"स्वच्छ भारत अभियान" आणि आपण
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना‘चे उद्घाटन केले आहे. दिल्लीतील महर्षी वाल्मिकी मंदिरात पोहचून मोदींनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली. या निमित्त भाषण करताना देशवासीयांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.
आपण सगळे आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणार्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. आपला पैसा, आपला वेळ वाया जात आहे.
आपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनल्या आहेत. कचर्याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत.