सध्याची पत्रकारीता
काही महिन्यांपूर्वी आमच्या एका मित्राने दहावीच्या मुलांसाठी करियर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाली. मित्राने माध्यमांशी संपर्क साधला आणि सांगितले की आपण येऊन आमचा कार्यक्रम कव्हर करा. पण टीव्हीवाल्यांनी त्याबाबत उत्साह दाखवला नाही. त्यांचे म्हणणे, अशा कार्यक्रमांमधे कुठलाही व्हिज्युअल कंटेंट मिळत नाही. म्हणजेच कॅमेराने टिपावे अशी कुठली गोष्ट सापडत नाही. दुसरा अर्थ कॅमेरा जे टिपेल तेवढेच आम्ही बातमी म्हणून दाखवतो. कार्यक्रमामधे बसून तो समजावून घेऊन, त्याची बातमी लिहीणे जमत नाही.