म्हारे हिवडा में नाचे मोर...!
राम राम मंडळी, मंडळी आयुष्य कितीही धकाधकीचं असलं तरी आपल्यासाठी आपल्या वेळेचं एक मूल्य आहे. कधी तरी वेळ काढून एखादं आवडीचं गाणं ऐकत बसणे, काही वेळासाठी तल्लीन होऊन जाणे. एखाद्या पुस्तकाच्या पानात रमणे, मित्राशी फोनवर गप्पा मारत खदखदत हसणे. निसर्गचित्रात रमणे, एखादा तलाव, नदी, समूद्र त्याच्याकडे पाहात त्या सौंदर्यात, समुद्रगाजेत रमणे. मॉर्निंग वॉकला जातांना येतांना प्राजक्ताची फूले-चाफ्यांची फुले वेचत बसणे. असे आपलं सामान्य मानसाचं आयुष्य एका रेषेत सरळ चाललेलं असतं. पण मोठ्या माणसांचं कसं असेल.