माहिती

१५ फेब्रुवारी, मिपा संमेलन...कशेळी, कर्जत

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
1 Jan 2015 - 1:34 pm

मिपाकरांनो,

प्रथमतः नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

आधीचा धागा (http://www.misalpav.com/node/29818)

ठरल्यापरमाणे मिपा संमेलन कशेळी, कर्जत जवळ होणार आहे.

पुण्याहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.इस्पिक एक्का आणि वल्ली, ह्यांच्या संपर्क साधावा.

मुंबईहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.कंजूस, श्री. नूलकर किंवा अजया ज्यांच्याशी संपर्क साधावा.

ह्या संमेलनाचे एक खास वैशिष्ट म्हणजे, श्री. नुलकर आपल्याला "ओरीगामी"ची ओळख आणि काही प्रात्यक्षिके पण दाखवणार आहेत.

मौजमजामाहिती

मवाली भट नी पै

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in जनातलं, मनातलं
28 Dec 2014 - 10:37 am

शीर्षक वाचून धागा उघडल्याबद्दल स्वताची पाठ थोपटून घेतो. स्वतःच्या लेखनाचा दर्जा ओळखून असल्याने अशी रोचक शीर्षके देऊन वाचक मिळवण्याचा क्षीण प्रयत्न.... असो आता मुद्द्याकडे वळूया. तसा आमचा प्रांत भटकंती या सदरातला , परंतु गेले २-३ महिने बंगळुरुला वास्तव्य असल्याने दुर्ग भ्रमंती होत नव्हती. त्यामुळे लेखन होत नव्हते, परंतु बंगुळूरुतील अनुभवांवर लेख लिहायचा विचार होता. तसे आम्ही पडलो अभियंता वर्गातले त्यामुळे ते अनुभव सर्वांस रुचातातच असे नव्हे. त्यामुळे आपल्या खाद्य्भ्रमंतीवर लेख लिहिण्याचा एक प्रयत्न!

संस्कृतीपाकक्रियाराहणीआस्वादशिफारसमाहिती

छायाचित्रण भाग १२. प्रतिमासंस्करणाची मूलभूत तत्त्वे

एस's picture
एस in काथ्याकूट
27 Dec 2014 - 8:24 pm

बजेटनुसार चांगले कॅमेरे

नांदेडीअन's picture
नांदेडीअन in काथ्याकूट
25 Dec 2014 - 8:42 pm

कॅमेर्‍याचे ‘साधारणतः’ तीन प्रकार असतात. (साधारणतः यासाठी की सध्या तरी बाजारात या तीन कॅमेर्‍यांचाच खप जास्त आहे.)
1) Point and Shoot किंवा Compact
2) Bridge किंवा Prosumer किंवा Superzoom
3) DSLR

MirrorLess हा अजून एक प्रकार आहे कॅमेर्‍यातला.
त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हे वाचा.
http://www.tomsguide.com/us/dslr-vs-mirrorless-cameras,news-17736.html

बाइक कुठली घेवू?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
20 Dec 2014 - 11:47 am

मुलाला नविन बाइक घेवून द्यायची आहे.

मला त्यातले काही समजत नाही.

त्यामुळे नेहमी प्रमाणे "कठीण समय येता, मिपाकर मदत करतात" हा अनुभव असल्याने, विचारणा करत आहे.

बजेट : ७० ते ८० हजार

वापरण्याचा कालावधी : जास्तीत जास्त ५ वर्षे.

मायलेज : जितके जास्त तितके उत्तम

रोजचा प्रवास : जास्तीत जास्त १०-१५ किमी. सलग ५-६ किमी.

वापरणार : आकुर्डी (पुणे)

शक्यतो सेकंड हँड नको आहे, पण कुणा मिपाकराची असली तर नक्कीच प्राधान्य.

“पडणे” एक कला

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
15 Dec 2014 - 12:05 pm

दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे. आता तुमच्या लक्षात आले असेच की “पडणे” या विषयावर बोलण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त योग्य व्यक्ती या भूतलावर नाही आहे.

धोरणमांडणीकलापाकक्रियाइतिहासबालकथामुक्तकभाषाव्युत्पत्तीविनोदसमाजजीवनमानऔषधोपचारप्रवासप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाआस्वादसल्लामाहितीसंदर्भमदत

जागो ग्राहक जागो....

मोदक's picture
मोदक in काथ्याकूट
9 Dec 2014 - 2:08 pm

गृहकर्जाबाबत बँकेचे नियम यावरून या धाग्याची कल्पना सुचली..

आपण रोज अनेक ठिकाणी ग्राहक म्हणून वावरत असतो.. बँका / वित्तीय संस्था, डॉक्टर्स, विमानसेवा, मोबाईल / इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर आणि सर्व प्रकारची दुकाने...

या ठिकाणी आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्व मिपाकरांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील..

माझे [ सध्या लगेच आठवणारे ;) ] दोन अनुभव..

*****************************************************************

गृहकर्जाबाबत बँकेचे नियम

स्वधर्म's picture
स्वधर्म in काथ्याकूट
9 Dec 2014 - 11:51 am

नमस्कार मित्रहो.
मी नुकतेच स्टेट बँकेकडून गृहकर्ज घेतले आहे. कर्जाची रक्कम रू. ३५ लाख. बँकेच्या पद्धतीनुसार आधी कर्जाच्या रकमेच्या चेकची छायाप्रत देण्यात आली. त्यावर मी १५ नोव्हें रोजी विकणार्या मालकांबरोबर सेलडीड केले. मग दोघांच्या सवडीने दि. २९ नोव्हें रोजी अ‍ॅपॉइंटमेंट घेऊन बँकेत गेलो व सेलडीड दिले. तेंव्हा प्रत्यक्ष चेक मालकांना देण्यात आला. तो त्यांनी दोन दिवसांनी भरला. मग तो त्यांच्या खात्यावर जमा झाला दि. ४ डिसें रोजी.

अचानक जमून आलेला पाताळेश्वर कट्टा

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
6 Dec 2014 - 7:23 pm

नमस्कार मंडळी.
पुण्याला येण्याचा अचानक योग जुळून आला, आणी त्यातच एक अचानक कट्टापण जमून गेला. वल्लीने सुचवलेलं 'पाताळेश्वर' हे ठिकाण एकदम अद्भुत. प्रशांत वगळता अन्य मिपाकरांशी भेट होण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. चौकटराजा, इस्पिकएक्का, वल्ली, समीर, सूड, धन्या, यसवायजी, प्रशांत .... सर्वांनी उदंड उत्साहानं गप्पा-गोष्टी केल्या. नंतर 'एक कालसर्प आहे खोल आपल्या पोटात दडून' आणि तो बाहेर कसा काढायचा, आणि काढल्यावर घडून येणारे सुपरिणाम, यावर मी स्वानुभाव-कथन केल्यावर मंडळींपैकी काहींनी ते करून बघण्याचा निश्चय केला, आणि त्याची पहिली पायरी म्हणून लगेचच ताज्या फळांचा रस प्राशन करते झालो.

वावरसंस्कृतीऔषधोपचारमौजमजाबातमीअनुभवमाहिती

दिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
4 Dec 2014 - 8:54 pm

खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.

पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.

श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.

आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा?

किती वाजता करायचा?

खायला-प्यायला काय आणायचे?

इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.

तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.

(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)