पीरनी बुशराच्या जाळ्यात पाकिस्तान!
बंगाली बाबा
रोज पेपरात, लोकलट्रेनमधे अशा बंगाली बाबूंच्या कडून वशीकरण आणि मुठ मारणे वगैरे हातखंडे वापरून जनतेला त्यांच्या वैयक्तिक कटकटी, शारीरिक समस्या, सहजासहजी सोडवायची हमी देणार्या छोट्या मोठ्या जाहिराती वाचून आपण सोडून देतो. काहीजण त्यांच्याकडे जाऊन समस्त समस्यांवर तोडगे, तोटके यांवर अवलंबून त्यांच्या आधीन होतात. त्यांना खरोखरच त्या उपायांनी हवा तो परिणाम साधला आला कि नाही याची शहानिशा करता येत नाही...
अशी कामे भरपूर वेळ आणि पैसे खर्च करायला लावणारी असतात हे ओघाने आलेच. असो.