विडंबन

मिपाकरलक्षणे समास द्वितीय

सस्नेह's picture
सस्नेह in जे न देखे रवी...
1 Jan 2014 - 4:07 pm

मिपाकरलक्षणे समास प्रथम
| | श्री मिसळ पाव ||
| डूआयडीलक्षणनाम समास द्वितीय |
मागा सांगितली लक्ष णे | मिपाकरांअंगी बाणे |
आता ऐका सोंग घेणे | असोनी येक आयडी |१ |
तयां नाव डुआयडी |नामे असती बहु फाकडी |
खवतुनी लाडीगोडी | करिती सदा |२|
घेई सोंगे कलह लावण्या | जुने स्कोर सेटल करण्या |
अथवा उगा मजा बघण्या | आयड्यांची |३|
बोली स्त्रीआयडींशी मधुर | मयतरी करण्या अति आतुर |
प्रतिसादी जो बहु चतुर | तो येक डुआयडी |४|
वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस |

भूछत्रीहास्यविडंबन

झिंगूनी गुत्त्यात सार्‍या...

धन्या's picture
धन्या in जे न देखे रवी...
31 Dec 2013 - 9:43 am

गझलसम्राट सुरेश भटांची माफी मागून "थट्टीफस" निमित्त:

झिंगूनी गुत्त्यात सार्‍या मी हो नाही बेवडा
दाबले जरी चिकनचिली मज वाटे ते घेवडा

कोण जाणे कोठुनी हे नवे दोस्त आले पुढे
मी असा की जमे "असा" मित्रमेळा एव्हढा

असे ही खिशात माझ्या चपटी औषधापरी
हे कंट्रीचे प्रेम माझे देशभक्त मी हो केव्हढा

कोणत्या इयत्तेत कळेना मी प्यावयास लागलो
अन्‌ कुठे मित्र गेले पुढे मी विकत राहीलो वडा

सांगती गुण माझे सारखे बायको अन्‌ चार पोरे
नवरा माझा दारुडया अन्‌ बाप आमचा बेवडा

हझलविडंबन

(प्रणयासक्ती)

मूकवाचक's picture
मूकवाचक in काथ्याकूट
28 Dec 2013 - 1:04 am

प्रणयासक्तांच्या प्रेमभावना आणि निसर्गदत्त वासनांप्रती पूर्ण आदर आहे.कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा).

<<<<<त्रैरंगात्मक त्रैमूर्ती: आणखी एक विचार>>>>

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
18 Dec 2013 - 3:19 pm

सध्या चाललेल्या वैचारिक धुळवडीनिमित्त आणखी एका त्रिगुणात्मक तत्वाचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं
आधी तीन आरत्यांचा नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती.
रेड, ग्रीन आणि ब्ल्यू ह्या तिन्ही रंगाच्या अंशावताराची हि दुनिया. खरंतर रंग असतात का असा प्रश्न येतो पण पाहणार्यांना ईष्ट देवतेचं स्मरण करायची संधी मिळावी, त्याद्वारे भक्ती वाढीस लागावी हा हेतू.
rgb

विडंबनप्रकटन

नाही चाखली चव 'लाडू'ची- (विडंबन)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
16 Dec 2013 - 12:06 pm

( चाल : नाही खर्चली कवडी दमडी...)

नाही चाखली चव 'लाडू'ची, नाही घेतला ठाव
उगिच घातला घाव, हाताने उगिच घातला घाव |धृ |

कुणी आपटे 'तो' फरशीवर
कुणा वाटते फुटे भिंतीवर
फुटण्याचे ना घेतो इतुके फोडियले तरी नाव .. |१|

'काळ' मम मुखी लाडू घरचा
जबडा न कळा सहतो वरचा
हात दुखोनी तुटेल भीती दाताचा न टिकाव .. |२|

जितुके लाडू तितुकी नावे
हृदये चिडुनी शिव्यासी द्यावे
मनीं न आवडे पत्नीपुढे मी दीन-अनाथ-'अ'भाव..|३|

.

अद्भुतरसविडंबनमौजमजा

झुक्या तुझ्या फेसबुकला

विनय_६६७'s picture
विनय_६६७ in जे न देखे रवी...
15 Dec 2013 - 10:34 am

मूळ गायक . कवी , चित्रपट निर्माते, आणि तमाम दुनियादारी च्या टीम ची माफी मागून एक भन्नाट प्रयत्न

झुक्या तुझ्या फेसबुकला
मर्यादाच नाही
सांग कुणा ब्लॉक करू
कळनाच काही

झुक्या तुला शोधू तुला
मला सांगना
खाते सुरु केले एव्हढाच
केला मी गुन्हा
झुक्या माझी पोस्ट
वाच एकदा तरी
झुक्या पामराची लेख
वाच एकदा तरी
माझ्या या नोटचा tag
लाव तुझ्या खाती
जगभर फिरण्याचा का
दिलास वाव तू आभासी
या जगताचा भासी देव तू
का कधी कुठे मैत्र जुळले
ब्रेक अप झाले

हास्यविडंबन

('अ-विचारजंती'- एक विकृती - बद्धकोष्ठ विनाशाचा मार्ग)

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
12 Dec 2013 - 10:43 pm

'अ'विचारजंतांवर काही म्हणायचा आधी इंटरनेट (आंतरजाला)च्या निर्मीती प्रक्रीये पासून हा लेख सुरु करतो. सध्या संगणकीय भाषेत म्हणायचे झाले तर अर्पानेटच्या पहिल्या वापरापासून इंटरनेट वापर प्रक्रिया सुरु आहे. ह्याच इंटरनेटचा वापर करून 'विभिन्न तत्व' लेखकू कपाळकरंटेपणाणे (वैचारिक भाषा) एकत्र आले आणि आजची आंतरजालिय लेखन सृष्टी डोळ्यांसमोर आहे.

विडंबनविरंगुळा

जत्रा

विनय_६६७'s picture
विनय_६६७ in जे न देखे रवी...
9 Dec 2013 - 9:47 pm

मूळ कविता, कवी ,सर्वांची माफी मागून

जत्रा -भारनियमनाची

हा भार सोसंना
जनता झालीय हैराण
गावात लाईट नाई
बंद पडलीय गिरण ,
सांग तू माझ्या राजा कस
आणू मी दळण ,
दिवाळी आली हि दारात
पर नाई नाई लाईट हि घरात

बोंब बोंब बोंब बोंब बोंब . . . . . .
-------------विनय गदो

विडंबन

बोकुल्या ये ना

विनय_६६७'s picture
विनय_६६७ in जे न देखे रवी...
9 Dec 2013 - 5:43 pm

मुळ कवी , कविता , गायक , संगीतकार या सर्वांची माफी मागून एक निरागस प्रयत्न

बोकुल्या ये ना ,
प्रिया जगू कशी तुझ्याविना मी राजा रे
कशी ही जिंदगीत आणिबाणी रे
ये ना बोकू

मी तर प्रेम दिवाणी मनुली
दे प्यार जरासा बोकुल्या

प्रिया, उगाच मी माणसांत बुडाले
तुला सोडून मी छळून गेले रे
ये बोकुल्या !
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले बोकुल्या तुला रे

विडंबन

नव'मिपाकराचे' मूरलेल्या 'मिपाकरास' पत्र (विडंबन)

युगन्धरा@मिसलपाव's picture
युगन्धरा@मिसलपाव in जनातलं, मनातलं
3 Dec 2013 - 4:45 pm

प्रिय मिपाकरांनो,
('असुद्लेखन'च्या चुका चालु ठेवत)

प्रत्येक हौशी मराठी माणसाप्रमाणे मी ही मिपावर लेखन करण्यास बरेच दिवसांपासुन खुप उत्सुक होते. बरिच स्वप्ने रंगवत होते.

पण आज मला जाणिव होते आहे की 'मिपा' म्ह्णजे फक्त मराठी साहित्य न्ह्वे. तर त्याहि पलिकडे 'मिपा' म्ह्णजे 'असुद्लेखना'च्या चुका काढणारया तज्ञ मंडळींची फौज, दुसरयांच्या भावना न समजुन घेणारया लोकांची गर्दि .

विडंबनप्रतिसाद