लहान असतांना आम्ही एक खेळ खेळायचो. रिंगा-रिंगा रोझेस म्हणत एकमेकांचा हात धरून गोल गोल फिरायचे आणि मग ते हाशा-हुशा करत धड़ामकन खाली पडायचे... ते गोल गोल फिरण्यात आणि पडण्यात आम्हाला फारच मजा यायची...आमचा हा अगदी फ़ेवरेट टाइमपास होता.
पुढे कधीतरी एक पुस्तक वाचत असतांना त्यात या खेळाचा उल्लेख वाचला. तो असा कि सोळाव्या शतकात लंडन मधे प्लेग ने धूमाकुळ घातला होता. लाखो लोक मृत्यु पावले होते. वर वर अतिशय निरागस वाटणाऱ्याया खेळाची पार्श्वभूमि या महाभयानक ग्रेट प्लेग ची होती.
मुळ रूप -रिंग-ओ-रिंग-ओ-रोझेस, पॉकेट फुल्ल ऑफ पोसिस, अॅशस अॅशस वी ऑल फॉल डाउन.