30 pm | रन्गराव

तुमी लै फास्ट पळताय राव. जर दम काढा. नाहितर राहिलेले भागपण तुम्हिच लिहून संपवा! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

12 Oct 2010 - 1:26 pm | परिकथेतील राजकुमार

मला उगाचच इतके दिवस तुम्ही फक्त मराठीवरच अत्याचार करता असे वाटत होते.

रन्गराव's picture

12 Oct 2010 - 1:28 pm | रन्गराव

आयला. आता काय घोड मारल!

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Oct 2010 - 1:55 pm | llपुण्याचे पेशवेll

ते शेवटचे 'आ'कार आहेत ना ते 'अ'कारात घ्या म्हणजे तुमच्या लिखाणातले मराठी जरा आकारात येईल.
झालंच तर इंग्रजी -हिंदी संभाषण त्यातले तांत्रिक शब्द तसेच इंग्रजीत ठेऊन मराठीत भाषांतरित केले तरी चालतील.
-(मराठी) पेशवे

रन्गराव's picture

12 Oct 2010 - 1:57 pm | रन्गराव

प्रयत्न करतो! :)