मुक्तक

कुण्या गावचा कोण?

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
24 Nov 2016 - 11:36 am

ते गाव मला माहित नाही, म्हणून बरं आहे.
तिथल्या सावल्या, चांदणे, उन्ह .. सारं काही माझ्याकडे सहज येतं.

कुठल्याही प्रकारच्या नात्याचा अडसर लागत नाही त्यात!

मी ही त्याच्याच सारखा 'सहज' ..,
म्हणून त्याला सहजपणे सामावून घेतो माझ्यात.

एकदा त्या गावाने मला विचारले, "अरे मुला.. , येत का नाहिस इकडे आत.. वेस ऒलांडून!? "

मी म्हटले, "नको रे , कशाला उगाच गावकरी होऊ मी? त्यापेक्षा हेच चांगलं आहे."

गाव म्हणते, " जे तुझ्याकडे न मागता सहज येतय, त्याच्याकडे तू नाही येणारं.. सहज... एकदातरी? "

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

खादाडी

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
23 Nov 2016 - 11:50 am

गेल्या रविवारी गुळपीठ अन् मी दोघेच घरी होतो. आमच्या मुदपाकखान्यातील कौशल्याची मजल झक्कास म्यागी, उकडलेली अंडी, चहा या सीमांमध्ये मर्यादित आहे. दिवसभर याच सिद्धहस्त पाककृती आलटून पालटून सादर केल्यावर संध्याकाळी आम्ही भेळ खायला गेलो. गावाकडं म्हणजे संगमनेरला बराच फेमस असलेलं घुले भेळ सेंटर इकडं आंबेडकर नगर ला सुरु झालय.......

संस्कृतीपाकक्रियाइतिहासमुक्तकराहणीमौजमजाप्रकटन

योगशिबीरातले दिवस २: योगाभ्यास- A man is as old as his spine is flexible

आर्या१२३'s picture
आर्या१२३ in जनातलं, मनातलं
21 Nov 2016 - 3:58 pm

मागच्या लेखात शिबीराची ओळख, दिनचर्या सांगितली . या लेखात शिबीरात काय काय शिकलो हे थोडक्यात सांगत आहे. अर्थात शेवटी, केंद्रातले व्यासंगी, प्रगल्भ वक्ते हे सगळे अतिशय प्रभावीपणे अगदी सहजगत्या उलगडुन सांगतात. तिथले प्रदुषणमुक्त वातावरण, आहार-विहार आणी मुख्यतः सामुहिक साधनेचा खुप फरक पडतो. सकारात्मक स्पंदने मिळतात.
अष्टांग योगात यम नियम वगैरे असतात हे आपण वाचले/ऐकले आहे. पण यम नियम म्हणजे तरी काय, याबद्दल जे आम्हाला सांगितले ते इथे मुद्द्यानिशी मांडतेय . यातही ८ पैकी पहिल्या ५ बहिरंग योगावरच इथे सांगणार आहे.

संस्कृतीमुक्तकसमाजजीवनमानप्रकटनविचारआस्वादलेखअनुभवमाहिती

योगशिबीरातले दिवस १- ओळख, दिनचर्या

आर्या१२३'s picture
आर्या१२३ in जनातलं, मनातलं
21 Nov 2016 - 3:50 pm

विवेकानन्द केन्द्र, योग शिबिर

तसे कॉलेजात असताना रोटरॅक्टचा युथ कॅम्प अटेन्ड केला होता. पण तो अगदीच ४ दिवसाचा. ४ दिवस भुर्र्कन उडुन गेले होते. त्या त्या वयातले अनुभव वेगळेच असतात. तेव्हा शरीर, मन दोन्हीही तरल असते. इतरांसोबत कुठल्याही सवयीचे अ‍ॅब्सॉर्बीन्ग चटकन होत असते. पण पन्नाशीला टेकल्यावर आधी असलेल्या सवयींना मुरड घालुन आणि ऊन वारे लागुन… वास्तवाचे टक्के टोणपे खाउन रिजीड झालेल्या शरीराला आणि मनाला वळण लावायला वेळ लागतो.वयानुरुप शिबीरे बदलत असतीलही.

याच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेले 'विवेकानन्द केन्द्राचे योग शिबीर' असेच बरेच काही शिकवुन गेले.

संस्कृतीमुक्तकसमाजजीवनमानलेखअनुभवमाहिती

कर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ कार्य

आर्या१२३'s picture
आर्या१२३ in जनातलं, मनातलं
19 Nov 2016 - 9:31 pm

एकनाथजी रानडे यांचे कार्य
शिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न:
अशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता,
त्यांचे स्वतःचे शब्दच द्यायचे तर ," प्रत्येक डावपेचाला प्रति-डावपेच, प्रत्येक शस्राला प्रतिशस्त्र असतेच ", या सत्याने समग्र दर्शन, निवारण होणारच अशा अडचणीतून एकनाथजींनी कसा मार्ग काढला यातून होते.

धोरणसंस्कृतीधर्मइतिहासमुक्तकसमाजप्रकटनविचारआस्वादसमीक्षालेखमाहिती

सोयीचं प्रेम की प्रेमाची सोय ?

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
16 Nov 2016 - 5:12 pm

----------------------------------------------------------------------------------------
ती: अहो, आता हा वर्षाचा होईल, बघता बघता दिवस निघून गेले ..मी तरी किती दिवस घरी राहणार अजून ? आपण लगेच पाळणाघर बघायला हवं ! मी एक दोन ठिकाणी चौकशी करून ठेवली आहे. त्यातल्या त्यात शेजारच्या बिल्डिंगमधल्या काकू बऱ्या आहेत, आपल्यालाही बरे पडेल......
तो : बरं , उद्याच जाऊन चौकशी करू ....
दुसऱ्याच दिवशी काही रंगीत खेळणी, थोडा खाऊ , औषधं आणि छोटं गोड पार्सल काकूंकडे रवाना.....

----------------------------------------------------------------------------------------

मुक्तकजीवनमानप्रकटन

प्रारब्ध

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
2 Nov 2016 - 1:55 pm

प्रारब्ध

मुक्त आम्ही मृगद्वय
विहरत होतो रानावनात
कांचन वल्कले भरली
सीतेच्या मनात

टाकुनी मंत्र मरीच
शिरला सख्याच्या तनात
मोहवुनी रामास
केला त्याने घात

रामाच्या हाती
पारध सख्याचे झाले
आठवणीच्या ज्वाळेत
मी मात्र सती गेले

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

कुशी

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
2 Nov 2016 - 11:53 am

कुशी

अलगद जेंव्हा तू वळतो कुशीवर
रात्र पण करवट घेते
अनावर होते झोप अन
डोळ्यात स्वप्न उतरते

स्वप्नात जेंव्हा तू उतरतो
पहाट अपुरी पडते
वियोगाच्या कल्पनेने
झोप माझी उडते

देईन साथ मी कल्पांतापर्यंत
देशील ना तू पण ?
विचाराने या मी
रोज कुशी बदलते

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

तुझ्या आठवणीत...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
1 Nov 2016 - 2:47 pm

तुझ्या आठवणीत...

बहरलेल्या वेलीवर
एक कळी खोळंबली
तुझ्या आठवणीत ति
अजून नाही उमलली

गाभाऱ्यातील ज्योत
मंदपणे तेवली
तुझ्या आठवणीत
हळूच लवलवली

आभाळातील चांदणी
रात्रभर गुरफटली
तुझ्या आठवणीत
पहाटे ति चमचमली

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

स्मरशील का?

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
31 Oct 2016 - 11:25 am

स्मरशील का?

सदोदित आईच्या कुशीत
कधी माझ्या कुशीत शिरशील का?

सदोदित आईच्या मागे मागे
कधी माझ्या मागे फिरशील का?

सारे हट्ट आईला सांगतोस
कधी कधी मला मागशील का?

साऱ्या गुजगोष्टी आईला सांगतोस
कधी कधी मला सांगशील का?

पोटासाठी दूरदेशी मी
कधीतरी मला स्मरशील का?

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक