ठळक बातम्या
राजकीय-
> पंतप्रधान मोदी अजूनही भारतातच.
> राहुल गांधी यांनी आज कुठलाही मूर्खपणा केला नाही.
> अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकार मध्ये (पुन्हा) "जंग".
कला-
> "BA पास" नंतर "MA पास" चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित. "NET/ SET Qualified" आणि "Doctorate" या त्यापुढिल भागांचीही उत्सुकता.
> शाहरुख़ चा FAN लौकरच प्रदर्शित होणार. " जबरा फ़ैन" गाण्यात कंगना राणावत चा जलवा.
(चुकीची दुरुस्ती- "जबरा फैन" गाण्यात शाहरुख़च आहे, जरी कंगना सारखा दिसत असला तरी.)
क्रीड़ा-
> भारताकडून पराभूत होण्यास बांगलादेश सज्ज.