हिंदी चित्रपट गीतांचा संस्कृत भावानुवाद

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in जनातलं, मनातलं
11 Mar 2019 - 9:22 am

युट्यबवर सहज फिरता फिरता संस्कृत रुपांतरीत केलेली काही गाणी आढळली. मला संस्कृत येत नसल्यामुळे ती गाणी अर्थाच्या दृष्टीने, व्याकरणाच्या दृष्टीने किती परीपुर्ण आहेत माहित नाही पण ऐकायला मात्र गोड वाटतात. गायकांचा आवाज देखील मस्त आहे. एकंदरीत वेगळा प्रयोग म्हणून बघायचे तर नक्कीच सुंदर प्रयत्न !
काही दुवे येथे देत आहे. उत्सुकांनी एकदा ऐकायला हरकत नाही.

१. धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना

२. मेरे रश्के कमर

३. मिले हो तुम हमको

४. शोले ( कितने आदमी थे )

५. कोरा कागज था यह दिल मेरा

६. अगर तुम मिल जाओ

कलाप्रकटन

प्रतिक्रिया

आरवी's picture

11 Mar 2019 - 5:45 pm | आरवी

मेरे रश्के कमर मूळ गाणे ऐकताना किंवा सहज गुणगुणताना शब्दार्थाबद्दल एवढा विचार केला नव्हता, मात्र संस्कृत अनुवाद ऐकल्यानंतर कुतूहल वाटून हिंदी, उर्दू चा संस्कृत व मराठी अर्थ गुगल केला. मस्त मस्त. आवडलं.

सचिन काळे's picture

11 Mar 2019 - 8:14 pm | सचिन काळे

शोले ( कितने आदमी थे ) मस्तंच आहे.

रोचक! बघते आणि ऐकते. धन्यवाद!

वकील साहेब's picture

12 Mar 2019 - 10:07 am | वकील साहेब

शोले मधील अमजद खानच्या तोंडी जो हरामजादो शब्द आहे तो भाषांतरित न करता अमजद खानच्याच आवाजात जसाच्या तसा दिला आहे.
हरामजादो ला संस्कृत प्रतिशब्द नसेल का ?

गामा पैलवान's picture

12 Mar 2019 - 9:53 pm | गामा पैलवान

हरामजादे = हे दास्यालयजाते

-गा.पै.

संस्कृत भाषेशी केवळ तोंड ओळख असणाऱ्या कुणीतरी हा दयनीय अनुवाद केला आहे. अनेक चुका आहेत. अजिबात आवडला नाही.

चौथा कोनाडा's picture

15 Mar 2019 - 5:33 pm | चौथा कोनाडा

प्रकार आवडला.... गंमत वाटते ऐकताना !