अविश्वसनीय

बाई सोडून गेली

नीलमोहर's picture
नीलमोहर in जे न देखे रवी...
18 Apr 2016 - 10:13 am

अवचित ते घडले, जणू आभाळ फाटले, धरणी कंपली
एक सुनामी आली की जगबुडी झाली,
अन बाई सोडून गेली

किती केली विनवणी, तिज आमिषेही दिली
पाषाणहृदयी त्या बालेला परि दया जराही न आली
अन बाई सोडून गेली

म्हणे तुम्हास बाई मिळेल दुसरी, जर शोधाशोध केली
जीव माझा जरी गेला, काळजी का कोणा इथे वाटली
अन बाई सोडून गेली

तरी बयेस कधी न कामास जुंपले, कायम लाडीगोडी केली
तऱ्हा तिच्या सांभाळत, आंजारत गोंजारत कामे करून घेतली
तरीही बाई सोडून गेली

अनर्थशास्त्रअविश्वसनीयविराणीसांत्वनाकरुणमुक्तकसमाजऔषधोपचार

गेले प्यायचे राहूनी..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
7 Apr 2016 - 9:52 am

गेले प्यायचे राहूनी
ते.. पहिल्या धारेचे देणे
माझ्या पास कालच्या विड्या
आणि थोडे बॉइल शेंगदाणे

आलो होतो रांगत मी
काही थेंबांसाठी फक्त
रात्रीचे-ओझे आता
कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त

आता पिऊन घेऊ रगड
राहू कण्हत कशाला!?
होते जगण्याचे निर्माल्य
नाही, तर.. फिरतो बोळा!

अनर्थशास्त्रअविश्वसनीयआरोग्यदायी पाककृतीइशाराकॉकटेल रेसिपीगरम पाण्याचे कुंडजिलबीफ्री स्टाइलभूछत्रीभयानकवीररसकविताविडंबनमौजमजा

अनाचे दोडोबा.. (शिमगा पेश्शल)

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
22 Mar 2016 - 9:31 am

उंच गुढीतच तपशीलाची गाठी
सकस धाग्यात अनाचे दोडोबा..

संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट
न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा..

विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत
संदर्भाचा तर खजिना अबाबा...

धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो
प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा

मालोजींकडे जातो घेऊन साथी
शिवकालीन चीजा आणि शिवबा..

त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार
चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा..

अविश्वसनीयकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीछावाफ्री स्टाइलभूछत्रीमुक्त कवितारोमांचकारी.भयानकहास्यवीररसअद्भुतरसरौद्ररसकविताचारोळ्यामुक्तकविडंबनमौजमजा

< अश्शी सासू असती तर >

अन्नू's picture
अन्नू in जे न देखे रवी...
9 Mar 2016 - 3:36 pm

अश्शी सासू असती तर, आंम्ही असे झालो नसतो
भर तारुण्यात बायकोला,
असं उठसूट सासुरवाडीला घेऊन गेलो नसतो
तिची नसती आली कुणालाच सर
अश्शी सासू असती तर

आळी सगळी गाजवली असती,
मिजास मोठी केली असती,
राजा बनून हिंडलो असतो
मेव्हणीही म्हणली नसती मेल्या बाजु सर
अश्शी सासू असती तर

घरातल्या कार्ट्यांजवळ तिला सोडून गेलो असतो
आंम्हीसुद्धा नवरा-बायको मग सतत जवळ दिसलो असतो
मळ्यातल्या शिदुबाने दिले असते अनेक वर
अश्शी सासू असती तर

अभय-लेखनअविश्वसनीयइशारागणेश पावलेगरम पाण्याचे कुंडजिलबीभयानकहास्यशांतरसमुक्तकविडंबनप्रतिशब्दव्युत्पत्तीविनोदमौजमजास्थिरचित्र

(असा नवरा असता तर..)

नीलमोहर's picture
नीलमोहर in जे न देखे रवी...
9 Mar 2016 - 10:19 am

असा नवरा असता तर, आम्ही असे झालो नसतो
भर उन्हात रिक्षावाला शोधत
हापिसला पायी निघालो नसतो
त्याच्या नखाची कुणाला आली नसती सर
असा नवरा असता तर

घरदार काय जग गाजवले असते
शॉपिंग हॉटेलिंग ऐश केली असती
आएम द क्वीन ऑफ द वर्ल्ड म्हणत मिरवले असते
पीसीएमसीत छोटसं आमचं असतं घर
असा नवरा असता तर

तळजाईच्या जंगलात निवांत हिंडलो असतो
आम्ही झेड ब्रिजवर तुम्हाला कधीच दिसलो नसतो
ओंकारेश्वराची कृपा झाली असती आम्हावर
असा नवरा असता तर

अविश्वसनीयप्रेम कविताविडंबन