रोमान्स विथ मुझिक

Primary tabs

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
25 Oct 2020 - 11:05 pm

गाणं हा शांतता आणि ध्वनी यातला प्रणय आहे. शांतता ही स्त्री प्रकृती आहे आणि ध्वनी पुरुष आहे. तुम्ही जीवनात गाणं आणलंत तर हा रोमान्स अविरत चालू शकतो. आशा भोसले म्हणते की गाणं ही फक्त शब्दाचा ध्वनी करण्याची कला आहे. जनमानसात एक दृढ गैरसमज आहे की गाणं ही अवघड कला आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या आवजात गोडवा नाही. या लेखाचं प्रयोजन असं की कोणतंही शास्त्रीय संगीत किंवा गाण्याचं फॉर्मल ट्रेनिंग न घेता, तुम्ही सुद्धा सुरेख गाऊ शकता. तुमच्याकडे एकमेव गोष्ट हवी ती म्हणजे रोमँटीक मूड ! हा रोमँटीक मूड तुमच्या जीवनाचा सगळा रंगच बदलून टाकतो. आवजातला गोडवा, ताल-सुराचं ज्ञान, शब्दांवर टाकायचं नेमकं वजन तुम्हाला यथावकाश आपसूक जमायला लागतात.

१. अँड्रॉइड तानपुरा हे फ्री अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन मोबाईलवर डाऊनलोड करा. त्यातला तानपुरा काळी एक किंवा तुम्हाला हा शब्द स्वरासारखा सहज उच्चारता येईल त्या स्केलला सेट करा. नाऊ यू आर ऑल सेट !

२. तुम्हाला फक्त ही सात व्यंजनं तानपुर्‍यात सेट केलेल्या ध्वनीशी जुळवायची आहेत :

>,
>,
> ,
> ,
> इ (ई),
> उ (ऊ),
> अं

कोणत्याही शांतवेळी हेडफोन लावा, सेट केलेला तानपुरा चालू करा आणि ही व्यंजनं स्वरासारखी म्हणून तानपुर्‍याच्या ध्वनीशी जुळवत म्हणा. तानपुर्‍याचा ध्वनी आणि तुमचं उच्चारण यांचा रेझोनन्स मॅच करत जा. नी सुरुवात करा. डोळे बंद ठेवा म्हणजे अवधान एकाग्र होईल आणि तुम्हाला रेझोनन्सचा नेमका फिल येईल.

पहिला स्वर जुळता क्षणी तुम्हाला कमालीचा आनंद होईल. गाणं म्हणजे फक्त उच्चारणाला किती जोर लावायचा याचं भान आहे. या भानाचा नेमका अंदाज नसल्यानं आपला स्वर बेसूर होतो इतकाच काय तो सुरांचा फंडा आहे.

वर सांगितलेली सर्व व्यंजनं शांतपणे तानपुर्‍याच्या ध्वनीच्या रेझोनन्सशी जुळवत म्हणत रहा. हा अत्यंत बेसिक रियाज़ आहे. त्यानं तुम्हाला उच्चारणाला लावायच्या जोराचं नेमकं भान येईल. एकदा हे जमलं की तुमची निम्मी तयारी झाली.

३. आता तुमच्या आवडीचं कोणतंही एक (आणि फक्त एकच) गाणं घ्या. सुरुवातीला एकच गाणं सिलेक्ट करणं आगत्याचं आहे कारण मनाची धरसोड वृत्ती प्रचंड आहे. हे जमत नाही की ते असं करत मनाच्या मागे गेलात तर सगळा प्रोजेक्टच फेल होईल.

त्या गाण्याची लिरिक्स गीतमंजूषा या साइट वरुन डाऊनलोड करा; म्हणजे लिरिक्सचा सरळ स्क्रीन शॉट घ्या.

गाण्यावर प्रेम याचा अर्थ गाण्याच्या शब्दांनी तुम्हाला मोह घातला आहे. तुम्हाला गाण्याची लिरिक्स पाठ आहेत आणि चाल तुम्हाला पक्की माहिती आहे. तुमची चाल इतकी पक्की आहे की लिरिक्सचा स्क्रीन शॉट समोर असेल तर तुम्ही ते गाणं सरळ चालीत म्हणू शकाल.

गाणं तालात हुकण्याची फक्त दोनच कारणं आहेत. एक, लिरिक्स पाठ नसणं आणि दोन, चाल पक्की नसणं. यापरता तालात चूक होण्याचं तिसरं कारण जगात नाही.

४. आता तुम्हाला फक्त गाण्याच्या शब्दांचे स्वर करायचे आहेत की यू आर ऑलमोस्ट डन ! ते काम विशेष अवघड नाही, कसं ते पाहा:

आया है मुझे फिर याद वो जालीम हे गाण्याचे शब्द आहेत. आता प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षराच्या उच्चारणात (किवा एखादं अक्षर चालीत लांबवलं असेल तर त्या अक्षराच्या उच्चारणात) वरच्या पैकी कोणतं तरी एक व्यंजन आहे, तेवढं शोधलं की त्या शब्दाचा स्वर होतो; असा :

आया (आ आ आ) है () मुझे.. (ऐ ऐ ऐ) फिर () या...(आ,आ,आ) ( ) वो () जा()लि(अं)

एकदा तुम्हाला ही शब्दाचा स्वर करायची कॢप्ती जमली की तुमच्या आवजातला गोडवा तुम्हाला जाणवायला लागेल.

हे काम तुम्हाल सगळ्या गाण्यातल्या तीन प्रकारच्या अक्षरांवर करायचं आहे :

अ) शब्दातलं शेवटचं अक्षर
ब) चालीत लांबवलेलं अक्षर
क) चालीत ठहराव असलेलं अक्षर

आता तुम्ही ठेक्यात गायला तयार झालात !

५. स्म्यूल सोशल सिंगींग अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा. हे अत्यंत उत्तम कराओके अ‍ॅप, १५० रुपयात वर्षभरासाठी उपलब्ध आहे (केवळ करोनामुळे !)

आता रिदमचा एकमेव फंडा आहे, इअर फोन्स चढवल्यावर ठेका तुम्हाला मेंदूच्या बरोबर मधे (म्हणजे नाकाच्या इग्झॅक्ट मागे) ऐकू यायला हवा. आणि तो संपूर्ण गाण्यात तिथून हालता कामा नये.

आता इअर फोन लावा, तुमचं आवडतं गाणं स्म्यूलवर सुरु करा आणि फक्त एकच प्रॅक्टीस करा, ठेका बरोबर मेंदूच्या मध्यभागी ऐकू यायला हवा. जोपर्यंत ठेका सेंटर होत नाही तोपर्यंत गाणं अजिबात म्हणू नका.

एकदा ठेका सेंटर झाला की गाणं तुमच्या आतून आपोआप सुरु होईल !

डोळे बंद करुन ठेका ऐकत गाणं म्हणा. लिरिक्स समोर डिस्प्ले होतीलच पण त्यांचा फक्त अंदाज़ घेऊन, पुन्हा तालाबरोबर चाल जुळवा कारण लिरिक्स तुम्हाला पाठ आहेत आणि चाल तुम्हाला माहिती आहे.

तिथं पॉज, रिज्युम (असाल तिथून पुन्हा सुरुवात) आणि रिस्टार्ट (पुन्हा पहिल्यापासून) अशा तीन्ही सोयी आहेत. गाणं संपल्यावर ते पब्लिक करुन (ते तिथे तुमच्याच चॅनेलवर रहातं, कुणी काही ऐकत-बिकत नाही); सेव करा.

साधारण आठ-दहा दिवसात तुमच्या जीवनात सांगितिक रोमान्स सुरु होईल आणि ....... मग तो तुमची जन्मभर संगत करेल.

___________________________________________

लेखात सांगितलेलं गाणं तुमच्यासाठी इथे डेमो म्हणून अपलोड केलंय :

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Oct 2020 - 11:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

गीतगायन तुम्ही म्हणता तेवढे सोपे नाही हे तुम्हीच इथे क्लिप डकवून सिद्ध केलेत,

कॉपी करण्या साठी सुद्धा लिहिता वाचता यावेच लागते, गाण्याचे पण तसेच आहे, लोक आयुष्य खर्च करतात, तेव्हा एखादा कोणी भीमसेन होतो, कोणीही उठून गाणे म्हणू शकत नाही, त्यामुळे गाता येत नसेल तर ऐकण्याचा आनंद घ्यावा, त्यातही भारी मजा आहे,
आमच्या सोसायटीच्या चेअरमानलाही वाटते की पुढच्या निवडणुकीत नरेंद्र मोदीं ना आपण हरवू शकतो,

हा बाथरूम सिंगिंग वेगळे, त्यातही आनंद असतोच,

पैजारबुवा,

व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही छंदाची कधीही सुरुवात का होऊ शकत नाही या मानसिकतेचं उत्तम उदाहरण आहे. धावायचं म्हटलं की डायरेक्ट युसेन बोल्टशी तुलना करायची आणि हातपाय गाळून बसायचं असा प्रकार होतो.

बाथरुम सिंगींग आणि कराओके सिंगींगमधे कमालीचा फरक आहे कराओके सिंगींग मधली मजा त्यात नाही. पण गाण्यासाठी आपल्याला जन्म घालवावा लागेल अशी धरणा करुन घेतली की बाथरुममधेही गायची लाज वाटेल.

तुमच्या प्रतिसादामुळे ज्यांना थोडं फार तरी गायची इच्छा आहे असे लोक हतोत्साह होऊ नयेत म्हणून प्रतिसाद दिला.

चिगो's picture

27 Oct 2020 - 5:04 pm | चिगो

प्रयत्न चांगला आहे संक्षीचा गाण्याचा, पण म्हणून उगाच 'सारेगमपधनीसा' ऐवजी 'अ'ची बाराखडी देऊन आपण काहीतरी नवीन विचार देतोय असा आव आणलाय. बाकी गाणं गाण्यासाठी फक्त गाण्यांवर प्रेम हवं आणि स्वतःच्या सुखाला/ आनंदाला गौण मानण्याची वृत्ती नसावी. उगाच 'परफेक्शन'च्या शंकेने दबून जायचीपण गरज नाहीये.आवाजाच्या प्रतीपेक्षा/ गोडव्यापेक्षा (इथे मला बहुतेकांना आवडणारा किनरा स्वर अभिप्रेत आहे) सुरा-स्वरांवरच्या प्रेमाची आणि त्याचा आनंद घेण्याची गरज आहे.

संक्षी, माझं प्रामाणिक मत द्यायचं झाल्यास, तुम्ही लेखात लिहीलेला भाव तुमच्या गाण्यात जाणवत नाहीये. तुम्ही सानुनासिक गायचा प्रयत्न करताय, असं मला वाटलं (तुमचा आवाज तसा नसेल तर).. मुळ गायकाने मोकळ्या गळ्याने गायलेलं एखादं गाणं ('पुकारता चला हुं मैं' पासून 'मन भरया' पर्यंत कुठलंही चालेल) ह्या प्लॅटफॉर्मवर टाका, मग ह्यावर जास्त बोलता येईल. स्वच्छंदपणे गात रहा, ह्याच शुभेच्छा..

मन की बातां : च्यायला.. मनमोकळेपणाने गावं, ह्यावरपण लेख यायला लागावेत ह्यापरतं दु:ख नाही. काय चाललंय जगात?

संजय क्षीरसागर's picture

27 Oct 2020 - 8:01 pm | संजय क्षीरसागर

थोडे गैरसमज दूर करतो :

१.

उगाच 'सारेगमपधनीसा' ऐवजी 'अ'ची बाराखडी देऊन आपण काहीतरी नवीन विचार देतोय असा आव आणलाय .

अजिबात नाही ! दिलेल्या व्यंजनांचा सरगमशी काहीएक संबंध नाही. सरगम असेंडींग आणि डिसेंडींग आहे. पोस्टमधे दिलेलं ऐकेक व्यंजन फार विचार करुन निवडलेलं आहे आणि गाण्यातला एकही शब्द (एंड नोट, विस्तार, ठहरावं) या पलिकडे जाऊ शकत नाही.

तुम्ही तो सराव केल्यावर तुमच्या लक्षात येईल.

२.

तुम्ही सानुनासिक गायचा प्रयत्न करताय, असं मला वाटलं (तुमचा आवाज तसा नसेल तर).. मुळ गायकाने मोकळ्या गळ्याने गायलेलं एखादं गाणं ('पुकारता चला हुं मैं' पासून 'मन भरया' पर्यंत कुठलंही चालेल) ह्या प्लॅटफॉर्मवर टाका, मग ह्यावर जास्त बोलता येईल.

गेली काही वर्ष नेझल पॉलीपमुळे एक नॉस्ट्रील ऑलमोस्ट बंद आहे. पॉलीपची आणखी एक भानगड म्हणजे तोंडानी ब्रिदींग होत असल्यानं घसा ड्राय होत जातो. अशा स्थितीत गाणं म्हणणं तर सोडा साधा गाण्याचा विचार सुद्धा मनात येत नाही. सर्जरी करायची नाही यावर ठाम असल्यानं उपायानां यश यायला थोडा अवधी लागेल; पण लक्षणीय प्रगती आहे. यथावकाश जसा नेझल पॅसेज मोकळा होईल आणि घसा नॉर्मलला येईल तसा आवाज मोकळा होईल.

३.

स्वच्छंदपणे गात रहा, ह्याच शुभेच्छा..

मनःपूर्वक धन्यवाद ! आणि तुम्हीही एखादं गाणं इथे टाकून, पोस्टचा हेतू सार्थक करल अशी आशा.

गेली काही वर्ष नेझल पॉलीपमुळे एक नॉस्ट्रील ऑलमोस्ट बंद आहे. पॉलीपची आणखी एक भानगड म्हणजे तोंडानी ब्रिदींग होत असल्यानं घसा ड्राय होत जातो. अशा स्थितीत गाणं म्हणणं तर सोडा साधा गाण्याचा विचार सुद्धा मनात येत नाही. सर्जरी करायची नाही यावर ठाम असल्यानं उपायानां यश यायला थोडा अवधी लागेल; पण लक्षणीय प्रगती आहे. यथावकाश जसा नेझल पॅसेज मोकळा होईल आणि घसा नॉर्मलला येईल तसा आवाज मोकळा होईल.

सॉरी, ह्याबद्दल अर्थातच कल्पना नव्हती. तुमचा नेझल पॅसेज आणि गळा लवकरात लवकर बरा आणि मोकळा व्हावा, ही सदिच्छा..

आणि तुम्हीही एखादं गाणं इथे टाकून, पोस्टचा हेतू सार्थक करल अशी आशा.

बघूयात.. जनरली मला सोशल मिडीयावर (त्यात मिपापण आलं) कलाकारी करायला आवडत नाही. कधी कट्ट्यावर किंवा इतर ठिकाणी भेटलो, तर बघूयात..

दिलेल्या व्यंजनांचा सरगमशी काहीएक संबंध नाही. सरगम असेंडींग आणि डिसेंडींग आहे. पोस्टमधे दिलेलं ऐकेक व्यंजन फार विचार करुन निवडलेलं आहे आणि गाण्यातला एकही शब्द (एंड नोट, विस्तार, ठहरावं) या पलिकडे जाऊ शकत नाही.

उच्चारुन बघितलं थोडं जोरात, पण अजून पटत नाहीये. प्रयत्न करतो पटत का ते बघण्याचा.. एनी वे, माझा ठहराव आणि आरोह-अवरोहबद्दल फार इश्यु नसल्याने काही खास प्रॉब्लेम नाहीये. जनरली ऐकलेल्या गाण्याबरहुकूम गाण्याचा प्रयत्न करतो. स्वांतसुखाय गात असल्याने इतरांचे कान किटले, तर तो त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही.. ;-)

संजय क्षीरसागर's picture

28 Oct 2020 - 4:54 pm | संजय क्षीरसागर

१.

उच्चारुन बघितलं थोडं जोरात, पण अजून पटत नाहीये. प्रयत्न करतो पटत का ते बघण्याचा.. एनी वे, माझा ठहराव आणि आरोह-अवरोहबद्दल फार इश्यु नसल्याने काही खास प्रॉब्लेम नाहीये

सरगममधे अलंकार, पलटे हा हमखास येणारा प्रकार पोस्टमधे दिलेल्या मेथडमधे नाही, त्यामुळे ती सोपी आहे. नक्की ट्राय करा, तुमचा तुम्हाला गाण्यातला फरक जाणवेल.

२.

जनरली मला सोशल मिडीयावर (त्यात मिपापण आलं) कलाकारी करायला आवडत नाही. कधी कट्ट्यावर किंवा इतर ठिकाणी भेटलो, तर बघूयात..

सोशल मेडीया हा वर्च्युअल कट्टाच आहे. इथे गाणी टाकणं आणि लेख टाकणं काय किंवा कट्ट्यावर त्या गोष्टी प्रत्यक्षात करणं काय एकच. आनंद शेअर करण्यासाठी हा उत्तम फोरम आहे. बघा विचार करुन.

संजय क्षीरसागर's picture

31 Oct 2020 - 11:18 pm | संजय क्षीरसागर

पुकारता चला हूं मैं ..... यातलं तिसरं कडवं मूळ गाण्यात नाहीये.

गाणं अशासाठी अपलोड केलंय की स्म्यूलच्या भन्नाट कराओके क्वालिटीची तुम्हाला कल्पना यावी.

मराठी_माणूस's picture

1 Nov 2020 - 10:28 am | मराठी_माणूस

तिसरं कडवं कुठे मिळाले ?

संजय क्षीरसागर's picture

1 Nov 2020 - 11:24 am | संजय क्षीरसागर

पण कधीही ऐकलं नसल्यानं गातांना मजा आली.

कळस म्हणतात तसं नाही याची ही प्रचिती !

गाणं मेंदूत अजिबात चालू नसलं तरंच तुम्ही ते आपलंसं करुन, तुमचं गाणं म्हणून गाऊ शकता. या कडव्याला प्रिसिडन्स नव्हता त्यामुळे ते स्वतःच्या स्टाईलनी (अर्थात, चालीचं भान ठेवून) म्हणायची संधी मिळाली.

थोडक्यात काय तर, तुमची लिरिक्स पाठ हवीत, चाल पक्की हवी... आणि ठेका मेंदूत सेंटर केला की गाणं सुरु ! मग ती तुमची तीन मिनीटांची एक छोटीशी मैफिल होते. गाणारा आणि ऐकणारा समरुप होतो, तिथे कुणीही उरत नाही, फक्त गाणं सुरु रहातं याला सीमलेस सिंगींग म्हणतात, स्वरांचा एक सलग प्रवाह; माझ्या गाण्यात तुम्हाला तो अनुभव येईल.

मराठी_माणूस's picture

1 Nov 2020 - 11:39 am | मराठी_माणूस

मस्त

चिगो's picture

3 Nov 2020 - 1:38 pm | चिगो

फर्माईश पुर्ण केल्याबद्दल धन्यवाद, संक्षी..

संजय क्षीरसागर's picture

3 Nov 2020 - 5:52 pm | संजय क्षीरसागर

या मूडमधे पूर्ण उतरलात तर आख्खं गाणं तुम्ही स्वतःच्या रोमॅंटिसिजमची अभिव्यक्ती करु शकता. मग ते सर्वस्वी तुमचं गाणं होतं.

यातली २ कडवी लिहून झालीत, शेवटचं झाली की एकवीन. तो नशा पण काही और आहे !

पुकारता चला हूँ मैं

मैं कहाँ हूँ इक तेरी ही चाह है
दिल नही है बस तेरा खयाल है,
जरा तू दे दे अपना हाथ हाथमें,
कहेगी जिंदगीके रंग भी कमाल है I १ I

ये फुल है के हुस्न तेरा हर तरफ,
हवा है ये की पहुंची तूही रुह तक,
ये इश्क क्या नशा है पी के देखले,
न मैं रहूँ न तू रहे, ना कोई फासले I

फक्त एकच प्रॅक्टीस करा, ठेका बरोबर मेंदूच्या मध्यभागी ऐकू यायला हवा.

ही आयडीया फारच भारी आणि उपयोगी आहे. 👍

- (बाथरूम सिंगर) सोकाजी

ज्ञापैंच्या मार्गानं जायचं तर उभा जन्म ताल शिकण्यातच जाईल. इन फॅक्ट जगातले कित्येक सुरेल आवाज केवळ तालाची समज नाही म्हणून बाद झालेत.

ताल हा खरं तर विक्षेप आहे. तो सतत गायकाचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतो आणि एकदा तालाकडे लक्ष गेलं की सूर हुकतो ! तालाला बंदिस्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो मेंदूत सेंटर करणं ! मग तो कोणताही ताल असू दे. हा इतका अफलातून उपाय आहे की बोलता सोय नाही.

यानं दोन्ही साधतं, (१) विक्षेप करणारा तालंच तुम्हाला सेंटर्ड करतो आणि (२) तुम्हाला नेमकं कोणत्या शब्दावर किती वजन टाकायचं ते कळतं.

तालाशी रोमान्स करायच्या फक्त दोनच पद्धती आहेत : ऑफ बीट आणि ऑन बीट. ऑफ बीट म्हणजे शब्द बीट पूर्वी किंवा नंतर येतो आणि ऑन बीट म्हणजे प्रत्येक शब्द बीटवर येतो. जसा तुमचा ताल सेंटर करण्याचा सराव वाढत जाईल तशी ही कला पण तुम्हाला अवगत होईल.

छान सुरमयी माहिती आहे.

संजय क्षीरसागर's picture

26 Oct 2020 - 10:47 am | संजय क्षीरसागर

लोकांच्या जीवनात गाणं यावं अशी माझी कामना आहे !

आपण गाऊ शकत नाही याचं एकमेव कारण म्हणजे आपला आवाज आपल्याला आवडत नाही. जर तुमचं गाणं ऐकायला तुम्हीच राजी नसाल तर तुमच्या जीवनात संगीत केवळ ऐकण्यापुरतं मर्यादित राहिल. तुम्ही कधीही स्वतःचं गाणं म्हणू शकणार नाही. हा मानवी मनाचा एक मोठा पॅरडॉक्स आहे. जे कुणी महान गायक होऊन गेले किंवा आहेत त्यांना फक्त एकच गोष्ट साधली की त्यांनी स्वतःचं गाणं ऐकायला सुरुवात केली !

इतर कुणीही असता तरी पोस्टवर आलेल्या पहिल्याच प्रतिसादानं तो इतका खचला असता की त्यानं प्रशासनाला ही पोस्टच निस्सरित करायला सांगितली असती आणि त्याच्या जीवनातलं गाणं कायमचं संपलं असतं !

पण पोस्ट इतकी नामी आहे की ती प्रत्येकाला स्वतःचं गाणं ऐकायचा मोह पाडेल आणि पोस्टमधे शब्दप्रधान गायकीचे सर्व पैलू इतक्या खुमारीनं साधलेत की तुम्हीही गायला लागाल आणि आनंदाचं एक अनंत आकाश तुम्हाला खुलं होईल.

मराठी_माणूस's picture

26 Oct 2020 - 9:59 am | मराठी_माणूस

मस्त

तशी ही पोस्ट बहरत जाईल. आपणही गाऊन पाहू असा मोह प्रत्येकाला व्हावा यासाठी ही पोस्ट आहे.

गाणं किती सोपं आणि सहज आहे हे सांगण्याचा हा एक दिलकश प्रयत्न आहे. तो यशस्वी झाला तर धागा अनेकांची गाणे इथे पोस्ट होऊन धागा उत्तरोत्तर बहरत जाईल.

तुम्हीही प्रयत्न करा.

मराठी_माणूस's picture

26 Oct 2020 - 11:52 am | मराठी_माणूस

मी बर्‍याच दिवसापासुन हे करत आहे. खुप आनंद मिळतो.

संजय क्षीरसागर's picture

26 Oct 2020 - 12:28 pm | संजय क्षीरसागर

कोणतं अ‍ॅप वापरता ? तुमच्या आवडत्या गाण्यांची लिस्ट द्याल का ?

तुम्ही ऑलरेडी गात आहात तर ही पोस्ट तुमचं गाणं आणखी असरदार बनवेल. तुमचा अनुभव नक्की लिहा.

मराठी_माणूस's picture

26 Oct 2020 - 2:08 pm | मराठी_माणूस

काही karaoke Tracks मेमरी कार्ड वर कॉपी केलेले आहेत. ते ऑफीस ला जातांना (चार चाकी मधे) म्हणत जायचो. एकतर आपण एकटेच असल्यामुळे संकोच वाटायचे काहीच कारण नव्हते. काचा बंद असल्यामुळे बाहेर आवाज जायचा नाही. रेकॉर्ड मात्र कधीच केले नाही.
९०% गाणी तलतची आहेत. ती गाणी फार आवडतात. त्या गाण्यांनी , शांततेचा अनुभव येतो.

संजय क्षीरसागर's picture

26 Oct 2020 - 2:42 pm | संजय क्षीरसागर

तुम्हाला इंटर-अ‍ॅक्टीव प्लॅटफॉर्म मिळतो. तुम्ही ड्युएट्स सुद्धा गाऊ शकता.

मिनी ऑपेरा ब्राऊजरमधे स्म्यूलची लिंक पेस्ट केली की तुमचं गाणं तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड होतं.

आपली गाणी ऐकायची मजा काही औरच आहे, त्यानं गाणं सुधारत जातं.

बघा प्रयत्न करुन.

अमर विश्वास's picture

26 Oct 2020 - 10:49 am | अमर विश्वास

तुमचा लेख आणि प्रतिसाद दोन्ही वाचले

मुळात बाथरूम सिंगर व्हायला सुरांची जाण नाही तर सर्व बंधन झुगारून बिनधास्त गायची वृत्ती लागते :)

बाकी सुरांचे (आणि तालाचे) ज्ञान (ज्ञान म्हणणं चुकीचं आहे ... ओळख) होण्यासाठी हार्मोनियम (पेटी किंवा सिन्थसायझरही चालेल) शिकावे ... त्यामुळे तानसेन नाही तरी कानसेन नक्की बनता येईल

संजय क्षीरसागर's picture

26 Oct 2020 - 11:16 am | संजय क्षीरसागर

आनंद झाला की पहिली गोष्ट काय होत असेल तर व्यक्ती गुणगुणायला लागते !

मानसशास्त्राचा कमालीचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलंय की या तीन स्टेप्स आहेत :

१. आनंदाचा अर्थ आपण स्वतःशी कनेक्ट झालोत.
२. गुणगुणायला लागणं याचा अर्थ असा की काही क्षण का होईना, मनाची अविरत बडबड थांबून त्याचं ध्वनीत रुपांतरण झालं आहे.
३. आनंद हरवण्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही गाणं गुणगुणत असतांना मनानं तुम्हाला पुन्हा सांगितलं की `अबे छपरी, लई झालं आता कामाला लाग ' !

तुम्ही पुन्हा मनाशी राजी झालात आणि स्वतःचं गाणं ऐकण्याची संधी गमावलीत !

सुरेख गाणी ऐकत रहा पण नुसते कानसेन होऊ नका. पॅसिविटी तुम्हाला परावलंबी करते. आपण रफी होऊ शकणार नाही याचं कारण रफी ग्रेट होता एवढंच नाही, तर त्यानं स्वतःच्या गाण्यावर प्रेम केलं. तुम्हीही स्वतःचं गाणं ऐकायला सुरुवात करा. आपण रफी होऊ शकत नाही या विचाराला फाटा मारा. मग तुमच्या लक्षात येईल की 'अरे, आपण सुद्धा गाण्यात एखादी वेगळी जागा घेऊ शकतो. आपल्या बरोबर गायला लता किंवा आशा असूच शकत नाही पण सोशल सिंगींग अ‍ॅपवर आपल्याला इन्वाइट पाठवणारी गायिका सुद्धा सुरेल आहेच की आणि तिच्या सुरात सूर मिसळून आपणही त्या आनंदात रमून जाऊ शकतो.

अमर विश्वास's picture

26 Oct 2020 - 11:38 am | अमर विश्वास

स्वतःचे गाणे ऐकायची एकही संधी गमावत नाही ... आवडलेली गाणी / कविता बिनधास्त गातो ... झेपेल त्या सुरात आणि जमेल त्या चालीवर ...

विशेषतः लॉन्ग ड्राईव्ह करत असताना (आणि एकटा असेल तर) रफी / किशोर च्या बरोबरीने जोरदार गातो
रफी कशाला काहीवेळा तर जसराजजी आणि रशीद खानलाही सोडत नाही

बाकी कानसेन होण्यातही मजा आहे ... रात्री शांततेत यमन सारखा एखादा ख्याल (भीमसेनजींचे "ऐरी आली पियाबिन" किंवा अजॉयजींचे "किनारे किनारे दारिया कश्ती बांधोरे" ) ऐकताना कानसेन असल्याचे सार्थक होते ...

संजय क्षीरसागर's picture

26 Oct 2020 - 12:09 pm | संजय क्षीरसागर

शास्त्रीय गायन हा अत्यंत वेगळा विषय आहे आणि ते गायला शक्यतो गुरु हवा. भीमसेन, जसराज, रशीद खान , (माझी अत्यंत आवडती ) मालिनी राजूरकर, कमालीचं मिस्टीकल गाणारे कुमार गंधर्व हे आपण फक्त ऐकू शकतो.

शब्दप्रधान गायकी हा सामान्यांच्या जीवनात गाणं यावं यासाठी झालेला एक सुरेल प्रयत्न आहे.

भीमसेनसारखा यमन आपण मैफिल जमवून गाऊ शकणार नाही पण इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदां ही यमनमधली सुरेख ट्यून एखाद्या रिसॉर्टच्या कराओकेवर, खुल्या आकाशाखाली एखाद्या सुरेल तरुणी बरोबर गात, तीन मिनीटांची का होईना आपणही मैफिल जमवू शकतो.

सोत्रि's picture

26 Oct 2020 - 3:44 pm | सोत्रि

तंतोतंत!

हेच म्हणतो. 👍

-(कानसेन) सोकाजी

उपयोजक's picture

26 Oct 2020 - 6:08 pm | उपयोजक

मानसशास्त्राचा कमालीचा अभ्यास केल्यानंतर

याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.म्हणजे अभ्यास काही विशिष्ट हेतूने?
कोणती शाखा? सामान्यांचे मानसशास्त्र , शैक्षणिक मानसशास्त्र ,अौद्योगिक मानसशास्त्र ???

संजय क्षीरसागर's picture

26 Oct 2020 - 6:57 pm | संजय क्षीरसागर

याचा सखोल अभ्यास अध्यात्मिक साधनेसाठी केला. मनाचे तीन पैलू आहेत : दृक, वाक आणि श्राव्य. पैकी वाक आणि श्राव्य हे संगीताच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. हे दोन पैलू एकसंध झाले तर शब्दांचा स्वर होतो. थोडक्यात, मनाची अविरत चाललेली बडबड ध्वनीत रुपांतरित होते. यापलिकडे संगीतशास्त्रात कधीही अभ्यास न केला जाणारा एक फॅक्टर आहे तो म्हणजे शांतता ! कारण सर्व संगीत हा स्वराभ्यास आहे; स्वर बेसूर होईल पण शांततेला काहीही होत नाही. या शांततेच्या कॅनवासवर संगीताचं गाणं उमटतं. ही शांतता म्हणजे खुद्द आपण आहोत. या शांततेचं भान स्वर गहिरा करत नेतं.

एनी वे, तो विषय सध्या बाजूला ठेऊ.

या समग्र अभ्यासानं शब्दाचा स्वर कसा करावा याची शक्कल कळली आणि ती अनुभव-सिद्ध पद्धत इथे सोपी करुन इथे लिहिली आहे.

मस्त संक्षी , नक्की करुन बघीन. आपल ताल, सुर आणि चालीत गायलेले गाण आपणच ऐकणे यासारखी मज्जा नाही. पण हे जमत नाही तर काय करावे हा आयुष्यभर छळणारा प्रश्न (या साठी गाण शिकायला जाव येव्हडी तयारी सध्या नाही). पण हे भारी वाटतय करुन पाहीन.
धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

26 Oct 2020 - 11:57 am | संजय क्षीरसागर

जरुर गा ! काहीही अडचण वाटली तर इथे विचारा किंवा व्यनि करा.

सुरुवातीला ऑन बीट असणारं एखादं सोपं आणि तुमच्या आवडीचं गाणं घ्या, उदा, ऐ दिल है मुश्कील जीना यहां. एकदा ठेक्यात गायला लागलात की तुम्ही सुरु झालाच म्हणून समजा !

जब वी मेट नावाच्या चित्रपटात एक करीना कपुरची व्यक्तिरेखा एकदा म्हणते "मै मेरी फेव्हरेट हूं ". मला तो ऍटिट्यूड अतिशय आवडतो, माणसाने स्वतःवर खुश रहावं, दुनिया गेली तेल लावत. हा ऍटिट्यूड तुमच्या या पोस्ट मध्ये मस्तपैकी दिसून येतोय. लगे रहो !!! अशीच भरपूर गाणी गात रहा.

माणसाने स्वतःवर खुश रहावं, दुनिया गेली तेल लावत. हा ऍटिट्यूड तुमच्या या पोस्ट मध्ये मस्तपैकी दिसून येतोय. लगे रहो !!! अशीच भरपूर गाणी गात रहा.

क्या बात है !

आनंद म्हणजे स्वतःच्या कंपनीत खुश असणं ! ओशो म्हणतात, सिद्ध किसीके विपक्षमे नही है, वो बस अपने पक्षमे आ गया है |

पोस्टमधे सांगितलेला सराव तुम्हीही करा. आनंदात रहाण्याची आयडीया तुम्हाला कळली आहे. मी तर इथे एकसोएक गाणी अपलोड करीनच पण स्म्यूलवर आलात की नक्की कळवा... एखादं ड्युएट तुमच्याबरोबरही गायला मजा येईल.

ऑल द बेस्ट !

शेखरमोघे's picture

27 Oct 2020 - 7:56 am | शेखरमोघे

लिखाण आणि प्रतिसादात व्यक्त केलेली सन्गीतप्रसाराची तळमळ दोन्हीही आवडले.

संजय क्षीरसागर's picture

27 Oct 2020 - 2:23 pm | संजय क्षीरसागर

जगातला हिंसाचार संपवायचा असेल तर लोकांना संगीताचा मोह पडणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. गाणारा दिवसेंदिवस तरल होत जातो, त्याची सौंदर्य दृष्टी कमालीची वाढायला लागते. मनाच्या अविरत बडबडीतून मुक्त झाल्यानं तो आनंदी होत जातो. गाणं तुम्हाला स्वतःशी कनेक्ट करतं. ती कला सर्वांना साधावी यासाठी हा प्रयत्न आहे. करा ट्राय !

Jayant Naik's picture

27 Oct 2020 - 2:11 pm | Jayant Naik

गाणे आवडते पण आवाज नाही अश्या बाथरूम सिंगेर्स साठी मस्त . कोणतीही कला अगदी मोजके लोक सोडले तर हे कष्टसाध्य च असते. तुझे प्रयत्न स्तुत्य .

संजय क्षीरसागर's picture

27 Oct 2020 - 2:47 pm | संजय क्षीरसागर

गोडवा हा म्हणणं आणि ऐकणं बॅलन्स झालं की आपसूक येतो. उच्चारण आणि श्रवण यांचा मध्यबिंदू म्हणजे गोडवा. आपल्या आवाजात गोडवा नाही असं वाटतं कारण आपण आपलं गाणं ऐकायला तयार नसतो.

पोस्टवरचा पहिलाच प्रतिसाद हे या मानवी मनात खोलवर रुजलेल्या इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. मग त्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लोक फक्त श्रवणभक्ती करतात. कितीही आनंद झाला आणि चुकून जरी गुणगुणायचं म्हटलं की डायरेक्ट भीमसेन आणि रफीच आठवतात आणि आपला आवज कंठातच अडकतो. अर्थात, ज्याला शास्त्रीय गायन आणि शब्दप्रधान गायकी यातला फरकच कळत नाही त्याच्या आकलनाची किंमत शून्य आहे. आज करोडो लोक कराओकेवर गातात आणि संगीताचा आनंद घेतात. यथावकाश सूर-लय-ताल त्यांच्या जीवनात प्रवेश करेलच. ज्यांना आवड असेल ते शास्त्रीय संगीतही शिकतील आणि आपल्याबरोबर इतरांचंही जगणं मजेचं करतील. अर्थात, त्यांच्या प्रवासात अशा मानसिकतेचे लोक भेटले तर त्यांना फुल फाटा दाखवून त्यांनी आपलं गाणं हरवू देऊ नये हे नक्की !

शा वि कु's picture

27 Oct 2020 - 5:53 pm | शा वि कु

तुमची लस्ट फॉर लाईफ एकदम जबरी आहे. बरेच शिकण्यासारखे आहे.

एक कोरा कॅनवास आहे. तुम्ही तो जितका रंगवाल तितकं ते रंगत जाईल. इथे जे नकारात्मक प्रतिसाद आलेत (किंवा येतील) त्यांचा अर्थ इतकाच की अशा मानसिकतेचा जगण्यातला सगळा रस संपला आहे.

संदीपच्या फार सुरेख ओळी आहेत :

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...

कळून येता जगण्याची या इवलीशी त्रिज्या
उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद-चाळा
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा,....

कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो !
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...

अशा लोकांच्या जीवनात ना कुठला छंद ना काही रस, ते फक्त तोच दिवस रोजरोज जगत जातात. तुम्ही त्यांच्या सहवासात थोड्याच वेळात एकदम बोअर व्हाल. त्यांच्या जगण्याचा आवाकाच इतका मर्यादित असतो की ते स्वतःलाच कंटाळलेले असतात. (इथल्या त्यांच्या पोस्टस बघून ही तुम्हाला त्यांचा आवाका कळेल). मग कुणी एखादा नवा उपक्रम सांगितला किंवा करण्यासाठी कुणाला प्रोत्साहित करतांना दिसला की यांचा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स ज्याम उफाळून येतो, कारण यांना स्वतःला, आपल्या आयुष्यात आता काहीही नवं घडू शकणार नाही याची ठाम खात्री असते. असे लोक कधी भेटले तर त्यांना फुल इग्नोर मारुन तुमचे छंद जपा. तुमचं आयुष्यही वृक्षासारखं बहरत जाईल.

Gk's picture

27 Oct 2020 - 5:56 pm | Gk

छान

चित्रगुप्त's picture

27 Oct 2020 - 6:21 pm | चित्रगुप्त

चांगला आहे लेख. विषेशतः गाणी म्हणण्याची इच्छा असूनही आपल्याला काही येत नाही, आपण शिकलेलो नाही, आता वय झाले, वेळ निघून गेली आहे वगैरे विचारांनी हतोत्साहित झालेल्यांसाठी उपयोगी ठरावा.
माझे एक परिचित (तसे ते शास्त्रीय संगीताचे थोडेबहुत जाणकारही आहेत आणि त्यांची स्वतः पेटी वाजवत गायलेली भजने वगैरे मला आवडायची सुद्धा) आता साठीत आल्यावर स्टारमेकर का कुठल्यातरी अ‍ॅपवर रोज सिनेमातली गाणी म्हणून मला पाठवत असतात, आणि मी ते लाईक, फॉरवर्ड वगैरे करावे असेही लिहीतात. त्यांची गाणी ऐकताना मूळ मुकेश वगैरेंच्या गाण्याशी कळत नकळत तुलना होत असल्याने मला काही ते गायन आवडत नाही. आता तर मी ते ऐकणे सोडून दिले आहे. यातून एक शिकायला मिळते ते असे की भले स्वतःला कितीही चांगले वाटत असले तरी ते इतरांना पाठवणे (अपवाद अशा लोकांचा, ज्यांना आपण काहीही केले तरी त्याचे कौतुकच वाटते अशी प्रेमाची माणसे - अर्थात तशी कुणी आपल्या जीवनात (उरली-) असली तरच-) आणि आपणहून लाईक वगैरे करायला सांगणे, या भानगडीत अजिबात पडले न पाहिजे. असले उद्योग स्वतःपुरते, स्वान्तःसुखाय ठेवणेच बरे.

उपयोजक's picture

27 Oct 2020 - 10:22 pm | उपयोजक

पासून पुढचे ज्ञानेश्वरांचे पैजार यांच्या प्रतिसादातल्या विचारांशी समान वाटला.कदाचित मी चुकीचाही असेन.

संजय क्षीरसागर's picture

29 Oct 2020 - 4:05 pm | संजय क्षीरसागर

पण इथे कुणी व्यनि करुन पोस्ट लाईक करायला सांगितलेली नाही. जे विधायक प्रतिसाद आलेत ते सगळे उत्सफूर्त आहेत. शिवाय माझं गाणं ऐका यासाठी ही पोस्ट नसून, तुम्ही गाणं म्हणा हा पोस्टचा उद्देश आहे. त्यामुळे उपहास करण्याच्या नादात प्रतिसादातला तो भाग पार हुकला आहे.

उपयोजक's picture

27 Oct 2020 - 10:23 pm | उपयोजक

पासून पुढचे ज्ञानोबाचे पैजार यांच्या प्रतिसादातल्या विचारांशी समान वाटला.कदाचित मी चुकीचाही असेन.

असे वाचावे।

उपयोजक's picture

27 Oct 2020 - 10:56 pm | उपयोजक

पुरुष गायकच हौशी गायक म्हणून का असतात? पौंगडावस्था ते पस्तिशी या गटातले पुरुष का कमी असतात?
हे कदाचित जुन्या गोलमालमधे रामप्रसाद शर्मा म्हणतो तसं "जवानी तो काम करने के लिए होती है। खेल कुद इत्यादी के लिए तो पुरी जिंदगी पडी है।" काही असतं का?

संजय क्षीरसागर's picture

27 Oct 2020 - 11:25 pm | संजय क्षीरसागर

निरुपयोगी आहे. आयुष्य कायम या क्षणात साठलेलं आहे. जर तुम्हाला गाणं म्हणायचं असेल तर त्यासाठी आता काही तरी करावं लागेल, मग तुमचं वय काहीही असो !

४५ नंतर तर आपल्याला आता काही जमणार नाही, फक्त आलेला दिवस ढकलायचा आणि भविष्याची स्वप्न बघायची (मुलाकडे / मुलीकडे अमेरिकेला जाऊ, नातवंड झालं की मजा येईल, व्यावसायात असाल तर : आणखी जोरात हँडल फिरवू म्हणजे पुढची सोय होईल) या पलिकडे कुणी फारसा विचार करणारे दिसत नाहीत.

पण एकदा वर्तमान छंद जोपासायची एकमेव संधी आहे हे लक्षात आलं की आयुष्याचे रंग बदलायला लागतात

उपयोजक's picture

28 Oct 2020 - 10:53 am | उपयोजक

तुम्हाला गाणी गाण्याचा छंद तुम्हाला तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी लागला?
(खरं खरं सांगा हं! पुछता है भारत! ; ) )

संजय क्षीरसागर's picture

28 Oct 2020 - 11:07 am | संजय क्षीरसागर

तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी लागला ?

एखाद्या मुलीशी नज़रभेट झाल्यावर अंगावर रोमांच उठायला लागले तेंव्हा !

छान विषयाला छेडले आहे! गाण्यात माणूस स्वतःशी जोडला जाऊन ध्यानमग्न होतो, यात शंकाच नाही..
गेल्या वर्षभरापासून मी स्टारमकेर या अँप वर अनेक जणांसोबत गाणी म्हणतोय, अनेक जणांची गाणी ऐकतोय. मुळात थोडीफार शास्त्रीय संगीताची जाण असल्याने आणि अनेक हौशी गायकांची गाणी पार्टी रूम मध्ये जवळुन ऐकल्यानंतर काही गोष्टी ज्या मला जाणवल्या त्या अशा-
१.जे गाणे आपल्याला म्हणायचे आहे ते इतक्या वेळा ऎकायला हवे की त्यातील शब्द न शब्द, चाल, ठेका,आवाज , लायकरी , त्यातल्या छोट्याशा हरकती मेंदूत एकदम ठसल्या पाहिजेत. आपण ज्यावेळी गाणे म्हणतो तेव्हा खरंतर मूळ गाणं आपल्या मेंदूत आपण प्ले करत असतो आणि त्याबर हुकूम म्हणायचा प्रयत्न करतो.तेव्हा मूळ गाण्याची रेकॉर्डिंग मेंदूत फिट्ट पाहिजे.
२. दुसरे असे की lyrics बऱ्यापैकी पाठ हवे, ओझरत्या नजरेने पाहूनही लिहिलेले lyrics समजायला हवेत. Lyrics वर लक्ष ठेवून वाचून गायला लागल्यास सूर डळमळीत होतो.
३.प्रत्येकाचे गायनाचे आकलन वेगळे असते. उदा.रफीचे "एहसान तेरा होगा मुझपर" ह्यातील प्रत्येक शब्दाचे उच्चारण, हलकेच घेतलेल्या हरकती, भाव हे अनेक जणांच्या लक्षातच येत नाही. मुळ गाण्याचे रेकॉर्डिंगच जर मेंदूत व्यवस्थित नसेल तर गाणे नीट गाता येणार नाही. अशा वेळी स्वतः गायलेले गाणे त्यामुळे चांगले नसले तरी स्वतःला ऐकतांना उत्तम वाटते, कारण स्वतःच्या मेंदूतील मूळ गाण्याचे रेकॉर्डिंगच मुळात अस्पष्ट,सदोष आहे आणि आपण त्याच्याशीच आपले गाणे ताडून पाहतो.
४.आपल्याला कोणते गाणे आवडते यापेक्षा कोणते गाणे(वा कोणत्या गायकचे गाणे) आपण विनाप्रयास गुणगुणू शकतो तेच सुरुवातीला गाण्यासाठी निवडायला हवे.सुरुवातीलाच एखादे खूप आवडते पण अवघड गाणे गायचा प्रयत्न करताना लोक दिसतात आणि मग जमले नाही की नाउमेद होतात.
५.प्रत्येकाचा आवाज अद्भुत आणि अद्वितीय आहे यात शंका नाही.परंतु कोणतीही कला ही साध्य करण्यासाठी मुळात ती काही प्रमाणात अंगी असेल तरच ती अभ्यासाने बहरू शकते.सगळ्या गोष्टी फक्त त्यामागचे शास्त्र वा टेक्निक शिकल्याने येत नाहीत.
६. सगळ्यात महत्वाचे म्हणजे गाणे गाताना स्वतःला त्यात झोकून देणे, एकरूप होऊन गाणे...म्हणजे मग गाण्यात भाव प्रकटतो..इतर गोष्टी ताल सूर लय मग थोड्याशा बिघडल्या तरी गौण ठरतात कारण गाण्याचा एकंदरीत इफेक्ट चांगला होतो.
माझ्या मते चांगला कानसेन होणे हे चांगला गायक होण्याची मूलभूत पायरी आहे.

मराठी_माणूस's picture

28 Oct 2020 - 9:01 am | मराठी_माणूस

मुद्दा ५ सोडुन बाकी सहमत.

काही मतांततरं आहेत ती अशी :

१.

आपण ज्यावेळी गाणे म्हणतो तेव्हा खरंतर मूळ गाणं आपल्या मेंदूत आपण प्ले करत असतो आणि त्याबर हुकूम म्हणायचा प्रयत्न करतो.तेव्हा मूळ गाण्याची रेकॉर्डिंग मेंदूत फिट्ट पाहिजे.

गातांना मेंदूतलं गाणं ऐकणं आणि त्या बरहुकूम म्हणणं हा डबल ट्रबल आहे. एकतर तो मूळ गाण्याची नक्कल करण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरं म्हणजे ते गाणं तुमचं होऊ शकत नाही. रफीनी म्हटलं त्यावेळी त्याला प्रिसिडन्स नव्हता, त्याच्या मेंदूत काहीही चालू नव्हतं त्यामुळे ते बहारदार झालं आहे.

गाण्याची एकमेव ट्रिक अशी > चाल (गाण्याची कॉपी नाही) मेंदूत एकदम पर्फेक्ट हवी > लिरिक्स पाठच हवीत, आणि > गातांना आपलं गाणं आपण ऐकायला हवं.

२.

दुसरे असे की lyrics बऱ्यापैकी पाठ हवे, ओझरत्या नजरेने पाहूनही लिहिलेले lyrics समजायला हवेत. Lyrics वर लक्ष ठेवून वाचून गायला लागल्यास सूर डळमळीत होतो.

लिरिक्स हुकली तर स्वरापेक्षाही ताल हुकतो ! लिरिक्स बर्‍यापैकी नाही तर फुल पाठच हवीत. गाणं हे नाटकाच्या संहितेसारखं आहे. तुम्ही जगातला कितीही भारी नट स्टेजवर उभा करा, पाठांतर नसेल तर त्यानी माती खाल्लीच म्हणून समजा !

गाणं हा सांगितीक अभिनय आहे त्यामुळे लिरिक्स तर पाठ हवीतच आणि त्याही पुढे जाऊन त्यांचा अर्थ माहिती हवा. कारण भावाभिव्यक्ती अर्थ समजल्याशिवाय असंभव आहे.

प्रत्येक गाणं ही गायकाच्या स्वानुभवाची सांगितिक भावाभिव्यक्ती आहे

३. प्रत्येकाचे गायनाचे आकलन वेगळे असते. उदा.रफीचे "एहसान तेरा होगा मुझपर" ह्यातील प्रत्येक शब्दाचे उच्चारण, हलकेच घेतलेल्या हरकती, भाव हे अनेक जणांच्या लक्षातच येत नाही

एकदम सही ! पण मेंदूतल्या गाण्याबरहुकूम गाणं नाही तर गाण्याचा महौल (मूड) लक्षात घेऊन गायला हवं.

४.

आपल्याला कोणते गाणे आवडते यापेक्षा कोणते गाणे(वा कोणत्या गायकचे गाणे) आपण विनाप्रयास गुणगुणू शकतो तेच सुरुवातीला गाण्यासाठी निवडायला हवे.

पर्फेक्ट !

५. प्रत्येकाचा आवाज अद्भुत आणि अद्वितीय आहे यात शंका नाही.परंतु कोणतीही कला ही साध्य करण्यासाठी मुळात ती काही प्रमाणात अंगी असेल तरच ती अभ्यासाने बहरू शकते.सगळ्या गोष्टी फक्त त्यामागचे शास्त्र वा टेक्निक शिकल्याने येत नाहीत

गाण्यासाठी फक्त दोनच गोष्टी लागतात : रोमँटिसिजम आणि स्वतःचं गाणं ऐकण्याची इच्छा. मग बाकी सगळं आपोआप जुळून येईल.

६.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे गाणे गाताना स्वतःला त्यात झोकून देणे, एकरूप होऊन गाणे...म्हणजे मग गाण्यात भाव प्रकटतो..इतर गोष्टी ताल सूर लय मग थोड्याशा बिघडल्या तरी गौण ठरतात कारण गाण्याचा एकंदरीत इफेक्ट चांगला होतो.

बरोब्बर ! इंपॅक्टसाठी ते गाणं मूळ गायकाचं न राहता तुमचं व्हायला हवं !

तुमच्या गाण्याची एखादी क्लिप इथे टाकाल का ? किंवा मला नक्की व्यनी करा.

अशा सविस्तर प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार्स !

उपयोजक's picture

28 Oct 2020 - 10:55 am | उपयोजक

अगदी विस्तारपूर्वक लिहिले आहे. छान!

कळस's picture

28 Oct 2020 - 4:22 pm | कळस

माझा प्रतिसाद आवडल्या बद्दल धन्यवाद. या ठिकाणी मी कराओके गाण्यांच्या गायनाबद्दल specifically बोलत आहे. कराओके ट्रॅक वर मुख्यत्वे आपण मूळ गाण्याप्रमाणेच गाण्याचा प्रयत्न करत असतो , म्हणून मूळ गाणे मेंदूत पक्के ठसलेले हवे. Live orchestra सोबत म्हणताना चाल लय हरकती यात थोडे deviation, freedom घेऊ शकतो कारण मागे पुढे झाले तरी ऑर्केस्ट्रा वाजवणारे तुम्हाला बेमालूमपणे सांभाळून घेतात..

Sad साँग प्रत्यक्षात कोणी गात नाही. ते सिनेमातच असते. खरेतर खूप दुःखी असताना आपण गाणे गाऊच शकत नाही. परंतु आपण आनंदात असलो, मूड चांगला असला तर आपण छान गातो. गाणे अगदी आतून येते. याउलट मूड थोडा खराब असेल तर अशावेळी जाणीवपूर्वक झोकून देऊन आवडते गाणे गायल्यास मूड ही छान होतो, सर्व tensions काही काळासाठी आपण पूर्णपणे विसरून जातो, हे खात्रीने सांगू शकतो.
कराओके मध्ये अजुन एक जाणवले ते हे की बरेच जण आवाजाची नक्कल करायला जातात.म्हणजे मुकेश चे गाणे असेल तर उगीचच नाकात गातात, ज्याची काही एक गरज नाही. आपण आपल्या स्वतःच्या आवाजातच नेहमी गाणे म्हणावे.फक्त मूळ गाण्याची सिंगिंग स्टाईल लक्षात घेऊन तसे गावे. उदा.मुकेश ची राजकपूर साठी गायलेली अनेक गाणी गाताना त्यात तोच मुकेश ने दिलेला भाबडा निरागस भाव येणे आवश्यक आहे. तेथे रांगडा आवाज लाऊन उपयोगी नाही. त्याउलट किशोर चे "जय जय शिव शंकर" गाताना तोच जोश आवाजात यायला हवा.

विजुभाऊ's picture

28 Oct 2020 - 4:57 pm | विजुभाऊ

वा खूप छान धागा आहे संक्षि.
ताला बद्दल अजुन माहिती द्यावी.
ताल कसा सांभाळायचा ही कसरत जमतच नाही

ताल सेंटर करणं ! तो पोस्टमधे दिला आहे. हा सराव झाला की तुम्हाला ऑन बीट आणि ऑफ बीट पण कळायला लागेल.

सुरुवातीला सोपं गाणं (ऑन बीट) घ्या, उदा. ऐ दिल है मुश्कील जीना यहां, ताल सेंटर करुन ते म्हणायचा प्रयत्न करा; मग तुम्हाला प्रत्येक शब्द कसा बीटवर येतो ते कळेल. तुमच्यासाठी ते गाणं मी इथे देणार होतो पण सध्या स्म्यूलवर त्या गाण्याला कुणी को-सिंगर नाही. तरी इन्वाइट पाठवीन आणि आल्यावर इथे देईन. इन द मीन टाईम तुम्ही ट्राय करा, जमून जाईल.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणी काही नेगटीव रिमार्क मारला तर नाऊमेद होऊ नका. त्या लोकांना प्रचंड इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स असतो. स्वतःला काहीही जमत नाही त्याची खंत ते निर्लज्जपणे दुसर्‍याला नाऊमेद करुन काढतात. अशा लोकांना फाटा दाखवा. माझे इथले बरेचसे प्रतिसाद त्याचाही एक डेमो आहेत.

साधे सोपे शब्द, सहगायन, मंद ठेका आणि जबरदस्त मूड असं हे काँबिनेशन आहे. करा ट्राय, तुम्हाला तालात कसं गायचं याची कल्पना येईल

ये रातें ये मौसम, नदीका किनारा

सुबोध खरे's picture

29 Oct 2020 - 10:30 am | सुबोध खरे

प्रत्येक मुलगा कष्टाने आय आय टी त किंवा एम्स मध्ये किंवा आय ए एस एम पी एस सी मध्ये जाऊ शकतो या तर्हेची जाहिरातबाजी करणाऱ्या क्लासेसची आठवण आली.

बाकी मी जे जगतो तेच जीवन उत्तम बाकी सारे अतिसामान्य असे सांगणाऱ्या गुरूंची आठवण झाली

पैजार बुवांशी सहमत.

उत्तम गायक वादक चित्रकार किंवा कोणताही कलाकार होण्यासाठी स्वतःवर खुश असण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी आवश्यक असतात.

दवाखान्यात लावलेल्या संगीतावर मोठ्याने गुणगुणून बाकी सर्व लोकांना/ रुग्णांना काव आणणारे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक रोजच्या पाहण्यात आहेत.

बाकी चालु द्या.

निवडून तिच्याबरोबर ड्युएट गायचा आनंद घेऊ शकता.

हमसाया मधलं ओपीचं दिलकी आवाज़ भी सुन हे सोलो गाणं, आर्ची नांवाच्या एका गायिकेनं गाऊन, जॉइन होण्याचा इन्वाइट पाठवला होता. धमाल मजा आली तीच्याबरोबर गातांना.

तुम्ही सुद्धा ही मजा घेऊ शकता.

स्म्यूलवर

उन्मेष दिक्षीत's picture

31 Oct 2020 - 10:00 pm | उन्मेष दिक्षीत

=== वर लिहिलेल्या टिप्स थोड्या प्रॅक्टीस केल्या, त्यानंतर गायला सुरुवात केली, तर अडखळायला झालं, कारण आता ओरिजिनल गाणं प्ले होईना डोक्यात, ऑफ बीट्स जायला लागलो ! मला वाटलं आधी जे गायचो ते पण विसरलो का काय.
आता गाणं परत मला ओरिजिनल गाणं वाटत तसं गायला लागलो, पण जे लिहिलंय ते प्रॅक्टीस केल्यामुळं लक्षात राहीलं होतं. त्यामुळं आता मात्र मी मला सुचत गेलं तसं ते गायला लागलो (ओरिजिनल साँग शी कंपेर न करता ). डोंट नो वॉट हॅपन्ड, बट रिअली एंजॉय्ड इट !

संजय क्षीरसागर's picture

31 Oct 2020 - 10:51 pm | संजय क्षीरसागर

गाणं सुरेख झालं आहे.

आता तुमच्या लक्षात आलं असेल की जेंव्हा मेंदूत काहीही प्ले होत नसतांना तुम्ही ते गाणं म्हणता तेंव्हा ते तुमचं गाणं होतं. देअर इज नो प्रिसिडन्स ! यू आर सिंगींग इट योरसेल्फ फॉर द फर्स्ट टाइम. आणि हीच स्थिती प्रत्येक वेळी तुम्ही ते गाणं म्हणता तेंव्हा येते. दरवेळी तुम्हाला त्या गाण्यात काही तरी नवं सापडतं, दरवेळी वेगळी मजा येते.
_____________________________

इथे नेगटीव प्रतिसाद देणारे आयुष्यभर नुसते ऐकत रहातील. त्याचा फायदा इतकाच की एकीकडे फुल स्पीडमधे विचार चालू आणि मधूनमधून (लक्षात आलं की) यांचं ऐकणं ! त्यात काही मजा नाही, ग्रोथ नाही आणि जीवनाचा रंग काही केल्या बदलत नाही. जगणं इंटर-अ‍ॅक्टीव हवं, पॅसिवीटी हा निर्बुद्धपणे जगण्याचा सगळ्यात सोयिस्कर मार्ग आहे. तुम्ही कायम मनाच्या दडपणाखालीच राहता. तुम्हाला स्वच्छंद होण्याचा एखादा पैलू कुणी दाखवला की त्यालाही खाली खेचायला बघता. ज्यांना नवा छंद जोपासायचायं त्यांनी अशा लोकांना फुल फाटा दाखवा.

गामा पैलवान's picture

1 Nov 2020 - 12:58 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

एक अनोखं तंत्र विकसित केल्याबद्दल तुमचं कौतुक व अभिनंदन आहे.

मला गाण्यातलं काही कळंत नाही. आवडलेलं गाणं मनातल्या मनात म्हणायला आवडतं. तोंडातनं गायला मेहनत करावी लागते. ती करायची इच्छा होत नाही. वर तुम्ही म्हंटलंय तसा मी निष्क्रिय आहे. पण त्याची मला कसलीही खंत नाही. भेंड्या खेळतांना फक्त तोंडातनं गायला आवडतं. एरव्ही नाही.

तुमचं ठेका विचलित करू शकतो हे निरीक्षण अफलातून आहे. मी ठेक्यावर गाणं ऐकू शकतो. भेंड्या खेळतांना तोंडातनं गायचं असतं तेव्हा ठेका पार वर्ज्य करून टाकतो. अन्यथा मन विचलित होतं आणि नुसते भावहीन शब्द उमटतांत.

ठेका म्हणजे ताल म्हणावा का? माझ्या मते ताल वेगळा आहे आणि ठेका वेगळा आहे. गीत वृत्तबद्ध असलं की ताल आपसूक उगवतो, तर ठेका मुद्दाम निर्माण करावा लागतो.

हे मी बरोबर बोललो का? माझा मूर्त ध्वनीकृत संगीतापेक्षा अमूर्त संकल्पनांकडे अधिक ओढा आहे. अशा प्रकारचं स्वारस्य कितपत समर्थनीय आहे, हा भाग वेगळा.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

1 Nov 2020 - 3:31 pm | संजय क्षीरसागर

१.

एक अनोखं तंत्र विकसित केल्याबद्दल तुमचं कौतुक व अभिनंदन आहे.

मनःपूर्वक आभार !

२.

तुमचं ठेका विचलित करू शकतो हे निरीक्षण अफलातून आहे.

मनसशास्त्राच्या अभ्यासाची ती परिणिती आहे.

३.

ठेका म्हणजे ताल म्हणावा का? माझ्या मते ताल वेगळा आहे आणि ठेका वेगळा आहे. गीत वृत्तबद्ध असलं की ताल आपसूक उगवतो, तर ठेका मुद्दाम निर्माण करावा लागतो.

ठेका आणि ताल एकच. शास्त्रीय संगीतात ताल आणि सुगम संगीतात ठेका म्हणतात.

ताल सेंटर करणं ही माझी सुगम संगीताला दिलेली सर्वोच्च काँट्रीब्युशन असेल ! गायक एकदा ते करु शकला की तालाची भीती गेलीच म्हणून समजा.

वृत्तांचा अभ्यास नाही पण ताल वृत्तबद्धतेतून उगवत नाही. ताल हा गाण्याचा स्पीड दर्शवतो आणि कंट्रोल करतो. गाणं तालात हुकतं तेंव्हा गाण्याचा स्पीड मिसमॅच झालेला असतो. अनेक गायक अत्यंत सुरेल गातात पण त्यांना हे लयीचं (गाण्याचा स्पीड) भान राखता येत नाही, त्यामुळे ते तालात गाऊ शकत नाहीत.

खरं तर तुमची चाल पक्की असेल तर तुम्हाला ठेक्याची गरजच नसते (कारण तो लयीतच अंतर्भूत झालेला असतो). पण ताल सुरु झाला की ती लय खुलते (आणखी सुस्पष्ट होते) आणि गाणं बहारदार वाटायला लागतं. म्हणून तुमची चाल पक्की असेल आणि तुम्ही ठेका सेंटर केला की तुमचं गाणं बिनधास्त होतं.

३.

हे मी बरोबर बोललो का? माझा मूर्त ध्वनीकृत संगीतापेक्षा अमूर्त संकल्पनांकडे अधिक ओढा आहे

संगीत हे मूर्त आहे त्यामुळे सूर- लय (चाल) आणि - ताल (रिदम) या तीन संकल्पनांनी ते बद्ध आहे. तिथे अमूर्त संकल्पनांचा उपयोग नाही.

केवळ एकच गोष्ट अमूर्त आहे ती म्हणजे शांतता, जीचा संगितशास्त्रात पॉज म्हणून काही वेळा उल्लेख केला जातो. ती संगितशास्त्राच्या अभ्यासाचा विषय नाही कारण तीचा अभ्यास होऊ शकत नाही. तालाच्या दोन बीटसच्या दरम्यानचा कालावधी इतपत संगीतात तिचा निर्देश होतो.

गामा पैलवान's picture

2 Nov 2020 - 2:15 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार! :-)

मला संगीतातलं फारसं कळंत नाही. तरीपण तुमचं हे विधान रोचक वाटलं :

ठेका आणि ताल एकच. शास्त्रीय संगीतात ताल आणि सुगम संगीतात ठेका म्हणतात.

ताल सेंटर करणं ही माझी सुगम संगीताला दिलेली सर्वोच्च काँट्रीब्युशन असेल ! गायक एकदा ते करु शकला की तालाची भीती गेलीच म्हणून समजा.

वृत्तांचा अभ्यास नाही पण ताल वृत्तबद्धतेतून उगवत नाही. ताल हा गाण्याचा स्पीड दर्शवतो आणि कंट्रोल करतो. गाणं तालात हुकतं तेंव्हा गाण्याचा स्पीड मिसमॅच झालेला असतो.

ठेका, ताल व वेग तिन्ही एकंच कसे हे काही समजंत नाही. बहुधा माझा काहीतरी गोंधळ होतो आहे. त्यामुळे मी थांबतो.

धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

2 Nov 2020 - 11:11 am | संजय क्षीरसागर

१.

ठेका, ताल व वेग तिन्ही एकच कसे हे काही समजत नाही

साधारणपणे कोणतीही फ्रेज तुम्ही तीन स्पीडनी गाऊ शकता > स्लो, मिडीयम आणि फास्ट

हा स्पीड कमी-जास्त करण्याचे दोन उपाय आहेत : १) गाण्याचा स्पीड (लय)) कमी जास्त करा किंवा २) ठेक्याचा स्पीड कमी जास्त करा.

अर्थात, तुम्ही गायनाचा स्पीड बदलला की ठेकेवाल्याला त्याबरहुकूम स्पीड अ‍ॅडजस्ट करावा लागेल आणि वाइस वर्सा

त्यामुळे ठेका आणि ताल एकच आणि तो गाण्याचा वेग दर्शवतो आणि कंट्रोल करतो.

गणपतीची आरती तुम्हाला वेगात म्हणायची असेल तर त्याबरोबर टाळ्यांचा वेग पण वाढवावा लागेल.
__________________________________________________

आता हे समजायला थोडं बाऊन्सर जाऊ शकतं पण मजेचं आहे :

ठेक्याचा स्पीड वाढवणं म्हणजे दोन बीटस मधलं अंतर कमी करत जाणं आणि ठेका विलंबीत करणं म्हणजे हे दोन बीटस मधलं अंतर वाढवत नेणं .

लेखातल्या बाकी गोष्टींवर मतांतरे असू शकतात. माझ्या अभ्यासपुरतं मर्यादित ठेवत फक्त काही वाक्याबद्दल बोलतो.
ठेका आणि ताल एकच. शास्त्रीय संगीतात ताल आणि सुगम संगीतात ठेका म्हणतात.
हे पूर्ण चुकीचं वाक्य आहे. ताल आणि ठेका ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शास्त्रीय संगीतात सुद्धा उत्तम ठेका धरून साथ करणारा साथीदार कुठल्याही गायकाला आवडतो.

ताल हि अमूर्त संकल्पना आहे आणि ठेका हे त्याचे मूर्त स्वरूप.
उदाहरणार्थ:
१. १६ मात्रांचे १ आवर्तन (cycle of १६ beats) हा ताल झाला. आणि तीनताल, तीलवाडा, अध्धा तीनताल हे त्यातले ठेके झाले ज्यांच्या मात्रा १६ आहेत पण अक्षरे वेगवेगळी आहेत. हे तीनही ठेके शास्त्रीय आणि सुगम दोन्ही कडे वाजवतात.
२. आपण नेहमी म्हणत असलेल्या बहुतेक आरत्यांना दादरा (६ मात्रा, (cycle of ६ beats)) हा ठेका वाजवतात. गणपतीची आरती १ ते ६ हे आकडे मोजत आरतीच्या चालीत म्हणा. हा फक्त ताल झाला, ह्याला तबल्याची भाषा आणि अक्षरे वापरली गेली कि तो ठेका होतो (धा-धि-ना-धा-ति-ना) असे दादरा ह्या ठेक्याचे अनंत variations आहेत. ठेका बदलला तरी ताल तोच राहिला.

आता खालील वाक्याबद्दलः
त्यामुळे ठेका आणि ताल एकच आणि तो गाण्याचा वेग दर्शवतो आणि कंट्रोल करतो.

कुठलाही ठेका गाण्याचा वेग दाखवत नाही, कुठलाहि ठेका कुठल्याही वेगात वाजवला जातो. वादकाची क्षमता, वाजवायची अक्षरे यानुसार, काही ठेके द्रुत लयीमध्ये वाजवताना अक्षरे बदलली जाऊ शकतात किंवा, संथ (विलंबित) लयीमध्ये वाजवताना तुटक वाटू नये म्हणून काही बदल करावे लागतात इतकंच.

ठेक्याची व्याख्या करताना: 'तालाची पहिली बंदिश' अशी केलेली आहे. या वरून ह्या दोनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे समजू शकेल.

प्रस्तुत माहिती हि माझ्या किमान २० वर्षांच्या तबला शिक्षणानंतर कळलेली आहे आणि ह्याबद्दल मी काही पुस्तकांचे दाखले पण देऊ शकेन.

संजय क्षीरसागर's picture

1 Dec 2020 - 1:27 pm | संजय क्षीरसागर

१. उपरोक्त धागा सुगम संगीताचा आहे आणि त्यात रिदम (त्याला तुम्ही ताल म्हणा किंवा ठेका) कसा पकडता येईल या विषयीचं सोपं टेक्निक दिलं आहे (सेंटरींग द रिदम)

२. थोडक्यात, वाट्टेल तो ताल असो की ठेका शेवटी बीट हाच महत्त्वाचा फॅक्टर आहे (त्याला तुम्ही धा म्हणा की तीन) आणि सुगम संगीतात सगळं कौशल्य या बीट वर किंवा ऑफ बीट म्हणण्याचं आहे.

३. तुमच्या लक्षात येईल की जगातला वाट्टेल तो ताल किंवा ठेका मेट्रोनोम होऊ शकतो.

४. एकूणात रिदम गाण्याचा (किंवा लयीचा) स्पीड दर्शवतो किंवा कंट्रोल करतो. मोहे भूल गए सावरीयाच्या रिदमचा स्पीड (त्याला तुम्ही ताल म्हणा की ठेका) हा दिल दे के देखो च्या रिदम स्पीड पेक्षा कमी आहे ही उघड गोष्ट आहे.

आणि पहिल्या तीन मुद्यात तुमच्या आणि माझ्या आकलनात शास्त्रीय वर्सेस सुगम असा फरक असला तरी या मुद्यावर वाद शक्य नाही.

_______________________

अर्थात, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि तुमच्या वादनाच्या किंवा गायनाच्या क्लिप्स इथे नक्की अपलोड करा असं सुचवेन.

संजय क्षीरसागर's picture

1 Dec 2020 - 1:37 pm | संजय क्षीरसागर

३. तुमच्या लक्षात येईल की जगातला वाट्टेल तो ताल किंवा ठेका मेट्रोनोम होऊ शकतो.

म्हणजे कोणतंही तालवाद्य नसतांना सुद्धा केवळ मांडीवर थाप मारत, गायक शास्त्रीय किंवा सुगम काहीही गाऊ शकतो. ही थाप हा मेट्रोनोम रिदम आहे.

४. एकूणात रिदम गाण्याचा (किंवा लयीचा) स्पीड दर्शवतो किंवा कंट्रोल करतो

विलंबीत गाण्यात दोन बीटस मधलं काँस्टंट असलेलं अंतर वाढतं, मध्य लयीत ते कमी होतं आणि द्रुत लयीत ते आणखी कमी होतं इतकाच काय तो फरक. तस्मात, रिदम गाण्याचा स्पीड दर्शवतो किंवा कंट्रोल करतो हे सिद्ध होतं.

तिरकीट's picture

1 Dec 2020 - 2:09 pm | तिरकीट

संगित कुठलेही असो, ताल आणि ठेका ह्य वेगळ्या गोष्टी आहेत हा माझा मुख्य मुद्दा होता आणी मला वाटतय ते मी पोहोचवु शकलोय.

संजय क्षीरसागर's picture

1 Dec 2020 - 2:22 pm | संजय क्षीरसागर

१. ताल आणि ठेका या फक्त बोलांच्या दृष्टीनं वेगळ्या गोष्टी आहेत आणि तो फरक तालवादकासाठी आहे. गायकाला त्यानं काहीही फरक पडत नाही. आरती टाळ्या वाजवून म्हटली काय की तबला वाजवून, रिदम पकडता आल्याशी कारण !

२.

कुठलाही ठेका गाण्याचा वेग दाखवत नाही, कुठलाहि ठेका कुठल्याही वेगात वाजवला जातो.

ठेका वेगात वाजवला तर लय द्रुत होईल आणि सावकाश वाजवला तर विलंबीत होईल हे तुम्हाला मान्य नाही का ? त्यामुळे रिदम लयीचा स्पीड कंट्रोल करते किंवा दर्शवते हे सिद्ध होतं.

संजय क्षीरसागर's picture

1 Dec 2020 - 2:27 pm | संजय क्षीरसागर

त्यामुळे रिदम लयीचा स्पीड कंट्रोल करतो किंवा दर्शवतो हे सिद्ध होतं.

तो फरक तालवादकासाठी आहे. गायकाला त्यानं काहीही फरक पडत नाही

मग कुठल्याही गाण्याला मी तबलावादक म्हणून काहीही वाजवू शकतो?

ठेका वेगात वाजवला तर लय द्रुत होईल आणि सावकाश वाजवला तर विलंबीत होईल हे तुम्हाला मान्य नाही का. गायकांनी दिलेल्या, सांगितलेल्या लयीमध्ये तालवादक ठेका धरतो. तो स्वतः लय फिक्स करत नाही,करू नये.

संजय क्षीरसागर's picture

1 Dec 2020 - 6:24 pm | संजय क्षीरसागर

१. मी ठेक्याचं महत्त्व नाकारत नाही, त्यामुळेच गाणं खुलतं पण गायकाला फक्त बीटवर राहाण्याचं कौशल्य साधायचंय. एकदा मी रिदम सेंटर केला की तो रुपक असो की दादरा आणि तुम्ही ठेका कसाही लावा, रिदममधे गाण्यासाठी मला एका सिंगल बीटशी घेणं आहे.

२. अर्थात ! लय गायक कंट्रोल करतो पण एकदा ताल सुरु झाल्यावर तालात गायचं म्हटल्यावर तालच लय कंट्रोल करतो आणि दर्शवतो.

कदाचित तुम्ही गात नसाल त्यामुळे तुम्हाला गायकाच्या चित्तदशेची कल्पना नसेल. ती तालवादनाकडे पाहाण्याचा इक्झॅक्टली अपोझिट अँगल आहे.

गायकाच्या चित्तदशेची कल्पना, बर...मी इथे थांबतो

तुमचा हा प्रतिसाद वाचून मला म्हणावेसे वाटते:

ऐकूनी कोरडया ओढ्यातील दगड-गोट्यांचा खडखडाट
झाले गहीरे पाणी नि:शब्द
कारण त्याला कळून चुकले
हा ओढा कोरडा आहे
आणि भ्रमात आहे की आपण आहोत
प्रशांत महासागर

सुबोध खरे's picture

1 Dec 2020 - 8:16 pm | सुबोध खरे

@ तिरकीट

हे पूर्ण चुकीचं वाक्य आहे

तुम्ही सर्वज्ञांना असं कसं म्हणू शकता?

इतकं औद्धत्य?

अब्रह्मण्यम !! शिव शिव !!

प्रस्तुत माहिती हि माझ्या किमान २० वर्षांच्या तबला शिक्षणानंतर कळलेली आहे.

ती चुलीत घाला

तिरकीट's picture

2 Dec 2020 - 8:54 am | तिरकीट

तुमच्या प्रतिसादातला टोन कळला, पण खरंच शिकलोय हो, काय करणार त्याला.

सुबोध खरे's picture

2 Dec 2020 - 10:17 am | सुबोध खरे

तुमचे शिक्षण सर्वज्ञांकडून प्रमाणपत्रित( CERTIFIED) आहे का?

नसेल तर २० वर्षे फुकट गेली

संजय क्षीरसागर's picture

7 Nov 2020 - 3:51 pm | संजय क्षीरसागर

तेरा हुस्न रहे मेरा इश्क रहे
चित्रपट : दो दिल, संगीत : हेमंत कुमार, लिरिक्स : कैफी आझमी

एकदा ताल सेंटर केला की प्रत्येक उच्चारण कसं बीटवर येतं हे या गाण्यातून कळेल.

इअर फोन्स लावून ऐकलंत की ताल सेंटर करणं म्हणजे काय ते कळू शकेल (म्हणजे ताल नेमका मेंदूच्या मधोमध वाजतोयं हे कळेल).
मग शब्द, त्यांचे अर्थ आणि चाल पक्की असेल तर तुम्ही तुमची एक छोटीशी मैफिल रंगवू शकता.
ओरिजिनल गाणं तुमच्या गाण्याच्या आणि ऐकण्याच्या मधे येत नाही.

संजय क्षीरसागर's picture

9 Nov 2020 - 2:47 pm | संजय क्षीरसागर

रागदारीवर आधारित हिंदी गाणी म्हणणं हा त्या रागाशी परिचित होण्याचा सर्वात सोपा आणि अत्यंत मोहक अनुभव आहे.

सोनूरिन नांवाच्या एका युवतीनं स्म्यूलवर हे सोलो गाणं, द्वंद्व गीत म्हणून गाण्यासाठी इन्वाइट पाठवला होता.

इअर फोन्स लावून ऐकलंत तर तुम्हाला कोणत्याही तालात किती सहजतेनं गाता येतं आणि शास्त्रीय संगीत न शिकता सुद्धा रागात बांधलेल्या बंदिशीनी एक छोटी मैफिल कशी सजवता येते याची कल्पना येईल.
______________________

छू लेने दो नाजूक होटोंको
संगीत : रवी
गीत : साहिर लुधियानवी
मूळ गायक : रफी
.

संजय क्षीरसागर's picture

11 Nov 2020 - 12:07 pm | संजय क्षीरसागर

आज की मुलाकात बस इतनी - विथ सौम्या

चित्रपट : भरोसा
संगीतकार : रवि
गीतकार : राजिन्दर कृष्ण
मूळ गायक : लता मंगेशकर, महेन्द्र कपूर

_________________________________

जलद गाणी म्हणतांना तुम्हाला शब्द, चाल आणि भवाभिव्यक्ती यांचं एकावेळी भान ठेवावं लागतं.

नुसते शब्द बरोबर आले तर ते पाठांतर होईल, चाल लक्षात राहणं ही स्मृतीची एक वेगळीच फॅकल्टी आहे ( म्युझिकल मेमरी); त्यामुळे गाणं म्हणतांना नुसतं फोकसिंग होत नाही, आनंदपण होतो. जलद गातांना अत्यंत कमी कालावधीत शब्दातून भाव व्यक्त करावा लागतो; त्याची मजा काही औरच आहे.

ऐका आणि तुम्ही पण ट्राय करा.

.

चाल माहिती होती पण पूर्वी हे गाणं कधीही म्हटलं नव्हतं. फेवरिट लिस्टमधे नसल्यानं लिरिक्सपण पक्की पाठ नव्हती. सहगायिकेचा साधासा आवाज ऐकून एकदम म्हणायचा मूड आला. ऐनवेळी हे गाणं रफीचं आहे का किशोरचं ते ही कन्फ्युजन होतं. ही नेमकी स्वतःच्या स्टाईलमधे म्हणायची संधी होती !

चित्रपट : गंगा की लहरें
संगीतकार : चित्रगुप्त
गीतकार : मजरूह सुलतानपुरी
मूळ गायक : किशोर कुमार / लता मंगेशकर

पहीलं गाणं ऐकल्या नंतर दुसरे ऐकावेसे वाटले नाही, बाकी तुमचे चालू द्या.
मी माझे प्राजंळ मत मांडले, वाद घालण्यात रस नाही.

संजय क्षीरसागर's picture

28 Nov 2020 - 10:41 am | संजय क्षीरसागर

जे इंटरेस्टेड आहेत त्यांना गाता यावं यासाठी ही पोस्ट आहे. इथे जितकी गाणी अपलोड होतील आणि त्यावर विधायक टिका / कौतुक काय होईल त्यातून सर्वांना गाण्याचा हुरुप येईल असा हेतू आहे.

संजय क्षीरसागर's picture

30 Nov 2020 - 12:20 am | संजय क्षीरसागर

सुरुवात सोप्या गाण्यानी करुन तुम्ही यथावकाश मोठ्या फ्रेजेस असलेली आणि तालाशी खेळणारी गाणी म्हणू शकता. ऐका :

ओ सनम तेरे हो गए हम - विथ आर्ची

गीतकार : शैलेन्द्र,
गायक : लता - रफी,
संगीतकार : शंकर जयकिशन,
चित्रपट : आई मिलन की बेला

शा वि कु's picture

30 Nov 2020 - 10:51 pm | शा वि कु

काराओके व्यवस्थित पणे आणि थोडासा प्रयत्न करून कधी वापरले नव्हते. त्यामुळे स्टारमेकर नावाचे चकटफू ऍप घेऊन प्रयत्न केला.

स्टारी स्टारी नाईट- डॉन मॅकलिन

विंग्रजी उच्चार काही ठिकाणी अस्पष्ट आहेत म्हणून लिरिक्स देतो:

Starry, starry night
Paint your palette blue and grey
Look out on a summer's day
With eyes that know the darkness in my soul
Shadows on the hills
Sketch the trees and the daffodils
Catch the breeze and the winter chills
In colors on the snowy linen land
Now I understand
What you tried to say to me
And how you suffered for your sanity
And how you tried to set them free
They would not listen, they did not know how
Perhaps they'll listen now
Starry, starry night
Flaming flowers that brightly blaze
Swirling clouds in violet haze
Reflect in Vincent's eyes of china blue
Colors changing hue
Morning fields of amber grain
Weathered faces lined in pain
Are soothed beneath the artist's loving hand
Now I understand
What you tried to say to me
And how you suffered for your sanity
And how you tried to set them free
They would not listen, they did not know how
Perhaps they'll listen now
For they could not love you
But still your love was true
And when no hope was left in sight
On that starry, starry night
You took your life, as lovers often do
But I could have told you, Vincent
This world was never meant for one
As beautiful as you
Starry, starry night
Portraits hung in empty halls
Frameless heads on nameless walls
With eyes that watch the world and can't forget
Like the strangers that you've met
The ragged men in the ragged clothes
The silver thorn, a bloody rose
Lie crushed and broken on the virgin snow
Now I think I know
What you tried to say to me
And how you suffered for your sanity
And how you tried to set them free
They would not listen, they're not listening still
Perhaps they never will

उन्मेष दिक्षीत's picture

30 Nov 2020 - 11:38 pm | उन्मेष दिक्षीत

व्वा ! गाणं पण भारी आहे, ऐकलं नव्हतं.

संजय क्षीरसागर's picture

1 Dec 2020 - 12:29 am | संजय क्षीरसागर

गात रहा.

शा वि कु's picture

2 Dec 2020 - 7:08 pm | शा वि कु

उमेश आणि संक्षी, धन्यवाद !