बजेटनुसार चांगले कॅमेरे

नांदेडीअन's picture
नांदेडीअन in काथ्याकूट
25 Dec 2014 - 8:42 pm
गाभा: 

कॅमेर्‍याचे ‘साधारणतः’ तीन प्रकार असतात. (साधारणतः यासाठी की सध्या तरी बाजारात या तीन कॅमेर्‍यांचाच खप जास्त आहे.)
1) Point and Shoot किंवा Compact
2) Bridge किंवा Prosumer किंवा Superzoom
3) DSLR

MirrorLess हा अजून एक प्रकार आहे कॅमेर्‍यातला.
त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हे वाचा.
http://www.tomsguide.com/us/dslr-vs-mirrorless-cameras,news-17736.html

1) Point and Shoot किंवा Compact
म्हणजे असा कॅमेरा, ज्यात फार काही सेटींग्स कराव्या लागत नाहीत.
ऑब्जेक्टकढे पॉईंट करायचे आणि फोटो काढायचे.
या प्रकारातले काही कॅमेरे इतके छोटे असतात की ते सहज तुमच्या शर्ट किंवा पॅंटच्या खिशात फिट होतात आणि म्हणूनच यांना Compact कॅमेरेसुद्धा म्हणतात.
पण हेसुद्धा लक्षात असू द्या की या कॅमेर्‍याची इमेज क्वालिटी तीनही प्रकारात सगळ्यात कमी असते.
या कॅमेर्‍यांना दुसर्‍या लेन्ससुद्धा लावता येत नाहीत.

हा कॅमेरा कुणासाठी उपयुक्त आहे ?
- ज्यांना अगदी छोट्या साईझचा कॅमेरा पाहिजे.
- ज्यांना कॅमेर्‍यातल्या सेटिंग्सशी काही घेणे देणे नाही.
- ज्यांना वापरायला अगदी सोपा कॅमेरा पाहिजे.
- ज्यांचे बजेट कमी आहे.

या प्रकारातले काही चांगले कॅमेरे :

--- Canon PowerShot SX600 (Rs. 10,490) ---
16 Megapixels
Optical Zoom: 18x
3 inch LCD
http://tiny.cc/sx600hs

--- Canon PowerShot IXUS 145 (Rs. 4,750) ---
16 Megapixels
Optical Zoom: 8x
2.7 inch LCD
Li-ion Battery
http://tiny.cc/ixus145

--- Nikon L29 (Rs. 4,099) ---
6.1 Megapixels
Optical Zoom: 5x
2.7 inch LCD
http://tiny.cc/nknl29

2) Bridge किंवा Prosumer किंवा Superzoom
या कॅमेर्‍यांची खासियत म्हणजे यांची झूम क्षमता !
यातले बरेच फंक्शन्स किंवा सेटिंग्स DSLR सारख्याच असतात आणि त्या तुम्हाला बदलतासुद्धा येतात.
Point and Shoot पेक्षा यांची साईझ थोडी मोठी असते.
या प्रकारातल्या जवळपास सगळ्याच कॅमेर्‍यांना DSLR सारखे electronic viewfinder (EVF) दिलेले असते.
या कॅमेर्‍यांनासुद्धा तुम्हाला दुसर्‍या लेन्स जोडता येणार नाहीत, पण TeleConverter किंवा Filters मात्र लावता येतील.

हा कॅमेरा कुणासाठी उपयुक्त आहे ?
- ज्यांना दूरवरच्या ऑब्जेक्टचे (खासकरून पक्ष्यांचे) फोटो काढायचे आहेत.
- ज्यांना फोटोग्राफी शिकायची आहे, पण DSLR आणि त्यांच्या लेन्सेस घेण्याइतके बजेट नाही.

या प्रकारातले काही चांगले कॅमेरे :

--- Panasonic Lumix DMC-FZ70 (Rs. 19,050) ---
16.1 Megapixels
Optical Zoom: 60x
3 inch LCD
RAW image format
http://tiny.cc/fz70
या रेंजमध्ये माझ्या मते हा सगळ्यात चांगला कॅमेरा आहे.
मी Panasonic चा FZ18 हा कॅमेरा ६ वर्षं वापरलाय, अजूनही काही तक्रार नाही.
तेव्हा Panasonic हा चांगला ब्रॅंड नसेल हा विचारसुद्धा मनात येऊ देऊ नका.

--- Canon PowerShot SX50 HS --- (Rs. 22,096)
12.1 Megapixels
Optical Zoom: 50x
2.8 inch LCD
http://tiny.cc/sx50hs

--- Nikon Coolpix P600 (Rs. 19,494)---
16.1 Megapixels
Optical Zoom: 60x
3 inch LCD
http://tiny.cc/p600

3) DSLR
वापरायला किचकट पण सगळ्यात चांगली इमेज क्वालिटी देणारा कॅमेरा.
याला तुम्ही वेगवेगळ्या लेन्स लावून वापरू शकता.
या कॅमेर्‍यांबद्दल लिहायला खूप काही आहे, पण ते टेक्निकल होईल म्हणून तूर्त इतकेच.

या प्रकारातले काही चांगले कॅमेरे :

खरं सांगायचं तर इथे fanboys ची मतं जास्त दिसून येतात.
जो निकॉन वापरतो, तो निकॉनचा कॅमेरा सुचवतो आणि ज्याच्याकडे कॅनन आहे तो कॅननच सुचवतो.

इथे मी फक्त चांगल्या Entry Level DSLR कॅमेर्‍यांची नावं देतोय.
त्यांच्याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला फ्लिपकार्ट वगैरेवर सहज मिळून जाईल.

- Nikon D5100, Nikon D5300, Nikon D3300
- Canon EOS 1200D, Canon EOS 1100D

हे सगळे जे लिहिले आहे, ते कुठेही टेक्निकल होऊ नये याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय.
तरीही एखाद्या शब्दाबद्दल किंवा टर्मबद्दल काही शंका असेल तर कृपया विचारा.

इथून पुढे तुम्हाला आणि मला एक्स्पर्ट्सचे मार्गदर्शन मिळेल अशी आशा आहे.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

25 Dec 2014 - 8:46 pm | यशोधरा

निकॉन डी ९० बद्दल काय मत?

नांदेडीअन's picture

25 Dec 2014 - 10:02 pm | नांदेडीअन

हा कॅमेरा मी वापरला नाही.
रिव्ह्यूजमध्ये Noise Reduction आणि एकंदरीतच सगळा Performance चांगला असल्याचे म्हटले आहे.

येडाखुळा's picture

26 Dec 2014 - 12:05 pm | येडाखुळा

एकदम झकास कॅमेरा आहे. गेली ३ वर्षे स्वतः वापरतोय. डी ३०००/३१००/ ५१०० यांच्यावर डी सिरीज लेन्सेस ऑटो फोकस होत नाहीत हा प्रॉब्लेम आहे. डी ९० वर होतात.

एस's picture

27 Dec 2014 - 8:37 pm | एस

D90 हा उत्तम कॅमेरा आहे. पहिला डीएसएलआर ज्यात व्हिडिओ शूटींगची सोय आली. पण डी-९० आता जुना कॅमेरा झाला. डीएसएलआरच्या त्या पिढीला सेकंड जनरेशन कॅमेरे म्हणतात. आता थर्ड जनरेशनही संपायला आली आहे. निकॉनने डी-९० अजूनही चालू ठेवण्याची दोन कारणे म्हणजे हा खूपच लोकप्रिय आणि प्रसिद्ध कॅमेरा आहे. अजूनही डिमांडमध्ये आहे, आणि दुसरे म्हणजे डी-९० च्या संवेदकाची डाय एफिशिएन्सी ही ९०-९५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने हा कॅमेरा बनवणे निकॉनला खूपच किफायतशीर ठरतेय आणि विनाजाहिरात नफाही उत्तम मिळवून देतोय.

D-series लेन्स ऑटोफोकस होण्यासाठी जी बिल्ट-इन फोकसिंग मोटार लागते ती 3xxx किंवा 5xxx सीरीज मध्ये नाही. D7000, D7100 ह्यामध्ये आहे.

चांगला धागा आहे. DSLR मॉडेलची किंमत ?आणि बॉडी अधिक कोणते लेन्स मिळते अथवा कोणते घ्यावे ?माझ्या मते स्वस्त मिळते महणून १८-५५ घेऊ नये.

नांदेडीअन's picture

25 Dec 2014 - 10:09 pm | नांदेडीअन

शक्यतोर 18-55mm लेन्स कॅमेर्‍यासोबतच येते.
18-55mm ही लेन्स फ्रेम कम्पोजिशन शिकण्यासाठी चांगली आहे.
ज्यावेळी तुम्ही नवीन एखादी लेन्स घेता, त्यावेळी जाणीव होते की 18-55mm किती कॅलिबरची लेन्स आहे.

फोटोग्राफीमध्ये तुमची सुरूवात झालेलीच असेल तर 18-55 ऎवजी 35mm किंवा 55mm दोन्ही लेन्स छान आहेत.
35mm लेन्स Day-today, Street आणि थोड्याफार प्रमाणार Portrait साठी खूप चांगली आहे.
55mm चा प्रामुख्याने Portraits साठी वापरली जाते.

55-300 किंवा या रेंजच्या इतर लेन्सेसमध्ये Portrait फोटोग्राफी तर होतेच, शिवाय Bird फोटोग्राफीसुद्धा करता येते.

कंजूस's picture

28 Dec 2014 - 6:04 am | कंजूस

कैनन /निकॉन यांच्या 28mm ,f/2.8 prime लेन्सचे फोटो भन्ना येतात. बिल्डिँगज, घरात, रस्त्यातले, निसर्ग यांसाठी उत्तम.

ज्यांना कैमराबद्दल काहीच माहिती नाही त्यांनी दोनतीन दुकानातल्या मांडून ठेवलेल्या आणि आपल्या बजेटमधल्या कैमऱ्यांचे मॉडेल नं लिहून आणावे आणि त्यातला कुठला घेऊ हे माहितगारांस(दुकानदारास नाही) विचारून कैमरा घ्यावा.

त्रिवेणी's picture

25 Dec 2014 - 9:20 pm | त्रिवेणी

ध न्य वा द. आ प ण धा गा का ढ ला त त्या ब द्द ल. न क्की च म ह त्वा ची मा हि ती मि ळे ल ई थे.

जे एस सर्वेश्वर's picture

25 Dec 2014 - 10:02 pm | जे एस सर्वेश्वर

मन:पुर्वक धन्यवाद!
खरं तर कधी पासून अशा प्रकारच्या मार्गदर्शनाच्या शोधात होतो.
पहिला कॅमेरा घेण्याच्या विचारात काहीशा गोंधळलेल्या काहीशा घाबरलेल्या स्थितीत अचूक मार्गदर्शन हे महत्त्वाचे असते

नांदेडीअन's picture

25 Dec 2014 - 10:15 pm | नांदेडीअन

बरेच लोक इथेच फसतात बिचारे.
एखाद्या जाणकाराला विचारण्याऎवजी दुकानदारालाच त्याबद्दल विचारत असतात.
तो एकतर स्टॉकमध्ये पडलेला कोणता तरी कॅमेरा देऊन टाकतो किंवा जास्त Megapixels असलेला कॅमेरा देऊन टाकतो.

जास्त Megapixel आहे म्हणून कॅमेरा जास्त चांगला होत नसतो.
जर तुम्हाला खूप मोठ्या साईझमध्ये फोटो प्रिंट काढून घ्यायच्या असतील तरच Megapixel कडे लक्ष द्यावे.
नाहीतर 10-12 megapixel चा कॅमेरासुद्धा खूप चांगले रिजल्ट्स देतो.

कैमऱ्यात १२ /१५ मेगा पिक्सेल असले तरी फोटो मेमरी कार्डात साठवला जातो तो कमी एमबी चा तर हाच आकडा खरा महत्त्वाचा ठरतो प्रिंटस काढताना अथवा मोठ्या स्क्रीनवर पाहताना. 'रॉ फॉर्मेट सेव' चा पर्याय वापरला तरच काही फायदा होतो. परंतू यावेळी दोन शॉटसमध्ये बराच वेळ जातो.

मोबाइलच्यापेक्षा वेगळे आणि चांगले फोटो येण्याच्या अपेक्षेने कैमरा घ्यायचा असल्यास CMOS सेंसर ऐवजी CCDसेंसर असणारा घ्या.

कैमरा कंपन्यांचीच मॉडेल्स घ्यावीत उदा॰कैनन, निकोन, सोनी, फुजी .वॉशिंगमशिन बनवणाऱ्यांची घेऊ नका .

नांदेडीअन's picture

26 Dec 2014 - 9:05 am | नांदेडीअन

कॅमेर्‍याचे Megapixels सेटिंग्समधून कमी जास्त करता येतात.
20 megapixel असलेल्या कॅमेर्‍यातूनसुद्धा तुम्ही सेटिंगमध्ये बदल करून 5 megapixel ने फोटो काढू शकता.

आणि जर फोटो १००% क्रॉप करूनच वापरायचा असेल तर जास्त megapixel असलेला Crop Sensor DLSR घेणे कधीही चांगले.

'रॉ फॉर्मेट सेव' चा पर्याय वापरला तरच काही फायदा होतो. परंतू यावेळी दोन शॉटसमध्ये बराच वेळ जातो.

यासाठी Class 10 चे SDHC कार्ड वापरावे.
आणि त्यातही Sandisk चे घेतले तर अगदी उत्तम.
सोप्या शब्दात तुलना करायची असेल तर Samsung चे Class 10 म्हणजे Sandisk चे Class 4

मोबाइलच्यापेक्षा वेगळे आणि चांगले फोटो येण्याच्या अपेक्षेने कैमरा घ्यायचा असल्यास CMOS सेंसर ऐवजी CCDसेंसर असणारा घ्या.

CCD आणि CMOS मधला फरक मलाही जास्त माहित नाही.
फक्त इतकेच माहित आहे की CMOS सेन्सर असलेल्या कॅमेर्‍यांमध्ये Noise Reduction थोडे अधिक प्रभावी असते.

थोडे उलगडून सांगाल का प्लिज ?
CCD आणि CMOS चे फायदे-तोटे थोडक्यात सांगता येतील का ?

राघवेंद्र's picture

30 Dec 2014 - 11:30 pm | राघवेंद्र

Sandisk हे नाव SANjay’s DISK असे आहे का ? संजय मेहरोत्रा यांनी हि कंपनी काढली आहे.

मदनबाण's picture

31 Dec 2014 - 1:34 pm | मदनबाण

Sandisk हे नाव SANjay’s DISK असे आहे का ? संजय मेहरोत्रा यांनी हि कंपनी काढली आहे.
या विषयी इकडे :- http://www.successstory.com/companies/sandisk

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business
Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project
Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions
US opening of oil export tap widens battle for global market

मुक्त विहारि's picture

26 Dec 2014 - 7:48 am | मुक्त विहारि

कूलपिक्स आहे.सध्या मुले वापरतात.

मला आता माझ्यासाठी कॅमेरा घ्यायचा आहे.

शक्यतो बाहेर वापरायला, कारण कूलपिक्सचा वापर करून घरात काढलेले फोटो उत्तम येतात.(अर्थात मुलांनी.....मुले आमच्या हातात कॅमेरा देत नाहीत.)

अल्पिनिस्ते's picture

26 Dec 2014 - 11:02 am | अल्पिनिस्ते

चिंचवड मधे फोटोग्राफीचे चांगले क्लासेस कुठे आहेत ?

मुक्त विहारि's picture

26 Dec 2014 - 11:09 am | मुक्त विहारि

बहूदा रानडे आडनावाचे...

ते मध्यंतरी मिपावर एक लेखमाला लिहीत होते.ते इराणला होते आणि त्यांची बायको इराणी आहे.

आमच्या मेंदूच्या मेमरी कार्डचा लोच्या आहे.त्यामुळे अर्धवट माहिती बद्दल क्षमस्व.

जमल्यास, आज उद्या कडे अज्जुन थोडी माहिती शोधतो आणि देतो.

अल्पिनिस्ते's picture

26 Dec 2014 - 11:12 am | अल्पिनिस्ते

त्या लेखमालेची लिंक द्या कि राव

मुक्त विहारि's picture

26 Dec 2014 - 11:31 am | मुक्त विहारि

आमच्या मेंदूचा मोमेंटो झाला आहे...

नांदेडीअन's picture

26 Dec 2014 - 11:24 am | नांदेडीअन

हेच का ते रानडे ?
http://misalpav.com/user/6261/authored

मुक्त विहारि's picture

26 Dec 2014 - 11:30 am | मुक्त विहारि

हेच ते...

अल्पिनिस्ते's picture

26 Dec 2014 - 11:27 pm | अल्पिनिस्ते

बघतो सापडतायत का गावात

येडाखुळा's picture

26 Dec 2014 - 12:08 pm | येडाखुळा

डी ९० मस्त कॅमेरा आहे. डी ३०००/३१००/ ५१०० यांच्यावर डी सिरीज लेन्सेस ऑटो फोकस होत नाहीत हा प्रॉब्लेम आहे. डी ९० वर होतात.

कमी उजेडातल्या फोटोंसाठी CCD सेंसर असावा लागतो तो CMOS च्यापेक्षा चौपट सक्षम (light sensitivity)असतो.
याउलट सेंसरवरची प्रतिमा CMOS चौपट वेगाने मेमरी कार्डवर पाठवतो त्यामुळे व्हिडिओ साठी CMOS सेंसर चांगला.

आता backlit-CMOS नावाची नवीन पद्धतीने CMOSची संवेदनक्षमता वाढवण्यात आलेली आहे तर खूप वेगवान प्रसेसर वापरून CCDचा व्हिडिओरेट वाढवला आहे.

नांदेडीअन's picture

27 Dec 2014 - 8:15 pm | नांदेडीअन

माहितीबद्दल धन्यवाद.

नांदेडीअन's picture

30 Dec 2014 - 12:56 pm | नांदेडीअन

फ्लिपकार्टवर निकॉन डी ३२०० आज २३,००० ला मिळतोय फक्त.
सोबत 8GB कार्ड आणि कॅमेरा बॅग फ्री आहे.
http://www.flipkart.com/nikon-d3200-dslr-camera/p/itmdyz8hpwfdydv2?pid=C...

सुबोध खरे's picture

1 Jan 2015 - 12:32 pm | सुबोध खरे

आपल्या ताजमहालाला आमची वीट
जर बजेट थोडे वाढवता आले तर निकॉन D ३३०० घ्या
कारणे खालील दुव्यात मिळतील. मी असाच शोध घेऊन D ३३०० आणी १८-५५ मिमी आणी ५५ ते २०० मिमी भिंगांची जोडी फ्लीप कार्ट आणी स्नापडील वरून घेतली. D ३३०० आणी १८-५५ मिमी २७,६००/- आणी ५५ ते २०० मिमी ८,२००/- ला
http://www.digitalcameraworld.com/2014/01/15/nikon-d3300-vs-d3200-vs-d31...
हे म्हणजे ग म भ न साठी पारकरचे पेन घेण्यासारखे आहे.

बस स्टॉपवर बसची वाट पाहून कंटाळला आहात आणि बऱ्याच वेळाने रिक्षावाले येऊन विचारू लागले येणार का ?येणार का ? {=मागे रिकामी बस येत आहे .}

जाहिरातबाजीत अमुक अमुक बरोबर तमुक मिळतंय {=हे मॉडेल विकलं जात नाहीये अथवा याच्यातल्या त्रुटी काढून कंपनी नवीन मॉडेल आणत आहे.}

उदा फोनचे घ्या.
लुमिआ ६३० बारा हजारला आला. ५१२ रैममुळे आणि फलैश, फ्रंट कैमरा नसल्यामुळे जात नव्हता. दिवाळीत तो ९ हजारात काढला. आता ८हजारात दुकानात मिळतो.
नवीन माईक्रो लु ५३५ दोन कैमरे, फ्लैश १जीबीरैम सह ९ हजारात आणला

फक्त सॉफ्टवेरच्या रांगोळीने सजवलेल्या इ वस्तु नंतर स्वस्त होतात.

मदनबाण's picture

2 Jan 2015 - 1:52 pm | मदनबाण

इथे :- http://www.dxomark.com/Cameras/Ratings जाउन कॅमेर्‍याच्या सेंसरची रेटींग्स पहावीत, त्यामुळे ठरवलेल्या बजेट मधला उत्तम सेंसर असलेला कॅमरा निवडता येइल.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
China builds lighter tanks for Tibet border
Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF
Russia looks to boost defence ties with India
Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B
Auto bailout cost the US goverment $9.26B
Analysts foresee bad year for U.S. government bonds
Google Fiber services may launch in India soon
Telcos to make tough calls as spectrum war heats up

कंजूस's picture

2 Jan 2015 - 6:51 pm | कंजूस

@मदनबाण, आजची सही पाहता "मदनबाण म्हणे/उवाच" धागा चालू कराच.

मदनबाण's picture

3 Jan 2015 - 9:07 am | मदनबाण

@कंजूस मामा
स्वारी... काल जरा डोस जास्तच झाला बरं का ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHO SHAMBHO SHIVA SHAMBHO SVAYAMBHO

@मदनबाण ,टोचलं नाहीये खरंच हवाय धागा. मीपण तीनचार वेबसाईटसचे (कैमरा, फोनस, रेल्वे इ॰साठी) RSS FEEDS केले आहेत परंतू आर्थिकचे नाहीत. ते जरा डोक्यावरून जातं. त्याचं दोनचार ओळीत टिपण चालेल.

टोचलं नाहीये खरंच हवाय धागा.
हो ते कळलयं मला, पण जालावर वाचन करताना मी काही विषय ठरवुन निवड करत नाही, मग त्या बातम्या असोत, माहिती असो वा गाणं किंवा Quotes. हा सहीतला उध्योग बराचसा माझ्या मूडवर देखील अवलंबुन असतो.
आता धागा काढणे मला आवडेल, पण तो धागा पोस्टींगला उलटा असावा असे मला वाटते,म्हणजे नविन प्रतिसाद वर यावा आणि जुने प्रतिसाद मागे जावेत...म्हणजे अपेडेट्स वरच पोस्ट करता येतील आणि वाचकांना नव्या अपडेट्ससाठी पाने उलटत मागे जाण्याची तसदी घ्यावी लागणार नाही,तसेच जुने अपडेट्स अपोआप मागे गेल्यामुळे त्यांचा क्रम सुद्धा योग्य दिसेल. पण असे करणे शक्य आहे का ते माहित नाही ! त्यामुळे सध्या तरी मी असा धागा काढत नाही...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHO SHAMBHO SHIVA SHAMBHO SVAYAMBHO

कंजूस's picture

3 Jan 2015 - 1:39 pm | कंजूस

सोप्प आहे लेखकाच्या मागणीनुसार बिल्डिंग ब्लॉक्स गेमसारखे खरडफळाछाप टेम्प्लेट निवडायचा पर्याय ठेवायचा नाहीतर सर्कशितले झोपाळ्यावरचे खेळाडू वरच्याचे पाय ओढत लटकतात तसा आपला नेहमीचा प्रतिक्रिया खाली द्या आहेच.

लेखकाच्या मागणीनुसार बिल्डिंग ब्लॉक्स गेमसारखे खरडफळाछाप टेम्प्लेट निवडायचा पर्याय ठेवायचा
हे कसे करावे ? आपल्याला माहित असल्यास मला सांगा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHO SHAMBHO SHIVA SHAMBHO SVAYAMBHO

तुम्हाला हवे असलेले नवीन नोंदी वरती आणि जुन्या खाली हा फॉर्मेट मिपाच्या खरडफळ्यात तयारच आहे. फक्त तो कोड मिपाने आपल्याला नवीन लेखन करा मध्ये पर्याय उपलब्ध करून दिला की झाले असं म्हणायचे आहे. बऱ्याच जणांनी मागितले आणि सर्वरवर ताण पडत नसेल तर करायला हरकत नाही.

आता नांदेडिअन म्हणतील इकडे चर्चा बजेटचीही नाही आणि कैमऱ्यांचीही नाही.

नांदेडीअन's picture

4 Jan 2015 - 7:48 am | नांदेडीअन

नाही, मी काही नाही म्हणणार. :)
फक्त कुणाचा काही प्रश्न असेल तर तो अनुत्तरित राहू नये इतकीच काळजी घ्यावी लागेल आपल्याला.