काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय.....
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय.....
मी त्याला पहिल्यांदा भेटलो २०११ साली, याच दिवशी. जनार्दन, बेजबाबदारपणाचं दुसरं नाव होता तो. फार उनाड. घर व्यवस्थित भरलेलं होतं, घरचा व्यवसाय मोठे भाऊ सांभाळत होते, तशी याच्यावर जवाबदारी नव्हती कसलीच. सकाळी सकाळी कॉलेजमध्ये जायचं, टवाळकी करायची, मित्रांच्या गराड्यात रमायचं हेच काय ते काम. तो गिटार मात्र फार छान वाजवायचा. (आयुष्यात अर्धवट सोडलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याला बघून मीही गिटार शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.) त्याचा आवाजही छान होता, वेगळ्या धाटणीचा. पण काही केल्या आयुष्यातील कला बहरत नाही अशी तक्रार होती त्याची.
अति मधुर मधुर..
-गाणी ऐकायची सवय फार जुनी ।
एकोणीसशेसाठ ते सत्तर,चे दशकाच्या आसपासचा,पन्नास।साठ वर्षापूर्वी चा काळ । ।हा काळ ,हिंदी चित्रपटांचा
सांगितिक सुवर्णयुग मानले जाते।
त्या काळातअनेकसंगीतकार ,गायक,
गायिका ,गीतकार यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने , गीत संगीताचे जे अक्षर,अतुट.अतुलनीय,रेशमी ,मधुर ,मायाजाल विणले आहे,
त्याच्या बंधनामध्ये अजुनहीसंगीत प्रेमी गुंतलेले ,आहेत।बाहेर यायला तयार नाहीत।
आपल्या आयुष्यातले अनेक क्षण ,
त्या अविस्मरणीय गाण्यांनी भारुन टाकलेे सुख दु:खाच्या प्रसंगात
सोबत केली ।
एक तरी गज़ल अनुभवावी # ०३
गाणं हा शांतता आणि ध्वनी यातला प्रणय आहे. शांतता ही स्त्री प्रकृती आहे आणि ध्वनी पुरुष आहे. तुम्ही जीवनात गाणं आणलंत तर हा रोमान्स अविरत चालू शकतो. आशा भोसले म्हणते की गाणं ही फक्त शब्दाचा ध्वनी करण्याची कला आहे. जनमानसात एक दृढ गैरसमज आहे की गाणं ही अवघड कला आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या आवजात गोडवा नाही. या लेखाचं प्रयोजन असं की कोणतंही शास्त्रीय संगीत किंवा गाण्याचं फॉर्मल ट्रेनिंग न घेता, तुम्ही सुद्धा सुरेख गाऊ शकता. तुमच्याकडे एकमेव गोष्ट हवी ती म्हणजे रोमँटीक मूड ! हा रोमँटीक मूड तुमच्या जीवनाचा सगळा रंगच बदलून टाकतो.
या आधीचे भाग
एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना
___________________________________________________________________________________________________________________________
हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है
इश्क़ ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया
वर्ना हम भी आदमी थे काम के
इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब'
कि लगाए न लगे और बुझाए न बने
गज़ल (मराठीत गझल?) आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय ... जणू मर्मबंधातली ठेव ही .... पण एकदम कोणीच गज़ल ऐकायला जात नाही.
आपल्या संगीत जीवनाची (कानसेन म्हणून ... तानसेन नव्हे ) सुरवात होते ती सिनेसंगीताने. त्यावेळी प्रमुख दोन प्रकार असतात .. फिल्मी आणि गैरफिल्मी.
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ
शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा
खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा
सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध
धुंद संगीताचा मंद आवाज
"गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी"
बोला आणखी काय हवं?
आज राजन नागेन्द्रा जोडीतले राजन निर्वतले अशी बातमी आहे. त्या आधी एस पी बालासुब्रह्मण्यम गेले. स्वर्गात असा काय अचानक दुष्काळ पडला आहे की सुमधूर गाण्यांनी कान तृप्त करणारे हे स्वर्गिय लोक देव वर घेऊन चालला आहे.
श्रीपति पंडिताराध्युला बालसुब्रहमण्यम् अर्थात एस. पी. बालसुब्रहमण्यम् यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नईत निधन झाले.
सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक म्हणून सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि गायनक्षेत्रातले विविध पुरस्कार मिळवलेले , ४० हजारहून अधिक गाणी गायलेले गायक आणि अभिनेते म्हणून प्रामुख्याने ते आपल्याला माहित आहेत. हिंदी,संस्कृतसह दक्षिणेच्या चारही राज्यभाषांमधे त्यांनी गाणी गायली आहेत.
त्यांनी गायलेली अवीट गाणी आपल्या सर्वांना नेहमीच आनंद देत राहतील.