माहिती

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in काथ्याकूट
2 Feb 2015 - 10:08 pm

मी जी काही खाली माहिती देत आहे ती अधिकृत शासकीय माहिती समजू नये.
योजनेचे नाव "राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना"(सोयीसाठी "रा. गां. योजना").
हि योजना महाराष्ट्रातील नागरिकांचा विनामुल्य आरोग्य विमा आहे असं थोडक्यात म्हणता येईल.
आणि योजना म्हंटलं कि अटी आल्या.

लहान मुलांसाठी मोबाईल अ‍ॅप

बटाटा१'s picture
बटाटा१ in काथ्याकूट
1 Feb 2015 - 7:41 am

माझा मोठा मुलगा सव्वा दोन वर्षाचा आहे, त्याची आयपॅड ची सवय घालवण्या खुप प्रयत्न केला पण दिवसातुन थोडावेळ तरी त्याला आयपॅड वापरायचा असतो. आयपॅड ला शिक्षणाचे साधन म्हणून कसे वापराता येईल याचा शोध घेतांना काही चांगली आणि काही बरिचशी पेड अ‍ॅप्स मिळाली.

मुलांसाठी चांगली अ‍ॅप्स सुचवावी म्हणून हा धागा काढत आहे. सध्या मी माझ्या मुलासाठी वापरत असलेली अ‍ॅप्स-

अगा जे घडलेची नाही...अर्थात न उडालेले वैदीक विमान !

स्वप्नांची राणी's picture
स्वप्नांची राणी in जनातलं, मनातलं
31 Jan 2015 - 4:36 pm

सुरुवातीला एक चेंडू घरंगळत येतो आणि एका कश्यातरी बांधलेल्या पट्टीवरून धडपडत जाऊन दुसर्‍या चेंडूवर आपटतो..की तो दुसरा चेंडू वरुन खाली टूणकन उडी मारतो आणि एक चाक गरागरा फिरायला लागते. मग त्यामुळे पुढे बरेचसे चेंडू पळापळ करून चाके फिरवतात आणि शेवटी अचानक एक म्हातारा दोरांसकट एका बोटीच्या नाळेवर हवेत उचलला जातो. आपली रोझ आणि जॅक जसे टायटॅनिकवर उडण्याची अ‍ॅक्शन करतात ना तसं, फक्त हा जरा जास्त हवेत दाखवलाय. हा सीन पुढे पिक्चरमधे किमान चारवेळा येतो आणि उत्तरोत्तर तो तितकाच अनकन्विन्सिंग होत जातो....सीनही आणि साहजिकच सिनेमाही!

विनोदसमाजमौजमजाचित्रपटआस्वादसमीक्षामाध्यमवेधअनुभवमतमाहितीविरंगुळा

इराकची खातून

विशाखा पाटील's picture
विशाखा पाटील in जनातलं, मनातलं
29 Jan 2015 - 12:25 pm

अमेरिकेने इराकवर हल्ला केला आणि इराकची वाताहत सुरू झाली. २००३ मध्ये अमेरिकेने हा हल्ला केला तेव्हा अमेरिकेच्या सैन्याने सर्वात आधी तेलमंत्रालयावर कब्जा केला. जवळच बगदादच समृद्ध वस्तुसंग्रहालय होतं. तिथे फक्त दोन सैनिक एका रणगाड्यावर उभे होते. त्यांना न जुमानता लोकांनी हजारो वर्षांचा ठेवा लुटून नेला. सुमेरिअन, बेबिलोनिअन, अकडीअन, ऑटोमन संस्कृतीचा वारसा सांगणारा हा अनमोल खजिना लोकांनी दिवसाढवळ्या लुटला. हा ऐवज जगभर विकला गेला. या वास्तूसंग्रहालयाची संस्थापक होती गरट्रुड बेल ही ब्रिटीश स्त्री. खरं तर, ही इराक या देशाची शिल्पकार. या देशाचा नकाशा घडवणारी एक चतुर स्त्री.

इतिहासमाहिती

मेरा सुंदर सपना बीत गया.....

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Jan 2015 - 2:48 pm

पूर्वप्रकाशित ...

ती एक न उलगडलेलं कोडं होती. एक अधुरी राहून गेलेली कविता होती. तीन दशक..., जवळजवळ तीन दशके तीने आपल्या नजाकतभर्‍या , मादक स्वरांच्या जोरावर रसिकांच्या मनावर अनभिषीक्त साम्राज्य गाजवलं.

संगीतचित्रपटआस्वादलेखमाहितीप्रतिभा

खाद्यभ्रमंती - पुणे

नांदेडीअन's picture
नांदेडीअन in काथ्याकूट
22 Jan 2015 - 11:16 am

खाण्या-पिण्यासाठीच्या पुण्यातल्या चांगल्या जागांचा एक नवीन डेटाबेस तयार करायचा का ?
बादशाही, श्रेयस, पीके, गुडलक, वैशाली या हॉटेल्सची महती एव्हाना पुण्याच्या बाहेरसुद्धा पोहोचली असेल.

थोडा वेळ काढून काही नवीन हॉटेल्सची नावं सांगा, जेणेकरून माझ्यासारख्या खादाडांना खाद्यभ्रमंती करता येईल.

चला, सुरूवात मीच करतो.

- चांदणी चौक (बावधन) जवळचे ’टेस्टी टंग्स’ चाटसाठी चांगले आहे.

बावन्नकशी अभिनयाचा राजकुमार ’फारुक शेख’ !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
21 Jan 2015 - 1:16 pm

नववी - दहावीचा काळ , खासकरून दहावीचा काळ थोडा विचित्रच होता, किंबहुना तो तसा असतोच. विचित्र एवढ्यासाठी की बरोबरच्या कुठल्याही मित्राला अगदी सुटीच्या दिवशी जरी विचारले,"चल बे, पिक्चर टाकु आज" , तर एकच उत्तर मिळायचे ...

"नाही बे, दहावीचे वर्ष आहे. अभ्यास कसला डेंजर आहे. आई-बाबा हाणतील धरुन पिक्चरला जातो म्हण्लं तर."

कलाचित्रपटआस्वादमाहितीप्रतिभा

गर्तेत जाणारे जागतिक अर्थकारण : अशक्तांबरोबर सशक्तांचाही कपाळमोक्ष अटळ आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
21 Jan 2015 - 1:49 am

जगाची अर्थिक विभागणी

हे जग अर्थिक दृष्ट्या सर्वसाधारणपणे "आर्थिकदृष्ट्या सबळ आणि देणेकरी उर्फ सधन पुढारलेले देश आणि म्हणुनच दादा देश" आणि "आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि घेणेकरी उर्फ विकसनशील / अविकसित देश आणि म्हणूनच दादा देशांवर कमीजास्त प्रमाणात अवलंबून असलेले देश" असे विभागलेले गेलेले आहे.

अर्थकारणाचे राजकारण आणि राष्ट्रिय कर्जे

अर्थकारणमाहिती

नारायण धारप यांच्या भयकथा !!!

किल्लेदार's picture
किल्लेदार in जनातलं, मनातलं
20 Jan 2015 - 11:55 am

भयकथांचे जे भोक्ते आहेत त्यांना नारायण धारप हे नाव माहीत नाही असे होणार नाही. मराठीत जे मोजके भयकथाकार आहेत त्यात नारायण धारप हे पितामह ठरावेत. अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे धारपांचे वैशिष्ट्य. त्यांचीच "चंद्राची सावली " ही गोष्ट वाचतांना लहानपणी सर्वजण घरात असूनही अंगावर शहारे आले होते. स्वतः विज्ञानात पदवीधर असल्यामुळे त्यांची भीतीची मांडणीदेखील अतिशय शास्त्रोक्त अशी असावी. जवळपास सर्व पुस्तकात असलेला समान धागा म्हणजे चांगल्या शक्तींचा वाईटावर विजय. त्यामुळे भीतीदायक वातावरणनिर्मिती करूनही शेवटी एक दिलासा असायचा.

कथामाहिती

Bio-Medical उपचारपद्धती व Autism

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture
स्वमग्नता एकलकोंडेकर in जनातलं, मनातलं
18 Jan 2015 - 12:09 pm

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

माझ्या नवीन वर्षाच्या संकल्पानुसार मी माझा आउटलुक बदलण्यावर गेला महिनाभर काम करत आहे. मैत्रिणींशी/काही जवळच्या नातेवाईकांशी खुल्या मनाने चर्चा केली. आता मला पुन्हा नव्याने पॉझिटीव्ह दृष्टीकोनाने कामाला लागायची प्रेरणा मिळाली.  :)

एक मुख्य संवादाचे, प्रेरणेचे साधन आहे ते हे लेख लिहीणे. फार स्ट्रेंजली मला ही लेखमालिका लिहून बरं वाटतं! कदाचित माझ्याच डोक्यातील विचारांचा नीट निचरा होत असावा? किंवा सगळे विचार डोक्यात गरगर फिरण्याऐवजी कागदावर ऑर्गनाईझ्ड पद्धतीने उमटले की बरं वाटत असावे. त्यामुळेच या वर्षीचा पहिला लेख लिहीत आहे.

समाजमाहिती