शोंना आणि दीडशहाना
तो : शोना, मी फक्त आपल्या भावी आयुष्यासाठीच मी कष्ट घेतोय गं .
ती : काय करतोयस ? असं का बोलतोयस ? तुझ्या तोंडात काही आहे का ?
तो : नाही गं असं का बोलते आहेस ? फक्त अभ्यास करतोय मी .
ती : खरंच कि काय खोटारडा कुठला ?
तो : शोने, तुझ्यासाठी अजून काय काय करायचं ते सांग ?
ती : माझ्याशी खोटं बोललं तर मला खूप चीड येते. खरं सांग.
तो : ते आमच्या रक्तात नाही .
ती : तुझ्या रक्तात काय काय आहे ते बघते नंतर .
तो : रक्तात तुला फक्त प्रेम सापडेल आणि हातात पुस्तकं.
ती : इथे मागे बघ मी इथे तुझ्या मागेच आहे.