आणखी एक मिपाप निती कथा.
पुर्वी इसापाने जंगलमधले प्राणी पाहून इसाप निती कथा लिहील्या. मिपा नावाच्या ह्या तळ्यात किंवा मळ्यात (काय म्हणायच ते म्हणा) अनेक चित्रविचित्र प्राणी आहेत. स्वभावाप्रमाणे नावे वापरून जरी ते वावरायचा आव आणीत असले, तरी पुष्कळदा निळा रंग धूवून निघाल्यानंतर खरा कोल्हा उघडा पडला, तसेही होत असते.
हे प्राणी अवलोकन करीत अनेक साधु-महात्मे, नाना अवलिया ह्या जंगलात स्वैर फिरत असतात.
जंगलातील एका तळ्यात बुडी मारली तेव्हा, अशाच एका महान पुरुषा (ओह. सॉरी. सत् लावायला विसरलो) बरोबर खालील संवाद होण्याचे भाग्य प्रप्त झाले.
>>>>>>सुसर- काही माशांना मारता यावे म्हणुन सुसरी सशांशी दोस्ती करतात.<<<
>>>ससा- क्या बात है नाना! ससा आणि सुसर एक नवीन मिपाप निती कथा बनवू चला. कथाके लिये साला कुछभी करेंगा. ससुरा ससा सुसरसेभी सांस लेना सिखेंगा!<<<
इसापाने एकट्यानेच सगळ्या कथा लिहील्या होत्या. आपण मिपा तळ्या भोवती बसून सुसरीची सुरस कथा बनवू या कां?
तर जंगल् वासी, जलचर, निशाचरांनो (निशाचर- अमेरिकेत रहाणारे) प्रतिसादांमधून ही मिपाप निती कथा पुढे न्या. प्रत्येक प्राणी फक्त मागच्या प्रतिसादामधून कथा पुढे नेईल. खून खराबा, दंगा-मस्ती, छुरीयां चलाना सब चलेगा. पण कृपया कथे पुरतेच ठेवा. वैयक्तिक आवडनिवड, गुण-दोष ह्यांची चर्चा नको. म्हणजेच, दुसर् या शब्दात, कोल्ह्याचा निळा रंग धुवू नका.
बाकी संपादकांची फलटण समर्थ आहेच म्हणा. (अवांतर- नाहीतरी इतक्या प्रचंड संख्येत असलेल्या संपादकांना काही काम नको का? ;) )
चलो ह्हो ज्जाये!
मिपाप निती कथा- २
ससा सुसर आणि ससाणा-
एका निबीड अरण्यात एक विशाल तळे होते. तळे इतके खोल होते, की मी मी म्हणणार् यांना तळाचा थांगपता लागत नसे. एक विनयशील, हळूवार वगैरे असणारा ससा तळ्याच्या काठावर बसून खूप असुयेने आत खोलवर पोहणार् या जलचरांकडे बघत बसायचा. पण आत उडी घ्यायची त्याला फार भिती वाटायची. कारण बरेचदा, पाण्यावर खळबळ माजलेली त्याने पाहिली होती. त्यावेळेस पाणी शांत व्हायचे तेव्हा रक्ताळलेले मासांचे तुकडे आणि त्यावर तुटून पडलेले छोटे मोठे मासे त्याने पाहिले होते.
असाच एकदा तो बसला असतांना एक सुसर तेथे आली.......
प्रतिक्रिया
6 Jul 2010 - 1:09 pm | अवलिया
असाच एकदा तो बसला असतांना एक सुसर तेथे आली.......
सुसर सशाला म्हणाली घाबरु नकोस मी आहे. सुसरीने सशाला आश्वासन दिल्यावर सशाने आत उडी मारायची ठरवले. सुसरीने त्याच्या पाठीवर हात टाकुन त्याला आश्वासन देतांना रक्त लावुन ठेवले होते. ससा पाण्यात गेला. पोहायला लागला. रक्ताच्या वासाने काही छोटे मोठे गोचीड. जळवा वगैरे प्राणी जमा व्हायला लागले. त्यांना पाहुन मासे जमायला लागले. ससा कधी पाण्यात कधी वर लाटांवर तरंगत असतांनाच त्याच्यामागे काही मासे पाहुन ससाण्याची नजर त्यांच्यावर पडली.
चालु द्या आता पुढे तुम्ही...
--अवलिया
लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार ||
"ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||
6 Jul 2010 - 1:21 pm | II विकास II
लाटांवर तरंगत असतांनाच त्याच्यामागे काही मासे पाहुन ससाण्याची नजर त्यांच्यावर पडली.
== मग सुसरीने आपले नेहमी मित्र मासे सश्यावर सोडले, ते सश्याला नाहक त्रास देउ लागले. ससा सुसरीकडे गेला तक्रार घेउन, सुसरीने त्या मित्रमाश्यांना डोळा मारला.
6 Jul 2010 - 5:33 pm | शानबा५१२
े.
सुसरीकडे बघुन मासे फार लाजले व बिळात जाउन लपले.ससा पकुन वरती आला व जंगलात निघुन गेला.ससुरी पण पकली व बिळात की कुठे तरी गेली.................गोष्ट संपली ...............चला.......नेक्स्ट!!
विषयांतर : सुसरी म्हणजे काय??? दीवाळीतल्या फटाक्याचे नाव वाटत!
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
6 Jul 2010 - 8:19 pm | शुचि
सुसर सशाला म्हणाली "तो दूर ससाणा पाहीलास का तुझा घास करायला टपून बसलेला? चल माझ्याबरोबर तळ्यात लपायला. तिथे खूप जागा आहे लपायला."
ससा सुसरीला म्हणाला "माझ्या आईनी मला ससाण्यापासून कसा बचाव करयचा त्याचं तंत्र शिकवलं आहे पण तळं नवीन आहे, तिथले धोके नवीन :( "
सुसर मृदू आवाजात म्हणाली "मी तुझं रक्षण करीन. मी शक्तीशाली आहे."
मूर्ख सशाने ससाण्यापासून स्वतःचा बचाव करण्याची जबाबदारी टाळली. तो सुसरीवर विसंबला.तळ्याच्या मध्यभागी सुसरीनी सशाचा घास घेतला.
बोध - स्वतःची जबाबदारी दुसर्यावर टाकू नये.
6 Jul 2010 - 10:23 pm | टारझन
ह्यावरुन मी फार पुर्वी लिहीलेली खास एक कथा आठवली आहे :) पुन्हा देण्याचा मोह काही आवरत नाही :)
एका जंगलात शेरखान अगदी जंगलाचा मालक असल्याच्या दिमाखात वावरायचा .. शक्यतो त्याचे विश्वासु प्राणी जे त्याला कधीतरी भेटायचे ते सोडले तर शेरखान तसा एकटाच ... त्या जंगलात बाकी सगळे प्राणी अगदी गुण्या गोविंदाने राहात असत. पण काड्यासारुपणा मुळे एका तरसा शी कोणी सरळ बोलत नसे (बर्याचदा तरस आला की तिरक्या लायनीत असलेले प्राणी आपापल्या वाटेने निघुन जात :) तरस एकटाच उरे... तर असा हा तरस एकदा तरसुन शेरखान च्या गुहेत गेला ... शेरखानही एकटाच होता ... त्याला कोणीतरी रामलाल हवाच होता :) एकांतात रामलाल म्हणजे एकदम विको टर्मर्रीक मल्टिपर्पज क्रिम पेक्षाही जास्त उपयोगी :) तरसाला तसंही सौरक्षण म्हणुन शेरखानची गुहा बरी वाटत होती :) (नाही म्हंटलं तरी जंगलातल्या शेकडो प्राण्यांपेक्षा एकटा शेरखान बरा , असा उदात्त हेतु त्यापाठी होता) ह्म्म्म, पण काय झालं , एक कोल्हा गुहेबाहेर येऊन रोज मिर्या वाटुन जात असे , शेरखानला पार पॅनिक पॅनिक फिलींग यायचं , तरसाने हा प्रकार आठवडा भर पाहिला ... आणि न रहाऊन एकदा शेरखान ला म्हंटला कोण हा कोल्हा ? आणि तुमच्या सारख्या मात्तब्बराच्या गुहेसमोर मिर्या वाटतो म्हणजे काय ? शेरखान म्हंटला "लेका , काय बोलणार .. हा कोल्हा म्हणजे बायको चा भाऊ आणि ..... " वाक्य कापत तरस म्हंटला , "तुम्ही काळजी करु नका मी ह्याचा बंदोबस्त करतो :) " , शेरखान म्हंटला , "तुझीतुझीतुझी इच्छा " आणि झोपी गेला. थोड्या वेळाने कोल्हा आला , पुन्हा मिर्या वाटु लागला , तोच तरसाने त्याच्यादिशेने झेप घेतली ... कोल्हा ह्या क्षणाची वाटंच पहात होता . .. कोल्हा पटकन एका अरुंद आणि पोकळ ओंडक्यात जाऊन लपला... तरस ही त्याच्या मागे त्या ओंडक्यात घुसण्याचा प्रयत्न करु लागला , पण त्याचे केवळ कमरेपर्यंतच शरीर आत गेले , बाकी भाग बाहेरंच आडकला .... कोल्हा पटकन ओंडक्याच्या दुसर्या बाजुने बाहेर आला , तेंव्हा त्याच्या हातात चार बांबु होते ..............
तेंव्हा पासुन तरसाच्या मागे आणि पुढे दोन दोन बांबु लटकलेले दिसु लागले =))
- टारझन कोल्हे
6 Jul 2010 - 10:36 pm | jaypal
घाणेरड्या प्राण्याची आठवण करुन दिलीस रे. अतिशय किळसवाणा, लोचट, लंगडा आणि विचित्र आवाजाचा प्राणी मला अजिबात आवडत नाही.
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
7 Jul 2010 - 12:40 pm | विजुभाऊ
तळ्याच्या मध्यभागी सुसरीनी सशाचा घास घेतला.
सुसरीला वाटले की गोष्ट इथेच पूर्ण झाली. पण सशाकडे एक वरदान होते. त्याला कधीही कोणत्याही रूपात प्रकट होण्याची विद्या अवगत होती असे सशाला वाटायचे. सुसरीने घास घेतल्यानन्तर सशाने सुसरीच्या पोटातली सगळी माहिती मिळवली .
एक दिवस ससा असा एका आगळ्या वेगळ्या रुपात सुसरीच्या पोटातुन बाहेर आला.