प्रकटन

नवी सायकल आणि पहिली सेंच्युरी

mayu4u's picture
mayu4u in जनातलं, मनातलं
8 Nov 2018 - 3:12 pm

(मी पहिली सायकल घेतली तेव्हाचं हे लेखन... अलीकडेच नवीन सायकल घेतली आणि पहिल्यांदाच १०० किमी ची राईड मारली. या अनुभवाविषयी लिहिण्यासाठी सरपंचांनी सुचवलं, तेव्हा मिपाकरांच्या "सायकल सायकल" या कायप्पा समूहावर केलेलं लेखन)

श्री मामा प्रसन्न

क्रीडाप्रकटनअनुभवविरंगुळा

तोळा तोळा

लौंगी मिरची's picture
लौंगी मिरची in जनातलं, मनातलं
7 Nov 2018 - 9:23 am

ओठांवरचे शब्द बोलके
पापण्यांचे खेळ ते बालिश
तुझ्या मिठितले श्वास जिवंत
स्पंदनातुनहि बरसतो आशीष...

मांडणीप्रकटन

मला भेटलेले रुग्ण - १८

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
6 Nov 2018 - 10:53 am

https://www.misalpav.com/node/42929

“डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”.....

टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला ....

ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!”

आरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियाअनुभवसल्लामाहितीप्रश्नोत्तरेआरोग्य

उत्सव...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
31 Oct 2018 - 10:10 am

आजही काहीच पत्ता लागला नाही. दोन दिवसांपासून घरात अक्षरश: सुतकी वातावरण होतं. मुलांच्या डोळ्यातील पाण्याला तर खळ नव्हता. धाकट्या मुलीने तर कालपासून काहीही खाल्लेदेखील नव्हते. तोदेखील विषण्ण होऊन घरात बसला होता. एवढा शोध घेऊनही सापडत नसल्याने स्वत:वरच चरफडत होता. भिंतीवरचा त्याचा फोटो पाहून तर त्याला रडूच कोसळले.
... तेवढ्यात फोन वाजला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता फोन कानाला लावला.
‘हॅलो, मी वृद्धाश्रमातून बोलतोय. तुम्ही दिलेली जाहिरात वाचली. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला तुमचा कुत्रा इथे आलाय. तुमच्या आईशी खेळतोय. लवकरात लवकर या आणि तुमच्या कुत्र्याला घरी घेऊन जा!’

मुक्तकप्रकटन

फडणवीस बुलेटिन ९

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
30 Oct 2018 - 8:43 am

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी एक चांगले काम केले आहे. ऑर्डीनन्स काढून APMC नावाचा शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक असा कायदा बंद केला. ह्यामुळे दलाल लोकांचा माज कमी होईल आणि आपले शेतकरी बंधू आणखीन चार दिवस जगतील अशी अशा करण्यास हरकत नाही.

आता रेइलायन्स, द मार्ट सारख्या कंपन्या थेट शेतकऱ्याकडून माल खरीदू शकतील.

वावरप्रकटन

लुब्री

गीतांजली टिळक's picture
गीतांजली टिळक in जनातलं, मनातलं
29 Oct 2018 - 2:42 pm

हो... कुत्रीच होती ती.
या घरात आम्ही रहायला आलो. यायच्या आधी मागच्या अंगणाला गेट करुन घेतलं. दिवसा बिल्डींगच्या पार्किंगच्या आवारात इकडून तिकडे पळणारं एक कुत्रं दिसायचं वरचेवर.. भटकं..

वाङ्मयमुक्तकप्रकटन

आई

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
21 Oct 2018 - 3:45 pm

एक मनस्वी वादक होता. आत्मानंदी! कलेचा उपासक. रोज सकाळी उठून वाद्य खांद्यावर घेऊन गावाबाहेर दूरच्या डोंगरावरच्या एका कड्याच्या काठी बसायचा, आणि कलासाधनेत मग्न व्हायचा. डोंगरातला वाराही त्या तालावर फेर धरायचा, पक्षी सम साधत गाऊ लागायचे, सारे भवताल सचेतन होऊन जायचे. या वादकाला त्याचा पत्ताही नसायचा. त्याची जादूई बोटं त्या वाद्यावर थिरकत स्वर्गीय नादनिर्मितीत मग्न असायची...

मुक्तकप्रकटन

ब्राह्मणेतरांचे नेते मात्र ब्राह्मण

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
20 Oct 2018 - 2:36 pm

सध्या राम आणि रावण यांच्या निमित्ताने निरनिराळे परस्पर विरोधी मुद्दे मांडले जात आहेत. ते ऐकताना सामान्य माणसाचा संभ्रम वाढतो आहे. रावण हा आदिवासींचा राजा होता त्यामुळे तो आमचा राजा आहे असे काही दलित संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे रामाने त्याची हत्या केली हे योग्य केले नाही आणि म्हणूनच दरवर्षी रावण दहन हेही त्यांना पटत नाही. मरणान्तानि वैराणि असं स्वतः राम म्हटले असतील तर दरवर्षी हा वाद उकरून काढून रावणाला का जाळायचं. अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी सुद्धा अशीच भूमिका घेतली होती इ. इ.

धोरणप्रकटन