राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in काथ्याकूट
2 Feb 2015 - 10:08 pm
गाभा: 

मी जी काही खाली माहिती देत आहे ती अधिकृत शासकीय माहिती समजू नये.
योजनेचे नाव "राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना"(सोयीसाठी "रा. गां. योजना").
हि योजना महाराष्ट्रातील नागरिकांचा विनामुल्य आरोग्य विमा आहे असं थोडक्यात म्हणता येईल.
आणि योजना म्हंटलं कि अटी आल्या.

प्रस्तावना
१> योजना पूर्वी म्हणजे २ जुलै २०१२ ला प्रायोगिक तत्वावर केवळ ८ जिल्ह्यात लागू करण्यात आली होती. याला Phase - I म्हणतात.
योजनेंअतंर्गत येणाऱ्या ८ जिल्ह्यांची नावे :- अमरावती, रायगड, सोलापूर, धूळे, नांदेड, गडचिरोली, मुंबई, मुंबई उपनगर(दहिसर, मुलुंड, मानखुर्द पर्यंत).
२> योजनेंअतंर्गत ९७२ उपचार व १२१ पाठपुरावा सेवा निवडल्या गेल्यात. रुग्णाचा उपचार या ९७२ उपचारांपैकी असावा(हे वैद्यकीय सल्लागार ठरवतात).
३> २१ नोवेंबर २०१३ पासून योजना उर्वरित महाराष्ट्रात (थोडक्यात संपूर्ण महाराष्ट्रात) राबवण्यात आली. सहाजिकच उर्वरित महाराष्ट्र Phase - II.
४> आता योजनेत ९७१ उपचार व १२१ पाठपुरावा सेवा निवडल्या गेल्यात. (शेवटी दिलेल्या संकेत स्थळावर यादी उपलब्ध).

पात्रतेविषयी बोलू.
पात्र रुग्णांना लागणाऱ्या कागदपत्रांविषयी
१> रुग्ण हा या महाराष्ट्रीय असावा, तसे सिद्ध करण्यासाठी त्याकडे शिधापत्रक हवे. त्यासोबत रुग्णाचे एखादे ओळखपत्र(मतदान पत्र, आधार पत्र, ई) देखील असावे.
२> शिधापत्रक पिवळे/केशरी असावे (केशरी असल्यास वार्षिक उत्पन्न १ लाखाहून कमी असावे.)
३ > इस्पितळात दाखल होते वेळी हे कागदपत्र(Original) त्याने सोबत घेऊन यावे व त्या इस्पितळातील योजनेच्या कार्यालयात द्यावित.
४ > रुग्णांकडे "राजीव गांधी आरोग्य पत्र"( RAAJIV GANDHI HEALTH CARD)(केवळ Phase - I मधील,Phase - II मधील आरोग्यपत्र निरुपयोगी) असल्यास त्यावर रुग्णाचे नाव व त्याचा फोटो ठळक असल्याचे निश्चित करून घ्यावे, असल्यास केवळ तेवढेच पुरेसे आहे.
५ > यांव्यतिरिक्त "अन्नपूर्णा" व "अन्तोदय" योजनेचेहि पत्रक चालतील, पण ते याच ८ जिल्ह्यांपैकी एकातले असावे.(मी अजूनपर्यंत तरी हे दोन्ही पत्रकं पाहिली नाहीत)

पात्र उपचारांविषयी
१> रुग्णाचे केवळ कागदपत्र पात्र असून उपयोग नाही तर त्याचा उपचार देखील ९७१ पैकी असावा तरच तो लाभार्थी ठरतो.
२> उपचारांचे दोन वर्गात वर्गीकरण करता येईल "नियोजित उपचार(ठरवून केले जाणारे)" व "आपत्कालीन उपचार".
३> उपचार नियोजित असल्यास रुग्णालयात दाखल होते वेळीच कागदपत्र दाखवून नाव नोंदनी करून घ्यावी.
उपचाराकरिता लागणारी शासकीय मंजुरी/ अनुमती येण्यास ६-२४ तास लागू शकतात.(सर्व बाबी बरोबर असल्यास).
४>आपात्कालीन वेळेत रुग्णाला दाखल करतेवेळेस उपचार योजनेत करायचे आहेत असे रुग्णालयाला सांगावे. आपात्कालीन उपचार केले जातात व कागदपत्रांचे सोपस्कार पार पाडण्यास रुग्णाच्या नातेवाईकांना ७२ तास दिले जातात.

रुग्णांना रुग्णालयात आल्यावर येणाऱ्या अडचणी
१> सर्वप्रथम रुग्णांना आपण या योजनेत मोडतो कि नाही हेच माहित नसतं.
२> योजनेची माहिती असली तरीही बरेच रुग्ण/रुग्णाचे नातेवाइक दाखल होते वेळी नाव नोंदणी करून घेत नाहीत व इस्पितळातून discharge च्या वेळेस राजीव गांधी आरोग्य पत्रक दाखवून केलेला खर्च परत मागतात(गुंठा मंत्री/भाऊ/ आबा/ आप्पा/ यांची ओळख सांगणारे) .
३> ऐन वेळेस शोधून आणलेले जीर्ण झालेले कागदपत्र .

रुग्णांनी/नातेवाईकांनी घ्यावयाची खबरदारी.
१> रुग्णाला इस्पितळात दाखल केल्यावर त्याचे कागदपत्र (Original ) घेऊन "राजीव गांधी" कार्यालयात संगणकीकृत नोंदणी करवून घेने.
२> नोंदणी करवून घेतल्यावर नोंदणीच्या दाखल्यासोबत एक (आणखी एक किंवा नोन्दनिच्याच दाखल्यावर मागील बाजूस) दाखला दिला जातो(PREAUTH/PREAUTHORISATION ).
३> हा अतिरिक्त दाखला (PREAUTH ) रुग्णावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सल्लागाराने भरावयाचा असतो.
४> हा दाखला (PREAUTH ) वैद्यकीय सल्लागाराकडून लौकरात लौकर भरवून घेण्याचे काम रुग्णाचे/नातेवाईकांचे असते. जर लागणारा उपचार योजनेंअतंर्गत येत असेल तरच वैद्यकीय सल्लागार हा दाखला भरतिल.
५> नंतर हा भरलेला दाखला (PREAUTH ) पुन्हा "रा. गां" कार्यालयात देणे (हा दाखला शासनाकडून उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची मागणी असते).
६> कार्यालयात दिल्यानंतर कार्यालयातून याच दाखल्याचे संगणकीकृत तीन पाने दिली जातात ज्यावर योजनेचे वैद्यकीय सल्लागार (Medical Co -ordinator) सही करतात.
७> शासनाकडून सर्व बाबी तपासून त्वरित अनामत रक्कम मंजुर केली जाते .
८> या मंजुरीत रक्कम व उपचार या दोन्ही गोष्टी नमूद असतात.
९> हि रक्कम रुग्णांना न भेटता ती इस्पितळास मंजूर होऊन येते.

रुग्णांना भेटणाऱ्या वैद्यकीय सेवेचे स्वरूप
रुग्णालयातील खाटा
निदान सेवा
भूल सेवा व शस्त्रक्रिया
आवश्यक औषधोपचार
शुश्रुषा व भोजन
एक वेळेचा परतीचा प्रवास खर्च.
प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत, केवळ किडनी प्रत्यारोपानासाठी २.५ लाख रुपये पर्यंत मदत. (प्रती वर्ष )

योजनेची माहिती/मदत व अन्य कोणत्याही मदतीकरिता रुग्ण/नातेवाईक रा. गां. योजनेचे कर्मचारी ज्यांना आरोग्यमित्र म्हणतात त्यांची मदत घेऊ शकतात.
आरोग्यमित्र हे २४ तास मदतीस उपलब्द्ध व तत्पर असतात.
कुठल्याही वेळी ग्राहक सेवा केंद्राशी सहाय्यते साठी संपर्क साधता येईल. ह्याचाशी निगडीत दूरसंचार क्रमांक खालील प्रमाणे :
निशुल्क सेवा माहिती : १८०० २३३ २२ ००/१ ५ ५ ३ ८ ८ .
या क्रमांकावर संपर्क करून जवळच्या इस्पितालाविषयी चौकशी करू शकतो आणि संकेत स्थळ इथे.

इतर काही मदत लागल्यास मी आहेच.

प्रतिक्रिया

विलासराव's picture

2 Feb 2015 - 10:26 pm | विलासराव

नुकतेच माझ्या भावाच्या ३ महीने वयाच्या मुलाचे हॄदयाचे (हॄदयाला छिद्र) ऑपरेशन ससुनला झाले. खर्च आला नाही या योजनेमुळे.
पण दिनानाथ मंगेर्शकर रुग्नालायाने ३.५ लाख खर्च सांगीतला होता. दिनानाथला ही योजना लागु आहे का? यावर माहीती दिलीत तर बरे होईल.

म्हया बिलंदर's picture

2 Feb 2015 - 10:59 pm | म्हया बिलंदर

अंगीकृत रुग्णालयांची यादी संकेत स्थळावर Network Hospitals सदरात मिलेल. दिनानाथ मंगेशकर रुग्णालय अंगीकृत नाही.

विलासराव's picture

3 Feb 2015 - 2:00 pm | विलासराव

धन्यवाद.

ससुननेही काही साहीत्य उपलब्ध नाही म्हणुन १५००० घेतले. पण त्याची रीतसर पावतीही दिलीय.

उपचार मोफत म्हणजे सर्वच गोष्टी विनामुल्य.
सविस्तर माहिती मिळाली तर अधिक भाष्य करणे सुलभ जाइल.

विलासराव's picture

3 Feb 2015 - 2:02 pm | विलासराव

उपचार मोफत म्हणजे सर्वच गोष्टी विनामुल्य.
सविस्तर माहिती मिळाली तर अधिक भाष्य करणे सुलभ जाइल.

खरय. सविस्तर माहीती मिळवण्याचा प्रयत्न करुन इकडे देतो.

मुक्त विहारि's picture

2 Feb 2015 - 11:03 pm | मुक्त विहारि

उपयुक्त धागा.

धन्यवाद...

पिलीयन रायडर's picture

2 Feb 2015 - 11:23 pm | पिलीयन रायडर

अत्यंत उत्तम माहिती! आणि अगदी व्यवस्थित दिली आहे..
धन्यवाद...

रॉजरमूर's picture

3 Feb 2015 - 1:06 am | रॉजरमूर

खूपच उपयुक्त आणि विस्तृत माहिती ........

hitesh's picture

3 Feb 2015 - 3:48 am | hitesh

छान

अर्धवटराव's picture

3 Feb 2015 - 5:04 am | अर्धवटराव

अत्यंत उपयुक्त माहिती.
धन्यवाद.

मागे खफ वर एक प्रश्न विचारला होता.तोच रिपीट करतो.
'या योजनेत दंतचिकीत्सा का नाही ?'
प्रश्न विचारतोय कारण गावाकडे याची सगळ्यात जास्त गरज असते.

म्हया बिलंदर's picture

3 Feb 2015 - 10:32 am | म्हया बिलंदर

(सर्वस्वी माझे आकलन चू. भू. दे. घे.)
योजनेत असे उपचार घेण्यात आलेत जे न केल्यास रुग्णाच्या तब्येतीवर घातक परिणाम होऊ शकतात.
शिवाय मोठ्या वैद्यकीय संस्थांमध्ये दंतचिकीत्सा बर्याच माफक दारात (कुठे कुठे मोफत देखील) होतात.
दंतचिकीत्सा हि आयुष्य तारणारी उपचार पध्दती कमी व सौंदर्य प्रसाधनात (Cosmetics) जास्त मोडते हा देखील एक मुद्दा.

हि योजना घडत असताना त्यात राज्यातील व देशातील मोठे मोठे वैद्यकीय तज्ञ तसेच क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी यांच्या सल्ल्याने नियमावली तयार करण्यात आलेली आहे. आपल्या सूचना आपण रा. गां. योजनेच्या सोसायटी च्या कार्यालयात द्याव्यात. (तेवढाच आशेचा किरण)

प्रमोद देर्देकर's picture

3 Feb 2015 - 10:10 am | प्रमोद देर्देकर

म्हया बिलंदर तुमचे मि.पा. वर स्वागत. आणि अतिशय छान उपयुक्त माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद.

म्हया बिलंदर's picture

3 Feb 2015 - 10:32 am | म्हया बिलंदर

धन्यवाद...

गब्रिएल's picture

3 Feb 2015 - 10:53 am | गब्रिएल

अत्यंत उपयुक्त माहिती. धन्यवाद !

अवांतर : पुरेश्या माहिती अभावी बर्‍याचदा अश्या चांगल्या प्रकल्पांचे फायदे गरजूंपर्यंत पोचत नाही. इतर प्रकल्पासंबंधीची उपयुक्त माहिती कोणास असल्यास ती इथे टाकल्याने वाचाकांना ती मिळेल आणि पर्यायाने त्या प्रकल्पाच्या उद्देश्याला मदतच होईल.