कविकल्पना
पंख मिळावे कल्पनांचे
आकाश व्हावे कागदांचे
भावनेची बनून लेखणी
मनपाखरू स्वछंद उडावे
शब्द व्हावे जाणिवांचे
स्पर्श त्यांना अर्थांचे
विचारांची करून मांडणी
कवितांनी जन्म घ्यावे
ध्यास लागो तालासुरांचे
वेड लागो मज बोलांचे
त्या बोलांची बनून गाणी
रसिकांनी गात रहावे