असेहि एक विलगीकरण
अलिबाग या मुख्य शहरापासून आमचे गाव साधारण 20 किलोमीटर आहे. तसेच मांडवा जेट्टी पासून तीन-चार किलोमीटर अंतरावर एका कोपर्यात सासवणे गाव वसलेले आहे. आमच्या गावाला आणि आजूबाजूच्या गावांना सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या अशा समुद्रकिनारी पूर्वी स्थानिकांच्या वाडी, बाग घर होती याठिकाणी आता श्रीमंत लोकांनी जागा विकत घेऊन स्वतःचे बंगले बांधले आहेत व सुट्टीच्या दिवशी त्यांचे तिकडे येणे-जाणे होते तसेच अधूनमधून पार्ट्या होत असतात. या श्रीमंत लोकांमध्ये क्रिकेटर, फिल्मी दुनियेशी संबंधित लोक, तसेच मोठे उद्योगपती सामील आहेत.